सायप्रस


सायप्रसचे प्रजासत्ताक (ग्रीक: Κυπριακή Δημοκρατία; तुर्की: Kıbrıs Cumhuriyeti) दक्षिण युरोपामधील एक हा द्वीप-देश आहे. सायप्रस भूमध्य समुद्रात ग्रीसच्या पूर्वेला, तुर्कस्तानच्या दक्षिणेला, सिरियालेबेनॉनच्या पश्चिमेला व इस्रायलच्या वायव्येला एका बेटावर वसला आहे. सायप्रसला युरोपआशिया ह्या दोन्ही खंडांत गणले जाते. सायप्रस १ मे २००४ पासून युरोपियन संघाचा सदस्य आहे. निकोसिया ही सायप्रसची राजधानी आहे.

प्रागैतिहासिक काळापासून मानवी वास्तव्य असलेल्या सायप्रस बेटावर इ.स.पूर्व ३३३ मध्ये अलेक्झांडर द ग्रेटने ताबा मिळवला. त्यानंतरच्या काळात येथे इजिप्त, रोमन साम्राज्य, बायझेंटाईन साम्राज्य, व्हेनिस इत्यादी साम्राज्यांची सत्ता राहिली. १५७१ साली ओस्मानी साम्राज्याने सायप्रसवर विजय मिळवला व त्यानंतर ३ दशके हा भाग ओस्मानांकडे होता. १८७८ साली सायप्रसला ब्रिटनच्या अधिपत्याखाली ठेवण्यात आले. १९६० साली सायप्रसला स्वातंत्र्य मिळाले व १९६१ मध्ये सायप्रस राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य बनला.

सायप्रसच्या दक्षिणेकडील भागात ग्री़क लोकांचे तर उत्तरेकडील भागात तुर्की लोकांचे वर्चस्व आहे. १९८३ सालापासुन उत्तर सायप्रस हा स्वतंत्र एक देश असल्याचा दावा ह्या भागातील लोकांनी केला आहे. उत्तर सायप्रस ह्या देशाला तुर्कस्तान व्यतिरिक्त इतर कोणत्याही राष्ट्राने मान्यता दिलेली नाही. सायप्रस बेटावरील सुमारे ३७% भाग उत्तर सायप्रसच्या अखत्यारीत येतो.

सायप्रसची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटन उद्योगावर अवलंबुन आहे. येथील दरडोई उत्पन्न उच्च आहे.

सायप्रस
Κύπρος (ग्रीक)
Kıbrıs (तुर्की)
सायप्रसचे प्रजासत्ताक
सायप्रसचा ध्वज सायप्रसचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Ὕμνος εἰς τὴν Ἐλευθερίαν
स्वातंत्र्याचे गाणे
सायप्रसचे स्थान
सायप्रसचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
निकोसिया
अधिकृत भाषा ग्रीक, तुर्की
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख निकोस अनास्तासियादेस
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १६ ऑगस्ट १९६० (युनायटेड किंग्डमपासून
युरोपीय संघात प्रवेश १ मे २००४
क्षेत्रफळ
 - एकूण ९,२५१ किमी (१६८वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १०,९९,३४१ (१५९वा क्रमांक)
 - घनता ११७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २३.७२८ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २९,०७४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०११) ०.८४० (अति उच्च) (३१ वा)
राष्ट्रीय चलन यूरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ CY
आंतरजाल प्रत्यय .cy
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३५७
राष्ट्र_नकाशा

बाह्य दुवे

उत्तर सायप्रस

उत्तर सायप्रस (तुर्की: Kuzey Kıbrıs Türk Cumhuriyeti उत्तर सायप्रसचे तुर्की प्रजासत्ताक) हा सायप्रस देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. उत्तर सायप्रसला तुर्कस्तान व्यतिरिक्त इतर कोणत्याही राष्ट्राने मान्यता दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय समुदाय, युरोपियन संघ उत्तर सायप्रसला सायप्रस देशाचा एक सार्वभौम भाग मानतात.

उत्तर सायप्रस आर्थिक, राजकीय व लष्करी मदतीसाठी पुर्णपणे तुर्कस्तानवर अवलंबुन आहे.

