शिक्षण

आधुनिक पद्धती

पूर्व प्राथमिक शिक्षण

प्राथमिक शिक्षणाअगोदरच्या शिक्षणास पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतात. हे प्रामुख्याने ५ वर्षांखालील बालकांना दिले जाते. विद्यार्थी याच वयोगटात खास करून शिकत असतो

प्राथमिक

शाळेच्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते. हे सरकारी शाळांमध्ये मूलभूत अधिकाराअंतर्गत समाजातील सर्व विद्यार्थ्याना मोफत मिळू शकते. प्राथमिक स्तरावर सर्व विद्यार्थी हे परिपूर्ण नसतात, त्यांना तसे शिक्षण द्यावे लागेते.

माध्यमिक

इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या शालेय शिक्षणास माध्यमिक शिक्षण म्हणतात. हे १२ ते १६ वयापर्यंतच्या मुलांना दिले जाते. माध्यमिक स्तरात विद्यार्थी हा सर्व विषयांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो.

उच्चमाध्यमिक

या स्तरात विद्यार्थी एका विशिष्ट ध्येयाकडे आकृष्ट होत असतो.

पदवी

बी.ए. ,बी.कॉम. ,बी.एस्सी., बी.ई. ई. प्रकारचे शिक्षण हे बारावी नंतर दिले जाते. हे शिक्षण महाविद्यालात दिले जाते. या स्तरात विद्यार्थी एका वेगळ्या वळणावर येऊन थांबतो.

पदव्युत्तर

या स्तरात विद्यार्थी संशोधनाच्या मागोवा घेत असतो तसेच विद्यार्थ्यांना अनेक मार्ग मोकळे होतात आणि अनेक कामाच्या संध्या ही उपलब्ध होतात.

अमरावती जिल्हा

अमरावती येथे अम्बा माता मन्दिर प्रसिद्ध आहे.असे म्हटले जाते की, येथुन रुथ्मिणी देवी चा हरण झालेले.गिल्लेवडे, साम्बारवडी,रोडगे ही प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहेत.

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड आणि देश आहे. याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंड, तास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो.

कॅनडा

कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस असलेला देश आहे. एकूण दहा प्रांत आणि तीन प्रादेशिक विभाग असलेल्या देशाच्या पूर्वेस अटलांटिक महासागर, पश्चिमेस प्रशांत महासागर तर उत्तरेस आर्क्टिक महासागर आहे. सुमारे ९९.८ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाने कॅनडाला जगातील सगळ्यात मोठ्या देशांच्या यादीत द्वितीय स्थान दिले आहे. दक्षिणेस, दोन देशांना विभागणारी जगातली सर्वात लांब आंतराष्ट्रीय सीमारेषा कॅनडा आणि अमेरिकेच्या दरम्यान असून हिची लांबी ८,८९१ किलोमीटर इतकी आहे. कॅनडाची राजधानी ओटावा (उच्चार: ऑटोवा) आहे. कॅनडातील प्रमुख शहरे टोरोंटो, व्हॅन्कुव्हर, मॉन्टरियाल आहेत.

केनिया

साचा:देश..केनिया वन्यजीव संपत्तीने समृद्ध देश आहे

केनिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे.

चीन

चीन (इंग्रजी: China/ चायना; नवी चिनी चित्रलिपी: 中国; जुनी चिनी चित्रलिपी: 中國; फीनयीन: Zhōngguó; उच्चार: चाँऽऽग्-कुओऽ; अर्थ: जगाच्या मध्यभागी वसलेला देश), अधिकृ्त नाव:- चीनचे जनतेचे प्रजासत्ताक (नवी चिनी चित्रलिपी: 中华人民共和国; जुनी चिनी चित्रलिपी: 中華人民共和國; फीनयीन: Zhōnghuá Rénmín Gònghéguó; उच्चार: चाँऽऽग्-हुआऽ रऽन्-मीऽन् कोंग्-हऽ-कुओऽ) हा आशियातला, जगातला सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. बौद्ध धर्म हा चीनचा प्रमुख धर्म असून देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये ९१% (१२२ कोटी) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे

