विकिपीडिया

विकिपीडिया ([२]) हा महाजालावरील एक मुक्‍त ज्ञानकोश आहे. महाजालावरील ह्या ज्ञानकोशात कुणालाही नव्याने लेख लिहिता येतो तसेच आधी लिहिलेल्या लेखाचे संपादन करता येते. विकी हे सॉफ्टवेयर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक देखील) आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्याचे निर्देश करणे आवश्यक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरित करताना ती मुक्त स्वरूपातच वितरित करणे आवश्यक असते.[१]

विकिमिडिया फाउंडेशन ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.

जिमी वेल्स आणि लॅरी सँगर ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवशी इंग्रजी भाषेत केली.[२] आजघडीला जगातील विविध भाषांत ह्या ज्ञानकोशाच्या शाखा उपलब्ध आहेत.[३][४] विविध भाषांचे भाषक आपापल्या भाषेतील ज्ञानकोशाच्या निर्मितीत सहभागी होऊ शकतात. मराठी विकिपीडिया हा ह्या ज्ञानकोशाची मराठी भाषेतील शाखा आहे. विकिपीडियाचा सर्वांनाच खूप फायदा होतो.

मराठी विकिपीडियावर (या पानानुसार)सध्या यात ५५,१५७ लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण तीन कोटींहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहीले गेले आहेत.

विकिपिडीयाची वैगुण्ये गृहित धरूनसुद्धा मुक्त सार्वत्रिक उपलब्धतेमुळे, विविध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणा ह्यांमुळे विकिपीडिया हा आज महाजालावरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे. मराठीतील विकिपिडीया इतर भाषांप्रमाणेच गूगल सारखी शोधयंत्रे वापरून शोधता येतो.

विकिपीडिया
उद्योग क्षेत्र इंटरनेट, संगणक सॉफ्टवेर
स्थापना जानेवारी १५, २००१
मुख्यालय अमेरिका
संकेतस्थळ [१]

विकिपीडियाची वैशिष्ट्ये

Wikipedia editing interface

बाह्य दुवे

मनोगत

संदर्भ

  1. ^ वापरण्याच्या अटी
  2. ^ कॉक, नेड व युंग, युसुन आणि सिन, टी.; विकिपीडिया ॲण्ड इ-कोलॅबरेशन रीसर्च : ऑपॉर्च्युनिटीज ॲण्ड चॅलँजेस; इंटरनॅशनल जर्नल ऑफ इ-कोलॅबरेशन; १२(२), १-८
  3. ^ विकिपीडियाचे मुख्य पान
  4. ^ विविध भाषांतील विकिपीडियांची यादी
अमर्त्य सेन

अमर्त्य सेन (बांग्ला: অমর্ত্য সেন , उच्चार - ओमोर्तो शेन; रोमन लिपी: Amartya Sen) (३ नोव्हेंबर, इ.स. १९३३ - हयात) हे बंगाली-भारतीय अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ आहेत. यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी इ.स. १९९८ सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. गरिबी ,आरोग्य ,शिक्षण , मानवी विकास आणि एकूणच मानवी कल्याण त्यांच्या विचाराचा गाभा आहे . भारतीय केंद्रशासनाने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी इ.स. २००७ साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे हे अध्यक्ष आहेत एकूण ४० वर्षात, ३०हून अधिक भाषांत अमर्त्य सेन यांची पुस्तके प्रकाशित झाली आहे. ते 'ऑक्सब्रिज कॉलेज'चे पहिले आशियाई प्रमुख आहेत.

अरुण साधू

अरूण साधू (जन्म : १७ जून १९४१ मृत्यू : २५ सप्टेंबर २०१७) हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक होते. त्यांनी रशियातील तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थांवर विवेचक लेखन केले आहे. ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

अर्नेस्ट थॉमस सिंटन वाल्टन

अर्नेस्ट थॉमस सिंटन वाल्टन (६ ऑक्टोबर, इ.स. १९०३ - २५ जून, इ.स. १९९५) हा नोबेल पारितोषिक विजेता आयरिश भौतिकशास्त्रज्ञ होता.

