साम्यवाद

साम्यवाद ही एक राज्यव्यवस्था किंवा समाजव्यवस्था आहे.

ह्या व्यवस्थेत उत्पादनाच्या मुख्य साधनांवर आणि स्रोतांवर कुणा एका व्यक्तीचे अथवा गटाचे आधिपत्य मान्य नाही. म्हणजेच, उत्पादनाची मुख्य साधने आणि स्रोत संपूर्ण समाजाच्याच एकत्रित आधिपत्याखाली असावेत अशी साम्यवादाची मान्यता असते.

कामाची सर्वांत समान विभागणी, योग्यतेनुसार आणि आवश्यकतेनुसार सर्व लाभ इत्यादि साम्यवादी विचारसरणीचे मुख्य पैलू आहेत.

भांडवलवादाच्या प्रसारामुळे विसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी साम्यवादी विचारसरणी मागे पडत गेली. आजमितीस केवळ पाच देशांत (उत्तर कोरिया, व्हियेतनाम, लाओस, चीन आणि क्युबा) साम्यवादी राज्यव्यवस्था तग धरून आहे.

भारतातील साम्यवादाचे नेतृत्व पी.सी.जोशी, ए.के.गोपालन, बी.टी.रणदिवे, पी.सुंदरय्या यांनी केले.

Hammer sickle clean
साम्यवादाचे चिन्ह - हातोडा व कोयता
साम्यवाद
Red star

मॅनिफेस्टो
मार्क्स · लेनिन

कम्युनिस्ट पक्ष
भाकप · माकप

देशात
सोवियत संघ
चीन
क्युबा
व्हियेतनाम
उत्तर कोरिया
लाओस

कम्युनिस्ट पक्ष

कम्युनिस्ट पक्ष या साम्यवाद विचारसरणीच्या राजकीय संस्था आहेत. त्यांचे ध्येय कम्युनिस्ट राज्याची स्थापना व कारभार चालवण्याची असते. सामान्यत: मजुर/ कष्टकरी वर्ग हे कम्युनिस्ट पक्षाचे समर्थक असतात.

या देशात कम्युनिस्ट राज्यपद्धती आहे:

चीन

क्युबा

व्हियेतनाम

उत्तर कोरिया

लाओस

कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स (जन्म: १८१८ – मृत्यू: १८८३) हे १९ हे एक जर्मन अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले पण त्यांचे वर्गसंघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध आहे. फ्रेडरिक एन्जेल्स (Friedrich Engels) प्रमाणे मार्क्सने देखील तत्कालिन राजकीय लढ्यांमध्ये भाग घेतला. कार्ल मार्क्स यांनी "दास कॅपिटाल" या ग्रंथाचा पहिला खंड इ.स. १८६७ मध्ये प्रसिद्ध केला.

कार्ल मार्क्स यांच्या विचारांची लोकप्रियता सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर कमी झाली असली तरी ते विचार शिक्षण क्षेत्र, राजकीय क्षेत्र, कामगार लढा यामध्ये अजूनही लोकप्रिय आहेत. मार्क्स यांचे विचार अनेक कम्युनिस्ट राज्ये आणि राजकीय चळवळींमध्ये अजूनही आदर्श मानले जातात.ते वर्ग संघर्षाचे प्रणेते होते

गोदावरी परुळेकर

गोदावरी परुळेकर (१४ ऑगस्ट, १९०८ - ऑक्टोबर ८, १९९६) (माहेरचे नाव- गोदावरी गोखले) या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, व मराठी लेखिका होत्या.

१९१२मध्ये ना.म. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परुळेकर यांनी मानद सहाय्यक सचिव म्हणून कामगारांच्या शिक्षणप्रसाराच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. गिरगावपासून परळपर्यंतच्या भागात ठिकठिकाणी नागरिकांना वर्तमानपत्रे वाचण्यासाठी केंद्रे सुरू केली. त्यामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली व त्यांना शिक्षणाची गरज वाटू लागली. याच सुमारास १९१७मध्ये चिंचपोकळी येथे वाचनालय सुरू केले. त्यावेळी ११ ग्रंथालये व १० वाचनालये मोफत चालविली जात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे क्रांतिकारी व मानवतावादी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडलेले आहेत.

