संस्कृती

{}[आमि तुम का भालो बाशी] }

प्रस्तावना

संस्कृती या संस्कृत शब्दाचा अर्थ 'चांगले करणे' असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.[१]

Gobustan ancient Azerbaycan full
गोबुस्तान, अझरबैजान येथील इ.स.पू. १०,००० सनाच्या काळातील, तत्कालीन संस्कृतीच्या खुणा सांगणारी पाषाणांवरील चित्रे

संस्कृती ही विविध अर्थच्छटा असणारी संकल्पना आहे. हा शब्द सहसा खालीलपैकी एखादा अर्थ ध्वनित करण्यासाठी योजला जातो :

  • कलाशास्त्रे यांतील उच्च अभिरुची - अर्थात 'अभिजात संस्कृती'
  • एखाद्या संस्थेच्या / संघटनेच्या किंवा एखाद्या समूहाच्या प्रवृत्ती, मूल्ये, ध्येये, प्रथा-प्रघात इत्यादी सामायिक बाबी
  • मानवी ज्ञान, समजुती, वर्तणुकी इत्यादींचा एकत्रित परिपाक

आशय

मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे, तर स्वत:चा देह, मन आणि बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वत:त बदल घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत.[२]

संस्कृतीची रूपे

संस्कृतीची दोन रूपे असतात, एक डोळ्याला जाणवणारे व दुसरे ज्ञानेंद्रियांद्वारे जाणवणारे. याविषयी इरावती कर्वे यांनी नोंदविले आहे- "व्यक्ती या घरे,कपडे इ.स्थूल वस्तूंचा उपभोग घेत असतात. हे संस्कृतीचे बाह्य रूप. संस्कृतीचे दुसरे रूप म्हणजे माणसाने सामाजिक जीवन जगण्यासाठी ठरवून घेतलेली रीत होय. योग्य-अयोग्य ,पाप-पुण्य, इत्यादी.संकल्पना तसेच कौटुंबिक नाती, वागणूक इत्यादी.गोष्टी या परंपरागत असतात. या गोष्टी माणूस एकटा निर्माण करीत नाही, तो समूहाने त्या करत असतो.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा

वाचन संस्कृती

बदलता वाचनव्यवहार :-

टी.व्ही, रेडिओ ,इंटरनेट, फ़ेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्विटर यांसारख्या आधुनिक प्रसारमाध्यमाच्या उपलब्धतेचा साहित्यव्यवहार आणि वाचनसंस्कृतीवर जाणवण्याइतपत परिणाम झाल्याचे दिसते. आधुनिक वाचकवर्ग या प्रसारमाध्यमाच्या विळख्यात सापडल्याने वाचन संस्कृतीवर काय चांगले वाईट परिणाम झाले हे बघणे गरजेचे आहे. सध्या वाचनव्यवहार लोप पावत चालला आहे, लोक वाचत नाहीत. मराठी पुस्तकांना पहिल्यासारखा वाचक मिळत नाही असा काहीसा ओरडा साहित्य व्यवहारात होताना दिसतो आहे. आधुनिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावांमुळे पुस्तकांचा वाचक वर्ग दुरावला आहे ओरडा विचारवंत, प्रकाशक, लेखक, पत्रकार मंडळींनी जो केला आहे त्या ओरडण्यात कितपथ तथ्य आहे हे बघणे महत्त्वाचे आहे.

पूर्वीचा काळ असा होता की, पुस्तकाचे वाचन करणे, संग्रह करणे हे वैचारिक श्रीमंतीचे एक लक्षण समजले जाई. पुस्तकाचे आदान प्रदान केले जाई .कोणी कोणती पुस्तके वाचली, त्यांतून काय मिळाले, याविषयी आपसात चर्चा-वादविवाद व्हायचे. चांगल्या कथा-कादंबर्‍या वाचताना वाचक एका भावनिक स्थितीत हरवला जायचा. काव्य, कथा, नाट्य, प्रवासवर्णन, ललित, वैचारिक गद्य यांच्या वाचनाने रसिक वाचक आणखी समृद्ध होत जायचा. विविध ग्रंथप्रकाशने, नियतकालिके, मासिके, वृत्तपत्रांच्या रविवारच्या अंकातील साहित्यिक पुरवण्या यांवर वाचकांच्या अक्षरशः उड्या पडायच्या. एखाद्या चांगल्या पुस्तकाच्या सर्व आवृत्या रांगा लावून हातोहात खपल्या जायच्या असा तो वैभवाचा काळ.बघता बघता हा वाचनसंस्कृतीच्या वैभवाचा काळ लोप पावला .टी.व्ही, रेडिओ, इंटरनेट, डीव्हीडी, व्हीसीडी प्लेअर, सोशल मेडिया, फ़ेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्विटर, इन्स्टाग्रॅम यांसारख्या आधुनिक करमणुकीच्या प्रसारमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे वाचक पुस्तके वाचेनासा झाला. रांगा लाऊन विकली जाणारी पुस्तके सवलत देऊनही विकली जात नसल्याच्या प्रकाशकांच्या ओरडण्यात तथ्य असल्याचे दिसते.

आधुनिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे वाचक ग्रंथ वाचनापासून दुरावत का गेला? वाचन संस्कृतीचा लोप का झाला? या विधानांची चर्चा करताना वर उल्लेखलेल्या आधुनिक प्रसारमाध्यमांचा प्रभाव तर परिकणामकारक आहेच पण याशिवाय आणखीही काही कारणे आहेत. पूर्वी करमणुकीच्या साधनांचा अभाव असल्यामूळे लोक फावल्या वेळेत ग्रंथवाचनाकडे वळत. मात्र सध्या करमणुकीच्या साधनाचा विकास झाला आहे. टी.व्ही. चॅनेल्सच्या वाढत्या संख्येमुळे लोकांना घरबसल्या जगाच्या कान्याकोपर्‍%यातली कोणत्याही विषयाची माहिती अत्यंत थोडक्या वेळात आणि परिणामकारक रीतीने मिळू लागली आहे. इंटरनेटवर ‘गुगल’सारख्या सर्च इंजिनाद्वारे घरबसल्या कोणत्याही विषयावरील माहिती काही सेकंदात मिळते. .आणि बघता बघता सारा समाज गुगलमय होत चालला आहे. तेव्हा तो ग्रंथालयात जाऊन पुस्तकांची शोधाशोध करीलच कशासाठी? हाताचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावण्याची समाजाची वृत्ती कधीच नसते. कमी वेळेत, कमी खर्चात आणि कमी श्रमात एखादी गोष्ट मिळत असेल तर ती आजच्या फास्ट जगात कुणालाच नको असते. या सर्व गोष्टींच्या परिणामांमुळे वाचक वर्ग कमी होत चालला आहे. फेसबुक, व्हॉट्‌स‍ॲप ट्विटरर या प्रसार माध्यमांवर लोकांचा जास्त वेळ जात असल्याने वाचक वर्ग कमी होत चालला आहे.

वाचन संस्कृतीचा लोप होत आहे, असे म्हणताना लेखक-प्रकाशकांचीही काही नैतिक जबाबदारी असतेच. काळ बदलत चालला आहे. काळाच्या बदलत्या प्रवाहाबरोबर लेखक-प्रकाशकांनीही बदलायला हवे.सध्या इंटरनेट सारख्या माध्यमांचा चांगल्या प्रकारे वापर करून वाचन संस्कृती वाढवता येईल. इंटरनेट आदी गोष्टी हे वाचन संस्कृतीवर आक्रमण न मानता ती वाचन व्यवहाराला लाभलेली देणगी आहे या भावनेने तिचा वापर करून घेता येऊ शकेल. कारण ह्या आधुनिक प्रसार माध्यमाद्वारे गद्य-पद्य स्वरूपातील साहित्य, चित्रे, ब्लॉग प्रसिद्ध करता येईती.या दृष्टीने ही माध्यमे उपयुक्त ठरतील. मराठीत ई साहित्य प्रतिष्ठान या संस्थेने पीडीएफ स्वरूपात मराठी पुस्तके विनामूल्य त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. ती पुस्तके आपण डाऊनलोड करून आपल्या मोबाईलवर वाचू शकतो. पुस्तकांचा संग्रहही करू शकतो. इंटरनेट हे माध्यम पुस्तक प्रकाशनापेक्षा स्वस्त, जलद आणि प्रभावी माध्यम आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध केलेले साहित्य काही मिनिटात जगभरच्या वाचकांना उपलब्ध होऊ शकते. त्यावर चर्चा ,विचार, परिसंवाद करणे सहज शक्य होते. व्हॉट्‌स‍ॲपसारख्या प्रसारमाध्यमाद्वारे आपण पीडीएफ स्वरूपातील पुस्तकांचे आदान प्रधान करू शकतो. ही प्रक्रिया फार जलद गतीने करता येते.

