वाणिज्य

वाणिज्य (इंग्लिश: Commerce, कॉमर्स ;) ही संज्ञा वस्तू व सेवा यांच्या उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या साखळीतील सर्व प्रकारांच्या देवघेवीला उद्देशून योजिली जाते. यात वस्तू, सेवा, पैसा, माहिती या व अश्या अर्थशास्त्रीय मूल्य असलेल्या कोणत्याही गोष्टीचा दोन व्यक्ती किंवा संस्थांमधील व्यापार अभिप्रेत असतो. वाणिज्य भांडवलवादी व अन्य काही अर्थशास्त्रीय व्यवस्थांचा मूलाधार आहे.

व्यवसायाचा असा एक विभाग कि जो वस्तू व सेवांचे वितरण करतो त्याला वाणिज्य असे म्हणतात . तुलनेने भांडवली गुंतवणूक कमी प्रमाणात लागते. वितरणाचे काम बाजारपेठेमध्ये तसेच कार्यालयात केले जाते. वस्तूंचे वितरण करण्यासाठी मनुष्यबळाची व संदेशवहनाची गरज भासते.वानिज्यामुळे वास्तूमध्ये स्थळ काळ व समय उपयोगिता निर्माण होते.वाणिज्य वस्तू व व्यापारी अभिकर्ते करतात. वाणिज्य हा व्यवसायाचा एक भाग असल्यामुळे त्यामध्ये व्यापारी कौशल्य असणे गरजेचे आहे.

Shaniwarwada in late 1800s
पुण्यातील शनिवारवाड्याजवळचा बाजार (प्रकाशचित्र काळ: इ.स.च्या १९ व्या शतकाचा उत्तरार्ध)

बाह्य दुवे

अमरावती

गुणक: 20.56°N 77.45°E / 20.56; 77.45

thumb|अमरावती शहराचे एक दृश्य

अमरावती (मूळ नाव उमरावती) हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील एक शहर आहे. अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शैक्षणिकदृष्ट्या अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघरही संबोधले जाते. विदर्भामध्ये प्रशासनाच्या दॄष्टीने दोन उपविभाग केले आहेत, नागपूर आणि अमरावती. त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. अमरावती शहर हे महाराष्ट्रातील दाट लोकवस्ती असलेल्या महानगर क्षेत्रांमध्ये सातव्या क्रमांकावर येते. हे शहर अमरावती जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात ऐतिहासिक अशी अंबा व श्रीकृष्ण मंदिरे आहेत.

१९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही "खाजगी जकात " म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६४६,८०१ इतकी आहे.

त्यापैकी ३३०,५४४ पुरुष व ३१६,२५७ महिला आहेत.

अमरावती शहरातील लिंग गुणोत्तर १०००:९५७ आहे.

आबासाहेब गरवारे महाविद्यालय

आबासाहेब गरवारे महाविद्यालय (पूर्वीचे MES College) पुण्यातील जुने महाविद्यालय आहे व सर्वसाधारणपणे "गरवारे महाविद्यालय" म्हणून ओळखले जाते.

या महाविद्यालयात कला (Arts) व शास्त्र (Science) शाखांचे शिक्षण दिले जाते. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) विभाग व जैवविविधतेतील (Bio Diversity) पदव्युत्तर शिक्षण (MSc) हे गरवारे महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे .

ऋणको

ऋणको ही कर्ज घेणारी व्यक्ती होय. ज्याने पैसे दिले त्याच्या म्हणजे धनकोच्या, लेखापुस्तकात ऋणकोचे खाते नावे रक्कम शिल्लक दाखवते. बँकेने एखाद्या व्यक्तीस कर्ज दिले असेल तर कर्जाचे खाते नावे रक्कम दाखवेल. व्यवसायाच्या ताळेबंदात ऋणकोच्या खात्यावरील नावे रक्कम ही मालमत्ता म्हणून दाखवली जाते.

जनरल मोटर्स

जनरल मोटर्स ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची वाहने बनवणारी कंपनी आहे.

जमा (अर्थव्यवहार)

अर्थव्यवहारात खात्यावर रक्कम जमा होणे (इंग्लिश: Credit) म्हणजे त्या खात्याची शिल्लक वाढणे होय.

बँकेत किंवा इतर वित्तसंस्थेत ज्याचे खाते असते त्या खातेदाराने आपल्या खात्यामध्ये पैसे भरणे याला 'खात्यावर रक्कम जमा होणे ' असे म्हणतात.

वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'जमा' या शब्दाचा अर्थ बदलतो

१) व्यक्तिगत खाते - जो पैसे देतो त्याचे खाते जमा होते (धनको). जो पैसे घेतो त्याचे खाते नावे होते.

२) मालमत्ता खाती - जी मालमत्ता बाहेर जाते ती खात्यावर जमा होते. जी मालमत्ता आत येते ती खात्यावर नावे होते.

३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो.

