सेंट लुईस


सेंट लुईस (इंग्लिश: Saint Louis) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिसूरी राज्यामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर (कॅन्सस सिटीखालोखाल) व सर्वात मोठे महानगर आहे. हे शहर मिसूरीच्या पूर्व भागात इलिनॉय राज्याच्या सीमेवर व मिसिसिपी नदीच्या काठावर वसले आहे. ३.१९ लाख शहरी व २८.४५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले सेंट लुईस अमेरिकेमधील ५८वे मोठे शहर व १६वे मोठे महानगर आहे.

इ.स. १७६४ साली मिसिसिपी नदीवरील एक बंदर म्हणून स्थापन केलेले सेंट लुईस १९व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेमधील चौथ्या क्रमांकाचे शहर होते. अमेरिकन यादवी युद्धानंतर येथील लोकसंख्या झपाट्याने वाढली. इ.स. १९०४ साली सेंट लुईसमध्ये उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा खेळवल्या गेल्या. इ.स. १९५० नंतर येथील लोकसंख्या घसरणीला लागली.

सध्या अमेरिकेच्या मध्य-पूर्व भागातील एक प्रमुख शहर असलेल्या सेंट लुईसची अर्थव्यवस्था सेवा, उत्पादन व पर्यटनावर अवलंबून आहे. अमेरिकेमधील अनेक मोठ्या कंपन्यांची मुख्यालये येथे आहेत. गेटवे आर्च ही सेंट लुईसची सर्वात प्रसिद्ध खुण आहे.

सेंट लुईस
Saint Louis
अमेरिकामधील शहर

StLouisMontage

Flag of St. Louis, Missouri
ध्वज
सेंट लुईस is located in मिसूरी
सेंट लुईस
सेंट लुईस
सेंट लुईसचे मिसूरीमधील स्थान
सेंट लुईस is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सेंट लुईस
सेंट लुईस
सेंट लुईसचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 38°37′38″N 90°11′52″W / 38.62722°N 90.19778°W

देश Flag of the United States अमेरिका
राज्य मिसूरी
स्थापना वर्ष इ.स. १७६४
क्षेत्रफळ १७१.३ चौ. किमी (६६.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४६६ फूट (१४२ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३,१९,२९४
  - घनता १,९९१ /चौ. किमी (५,१६० /चौ. मैल)
  - महानगर २८,४५,२९८
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
stlouis-mo.gov

इतिहास

सेंट लुईस शहराची स्थापना पियेर लेक्लेद व रेने ऑगस्ते चूतू ह्या फ्रेंच शोधकांनी इ.स. १७६४ साली केली. स्थापनेपासून सेंट लुईस मिसिसिपी नदीच्या काठावरील स्थानामुळे मध्य अमेरिकेमधील एक महत्वाचे वाहतूक केंद्र होते.

भूगोल

सेंट लुईस शहर मिसिसिपी नदीच्या पश्चिम काठावर उंचसखल भागात १७१.३ किमी क्षेत्रफळावर वसले आहे. मिसिसिपी व मिसूरी नद्यांच्या खोर्‍यातील हा भाग अत्यंत सुपीक असून येथील माल इतरत्र वाहून नेण्यासाठी सेंट लुईस बंदराचा मोठ्या प्रमाणावर होत असे.

हवामान

सेंट लुईसमधील हवामान तीव्र आहे. आर्क्टिक वार्‍यांमुळे येथील हिवाळे शीत व रूक्ष तर मेक्सिकोच्या आखाती वार्‍यांमुळे उन्हाळे उष्ण व दमट असतात.

जनसांख्यिकी

एकोणिसाव्या व विसाव्या शतकांदरम्यान झपाट्याने वाढणार्‍या सेंट लुईसची लोकसंख्या १९५० साली सर्वाधिक होती. तेव्हापासून अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ६० वर्षांदरम्यान सेंट लुईसची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. २०१० साली ३,१९,२९४ लोकसंख्या असलेल्या सेंट लुईसमधील ४९.२ टक्के लोक आफ्रिकन अमेरिकन वंशाचे आहेत.