चीनचे क्षेत्रफळ सुमारे ९६ लाख चौरस किलोमीटर आहे. भूप्रदेशाच्या आकारानुसार चीन जगातला दुसरा सर्वात मोठा देश आहे.चीनचा विस्तारित भूप्रदेश वैविध्यपूर्ण आहे. उत्तर आणि उत्तरपुर्वेला मंगोलिया आणि मध्यआशियानजिक गोबी आणि तलमाकन वाळवंटे आहेत. तर नैऋत्य आशियालगतच्या दक्षिणेकडच्या पाणथळ भूप्रदेशात कटिबंधीय अरण्ये आहेत. चीनचा पश्चिमेकडील भूभाग हा खडबडीत आणि उंचावलेला आहे. हिमालय, काराकोरम, पामीर आणि थ्येन शान पर्वतरांगा याच भागात आहेत. तिबेटच्या पठारावरून निघणाऱ्या यांगत्से आणि पीत नदी या दोन पूर्ववाहिनी नद्या चीनमधील मोठ्या नद्या आहेत

डेन्मार्क

डेन्मार्क हा उत्तर युरोपामधील व स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. हा देश अतिशय विकसीत असून या देशाचे दरडोई उत्पन्न अति उच्च आहे. डेन्मार्क हा देश दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. कोपनहेगन ही डेन्मार्क ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

नेदरलँड्स

नेदरलँड्स हा पश्चिम युरोपामधील एक देश आहे. नेदरलँड्स हा नेदरलँड्सचे राजतंत्र (डच: Koninkrijk der Nederlanden) ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. बेआट्रिक्स ही नेदरलँड्सची राणी व राष्ट्रप्रमुख आहे. अ‍ॅमस्टरडॅम हे नेदरलँड्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मुख्यालय आहे.

नेदरलँड्सलाच हॉलंड समजले जाते, मात्र प्रत्यक्षात नॆदरलँड्समध्येच उत्तर हॉलंड व दक्षिण हॉलंड असे दोन प्रांत आहेत व बहुतेक महत्त्वाची शहरे या दोन प्रांतांत आहेत.

पुणे

हा लेख पुणे शहराविषयी आहे. पुणे शहर तालुक्याच्या माहितीसाठी येथे स्पर्श करा.

गुणक: 18.53°N 73.85°E / 18.53; 73.85

पुणे (इंग्रजी :Pune) उच्चार , हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे असे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या पुणं या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५० वर्षे प्रचलित होते. शहरात पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. मराठी ही शहरातील मुख्य भाषा आहे.

पुण्यामध्ये ऐतिहासिकः- लाल महाल, तुळशी बाग, शनिवार वाडा, विश्रामबाग वाडा इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे सर्वांनी भेट द्यावीत अशी आहेत. ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक व पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत.

पुणे शहर आणि परिसरात पाच नद्या आहेत.

पूर्व प्राथमिक शिक्षण

प्राथमिक शिक्षणा अगोदरच्या शिक्षणास पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतात. हे प्रामुख्याने २ ते ५ वर्षा खालिल बालकांना दिल्या जाते. भारतात हे शिक्षण देण्यासाठी अंगणवाडी व बालवाडी या सारख्या संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

पोर्तुगाल

पोर्तुगाल हा पश्चिम युरोपामधील इबेरिया द्वीपकल्पावर वसलेला एक देश आहे. पोर्तूगाल युरोपातील सर्वात पश्चिमेकडील देश आहे. या देशाच्या उत्तर व पूर्वेला स्पेन हा देश तर दक्षिणेला व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. लिस्बन ही पोर्तुगाल ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

पोलंड

पोलंड हा मध्य युरोपातील एक देश आहे. पोलंडच्या उत्तरेला बाल्टिक समुद्र व रशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्ट, ईशान्येला लिथुएनिया, पूर्वेला बेलारूस व युक्रेन, दक्षिणेला स्लोव्हाकिया, नैऋत्येला चेक प्रजासत्ताक तर पश्चिमेला जर्मनी हे देश आहेत. ३,१२,६८५ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला पोलंड हा आकाराने युरोपातील ९वा व जगातील ६९वा मोठा देश आहे. वर्झावा तथा वॉर्सो ही पोलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

पोलंडचे अधिकृत चलन न्यु झ्लॅाटी हे आहे. जगात सर्वाधिक गंधकाचे साठे याच देशात आहे. ओडर आणि व्हिस्चुला या देशातील प्रमुख नद्या आहेत.

