व्होल्ट

व्होल्ट हे विद्युत विभवांतर आणि विद्युतवाहक बल मोजण्याचे एस. आय. पद्धतीतील एकक आहे. याचे मापन व्होल्टमीटरने करतात.

अणुऊर्जा

अणुऊर्जा वा अणुशक्ती अणु उर्जा म्हणजे परमाणु प्रतिक्रियांचा वापर म्हणजे उष्णता निर्माण करण्यासाठी अणु ऊर्जा सोडली जाते, ज्याचा वापर बहुतेक वेळा स्टीम टर्बाइनमध्ये अणु उर्जा प्रकल्पात वीज निर्मितीसाठी केला जातो. विभक्त विखंडन, विभक्त क्षय आणि विभक्त संलयन प्रतिक्रियांमधून विभक्त शक्ती मिळविली जाऊ शकते. सध्या, अणुऊर्जेपासून मिळणारी बरीचशी वीज युरेनियम आणि प्लूटोनियमच्या विभक्त विखंडनाने तयार होते. विभक्त क्षय प्रक्रिया रेडिओआइसॉपॉप थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर सारख्या कोनाडा अनुप्रयोगांमध्ये वापरली जातात. फ्यूजन पॉवरमधून वीज निर्मिती आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या केंद्रस्थानी आहे. हा लेख मुख्यतः वीज निर्मितीसाठी अणू विखंडन शक्तीशी संबंधित आहे.

नागरी अणुऊर्जाने २०१७ मध्ये २,४८८ तेरा वॅट तास (टीडब्ल्यूएच) वीज पुरविली, जी जागतिक वीज निर्मितीच्या सुमारे १०% एवढी होती आणि जलविद्युत नंतरचा दुसरा सर्वात कमी कमी कार्बन उर्जा स्रोत होता. एप्रिल २०१८ of पर्यंत, ४४९ नागरी विखंडन रिएक्टर आहेत. जगात, ३९४ गीगावाट (जीडब्ल्यू) च्या संयुक्त विद्युत् क्षमतेसह.येथे ५८ अणुऊर्जा अणुभट्ट्या निर्माणाधीन असून १५४ अणुभट्ट्यांची योजना आखण्यात आली असून त्यांची संयुक्त क्षमता अनुक्रमे ६३ जीडब्ल्यू आणि १५७ जीडब्ल्यू आहे. जानेवारी २०१९ पर्यंत आणखी ३३७ अणुभट्ट्यांचा प्रस्ताव होता.

निर्माणाधीन बहुतेक अणुभट्ट्या आशिया खंडातील पिढी III अणुभट्ट्या आहेत.अणु विभाजन केल्यानंतर होणाऱ्या स्फोटात प्रचंड ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेला अणुऊर्जा म्हणतात. या अणुऊर्जेचा उपयोग अनेक प्रकारे करून घेतला जातो. उदा० विद्युत निर्मिती केंद्र कोळश्यावर चालवण्याऐवजी अणुशक्तीवरही चालवले जाऊ शकते.

याच ऊर्जेचा उपयोग करून प्रचंड विध्वंस करू शकणारा अणुबाँब बनवला गेला आहे.

स्फोटक पदार्थासारखा वापर करुन दुस-या देशावर आक्रमन करता येतो

अणुकेंद्रीय भौतिकी

अणुकेंद्रीय भौतिकी भौतिकशास्त्रातील विषय आहे.

अणुकेंद्रासंबंधी रचना, विस्तार, आकार, प्रेरणा, प्रतिमान (मॉडेल), विक्रिया, परिवलन (स्वत:भोवती फिरणे) आणि चुंबकत्व एवढे विषय अणुकेंद्रीय भौतिकीत मोडतात.

आयफोन (मूळ)

मूळ आयफोन (किंवा आयफोन २जी) हा अ‍ॅपलचा सर्वात पहिला आयफोन होता. त्याचा उत्तराधिकारी आयफोन ३जी हा आहे.

आयफोन ३जी

आयफोन ३जी ही अ‍ॅपलच्या आयफोनची दुसरी पिढी आहे.

आयफोन ४एस

आयफोन ४ एस हा एक स्मार्टफोन आहे जो ॲपल इंक द्वारे डिझाइन व बाजारात आला आहे. आयफोनची पाचवी पिढी आहे, आयफोन ४ नंतर यशस्वी करते आणि आयफोन ५च्या आधी असलेले हे स्मार्टफोन आहे.

