रानडे, गांधी आणि जीना

रानडे, गांधी आणि जीना (इंग्रजी: Ranade, Gandhi and Jinnah) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. इ.स. १९४३ सालच्या १८ जानेवारी रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१) यांच्या १०१व्या जन्मतिथीच्या निमित्ताने, रानड्यांनीच इ.स. १८९६ मध्ये स्थापन केलेल्या ‘डेक्कन सभा’ या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक इंग्रजी व्याख्यान दिले. हे भाषण पुढे ‘रानडे, गांधी आणि जीना’ या नावाने पुस्तकस्वरूपात प्रकाशित झाले. या पुस्तकात बाबासाहेबांनी महादेव गोविंद रानडे, मोहनदास करमचंद गांधी आणि महमंद अली जीना या तीन व्यक्तित्वांची तुलना केली आहे व त्यात रानडे हे गांधी व जिनांपेक्षा थोर असल्याचे सांगितले आहे. व्यक्तिपूजा (हीरो वरशिप) चांगली गोष्ट नाही, कारण ती शेवटी समाजासाठी आणि देशासाठी अहितकारक असते, असे या पुस्तकात सांगितले आहे.

मराठीतले हे पुस्तक पुण्यातील जोशी ब्रदर्स या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. मूळ पुस्तक इंग्रजीत होते.

हे सुद्धा पहा

आंबेडकर मेमोरिअल पार्क

आंबेडकर मेमोरिअल पार्क (मराठी: आंबेडकर स्मारक उद्यान) हे उत्तर प्रदेश, लखनऊ, गोमतीनगर येथील एक सार्वजनिक उद्यान आहे. हे अधिक औपचारिकपणे डॉ भीमराव आंबेडकर सामाजिक प्रतिक स्थळ म्हणून ओळखले जाते. तसेच "आंबेडकर पार्क" म्हणूनही ओळखले जाते. ज्योतिराव फुले, नारायण गुरु, बिरसा मुंडा, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या उद्यानाची स्थापना उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी केली.

काळाराम मंदिर सत्याग्रह

काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता.

या सत्याग्रहात स्त्रीयांचा सहभाग होता

आणि 1934 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सत्याग्रह मागे घेण्यात आला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार हा आंबेडकराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अँड लिटरेचरतर्फे दिला जातो. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार हा गुजरात शासनाद्वारे दिला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार अशा प्रतिष्ठित व्यक्तीला दिला जातो ज्याने समाज कल्याणकारी कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु . २,००,००० / - आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची

हा लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१ - १९५६) यांचेशी संबंधित असलेल्या लेखांची सूची आहे.

डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार

डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार हा दिल्ली सरकारद्वारे प्रदान केला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असलेल्या व्यक्ती, व्यक्तिसमूह किंवा संस्थेला दिला जातो.

डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम

डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम हे इतचेरला, श्रीकाकुलम जिल्हा, आंध्र प्रदेश येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. आंध्रप्रदेश सरकारने २००८ मध्ये याची स्थापना केली आहे.

डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ

डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, पूर्व आग्रा विद्यापीठ, हे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. विद्यापीठाचे सध्याचे उप-कुलपती अरविंद कुमार दीक्षित आहेत.

डॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ

डॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ, संशिप्तमध्ये बी. आर. आंबेडकर विमानतळ किंवा मेरठ विमानतळ हे उत्तर प्रदेश मधील गागोल मेरठपासून ९ कि.मी. अंतरावर पोर्टापूर मध्ये स्थित आहे. ४७ एकर क्षेत्रावर पसरलेले व प्रादेशिक उड्डाणांसाठी वापरलेले जाणारे विमानतळ आहे. विमानतळाच्या विकासासाठी उत्तर प्रदेश सरकारने फेब्रुवारी २०१४ मध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) सह एक सामंजस्य करार केला होता.

थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स

थॉट्स ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आणि इ.स. १९५५मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक आहे. यात डॉ. आंबेडकरांनी राज्यांच्या भाषिक एकत्रिकरणाचे चित्रण केले आहे तसेच एक राज्य एक भाषा या सार्वभौमिक सिद्धांताचा स्वीकार केला आहे. हिंदी भाषेला संपूर्ण राष्ट्राची राजकीय भाषा बनवल्या जाण्यावर जोर दिला आहे. त्यांचा मते, एक भाषा राष्ट्राला संघटित ठेवू शकते आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये शांती तसेच विचार संचाराला सोपे बनवू शकते.

द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट

द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट मुंबई ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २९ जुलै १९४४ रोजी स्थापन केलेली एक सामाजिक संस्था होती.

पर्वती मंदिर सत्याग्रह

पर्वती मंदिर सत्याग्रह हा पुण्यातील पर्वती मंदिर प्रवेशासाठी इ.स. १९२९ मध्ये केला गेलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह होता. पुण्यातील 'पर्वती टेकडीवरील मंदिर' हे अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा अमरावती नंतरचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील आंबेडकरांच्या वतीने एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला त्यांचा अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून ट्रर्टने अर्ज फेटाळला. यानंतर मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. या सर्वांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पुणे पर्वती सत्याग्रह सुरू केला. यात शिवराम कांबळे, एम.एम.जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित हजारों स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता.

पीपल्स एज्युकेशन सोसायटी

पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील एक शैक्षणिक संस्था आहे.

अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीची’ स्थापना केली. या संस्थेच्यावतीने १९४६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाज बांधवासाठी सुरू केले.

बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ

बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ (बीबीएयू) हे उत्तर प्रदेशातील लखनौमधील केंद्रीय विद्यापीठ आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून या विद्यापीठाचे नाव देण्यात आले आहे.

बालक आंबेडकर

बालक आंबेडकर हा इ.स. १९९१ मधील बसवराज दिग्दर्शित कन्नड भाषेतील चित्रपट आहे. हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपण ते तरूण जीवनावर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतही डब झालेला आहे.

भिम गर्जना

भिम गर्जना हा इ.स. १९९० मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर वाघमारे व निर्मात्या नंदा पवार आहेत.

भीमराव यशवंत आंबेडकर

भीमराव यशवंत आंबेडकर हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक कार्यकर्ते व अभियंता आहेत. त्यांनी अनेक सामाजिक, धार्मिक तसेच राजकीय चळवळीमध्ये काम केलेले आहे. भीमराव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व यशवंत आंबेडकर यांचे द्वितीय पुत्र आहेत. ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांचे भाऊ आहेत.

मनुस्मृती दहन दिन

मनुस्मृती दहन दिन हा दिवस दलित-बहुजन जनतेद्वारे दरवर्षी २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. महाड सत्याग्रह नंतर मनुस्मृती ह्या पुरातन विषमतावादी हिंदू ग्रंथाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर, इ.स. १९२७ रोजी जाहिरपणे दहन केले होते. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज

स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले कृषिविषयक पुस्तक आहे, जे त्यांनी इ.स. १९१८ साली प्रकाशित केले होते. हे पुस्तक लहान आणि तुकड्यात विभागलेल्या कसण्यायोग्य जमीनीचा विस्तार व त्याच्या ‘चकबंदी’शी संबंधित आहे. डॉ. आंबेडकरांच्या नुसार जोपर्यंत लहान व विभागलेली भूमीचा विस्तार आणि चकबंदी होत नाही तोपर्यंत भारताच्या कृषी सुधारणेत प्रगती होणार नाही.

गुरू
कुटुंब
सत्याग्रह व चळवळी
वृतपत्रे
पक्ष, संस्था व संघटना
लेखन साहित्य
प्रभावित
प्रतीके
निष्टावंत सहयोगी
संबंधित स्थळे
पुरस्कार व सन्मान
समर्पित दिवस
चित्रपट व मालिका
नावावरील गोष्टी
बौद्ध धर्म
बहुआयामी व्यक्तिमत्त्व

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.