हिंदू संस्कृतीचे अन्य विषय

हिंदू संस्कृतीच्या संदर्भात विविध संकल्पना मानल्या आहेत.-

१. ऋणकल्पना- ही भारतीय समाजशास्त्रीय महत्वाचे संकल्पना असून आश्रम व्यवस्थेशी या संकल्पनेची सांगड घातलेली दिसून येते.

२. आश्रम-मानवी आयुष्याचे चार भाग कल्पून त्या प्रत्येक भागाला आश्रम असे नाव दिले आहे.ब्रह्मचर्य, गृहस्थ ,वानप्रस्थ आणि संन्यास असे हे चार आश्रम आहेत.

३. पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले असून नीतीशास्त्राच्या दृष्टीने याला विशेष महत्त्वव आहे.

४. चातुर्वर्ण्य-ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण मानले गेले आहेत .

५. प्रतीक संकल्पना- स्वस्तिक, कमळ, कलश ,यज्ञ अशी विविध प्रतीके ही भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे घटक आहेत.

संस्कृतीची अंगे

१. भूमी
२. भारतीय जन
३. भाषा व साहित्य

ही भारतीय संस्कृतीची तीन प्रमुख अंगे आहेत.

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा
आशिया

आशिया हा पृथ्वीवरील सात भूखंडांपैकी एक आहे. आशिया जगातील सर्वांत मोठा व सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला खंड आहे. जगातील ६०% लोकसंख्या आशियात राहते. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी ८.६% भाग आशियाने व्यापला आहे.

सिंधू संस्कृती, बॅबिलोनियन संस्कृती, सुमेरियन संस्कृती इ. प्राचीन संस्कृतींचा उगम या खंडातच झाला. हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, पारशी, शिख इ. धर्मांचा उदय देखील याच खंडात झाला.

हे देश आशिया व युरोप ह्या दोन्ही खंडांत गणले जातात. ह्या देशांकरिता क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचे आकडे त्यांच्या आशियातील भागांकरिता आहेत.* हे देश आशिया व ओशानिया ह्या दोन्ही खंडांत गणले जातात. ह्या देशांकरिता क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचे आकडे त्यांच्या आशियातील भागांकरिता आहेत.

इटली

इटली हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. हा देश विकसित देशांपैकी एक असून तो जी-७चा सदस्य आहे. इटली चे क्षेत्रफळ ३,०१,२५३ चौ.किमी एवढे आहे. लिरा हे इटली चे चलन असून इटली ची साक्षरता ९७ टक्के आहे. ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म असून इटालियन ही प्रमुख भाषा आहे. रोम ही इटलीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हा देश गंधकाच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे.इटली तील प्रमुख खेळ फुटबॉल आहे.

इराण

इराण हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. इराण चे पूर्वीचे नाव पर्शिया असे होते. पर्शियन संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. खनिज तेल साठयात संपूर्ण जगात क्रमांक तिसरा तर वायुसाठ्यात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. इराकविरुद्ध ९ वर्षे चाललेले युद्ध यादेशाने केले.

ईरान मध्ये, फारसी, अझरबैजान, कुर्दिश (कुर्डिस्तान) आणि लूरे हे सर्वात महत्वाचे जातीय गट आहेत

उत्तर कोरिया

उत्तर कोरिया हा पूर्व आशियातील एक देश आहे. हा एक एक अण्वस्त्रधारी देश आहे.

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड आणि देश आहे. याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंड, तास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो.

केनिया

साचा:देश..केनिया वन्यजीव संपत्तीने समृद्ध देश आहे

केनिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे.

केरळ

गुणक: 08.47°N 76.95°E / 08.47; 76.95

केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोची व कोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे.

पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे केरळात भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य आहे. अर्थात, केरळचा व्यक्तिविकास सूचकांक भारतात सर्वात अधिक आहे. २००५ मधील एका सर्वेक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे. केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थलांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. निसर्ग साधनसंपत्ती आणि महिलाचे शिक्षणातील सर्वात जास्त प्रमाण ही वैशिष्ट्ये आहे.

क्रोएशिया

क्रोएशिया हा युरोपातील बाल्कन विभागामधील एक देश आहे. झाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी व प्रमुख शहर आहे.

