स्टॅलिन

जोसेफ विसारिओनोविच जुगाश्विली ऊर्फ जोसेफ स्टालिन (रशियन इओसेफ स्तालिन) यांचा जन्म डिसेंबर २१ १८७९ रोजी जॉर्जिया (देशातील) तिफ्लिस प्रांतातील गोरी या गावी झाला. सोवियेत संघास जागतिक महाशक्ती म्हणून घडविणारे स्टालिन अतिशय सामान्य कुटुंबातले होते. त्यांचे वडील विसारिओन इव्हानोविच जुगाश्विली हे चांभार काम करीत तर आई एकातेरिना जॉर्जियेव्हना गृहिणी होती. त्यांना एकूण चार अपत्ये होती, पण स्टालिन यांची तीन भावंडे लहानपणीच दारिद्र्य व रोगराईमुळे मरण पावली होती.

स्टालिनच्या आईला स्टालिनच्या भविष्याबाबत फार काळजी वाटत असे. जोसेफने मोठे होऊन धर्मोपदेशक व्हावे असे तिला वाटत होते. त्यानुसार जोसेफ ९ वर्षांचा झाल्यावर त्याला चर्चच्या शिक्षणकेंद्रात पाठविण्यात आले. त्या शाळेत ६ वर्षे शिकल्यावर त्याला तिफ्लिस येथील उच्च शिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. त्या केंद्रात जोसेफ ५ वर्षे शिकला. या काळात जोसेफने हुशार विद्यार्थी म्हणून नाव कमाविले. पण बंडखोर वृत्तीच्या जोसेफने अभ्यासक्रम सोडून सामाजिक व राजकीय ग्रंथ वाचणे सुरू केले. त्यामुळे स्टालिनचे त्यांच्या शिक्षकांशी वारंवार खटके उडू लागले. इतकेच नव्हे तर त्यावर्षी स्टालिनने परिक्षा देण्यासही नकार दिल्याने त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. शाळेतून काढून टाकल्यावर स्टालिनने काही काळ शिक्षक म्हणून तर काही काळ वेधशाळेत नोकरी केली. या काळातही इतिहास, मार्क्सवाद वगैरे विषयांवर त्यांचे वाचन सुरूच होते. मार्क्सवादाचे ते कट्टर समर्थक बनले.

१८९४ पासून स्टालिन राजकीय क्रांतीसाठी काम करू लागले. लवकरच स्थानिक पोलीस त्यांच्या मागे लागले. त्यांच्या जाचातून सुटता यावे म्हणून स्टालिन मग बाकु व बाटुमच्या कामगार संघटनांमध्ये प्रचार कार्य करू लागले. १९०२ साली संपात सहभागी झाल्याबद्दल जोसेफ स्टालिन यांना अटक करून १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली तसेच त्या शिक्षेनंतर सायबेरियात हद्दपारीची शिक्षाही देण्यात आली. पण स्टालिन एका महिन्याच्या आतच कैदेतून निसटले. १९०४ पासून सुमारे १० वर्षे भूमिगत राहून, आपले नाव आणि वेश बदलत जोसेफने क्रांतिकारी म्हणून आपले कार्य सुरूच ठेवले. याच काळात स्टालिन यांना एकूण ८ वेळा पकडण्यात आले पैकी ७ वेळा त्यांना हद्दपारीची शिक्षा देण्यात आली. त्यांनी बदलेल्या अनेक नावांपैकी स्टालिन हेही एक नाव होते. पुढे स्टालिन हे नाव कठोर, पोलादी, कणखर ध्येयाचे प्रतीक बनले.

Vladimir Lenin and Joseph Stalin, 1919
उजवीकडून लेनिन आणि जोसेफ स्टालिन १९१९

१९०५ साली पहिल्यांदा जोसेफ स्टालिन, लेनिन यांना भेटले. पहिल्या भेटीतच लेनिनचा प्रभाव स्टालिनवर पडला. १९१३ पासून लेनिनचे निकटचे सहकार्य स्टालिनला लाभले. त्यांच्याच सूचनेवरून स्टालिननी मार्क्सवाद व राष्ट्रीय समस्या या नावाचा प्रबंध लिहिला. मार्च १९१७ मध्ये रशियात झालेल्या क्रांतीच्यावेळी स्टालिन सायबेरियात हद्दपारीची शिक्षा भोगत होते. समाजवाद्यांच्या दबावामुळे त्यावेळी सायबेरियात असलेल्या कैद्यांची सुटका करण्यात आली. लेनिन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऑक्टोबर क्रांतीत स्टालिनही सहभागी झाले होते. त्या क्रांतीनंतर स्थापन झालेल्या नव्या सरकारच्या अल्पसंख्य राष्ट्रिक गटाचे मंत्रिपद स्टालिनकडे देण्यात आले.

