हांबुर्ग


हांबुर्ग (जर्मन: Freie und Hansestadt Hamburg) हे जर्मनीतील दुसर्‍या क्रमांकाचे शहर व जर्मनीच्या १६ राज्यांपैकी एक आहे.

एल्बे नदीच्या काठावर वसलेले हांबुर्ग शहर युरोपातील ३रे व जगातील ९वे सर्वात मोठे बंदर आहे. हांबुर्ग हे जर्मनी मधील सर्वात मोठे बंदर आहे.

हांबुर्ग
Freie und Hansestadt Hamburg
जर्मनीमधील शहर

Hamburg Rathaus

Flag of Hamburg
ध्वज
DEU Hamburg COA
चिन्ह
Deutschland Lage von Hamburg
हांबुर्गचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 53°33′55″N 10°0′05″E / 53.56528°N 10.00139°E

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य हांबुर्ग
क्षेत्रफळ ७५५ चौ. किमी (२९२ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १७,६९,११७
  - घनता २,३४३ /चौ. किमी (६,०७० /चौ. मैल)
http://www.hamburg.de/
इमटेक अरेना

इमटेक अरेना (जर्मन: Imtech Arena) हे जर्मनी देशाच्या हांबुर्ग शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या हांबुर्गर एस.फाउ. ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. २००१ सालापर्यंत हे स्टेडियम फोल्क्सपार्कस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे.

१९७४ व २००६ फिफा विश्वचषक, युएफा यूरो १९८८ ह्या स्पर्धांमधील साखळी व बाद फेरीचे सामने तसेच युएफा युरोपा लीगच्या २०१० हंगामामधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.

एअरबस ए३२०

एअरबस ए३२० हा एअरबस ह्या कंपनीने उत्पादित केलेला मध्यम पल्ल्याच्या, मध्यम क्षमतेच्या प्रवासी जेट विमानांचा एक समूह आहे. साधारणपणे १५० प्रवासी ५,४०० किमी (२,९०० समुद्री मैल) वाहून नेण्याची क्षमता या विमानात आहे. ह्या विमानाचे उत्पादन व अंतिम जोडणी फ्रान्सच्या तुलूझ व जर्मनीच्या हांबुर्ग येथील कारखान्यांमध्ये करण्यात येते. ए३२० विमान समूहामध्ये ए३१८, ए३१९ व ए३२१ ह्या बनावटींची विमाने देखील तयार करण्यात येतात.

ए३२० समूहातील पहिले विमान मार्च १९८४ मध्ये बनवले गेले व एअर फ्रान्सने हे विमान सर्वप्रथम मार्च १९८८ मध्ये वापरात आणले. आजच्या घडीला ए३२० समूहाची ७,५२१ विमाने जगभर वापरात आहेत तर ५,४७९ नव्या विमानांच्या पक्क्या ऑर्डरी एअरबसला मिळाल्या आहेत. किफायती दरात प्रवासी विमानसेवा पुरवण्याचे लक्ष असणाऱ्या अनेक कंपन्यांसाठी ए३२० विमान आकर्षक ठरले आहे. आजच्या घडीला ए३२० समूहाची ३९४ विमाने आपल्या ताफ्यात बाळगणारी अमेरिकन एअरलाइन्स ही ए३२० समूहाची जगातील सर्वाधिक वापरकर्ती कंपनी आहे. भारतीय विमानवाहतूक कंपनी इंडिगो आपल्या देशांतर्गत प्रवासी सेवेसाठी पूर्णपणे ए३२० रचनेची विमाने वापरते. बोइंग कंपनीचे ७३७ हे एअरबस ए-३२०चे थेट स्पर्धक प्रकारचे विमान मानले जाते.

डिसेंबर २०१० मध्ये एअरबसने ए३२० विमानाची ए३२०निओ (न्यू इंजिन ऑप्शन, New Engine Option) ही अद्ययावत शृंखला उद्धाटित केली. ए३२०निओ विमानांमध्ये नव्या व इंधनाची बचत करणाऱ्या इंजिनांचा वापर करण्यात आला असून ह्यामुळे १५ टक्के इंधनाची बचत होईल असा अंदाज एअरबसने मांडला आहे. पहिले ए३२०निओ विमान २५ जानेवारी २०१६ रोजी लुफ्तान्साने वापरात आणले.

क्योल्न

क्योल्न (जर्मन: Köln; इंग्लिश वापर: Cologne; कोलोन) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील सर्वात मोठे तर जर्मनीमधील बर्लिन, हांबुर्ग व म्युनिक खालोखाल चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. जर्मनीच्या पश्चिम भागातील रूर परिसरामध्ये ऱ्हाइन नदीच्या काठावर वसलेल्या क्योल्नची लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. येथील क्योल्नर डोम नावाच्या कॅथेड्रलसाठी प्रसिद्ध असणारे क्योल्न ऱ्हाइनलँड परिसरामधील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.