पोलिश मातीवरील मानवी क्रियाकलापांचा इतिहास जवळजवळ 500,000 वर्षांचा आहे. लोह युग संपूर्ण काळात विविध संस्कृतींमध्ये व विविध संस्कृती व जमाती नंतर पूर्व जर्मनिया मध्ये स्थायिक झाले. तथापि, पाश्चात्य पोलांनीच या प्रांतावर प्रभुत्व मिळवत पोलंडला हे नाव दिले. पहिल्या पोलिश राज्याची स्थापना इ.स. 66 .66 पर्यंत शोधली जाऊ शकते, जेव्हा मिआस्को प्रथम, सध्याच्या पोलंडच्या प्रांताशी सुसंगत ख्रिश्चन धर्मात परिवर्तित झाले. पोलंड किंगडमची स्थापना 1025 मध्ये झाली आणि 1569 in मध्ये त्याने लुब्लिन संघटनेवर स्वाक्षरी करून लिथुआनियाच्या ग्रँड डचीशी दीर्घकाळपासून चाललेल्या राजकीय संबंधांना सिमेंट बनविले. या संघटनेने पोलिश-लिथुआनियन कॉमनवेल्थची स्थापना केली, सर्वात मोठा (१,००,००,००० चौरस किलोमीटर क्षेत्रातील एक (0 s ०,००० चौरस मैल)) आणि 16 व्या आणि 17 व्या शतकातील युरोपमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये, अनोखी उदारमतवादी राजकीय व्यवस्था ज्यांनी युरोपची पहिली अंगीकारली राष्ट्रीय संविधान, 3 मे 1791 ची घटना.

प्रतिष्ठा आणि समृद्धीच्या अस्तित्वामुळे, 18 व्या शतकाच्या शेवटी शेजारील देशांनी देशाचे विभाजन केले आणि 1918 मध्ये व्हर्साय कराराद्वारे त्याचे स्वातंत्र्य पुन्हा मिळवले. प्रादेशिक संघर्षांच्या मालिकेनंतर, नवीन बहु-वंशीय पोलंडने युरोपियन राजकारणातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून आपले स्थान पुनर्संचयित केले. सप्टेंबर 1939 मध्ये जर्मनीने पोलंडच्या स्वारीवर दुसरे महायुद्ध सुरू केले आणि त्यानंतर सोव्हिएत युनियनने मोलोटोव्ह – रिबेंट्रॉप करारानुसार पोलंडवर आक्रमण केले. देशातील 90% ज्यूंसह सुमारे सहा दशलक्ष पोलिश नागरिक युद्धामध्ये मरण पावले. 1947 मध्ये, पोलिश पीपल्स रिपब्लिकची स्थापना सोव्हिएटच्या प्रभावाखाली उपग्रह राज्य म्हणून झाली. 1989 च्या क्रांतीनंतर, विशेषत: एकता चळवळीच्या उदयातून पोलंडने स्वतःला राष्ट्रपती लोकशाही प्रजासत्ताक म्हणून प्रस्थापित केले.