तेलंगणा

तेलंगण (लेखनभेद: तेलंगणा किंवा तेलंगाणा) भारताचे २९वे राज्य आहे. जून २, इ.स. २०१४ रोजी स्थापन झालेले हे राज्य पूर्वी आंध्र प्रदेशचा भाग होते. या प्रदेशाची प्राचीन नावे तेलिंगाण, तेलिंगा, त्रिलिंग अशी होती.

तेलंगण भौगोलिक दृष्ट्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर कर्नाटक यांच्या सीमांलगत आहे. तांदूळ हे मुख्य पीक असलेला हा प्रदेश गोदावरी खोऱ्यात असून हा भाग ऐतिहासिक काळात सातवाहन (इ.स.पू. २२१ - इ.स. २१८), गोवळकोंड्याची कुतुबशाही (इ.स. १५२० - इ.स. १६८७) आणि हैदराबादचा निजाम (इ.स. १७२४ - इ.स. १९४८) यांच्या सत्तेखाली राहिला. इ.स.च्या विसाव्या व एकविसाव्या शतकात साम्यवाद आणि नक्षल विचारप्रणालींचा लक्षणीय प्रभाव या प्रदेशावर आढळतो. हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर इ.स. १९४८ साली हा भाग स्वतंत्र भारतीय संघराज्यात विलीन झाला. हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे तर तेलगू ही प्रमुख भाषा आहे.

नक्षलवाद

नक्षलवाद ही भारतातील कडव्या साम्यवादी संघटनांनी चालविलेली सशस्त्र चळवळ आहे.

गरीब शेतमजूर आणि आदिवासींच्या दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध माओ ने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल ही नक्षलवाद्यांची विचारसरणी आहे.

नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील (ऑगस्ट ३, इ.स. १९०० - डिसेंबर ६, इ.स. १९७६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.

नोव्हेंबर १४

नोव्हेंबर १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१७ वा किंवा लीप वर्षात ३१८ वा दिवस असतो.

प्रभाकर ऊर्ध्वरेषे

प्रभाकर ऊर्ध्वरेषे (९ जानेवारी १८१९: मृत्यू : ) हे साम्यवादी विचारसरणीचे मराठी लेखक व पत्रकार होते.

नवे जग या साम्यवादाला वाहिलेल्या मराठी नियतकालिकाचे ते १९४०च्या दशकांत मुख्य संपादक होते. १ जानेवारी १९४६ला नागपूरहून सुरू झालेल्या 'युगवाणी' त्रैमासिकाचे मधुकर आष्टीकर यांच्यानंतरचे संपादक होते.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जडण-घडण व स्थित्यंतरे जवळून अनुभवलेल्या ऊर्ध्वरेष्यांनी, पूरण चंद जोशी व भालचंद्र रणदिवे ह्या पक्षातील दोन सर्वोच्च नेत्यांमधील संघर्ष आपल्या आत्मचरित्रात विस्तृतपणे मांडला आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष

भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे.या पक्षाची स्थापना १९२५ साली कॉम्रेड डांगे उर्फ श्रीपाद अमृत डांगे यांनी केली. अन्य पक्षांच्या तुलनेत हा पक्ष वेगळा आहे.ह्या पक्षाचे विचार पूर्णपणे मार्क्सवादी आहेत. कार्ल मार्क्सने प्रतिपादन केलेल्या साम्यवादी अर्थव्यवस्थेचा या पक्षावर संपूर्ण प्रभाव प्रभावित आहे. भारतात काँग्रेस पक्षानंतरचा हा सर्वात जुना पक्ष आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर भारतात बंदी नसून माओवादी कम्युनिस्ट पक्षावर भारतात बंदी आहे. माओवादी कम्युनिस्ट पक्ष हिंसेचे समर्थन करतो.

