राज्य

राज्य ही राजकीय प्रणाली व सरकार एकत्रित करणारी एक सुनियोजित संस्था आहे. राज्य हा शब्द एखाद्या देशामधील संघीय राजकीय विभागाला संबोधण्यासाठी देखील वापरला जातो. राज्य हे देशाचा अविभाज्य घटक आहे.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने

उत्तर अमेरिका खंडातील अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने (युनायटेड स्टेट्स Eng:United States) या नावाने ओळखला जातो.

अमेरिका हा लोकशाही प्रणाली मानणारा जगातील मोठ्या(क्षेत्रफळाने) देशांपैकी प्रमुख असून येथील प्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो.भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत.

अमेरिका आर्थिक व लष्करीदृष्ट्या जगातील सर्वांत बलशाली देश आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती या महत्त्वाच्या जागतिक समितीमध्ये या देशास स्थायी सदस्यत्व असून नकाराधिकार देखील प्राप्त आहे.

अमेरिकन डॉलर अमेरिकेचे चलन आहे.

आंध्र प्रदेश

गुणक: 16.5°N 80.6°E / 16.5; 80.6

आंध्रप्रदेश (तेलगु- ఆంధ్ర ప్రదేశ్) हे भारतीय २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. आंध्रप्रदेशाचे क्षेत्रफळ १६०.२०५ वर्ग कि.मी. असून क्षेत्रफळानुसार ते भारतात आठवे राज्य आहे. २०११ च्या जणगणनेुसार आंध्र प्रदेशाची लोकसंख्या ४९,३८६,७९९ एवढी आहे. लोकसंख्येनुसार आंध्र प्रदेश भारतात दहावे राज्य आहे. या राज्याची नवीन राजधानी गुंटुर जिल्ह्यात अमरावती या नावाने विकसित करण्यात येत आहे. काही काळापर्यंत हैदराबाद ही अांध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांची राजधानी राहणार आहे.

आसाम

गुणक: 26.15°N 91.77°E / 26.15; 91.77

आसाम ईशान्य भारततील एक महत्वाचे व सर्वात मोठे राज्य आहे. अासामच्या उत्तरेला भूतान व अरूणाचल प्रदेश आहे. पूर्वेला नागालँड व मणिपूर ही राज्य आहेत. तर दक्षिणेला मेघालय, त्रिपूरा व मिझोरम ही राज्य आहेत. ईशान्य भारतातील सात राज्यांपैकी आसाम सगळ्यात मोठे राज्य आहे. आसाम ची लोकसंख्या ३,११,६९,२७२ एवढी आहे. असमीया ही आसामची प्रमुख भाषा आहे. आसामची साक्षरता ७३.१८ टक्के एवढी आहे. तांदूळ व मोहरी ही येथील प्रमुख पिके आहेत. बिहू नृत्य येथील लोकप्रिय नृत्य आहे. दिसपूर ही आसामची राजधानी तर गुवाहाटी सर्वात मोठे शहर आहे.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश हे भारताचे उत्तरेकडील एक प्रमुख राज्य आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या १९,९५,८१,४७७ एवढी आहे. लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते. उत्तर प्रदेशाचे क्षेत्रफळ २,४०,९२८ वर्ग किमी एवढे आहे. हिंदी व उर्दु ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. लखनौ ही उत्तर प्रदेशाची राजधानी तर कानपूर हे तेथील सर्वात मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशाची साक्षरता ७९.१२ टक्के आहे. तांदूळ, गहू, मका व डाळ ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही हे राज्य अतिशय महत्वाचे समजले जाते. उत्तर प्रदेशात सर्व धर्मांची अनेक पवित्र स्थळे आहेत, त्यामुळे हे राज्य अतिशय संवेदनशील आहे.