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १८१० १,६००
इ.स. १८२०
इ.स. १८३० ४,९७७
इ.स. १८४० १६,४६९ +२३०%
इ.स. १८५० ७७,८६० +३७२%
इ.स. १८६० १,६०,७७३ +१०६%
इ.स. १८७० ३,१०,८६४ +९३%
इ.स. १८८० ३,५०,५१८ +१२%
इ.स. १८९० ४,५१,७७० +२८%
इ.स. १९०० ५,७५,२३८ +२७%
इ.स. १९१० ६,८७,०२९ +१९%
इ.स. १९२० ७,७२,८९७ +१२%
इ.स. १९३० ८,२१,९६० +६%
इ.स. १९४० ८,१६,०४८ −०%
इ.स. १९५० ८,५६,७९६ +५%
इ.स. १९६० ७,५०,०२६ −१२%
इ.स. १९७० ६,२२,२३६ −१७%
इ.स. १९८० ४,५२,८०१ −२७%
इ.स. १९९० ३,९६,६८५ −१२%
इ.स. २००० ३,४८,१८९ −१२%
इ.स. २०१० ३,१९,२९४ −८%
[५][६]

वाहतूक

महामार्ग

सेंट लुईस आय-७० आणि आय-५५ या दोन मोठ्या आंतरराज्य महामार्गांच्या तिठ्यावर आहे. याशिवाय आय-४४ आणि आय-६४ हे दोन आंतरराज्य महामार्ग या शहरातून जातात.

रेल्वे

सेंट लुईस रेल्वेमार्गे सान अँटोनियो, शिकागो आणि कॅन्सस सिटी मार्गे देशातील इतर शहरांशी जोडलेले आहे.

विमानसेवा

लँबर्ट सेंट लुईस आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मोठा विमानतळ असून इतर तीन लहान विमानतळ या शहरास विमानसेवा पुरवतात.

खेळ

खालील तीन व्यावसायिक संघ सेंट लुईसमध्ये स्थित आहेत.

संघ खेळ लीग स्थान
सेंट लुईस कार्डिनल्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल बुश स्टेडियम
सेंट लुईस रॅम्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग एडवर्ड जोन्स डोम
सेंट लुईस ब्लूज आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग स्कॉटट्रेड सेंटर

२०१७ हंगामापासून हा संघ लॉस एंजेलसला स्थलांतरित झाला.

शहर रचना

सेंट लुईसचे विस्तृत चित्र
सेंट लुईसचे विस्तृत चित्र
ईस्ट सेंट लुईसमधून टिपलेले चित्र.
ईस्ट सेंट लुईसमधून टिपलेले चित्र.

जुळी शहरे

जगामधील खालील १५ शहरे सेंट लुईसची जुळी शहरे आहेत.[७]

संदर्भ

  1. ^ "Climatography of the United States No. 20: ST. LOUIS INTL AP, MO 1971–2000" (PDF). National Oceanic and Atmospheric Administration. 2004. 2010-06-08 रोजी पाहिले.
  2. ^ "Climatological Information for St. Louis, United States". Hong Kong Observatory. 2011-01-23 रोजी पाहिले.
  3. ^ "Monthly Averages for Lambert-St. Louis International Airport – Temperature and Precipitation". The Weather Channel. 2010-06-08 रोजी पाहिले.
  4. ^ "Top 10 list of Weather Records". National Oceanic and Atmospheric Administration. 2010-06-08 रोजी पाहिले.
  5. ^ "Census of 1850". United States Census. page 36
  6. ^ Campbell Gibson. "Population of the 100 largest cities and other urban places in the United States: 1790 to 1990". United States Bureau of the Census.
  7. ^ "St. Louis Sister Cities". St. Louis Center for International Relations. March 20, 2011 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

अमेरिकेमधील शहरांची यादी

अमेरिका देशामधील सर्वाधिक लोकसंख्येची १०० शहरे खालील यादीमध्ये दिली आहेत.

ईस्ट सेंट लुइस

ईस्ट सेंट लुइस हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. सेंट लुइस शहरापासून जवळ मिसिसिपी नदीवर असलेले हे शहर सेंट लुइस महानगराचा भाग समजले जाते. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,००६ होती. १९५०च्या तुलनेत ही संख्या १/३ होती. गेल्या ५०-६० वर्षांत ईस्ट सेंट लुइस व आसपासच्या भागातील कारखाने बंद पडून येथील रोजगारी कमी झाल्याने ही वस्तीघट झाली आहे.

इंटरस्टेट ७०, इंटरस्टेट ५५ आणि इंटरस्टेट ६४ हे महामार्ग ईस्ट सेंट लुइसच्या हद्दीत एकमेकांस मिळतात.