चीन

चीन (इंग्रजी: China/ चायना; नवी चिनी चित्रलिपी: 中国; जुनी चिनी चित्रलिपी: 中國; फीनयीन: Zhōngguó; उच्चार: चाँऽऽग्-कुओऽ; अर्थ: जगाच्या मध्यभागी वसलेला देश), अधिकृ्त नाव:- चीनचे जनतेचे प्रजासत्ताक (नवी चिनी चित्रलिपी: 中华人民共和国; जुनी चिनी चित्रलिपी: 中華人民共和國; फीनयीन: Zhōnghuá Rénmín Gònghéguó; उच्चार: चाँऽऽग्-हुआऽ रऽन्-मीऽन् कोंग्-हऽ-कुओऽ) हा आशियातला, जगातला सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. बौद्ध धर्म हा चीनचा प्रमुख धर्म असून देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये ९१% (१२२ कोटी) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे

चीनचे क्षेत्रफळ सुमारे ९६ लाख चौरस किलोमीटर आहे. भूप्रदेशाच्या आकारानुसार चीन जगातला दुसरा सर्वात मोठा देश आहे.चीनचा विस्तारित भूप्रदेश वैविध्यपूर्ण आहे. उत्तर आणि उत्तरपुर्वेला मंगोलिया आणि मध्यआशियानजिक गोबी आणि तलमाकन वाळवंटे आहेत. तर नैऋत्य आशियालगतच्या दक्षिणेकडच्या पाणथळ भूप्रदेशात कटिबंधीय अरण्ये आहेत. चीनचा पश्चिमेकडील भूभाग हा खडबडीत आणि उंचावलेला आहे. हिमालय, काराकोरम, पामीर आणि थ्येन शान पर्वतरांगा याच भागात आहेत. तिबेटच्या पठारावरून निघणाऱ्या यांगत्से आणि पीत नदी या दोन पूर्ववाहिनी नद्या चीनमधील मोठ्या नद्या आहेत

डेन्मार्क

डेन्मार्क हा उत्तर युरोपामधील व स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. हा देश अतिशय विकसीत असून या देशाचे दरडोई उत्पन्न अति उच्च आहे. डेन्मार्क हा देश दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. कोपनहेगन ही डेन्मार्क ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

तुतारी

तुतारी (स्त्रीलिंगी नाम; अनेकवचन: तुतार्‍या) हे भारतीय उपखंडात, विशेषकरून महाराष्ट्रात, प्रचलित असणारे एक सुषिर (म्हणजे तोंडाने फुंकून वाजवण्याचे) वाद्य आहे. ही आकडेबाज वळणाची, म्हणजे साधारणतः इंग्रजी 'सी' आकाराची असते व तिचा आकार वाजविणाऱ्याच्या तोंडाकडे निमुळता होत आलेला असतो. सर्वसाधारणपणे, हे पितळेचे बनविलेले असते. मात्र सध्या अन्य धातू व मिश्रधातूंमध्येही तुतार्‍या बनवल्या जातात.

पूर्वी लढाईस तोंड फुटणे किंवा राजाचे आगमन होणे, इत्यादी प्रसंगी तुतारी फुंकली जात असे. वर्तमान काळात लग्नप्रसंगात किंवा सभासमारंभांच्या उद्घाटनप्रसंगी हिचा वापर होताना आढळतो.

तुर्कस्तान

तुर्कस्तान (तुर्की :Türkiye) किंवा टर्की हा मध्यपूर्वेतील एक मोठा देश आहे. हा देश दोन खंडामध्ये (युरोप व आशिया) विस्तारित आहे. अंकारा ही तुर्कस्तानची राजधानी आहे तर इस्तंबूल हे त्या देशातील सर्वात मोठे शहर आहे.

नेदरलँड्स

नेदरलँड्स हा पश्चिम युरोपामधील एक देश आहे. नेदरलँड्स हा नेदरलँड्सचे राजतंत्र (डच: Koninkrijk der Nederlanden) ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. बेआट्रिक्स ही नेदरलँड्सची राणी व राष्ट्रप्रमुख आहे. अ‍ॅमस्टरडॅम हे नेदरलँड्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मुख्यालय आहे.

नेदरलँड्सलाच हॉलंड समजले जाते, मात्र प्रत्यक्षात नॆदरलँड्समध्येच उत्तर हॉलंड व दक्षिण हॉलंड असे दोन प्रांत आहेत व बहुतेक महत्त्वाची शहरे या दोन प्रांतांत आहेत.