ओडिशा

ओडिशा (मराठी नामभेद: ओरिसा ; रोमन लिपी: Odisha) भारत देशाच्या २९ राज्यांपैकी एक राज्य आहे. ओडिशा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तरेला असून त्याच्या पूर्वेला बंगालचा उपसागर, उत्तरेला पश्चिम बंगाल व झारखंड, पश्चिमेला छत्तीसगढ, नैर्ऋत्येला तेलंगण तर दक्षिणेला आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत. भुवनेश्वर ही ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.भुवनेश्वर आणि कटक ही जुळी शहरे आहेत. क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील ९व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. ओरिसाला ४८५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

ओरिसाची विविध नावे : उच्छल (बंगाली), उत्कल, उड्र देश, ओड्र, उडीशा, उडीसा, उड़़ीसा, ओडिसा, ओडिशा, ओढिया, ओदिशा, Odisha, Orissa

पुरी येथील जगन्नाथ मंदिर, कोणार्क येथील सूर्य मंदिर इत्यादी जगप्रसिद्ध सांस्कृतिक स्थाने असलेल्या ओडिशामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचे अनेक ठसे आढळतात. कोणार्कच्या सूर्यमंदिराजवळ पुराणांत वर्णन केलेली चंद्रभागा नदी होती. आता तेथे चंद्रभागा बीच आहे.

कर्नाटक

गुणक: 12.970214°N 77.56029°E / 12.970214; 77.56029

कर्नाटक Karnataka (कन्नड भाषेत :ಕರ್ನಾಟಕ, उच्चार [kəɾˈnɑːʈəkɑː] ) हे भारताच्या दक्षिणेकडील चार राज्यांपैकी एक राज्य आहे. राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी म्हैसूर राज्य म्हणून झाली व १९७३ मध्ये या राज्याचे नाव कर्नाटक असे बदलण्यात आले.

कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तमिळनाडू ही राज्ये येतात. राज्याचे क्षेत्रफळ १,९१,९७६ चौरस किलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५.८३% इतके आहे. कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार भारतातले ८ वे मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा भारतात ९ वा क्रमांक आहे. कर्नाटक राज्यात २९ जिल्हे आहेत. कन्नड ही राज्याची मुख्य भाषा असून मराठी, कोकणी, तुळू, व तमीळ ह्याही भाषा बोलल्या जातात.

कर्नाटक या नावाचे अनेक अर्थ आहेत. करु= उच्च अथवा उत्कर्षित व नाडू = भूमी. म्हणजेच उत्कर्षित राज्य. हा त्यांपैकी एकअर्थ. तसेच दुसरा अर्थ : करु= काळा रंग + नाडू= भूमी. म्हणजे काळ्या रंगाच्या मातीचा प्रदेश. ही काळी माती महाराष्ट्र व कर्नाटकातील मोठ्या भूभागावर आढळते. श कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील भागाला ब्रिटिश कारनॅटिक असे म्हणत.कर्नाटक राज्याचा इतिहासाप्रमाणे मध्ययुगीन कर्नाटकात अनेक शक्तिशाली साम्राज्ये होऊन गेली. कर्नाटकाकडून शिल्पकला, संगीत, नृत्य, तत्त्वज्ञान, साहित्य यांची अनमोल परंपरा भारताला मिळाली आहे. स्वातंत्र्यानंतर साहित्य क्षेत्रात दिला जाणाऱ्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचा मान सर्वाधिक वेळा कर्नाटकला मिळालेला आहे. कर्नाटकाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही भरीव प्रगती केलेली आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणाचे खाजगीकरण करून भारताला सर्वाधिक पदवीधरांचा देश बनवण्यात कर्नाटकाने मोठी कामगिरी बजावलेली आहे. राज्याची राजधानी बंगळूर ही असून, आज ती भारताची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राजधानी समजली जाते.

कॅलिफोर्निया

कॅलिफोर्निया (इंग्लिश: California) हे अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील एक राज्य आहे. अमेरिकेत सर्वाधिक लोकसंख्या असणारे हे राज्य आकाराने देशातील तिसऱ्या क्रमांकाचे आहे (अलास्का व टेक्सास खालोखाल). अमेरिकेच्या ५० सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी ८ शहरे कॅलिफोर्निया राज्यात स्थित आहेत.

