स्पॅनिश भाषा

स्पॅनिश, एस्पान्योल, कास्तेयानो
Español, Castellano
स्थानिक वापर युरोपचा काही भाग, मध्य अमेरिकादक्षिण अमेरिकेचा काही भाग, उत्तर अमेरिकाकॅरिबियन बेटांचा काही भाग, उत्तर आफ्रिका (इक्वेटोरियल गियाना, पश्चिम सहारा) आणि आशिया-प्रशांत (फिलिपाईन्स)
लोकसंख्या -
क्रम २-४ (विविध अंदाज)
बोलीभाषा -
भाषाकुळ
इंडो-युरोपीय

 इटालिक
  रोमान्स
   पश्चिम इटालिक
    गॅलो-इबेरियन
     इबेरो-रोमान्स
      पश्चिम इबेरियन

  • स्पॅनिश, एस्पान्योल, कास्तेयानो
लिपी रोमन लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर स्पेन, आर्जेन्टिना, बोलिव्हिया, चिली, कोलंबिया, कॉस्टा रिका, क्युबा, डॉमिनिकन प्रजासत्ताक, इक्वेडोर, एल साल्वाडोर, इक्वेटोरियल गियाना, युरोपीय महासंघ, ग्वाटेमाला, होन्डुरास, मेक्सिको, निकाराग्वा, पनामा, पॅराग्वे, पेरू, पोर्तो रिको, संयुक्त राष्ट्रे, उरुग्वे, व्हेनेझुएला
भाषा संकेत
ISO ६३९-१ es
ISO ६३९-२ spa
अॅग्रोव्हॉक

ॲग्रोव्हॉक हा एक बहुभाषीय शब्दकोश आहे. ह्यात कृषी विज्ञान, वन विज्ञान, मत्स्य पालन अणि संबंधित असलेल्या विज्ञानातले शब्द आहेत. अग्रोवोक हे एफ. ऐ. ओ. च्या पाच मुख्य भाशन (इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश भाषा, चीनी अणि अरबी भाषा) मध्ये उपलब्ध आहे. तसेच, हे चेक, हिंदी भाषा, जर्मन भाषा, जपानी भाषा, इटालियन भाषा,पोर्तुगीज, स्लोवाक अणि थाई मध्ये सुद्धा उपलब्ध आहे.

आय.एस.ओ. ६३९-१

आय.एस.ओ. ६३९-१ (इंग्लिश: ISO 639-1:2002) हा आय.एस.ओ. ६३९ ह्या आंतरराष्ट्रीय भाषा प्रमाणाचा पहिला भाग आहे. ह्यामधील प्रत्येक भाषेसाठी दोन अक्षरी संक्षेप ठरवण्यात आला आहे. हा संक्षेप जगतील एकूण १३६ भाषांसाठी वपरला जातो.

आय.एस.ओ. ६३९-१ ची काही उदाहरणे खालील आहेत:

मराठी भाषा: mr

इंग्लिश भाषा: en

हिंदी भाषा: hi

फ्रेंच भाषा: fr

जर्मन भाषा: de

ग्रीक भाषा: el

डच भाषा: nlसध्या अनेक बहु-भाषिक संकेतस्थळे विविध भाषांचा उल्लेख करण्यासाठी ह्या कोडचा वपर करतात. उदा. विकिपीडियावर mr.wikipedia.org हा पत्ता मराठी विकिपीडियासाठी वापरात आहे.

ग्वातेमाला सिटी

ग्वातेमाला सिटी (स्पॅनिश: La Nueva Guatemala de la Asunción) ही ग्वातेमाला ह्या मध्य अमेरिकेतील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ग्वातेमाला सिटी हे मध्य अमेरिकेतील सर्वांत मोठे शहर आहे.

चिली

चिलीचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Chile उच्चार ) हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे. चिलीच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला आर्जेन्टिना हे देश आहेत. चिलीला ६,४३५ किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. प्रशांत महासागरातील ईस्टर द्वीप चिलीच्या अधिपत्याखाली येते तर अंटार्क्टिका खंडाच्या १२,५०,००० वर्ग किमी भागावर चिलीने आपला हक्क सांगितला आहे.

१६व्या शतकामध्ये स्पॅनिश शोधक येण्यापुर्वी येथे इन्का साम्राज्याची सत्ता होती. १२ फेब्रुवारी १८१८ रोजी चिलीला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. आजच्या घडिला चिली हा दक्षिण अमेरिकेमधील सर्वात स्थिर व समृद्ध देश आहे.चिली देशाची एकुण लांबी (दक्षिणोत्तर) ४,३०० किमी तर सरासरी रुंदी (पूर्व-पश्चिम) केवळ १७५ किमी आहे. ह्यामुळे चिली मध्ये विविध प्रकारचे हवामान आढळते.

चिलीचे एकूण क्षेत्रफळ ७,५६,९४५ वर्ग किलोमीटर एवढे असून लोकसंख्या १७.१ दशलक्ष आहे. या देशाचा मुख्य धर्म ख्रिश्चन असून स्पॅनिश ही राष्ट्रभाषा आहे. पेसो हे चलन असलेल्या या देशाचे प्रतिव्यक्ती उत्पन्न १०,०८४ अमेरिकन डॅालर एवढे आहे. चिलीला १८ सप्टेंबर १८१० रोजी स्पेन कडून स्वातंत्र्य मिळाले.

