यशवंत मनोहर

डॉ. यशवंत मनोहर (२६ मार्च, इ.स. १९४३ - हयात) हे एक मराठी कवी, लेखक आणि साहित्य समीक्षक आहेत.

यशवंत मनोहर
जन्म २६ मार्च, १९४३
येरला नागपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
प्रसिद्ध साहित्यकृती उत्थानगुंफा
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
संकेतस्थळ http://yashwantmanohar.com/

व्यक्तिगत जीवन

डॉ. यशवंत मनोहर यांचे बालपण नागपूर जिल्ह्यातील येरला या छोट्याशा खेड्यात गेले. मोलमजुरी करून जमेल तसे पोटाच्या आगीला समजावणाऱ्या गरीब आईवडिलांचे ते पुत्र होते. त्यांनी खूप हाल‍अपेष्टात राहून आपले शिक्षण केले. औरंगाबादला शिकताना त्यांना खूपदा उपाशीही राहावे लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातून १९६५ साली ते प्रथम श्रेणीत बी.ए. ऑनर्स उत्तीर्ण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातूनच एम.ए. ला ते प्रथम श्रेणीत तिसरे आले. १९८४ साली ते नागपूर विद्यापीठातून पीएच.डी. झाले. नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागातून २००३ साली ते प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.

यशवंत मनोहर यांच्या कविता इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, बंगाली, कन्नड आदी भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत.

मनोहरांचे साहित्य

कवितासंग्रह

 1. अग्नीचा आदिबंध
 2. उत्थानगुंफा (हा मनोहरांचा पहिला कवितासंग्रह)
 3. काव्यभिमायन
 4. जीवनकाय (?)
 5. जीवनायन
 6. तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता
 7. प्रतीक्षायन
 8. बाबासाहेब!
 9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक चिंतनकाव्य
 10. युगमुद्रा
 11. युगांतर
 12. स्वप्नसंहिता

वैचारिक निबंधलेखन

 1. अध्यापकांपुढील जळते प्रश्न
 2. आजचे शिक्षण आणि अध्यापक
 3. आपले महाकाव्यातील नायक : शम्बूक-कर्ण-एकलव्य
 4. आपल्या क्रांतीचे शिल्पकार : आंबेडकर-फुले-बुद्ध
 5. डॉ. आंबेडकर : एक शक्तिवेध
 6. आंबेडकरवादी बौद्ध भिक्खू कसा असावा?
 7. आंबेडकरवादी विद्रोही निबंध
 8. आंबेडकरसंस्कृती
 9. डॉ. आंबेडकरांचा बुद्ध कोणता?
 10. डॉ. आंबेडकरांचा बुद्धधम्म
 11. डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली?
 12. डॉ. आंबेडकरांनी विपश्यना का नाकारली?
 13. आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा : समता सैनिक दल
 14. आंबेडकरी चळवळीतील अंतर्विरोध
 15. क्रांतिकारी पुनर्रचना
 • दलित साहित्य : सिद्धान्त आणि स्वरूप
 1. धम्मदीक्षेचा सुवर्णमहोत्सव : तुम्हाला काय मागतो?
 2. प्रबोधनविचार
 3. बहुजन क्रांतीचे महानायक : जोतिबा फुले
 4. बुद्ध आणि त्याचा धम्म : सारतत्त्व
 5. मंडल आयोग : भ्रम आणि सत्य
 6. महाबुद्ध डॉ. आंबेडकर
 7. मूल्यमंथन
 8. रिपब्लिकन पक्ष : बांधणीची एक दिशा
 9. शिक्षकांपुढील आव्हाने
 10. समाजपरिवर्तनाची दिशा

समीक्षा

 1. प्रतिभावंत साहित्यिक : आत्माराम कनीराम राठोड
 2. निबंधकार डॉ. आंबेडकर
 3. आंबेडकरवादी आस्वादक समीक्षा
 4. आंबेडकरवादी मराठी साहित्य
 5. आंबेडकरी चळवळ आणि साहित्य
 6. दलित साहित्यचिंतक
 7. दलित साहित्य : सिद्धान्त आणि स्वरूप
 8. नवे साहित्यशास्त्र
 9. परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाड्मयीन मूल्ये
 10. बाळ सीताराम मेर्ढेकर
 11. मराठी कविता आणि आधुनिकता
 12. युगसाक्षी साहित्य
 13. आंबेडकरवादी महागीतकार : वामनदादा कर्डक
 14. विचारसंघर्ष
 15. शरच्चंद मुक्तिबोधांची कविता (संपादन)
 16. समाज आणि साहित्यसमीक्षा
 17. साहित्यसंस्कृतीच्या प्रकाशवाटा
 18. साहित्याचे इहवादी सौंदर्यशास्त्र
 19. स्वाद आणि चिकित्सा