कॅलिफोर्नियाच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, दक्षिणेला मेक्सिकोचे बाहा कॅलिफोर्निया हे राज्य, उत्तरेला ओरेगॉन तर पूर्वेला नेव्हाडा व ऍरिझोना ही राज्ये आहेत. सॅक्रामेंटो ही कॅलिफोर्नियाची राजधानी असून लॉस ऍन्जलीस हे सर्वात मोठे शहर व महानगर आहे.

१९व्या शतकाच्या मध्यापर्यंत कॅलिफोर्निया हा मेक्सिकोचा भाग होता. १८४६-१८४८ दरम्यान झालेल्या मेक्सिकन-अमेरिकन युद्धानंतर हे राज्य अमेरिकेकडे सुपूर्त करण्यात आले व ९ सप्टेंबर १८५० रोजी अमेरिकन संघात विलिन करून घेण्यात आले. ह्याच काळात कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खाणींचा शोध लागला व अमेरिकेच्या इतर भागातून व सर्व जगभरातून स्थलांतर करणार्‍या लोकांचे लोंढे येथे येऊ लागले. लॉस ऍन्जलीस येथील हॉलिवूड ह्या सिनेउद्योगामुळे, येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी मोठ्या संख्येने बेट देणार्‍या पर्यटकांमुळे व सिलिकॉन व्हॅलीमधील अतिविकसित तंत्रज्ञान उद्योगांमुळे कॅलिफोर्नियाची भरभराट झाली आहे. सध्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील १३ टक्के वाटा उचलणाऱ्या कॅलिफोर्नियाचा जीडीपी $१.८१२ सहस्रअब्ज इतका आहे.

केरळ

गुणक: 08.47°N 76.95°E / 08.47; 76.95

केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोची व कोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे.

पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे केरळात भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य आहे. अर्थात, केरळचा व्यक्तिविकास सूचकांक भारतात सर्वात अधिक आहे. २००५ मधील एका सर्वेक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे. केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थलांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. निसर्ग साधनसंपत्ती आणि महिलाचे शिक्षणातील सर्वात जास्त प्रमाण ही वैशिष्ट्ये आहे.

गुजरात

गुणक: 23.2167°N 72.6833°E / 23.2167; 72.6833

गुजरात उच्चार (गुजराती: ગુજરાત) हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे.भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य आहे.

छत्तीसगढ

गुणक: 21.27°N 81.60°E / 21.27; 81.60

झारखंड

झारखंड (संताली: ᱡᱷᱟᱨᱠᱷᱚᱸᱰ) हे भारत देशाच्या पूर्व भागातले एक राज्य आहे. बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा काढून, या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन २००० मध्ये संमत केला. त्यानुसार भारतीय गणराज्यातील २८ वे राज्य म्हणून १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड अस्तित्वात आले. वने आणि खनिज संपत्तीची समृद्धी हे या राज्याचे वैशिष्ट्य आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत या दोन घटकांचा सर्वांत मोठा वाटा आहे. रांची हे औद्योगिक शहर झारखंड राज्याची राजधानी आहे. झारखंड या राज्याचे क्षेत्रफळ ७९,७१४ चौ.किमी. एवढे आहे. या राज्याची लोकसंख्या ३,२९,६६,२३८ एवढी आहे. हिंदी ही येथील प्रमुख भाषा आहे. तांदूळ, गहू व मका ही येथील प्रमुख पिके आहेत.