१९१८ मध्ये सोव्हियेट संघात सुरू झालेल्या यादवी युद्धात स्टालिन यांना संरक्षण खात्याची आणि मंत्रिमंडळाच्या कार्यकारी समितीतील महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. त्सारित्सिन भागात बंडखोर लोकांपासून जनतेचा बचाव करण्याची जबाबदारी स्वीकारून स्टालिन यांनी तशी कार्यवाही केली. वोल्गा नदीवरील त्सारित्सिन या शहरास पुढे स्टालिनग्राड (रशियन उच्चार स्तालिनग्राद) असे नाव देण्यात आले. (नंतर ते पुन्हा बदलवून त्याचे व्होल्गोग्राड झाले). १९२० साली स्टालिन यांच्या प्रयत्नामुळे, त्यासाठी लढा देऊन जॉर्जिया राज्य सोव्हियेट संघास जोडण्यात आले. १९२२ साली स्टालिन यांना बोल्शेविक पक्षाचे महासचिव करण्यात आले. तर लेनिन यांच्या आजारपणात स्टालिन परराष्ट्र मंत्री होते. लेनिन यांच्या मृत्युनंतर त्यांचा देह लाल चौकात जतन करावा अशी आग्रही भूमिका स्टालिनची होती. त्यास मार्क्सवाद्यांनी विरोधही केला होता. पण कोणाचेही न ऐकता स्टालिननी लेनिनची समाधी लाल चौकात उभी केलीच.

लेनिननंतर सोव्हियेट संघाचे नेतृत्व ट्रॉट्स्की किंवा स्टालिन यांच्यापैकी कोणाला द्यावे असा प्रश्न उपस्थित झाला होता. स्टालिनकडे ट्रॉट्स्की सारखे वक्तृत्वाचे अंग नव्हते पण स्टालिन एक कुशल संघटक, उत्तम प्रशासक, निष्ठावान कार्यकर्ता असल्याने त्यांना सामान्य पक्ष कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता म्हणून स्टालिनच सोव्हियेट संघाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले.

यादवी युद्धाच्या काळातच स्टालिन आणि ट्रॉट्स्की यांच्यात अतिशय उग्र मतभेद झाले. १९२८ मध्ये पक्षाने ट्रॉट्स्की यांना हद्दपार करून हे सर्व मतभेद संपविले. त्या आधी १९२७ साली साम्यवादी पक्षाच्या १५ व्या परिषदेने राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी 'एका राष्ट्रात समाजवाद' ही नीती स्वीकारली व त्यानुसार १९२८ च्या प्रारंभी राष्ट्रीय नियोजन मंडळाने पहिली पंचवार्षिक योजना सादर केली व १ ऑक्टोबर १९२८ पासून योजनेला मूर्त स्वरूप मिळून प्रत्यक्ष कार्य आरंभ झाले. सोवियेत संघात पंच वार्षिक योजना राबवून त्या यशस्वी करण्याची जबाबदारीही राष्ट्राध्यक्ष म्हणून स्टालिन यांचीच होती. या सगळ्यात ट्रॉट्स्कीचे नाव कोठेही नव्हते.

१९२८ ते १९५३ पर्यंत सोव्हियेट संघाचे नेतृत्व स्टालिनकडे होते. स्टालिन यांनी अवघ्या १२ वर्षांच्या काळात देशाची उभारणी केली, जागतिक महासत्ता म्हणून सोवियेत संघ उदयास आले. राष्ट्राध्यक्ष स्टालिन यांच्या पुढाकारानेच सोवियेत संघाची घटना तयार करण्यात आली. त्याप्रमाणे सोव्हियेट संघात समावेष असलेल्या प्रत्येक वांशिक व राष्ट्रीय गटाचे वैविध्य टिकविण्याची महत्त्वाची जबाबदारी स्वतः स्टालिन यांनीच स्वीकारली. तसेच घटनेप्रमाणे सर्व देशावर बोल्शेविक पक्ष आणि केंद्र सरकारचे थेट नियंत्रण ठेवण्यात स्टालिन यशस्वी झाले. प्रत्येक गटाला आणि देशाला महत्त्व दिल्याने अल्पकाळातच प्रत्येक घटक राज्याने नेत्रदीपक प्रगती केली. पण हजारो विरोधकांचे निर्दालन करणारा नरराक्षस असे त्यांना संबोधण्यात येत असे. तसेच दुसर्‍या महायुद्धात सोवियेत संघाची जी अपार हानी झाली त्याचे कारणही स्टालिन यांचे नेतृत्व असल्याचे मानले जाते. पक्षशुद्धी मोहिमेत हजारो विरोधकांना मारल्याचा आरोपही स्टालिनवर आहे. देशात स्टालिन यांची एकछत्री हुकुमशाही राजवट होती. सर्वंकष शिस्तीचा पुरस्कर्ता, कठोर मनाचा अशी स्टालिनची प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण झाली.