प्रवास वर्णन

 1. स्मरणांची कारंजी

कादंबरी

 1. रमाई
 2. मी सावित्री जोतीबा फुले
 3. मी यशोधरा

पत्रसंग्रह

 1. पत्रप्राजक्त

श्रद्धांजलीपर लेख

 1. सातवा ऋतू अश्रूंचा

मनोहरांवरील पुस्तके

 • डॉ. यशवंत मनोहर : नवनिर्माणाची कार्यशाळा.
 • डॉ. यशवंत मनोहर : एक प्रज्ञाशील प्रतिभा.
 • डॉ. यशवंत मनोहर : वेध एका युगसाक्षी प्रतिभेचा. (संपादक : प्रा. अनमोल शेंडे, युगसाक्षी प्रकाशन, नागपूर, दुसरी आवृत्ती, २००९)

मनोहरांचा काव्य संग्रह व कविता

" शब्दांची पूजा करत नाही मी, माणसांसाठी आरती गातो "

मराठी साहित्यविश्वात यशवंत मनोहरांच्या उत्थान गुंफा काव्य संग्रहाची विशेष दखल घेतली गेली. पु.ल देशपांडे म्हणतात एकाच गावात आनंदाची श्रावणझड व्हावी आणि त्याच गावच्या गावकुसाबाहेरच्या लोकांकरता तो चिरंतन ग्रीष्म असावा ह्या विसंगतीचे शोषितांच्या दुःखाचे अस्वस्थ करणार वर्णन उत्थानगुंफातील, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही; सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे" या ओळीतून येते.[१]कलेसाठी कला, मनोरंजनासाठी कला आणि समाज परिवर्तनासाठी कला असे कलेचे भेद केले जातात या संदर्भाने यशवंत मनोहर शोषितांचा भावना मांडताना त्यांच्या कवितेतून म्हणतात

मला आनंदच देत नाही कुठली कला,

सृष्टीच्या नाना लीला

मी असूच कसा शांत समतोल

छळतात सारी शास्त्रे-पुराणे-वेदांत

गळा आवळणारे नाना धर्म पंथ'

प्रज्ञा दया पवार यांच्या मतानुसार,"वाङ्मयीन व्यवस्थेला आणि हितसंबंधी कलावादी दृष्टिकोनाला फुले-आंबेडकरवादाने प्रेरित झालेले साहित्यिक विरोध का करतात, हे मला आनंदच देत नाही कुठली कला, या कवि यशवंत मनोहरांच्या कवितेतून स्पष्ट कवितिक विधानातून स्पष्ट होते.[२]

प्रसिद्ध काव्यपंक्ती

‘‘मी सुरुंगांवरून चालून पाहिले
ज्वालामुखीवर मी फुलून पाहिले
मी पुनःपुन्हा जहर खाऊन पाहिले
मला नाकारणारे जगणे मी जगून पाहिले

मी जळत्या सूर्याला उराशी कवटाळून पाहिले
मी सुखांना खूपदा दुखवून पाहिले
खूप जखमांनी घरटी बांधली माझ्यावर
खूपदा मी जगण्याशिवाय जगून पाहिले
(खूपदा: जीवनायन)

पुरस्कार आणि सन्मान

 • मारवाडी फाउंडेशनचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲवार्ड (२०-१२-२०१२)
 • ‘समाजभूषण पुरस्कार’ दादासाहेब रूपवते प्रतिष्ठान, मुंबई, २०११
 • मिलिंद समता पुरस्कार, मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद, २०११
 • सम्यक जीवन पुरस्कार, परभणी, २०११
 • 'स्वप्नसंहिता' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा ‘कवी केशवसुत’ पुरस्कार
 • 'जीवनायन' या कवितासंग्रहाला उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठीचा इचलकरंजीचा इंदिरा संत पुरस्कार
 • 'जीवनायन' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र फाऊन्डेशन, पद्मश्री विखे पाटील पुरस्कार
 • समता प्रतिष्ठानचा सत्यशोधक दिनकरराव जवळकर पुरस्कार (१-२-२०१५)
 • औरंगाबादच्या वामनदादा कर्डक प्रतिष्ठान या संस्थेने भरविलेले पहिले अखिल भारतीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन, १५ मे २००८ रोजी औरंगाबाद येथे झाले. डॉ. यशवंत मनोहर संमेलनाध्यक्ष होते.
 • सुगावा प्रकाशनातर्फे दिला जाणारा सुगावा पुरस्कार (१-८-२०१५)
 • गवळी प्रतिष्ठानचा पुरस्कार
 • मराठवाडा साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार (२७-२-२०१८)

