युरोपियन संघ

युरोपियन युनियन (अर्थ:युरोपियन संघ) (The European Union-EU) अथवा युरोपियन महासंघ हा युरोप खंडातील २८ देशांचा संघ आहे. या संघाचे उद्दीष्ट युरोपीय देशांमध्ये राजकीय व शासकीय संयु्क्तता आणणे, समान अर्थव्यवस्था व समान व्यापार-नियम लागू करणे, समान चलन (युरो-€) अस्तित्वात आणणे हे आहे. युरोप खंडातील सर्वात मोठे राजकीय व आर्थिक अस्तित्व युरोपियन संघाला लाभले आहे. संघाची एकूण लोकसंख्या ४९ कोटी ३० लाख आणि वार्षिक उत्पन्न (GDP) €१०५ ($१३७) निखर्व आहे. युरोपियन संघात खालील देश आहेत.

युनायटेड किंग्डममध्ये २३ जून २०१६ रोजी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये ब्रिटिश नागरिकांनी युरोपियन संघ सोडण्याच्या बाजूने कौल दिला.[१][२] त्यामुळे २०१९ साली युनायटेड किंग्डम अधिकृतपणे युरोपियन संघातून बाहेर पडेल.[१]

युरोपाचा ध्वज

युरोपाचा ध्वज

जगाच्या नकाशावर युरोपियन संघ

जगाच्या नकाशावर युरोपियन संघ

लघुरूपEU
ध्येयUnited in diversity (विविधतेमध्ये एकता)
स्थापना२५ मार्च १९५७
सदस्यता
अधिकृत भाषा२३

इतिहास

दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक सहकार्य तसेच व्यापारवर्धित करण्याच्या उद्देशाने युरोपीय  देश एकत्र येऊ लागले ,१९५७ मध्ये बेल्जीयम ,जर्मनी ,फ्रान्स ,इटली ,लक्झेमबर्ग आणि आणि नेदरलँड या सहा देशांनी युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी या संस्थेची स्थापना केली युरोपस्थित २८ देशांची युरोपियन युनियन ही अतिप्रगत अशी आर्थिक युनियन आहे. युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी आणि युरोपियन आर्थिक युनियन यांच्यापासुन युरोपियन युनियनचा जन्म झाला.१९९३ मध्ये मॅस्ट्रिच कराराने युरोपियन युनियन हे नाव देण्यात आले . लिस्बन कराराने अलीकडे २००९मध्ये युरोपियन युनियनमध्ये सुधारित घटना लागू झाली आहे . १ जुलै २०१३ पासून क्रोशिया हा नवीन देश सदस्य होत असल्यामुळे युरोपियन युनियनमध्ये आता २८ देश  आहेत .  या संघाने युरोपमधील विविध सदस्य देशांत एकत्रित बाजारप्रणाली विकसित केली आहे . युरोपमध्ये वस्तू , सेवा व भांडवल यांचा मुक्त संचार होणे , हे उद्दिष्ट आहे .समुदायातील सर्व देशांनी वस्तूंची देवाणघेवाण करताना सर्व वस्तूवरील जकात रद्द केली आहे .सभासद देशांकरिता युरो चलन निश्चित केले .