ताळेबंद

द्वि-नोंदी पद्धतीने पुस्तपालन केले असता सर्व खात्यांच्या शिल्लक रकमेचा आढावा घेऊन एका विशिष्ट दिवशी, व्यवसायाची आर्थिक परिस्थिती दर्शवणाऱ्या कागदपत्रास ताळेबंद असे म्हटले जाते. (इंग्लिश : Balance sheet )

व्यवसायाच्या ताळेबंदामध्ये येणे असलेली रक्कम, देय रक्कम, मालमत्ता, कर्ज, उत्पन्न, खर्च आणि नफा किंवा नुकसान या सर्व बाबींचा समावेश असतो. साधारणतः ताळेबंद हा ठरावीक दिवशी उदा. तिमाही, सहामाही यांचा शेवटचा दिवस आणि वर्षाअखेरीस काढला जातो.

ताळेबंदाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे द्वि-नोंदी पद्धतीची अचूकता पाहणे, व्यवसायाचा आर्थिक आढावा घेणे हा होय.

दक्षिण आशिया

दक्षिण आशिया हा आशिया खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये भारतीय उपखंडामधील भूभागाचा समावेश होतो. भौगोलिक दृष्ट्या दक्षिण आशिया हिमालयाच्या व हिंदुकुश पर्वतरांगे दक्षिणेकडील भारतीय प्रस्तरावर स्थित असून त्याच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका हे भारतीय उपखंडामधील प्रमुख देश तसेच, नेपाळ, अफगाणिस्तान, भूतान व मालदीव ह्या आठ देशांना साधारणपणे दक्षिण आशियाई देश मानले जाते.

१९८५ साली दक्षिण आशियाई देशांनी प्रादेशिक राजकीय व वाणिज्य संबंध बळकट करण्यासाठी सार्कची स्थापना केली व २००४ साली दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराला मान्यता दिली.

दीक्षाभूमी, चंद्रपूर

दीक्षाभूमी हे चंद्रपूर शहरातील आणि नागपूरच्या दीक्षाभूमीखालोखाल भारतातील बौद्ध धर्मीयांचे प्रमुख बौद्ध तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी आपल्या ३ लाखापेक्षा अधिक अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. तत्पूर्वी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे १४ व १५ ऑक्टोबर १९५६ रोजी अनुक्रमे ५ लाख व २ लाख अशा एकूण ७ लाखावर अनुयायांनाही दीक्षा दिली होती. त्यामुळे या दोन्ही स्थळांना ‘दीक्षाभूमी’ म्हटले जाते.बाबासाहेबांनी चंद्रपूरला ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी त्यांच्या नावाचे 'डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय' सुरू आहे. आणि काही कालावधीनंतर या दीक्षाभूमीवर एक विशाल स्तूप उभारला जाणार आहे. वर्षभर बौद्ध अनुयायी येथे भेटी देत असतात, परंतु दरवर्षातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाला म्हणजेच १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी १० लाखापेक्षा अधिक बौद्ध लोक येथे बुद्धाला व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमा होऊन हा दिवस उत्साहात साजरा करतात.

नांदेड

गुणक: 19.09°N 77.27°E / 19.09; 77.27

नांदेड शहर हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरून पडले असल्याचे सांगण्यात येते. नांदेड शहरात शीखांचे दहावे आणि शेवटचे गुरु, गुरू गोविंद सिंग यांच्या समाधीवर बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब (पहा हुजूर साहिब नांदेड) आहे. नांदेड हे मराठी कवी रघुनाथ पंडित आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर 'गोदावरी नदीच्या' काठी वसलेले आहे. येथे नांदगिरी नावाचा किल्ला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प विष्णुपुरी धरण येथेच आहे. काही वर्षांपूर्वी येथे शीख समाजाचा गुरूतागद्दी हा सोहळा संपन्न झाला.तसेच सोनखेड येथील संत तुकाराम महाराज मंदिर प्रसिध्द आहे.

नावे करणे (वाणिज्य)

वाणिज्यात एखाद्या खात्यावरून पैसे कमी करणे म्हणजे रक्कम नावे करणे होय.

बँकेत आपल्या बचत खात्यातील पैसे जेव्हा खातेदार काढतो तेव्हा ती रक्कम खात्याच्या नावे होते. खात्यातील शिल्लक रक्कम कमी होते. कर्जाची रक्कम बँकेकडून घेतली म्हणजे आपल्या नावाचे कर्जखाते नावे होते.

पैसे नावे टाकणे म्हणजे दरवेळी शिल्लक कमीच होईल असे नाही.

वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'नावे' या शब्दाचा अर्थ बदलतो

१) व्यक्तिगत खाते - जो पैसे देतो त्याचे खाते जमा होते. जो पैसे घेतो त्याचे खाते नावे होते.

२) मालमत्ता खाती - जी मालमत्ता बाहेर जाते ती खात्यावर जमा होते. जी मालमत्ता आत येते ती खात्यावर नावे होते.

३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो.

बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स

बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुण्यातील वाणिज्य शाखेचे शिक्षण देणारे जुने महाविद्यालय आहे.