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा १८९६ साली ग्रीसच्या अथेन्समध्ये भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी (१९१६, १९४० व १९४४ चा अपवाद वगळता) उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती ह्या संस्थेवर स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी आहे. उन्हाळी ऑलिंपिकच्या प्रचंड यशानंतर १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा देखील भरवल्या जात आहेत.

स्पर्धेच्या प्रत्येक प्रकारामध्ये पहिल्या येणाऱ्या खेळाडू अथवा संघाला सुवर्ण पदक, दुसऱ्याला रौप्य पदक तर तिसऱ्याला कांस्य पदक देण्यात येते. २००८ च्या बीजिंगमधील ऑलिंपिक स्पर्धेत २०५ देशांच्या १०,५०० खेळाडूंनी ३०२ प्रकारच्या खेळप्रकारांमध्ये सहभाग घेतला होता.

ग्रीस, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया व स्वित्झर्लंड ह्या जगातील केवळ पाच देशांनी आजवरच्या सर्व उन्हाळी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून सर्व स्पर्धांमध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकणारा ग्रेट ब्रिटन हा एकमेव देश आहे.

ऑलिंपिक

ऑलिंपिक खेळांचा इतिहास (ग्रीसमधील) ३००० वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरूवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली. ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड ,भारत सह १४ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले.

“ओलंपिक डे” इस दिन को सर्वप्रथम 1948 मे परिचित करवाया ...

स्थापना: 23 जून 1894

जानकारी: विवरण

अध्यक्ष: थॉमस बेच

मुख्यालय: लौसन, स्वीज़लेंड

ऑलिंपिक खेळात इटली

इटली देश १९०० सालापासून १९०४ सेंट लुईस स्पर्धेचा अपवाद वगळता सर्व उन्हाळी व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून इटालियन खेळाडूंनी आजवर एकूण ६६४ पदके जिंकली आहेत.

ऑलिंपिक खेळात मेक्सिको

मेक्सिको देशाने आजवर १९०० व १९२४ पासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक तसेच ८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. उन्हाळी स्पर्धांमध्ये मेक्सिकन खेळाडूंना एकूण ६२ पदके मिळाली आहेत.

ऑलिंपिक खेळात हंगेरी

हंगेरी देशाने आजवर १९२० व १९८४ चा अपवाद वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक तसेच सर्व हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. उन्हाळी स्पर्धांमध्ये हंगेरीयन खेळाडूंना एकूण ४७६ तर हिवाळी स्पर्धांमध्ये ६ पदके मिळाली आहेत.

जून ४

जून ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५५ वा किंवा लीप वर्षात १५६ वा दिवस असतो.

टी.एस. इलियट

थॉमस स्टर्न्स इलियट (इंग्लिश: Thomas Stearns Eliot; २६ सप्टेंबर १८८८, सेंट लुईस, मिसूरी - ४ जानेवारी १९६५, लंडन) हा एक अमेरिकन-ब्रिटिश कवी व लेखक होता.

अमेरिकेच्या सेंट लुईस शहरामध्ये जन्मलेल्या इलियटने हार्वर्ड विद्यापीठामधून पदवीचे शिक्षण घेतले. तो १९१४ साली वयाच्या २५व्या वर्षी ब्रिटनला स्थानांतरित झाला. त्याने अनेक प्रसिद्ध कविता व नाटके लिहिली. त्याच्या साहित्यामधील योगदानासाठी इलियटला १९४८ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: DEN, आप्रविको: KDEN, एफ.ए.ए. स्थळसूचक: DEN) अमेरिकेच्या डेन्व्हर शहरात आहे. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. ५३ चौरसमैल क्षेत्रफळ असलेला हा विमानतळ अमेरिकेतील सगळ्यात मोठा तर किंग फह्द आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि माँत्रियाल-मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळामागोमाग जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा विमानतळ आहे. येथील १६R/३४L ही धावपट्टी अमेरिकेतील सगळ्यात जास्त लांबीची धावपट्टी आहे.

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फ्रंटियर एरलाइन्स आणि ग्रेट लेक्स एरलाइन्स या विमानकंपन्यांचे मुख्य तळ आहेत तर हा युनायटेड एरलाइन्सचा चौथ्या क्रमांकाचा तळ आहे. ही विमानतळ साउथवेस्ट एरलाइन्सच्या वाहतूककेन्द्रबिंदूपैकी एक असून येथून साउथवेस्ट एरलाइन्स ४०पेक्षा जास्त शहरांना सेवा पुरवते.

