युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक

युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक (इंग्लिश: Federal Republic of Yugoslavia) हा १९९२ ते २००३ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे.

१९९२ साली अनेक युद्धांनंतर युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक ह्या देशाचे विघटन झाले व त्यातुन युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक देशाची निर्मिती झाली. ह्या देशात मुख्यतः सर्बिया व माँटेनिग्रो ही दोन गणराज्ये होती. २००३ साली ह्या देशाचे नाव बदलुन सर्बिया आणि माँटेनिग्रो हे ठेवण्यात आले.

Breakup of Yugoslavia
युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
  युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक; सर्बिया आणि माँटेनिग्रो; सर्बिया
                     बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये
FRYugoMap2k
युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक
ऑलिंपिक खेळ हँडबॉल

सांघिक हँडबॉल हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९७२ सालापासून खेळला जात आहे. त्यापूर्वी १९३६ बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेत देखील हा खेळ समाविष्ट केला गेला होता. महिलांचा हँडबॉल १९७६पासून खेळला जाऊ लागला.

क्रोएशिया

क्रोएशिया हा युरोपातील बाल्कन विभागामधील एक देश आहे. झाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी व प्रमुख शहर आहे.

बेलग्रेड

बेलग्रेड (सर्बियन: Београд; बेओग्राद) ही पूर्व युरोपातील सर्बिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बेलग्रेड शहर सर्बियाच्या उत्तर-मध्य भागात सावा व डॅन्यूब नद्यांच्या संगमावर वसले आहे. २०१३ साली बेलग्रेड शहराची लोकसंख्या सुमारे १२.३३ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १६.६ लाख होती. बेलग्रेड शहर १७ महानगरपालिकांमध्ये विभागले गेले असून सर्बियामधील २२.५ टक्के लोकवस्ती येथेच एकवटली आहे.

बेलग्रेड हे १९१८ सालापासून युगोस्लाव्हिया देशाच्या राजधानीचे शहर राहिले आहे. सध्या बेलग्रेड एक जागतिक शहर असून ते सर्बियाचे व बाल्कन प्रदेशाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

बॉस्निया आणि हर्झगोव्हिना

बॉस्निया आणि हर्झगोव्हिना हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

मॅसिडोनिया

मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक (मॅसिडोनियन: Република Македонија) हा दक्षिण युरोपाच्या बाल्कन भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग राहिलेल्या मॅसिडोनियाला १९९१ साली स्वातंत्र्य मिळाले. मॅसिडोनियाच्या उत्तरेला सर्बिया देश व कोसोव्हो प्रांत, पूर्वेला बल्गेरिया, दक्षिणेला ग्रीस तर पश्चिमेला आल्बेनिया हे देश आहेत. स्कोप्ये ही मॅसिडोनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

मॅसिडोनिया ह्या नावावरुन ग्रीस व मॅसिडोनिया देशांमध्ये वाद सुरु आहे. ग्रीस देशाच्या उत्तरेकडील प्रदेशाचे नाव मॅसिडोनिया हेच आहे. ह्यामुळे मॅसिडोनियाला संयुक्त राष्ट्रांमध्ये मॅसिडोनियाचे भूतपूर्व युगोस्लाव्ह प्रजासत्ताक ह्या नावाने दाखल करण्यात आले होते. सध्या संयुक्त राष्ट्रे व युरोपाची परिषद ह्या संस्थांचा सदस्य असलेल्या मॅसिडोनियाने नाटो व युरोपियन संघाच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे.

मोंटेनेग्रो

माँटेनिग्रो हा बाल्कन प्रदेशातील एक देश आहे. माँटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला सर्बिया, पूर्वेला कोसोव्हो, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत. पॉडगोरिका ही माँटेनिग्रोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

युगोस्लाव्हिया

युगोस्लाव्हिया हे नाव विसाव्या व एकविसाव्या शतकात अस्तित्वात असलेल्या तीन वेगवेगळ्या सत्तांचा उल्लेख करण्यासाठी वापरले जाते.

युगोस्लाव्हियाचे राजतंत्र: १९१८ - १९४१

युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक: १९४५ - १९९२

युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक: १९९२ - २००३

सर्बिया आणि माँटेनिग्रो: २००३ - २००६

सर्बिया: २००६ - आजवर

माँटेनिग्रो: २००६ - आजवर

युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक

युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा १९४३ ते १९९२ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे. युगोस्लाव्हिया हा शब्द मुख्यतः ह्याच देशाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो.

युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा देश मध्य व दक्षिण युरोपात २,५५,८०४ वर्ग किमी इतक्या क्षेत्रफळावर वसला होता व जुलै १९८९ मध्ये त्याची लोकसंख्या २,३७,२४,९१९ एवढी होती. बेलग्रेड ही युगोस्लाव्हियाची राजधानी होती. युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा एक कम्युनिस्ट देश होता.

सर्बिया

सर्बिया हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. बेलग्रेड ही सर्बियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

सर्बिया आणि माँटेनिग्रो

सर्बिया आणि माँटेनिग्रो हा २००३ ते २००६ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे.

१९९२ ते २००३ दरम्यान हा देश युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखला जात असे. जून २००६ मध्ये सर्बिया आणि माँटेनिग्रो देशाचे शांततापुर्वक विघटन झाले व त्यातुन सर्बिया व माँटेनिग्रो ह्या दोन स्वतंत्र देशांची निर्मिती झाली.

सर्बिया आणि माँटेनिग्रो फुटबॉल संघ

सर्बिया आणि माँटेनिग्रो फुटबॉल संघ हा सर्बिया आणि माँटेनिग्रो ह्या देशाचा पुरुष फुटबॉल संघ होता. १९९२ सालापर्यंत हा संघ युगोस्लाव्हिया ह्या नावाने आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळत असे. युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर ह्या दोन देशांना युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखले जात असे. २००३ साली त्याचे नाव बदलून सर्बिया आणि माँटेनिग्रो असे ठेवण्यात आले. २००६ साली माँटेनिग्रो देश सर्बियापासून वेगळा झाल्यानंतर ह्या फुटबॉल संघाचे नाव सर्बिया फुटबॉल संघ असे ठेवण्यात आले व माँटेनिग्रो संघ नव्याने निर्माण केला गेला.

साव्हो मिलोसेविच

साव्हो मिलोसेविच (सर्बियन सिरिलिक: Саво Милошевић; जन्म:२ सप्टेंबर १९७३) हा सर्बियाचा निवृत्त फुटबॉल खेळाडू आहे. बॉस्नियामध्ये जन्मलेला मिलोसेविच अनेक युरोपियन क्लबांमधून फुटबॉल खेळला. तो युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक व सर्बिया आणि माँटेनिग्रो ह्या देशांच्या राष्ट्रीय संघांसाठी सर्वाधिक सामने खेळलेला फुटबॉलपटू आहे. २००१ ते २००६ दरम्यान तो सर्बिया आणि माँटेनिग्रो संघाचा कर्णधार होता.

स्लोव्हेनिया

स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक (स्लोव्हेन: Republika Slovenija) हा मध्य युरोपामधील एक देश आहे. स्लोव्हेनियाच्या पश्चिमेला इटली, उत्तरेला ऑस्ट्रिया, ईशान्येला हंगेरी तर पूर्व व दक्षिणेला क्रोएशिया हे देश आहेत. नैऋत्येला स्लोव्हेनियाला भूमध्य समुद्राचा लहानसा समुद्रकिनारा लाभला आहे. लियुब्लियाना ही स्लोव्हेनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

ऐतिहासिक काळात रोमन व पवित्र रोमन साम्राज्यांचा भाग असलेल्या स्लोव्हेनियाने १९१८ साली पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रिया-हंगेरी पराभूत झाल्यानंतर सर्बिया व क्रोएशियासह नव्या राष्ट्राची निर्मिती केली जे लगेचच युगोस्लाव्हियाचे राजतंत्र बनले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अक्ष राष्ट्रांनी स्लोव्हेनिया भागावर आक्रमण केले होते. ह्याच काळात युगोस्लाव्हिया देशाची स्थापना झाली व पुढील सुमारे ५० वर्षे स्लोव्हेनिया हे युगोस्लव्हियामधील एक गणराज्य होते. १९९१ सालच्या युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर स्लोव्हेनिया स्वतंत्र देश बनला.

सध्या स्लोव्हेनिया युरोपील एक प्रगत व समृद्ध देश आहे. २००४ साली स्लोव्हेनियाला नाटो व युरोपियन संघात प्रवेश देण्यात आला तर २००७ साली युरोक्षेत्रामध्ये सहभागी होणारा स्लोव्हेनिया हा पहिला भूतपूर्व कम्युनिस्ट देश होता. २०१० साली स्लोव्हेनिया आर्थिक सहयोग व विकास संघटनेचा सदस्य बनला.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.