पोर्तुगाल

पोर्तुगाल हा पश्चिम युरोपामधील इबेरिया द्वीपकल्पावर वसलेला एक देश आहे. पोर्तूगाल युरोपातील सर्वात पश्चिमेकडील देश आहे. या देशाच्या उत्तर व पूर्वेला स्पेन हा देश तर दक्षिणेला व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. लिस्बन ही पोर्तुगाल ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

पोलंड

पोलंड हा मध्य युरोपातील एक देश आहे. पोलंडच्या उत्तरेला बाल्टिक समुद्र व रशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्ट, ईशान्येला लिथुएनिया, पूर्वेला बेलारूस व युक्रेन, दक्षिणेला स्लोव्हाकिया, नैऋत्येला चेक प्रजासत्ताक तर पश्चिमेला जर्मनी हे देश आहेत. ३,१२,६८५ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला पोलंड हा आकाराने युरोपातील ९वा व जगातील ६९वा मोठा देश आहे. वर्झावा तथा वॉर्सो ही पोलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

पोलंडचे अधिकृत चलन न्यु झ्लॅाटी हे आहे. जगात सर्वाधिक गंधकाचे साठे याच देशात आहे. ओडर आणि व्हिस्चुला या देशातील प्रमुख नद्या आहेत.

पोलिश मातीवरील मानवी क्रियाकलापांचा इतिहास जवळजवळ 500,000 वर्षांचा आहे. लोह युग संपूर्ण काळात विविध संस्कृतींमध्ये व विविध संस्कृती व जमाती नंतर पूर्व जर्मनिया मध्ये स्थायिक झाले. तथापि, पाश्चात्य पोलांनीच या प्रांतावर प्रभुत्व मिळवत पोलंडला हे नाव दिले. पहिल्या पोलिश राज्याची स्थापना इ.स. 66 .66 पर्यंत शोधली जाऊ शकते, जेव्हा मिआस्को प्रथम, सध्याच्या पोलंडच्या प्रांताशी सुसंगत ख्रिश्चन धर्मात परिवर्तित झाले. पोलंड किंगडमची स्थापना 1025 मध्ये झाली आणि 1569 in मध्ये त्याने लुब्लिन संघटनेवर स्वाक्षरी करून लिथुआनियाच्या ग्रँड डचीशी दीर्घकाळपासून चाललेल्या राजकीय संबंधांना सिमेंट बनविले. या संघटनेने पोलिश-लिथुआनियन कॉमनवेल्थची स्थापना केली, सर्वात मोठा (१,००,००,००० चौरस किलोमीटर क्षेत्रातील एक (0 s ०,००० चौरस मैल)) आणि 16 व्या आणि 17 व्या शतकातील युरोपमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये, अनोखी उदारमतवादी राजकीय व्यवस्था ज्यांनी युरोपची पहिली अंगीकारली राष्ट्रीय संविधान, 3 मे 1791 ची घटना.

प्रतिष्ठा आणि समृद्धीच्या अस्तित्वामुळे, 18 व्या शतकाच्या शेवटी शेजारील देशांनी देशाचे विभाजन केले आणि 1918 मध्ये व्हर्साय कराराद्वारे त्याचे स्वातंत्र्य पुन्हा मिळवले. प्रादेशिक संघर्षांच्या मालिकेनंतर, नवीन बहु-वंशीय पोलंडने युरोपियन राजकारणातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून आपले स्थान पुनर्संचयित केले. सप्टेंबर 1939 मध्ये जर्मनीने पोलंडच्या स्वारीवर दुसरे महायुद्ध सुरू केले आणि त्यानंतर सोव्हिएत युनियनने मोलोटोव्ह – रिबेंट्रॉप करारानुसार पोलंडवर आक्रमण केले. देशातील 90% ज्यूंसह सुमारे सहा दशलक्ष पोलिश नागरिक युद्धामध्ये मरण पावले. 1947 मध्ये, पोलिश पीपल्स रिपब्लिकची स्थापना सोव्हिएटच्या प्रभावाखाली उपग्रह राज्य म्हणून झाली. 1989 च्या क्रांतीनंतर, विशेषत: एकता चळवळीच्या उदयातून पोलंडने स्वतःला राष्ट्रपती लोकशाही प्रजासत्ताक म्हणून प्रस्थापित केले.