तमिळनाडू

तमिळनाडू (लिहिण्याची पद्धत) तमिळ्नाडु (स्थानिक उच्चार) (तमिळ: தமிழ்நாடு/तमिळ्नाडु) अर्थ: "तमिळ् लोकांचे राष्ट्र") हे भारतातील २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. चेन्नई (पूर्वीचे नाव:मद्रास) हे सर्वात मोठे शहर तसेच राज्याची राजधानी आहे. तमिळनाडू भारताच्या सर्वात दक्षिणटोकावरील द्वीपकल्पावर वसले आहे. पश्चिमेस केरळ, वायव्येला कर्नाटक, दक्षिणेस भारतीय महासागर व श्रीलंका, पूर्वेस बंगालचा उपसागर, तसेच केंद्रशासित प्रदेश पॉन्डिचरी (पुदुच्चेरी) आणि उत्तरेस आंध्र प्रदेश अशा त्याच्या चतु:सीमा आहेत. राज्याच्या वायव्येस निलगिरी पर्वतरांगा, अण्णामालै टेकड्या, पश्चिमेस पालक्काड, तर उत्तरेस पूर्वेघाट आणि पूर्वदिशेला असलेला बंगालचा उपसागर दक्षिणेस पाल्कची समुद्रधुनी ओलांडून भारतीय महासागरात मिसळतो. दक्षिणेकडील टोकावर असणाऱ्या कन्याकुमारी ह्या प्रसिद्ध पर्यटनक्षेत्री तीन समुद्र एकमेकांत मिसळतानाचे दृश्य पहावयास मिळते.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडूचा भारतात अकरावा क्रमांक लागतो तर लोकसंख्येनुसार सातवा क्रमांक लागतो. तमिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य आहे, तसेच भारताच्या औद्योगिक विकास दरात (जी.डी.पी.) त्याचे पाचव्या क्रमांकाचे स्थान आहे. भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये(१०.५६ टक्के)असणारे राज्य म्हणून तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो. सुत, साखर व सिमेंट हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत. पण त्यामानाने देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ६ टक्के लोक तमिळनाडूत राहतात. सर्वांगीण विकासात तमिळनाडू हे भारतातील एक अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. तामिळनाडू आपल्या सर्वाेत्तम परिवहन सुविधेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

तामिळनाडूचे क्षेत्रफळ १,३०,०५८ चौ.किमी असून लोकसंख्या ७,२१,३८,९५८ एवढी आहे. तमिळ ही येथील प्रमुख भाषा आहे. तामिळनाडूची साक्षरता ८०.३३ टक्के आहे. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी असून सर्वात मोठे शहर आहे. तांदुळ, रागी, कापूस व ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. तामिळनाडूतील कावेरी नदी, पालर नदी व वैगई नदी या प्रमुख नद्या आहेत.

न्यू यॉर्क

न्यू यॉर्क (इंग्लिश: New York) हे अमेरिकेच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. न्यू यॉर्क हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसर्‍या क्रमांकाचे राज्य आहे.

न्यू यॉर्कच्या उत्तरेला कॅनडाचे ओन्टारियो व क्वेबेक हे प्रांत, वायव्येला ओन्टारियो सरोवर, पूर्वेला ईरी सरोवर, दक्षिणेला पेनसिल्व्हेनिया व न्यू जर्सी, आग्नेयेला अटलांटिक महासागर तर पूर्वेला व्हरमाँट, कनेक्टिकट व मॅसेच्युसेट्स ही राज्ये आहेत. आल्बनी ही न्यू यॉर्क राज्याची राजधानी असून न्यू यॉर्क शहर हे अमेरिकेतील सर्वात मोठे शहर ह्याच राज्याच्या अखत्यारीत येते. न्यूयॉर्क राज्य आणि न्यू यॉर्क शहर ह्यांत फरक करण्यासाठी बरेच वेळा राज्याचा उल्लेख 'न्यू यॉर्क राज्य' (New York State) असा स्पष्टपणे केला जातो.

न्यू यॉर्क राज्याची अर्थव्यवस्था अमेरिकेमध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे, ज्यापैकी बव्हंशी उलाढाल न्यू यॉर्क शहराशी निगडित आहे. वाहतूक व्यवस्था, शिक्षण, संस्कृती इत्यादी सर्वच बाबतीत न्यू यॉर्क अमेरिकेचे एक आघाडीचे राज्य मानले जाते.