संस्कृती

European Union map

सदस्य राष्ट्रे

चिन्ह ध्वज देश
सामील
लोकसंख्या
किमी²
दरडोई उत्पन्न चलन
जिनी
माविनि
परिषदेमधील
मते
संसदेमधील
जागा
भाषा भूभाग
Coat of arms of the archduchy of Austria.svg ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 1995-01-01 ८४,४३,०००[३] ८३,८५५ ४२,४०९[४] युरो २९.१[५] ०.८९५[६] 10 19 जर्मन
Royal Arms of Belgium.svg बेल्जियम बेल्जियम स्थापक १,१०,४१,३००[३] ३०,५२८ ३७,८८३[४] युरो ३३.०[५] ०.८९७[६] 12 22 डच
फ्रेंच
जर्मन
Coat of arms of Bulgaria (version by constitution).svg बल्गेरिया बल्गेरिया 2007-01-01 ७३,२७,२००[३] १,१०,९९४ १४,३१२[४] लेव्ह २९.२[५] ०.७८२[६] 10 18 बल्गेरियन
Croatian Chequy.svg क्रोएशिया क्रोएशिया 2013-07-01 ४३,९८,०००[३] ५६,५९४ १७,८१०[४] कुना २९[५] ०.८०५[६] 7 12 क्रोएशियन
Lesser coat of arms of Cyprus.svg सायप्रस सायप्रस 2004-05-01 ८,६२,०००[३] ९,२५१ २७,०८६[४] युरो ३१.२[५] ०.८४८[६] 4 6 ग्रीक
तुर्की
Coat of arms of the Czech Republic.svg चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक 2004-05-01 १,०५,०५,४००[३] ७८,८६६ २७,१९१[४] कोरुना २५.८[५] ०.८७३[६] 12 22 चेक
National Coat of arms of Denmark no crown.svg डेन्मार्क डेन्मार्क 1973-01-01 ५५,८०,५००[३] ४३,०७५ ३७,६५७[४] क्रोन २४.७[५] ०.९०१[६] 7 13 डॅनिश
Small coat of arms of Estonia.svg एस्टोनिया एस्टोनिया 2004-05-01 १३,३९,७००[३] ४५,२२७ २१,७१३[४] युरो ३६.०[५] ०.८४६[६] 4 6 एस्टोनियन
Coat of arms of Finland.svg फिनलंड फिनलंड 1995-01-01 ५४,०१,३००[३] ३,३८,४२४ ३६,३९५[४] युरो २६.९[५] ०.८९२[६] 7 13 फिनिश
स्वीडिश
Arms of France (UN variant).svg फ्रान्स फ्रान्स स्थापक ६,५३,९७,९००[३] ६,७४,८४३ ३५,५४८[४] युरो ३२.७[५] ०.८९३[६] 29 74 फ्रेंच
Coat of arms of Germany.svg जर्मनी जर्मनी स्थापक[d] ८,१८,४३,७००[३] ३,५७,०२१ ३९,०२८[४] युरो २८.३[५] ०.९२०[६] 29 99 जर्मन
Lesser coat of arms of Greece.svg ग्रीस ग्रीस 1981-01-01 १,१२,९०,९००[३] १,३१,९९० २४,५०५[४] युरो ३४.३[५] ०.८६०[६] 12 22 ग्रीक
Arms of Hungary.svg हंगेरी हंगेरी 2004-05-01 ९९,५७,७००[३] ९३,०३० १९,६३८[४] फोरिंट ३०.०[५] ०.८३१[६] 12 22 हंगेरियन
Coat of arms of Ireland.svg आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड 1973-01-01 ४५,८२,८००[३] ७०,२७३ ४१,९२१[४] युरो ३४.३[५] ०.९१६[६] 7 12 आयरिश
इंग्लिश
CoA Marina Mercantile.svg इटली इटली स्थापक ६,०८,२०,८००[३] ३,०१,३३८ ३०,१३६[४] युरो ३६.०[५] ०.८८१[६] 29 73 इटालियन
Lesser coat of arms of Latvia (escutcheon).svg लात्व्हिया लात्व्हिया 2004-05-01 २०,४१,८००[३] ६४,५८९ १८,२५५[४] लाट्स ३५.७[५] ०.८१४[६] 4 9 लात्व्हियन
Coat of arms of Lithuania.svg लिथुएनिया लिथुएनिया 2004-05-01 ३०,०७,८००[३] ६५,२०० २१,६१५[४] लिताज ३५.८[५] ०.८१८[६] 7 12 लिथुएनियन
Arms of the Counts of Luxembourg.svg लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग स्थापक ५,२४,९००[३] २,५८६.४ ७९,७८५[४] युरो ३०.८[५] ०.८७५[६] 4 6 फ्रेंच
जर्मन
लक्झेंबर्गिश
Arms of Malta.svg माल्टा माल्टा 2004-05-01 ४,१६,१००[३] ३१६ २७,०२२[४] युरो २५.८[५] ०.८४७[६] 3 6 माल्टी
इंग्लिश
Arms of the Kingdom of the Netherlands.svg नेदरलँड्स नेदरलँड्स स्थापक १,६७,३०,३००[३] ४१,५४३ ४२,१९४[४] युरो ३०.९[५] ०.९२१[६] 13 26 डच
Herb Polski.svg पोलंड पोलंड 2004-05-01 ३,८५,३८,४००[३] ३,१२,६८५ २०,५९२[४] झुवॉटी ३४.९[५] ०.८२१[६] 27 51 पोलिश
Portuguese shield.svg पोर्तुगाल पोर्तुगाल 1986-01-01 १,०५,४१,८००[३] ९२,३९० २३,३८५[४] युरो ३८.५[५] ०.८१६[६] 12 22 पोर्तुगीज
Coat of arms of Romania.svg रोमेनिया रोमेनिया 2007-01-01 २,०१,२१,६४१[३] २,३८,३९१ १२,८०८[४] लेउ ३१.५[५] ०.७८६[६] 14 33 रोमेनियन
Coat of arms of Slovakia.svg स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया 2004-05-01 ५४,०४,३००[३] ४९,०३५ २४,२४९[४] युरो २५.८[५] ०.८४०[६] 7 13 स्लोव्हाक
Coat of arms of Slovenia.svg स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया 2004-05-01 २०,५५,५००[३] २०,२७३ २८,१९५[४] युरो ३१.२[५] ०.८९२[६] 4 8 स्लोव्हेन
Arms of Spain.svg स्पेन स्पेन 1986-01-01 ४,६१,९६,३००[३] ५,०४,०३० ३०,५५७[४] युरो ३२.०[५] ०.८८५[६] 27 54 स्पॅनिश[e]
Blason Oscar II de Suède.svg स्वीडन स्वीडन 1995-01-01 ९४,८२,९००[३] ४,४९,९६४ ४१,१९१[४] क्रोना २५.०[५] ०.९१६[६] 10 20 स्वीडिश
Arms of the United Kingdom.svg युनायटेड किंग्डम युनायटेड
किंग्डम
1973-01-01 ६,२९,८९,६००[३] २,४३,६१० ३६,९४१[४] पाउंड स्टर्लिंग ३६.०[५] ०.८७५[६] 29 73 इंग्लिश
एकूण / सरासरी ५०,८०,७७,९००[३] ३३,८००[७] युरो ३०.७[८] ०.८४५[९] 352 766 24 (official)
टिपा
 1. ^ युरोपियन संघाने उत्तर सायप्रसचे सार्वभौमत्व अमान्य केले आहे.
 2. ^ संयुक्त राष्ट्रांद्वारे शासन .
 3. a b See Article 355(1) of the Treaty on the Functioning of the European Union.[१]
 4. ^ जर्मनीच्या पुन:एकत्रीकरणानंतर ३ ऑक्टोबर १९९० रोजी भूतपूर्व पूर्व जर्मनी देशाची राज्ये पश्चिम जर्मनीमध्ये समाविष्ट केली गेली.
 5. ^ स्थानिक मान्यताप्राप्त भाषा: बास्क, कातालानगालिसियन.