१९५२ अखेर स्टालिन यांची प्रकृती ढासळू लागली. मार्च ६ १९५३ रोजी स्टालिनचे मेंदूतील रक्तस्रावामुळे निधन झाले.

JStalin Secretary general CCCP 1942
जोसेफ स्टालिन १९४२
साम्यवाद
Red star

मॅनिफेस्टो
मार्क्स · लेनिन

कम्युनिस्ट पक्ष
भाकप · माकप

देशात
सोवियत संघ
चीन
क्युबा
व्हियेतनाम
उत्तर कोरिया
लाओस

ए.आर. मुर्गदास

ए.आर.मुर्गदास किंवा मुरुगादास/मुरुगादॉस(तमिळःஎ.ஆர்.முருகாதாஸ்)A. R. Murugadossएक भारतीय तमिळ चित्रपट दिग्दर्शक व लेखक.(अजित राहुल मुर्गादास/Ajith Ragul Murugadoss)

एडवर्ड ओसोब्का-मोराव्स्की

एडवर्ड ओसोब्का-मोराव्स्की (पोलिश: Edward Bolesław Osóbka-Morawski; ५ ऑक्टोबर १९०९ - ९ जानेवारी १९९७) हा पोलंड देशामधील एक चळवळकर्ता व राजकारणी होता. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात सोव्हियेत संघाने स्थापन केलेल्या कळसुत्री सरकारचा तो प्रमुख होता. ओसोब्का-मोराव्स्की कट्टर स्टॅलिन समर्थक होता. १९४७ साली त्याला पंतप्रधानपदावरून हाकलण्यात आले.

तृषा कृष्णन

तृषा कृष्णन ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रमुख कार्यक्षेत्र तमिळ चित्रपट. (कॉलीवूड)

भारतीय आडनावे

कुटुंब नाव किंवा आडनाव हे कटुंब, घराणे, अथवा मूळ गांव यांचे निदर्शक उपनाम म्हणून वापरले जाते. एकाच नावाच्या अनेक व्यक्ती आढळत असल्यामुळे निश्चितपणे ओळखता यावे, म्हणून त्या त्या व्यक्तीच्या वैयक्तिक नावाबरोबर अधिक नावे जोडण्याची प्रथा पडली असावी. वैयक्तिक नावालाच पाळण्यातले नाव किंवा ख्रिश्चन नेम असे म्हणतात.

भारतातील नावे वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित आहेत. नावे आणि आडनावे जात, धर्म, भाषा आणि प्रदेश अशा गोष्टींनुसार बदलतात. उदाहरणार्थ: उत्तर भारतात आडनावे वापरली जातात तर दक्षिण भारतात (तमिळनाडू, केरळ) बरेचसे लोक आडनावे वापरत नाहीत, त्याऐवजी वडिलांचे नाव किंवा त्या नावाचे आद्याक्षर जोडतात, आणि तेही स्वतःच्या वैयक्तिक नावाआधी. उदा० एन.गोपालस्वामी अय्यंगार. यातले एन. म्हणजे नरसिंह, गोपालस्वामींच्या वडिलांचे नाव.

अनेक भारतीयांचे जन्मनाव त्यांच्या अधिकृत नावापेक्षा वेगळे असते. जन्मनाव अनेकदा ज्योतिषशास्त्रानुसार ठेवले जाते. जेथे आडनावे वापरात नाहीत अशा ठिकाणी तिसरे नाव म्हणून आजोबा/आजीचे नाव किंवा गावाचे नाव वापरण्याचा संकेत आहे. ज्या ठिकाणी समाजवादी विचारांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी समाजवादी नेत्यांची किंवा रशियातील नावे वापरण्याचीही पद्धत आहे. उदाहरण: स्टॅलिन (तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांचे पुत्र), लोलिता, गोगोल.

भारतीय आडनावांमध्ये अनेकदा काही सूत्र असते. ग्रामनामावरून पडलेल्या मराठी आडनावांच्या शेवटी ’कर’ हा प्रत्यय असतो.

वाल्हेकर, मुळगावकर, माडखोलकर, पुणेकर, माहीमकर ही त्याची उदाहरणे. जर त्या मराठी माणसाचे मूळ तेलंगणातले असेल तर ’कर’ऐवजी ’वार’ हा प्रत्यय असतो. उदा० अन्नमवार, कन्नमवार, चिद्रेवार, तालेवार, तुमपल्लीवार, नंदनवार. पारपिल्लेवार, फुलकुंठवार, बोजेवार, मुनगंटीवार, हमपल्लीवार वगैरे. उत्तरी भारतात ’वार’ऐवजी ’वाल’असते. आगरवाल, बकलीवाल, धारीवाल इ.इ. धंद्यावरून किंवा गावांवरून ठेवली जाणारी बोहरी आणि पारशी आडनावे - कोलंबोवाला, दारूवाला, नडियादवाला, ताडीवाला, बाटलीवाला वगैरे.

