अफगाणिस्तान क्रिकेट संघ

अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (पश्तो: دافغانستان کرکټ ملي لوبډله‎, दारी: تیم ملی کرکت افغانستان) हा अफगाणिस्तान देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटचा इतिहास जुना असला तरीही राष्ट्रीय संघाला विशेष यश मिळत नव्हते. १९९५ साली अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाची स्थापना झाली. २०११ साली अफगाणिस्तानला एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या संघाचा दर्जा मिळाला. अफगाणिस्तानमधील असुरक्षीत परिस्थितीमुळे हा संघ आपले गृहसामने इतरत्रच खेळतो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे देश संस्थापक असलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती १५ जून १९०९ रोजी लॉर्ड्स येथे इंपेरियल क्रिकेट परिषद म्हणून स्थापन झाली. ह्या परिषदेमध्ये सुरवातीला फक्त राष्ट्रकुलमधील देशांनाच सामिल होता येत होते. ह्या सदस्यांनंतर १९२६ मध्ये भारत, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज, आणि त्यानंतर १९५३ मध्ये पाकिस्तान सामील झाला. १९६१ मध्ये, राष्ट्रकुलामधून बाहेर पडल्याने दक्षिण आफ्रिकेने सदस्यत्वाचा राजीनामा दिला. १९६५ मध्ये इंपेरियल क्रिकेट परिषदेचे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असे करण्यात आले त्याचबरोबर पहिल्यांदाच नियमन मंडळात राष्ट्रकुलाच्या बाहेरील देशांच्या निवडीला मंजूरी देण्याबाबत नवीन नियम केले गेले. नियमन मंडळामध्ये नव्याने निवड झालेला कोणताही सदस्य फक्त सहयोगी (असोसिएट) सदस्य म्हणून निवड केला जातो ज्याला पुर्ण सदस्य होण्याची संधी असते. फिजी आणि अमेरिका हे सर्वात पहिले सहयोगी सदस्य होते. १९८९ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नाव पुन्हा एकदा बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती असे केले गेले. १९९१ मध्ये दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा पुर्ण सदस्य म्हणून निवडला गेला आणि १९९२ मध्ये झिम्बाब्वेची निवड. सर्वात अलिकडील पुर्ण सदस्य अफगाणिस्तान आणि आयर्लंड, २०१७ साली नियुक्त केला गेला. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीमध्ये एकूण १०५ सदस्य आहेत.

इंग्लंड

इंग्लंड युनायटेड किंग्डमचा एक घटकदेश आहे. युनायटेड किंग्डमची ८३% लोकसंख्या इंग्लंडमध्ये राहते; तर क्षेत्रफळानुसार इंग्लंड ग्रेट ब्रिटनचे दोन तृतीयांश क्षेत्रफळ व्यापतो. इंग्लंडच्या उत्तरेस स्कॉटलंड, पश्चिमेस वेल्स यांच्या भूसीमा असून इअतर सर्व बाजूंनी उत्तर समुद्र, आयरिश समुद्र, केल्टिक समुद्र, ब्रिस्टल खाडी व इंग्लिश खाडी यांनी इंग्लंडला वेढले आहे. इंग्लंडची राजधानी असलेले लंडन ग्रेट ब्रिटनमधील सर्वात मोठे महानगर असून अनेक मानकांनुसार युरोपीय संघातील सर्वात मोठे नागरी क्षेत्र आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. कसोटी क्रिकेट खेळणारा तो इंग्लंडसोबत सर्वात जुना क्रिकेट संघ असून ह्या दोन संघांदरम्यान इ.स. १८७७ साली पहिला कसोटी सामना खेळवला गेला होता.

क्रिकेट

क्रिकेट हा क्रिकेट मैदानावर प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान, चेंडू(बाॅल) आणि फळी (बॅट) ने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानाच्या मध्यभागी एक २२-यार्ड लांबीची मुख्य खेळपट्टी असते. तिच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी ३ लाकडी यष्टी असतात. एक संघ फलंदाजी संघ म्हणून खेळतो. हा संघ जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षण करतो. खेळाच्या प्रत्येक टप्प्याला डाव असे म्हणतात. संघाचे दहा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निर्धारित षटके पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात. एका किंवा दोन डावांत अतिरिक्त धावा मिळून ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो विजेता संघ म्हणून घोषित होतो.

क्रिकेट विश्वचषक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (ICC) दर चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन करते. कसोटी व एकदिवसीय सामने खेळणार्‍या देशाशिवाय ICC Trophy तील काही देश विश्वचषक स्पर्धेत सहभागी होतात.