अधिकृत भाषा

खालील २३ भाषा युरोपियन संघाच्या अधिकृत भाषा आहेत.

भाषा अधिकृत वापरकर्ते वापरास सुरुवात
बल्गेरियन बल्गेरिया ध्वज बल्गेरिया 2007
चेक Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया1
2004
डॅनिश डेन्मार्क ध्वज डेन्मार्क
जर्मनी ध्वज जर्मनी2
1973
डच Flag of the Netherlands नेदरलँड्स
बेल्जियम ध्वज बेल्जियम
1958
इंग्लिश आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
माल्टा ध्वज माल्टा
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
1973
एस्टोनियन एस्टोनिया ध्वज एस्टोनिया 2004
फिनिश फिनलंड ध्वज फिनलंड 1995
फ्रेंच बेल्जियम ध्वज बेल्जियम
फ्रान्स ध्वज फ्रान्स
इटली ध्वज इटली3
लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग
1958
जर्मन ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
बेल्जियम ध्वज बेल्जियम
डेन्मार्क ध्वज डेन्मार्क4
जर्मनी ध्वज जर्मनी
इटली ध्वज इटली5
लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग
1958
ग्रीक सायप्रस ध्वज सायप्रस
ग्रीस ध्वज ग्रीस
इटली ध्वज इटली6
1981
हंगेरियन हंगेरी ध्वज हंगेरी
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया7
रोमेनिया ध्वज रोमेनिया8
स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया1
स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया9
2004
आयरिश आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम10
2007
इटालियन इटली ध्वज इटली
स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया11
1958
लात्व्हियन लात्व्हिया ध्वज लात्व्हिया 2004
लिथुएनियन लिथुएनिया ध्वज लिथुएनिया 2004
माल्टी माल्टा ध्वज माल्टा 2004
पोलिश पोलंड ध्वज पोलंड 2004
पोर्तुगीज पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल 1986
रोमेनियन रोमेनिया ध्वज रोमेनिया 2007
स्लोव्हाक स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
2004
स्लोव्हेन स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया12
इटली ध्वज इटली13
2004
स्पॅनिश स्पेन ध्वज स्पेन 1986
स्वीडिश स्वीडन ध्वज स्वीडन
फिनलंड ध्वज फिनलंड14
1995