नॅशनल हॉकी लीग

नॅशनल हॉकी लीग (इंग्लिश: National Hockey League; फ्रेंच: Ligue nationale de hockey—LNH) ही कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशांमधील एक व्यावसायिक आइस हॉकी खेळाची संघटना (लीग) आहे. नॅशनल हॉकी लीगची स्थापना २२ नोव्हेंबर १९१७ रोजी माँत्रियाल शहरामध्ये करण्यात आली. सध्या ३० खाजगी अमेरिकन व कॅनेडियन आईस हॉकी संघ नॅशनल हॉकी लीगचे सदस्य आहेत.

बोलोन्या

बोलोन्या (इटालियन: Bologna; उच्चार ; लॅटिन: Bononia) ही इटली देशाच्या एमिलिया-रोमान्या ह्या प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. इटलीच्या उत्तर भागात वसलेले व सुमारे २.८४ लाख लोकसंख्या असलेले बोलोन्या हे इटलीमधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इ.स. १०८८ साली स्थापन झालेले येथील बोलोन्या विद्यापीठ जगातील सर्वात जुने विद्यापीठ मानले जाते.

सध्या बोलोन्या हे उत्तर इटलीमधील कला व संस्कृतीचे माहेरघर मानले जाते. २००० साली बोलोन्या युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते. बोलोन्या हे इटलीमधील सर्वात सुबत्त शहरांपैकी एक असून येथील राहणीमानाचा दर्जा इटलीमध्ये सर्वोत्तम आहे.

मिसिसिपी नदी

मिसिसिपी नदी (इंग्लिश: Mississippi River) ही उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठी नदी आहे. मिसिसिपी नदीचा उगम मिनेसोटा राज्यातील इटास्का सरोवरामध्ये होतो. येथून ही नदी दक्षिण दिशेला ३,७३० किमी (२,३२० मैल) वाहते व लुईझियानातील न्यू ऑर्लिन्स शहराच्या १५३ किमी दक्षिणेला मेक्सिकोच्या आखाताला मिळते. ही नदी मिनेसोटा व लुईझियाना ह्या राज्यांमधून वाहते तर विस्कॉन्सिन, इलिनॉय, केंटकी, टेनेसी व मिसिसिपी ह्या राज्यांच्या पश्चिम सीमा व आयोवा, मिसूरी व आर्कान्सा ह्या राज्यांच्या पूर्व सीमा मिसिसिपी नदीने आखल्या गेल्या आहेत.

मिसिसिपी ही लांबीने जगातील चौथ्या क्रमांकाची नदी आहे. मिसूरी व ओहायो ह्या दोन मिसिसिपीच्या सर्वात मोठ्या उपनद्या आहेत.

मिसूरी

मिसूरी (इंग्लिश: Missouri; उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य भागात (मिड-वेस्ट) वसलेले मिसूरी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २१वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १८व्या क्रमांकाचे राज्य आहे.

मिसूरीच्या दक्षिणेला आर्कान्सा, पश्चिमेला कॅन्सस, नैऋत्येला ओक्लाहोमा, वायव्येला नेब्रास्का, उत्तरेला आयोवा, पूर्वेला इलिनॉय व केंटकी तर आग्नेयेला टेनेसी ही राज्ये आहेत. जेफरसन सिटी ही मिसिसिपीची राजधानी, कॅन्सस सिटी हे सर्वात मोठे शहर तर सेंट लुईस हे येथील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. मिसूरी ही मिसिसिपी नदीची सर्वात मोठी उपनदी राज्याच्या मध्यातून पूर्व-पश्चिम दिशेने वाहते व सेंट लुईसजवळ मिसिसिपी नदीला मिळते. अमेरिकेच्या मध्य भागात वसलेले मिसूरी बरेचदा पूर्व व पश्चिम अमेरिकेला वेगळे करणारे राज्य मानले जाते. येथील सेंट लुईस शहर सर्वात पश्चिमेकडील पौव्रात्य शहर तर कॅन्सस सिटी शहर सर्वात पूर्वेकडील पश्चिमात्य शहर अशी संबोधली जातात.

शेती, खाद्य व्यवसाय, रासायनिक उत्पादन हे मिसूरीमधील सर्वात मोठे उद्योग आहेत. येथील वाईन बनवण्याचा उद्योग वेगाने प्रगती करीत आहे.