क्रिकेट विश्वचषक, १९८३

क्रिकेट विश्वचषक, १९८३ (प्रुडेंशियल चषक, १९८३) ही विश्वचषक स्पर्धा तिसऱ्यांदा आयोजित झालेली विश्वचषक स्पर्धा होती. ही स्पर्धा ९ जून ते २५ जून दरम्यान इंग्लंडमध्ये खेळवण्यात आली. स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले होते.

क्रिकेट विश्वचषक, १९९९

१९९९चा क्रिकेट विश्वचषक इंग्लंडने आयोजित केला होता. इंग्लंडशिवाय आयर्लंड, वेल्स, स्कॉटलंड आणि नेदरलँड्समध्येही सामने झाले. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघ विजयी ठरला.. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला. एकतर्फी झालेली ही अंतिम लढत लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झाली. न्यू झीलँड व दक्षिण आफ्रिका हे संघ उपांत्य फेरीत पोचले.

क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८

क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ ही एक क्रिकेट स्पर्धा मार्च २०१८ मध्ये झिम्बाब्वे येथे पार पडली. ह्या स्पर्धेमध्ये २०१९ क्रिकेट विश्वचषक मध्ये सामिल होणारे अंतिम २ संघ ठरवले गेले. ह्या स्पर्धेतील अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीज हे दोन अव्वल संघ २०१९ क्रिकेट विश्वचषक साठी पात्र ठरले आणि यजमान (इंग्लंड) व एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धातून विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरलेल्या ७ संघांना सामील होतील. अंतिम सामन्यात अफगाणिस्तानने विंडीजचा ७ गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अफगाणिस्तानाचा मोहम्मद शहजाद सामनावीर तर झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाला मालिकावीराचा पुरस्कार दिला गेला.योजनेप्रमाणे ही स्पर्धा बांग्लादेशमध्ये होणार होती. पण मे २०१७ मध्ये ही स्पर्धा दुसरीकडे खेळविण्याचे ठरले कारण बांग्लादेश विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरला. त्यानुसार ह्या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यासाठी झिम्बाब्वे, संयुक्त अरब अमिराती, आयर्लंड आणि स्कॉटलंड या देशांनी बोली लावली.

दुबई

दुबई (अरबी: دبي) हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती ह्या देशामधील सर्वांधिक लोकसंख्येचे शहर व अबु धाबीखालोखाल आकाराने दुसऱ्या क्रमांकाची अमिरात आहे. दुबई शहर दुबई अमिरातीच्या उत्तर भागात पर्शियन आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे. अबु धाबी व दुबई ह्या दोन अमिरातींना सर्वाधिक राजकीय महत्त्व असून देशाच्या विधिमंडळामध्ये त्यांना नकाराधिकार उपलब्ध आहे. दुबई-अजमान-शारजा ह्या महानगरामधील सर्वात मोठे शहर असलेल्या दुबईची लोकसंख्या २०१३ साली सुमारे २१ लाख होती.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तथा बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया ही भारतातील क्रिकेटचे नियमन करणारी संस्था आहे.

वेल्स

वेल्स हा युनायटेड किंग्डमच्या चार घटक देशांपैकी एक आहे. वेल्सच्या पूर्वेस इंग्लंड तर इतर तिन्ही बाजूंना अटलांटिक महासागर आहे.

१९७५ क्रिकेट विश्वचषक

१९७५ क्रिकेट विश्वचषक (अधिक्रुत नाव प्रुडंशियल चषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे पहिले आयोजन होते. हि स्पर्धा इंग्लंडमध्ये ७ जुन ते २१ जुन १९७५ च्या दरम्यान खेळवली गेली. हि स्पर्धा प्रुडंशियल ऍश्युरन्स कंपनीने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले. सहभागी संघातील ६ संघ कसोटी खेळणारे (ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान व वेस्ट इंडिज) तसेच श्रीलंका व पुर्व आफ्रिका. साखळी सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ बाद फेरीत गेले.

२०१९ पुलवामा हल्ला

दिनांक १४ फेब्रुवारी २०१९ला भारतातील जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर, सुरक्षा दलांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या एका ताफ्यावर , आपल्या वाहनासकट आत्मघाती हल्लेखोराने हल्ला केला.या वाहनात स्फोटके भरलेली होती. यात केंद्रीय राखीव बलातील सुमारे ४० जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर हल्लेखोर देखील मरण पावला. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित ईस्लामिक गट जैश-ए-महोम्मदने स्वीकारली आहे.;आदिल अहमद डार उर्फ आदिल अहमद गादी टेकरनवाला उर्फ वकास कमांडो असे त्या आत्मघाती हल्लेखोराचे नाव होते. या अपघातानंतर त्या हल्लेखोराचा एक व्हिडियोपण प्रसृत करण्यात आला.या काफिल्यात सुमारे ७८ वाहने होती.त्यात एकूण सुमारे २५०० पेक्षा जास्त जवान होते.

इतर भाषांत वाचा