संदर्भ

 1. a b "ब्रिटनकरांचा ‘ब्रेक्झिट’च्या बाजूने कौल". लोकसत्ता. २४ जून २०१६.
 2. ^ "इंग्लंड युरोपियन युनियनमधून बाहेर पडणार!". महाराष्ट्र टाइम्स. २४ जून २०१६.
 3. a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z aa ab ac Council Decision of 14 January 2013 (2013/37/EU) as amended by Council Decision of 1 July 2013 (2013/345/EU) amending the Council's Rules of Procedure.
 4. a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z aa ab Report for Selected Countries and Subjects IMF
 5. a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z aa ab UNDP.org
 6. a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z aa ab "Inequality-adjusted Human Development Index [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]]". HDRO (Human Development Report Office) संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम. 20 July 2013 रोजी पाहिले. Wikilink embedded in URL title (सहाय्य)
 7. ^ "Eurostat – Tables, Graphs and Maps Interface (TGM) table". Epp.eurostat.ec.europa.eu. 26 April 2011 रोजी पाहिले.
 8. ^ Eurostat - Tables, Graphs and Maps Interface (TGM) table. Epp.eurostat.ec.europa.eu (2013-06-14). Retrieved on 2013-07-29.
 9. ^ Mihaiu, Diana Marieta; Opreana, Alin (April 2011). "Correlation Analysis Between the Health System and Human Development Level Within the European Union". International Journal of Trade, Economics and Finance 2 (2). डी.ओ.आय.:10.7763/IJTEF.2011.V2.85.

बाह्य दुवे

अबखाझिया

अबखाझिया हा काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील व कॉकेशस भौगोलिक प्रदेशामधील एक वादग्रस्त भूभाग आहे. १९९९ साली जॉर्जिया देशापासून फुटून स्वातंत्र्याची घोषणा करणाऱ्या अबखाझियाला एक स्वतंत्र देश म्हणून सध्या केवळ रशिया, निकाराग्वा, व्हेनेझुएला, नौरू, तुवालू ह्या देशांनी तसेच दक्षिण ओसेशिया ह्या अंशत: मान्य देशाने मान्यता दिली आहे. जॉर्जियाचा ह्या स्वातंत्र्याला पूर्ण विरोध असून अबखाझिया आपल्याच देशाचा एक स्वायत्त भाग आहे अशी भुमिका त्याने घेतली आहे. युरोपियन संघ, नाटो व इतर बरेच देश मात्र स्वतंत्र अबखाझिया देशाला मान्यता देण्याच्या विरोधात आहेत.

इटालियन भाषा

इटालियन ही रोमान्स भाषासमूहामधील एक प्रमुख युरोपियन भाषा आहे. इटालियन ही इटली, स्वित्झर्लंड, सान मारिनो व व्हॅटिकन सिटी ह्या देशांची राष्ट्रीय भाषा असून युरोपियन संघाच्या २३ अधिकृत भाषांपैकी एक आहे. इटालियन भाषा लॅटिनपासून निर्माण झाली असून सध्या जगातील सुमारे ८.५ कोटी लोक इटालियन भाषा समजू शकतात.

उत्तर सायप्रस

उत्तर सायप्रस (तुर्की: Kuzey Kıbrıs Türk Cumhuriyeti उत्तर सायप्रसचे तुर्की प्रजासत्ताक) हा सायप्रस देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. उत्तर सायप्रसला तुर्कस्तान व्यतिरिक्त इतर कोणत्याही राष्ट्राने मान्यता दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय समुदाय, युरोपियन संघ उत्तर सायप्रसला सायप्रस देशाचा एक सार्वभौम भाग मानतात.

उत्तर सायप्रस आर्थिक, राजकीय व लष्करी मदतीसाठी पुर्णपणे तुर्कस्तानवर अवलंबुन आहे.