पंजाब

गुणक: 30.73°N 76.78°E / 30.73; 76.78

पंजाब हे भारताच्या वायव्येकडील एक महत्वाचे राज्य आहे. पंजाब पाच नद्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. याच्या ईशान्येला हिमाचल प्रदेश व जम्मू आणि काश्मीर, पूर्वेस चंदिगड, दक्षिण व आग्नेय दिशांना हरयाणा, नैऋत्येस राजस्थान ही राज्ये आहेत तर पश्चिमेस पाकिस्तान हा देश आहे. चंदिगड ही पंजाब व हरियाणाची संयुक्त राजधानी आहे. पंजाबचे क्षेत्रफळ ५०,३६२ आहे तर पंजाबची लोकसंख्या १०,३८,०४,६३७ एवढी आहे. पंजाबी ही पंजाबची प्रमुख भाषा आहे. पंजाबची साक्षरता ७६.६८ टक्के आहे. ताग, गहू, तांदूळ, चहा ही येथील प्रमुख पिके आहेत. पंजाब मध्ये शीख धर्माचा उदय झाल्याने तेथे शीख धर्मीयांची संख्या जास्त आहे.

पश्चिम बंगाल

गुणक: 22.5697°N 88.3697°E / 22.5697; 88.3697

पश्चिम बंगाल / wɛst bɛŋɡɔ ː लसिथ / (बांग्ला: পশ্চিমবঙ্গ) हे भारतातील पुर्व भागात असलेले एक राज्य आहे आणि लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. तसेच जगातील सातव्या सर्वात दाट लोकवस्ती असलेला प्रदेश आहे. 91 दशलक्ष रहिवासी . [ 4 ] 34.267 चौरस मैल ( 88,750 km2 ) पसरलेल्या , या राज्याच्या सीमा नेपाळ , भूतान , आणि बांगलादेश या देशांना आणि ओडिशा , झारखंड , बिहार , सिक्कीम , आसाम या भारतील राज्यांना लागून आहेत . या राज्याची राजधानी कोलकाता आहे . पश्चिम बंगाल दोन ब्रॉड नैसर्गिक प्रदेशात करतात : . दक्षिण Gangetic साधा आणि उत्तर उप Himalayan आणि Himalayan क्षेत्र .

प्राचीन बंगाल अनेक प्रमुख वैदिक राज्यांचे च्या साइटवर होते . आणि प्रादेशिक Pala साम्राज्य ( 11 शतक आठव्या ) आणि शिवसेना राजवंश ( 11 - 12 शतक ) भाग ; बंगाल प्रदेश अशा मौर्य साम्राज्य ( दुसरे शतक इ.स.पू. ) आणि गुप्ता साम्राज्य ( चौथ्या शतकापासून ) म्हणून मोठ्या भारतीय empires भाग होता . पुढे 13 व्या शतकात पासून , प्रदेश 18 व्या शतकात ब्रिटिश नियम सुरुवातीला होईपर्यंत , अनेक sultans , हिंदू राजे आणि Baro - Bhuyan landlords राज्य आले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इ.स. 1757 मध्ये Plassey लढाई खालील प्रदेशात सुटीच्या धरून सिमेंटची , आणि कलकत्ता ब्रिटीश इंडिया राजधानी म्हणून अनेक वर्षे काम केले . ब्रिटीश प्रशासनासाठी लवकर आणि प्रदीर्घ प्रदर्शनासह पाश्चात्य शिक्षण विस्तार , विज्ञाननिष्ठ विकास culminating , संस्थात्मक शिक्षण , आणि बंगाल 14 15 व 16 व्या शतकांतील विद्येचे पुनरुज्जीवन म्हणून ओळखले झाले काय समावेश विभागाचे सामाजिक सुधारणा , परिणत . नव्याने तयार पाकिस्तान - नंतर भारत आणि पूर्व बंगाल - एक भाग पश्चिम बंगाल - राज्य : 20 व्या शतकाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक वाढीला अनुकूल अशी जागा , बंगाल दोन वेगळे घटक मध्ये धार्मिक ओळी बाजूने 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्य दरम्यान वाटून करण्यात आला 1971 मध्ये बांगलादेश होत .

