लक्ष्मण देशपांडे

डॉ. लक्ष्मण देशपांडे (डिसेंबर ५, इ.स. १९४३ - फेब्रुवारी २२, इ.स. २००९) एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते. मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांना त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून या नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ रूपे सादर करायचे. त्यामुळे लोक त्यांना वऱ्हाडकर म्हणायचे.

लक्षमण देशपांडे लहानप गणपती उत्सवात होणाऱ्या मेळा नावाच्या करमणुकीच्या कार्यक्रमांत भाग घेत. तेथेच त्यांच्यातील कलावंताची जडणघडण झाली. घरची परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी एम.ए. व त्यानंतर एमडी (मास्टर इन ड्रॅमॅटिक्‍स)चे शिक्षण घेतले. मौलाना आझाद, सरस्वती भुवन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यावर १९८० साली ते औरंगाबाद विद्यापीठात शाखाप्रमुख म्हणून कार्यरत झाले. याच दरम्यान त्यांनी 'वऱ्हाड निघालंंय लंडनला'ची निर्मिती केली. या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारोंच्या संख्येने लोक प्रयोगांना हजर रहात. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवेत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया येथेही वऱ्हाडचे प्रयोग झाले. एकाच व्यक्तीने ५२ व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम केल्याबद्दल डॉ. देशपांडे यांची २००४मध्ये गिनीज बुकातही नोंद झाली. रेशमगाठी, पैंजण या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले. याशिवाय त्यांनी द्विपात्री 'नटसम्राट' या नाटकातही काम केले. इ.स. २०००मध्ये वऱ्हाडकारांनी औरंगाबाद विद्यापीठातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. याच वर्षी त्यांची परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

लक्ष्मण देशपांडे

लेखन

प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी "वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाचे पुस्तक प्रकाशित केले. त्याच्या दोन आवृत्त्या निघाल्या. प्रतिकार हे त्यांनी लिहिलेल्या एकांकिकांचे पुस्तकही रसिकांना भावले. 'मौलाना आझाद-पुर्नमूल्यांकन' या पुस्तकाचे, तसेच महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अक्षरनाद या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले होते.

प्रा. लक्ष्मण देशपांडे यांना मिळालेले काही पुरस्कार

  • २००३ : महाराष्ट्र शासनाचा कलावंत पुरस्कार.
  • २००४ : विष्णुदास भावे पुरस्कार.
  • याशिवाय छत्रपती शाहू महाराज, बेंडे स्मृती, राम श्रीधर, अल्फा टीव्ही, पुरुषोत्तम करंडक, वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठान, सयाजीराव महाराज यांच्या नावाचे पुरस्कार.
  • अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे साहित्यसम्राट आचार्य अत्रे पुरस्कार.

बाह्य दुवे

आनंद पाळंदे

आनंद पाळंदे हे लोकप्रिय मराठी लेखक आहेत.

== जीवन = मरण

कल्याण कुलकर्णी

कल्याण कुलकर्णी (? - ऑक्टोबर २४, १९९८) हे मराठी लेखक होते.

गोपाळ गंगाधर लिमये

गोपाळ गंगाधर लिमये (सप्टेंबर २५ १८८१ - अज्ञात)मराठी कथाकार आणि विनोदकार होते. कॅप्टन गो. गं. लिमये या नावाने त्यांनी लेखन केले.

नीलकंठ महादेव केळकर

नीलकंठ महादेव केळकर (१९०० - ?) हे मराठी चित्रकार, लेखक होते.

पु.ल. देशपांडे

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुल (जन्म : मुंबई, ८ नोव्हेंबर १९१९; मृत्यू : पुणे, १२ जून २०००) हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.गुळाचा गणपती, या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे अनेक किस्से आहेत. त्यांच्यावर मराठीत भाई हा चित्रपट बनला आहे.या चित्रपटाचे 2 भाग निघाले आहेत.

माधव आचवल

प्रसिद्ध लेखक, चित्रकार, वास्तूशिल्पकार, समीक्षक

राजीव साने

राजीव साने हे तत्त्वज्ञान विषयाचे संशोधक व लेखक आहेत. तसेच हे एक नावाजलेले कामगार पुढारीही आहेत. यांनी आपले तत्त्वज्ञानाचे संशोधन पुस्तक स्वरूपात युगांतर नावाने प्रसिद्ध केले आहे. तसेच संगणक विषयावरही यांनी लेखन केले आहे.

लक्ष्मण गायकवाड

"उचल्या" ह्या पारधी समाजाचे अस्वस्थ करणारे चित्रण असलेल्या अतिशय गाजलेल्या कादंबरी चे लेखक.

लीना मोहाडीकर

लीना मोहाडीकर या एक मराठी लेखिका आहेत.

विजय कुवळेकर

विजय कुवळेकर : मराठी लेखक आणि पत्रकार. त्यांनी चित्रपटांचे लेखनही केले आहे.

विनीता आपटे

विनीता आपटे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या मराठी भाषेतील लेखिका आहेत.

विनीता आपटे या मराठी निवेदिका,ले़खिका,अभिनेत्री आहेत. सध्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागात पॅरिस येथे सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत.

विमला ठकार

विमला ठकार (१५ एप्रिल, इ.स. १९२१ - ११ मार्च, इ.स. २००९) या मराठी भाषेतील लेखिका आहेत.

सहज भाषेत अध्यात्मातील अवघड तत्वे उलगडणे यांना लेखनातून सिद्ध आहे.

आत्मोन्नती व मनोविकास या विषयावर लेखन करणाऱ्या या महत्त्वाच्या लेखिका आहेत.

शकुंतला बोरगावकर

शकुंतला बोरगावकर (? - जून १२, २००१) या मराठी लेखिका होत्या.

सुनीता पुरुषोत्तम देशपांडे

सुनीता देशपांडे (जुलै ३, इ.स. १९२५/इ.स. १९२६; रत्नागिरी, महाराष्ट्र - नोव्हेंबर ७, इ.स. २००९; पुणे, महाराष्ट्र), पूर्वाश्रमीचे नाव सुनीता ठाकूर, या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे त्यांचे पती होते.

पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न जून १२, इ.स. १९४६ रोजी झाले. पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकांत काम केले. तसेच 'वंदेमातरम्' या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती. 'नवरा बायको' या चित्रपटातही त्यांनी काम केलेले आहे. 'राजमाता जिजाबाई' हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या 'सुदर मी होणार' मधील दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिका सुनिताबाईंनी साकारली होती.

मराठी साहित्यिक

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.