ग्वादेलोप

ग्वादेलोप (फ्रेंच: Guadeloupe) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रदेश व विभाग आहे. ग्वादेलोप बेट कॅरिबियन समुद्रामधील लेसर अँटिल्स द्वीपसमूहाचा भाग असून तो फ्रान्सच्या ५ परकीय (मुख्य भूमीपासून वेगळा) प्रदेशांपैकी एक आहे. ग्वादेलोप फ्रान्सचा अविभाज्य घटक मानला जात असल्यामुळे तो युरोपियन संघ व युरोक्षेत्र ह्या दोन्ही संस्थांचा भाग आहे. बासे-तेर ही ग्वादेलोपची राजधानी तर प्वेंत-ए-पित्र हे येथील सर्वात मोठे शहर आहे. २०१३ साली ग्वादेलोपची लोकसंख्या ४ लाख होती. फ्रेंच ही येथील राजकीय भाषा आहे.

ग्वादेलोपचा शोध क्रिस्टोफर कोलंबसने इ.स. १४९३ मध्ये लावला. कोलंबसला येथे अननस हे फळ सापडले. १७व्या शतकात सेंट किट्स येथे यशस्वीरित्या वसाहत स्थापन केल्यानंतर फ्रेंच साम्राज्याने १६३५ साली ग्वादेलोप बेटावर तळ उघडला. येथील स्थानिक आदिवासी जमातीच्या लोकांना हळूहळू ठार करत फ्रेंचानी संपूर्ण बेटावर नियंत्रण मिळवले. १६८५ साली ग्वादेलोपला फ्रान्समध्ये सामावून घेण्यात आले. १८व्या शतकामध्ये ग्वादेलोपच्या नियंत्रणावरून फ्रेंच व ब्रिटिशांमध्ये अनेक लढाया झाल्या व ग्वादेलोपचा ताबा बदलत राहिला. येथील साखर उत्पादनामधून मिळणारे उत्पन्न कॅरिबियनमध्ये सर्वाधिक होते. २८ मे १८४८ रोजी ग्वादेलोपमध्ये गुलामगिरीवर बंदी घातली गेली.

सध्या ग्वादेलोपमधील बव्हंशी रहिवासी आफ्रिकन अथवा मिश्र वंशाचे असून येथील अर्थव्यवस्था पर्यटन व शेतीवर अवलंबून आहे. सेंट-जॉन पर्स ह्या नोबेल विजेत्या कवीने आपल्या कवितांमधून ग्वादेलोपच्या संस्कृतीवर प्रकाश टाकला आहे. प्रसिद्ध फ्रेंच फुटबॉलपटू थिएरी ऑन्री ह्यावे वडील ग्वादेलोप वंशाचे आहेत तर फुटबॉलपटू लिलियन थुरामचा जन्म येथे झाला होता.

चेक भाषा

चेक ही चेक प्रजासत्ताक ह्या देशाची राष्ट्रभाषा व युरोपियन संघाच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे. ही स्लाव्हिक भाषासमूहामधील एक प्रमुख भाषा असून ती स्लोव्हाकसोबत मिळतीजुळती आहे.

दक्षिण ओसेशिया

दक्षिण ओसेशिया हा जॉर्जिया देशातील रशियाच्या सीमेजवळील एक वादग्रस्त भाग आहे. १९९१ साली दक्षिण ओसेशियाने स्वातंत्र्याची घोषणा केली. जॉर्जियाने ह्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व दक्षिण ओसेशिया स्वतंत्र देश नसुन आपल्याच देशाचा एक भाग आहे अशी भुमिका घेतली आहे. २००८ सालच्या रशिया-जॉर्जिया युद्धानंतर रशिया व निकाराग्वा ह्या देशांनी दक्षिण ओसेशिया देशाला मान्यता दिली आहे, तसेच इतर काही देश भविष्यात हे धोरण स्वीकारण्यास तयार आहेत. युरोपियन संघ, नाटो व इतर बरेच देश मात्र स्वतंत्र दक्षिण ओसेशिया देशाला मान्यता देण्याच्या विरोधात आहेत.

नोबेल शांतता पारितोषिक

नोबेल शांतता पुरस्कार हा दरवर्षी बहाल केल्या जाणाऱ्या ५ नोबेल पुरस्कारांपैकी एक आहे. नोबेल शांतता पुरस्काराचे वितरण दरवर्षी १० डिसेंबर रोजी ओस्लो शहरात केले जाते.