मे २७

मे २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४७ वा किंवा लीप वर्षात १४८ वा दिवस असतो.

लँबर्ट सेंट लुईस आंतरराष्ट्रीय विमानतळ

लँबर्ट सेंट लुईस आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: STL, आप्रविको: KSTL, एफ.ए.ए. स्थळसूचक: STL) हा अमेरिकेच्या सेंट लुईस शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या वायव्येस १६ किमी (१० मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ लँबर्ट फील्ड या नावानेही ओळखला जातो. येथून रोज साधारण २५५ विमाने जगभरातील ९० शहरांना जातात. २०१५मध्ये येथून अंदाजे १ कोटी २७ लाख प्रवाशांनी ये-जा केली होती.हा विमानतळ एर चॉइस वन आणि केप एर या विमानकंपन्याचे मुख्य ठाणे असून साउथवेस्ट एरलाइन्सचा येथे मोठा तळ आहे. येथे पूर्वी टीडब्ल्यूए आणि नंतर अमेरिकन एरलाइन्सचे मोठे तळ होते.

सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ

सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SFO, आप्रविको: KSFO, एफ.ए.ए. स्थळसूचक: SFO) हा अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या २१ किमी (१३ मैल) दक्षिणेस मिलब्रे आणि सान ब्रुनो उपनगरांजवळ सान मटेओ काउंटीमध्ये असलेला हा विमानतळ बे एरियामधील सगळ्यात मोठा तर कॅलिफोर्नियातील दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. येथून अमेरिकेतील सगळ्या मोठ्या शहरांना तसेच युरोप आणि आशियातील प्रमुख विमानतळांना जोडणारी विमानसेवा उपलब्ध आहे.

१९०४ उन्हाळी ऑलिंपिक

१९०४ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील तिसरी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा होती. ही स्पर्धा अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या सेंट लुईस शहरामध्ये १ जुलै ते २३ नोव्हेंबर दरम्यान खेळवली गेली.

सेंट लुईस आंतरराष्ट्रीय विमानतळ साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 77
(25)
85
(29)
92
(33)
93
(34)
98
(37)
105
(41)
115
(46)
110
(43)
104
(40)
94
(34)
86
(30)
76
(24)
115
(46)
सरासरी कमाल °फॅ (°से) 37.9
(3.3)
44.3
(6.8)
55.4
(13)
66.7
(19.3)
76.5
(24.7)
85.3
(29.6)
89.8
(32.1)
87.9
(31.1)
80.1
(26.7)
68.3
(20.2)
53.8
(12.1)
42.0
(5.6)
65.67
(18.71)
सरासरी किमान °फॅ (°से) 21.2
(−6)
26.5
(−3.1)
36.2
(2.3)
46.5
(8.1)
56.6
(13.7)
65.9
(18.8)
70.6
(21.4)
68.6
(20.3)
60.3
(15.7)
48.2
(9)
36.7
(2.6)
25.8
(−3.4)
46.93
(8.28)
विक्रमी किमान °फॅ (°से) −22
(−30)
−18
(−27.8)
−5
(−20.6)
20
(−6.7)
31
(−0.6)
43
(6)
51
(11)
47
(8)
32
(0)
21
(−6.1)
1
(−17.2)
−16
(−26.7)
−22
(−30)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 2.14
(54.4)
2.28
(57.9)
3.60
(91.4)
3.69
(93.7)
4.11
(104.4)
3.76
(95.5)
3.90
(99.1)
2.98
(75.7)
2.96
(75.2)
2.76
(70.1)
3.71
(94.2)
2.86
(72.6)
38.75
(984.2)
सरासरी हिमवर्षा इंच (सेमी) 7.2
(18.3)
4.7
(11.9)
3.2
(8.1)
.8
(2)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
1.5
(3.8)
4.8
(12.2)
22.2
(56.3)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in) 9.4 8.2 11.1 11.4 11.3 9.6 8.3 8.1 7.5 8.5 10.1 9.4 112.9
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in) 5.2 3.4 2.3 .4 0 0 0 0 0 0 .9 3.5 15.7
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 161.2 161.0 198.4 222.0 266.6 291.0 310.0 269.7 237.0 207.7 141.0 130.2 २,५९५.८
स्रोत: Average Temperature, Precipitation, and Snowfall [१], Sunshine Hours [२]

Extremes [३][४]

उन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.