इलेक्ट्रॉनव्होल्ट

इलेक्ट्रॉनव्होल्ट(चिन्ह: eV) हे ऊर्जेचे एकक आहे. एका इलेक्ट्रॉनने एक व्होल्टचे विभवांतर पार केले असता त्याच्या ऊर्जेत होणारा बदल म्हणजे एक इलेक्ट्रॉनव्होल्ट होय. म्हणून १ व्होल्टला (१ ज्यूल प्रती कूलोंब) इलेक्ट्रॉनच्या विद्युतभाराने (१.६०२१७६६२०८(९८)×१०−१९ C) गुणले असता मिळणारी संख्या म्हणजे १ इलेक्ट्रॉनव्होल्ट.

१ eV = १.६०२१७६६२०८(९८)×१०−१९ ज्यूलइलेक्ट्रॉनव्होल्ट हे ऊर्जेचे एसआय एकक नाही. सामान्यत: या एककाचा वापर मेट्रिक उपसर्गांसोबत केला जातो. उदा., मिली-, किलो-, मेगा-, गिगा-, टेरा-, पेटा-, एक्झा- इत्यादी (अनुक्रमे meV, keV, MeV, GeV, TeV, PeV आणि EeV).

ऊ१ (बर्लिन उ-बाह्न)

ऊ१ तथा ऊ आइन किंवा उंटरग्राउंडबाह्न आइन हा जर्मनीच्या बर्लिन शहरातील उ-बाह्न प्रणालीतील एक मार्ग आहे.

९ किमी लांबीचा हा मार्ग उह्लांडस्ट्रास पासून वारशॉउअरस्ट्रास स्थानकांपर्यंत आहे. एकूण १३ स्थानके असलेला हा मार्ग साधारण पूर्व-पश्चिम धावतो. उह्लांडस्ट्रास स्थानक पूर्वीच्या श्लेसिशेनबाह्नच्या दक्षिणेस आहे.

ऊ२ (बर्लिन उ-बाह्न)

ऊ२ तथा ऊ झ्वाइ किंवा उंटरग्राउंडबाह्न झ्वाइ हा जर्मनीच्या बर्लिन शहरातील उ-बाह्न प्रणालीतील एक मार्ग आहे.

२०.७ किमी लांबीचा हा मार्ग पॅन्काउ पासून रुह्लबेन स्थानकांपर्यंत आहे. एकूण २९ स्थानके असलेला हा मार्ग साधारण ग्लाइसड्राइएक पर्यंत साधारण उत्तर-दक्षिण व तेथून पश्चिमेस धावतो.

ऊ३ (बर्लिन उ-बाह्न)

ऊ३ तथा ऊ द्राय किंवा उंटरग्राउंडबाह्न द्राय हा जर्मनीच्या बर्लिन शहरातील उ-बाह्न प्रणालीतील एक मार्ग आहे.

१२.१ किमी लांबीचा हा मार्ग नोलेन्डोर्फप्लाट्झपासून क्रुमे लांक पर्यंत धावतो.

ऊ४ (बर्लिन उ-बाह्न)

ऊ४ तथा ऊ फियर किंवा उंटरग्राउंडबाह्न फियर हा जर्मनीच्या बर्लिन शहरातील उ-बाह्न प्रणालीतील एक मार्ग आहे.

२.८६ किमी लांबीचा हा मार्ग नोलेन्डोर्फप्लाट्झपासून इन्सब्रुकरप्लाट्झ पर्यंत धावतो. बर्लिन उ-बाह्नमधील मार्गांपैकी हा मार्ग दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात छोटा मार्ग आहे.

ऊ५ (बर्लिन उ-बाह्न)

ऊ५ तथा ऊ फ्युंफ किंवा उंटरग्राउंडबाह्न फ्युंफ हा जर्मनीच्या बर्लिन शहरातील उ-बाह्न प्रणालीतील एक मार्ग आहे.

हा मार्ग अलेक्झांडरप्लाट्झ पासून हॉनोउ स्थानकांपर्यंत आहे. एकूण २० स्थानके असलेला हा मार्ग शहराच्या मध्य भागापासून पूर्वेकडे धावतो. हा मार्ग बर्लिन हॉप्टबाह्नहॉफ आणि टेगेल विमानतळापर्यंत पुढे बांधला जाण्याचे बेत आहेत.