फ्रेंच गयाना

फ्रेंच गयाना (फ्रेंच: Guyane) हा दक्षिण अमेरिका खंडातील फ्रान्स देशाचा एक प्रदेश व विभाग आहे. गयानाच्या पूर्वेला व दक्षिणेला ब्राझिल, पश्चिमेला सुरिनाम तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहेत. कायेन ही फ्रेंच गयानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इ.स. १७६३ साली फ्रेंच शोधक पोचण्याआधी येथे स्थानिक लोकांचे वास्तव्य होते. १८०९ साली पोर्तुगीज साम्राज्याने ह्या भागावर ताबा मिळवला परंतु १८१४ मधील पॅरिस येथे झालेल्या तहानंतर हा भूभाग पुन्हा फ्रेंचांच्या स्वाधीन करण्यात आला.

फ्रान्सचा सार्वभौम प्रदेश असल्यामुळे फ्रेंच गयाना युरोपियन संघ व युरोक्षेत्राचा भाग आहे व येथील चलन युरो हेच आहे. सध्या गयाना अंतराळ केंद्र हे फ्रान्स व युरोपाचे प्रमुख केंद्र हा फ्रेंच गयानाच्या मिळकतीचा मोठा स्रोत आहे.

मार्टिनिक

मार्टिनिक (फ्रेंच: Martinique) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रदेश व विभाग आहे. मार्टिनिक बेट कॅरिबियन समुद्रामधील लेसर अँटिल्स द्वीपसमूहाचा भाग असून तो फ्रान्सच्या मुख्य भूमीपासून वेगळ्या ५ प्रदेशांपैकी एक आहे. मार्टिनिक फ्रान्सचा अविभाज्य घटक मानला जात असल्यामुळे तो युरोपियन संघ व युरोक्षेत्र ह्या दोन्ही संस्थांचा भाग आहे. फोर्ट-दे-फ्रान्स ही मार्टिनिकची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१३ साली मार्टिनिकची लोकसंख्या ३.८६ लाख होती. फ्रेंच ही येथील राजकीय भाषा व युरो हे अधिकृत चलन आहे.

मार्टिनिकचा शोध ख्रिस्तोफर कोलंबसने इ.स. १४९३ मध्ये लावला व १५ जून १५०२ रोजी तो येथे दाखल झाला. १७व्या शतकात सेंट किट्स येथे यशस्वीरीत्या वसाहत स्थापन केल्यानंतर फ्रेंच साम्राज्याने १६३५ साली मार्टिनिक बेटावर तळ उघडला. येथील स्थानिक आदिवासी जमातीच्या लोकांना हळूहळू ठार करत फ्रेंचानी संपूर्ण बेटावर नियंत्रण मिळवले. २८ मे १८४८ रोजी मार्टिनिकमध्ये गुलामगिरीवर बंदी घातली गेली. इ.स. १९०२ मध्ये येथील माउंट पेली ह्या जागृत ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि मार्टिनिकमधील बहुतेक सर्व वस्ती नष्ट झाली. सुमारे ३०,००० लोक मृत्यूमुखी पडले. १९७४ मध्ये मार्टिनिकला फ्रान्सचा एक विभाग बनवण्यात आले.

माली

मालीचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République du Mali हा आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील एक देश आहे. मालीच्या उत्तरेला अल्जीरिया, पूर्वेला सुदान, दक्षिणेला बर्किना फासो व कोत द'ईवोआर, आग्नेयेला गिनी तर पश्चिमेला सेनेगाल व मॉरिटानिया हे देश आहेत. १२,४०,१९२ चौरस किमी क्षेत्रफळ असणाऱ्या मालीची लोकसंख्या सुमारे १.४५ कोटी आहे. बामाको ही मालीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मालीमधील बहुतांशी लोकवस्ती दक्षिण भागात नायजर व सेनेगाल नद्यांच्या काठावर वसलेली आहे. मालीचा उत्तर भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे

१९व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी मालीवर सत्ता प्रस्थापित केली व फ्रेंच सुदान ह्या वसाहतीमध्ये मालीचा समावेश केला. १९६० साली मालीला स्वातंत्र्य मिळाले.

शेती हा मालीमधील सर्वात मोठा उद्योग असून कापसाची निर्यात हा मालीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जगातील सर्वात गरीब व कर्जबाजारी देशांपैकी एक असणाऱ्या मालीमधील ६४ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली राहते. युरोपियन संघ, जागतिक बँक इत्यादींकडून मालीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनुदान मिळते.