मुख्य कृषी उत्पादक , पश्चिम बंगाल भारतातील निव्वळ घरगुती उत्पादनाच्या सहाव्या क्रमांकाचा वर्गणीदार आहे . [ 6 ] त्याच्या राजकीय कृतिवाद साठी , राज्य तीन दशके democratically निवडून साम्यवादी सरकार राज्य करण्यात आली असावी. पश्चिम बंगाल त्याच्या सांस्कृतिक उपक्रम आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्था उपस्थिती साठी नोंद आहे ; राज्य राजधानी कोलकाता " भारत सांस्कृतिक राजधानी " म्हणून ओळखले जाते . राज्याचे सांस्कृतिक वारसा , बदलेला लोकसाहित्याचा परंपरा याशिवाय , नोबेल - इंग्लंडमध्ये राजकवी ही पदवी रवींद्रनाथ टागोर समावेश साहित्य stalwarts पासून संगीतकार च्या स्कोअर , चित्रपट निर्मात्यांना आणि कलाकारांचे श्रेण्या . पश्चिम बंगाल देखील त्याचे कौतुक आणि राष्ट्रीय आवडत्या खेळात क्रिकेट याशिवाय फुटबॉल खेळताना च्या सराव सर्वात इतर भारतीय राज्यांच्या पेक्षा वेगळी आहे . [ 7 ] [ 8 ] [ 9 ]

बिहार

गुणक: 25.35°N 85.12°E / 25.35; 85.12

बिहार उत्तर भारतातील राज्य आहे. बिहारच्या उत्तरेला नेपाळ हा देश, पश्चिमेला उत्तर प्रदेश, दक्षिणेस झारखंड तर पूर्वेला पश्चिम बंगाल ही राज्य आहेत. बिहारचे क्षेत्रफळ ९४,१६३ चौ.किमी एवढे आहे. याची लोकसंख्या २,७७,०४,२३६ एवढी आहे. साक्षरता ६३.८२ टक्के आहे. हिंदी ही येथील प्रमुख भाषा आहे. तांदूळ, गहू व मका ही येथील प्रमुख पिके आहेत.

महाराष्ट्र

गुणक: 18.96°N 72.82°E / 18.96; 72.82

महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे. विस्तार १, १८, ८०९ चौरस मैल (३,०७, ७१० चौरस किमी) असून, तो पश्चिम आणि कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली भारतीय राज्यांना अरबी समुद्र लागून आहे. महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. कारण महाराष्ट्राला या तीन समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभलेला आहे.

मुंबई

गुणक: 18.96°N 72.82°E / 18.96; 72.82

मुंबई (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: /'mumbəi/ उच्चार ऐका) ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने होणारी ५०% मालवाहतूक होते.

मुंबई १८व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी मुंबई ही कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण बनवली. १९व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २०व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. इ.स. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ.स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुंबई करण्यात आलं.

मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.

मुंबई हे बॉलीवूड व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे.

युनायटेड किंग्डम

ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (प्रचलित नाव: United Kingdom of Great Britain and Northern Ireland; युनायटेड किंग्डम हा उत्तर युरोपातील एक देश (संयुक्त राजतंत्र) आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड आयर्लंड ह्या बेटावर वसला आहे.

युनायटेड किंग्डम हा युरोपातील व जगातील एक विकसित देश आहे. तसेच, ते युरोपियन संघाचे संघराज्य आहे, व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहे. युनायटेड किंग्डम हे राष्ट्रकुल परिषद, जी-८, नाटो इत्यादि अंतर्राष्ट्रीय संस्थांचे सदस्य राज्य आहे.

लोकसभा

लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. तसेच धनविषयक प्रस्ताव हा लोकसभेतच मांडला जातो.

इवलेसे|Lok-sabha-india

संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य, 'भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे' हे असते, अर्थात हे सदस्य राज्यकारभाराच्या विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत.

'लोकसभा' हा शब्द संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या दोन पाठोपाठ निवडणुकांमधील कालावधीसही वापरतात. २००८ पर्यंत भारतामध्ये १४ लोकसभा-कालावधी झाले आहेत. लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.( जे की राष्ट्रपतीकडुन निवडून दिले जातात)

प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. ह्याला आणीबाणीची परिस्थिती हा एक अपवाद आहे. आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्यास लोकसभेचा कालावधी एक वर्षाच्या टप्प्यामध्ये ५ वर्षाहून अधिक काळही वाढवता येतो.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.