माओ त्झ-तोंग

हे चिनी नाव असून, आडनाव माओ असे आहे.माओ त्झ-तोंग, माओ झेडाँग, माओ झेतांग (मराठी लिखाण : माओ त्से-तुंग); चिनी लिपीत: 毛泽东 ; फीनयीन: Mao Zedong / Mao Tse-tung) (जन्म : २६ डिसेंबर, इ.स. १८९३; षाओषान, हूनान, चीन; मृत्यू : ९ सप्टेंबर, इ.स. १९७६; पेकिंग, चीन) हा चिनी साम्यवादी क्रांतिकारक, राजकारणी, राजकीय तत्त्वज्ञ, चिनी राज्यक्रांतीचा प्रणेता, इ.स. १९४९ साली स्थापन झालेल्या चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या (ची.ज.प्र.) शिल्पकारांपैकी एक शिल्पकार व ची.ज.प्र.चा पहिला चेअरमन, अर्थात अध्यक्ष, होता. इ.स. १९४९ सालापासून इ.स. १९७६ साली मृत्यूपर्यंत त्याने देशावर एकाधिकारशाहीसारखा अंमल गाजवला. मार्क्सवाद-लेनिनवादांत माओने घातलेली सैद्धांतिक भर व माओची राजकीय, सैनिकी धोरणे यांना साकल्याने माओवाद या संज्ञेने उल्लेखले जाते.

मार्क्सवाद

मार्क्सवाद म्हणजे कार्ल मार्क्स यांचे तत्त्वज्ञान होय. मार्क्सवादास साम्यवाद असेही म्हटले जाते. मार्क्सवाद हा जगभर प्रसिद्ध आहे तसेच जगातील अनेक देशांत मार्क्सवादावर आधारलेले राजकिय पक्ष आहेत परंतु रशिया, चीन, व्हिएतनाम व इतर काही देशांत प्रमुख राजकिय पक्ष हा मार्क्सवादी आहे.

राहुल सांकृत्यायन

महापंडित राहुल सांकृत्यायन (९ एप्रिल, १८९३ (पंदहा, उत्तर प्रदेश) - १४ एप्रिल, १९६३ (दार्जिलिंग)) हे हिंदी साहित्यातील नावाजलेले लेखक होते.

लेऑन ट्रॉट्स्की

लेऑन ट्रॉट्स्की (रशियन: Лeв Давидович Трóцкий) (नोव्हेंबर ७, इ.स. १८७९ - ऑगस्ट २१, इ.स. १९४०) हा युक्रेनमध्ये जन्मलेला मार्क्सवादी तत्त्वज्ञ होता. ट्रॉट्स्की बोल्शेविक क्रांतीतील एक नेता होता. ह्याने 'लाल सेने'ची स्थापना केली.

याचे मूळ नाव लेव्ह डेव्हिडोविच ब्रॉन्स्टाइन असे होते.

लोकशाही

अब्राहम लिंकन कृत व्याख्या: लोकांनी, लोकांसाठी , लोकांमार्फत चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही.

देशाच्या राज्यकारभाराची एक उत्तम पध्दती म्हणून लोकशाही शासनपध्दतीचा उल्लेख केला जातो . जगातील बहुतेक देशांना लोकशाही शासनपध्दतीचे आकर्षन असल्लाचे दिसते .लोकशाहीव्यतिरिक्त अन्य शासन पध्दती असणाऱ्या देशातील जनतेने संघटितपणे लढे दिले व लोकशाही अस्तित्वात आणली.