पोलंडची विकसित बाजारपेठ आहे आणि पूर्व-मध्य युरोपीय क्षेत्रातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज असलेल्या मध्य युरोपमधील एक प्रादेशिक शक्ती आहे. [२०] युरोपियन युनियनमध्ये जीडीपी (पीपीपी) द्वारे सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि जगातील सर्वात गतीशील अर्थव्यवस्था आहे, एकाच वेळी मानव विकास निर्देशांकात उच्च स्थान मिळवित आहे. [२ 23] पोलंड हा एक विकसित देश आहे, जी राहणीमान, जीवन गुणवत्ता, सुरक्षा, शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य यासह उच्च-उत्पन्न-अर्थव्यवस्था [२ 25] राखते. [२]] [२]] विकसित शालेय शैक्षणिक व्यवस्थेसह, राज्य विनामूल्य विद्यापीठ शिक्षण, सामाजिक सुरक्षा आणि सार्वत्रिक आरोग्य सेवा प्रणाली देखील प्रदान करते. [२]] []०] देशात 16 युनेस्को जागतिक वारसा साइट आहेत, त्यापैकी 15 सांस्कृतिक आहेत.

पोलंड हे युरोपियन युनियन, शेंजेन एरिया, संयुक्त राष्ट्र, नाटो, ओईसीडी, थ्री सीज इनिशिएटिव्ह, व्हिसेग्रीड ग्रुपचे सदस्य राष्ट्र आहे आणि जी -20 वर अंदाज आहे.

मेक्सिको

मेक्सिको किंवा मेक्सिकोची संयुक्त संस्थाने (स्पॅनिशमध्ये एस्तादोस युनिदोस मेक्सिकानोस) हा उत्तर अमेरिकेतील एक देश आहे. मेक्सिको जगातील सर्वांत जास्त स्पॅनिशभाषक असलेला देश आहे. मेक्सिकोला लॅटिन अमेरिकेचा एक भाग समजले जाते.

युनायटेड किंग्डम

ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (प्रचलित नाव: United Kingdom of Great Britain and Northern Ireland; युनायटेड किंग्डम हा उत्तर युरोपातील एक देश (संयुक्त राजतंत्र) आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड आयर्लंड ह्या बेटावर वसला आहे.

युनायटेड किंग्डम हा युरोपातील व जगातील एक विकसित देश आहे. तसेच, ते युरोपियन संघाचे संघराज्य आहे, व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहे. युनायटेड किंग्डम हे राष्ट्रकुल परिषद, जी-८, नाटो इत्यादि अंतर्राष्ट्रीय संस्थांचे सदस्य राज्य आहे.

रशिया

रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. रूबल हे रशियाचे चलन आहे. ख्रिश्चन व निधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.

साक्षरता

साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे किवा शिक्षण घेणे होय.

साहित्य

ह्या ठिकाणी मराठी भाषेतील साहित्य, साहित्यिक, साहित्य संमेलने आणि इतर माहिती नोंदवा.

संत साहित्य

मराठी साहित्य

कादंबरी

कविता

स्वीडन

स्वीडन (स्वीडिश: Konungariket Sverige) इंग्रजीत Sweden) हा उत्तर युरोपातील एक देश आहे. स्वीडनच्या उत्तरेला व पश्चिमेला नॉर्वे, इशान्येला फिनलंड, तर पूर्वेला व दक्षिणेस बाल्टिक समुद्र आहेत. दक्षिणेला डेन्मार्क, जर्मनी व पोलंड तर पूर्वेला इस्टोनिया, लॅटिव्हिया, लिथुआनिया व रशिया ह्या देशांसोबत स्वीडनच्या सागरी सीमा आहेत. स्वीडन डेन्मार्क देशाशी ओरेसुंड पूलाद्वारे जोडला गेला आहे.

सुमारे ४.५ लाख चौरस किमी क्षेत्रफळ असलेला स्वीडन देश युरोपियन संघामधील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. येथील लोकसंख्या ९४ लाख असून बहुतांशी लोक देशाच्या दक्षिण भागात शहरी क्षेत्रांमध्ये राहतात. स्टॉकहोम ही स्वीडनची राजधानी व प्रमुख शहर आहे.

ऐतिहासिक व मध्ययुगीन काळापासून स्वीडन हा एक स्वतंत्र देश राहिला आहे. सध्या स्वीडनमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही आहे. कार्ल सोळावा गुस्ताफ हे येथील विद्यमान राजे आहेत. अत्यंत विकसित व समृद्ध असलेल्या स्वीडनला लोकशाही निर्देशांकानुसार जगात प्रथम स्थान मिळाले आहे.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.