पोलंडची विकसित बाजारपेठ आहे आणि पूर्व-मध्य युरोपीय क्षेत्रातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज असलेल्या मध्य युरोपमधील एक प्रादेशिक शक्ती आहे. [२०] युरोपियन युनियनमध्ये जीडीपी (पीपीपी) द्वारे सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि जगातील सर्वात गतीशील अर्थव्यवस्था आहे, एकाच वेळी मानव विकास निर्देशांकात उच्च स्थान मिळवित आहे. [२ 23] पोलंड हा एक विकसित देश आहे, जी राहणीमान, जीवन गुणवत्ता, सुरक्षा, शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य यासह उच्च-उत्पन्न-अर्थव्यवस्था [२ 25] राखते. [२]] [२]] विकसित शालेय शैक्षणिक व्यवस्थेसह, राज्य विनामूल्य विद्यापीठ शिक्षण, सामाजिक सुरक्षा आणि सार्वत्रिक आरोग्य सेवा प्रणाली देखील प्रदान करते. [२]] []०] देशात 16 युनेस्को जागतिक वारसा साइट आहेत, त्यापैकी 15 सांस्कृतिक आहेत.

पोलंड हे युरोपियन युनियन, शेंजेन एरिया, संयुक्त राष्ट्र, नाटो, ओईसीडी, थ्री सीज इनिशिएटिव्ह, व्हिसेग्रीड ग्रुपचे सदस्य राष्ट्र आहे आणि जी -20 वर अंदाज आहे.

मेक्सिको

मेक्सिको किंवा मेक्सिकोची संयुक्त संस्थाने (स्पॅनिशमध्ये एस्तादोस युनिदोस मेक्सिकानोस) हा उत्तर अमेरिकेतील एक देश आहे. मेक्सिको जगातील सर्वांत जास्त स्पॅनिशभाषक असलेला देश आहे. मेक्सिकोला लॅटिन अमेरिकेचा एक भाग समजले जाते.

युनायटेड किंग्डम

ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (प्रचलित नाव: United Kingdom of Great Britain and Northern Ireland; युनायटेड किंग्डम हा उत्तर युरोपातील एक देश (संयुक्त राजतंत्र) आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड आयर्लंड ह्या बेटावर वसला आहे.

युनायटेड किंग्डम हा युरोपातील व जगातील एक विकसित देश आहे. तसेच, ते युरोपियन संघाचे संघराज्य आहे, व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहे. युनायटेड किंग्डम हे राष्ट्रकुल परिषद, जी-८, नाटो इत्यादि अंतर्राष्ट्रीय संस्थांचे सदस्य राज्य आहे.

रशिया

रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. रूबल हे रशियाचे चलन आहे. ख्रिश्चन व निधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.

स्वीडन

स्वीडन (स्वीडिश: Konungariket Sverige) इंग्रजीत Sweden) हा उत्तर युरोपातील एक देश आहे. स्वीडनच्या उत्तरेला व पश्चिमेला नॉर्वे, इशान्येला फिनलंड, तर पूर्वेला व दक्षिणेस बाल्टिक समुद्र आहेत. दक्षिणेला डेन्मार्क, जर्मनी व पोलंड तर पूर्वेला इस्टोनिया, लॅटिव्हिया, लिथुआनिया व रशिया ह्या देशांसोबत स्वीडनच्या सागरी सीमा आहेत. स्वीडन डेन्मार्क देशाशी ओरेसुंड पूलाद्वारे जोडला गेला आहे.

सुमारे ४.५ लाख चौरस किमी क्षेत्रफळ असलेला स्वीडन देश युरोपियन संघामधील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. येथील लोकसंख्या ९४ लाख असून बहुतांशी लोक देशाच्या दक्षिण भागात शहरी क्षेत्रांमध्ये राहतात. स्टॉकहोम ही स्वीडनची राजधानी व प्रमुख शहर आहे.

ऐतिहासिक व मध्ययुगीन काळापासून स्वीडन हा एक स्वतंत्र देश राहिला आहे. सध्या स्वीडनमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही आहे. कार्ल सोळावा गुस्ताफ हे येथील विद्यमान राजे आहेत. अत्यंत विकसित व समृद्ध असलेल्या स्वीडनला लोकशाही निर्देशांकानुसार जगात प्रथम स्थान मिळाले आहे.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.