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी

 1. ^ पु.ल.देशपांडे. उत्थान गुंफा आकलनाचे आलेख. सुगावा प्रकाशन. pp. १ ते १०. आय.एस.बी.एन. 81-88764-29-9. ८-१०-२०१३ रोजी पाहिले.
 2. ^ "विद्रोहाची चळवळ -Maharashtra Times". Maharashtra Times (mr मजकूर). 2011-05-01. 2018-04-09 रोजी पाहिले.
आंबेडकरी साहित्य संमेलन

विदर्भात जवळजवळ दरवर्षी, आंबेडकरी साहित्य संमेलन भरते. पहिले अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन वर्धा शहरात १९९३ साली भरले होते. कवी वामनराव कर्डक त्याचे संमेलनाध्यक्ष होते.

दुसरे संमेलन त्याच शहरात १९९६मध्ये झाले.

त्यानंतर आणखी एक अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन, बल्लारपूरला १३-१४ जानेवारी १९९६ या तारखांना डॉ. यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

२००८चे संमेलन ज्या संस्थांनी आयोजित केले होते त्या सगळ्या संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव अशा प्रत्येकी दोन प्रतिनिधींची बैठक २१ सप्टेंबर २००८ रोजी अमरावतीला झाली होती. त्या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये, ही संमेलने सुसंगत आणि नियमित व्हावी यासाठी सांस्कृतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्था एकसंघ असणे गरजेचे आहे हे लक्षात आले. म्हणून त्याच वेळी, अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ नामक संस्थेची स्थापना करण्यात आली. हे महामंडळ संस्थांचा संघ म्हणून काम करेल आणि ज्या संस्था त्याच्या सभासद असतील, त्यांचे दोन प्रतिनिधी या महामंडळाच्या आमसभेला निमंत्रित केले जातील, अशी योजना ठरवली गेली. मात्र त्यापूर्वीचे २००८चे अमरावतीचे संमेलन हे "आशय" नावाच्या स्थानिक संस्थेने आयोजित केले होते.

१९९३नंतरच्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष, उत्तम कांबळे, गंगाधर पानतावणे, बाबुराव बागुल, यशवंत मनोहर, लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, अरुण कांबळे(९वे संमेलन; वणी-यवतमाळ, १३ जानेवारी २००६), रावसाहेब कसबे (१०वे संमेलन; अमरावती, २१-२२ फ़ेब्रुवारी २००९) हे होते. ११ वे साहित्य संमेलन१२ व १३ जानेवारी २०१३ रोजी विदर्भातील भंडारा येथे झाले. आंबेडकरी साहित्य चळवळीचे ज्येष्ठ भाष्यकार राजा ढाले संमेलनाच्या अध्यक्षपदी होते.

१२वे अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत, प्रा.डॉ. शरणकुमार लिंबाळे होते. ते १२-३-२०११ला नांदेड येथे झाले होते.

आणखी एक १२वे आंबेडकरी साहित्य संमेलन चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे २०११ सालच्या जानेवारीत भरले होते, संमेलनाध्यक्ष अविनाश डोळस होते.

पुढे या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने दोन आंबेडकरी विद्यार्थी साहित्य संमेलने आणि चार आंबेडकरी युवा साहित्य संमेलने आयोजित केली गेली. ६ जानेवारी २०११ला वर्धा येथे सतेश्वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे युवा संमेलन झाले, तर चौथे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन दहा महिन्यांनीच, १२ व १३ नोव्हेंबर २०११ या तारखांना नागपूरला झाले. संजय पवार त्याचे संमेलनाध्यक्ष होते.

मार्च २०१२पर्यंत अकरा अखिल भारतीय दलित साहित्य संमेलने (११वे नागपूरला, २१-२३ जाने २०११, अध्यक्ष डॉ.जनार्दन वाघमारे. १२ वे भोपाळला, मार्च २०१२, अध्यक्ष शरदकुमार लिंबाळे) आणि पंधरा आंबेडकरी साहित्य संमेलने झाली होती. याशिवाय तीन अखिल भारतीय आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलने नोव्हेंबर २०१२पर्यंत झाली आहेत.