फ्रेंच ही मालीची राष्ट्रभाषा असून येथे ४० पेक्षा अधिक स्थानिक भाषा वापरल्या जातात. मालीमधील ९० टक्के जनता मुस्लिम धर्मीय आहे

युरोक्षेत्र

युरोक्षेत्र (इंग्लिश: Eurozone) ही युरोपामधील युरो हे चलन वापरणार्‍या १८ युरोपियन संघ सदस्य देशांची आर्थिक व वित्तिय संघटना आहे. युरोक्षेत्राची स्थापना १९९९ साली १० सदस्यांसह करण्यात आली तर ७ देशांनी त्यानंतर युरोक्षेत्रामध्ये प्रवेश केला. युरोपियन संघातील युरोक्षेत्राच्या बाहेर असलेल्या १० सदस्यांपैकी ७ सदस्यांना युरोक्षेत्रामध्ये सामील होणे बंधनकारक आहे. लात्व्हिया देश १ जानेवारी २०१४ पासून युरोक्षेत्राचा सदस्य बनला.

युरोक्षेत्राच्या आर्थिक धोरणासाठी युरोपियन मध्यवर्ती बँक जबाबदार आहे.

युरोप

युरोप हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. युरेशिया ह्या महाखंडाच्या पश्चिम प्रायद्वीपावर वसलेल्या युरोपाच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिमेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला भूमध्य समुद्र व पूर्वेला काळा समुद्र आहेत. उरल पर्वतरांगा, कास्पियन समुद्र व कॉकासस प्रदेश हे साधारणपणे युरोप व आशियाच्या भौगोलिक विभाजनासाठी वापरले जातात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोप हा जगातील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा खंड आहे. रशिया हा युरोपातील सर्वात मोठा देश तर व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश आहे.

युरोपियन परिषद

युरोपियन परिषद हे युरोपियन संघाचे एक अंग आहे. युरोपियन संघाच्या सर्व सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख ह्या परिषदेचे सदस्य आहेत. युरोपाची एकत्रित राजकीय धोरणे व दिशा ह्यांवर चर्चा करण्यासाठी ह्या परिषदेचा वापर केला जातो.

युरोपियन मध्यवर्ती बँक

युरोपियन मध्यवर्ती बँक ही युरोपियन संघामधील युरोक्षेत्राची प्रमुख बँक आहे. १७ युरोझोन देशांच्या अर्थव्यवस्थेवर नजर ठेवणारी युरोपियन मध्यवर्ती बँक ही जगातील सर्वात महत्त्वाच्या व बलाढ्य मध्यवर्ती बँकांपैकी एक आहे.

युरोपियन सांस्कृतिक राजधानी

युरोपियन सांस्कृतिक राजधानी हे युरोपियन संघाने दरवर्षी नियुक्त केलेले युरोपामधील एक शहर आहे. एका वर्षासाठी नियुक्त झालेल्या ह्या शहरामध्ये त्या वर्षी युरोपियन संस्कृतीचे प्रदर्शन करणारे सोहळे व समारंभांचे आयोजन केले जाते.

युरोपियन सांस्कृतिक राजधानी नियुक्त करण्याचा प्रस्ताव १९८५ साली मांडण्यात आला व तेव्हापासून दरवर्षी युरोपामधील एक वा अनेक शहरांना सांस्कृतिक राजधानीचा खिताब दिला जातो.

लक्झेंबर्ग

लक्झेंबर्गची शाही राजसत्ता (लक्झेंबर्गिश: Groussherzogtum Lëtzebuerg, फ्रेंच: Grand-Duché de Luxembourg, जर्मन: Großherzogtum Luxemburg) हा पश्चिम युरोपामधील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लक्झेंबर्गच्या पश्चिम व उत्तरेला बेल्जियम, दक्षिणेला फ्रान्स व पूर्वेला जर्मनी हे देश आहेत. २,५८६ चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या लक्झेंबर्गची लोकसंख्या २०११ साली ५,१२,३५३ इतकी होती. लक्झेंबर्ग ह्याचा नावाचे शहर ही ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इ.स. १८१५ सालापासून स्वतंत्र असलेल्या लक्झेंबर्गमध्ये संविधानिक एकाधिकारशाही स्वरूपाची राजवट असून सध्या राजसत्ता (डची) असलेला हा जगातील एकमेव देश आहे. लक्झेंबर्ग हा जगातील सर्वात प्रगत देशांपैकी एक असून येथील दरडोई उत्पन्न जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. लक्झेंबर्ग संयुक्त राष्ट्रे, युरोपियन संघ, नाटो, आर्थिक सहयोग व विकास संघटना, बेनेलक्स इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सभासद असून युरो हे येथील अधिकृत चलन आहे.

