रवीश मल्होत्रा

रवीश मल्होत्रा (डिसेंबर २५, इ.स. १९४३:लाहोर, पाकिस्तान - ) हा भारतीय वायुसेनेचा निवृत्त एर कॉमोडोर आहे.

मल्होत्रा १९८२ साली सोयुझ टी-११ मोहीमेंतर्गत अंतराळात गेलेल्या राकेश शर्माचा बदली अंतराळवीर होता. मल्होत्रा अंतराळात गेला नाही.

अवकाश

१. विश्वाच्या जडणघडणीतील एक मूलभूत घटक. अशा मितींचा संच की ज्यात सर्व दृश्य वस्तु स्थित आहेत, त्यांना विशिष्ठ आकार आहे आणि ज्यात त्या हलू शकतात. २. विश्वातील कुठल्याही वस्तूच्या वातावरणाबाहेरील जवळजवळ रिकामी पोकळी. यालाच दुसरया शब्दात पृथ्वी सभोवतालच्या वातावरणाची अथांग पोकळी असेहि म्हणतात.

3.अंतरीक्ष ला इंग्लिश मध्ये स्पेस् म्हणतात. पृथ्वी च्या बाहेरील जागेस अंतराळ असे संबोधले जाते.

४.दोन ग्रहांच्यामधील असलेल्या मोकळ्या जागेला अवकाश असे म्हणतात.

५.अवकाशात आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला आहेत.अवकाशात अनेक तारासमूहसुद्धा आहेत.अवकाशात

अनेक ग्रह आहेत त्यांच्या नैसर्गिक उपग्रहांसोबत सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत असतात.

आर.व्ही. पेरूमल

आर.व्ही. पेरूमल हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी निदेशक आहेत.

इन्सॅट-४अ

उपग्रह- इन्सॅट-४अ

अवकाशात प्रक्षेपण- २५ डिसेंबर २००५

प्रक्षेपक यान - एरियन-५व्ही१६९

प्रक्षेपक स्थान - फ्रेंच गयाना

काम बंद दिनांक -

वजन - ३०८१ किलो

आकार - २.० × १.७ × २.८ मीटर

विद्युत पुरवठा - ५९२२ वॅट्

उपग्रहावरील यंत्रे - १२ सी बँड ट्रांसपाँडर,१२ केयु बँड ट्रांसपाँडर,

उपग्रह कक्षा - भूस्थिर ८३ रेखांश पूर्व

कार्यकाळ - १२ वर्ष

उद्देश्य - दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतरभारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो

इस्रो उपग्रह केंद्र

इस्रो उपग्रह केंद्र हे केंद्र बंगळूर येथे असून, या केंद्राचे मुख्य काम उपग्रह तंत्राचे परीक्षण व उपग्रह जुळणीचे आहे. येथे इन्सॅट, जीसॅट, व आयाआरएस २३ उपग्रहाचे काम करण्यात आले आहे.

एम. अण्णादुराई

मयिलस्वामी अण्णादुराई (तमिळ:மயில்சாமி அண்ணாதுரை; जन्म: २ जुलै १९५८, पोल्लाची, कोइंबतूर जिल्हा, तामिळ नाडू) हे एक भारतीय खगोलशास्त्रज्ञ व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सदस्य आहेत. चंद्रयान, चंद्रयान २, ॲस्ट्रोसॅट, आदित्य, मंगळयान इत्यादी अनेक महत्त्वाच्या व प्रतिष्ठित संशोधन प्रकल्पांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.

कल्पना-१

कल्पना-१ हा भारताचा हवामानसंशोधन उपग्रह आहे.

हा उपग्रह ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाद्वारे सप्टेंबर १२, इ.स. २००२ रोजी प्रक्षेपित करण्यात आला. याला भारतीय-अमेरिकन अंतराळयात्री कल्पना चावलाचे नाव देण्यात आले आहे.

कार्टोसॅट

कार्टोसॅट ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने बनवलेल्या उपग्रहांची मालिका आहे. आत्तापर्यंत या मालिकेत चार उपग्रह तयार केले गेलेले आहेत.

जीसॅट

जीसॅट हे उपग्रह भारत देशाने स्वतः तयार केलेले उपग्रह आहेत. ते मुख्यतः व्हिडीओ प्रक्षेपण, माहिती देवाण घेवाण करिता योजिले आहेत.

हा पृथ्वीच्या ३,५०० कि.मी. अंतरावर असलेल्या भूस्थिर कक्षेत पाठवण्याचे काम करतो. तसेच २,००० ते ५,००० पर्यंत वजनाचे उपग्रह पाठवणे सहज शक्य होते.

जीसॅट-१

जीसॅट-२

जीसॅट-३

जीसॅट-४

जीसॅट-५पी

जीसॅट-६

जीसॅट-६अ

जीसॅट-७

जीसॅट-८

जीसॅट-९

जीसॅट-१०

जीसॅट-११

जीसॅट-१२

जीसॅट-१४

जीसॅट-१५

जीसॅट-१६

जीसॅट-१७

जीसॅट-१८

भौतिकी संशोधन कार्यशाळा

भौतिकी संशोधन कार्यशाळा (इंग्लिश: Physical Research Laboratory) ही भारतातील अंतराळ संशोधन आणि संलग्न कार्यक्षेत्रात संशोधन करणारी संस्था आहे.

सतीश धवन अंतराळ केंद्र

सतीश धवन अंतराळ केंद्र हे आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरीकोटा येथे असलेले इस्रोचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. इ.स. २००२ साली इस्रोचे अध्यक्ष राहिलेले सतीश धवन यांच्या मृत्यूनंतर या प्रक्षेपण केंद्राला त्यांचे नाव देण्यात आले.

सरल उपग्रह

सरल उपग्रह हा भारतीयीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो व फ्रांसने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. समुद्रावरील घडामोडींचा या उपग्रहाच्या मदतीने अभ्यास करतात.

स्ट्रेच्ड रोहिणी सॅटेलाइट सिरीझ

स्ट्रेच्ड रोहिणी सॅटेलाइट सिरीझ ही भारताने सोडलेल्या कृत्रिम उपग्रहांची मालिका आहे. या मालिकेतील उपग्रह रोहिणी उपग्रहासारखे परंतु अधिक क्षमता असलेले आहेत.

भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती
विभाग
उपग्रह
प्रयोग आणि प्रक्षेपण यान
संस्था
महत्त्वाच्या व्यक्ती

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.