चिलीत संपूर्ण जगातून सर्वाधिक तांब्याचे उत्पादन होते. त्यामुळे हा जगातील सर्वात मोठा तांब्याची निर्यात करणारा देश आहे. चिलीत नायट्रेट, सोने, चांदी, लिथियम व लोहाचे सुद्धा प्रचंड साठे आहेत.

तोरिजा (किल्ला)

तोरिजा किल्ला (स्पॅनिश भाषा: Castillo de Torija) हा स्पेन देशातला एक किल्ला आहे. या किल्ल्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. युनेस्कोने या किल्ल्याला जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे।

फ्लोरिडा

फ्लोरिडा (इंग्लिश: Florida) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय टोकापाशी वसलेले फ्लोरिडा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या (कॅलिफोर्निया, टेक्सास व न्यू यॉर्क राज्यांच्या खालोखाल) क्रमांकाचे राज्य आहे.

फ्लोरिडाच्या पश्चिमेला मेक्सिकोचे आखात, पूर्वेला अटलांटिक महासागर तर उत्तरेला जॉर्जिया व अलाबामा ही राज्ये आहेत. फ्लोरिडाचा राज्याचा बराचसा भूभाग मेक्सिकोचे आखात व अटलांटिक महासागर ह्यंमधील द्वीपकल्पावर वसला आहे ज्यामुळे फ्लोरिडाला २,१७० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. फ्लोरिडाच्या वायव्य भागात पूर्व-पश्चिम धावणारा एक चिंचोळा पट्टा आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये फ्लोरिडा पॅनहँडल असे संबोधतात. फ्लोरिडाच्या दक्षिणेला सुमारे ४,५०० लहान-मोठ्या बेटांचा (कीज) एक द्वीपसमूह असून की वेस्ट हे सर्वात पश्चिमेकडील बेट आहे. टॅलाहासी ही फ्लोरिडाची राजधानी, जॅक्सनव्हिल हे सर्वात मोठे शहर तर मायामी-फोर्ट लॉडरडेल, टँपा, सेंट पीटर्सबर्ग, ओरलँडो ही येथील इतर मोठी शहरे आहेत.

फ्लोरिडा हे अमेरिकेमधील अतिप्रगत राज्यांपैकी एक आहे. वर्षातील बाराही महिने सूर्यप्रकाशाचे दिवस, सौम्य हवामान, रम्य समुद्रकिनारे इत्यादी कारणांमुळे फ्लोरिडा हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. तसेच येथे अमेरिकेमधील व जगभरातील अनेक धनाढ्य उद्योगपती, सिनेकलाकार व खेळाडूंचे वास्तव्य आहे. येथील अंदाजे २ कोटी लोकसंख्येच्या २२ टक्के लोक लॅटिन अमेरिकन वंशाचे आहेत व १८ टक्के लोक केवळ स्पॅनिश भाषा बोलतात.

देशातील चौथ्या क्रमांकावर असलेली फ्लोरिडाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे. कृषी हा येथील दुसर्‍या क्रमांकाचा उद्योग असून अमेरिकेमधील ७४ टक्के संत्र्यांचे उत्पादन फ्लोरिडामध्ये होते.

मेक्सिको

मेक्सिको किंवा मेक्सिकोची संयुक्त संस्थाने (स्पॅनिशमध्ये एस्तादोस युनिदोस मेक्सिकानोस) हा उत्तर अमेरिकेतील एक देश आहे. मेक्सिको जगातील सर्वांत जास्त स्पॅनिशभाषक असलेला देश आहे. मेक्सिकोला लॅटिन अमेरिकेचा एक भाग समजले जाते.

मोन्तेविदेओ

मोन्तेविदेओ (स्पॅनिश: Montevideo; इंग्लिश उच्चारः माँटेव्हिडीयो) ही उरुग्वे देशाची राजधानी, सर्वात मोठे शहर व प्रमुख बंदर आहे. हे शहर देशाच्या दक्षिण भागात अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावर वसले आहे. २०१० साली मोन्तेविदेओ शहराची लोकसंख्या १३,३६,८७८ (उरुग्वेच्या ५० टक्के) तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १९,७३,३८० इतकी होती.

मोन्तेविदेओ दक्षिण अमेरिका खंडाच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण शहर मानले जाते. १९३० सालामधील पहिल्या फुटबॉल विश्वचषकाचे सर्व सामने मोन्तेविदेओमध्ये भरवण्यात आले होते. तसेच २६ डिसेंबर १९३३ रोजी अमेरिका (खंड)ातील १९ देशांनी मोन्तेविदेओ येथे लष्करी अनाक्रमणाचा करार केला होता. सध्या मोन्तेविदेओ हे लॅटिन अमेरिकेतील एक मोठे सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. एका अहवालानुसार २००७ साली मोन्तेविदेओ हे लॅटिन अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट राहणीमान असलेले शहर होते.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.