अॅल्बर्ट आइन्स्टाइन

अ‍ल्बर्ट आईन्स्टाईन (इंग्रजी: Albert Einstein ;) (मार्च 14, इ.स. १८७९ - एप्रिल १८, इ.स. १९५५) हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतावादाचा सिद्धान्त, (विशेष सिद्धान्त, सामान्य सिद्धान्त), प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धान्तासाठी आणि "त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी" इ.स. १९२१ साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन "सन्मानित" केले गेले. आइन्स्टाइन यांना त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानंतर जगभर प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध वैज्ञानिक म्हणून ओळखले जाऊ लागले. आइन्स्टाइन यांनी "अ‍ल्बर्ट आईन्स्टाईन" ची व्यापारचिन्ह म्हणून नोंदणी केली. एका शास्त्रज्ञाला त्याची इतकी प्रसिद्धी असणे आणि त्यामुळे होणारे परिणाम याचा अनुभव नव्हता. आज बुद्धिमत्ता आणि आइन्स्टाइन हे एक प्रकारे समीकरणच बनले आहे. त्यांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी आइन्स्टाइन यांनी विचार केला की, ही विद्युत चुंबकीय नियमांसोबत पारंपरिक यांत्रिकीच्या नियमांशी मेळ घालणारी नव्हती. या घटनेने त्यांच्या विशिष्ट सापेक्षता सिद्धान्ताला चालना मिळाली. तथापि त्यांना असे वाटू लागले की, सापेक्षतेचे तत्त्व हे गुरुत्वाकर्षणाचेच सुधारित आणि विस्तारित रूप आहे. त्यांनी १९१६ साली त्यांच्या अनुबर्ती गुरुत्वाकर्षण सिद्धान्तावरून सामान्य सापेक्षता सिद्धान्तावर एक पेपर प्रकाशित केला. सांख्यिकीय यांत्रिकी आणि पुंजयांत्रिकी सिद्धान्त यांच्या समस्यांची उकल करण्यायास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना त्यांच्या आण्विक सिद्धांत आणि रेण्विक गती या संबंधित सिद्धान्त स्पष्ट करता आले. त्याचप्रमाणे त्यांनी प्रकाशाच्या औष्णिक गुणधर्माचा शोध लावल्यामुळे त्यांना प्रकाशकणांचा सिद्धान्त मांडता आला. १९१७ साली, आईन्स्टाइन यांनी त्यांचा सामान्य सापेक्षता सिद्धान्ताच्या स्पष्टीकरणासाठी एका भव्य विश्वाची रचनाकृती प्रदर्शित केली.आईन्स्टाईन यांनी १९३३ साली अमेरिकेला भेट दिली होती तेव्हा जर्मनीत ॲडॉल्फ हिटलर सत्तेवर आला आणि त्यामुळे आइन्स्टाइन यांनी ते पूर्वी जिथे प्राध्यापक होते त्या प्रशियन विज्ञान महाविद्यालय।बर्लिन विज्ञान अकादमी येथे परत जाण्यास नकार दिला आणि ते अमेरिकेत स्थायिक झाले. १९४० मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळवले.

दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वसंध्येला, आइन्स्टाइन यांनी अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी आवाहन केले होते की, रूझवेल्ट यांनी तत्काळ आदेश देऊन अत्यंत आधुनिक व महाभयंकर अणुबॉम्ब यांची निर्मिती थांबवावी. परंतु त्या पत्राची दखल न घेता अमेरिकेने मॅनहॅटन प्रकल्प उभारला. आइन्स्टाइन यांचा सैन्याच्या संरक्षण-धोरणाला पाठिंबा होता, परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणावर वापरात असलेल्या अणुकेंद्राचे विभाजन या तत्त्वावर चालणार्‍या शस्त्रांचा निषेध केला. काही काळानंतर आइन्स्टाइन यांनी ब्रिटिश तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांच्याशी संपर्क साधून रसेल-आइन्स्टाइन जाहीरनामा यावर स्वाक्षरी केली. या जाहीरनाम्यात आण्विक शस्त्रांचे दुष्परिणाम विशद करण्यात आले होते. आइन्स्टाइन हे अमेरिकेतील प्रिन्स्टन,न्यू जर्सी या शहरातील इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी या शिक्षण संस्थेशी शेवटपर्यंत संलग्न राहिले. इ.स.१९५५ साली आइन्स्टाइन यांचे निधन झाले.

आइन्स्टाइन यांनी सबंध आयुष्यात एकूण ३०० वैज्ञानिक शोधनिबंध आणि १५० गैरवैज्ञानिक निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या अनेक महान बौद्धिक कामगिऱ्या आणि त्यांची विलक्षण कल्पनाशक्ती यामुळे अलौकिक बुद्धिमत्ता या अर्थाने आइन्स्टाइन हा शब्द वापरला जाऊ लागला.

आंत्वान हेन्री बेकरेल

आंत्वान हेन्री बेकरेल हे शास्त्रज्ञ आहेत.

एमिलियो जिनो सेग्रे

एमिलियो जिनो सेग्रे हे शास्त्रज्ञ आहेत.