कूलोंब

कूलोंब हे विद्युत प्रभाराचे SI एकक आहे. त्याचे चिन्ह C हे आहे. कूलोंब म्हणजे एक ॲम्पिअर विद्युत प्रवाहाने एका सेकंदात प्रवाहित केलेला प्रभार:

हे एक फॅरडचे धारित्र एक व्होल्ट विभवांतरापर्यंत प्रभारित केल्यास त्यावरील अतिरिक्त प्रभार आहे:

एक कूलोंब प्रभाराचे ते प्रमाण आहे जे एक मीटरवरील समान प्रभाराला ९ x १० न्यूटन बलाने अपकर्षित करतो.

धारिता

विद्युतचुंबकशास्त्र व इलेक्ट्रॉनिकी यांनुसार धारिता (अन्य नावे: धारकता ; इंग्लिश: Capacitance, कॅपॅसिटन्स ;) म्हणजे एखाद्या पदार्थाची विद्युतभार धरुन ठेवण्याची क्षमता होय. काही विशिष्ट विद्युतवर्चसाने साठवलेल्या किंवा अलग केलेल्या वैद्युत ऊर्जेचे मोजमाप धारितेतून व्यक्त होते. उदाहरणार्थ, ऊर्जा साठवून ठेवणाऱ्या उपकरणांचे प्रातिनिधिक उदाहरण असलेल्या समांतर-पट धारित्राच्या पटांवरील विद्युतभार +Q व -Q मानल्यास व त्यांच्या दरम्यान V व्होल्ट एवढा वर्चोभेद आहे असे मानल्यास, धारिता खालील समीकरणानुसार मांडली जाते :

फॅराड हे धारितेचे एकक आहे. १ फॅराड म्हणजे प्रति १ कूलाँब प्रति १ व्होल्ट.

परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे

भाषा सल्लागार मंडळाने वैज्ञानिक व तांत्रिक परिभाषेच्या निर्मितीसाठी आधारभूत म्हणून ठरवून दिलेली निदेशक तत्त्वे

[संदर्भ : भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (मराठी-इंग्रजी);भाषा संचालनालय महाराष्ट्र शासन.मुंबई -फेब्रुवारी,२००६.]

मुंबई उपनगरी रेल्वे

मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे हे दोन क्षेत्रीय विभाग ती चालवते. उपनगरी रेल्वेने मुंबईत ७५ लाखाहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या संपूर्ण भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासीसंख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालींपैकी ही एक आहे. सर्वसामान्य लोक या मार्गांवर चालणाऱ्या गाड्यांना लोकल ट्रेन असे म्हणतात.

भारतीय रेल्वेची तशीच मुंबई उपनगरी रेल्वेची सुरुवात ब्रिटिशांनी भारतात व आशिया खंडात १६ एप्रिल १८५३ मध्ये बांधलेल्या पहिल्या रेल्वे मार्गावर झाली. या मार्गावर पहिली आगगाडी मुंबई पासून ३४ कि.मी. अंतरावर असलेल्या ठाणे स्थानकापर्यंत धावली.

मुंबई बेटाची पश्चिम-पूर्व रुंदी फारच कमी आहे. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या उत्तरेकडे असलेल्या उपनगरांच्या दिशेने वाढत गेली. मात्र, मुंबईतील प्रमुख व्यापारी संस्था आणि त्यांची कार्यालये दक्षिण मुंबईत आहेत. या स्थितीत या कार्यालयांत येण्याकरिता दक्षिणोत्तर धावणारी ही रेल्वेव्यवस्था लोकांसाठी जनवाहतुकीची प्राथमिक प्रणाली झाली. मागील काही दशकांत भारताच्या अन्य भागांतून मुंबईत स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे मुंबईची लोकसंख्या अफाट वाढली व त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्याकरिता, या वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत मेट्रो प्रणाली व मोनो प्रणाली बांधली आहे.

मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गाचे पाच मुख्य मार्ग आहेत:

मध्य मार्ग

हार्बर मार्ग

पश्चिम मार्ग

ट्रान्सहार्बर मार्ग

नेरूळ-उरण मार्ग

मॅक्सवेलची समीकरणे

मॅक्सवेलची समीकरणे ही अभिजात विद्युतचुंबकीतील महत्त्वाची समीकरणे असून तीत गॉसचा नियम, गॉसचा चुंबकीचा नियम, फॅरॅडेचा नियम आणि ॲम्पिअरचा पथित नियम ह्या चार महत्त्वाच्या समीकरणांचा समावेश होतो. तथापि, मॅक्सवेलची समीकरणे हे वेगवेगळ्या संदर्भांमध्ये पहाता त्यात काही आणखीन समीकरणांचा समावेश होतो परंतु आधुनिक भौतिकीत वर उल्लेखिलेली चार समीकरणे धरली जातात. आणि ह्या चार समीकरणांच्या आधारे विद्युतचुंबकी तरंगांचे अस्तित्व सिद्ध करता येते.

