स्टालिनग्राडची लढाई

स्टालिनग्राडचा वेढा किंवा स्टालिनग्राडची लढाई या नावांनी ओळखली जाणारी लढाई नाझी जर्मनी व अक्षराष्ट्रांच्या आघाडीची सैन्ये आणि सोव्हिएत संघाचे सैन्य यांच्या दरम्यान स्टालिनग्राड (आधुनिक वोल्गोग्राद) या व्यूहात्मक महत्त्वाच्या शहरावरील नियंत्रणासाठी झडलेली दुसऱ्या महायुद्धातील लढाई होती. १७ जुलै, इ.स. १९४२ ते २ फेब्रुवारी, इ.स. १९४३ या कालखंडात ही लढाई चालली होती. या लढाईच्या अंती नाझी जर्मनीला स्टालिनग्राडावरील पकड गमवावी लागली. या लढाईतील अपयशामुळे नाझी जर्मनीच्या पूर्व आघाडीवरील यशस्वी घोडदौडीला खीळ बसून त्यांची सामरिक पीछेहाट झाली. त्या दृष्टीने ही लढाई दुसऱ्या महायुद्धातील कलाटणीच्या प्रसंगांपैकी एक मानली जाते.

ऑगस्ट २३

ऑगस्ट २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३५ वा किंवा लीप वर्षात २३६ वा दिवस असतो.

दुसरे महायुद्ध

दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले. यानंतर फ्रांस, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपान व इटलीने जर्मनीच्या बाजुने युद्धात पदार्पण केले. डिसेंबर १९४१ मध्ये जपानने अमेरिकेवर हल्ला केल्यावर अमेरिकेने युद्धात सक्रीय भाग घेतला व येथून युद्ध जगभर पसरले. दोस्त राष्ट्रांमध्ये चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटली व जपान हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युद्धात सहा कोटींच्यावर जीवित हानी झाली. मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवित हानी आहे. या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.

नोव्हेंबर १९

नोव्हेंबर १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२३ वा किंवा लीप वर्षात ३२४ वा दिवस असतो.

नोव्हेंबर २२

नोव्हेंबर २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२६ वा किंवा लीप वर्षात ३२७ वा दिवस असतो.

पोलंडवरील आक्रमण (इ.स. १९३९)

नाझी जर्मनीने सप्टेंबर १, इ.स. १९३९ रोजी पोलंडवर आक्रमण (पोलिश:कांपानिया विझेशनियोवा किंवा वॉय्ना ओब्रॉना १९३९ रोकु, जर्मन:पोलेनफेड्झुग) करून दुसर्‍या महायुद्धाला तोंड फोडले. यानंतर सोवियेत संघानेही पूर्वेकडून पोलंडवर आक्रमण केले.

सोवियेत संघ आणि जर्मनीने या आक्रणाच्या आठवडाभर आधी मोलोटोव्ह-रिबेनट्रोप करार केला होता व त्यानुसार ऑक्टोबर ६ला दोन्ही राष्ट्रांनी पोलंड गिळंकृत करून त्याचे दोन तुकडे आपसात वाटून घेतले.

याला सप्टेंबर मोहीम किंवा पोलंड मोहीम या नावानेही ओळखतात.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.