एर्विन श्र्यॉडिंगर

एर्विन रूडोल्फ योजेफ आलेक्सांडेर श्र्यॉडिंगर, म्हणजेच एर्विन श्र्यॉडिंगर (चुकीचे रूढ लेखनभेद: एर्विन श्रॉडिंजर, एर्विन श्रॉडिंगर; जर्मन: Erwin Rudolf Josef Alexander Schrödinger) (१२ ऑगस्ट, इ.स. १८८७ - ४ जानेवारी, इ.स. १९६१) हे पुंज यामिकी या भौतिकशास्त्रीय शाखेच्या प्रणेत्यांपैकी एक मानला जाणारे ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी मांडलेले श्र्यॉडिंगर समीकरण पुंज यामिकीत पायाभूत मानले जाते. पुंजयामिकीतील योगदानासाठी त्यांना इ.स. १९३३ सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. याशिवाय श्र्यॉडिंगरचे मांजर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसप्रयोगही यानेच मांडला. भौतिकशास्त्रासोबत याने तत्त्वज्ञान व सैद्धान्तिक जीवशास्त्र या विषयांतही लिखाण केले आहे.

कोत द'ईवोआर

कोत द'ईवोआरचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République de Côte d'Ivoire; पूर्वीचे नावः आयव्हरी कोस्ट) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. कोत द'ईवोआरच्या पश्चिमेला लायबेरिया व गिनी, उत्तरेला माली व बर्किना फासो तर पूर्वेला घाना हे देश आहेत. देशाच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. यामूसूक्रो ही कोत द'ईवोआरची राजधानी तर आबीजान हे सर्वांत मोठे शहर आहे.

कोत द'ईवोआर स्वातंत्र्यापूर्वी फ्रेंच वसाहत होती. ह्या देशाची राष्ट्रभाषा फ्रेंच आहे व त्यामुळे आयव्हरी कोस्ट ह्या इंग्लिश नावापेक्षा कोत द'ईवोआर हे फ्रेंच नाव अधिकृतपणे वापरले जाते.

गॅब्रियेल लिपमन

गॅब्रियेल लिपमन हे शास्त्रज्ञ आहेत.

जे.जे. थॉमसन

जे.जे. थॉमसन हे ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकविजेते शास्त्रज्ञहोते

जेरोम आय. फ्रीडमन

जेरोम आयझॅक फ्रीडमन (मार्च २८, इ.स. १९३०:शिकागो, इलिनॉय, अमेरिका - ) हा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ आहे.

देवनागरी

देवनागरी लिपी ही बऱ्याच भारतीय भाषांची प्रमुख लेखन पद्धती आहे. संस्कृत, पाली, मराठी, कोकणी, हिंदी, सिंधी, काश्मिरी, नेपाळी, बोडो, अंगिका, भोजपुरी, मैथिली, रोमानी इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात. देवनागरी लिपी एकंदरीत देशातल्या व देशाबाहेरच्या एकूण १९४ भाषांसाठी वापरली जाते.

पु.ल. देशपांडे

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुलं (जन्म : मुंबई, ८ नोव्हेंबर १९१९; मृत्यू : पुणे, १२ जून २०००) हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.गुळाचा गणपती, या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे अनेक किस्से आहेत. त्यांच्यावर मराठीत भाई हा चित्रपट बनला आहे.या चित्रपटाचे 2 भाग निघाले आहेत.

पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट

पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट हे शास्त्रज्ञ आहेत.

मुक्‍त ज्ञानकोश

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

येथील लेखनाचा परिघ ज्ञानकोशाचा असतो.मुक्‍त ज्ञानकोश वाचन, लेखन, संपादन,सुधारणा, बदल करण्याकरीता सर्वांना मुक्त असतात.मुक्त ज्ञानकोशातील लेखात सर्वसामान्य वाचक सुद्धा लेखनात सहभाग घेतात तसेच एकट्याने अथवा सहयोगी पद्धतीने लेखन केले जाते.

मुक्त ज्ञानकोश हा मुक्त सॉफ्टवेअरच्या तत्त्वावर आधारित असून ज्ञानावरील मालकी हक्क असू नये म्हणून त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. कोणीही वापरकर्ता तो संपादित करू शकतो.

रिकार्दो जियाकोनी

रिकार्दो जियाकोनी हे शास्त्रज्ञ आहेत.

वर्नर हायझेनबर्ग

वर्नर कार्ल हायझेनबर्ग (डिसेंबर ५, इ.स. १९०१ - फेब्रुवारी १, इ.स. १९७६) हे जर्मनीचे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान केले. १९२७ मध्ये त्यांनी अनिश्चिततेचे तत्त्व मांडले.

विल्हेम राँटजेन

विल्हेम राँटजेन हे शास्त्रज्ञ आहेत.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.