अंदाजे पहिल्या शतकादरम्यान वसवल्या गेलेल्या क्योल्नवर इतिहासामध्ये अनेकदा फ्रेंचांनी व ब्रिटिशांनी सत्ता गाजवली. मध्य युगादरम्यान आल्प्स पर्वतरांगेच्या उत्तरेकडील सर्वात महत्त्वाच्या व्यापारी व वाहतूक केंद्रांपैकी एक असलेले क्योल्न हान्से संघामधील आघाडीचे शहर होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांकडून केल्या गेलेल्या असंख्य बाँबहल्ल्यांदरम्यान क्योल्नची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. युद्ध संपल्यानंतर जर्मन सरकारने येथील अनेक ऐतिहासिक वास्तू पुन्हा बांधण्याचे प्रयत्न केले.

सध्या क्योल्न जर्मनीमधील एक आघाडीचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे.

जर्मनी

जर्मनी (जर्मन: , Deutschland)(अधिकृत नाव: जर्मन संघराज्याचे प्रजासत्ताक , Bundesrepublik_Deutschland, जर्मन: , आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती:ˈbʊndəsʁepuˌbliːk ˈdɔʏtʃlant ) हा जगातल्या औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांपैकी एक देश असून तो युरोप खंडाच्या मध्यभागी आहे. जर्मनीमध्ये भारतासारखी संसदीय लोकशाही पद्धत असून त्याची प्रथम स्थापना १८७१ मध्ये झाली.

जर्मनीची राज्ये

जर्मनी देश एकूण १६ राज्यांमध्ये विभागला गेला आहे ज्यांपैकी ३ महानगर राज्ये आहेत.

ह्या १६ राज्यांपैकी ५ राज्ये दुसर्‍या महायुद्धानंतर तयार झालेल्या पूर्व जर्मनी देशामध्ये समाविष्ट करण्यात आली होती तर बर्लिनचे पूर्व बर्लिन व पश्चिम बर्लिन हे दोन विभाग करण्यात आले होते. १९९० सालच्या जर्मन एकत्रीकरणानंतर ही सर्व राज्ये जर्मनी ह्या एकसंध देशामध्ये विलीन करण्यात आली.

जर्मनीमधील शहरांची यादी

ह्या जर्मनीमधील शहरांच्या यादीमध्ये जर्मनी देशामधील १ लाख पेक्षा अधिक शहरे व त्यांचे तपशील दिले आहेत.

जुलै २४

जुलै २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०५ वा किंवा लीप वर्षात २०६ वा दिवस असतो.

जुलै २८

जुलै २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०९ वा किंवा लीप वर्षात २१० वा दिवस असतो.

फेब्रुवारी १७

फेब्रुवारी १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४८ वा किंवा लीप वर्षात ४८ वा दिवस असतो.

फ्रांकफुर्ट

फ़्रांकफुर्ट आम माइन हे जर्मनीच्या हेसेन राज्यातील सर्वात मोठे शहर असून बर्लिन, हांबुर्ग, म्युन्शेन, क्यॉल्न या शहरांनंतर जर्मनीतले पाचवे मोठे शहर आहे.

माइन नदीकाठावर वसलेले फ्रांकफुर्ट जर्मनीतील आर्थिक व दळणवळण-वाहतुकीचे केंद्र आहे. युरोपीय केंद्रीय बँक, फ्रांकफुर्ट स्टॉक एक्स्चेंज फ्रांकफुर्टमध्येच असल्यामुळे हे शहर युरोपाच्या मुख्यभूमीवरील महत्त्वाच्या दोन आर्थिक केंद्रांपैकी(दुसरे केंद्र पॅरिस) एक मानले जाते.

बीटल्स

बीटल्स (इंग्रजी: The Beatles, द बीटल्स ;) हा इ.स. १९६०-७०च्या दशकांमध्ये कार्यरत असलेला इंग्लिश रॉक संगीतचमू होता. हा पॉप संगीताच्या इतिहासातील व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी व नावाजला गेलेला चमू इ.स. १९६० साली इंग्लंडातील लिव्हरपूल येथे स्थापन झाला. इ.स. १९६२पासून या चमूत जॉन लेनन (रिदम गिटार, गायन), पॉल मॅकार्टनी (बास गिटार, गायन), जॉर्ज हॅरिसन (लीड गिटार, गायन) आणि रिंगो स्टार (ड्रम, गायन) हे कलाकार होते. स्किफल व इ.स. १९५० सालच्या रॉक अँड रोल संगीतप्रकारांपासून सुरुवात करून या चमूने पुढे पॉप बॅलाड ते सायकिडिलिक रॉक असे अनेक संगीतप्रकार अभिनव पद्धतीने हाताळले. सुरुवातीला त्यांच्या अफाट लोकप्रियतेला 'बीटलमॅनिया' या नावाने खूळ समजले जात होते. हे लोकमत पुढे त्यांची गीतलेखनकला सफाईदार व शिष्टसंमत झाल्यावर बदलले. इ.स. १९६०सालच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींतल्या तत्त्वप्रणालीचे ते प्रतीक बनले.