लात्व्हिया

लात्व्हियाचे प्रजासत्ताक (लात्व्हियन: Latvijas Republika) हा उत्तर युरोपातील व बाल्टिक देशांपैकी एक देश आहे. लात्व्हियाच्या उत्तरेला एस्टोनिया, पूर्वेला रशिया, आग्नेयेला बेलारूस, दक्षिणेला लिथुएनिया हे देश तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत. रिगा ही लात्व्हियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. लात्व्हिया ला युरोपियन संघामधील सर्वात कमी लोकसंख्येच्या व सर्वात तुरळक लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक आहे. भूगोल, लोकजीवन, संस्कृती इत्यादींबाबतीत लात्व्हिया एस्टोनिया व लिथुएनिया ह्या इतर बाल्टिक देशांसोबत मिळताजुळता आहे.

ऐतिहासिक काळापासून अनेक साम्राज्यांचा भूभाग राहिलेल्या लात्व्हियाने पहिल्या महायुद्धानंतर १९१८ साली रशियन साम्राज्यापासून स्वातंत्र्याची घोषणा केली. परंतु केवळ २२ वर्षे स्वतंत्र राहिल्यानंतर १९४० साली सोव्हियेत संघाने लष्करी आक्रमण करून हा भूभाग बळकावला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीची लात्व्हियावर सत्ता होती. महायुद्ध संपल्यानंतर सोव्हियेत संघाने पुन्हा येथे आपले अधिपत्य प्रस्थापित केले व लात्व्हियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्याची स्थापना केली. १९९१ सालच्या सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर लात्व्हिया पुन्हा एकदा स्वतंत्र झाला.

स्वतंत्र झाल्यानंतर लात्व्हियाने बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अंगीकार केला आहे. सध्या लात्व्हिया एक प्रगत देश असून येथील मानवी विकास निर्देशांक जगात ४३व्या क्रमांकावर आहे. २००८-२०१० दरम्यानच्या जागतिक मंदीदरम्यान प्रचंड अधोगती झाल्यानंतर २०११ साली लात्व्हियाची अर्थव्यवस्था युरोपियन संघामध्ये सर्वात वेगाने वाढली. सध्या लात्व्हिया संयुक्त राष्ट्रे, नाटो, युरोपियन संघ, युरोपाची परिषद, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, डब्ल्यू.टी.ओ. इत्यादी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

हंगेरियन भाषा

हंगेरियन ही हंगेरी देशाची राष्ट्रभाषा व युरोपियन संघाच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे.

हंगेरी

हंगेरी (स्थानिक मॉज्यॉरोर्शाग) हा मध्य युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. हंगेरीच्या उत्तरेला स्लोव्हाकिया, पूर्वेला युक्रेन व रोमेनिया, दक्षिणेला सर्बिया व क्रोएशिया, नैऋत्येला स्लोव्हेनिया तर पश्चिमेला ऑस्ट्रिया हे देश स्थित आहेत. बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

अंदाजे इ.स. च्या नवव्या शतकादरम्यान स्थापन केला गेलेल्या हंगेरीचे रूपांतर इ.स. १००० साली पहिल्या स्टीफनने राजतंत्रामध्ये केले. इ.स. १५४१ ते १६९९ दरम्यान हंगेरी ओस्मानी साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. १८६७ ते १९१८ सालांदरम्यान ऑस्ट्रिया-हंगेरी हे एक बालाढ्य राष्ट्र अस्तित्वात होते. पहिल्या महायुद्धामध्ये पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रिया-हंगेरीचे विघटन झाले व आजचा हंगेरी देश निर्माण झाला. पहिल्या महायुद्धामध्ये अक्ष राष्ट्रांच्या बाजूने लढणाऱ्या हंगेरीने महायुद्ध संपल्यानंतर कम्युनिस्ट राजवटीचा स्वीकार केला. १९८९ साली हंगेरीमध्ये साम्यवादाचा अस्त झाला व संसदीय प्रजासत्ताक पद्धती चालू झाली.

सध्या प्रगत देशांपैकी एक असलेला हंगेरी संयुक्त राष्ट्रे, युरोपियन संघ, नाटो, आर्थिक सहयोग व विकास संघटना इत्यादी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

आंतरराष्ट्रीय संस्था

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.