लोकशाहीचा अर्थ

लोकशाहीला इंग्रजीत डेमोक्रसी ( Democracy ) म्हणतात .डेमोस म्हणजे लोक आणि क्रेसिया म्हणजे सत्ता . लोकांची सत्ता असणारी शासनपध्दती म्हणजे लोकशाही होय . लोकशाही हे लोकांचे शासन असते . या पध्दतीत लोकांचा राज्यकारभारात सहभाग असतो . व्यक्तीचे स्वातंत्र्य व लोकांचे कल्याण यावर लोकशाहीत भर दिला जातो . लोकशाही जनसमतीवर आधारलेली असते

लोकशाहीचे प्रकार

अध्यक्षीय लोकशाही - अध्यक्षीय

संसदीयलोकशाहीचे मुख्य स्पर्धक

भांडवलशाही

राजेशाही

Theocracy

फाशीवाद

साम्यवाद

हुकुमशाहीलोकशाहीत राजकीय पक्ष महत्वाचे आहेत. राजकीय पक्षाचे दोन प्रकार पडतात. अ)राजकीय पक्ष. ब)राष्ट्रीय पक्ष.

व्लादिमिर लेनिन

व्लादिमिर इलिच लेनिन (इस.१८७०-१९२४) हे रशियाचे क्रांतीकारी नेते व विचारवंत होते. यांचे मूळ नाव व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह असे होते. सोवियत संघाच्या पहिल्या सरकारचे अध्यक्ष असलेले लेनिन सोवियत सोशॅलिस्ट बोल्शेव्हिक पार्टीचे (नंतरच्या सोव्हियेत कम्युनिस्ट पार्टीचे) नेते होते. रशियन राज्यक्रांतीनंतर इ.स १९१७ रोजी त्यांनी सत्ता हस्तगत केली. कम्युनिस्ट विचारसरणीत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांचा मृतदेह रशियाच्या लाल चौकात जतन केला आहे. लेनिन हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे साम्यवादी विचारवंत होते. त्यांचे कार्य जगाच्या इतिहासात खरोखरच अतुलनीय व नेत्रदीपक आहे.

सहजानंद सरस्वती

स्वामी सहजानंद सरस्वती (१८८९ - १९५०) हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शेतकरी नेते होते. हे दशनामी आखाड्याचे संन्यासी असून संस्कृत पंडित आणि लेखक होते. त्यांनी भगवद्गीतेवर भाष्य केले. हे भाष्य मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे. त्यांनी गीता आणि मार्क्सवाद यांचा तुलनात्मक अभ्यास करणारा एक ग्रंथही लिहिला आहे. त्यांच्यावर शंकराचार्यांपासून मार्क्सपर्यंतचा प्रभाव होता. गीतेतच खरा मार्क्सवाद आणि साम्यवाद सापडतो अशी त्यांची भूमिका दिसते. ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कॉ. नंबुद्रीपाद यांचा आदर करीत. त्यांनी पूर्व-मीमांसा, वेदान्त, भागवत, शंकराचार्य, मार्क्सवाद, गांधीवाद आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, इ. क्षेत्रांत काम केले. भाष्यग्रंथांच्या आधारे नव्हे तर जीवनानुभवाच्या आधारे गीता समजते हे त्यांचे मुख्य प्रतिपादन आहे.

त्यांनी अखिल भारतीय किसान सभा या संघटनेच्या स्थापनेचे काम केले.

साम्यवादी जाहीरनामा

कम्युनिस्ट मॅनिफेस्टो (जर्मन: Manifest der kommunistischen Partei)

कार्ल मार्क्स व फ्रेडरिच एन्गेल्स यांनी इ.स. १८४८ रोजी लंडन येथे प्रसिद्ध करून कम्युनिस्ट विचारसरणीचा पाया घातला.

याचे प्रस्तावना व चार खंड असे पाच भाग आहेत.

इतिहास
तत्वज्ञान व विचारधारा
घटना व चळवळी
संघटना
तत्त्वज्ञ व समाजसुधारक
स्वातंत्र्य सेनानी
ब्रिटिश व्हाइसरॉय
स्वातंत्र्य

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.