विजाणू

विजाणू (इंग्रजी: Electron इलेक्ट्रॉन) हा अणूच्या अंतरंगातील एक मूलभूत कण आहे. विजाणूचा विद्युत प्रभार ‘उणे १’ मानला जातो. सर्व विद्युतचुंबकीय घटना आणि रासायनिक बंध विजाणूंमुळेच घडतात.

विभवांतर

विभवांतर किंवा विद्युतदाब अर्थात व्होल्टेज (इंग्लिश: Voltage ;) म्हणजे एकक धन प्रभार विद्युत क्षेत्रातील एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत स्थानांतरित होताना घडून येणारे एकूण कार्य होय. गणिती सूत्राच्या स्वरूपात विभवांतर म्हणजे दर एकक विद्युतभारामुळे निर्माण होणारी किंवा खर्च होणारी ऊर्जा.

विद्युतचुंबकीय शास्त्राच्या पारंपरिक व्याख्येनुसार, विद्युतदाब ही अदिश राशी असून, दिलेल्या बिंदूचा विद्युतदाब हा त्या बिंदूची विद्युत स्थितीज ऊर्जा भागिले त्या बिंदूवर असणारा विद्युत प्रभार एवढा असतो.

संगणक-टंक

हा लेख मुख्यत्वे Marathi Fonts बद्दल आहे. मराठी विकिपीडियावरच्या टायपींग पद्धती माहिती करून घेण्यासाठी विकिपीडिया:Input System कडे जावे."Marathi Fonts" हा गुगल शोधयंत्रात महाराष्ट्रातील लोकांकडून सर्वाधिक शोधला जाणारा शब्द समुह आहे.या लेखात फॉण्ट (Font) या इंग्रजी शब्दाला मराठीत टंक असा प्रतिशब्द वापरला आहे. संगणकपूर्व काळात टंकलेखन हे टंकलेखनयंत्र वापरुन किंवा खिळे जुळवून केले जात असे. कॅरॅक्टर एनकोडिंगच्या साहाय्याने संगणकावर टंकलेखन शक्य झाले.तरीसुद्धा सुरवातीच्या कालावधीत ऑपरेटिंग सिस्टिम, इंटरनेट ब्राउजरच्या तांत्रिक मर्यांदांमुळे संगणकावर व इंटरनेटवर भारतीय भाषांचा उपयोग फारच मर्यादित राहिला. यातच संगणकशिक्षित भारतीय लोक मुख्यत्वे इंग्रजी भाषेचा वापर करत. तसेच भारतीय भाषासाठीच्या संगणकीय टंकांकरिता मोजावी लागणारी किंमत, वापर सुरू करण्याकरिता करावी लगणारी क्लिष्ट प्रक्रिया, दर संगणकीय टंकासोबत बदलणारे कळपाटाचे आराखडे यामुळे पण भारतीय भाषांच्या संगणकीय टंकांचा वापर कमी राहिला आहे.[१],[२]

व्यापारी तत्त्वावर मॉड्युलर सिस्टिम, सिडॅक, आयट्रांस आणि इतर छोट्या मोठ्या आस्थापनांनी संगणकीय टंक भारतीय भाषांत उपलब्ध करून दिले. काही संकेतस्थळांनी टंक प्रत्येक वेळी डाउनलोड करण्याच्याऐवजी आपोआप डाउनलोड होणारे डायनॅमिक संगणकीय टंक व भारतीय भाषात ईमेल, चॅट सुविधा पुरवण्यास सुरुवात केली. पण बहुसंख्य सामान्य माणसांच्या दृष्टीने संगणकावरील भारतीय भाषातील टंक संगणकावर सुलभ पद्धतीने आणि कुठल्याही कार्यक्रमात वापरता येतील असे नव्हते.

खरी क्रांती Windows 98 ही ऑपरेटिंग सिस्टिम मागे पडून व वाढत्या आधुनिक युनिकोड पद्धतीच्या विनामूल्य टंकांमुळे, काही मुक्त तंत्रांश, युनिकोड वापरता येतील अशी संकेतस्थळे इत्यादींमुळे नजरेच्या टप्प्यात आली आहे.

अजूनसुद्धा बहुसंख्य भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या भाषेतील टंक वापरण्याकरिता किमान काही तांत्रिक संज्ञा माहीत असणे श्रेयस्कर ठरते.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.