ऑलिंपिक खेळात नेदरलँड्स

ऑलिंपिक खेळात नेदरलँड्सने १९००च्या उन्हाळी खेळांपासून भाग घेतला आहे. त्यानंतर १९०४चे सेंट लुइस येथील खेळ आणि १९५६चे मेलबोर्नमधील खेळ यांशिवाय नेदरलँड्सने सगळ्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

ऑलिंपिक खेळात स्पेन

स्पेन देश १९०० सालापासून बहुतेक सर्व उन्हाळी व सर्व हिवाळी स्पर्धांमध्ये (१९७६ चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर ११५ पदके जिंकली आहेत.

चलन

अर्थशास्त्रात चलन या शब्दाचा अर्थ देवाणघेवाणीचे स्वीकारार्ह माध्यम असा सर्वसाधारणपणे घेतला जातो. चलन हे बहुतांशी देशाच्या सरकारने नाणी आणि बँक नोटांच्या स्वरूपात तयार केले असते आणि देशाच्या वितपुरवठ्याचा भौतिक पैलू असते.आधुनिक अर्थव्यवस्थेत पैसा म्हणून चलन , पतपैसा ,आणि इ-पैसा हे प्रमुख प्रकार प्रचलीत आहेत

जगातील देशांची यादी

जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील.

तुर्की भाषा

तुर्की भाषा (उच्चार:ˈt̪yɾktʃe) मध्यपूर्वेतील भाषा आहे. ही ६ कोटी ३० लाख लोकांची मातृभाषा आहे. ही भाषा मुख्यत्वे तुर्कस्तान, सायप्रस तसेच इराक, ग्रीस, बल्गेरिया, मॅसिडोनिया, कोसोव्हो आणि आल्बेनियामध्ये वापरली जाते. या भागांतून परागंदा झालेले लोकही ही भाषा वापरतात.

सुमारे १,२०० वर्षांचा लिखित इतिहास असलेल्या या भाषेचा उगम मध्य आशियात झाला. ऑटोमन साम्राज्याबरोबर ही भाषा युरोपमध्ये पसरली. भारतातही उर्दू भाषेतल्या गझलांमध्ये अनेक तुर्की शब्दांचा वापर असतो. अरबी, फार्सी आणि तुर्की शब्दांचे ज्ञान असेल तर उर्दू शायरी समजणे सोपे जाते.

निकोसिया

निकोसिया ही सायप्रस ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. उत्तर सायप्रस ह्या अमान्य देशाची राजधानी देखील निकोसिया येथेच आहे. ह्या कारणास्तव निकोसिया शहर दोन भागांमध्ये विभागण्यात आले आहे.

भूमध्य समुद्र

भूमध्य समुद्र हा अटलांटिक महासागराचा एक भाग व पृथ्वीवरील एक प्रमुख समुद्र आहे. हा समुद्र चारही बाजूंनी जमिनीने वेढला गेला असून त्याच्या उत्तरेस युरोप व अनातोलिया तर दक्षिणेस आफ्रिका खंड आहेत. भूमध्य समुद्र पश्चिमेला जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने अटलांटिक महासागरासोबत जोडला गेला आहे. डार्डेनेल्झ व बोस्फोरस ह्या सामुद्रधुन्या भूमध्य समुद्राला मार्माराच्या समुद्रासोबत व काळ्या समुद्रासोबत जोडतात. तसेच इजिप्तमधील सुएझ कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्रासोबत जोडतो.

तांत्रिक दृष्ट्या अटलांटिक महासागराचाच एक भाग असला तरी बरेचदा भूमध्य समुद्र एक वेगळा पाण्याचा साठा समजला जातो. २५ लाख चौरस किमी इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ असलेल्या भूमध्य समुद्राची सरासरी खोली १,५०० मी तर कमाल खोली ५,२६७ मी इतकी आहे.

मध्यपूर्व

मध्यपूर्व हे पृथ्वीवरील एक भौगोलिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात कोणत्या देशांचा समावेश आहे किंवा कोणते देश समाविष्ट करावे याबद्दल काही निश्चित धोरण नसले, तरी मध्यपूर्वेत साधारणपणे भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील नैर्ऋत्य आशियातील, लगतच्या यूरोपमधील व आफ्रिकेच्या उत्तर भागातील काही देश गणले जातात. इजिप्त, इराक, इराण, इस्रायल, ओमान, कतार, कुवेत, जॉर्डन, बहरीन, येमेन, लिबिया, लेबानन, संयुक्त अरब अमिराती, सिरिया, सुदान, सौदी अरेबिया ही सर्व अरब राष्ट्रे, तुर्कस्तान आणि सायप्रस ही अर्ध-युरोपियन राष्ट्रे, आणि अल्जीरिया, मोरोक्को, ट्यूनीशिया या आफ्रिकी देशांचा स्थूलपणे, मध्यपूर्वेत समावेश होतो.