याहून एक वेगळा प्रकार म्हणजे याकारान्त नावे. ही हिंदू, मुसलमान, पारशी, जैन आणि ख्रिश्चन या पाचही धर्मीयांमध्ये आढळतात. हिंदूंमधली अशी आडनावे असणारे बहुधा मारवाडी, गुजराती किंवा सिंधी-पंजाबी असतात. नावे अशी -

आंटिया

कनोजिया

कांकरिया

कापडिया

कुटमुटिया

कोडिया

चोरडिया

छाब्रिया

झकेरिया

झाझरिया

डालमिया

डिया

देढिया

दोडिया

फिरोदिया

बगाडिया

बोखारिया

भांखरिया

भाटिया

मारडिया

मोठवाडिया

रुईया

रेशमिया

लोहिया

वाडिया

सिंघानिया

सिसोदिया

सुरपुरिया, वगैरे वगैरे.==भारताच्या पूर्व भागातील नावे==girge

व्याचेस्लाव्ह मोलोतोव्ह

व्याचेस्लाव्ह मोलोतोव्ह (रशियन: Вячеслав Молотов; ५ डिसेंबर १८६७ - १२ मे १९३५) हा एक सोव्हियेत राजकारणी व जोसेफ स्टॅलिनचा निकटचा सहकारी होता. तो १९३० च्या शतकादरम्यान सोव्हियेत संघाचा प्रमुख तर १९३९ ते १९४९ दरम्यान परराष्ट्रमंत्री होता.

१९३९ साली दुसऱ्या महायुद्धाच्या सुरूवातीच्या काळात सोव्हियेत व नाझी जर्मनी ह्यांच्या दरम्यान झालेल्या गुप्त करारामध्ये मोलोतोव्हने सहभाग घेतला होता. मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार ह्या नावाने मोलोतोव्ह व नाझी परराष्ट्रमंत्री योआखिम फॉन रिबेनट्रॉप ह्यांच्यामध्ये झालेल्या ह्या करारामध्ये पोलंड देशाचे विभाजन व एकमेकांवर अनाक्रमणाचे वचन दिले गेले होते.

युद्ध संपल्यानंतर मोलोतोव्हचे सोव्हियेतमधील महत्त्व कमी झाले. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर मोलोतोव्हने स्टॅलिनच्या धोरणांचा पाठिंबा चालू ठेवला. तो निकिता ख्रुश्चेव्हच्या राजवटीचा मोठा टीकाकार होता.

सोव्हियेत संघाचा कम्युनिस्ट पक्ष

सोव्हियेत संघाचा कम्युनिस्ट पक्ष (रशियन: Коммунистическая партия Советского Союза) हा सोव्हियेत संघ ह्या भूतपूर्व देशामधील एकमेव राजकीय पक्ष होता. १ जानेवारी १९१२ रोजी व्लादिमिर लेनिनने ह्या कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. २९ ऑगस्ट १९९१ रोजी सोव्हियेत संघाच्या विघटनादरम्यान कम्युनिस्ट पक्ष बरखास्त करण्यात आला.

कार्ल मार्क्स व लेनिन ह्यांच्या विचारवादावर आधारित असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचे सोव्हियेत संघाच्या जवळजवळ सर्व अस्तित्वादरम्यान देशावर संपूर्ण नियंत्रण होते. नियमानुसार पक्षाचा सरचिटणीस सोव्हियेत संघाचा सरकारप्रमुख व राष्ट्रप्रमुख ह्या पदांवर आपोआप नियुक्त होत असे.

१९८८ सालच्या मिखाईल गोर्बाचेवने आणलेल्या अनेक धोरणांमुळे कम्युनिस्ट पक्षाचा एकछत्री अंमल कमी झाला.

स्टॅलिन-विरोधी डावे

स्टॅलिन-विरोधी डावे म्हणजे डाव्या राजकीय विचारधारेचे असे लोक जे पुढीलपैकी सर्व किंवा काही गोष्टींची टीका करतात - जोसेफ स्टॅलिन, राजकीय तत्त्वज्ञान म्हणून स्टॅलिनवाद, व सोविएत संघात स्टॅलिनने हुकूमशाही पद्धतीने राबवलेली शासनव्यवस्था.

सोव्हियेट संघाचे राष्ट्राध्यक्ष

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.