मनामा

मनामा (अरबी: المنامة) ही पश्चिम आशियामधील बहरैन देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मनमा शहर बहरैन बेटाच्या उत्तर भागात इराणच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे. १९२१ सालापर्यंत बहरैनची राजधानी जवळील मुहर्रक येथे स्थित होती. विसाव्या शतकामध्ये खनिज तेल विक्रीमुळे बहरैनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली व मनामा हे देशाचे आर्थिक व वाणिज्य केंद्र बनले. ह्याकारणास्तव १९२१ साली राजधानी मनामाला हलवण्यात आली.

२०१२ साली मनामाला अरब लीगने अरबी सांस्कृतिक राजधानी घोषित केले होते.

महाविद्यालय

महाविद्यालये सर्वसाधारणपणे पदवी आणि/अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करतात. काही महाविद्यालयांमध्ये स्नातक अभ्यासक्रमही असतो.

मिलिंद महाविद्यालय

मिलिंद महाविद्यालय हे औरंगाबाद शहरातील एक महाविद्यालय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत याची स्थापना केली. मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे असलेल्या तीन शैक्षणिक महाविद्यालयाच्या पदवीधारकांचे गट आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञानमधील पदवी व पद्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जातो. हे तिनही महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठशी संलग्न आहेत. ५४ एकर परिसरामध्ये हे महाविद्यालय पसरलेले आहे. देण्यात आली. हैदराबाद संस्थानाचा सातवा निजाम मीर उस्मान अली खान कडून सुरुवातीला मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी जमीन देण्यात आली.

लुधियाना

लुधियाना (पंजाबी: ਲੁਧਿਆਣਾ) हे भारताच्या पंजाब राज्यामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. लुधियाना शहर पंजाबच्या पूर्व भागात सतलज नदीच्या जुन्या काठावर राजधानी चंदिगढच्या ९८ किमी पश्चिमेस वसले आहे. लुधियाना दिल्लीच्या उत्तरेकडील भारताचे सर्वात मोठे शहर असून ते उत्तर भारतातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र मानले जाते. जागतिक बँकेनुसार २००९ व २०१३ साली वाणिज्य व व्यापारासाठी लुधियाना भारतातील सर्वोत्तम शहर होते. २०११ साली लुधियानाची लोकसंख्या १६.१९ लाख होती.

नवी दिल्ली ते अमृतसर दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १ लुधियानामधून जातो. तसेच लुधियाना रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक वर्दळीचे जंक्शन आहे.

विठ्ठल भिकाजी वाघ

प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ (जन्म: १ जानेवारी इ.स. १९४५, हिंगणी, अकोला जिल्हा - हयात) हे मराठीतील एक कवी आणि लेखक आहेत. ते मराठी हा विषय घेऊन एम.ए. पी‍एच. डी. झाले आहेत. ते अकोल्यातील ’शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’ तून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.

विठ्ठल वाघ यांनी अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून पायी हिंडून, काव्ययात्रेतून समाज प्रबोधन केले आहे. त्यांचे अमेरिका, कॅनडा या देशांत काव्यगायनाचे २२ कार्यक्रम झाले आहेत. विठ्ठल वाघ हे महाराष्ट्रातील शालेय मराठीचे पाठ्यपुस्तक, ’बालभारती’ इयत्ता १ ते ७ चे संपादन प्रमुख होते. त्यांनी लिहिलेल्या पाठांचा आणि कवितांचा समावेश, अनेक विद्यापीठांतील व उच्च माध्यमिक विद्यालयांतील पाठ्यक्रमांत झाला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने शब्दसंग्रह वाढवण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर, प्रत्येक विद्यापीठाच्या आसपासच्या जिल्ह्यांतील बोलीभाषेतील शब्दांचा संग्रह करण्याचे काम सुरू केले. त्यासाठी अमरावती विद्यापीठाने डॉ. विठ्ठल वाघ यांची नेमणूक केली होती. वाघ यांनी ३३ तालुक्यांचा दौरा करून, काही म्हणी व शब्द गोळा केले.सुपसिदध कवी व लेखक. 'काळ्या मातीत मातीत ', 'पंगतीच्या वाटेवर', 'कपाशिची चंद्रफुले', हे कवितासंग्रह

श्रीकृष्ण राऊत

डॉ.श्रीकृष्ण राऊत (जन्म : पातूर(अकोला जिल्हा), महाराष्ट्र, १ जुलै १९५५) हे एक मराठी गझलकार आहेत. ते एम.कॉम.,एम.ए.,एम.फिल.पीएच्.डी.(मराठी,वाणिज्य) असून अकोला येथील शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य विभाग-प्रमुख आहेत.

सुहासिनी इर्लेकर

डॉ. सुहासिनी इर्लेकर (इ.स. १९३२:सोलापूर, महाराष्ट्र - २८ ऑगस्ट, इ.स. २०१०:बीड, महाराष्ट्र) या मराठी कवयित्री आणि लेखिका होत्या. संत साहित्याच्या अभ्यासक असलेल्या इर्लेकर मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या महिला पीएच.डी होत्या.

डॉ. सुहासिनी इर्लेकर या बीड येथील बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागात विभागप्रमुख होत्या. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कॉलेजचे वाङ्मय मंडळ विकसित केले होते. इर्लेकरांनी १०हून अधिक कवितासंग्रह प्रकाशित केले.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.