युएफा

युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स (संक्षिप्त: युएफा) ही युरोप खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक नियंत्रण संस्था आहे. सध्या युरोपामधील ५३ देशांचे फुटबॉल संघ युएफाचे सदस्य आहेत.

युरो

युरो हे युरोपियन संघाच्या युरोक्षेत्रामधील देशांचे अधिकृत चलन आहे. युरोपियन संघाच्या विद्यमान २८ सदस्य राष्ट्रांपैकी खालील १९ राष्ट्रे हे चलन अधिकृतरित्या वापरतात. ऑस्ट्रिया, बेल्जियम, सायप्रस, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, लात्व्हिया, लिथुएनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया व स्पेन ह्या देशांनी आजपर्यंत युरोचा स्वीकार व वापर सुरू केला आहे. सध्या सुमारे ३३.४ कोटी युरोपीय रहिवासी युरोचा वापर करतात. तसेच युरोपाबाहेर (विशेषत: आफ्रिकेमधील) अनेक देशांची राष्ट्रीय चलने युरोसोबत संलग्न केली गेली आहेत.

अमेरिकन डॉलर खालोखाल परकीय गंगाजळीसाठी वापरले जाणारे युरो हे जगातील दुसरे मोठे चलन आहे. या चलनासाठी € हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, आय.एस.ओ. ४२१७ (ISO 4217) प्रणालीनुसार युरोचे चिन्ह EUR असे आहे.

युरोप

युरोप हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. युरेशिया ह्या महाखंडाच्या पश्चिम प्रायद्वीपावर वसलेल्या युरोपाच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिमेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला भूमध्य समुद्र व पूर्वेला काळा समुद्र आहेत. उरल पर्वतरांगा, कास्पियन समुद्र व कॉकासस प्रदेश हे साधारणपणे युरोप व आशियाच्या भौगोलिक विभाजनासाठी वापरले जातात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोप हा जगातील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा खंड आहे. रशिया हा युरोपातील सर्वात मोठा देश तर व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश आहे.

युरोपियन संघ

युरोपियन युनियन (अर्थ:युरोपियन संघ) (The European Union-EU) अथवा युरोपियन महासंघ हा युरोप खंडातील २८ देशांचा संघ आहे. या संघाचे उद्दीष्ट युरोपीय देशांमध्ये राजकीय व शासकीय संयु्क्तता आणणे, समान अर्थव्यवस्था व समान व्यापार-नियम लागू करणे, समान चलन (युरो-€) अस्तित्वात आणणे हे आहे. युरोप खंडातील सर्वात मोठे राजकीय व आर्थिक अस्तित्व युरोपियन संघाला लाभले आहे. संघाची एकूण लोकसंख्या ४९ कोटी ३० लाख आणि वार्षिक उत्पन्न (GDP) €१०५ ($१३७) निखर्व आहे. युरोपियन संघात खालील देश आहेत.

युनायटेड किंग्डममध्ये २३ जून २०१६ रोजी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये ब्रिटिश नागरिकांनी युरोपियन संघ सोडण्याच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे २०१९ साली युनायटेड किंग्डम अधिकृतपणे युरोपियन संघातून बाहेर पडेल.

रोमन सायप्रस

सायप्रसचा प्रांत (लॅटिन: Provincia Cyprus, ग्रीक: Ἐπαρχία Κύπρος) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. इ.स.पू. ५८ मध्ये सायप्रसचे बेट प्टॉलेमिक साम्राज्याकडून जिंकून घेतल्यावर ते रोमनांसाठी एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र झाले. सायप्रसवरील रोमन वर्चस्व चौथ्या शतकापर्यंत अबाधित राहिले व त्यानंतर ते बायझेंटाईन साम्राज्याचा भाग बनले.

स्वातंत्र्याचे गाणे

स्वातंत्र्याचे गाणे हे सायप्रस या देशाचे राष्ट्रगीत आहे.

२००८ उन्हाळी ऑलिंपिक

२००८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची २९वी आवृत्ती चीनमधील बीजिंग शहरात ऑगस्ट ८ ते ऑगस्ट २४ दरम्यान खेळवण्यात आली.

युरोपातील देश व संस्थाने
देश व भूभाग
अन्य भूभाग
अंशत: मान्य देश

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.