सुरुवातीला लेनन, मॅकार्टनी, हॅरिसन, स्टुअर्ट सटक्लिफ (बास) आणि पीट बेस्ट (ड्रम) या पाच बीटल्सांनी लिव्हरपूल आणि हांबुर्ग येथील क्लबांतून आपला जम बसवला. इ.स. १९६१ साली सटक्लिफाने चमू सोडला आणि बेस्टाच्या बदली रिंगो स्टार चमूत सामील झाला. एका संगीतविषयक दुकानाचा मालक, ब्रायन एपष्टाइन याने बीटल्सांचा व्यवस्थापक म्हणून काम करायची तयारी दाखवल्यावर या संगीतचमूला व्यावसायिक स्पर्श लाभला. तसेच निर्माता जॉर्ज मार्टिन याच्या मदतीने 'लव्ह मी डू' या ध्वनिफितीच्या निर्मितीनंतर बीटल्सांना इ.स. १९६२ साली व्यावसायिक स्तरावर चांगले यश मिळाले. इ.स. १९७० साली हा चमू फुटेपर्यंत, देशोदेशी कार्यक्रम करणे आणि इंग्लंडात असताना आपल्या स्टुडिओत नवीन ध्वनिफितींचे ध्वनिमुद्रण करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. यानंतर पाचही बीटल्स स्वतंत्रपणे संगीतक्षेत्रात कार्य करू लागले. इ.स. १९८० साली लेननाचा त्याच्या न्यू यॉर्क शहरातल्या घराबाहेर खून झाला, तर इ.स. २००१ साली हॅरिसनाचे कर्करोगाने निधन झाले. मॅकार्टनी आणि स्टार अजूनही सक्रीय आहेत.

ब्रेमन

ब्रेमन (जर्मन: Bremen) हे जर्मनी देशाच्या ब्रेमन ह्या राज्याच्या दोन शहरांपैकी एक आहे (दुसरे शहर: ब्रेमरहाफेन). हान्से संघामधील हे शहर जर्मनीच्या उत्तर भागात वेसर नदीच्या काठावर वसले असून ते एक महत्त्वाचे बंदर आहे. नीडरजाक्सन राज्याने ब्रेमनला सर्व बाजूंनी वेढले आहे.

२०१२ साली ब्रेमन शहराची लोकसंख्या सुमारे ५.५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २४ लाख होती. ब्रेमन हे उत्तर जर्मनीमधील हांबुर्ग खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. महाराष्ट्रातील पुणे हे ब्रेमेनचे भगिनी शहर आहे

मे ४

मे ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२४ वा किंवा लीप वर्षात १२५ वा दिवस असतो.

श्लेस्विग-होल्श्टाइन

श्लेस्विग-होल्श्टाइन (जर्मन: Schleswig-Holstein) हे जर्मनी देशामधील सर्वात उत्तरेकडील राज्य आहे. श्लेस्विग-होल्श्टाइनच्या उत्तरेस डेन्मार्क देश, पूर्वेस बाल्टिक समुद्र, पश्चिमेस उत्तर समुद्र तर दक्षिणेस जर्मनीची नीडर जाक्सन, हांबुर्ग व मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न ही राज्ये आहेत. कील ही श्लेस्विग-होल्श्टाइनची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ल्युबेक, फ्लेन्सबुर्ग व नॉयम्युन्स्टर ही इतर मोठी शहरे आहेत.

हांबुर्गर एस.फाउ.

१९६३-६४ •

१९६४-६५ •

१९६५-६६ •

१९६६-६७ •

१९६७-६८ •

१९६८-६९ •

१९६९-७० •

१९७०-७१ •

१९७१-७२ १९७२-७३ •

१९७३-७४ •

१९७४-७५ •

१९७५-७६ •

१९७६-७७ •

१९७७-७८ •

१९७८-७९ •

१९७९-८० •

१९८०-८१ १९८१-८२ •

१९८२-८३ •

१९८३-८४ •

१९८४-८५ •

१९८५-८६ •

१९८६-८७ •

१९८७-८८ •

१९८८-८९ •

१९८९-९० १९९०-९१ •

१९९१-९२ •

१९९२-९३ •

१९९३-९४ •

१९९४-९५ •

१९९५-९६ •

१९९६-९७ •

१९९७-९८ •

१९९८-९९ १९९९-०० •

२०००-०१ •

२००१-०२ •

२००२-०३ •

२००३-०४ •

२००४-०५ •

२००५-०६ •

२००६-०७ •

२००७-०८

१९७४ फिफा विश्वचषक

१९७४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती पश्चिम जर्मनी देशामध्ये १३ जून ते ७ जुलै १९७४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ९८ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

यजमान पश्चिम जर्मनीने अंतिम फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सला २–१ असे पराभूत करून आपले दुसरे अजिंक्यपद जिंकले.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.