अश्‍वघोष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजलेले २रे अखिल भारतीय आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन १४-१५ जानेवारी २०११ला सोलापूरमध्ये झाले. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरचे प्रा. डॉ. कृष्णा किरवले हे होते.

अश्‍वघोष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजलेले ३रे अखिल भारतीय आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन २१-२२ जुलै २०१२ला सोलापूरमध्ये झाले. संमेलनाध्यक्षपदी उत्तम कांबळे होते.

फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या सोलापूर नगरीत १४ व १५ फेब्रुवारी २०१५ रोजी १३ व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ज.वि. पवार हे संमेलनाध्यक्ष होते.

महात्मा फुले, आंबेडकर विचारमंच गडचिरोलीच्या वतीने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी शुकवारी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार तर अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. भाऊ लोखंडे होते. विशेष अतिथी म्हणून आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी संमेलनाला हजेरी लावली होती.

१८ मार्च २०१७ : नागपूर येथे (आणखी एक) १३ वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. दत्ता भगत होते.

फेब्रुवारी २०१८ : आनंद गायकवाड हे फेब्रुवारी २०१८ मध्ये उमरखेड (जि.यवतमाळ)येथे झालेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

याशिवाय खालील नावाची साहित्य संमेलनेही आहेत.

प्रबुद्ध साहित्य संमेलन

प्रबोधन साहित्य संमेलन

प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन

फुले आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन

फुले-आंबेडकर साहित्य संमेलन

फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन

फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन

फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन

बंधुता साहित्य संमेलन

आंबेडकरी विचारवेध साहित्य संमेलन

उत्तम कांबळे

उत्तम कांबळे हे संपादक, पत्रकार आणि साहित्यिक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी गावी शेतमजूर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. उत्तम कांबळे यांचे मूळ गाव बेळगावमधील शिरगुप्पी आहे.

कविता

कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता (मुख्यतः) छंदोबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते.कविता, कविता किंवा श्लोक हे साहित्यचे माध्यम आहे ज्यामध्ये कोणतीही भाषा किंवा मनःस्थिती कोणत्याही भाषेद्वारे व्यक्त केली जाते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान फार जुने आहे. हे सुरवातीपासून समजू शकते. कविता शब्दशः काव्य रचना किंवा कवीचे कार्य आहे, जो ताल्यांच्या साखळीत लिहिली जाते.

कविता हे एक वाक्यरचना आहे, जेणेकरून मन कोणत्याही रस किंवा मूडने भरलेले असेल. म्हणजे, ज्यामध्ये कल्पना आणि मनोविश्लेषकांचे प्रभाव निवडलेल्या शब्दांवर प्रभाव पाडतात. रसगंगादरमध्ये "कविता" शब्द 'कविता' शब्दांतून आला आहे. अर्थाच्या सुरेखतेच्या अर्थाने, लोक हा अभ्यासक्रम स्वीकारतात तसेच शब्दांचे उच्चार समजतात. पण अनेक प्रकारचे 'युफोरिया' असू शकते. यावरून हे स्पष्ट होत नाही. साहित्याचे वैशिष्ट्य असे आहे की विश्वनाथ यांची पात्रता सर्वात अचूक आहे. त्यांच्या मते, 'रसयतन ही एकमेव कविता' आहे. भावनांचा सुखद संवाद साधण्याच्या कविताचा रस म्हणजे रस होय.

अंगाई

अभंग

आर्या

ओवी

कणिका

खंडकाव्य

गझल

चारोळी

चित्रपटगीत

चौपदी

दशपदी

दिंडी

नाट्यगीत

निसर्गवर्णनात्मक कविता

पोवाडा

बालकविता

बालगीत

भक्तिगीत

भलरी (शेतकरी गीत)

भावगीत

महाकाव्य

मुक्तछंद

रूबाया

लावणी

विडंबन

विनोदी कविता

श्लोक

साकी

सुनीत

हायकू

जागतिकीकरण

जागतिकीकरण म्हणजे स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावर स्थानांतरणाची प्रक्रिया. ह्या संज्ञेचा उपयोग बहुध आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात केला जातो. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेबरोबर एकत्रीकरण करणे ,२० व्या शतकाच्या शब्दकोशानुसार जागतिकीकरण म्हणजे जगभर पसरणे ,एकाच वेळी संपूर्ण जगाचा किंवा जगातील सर्व लोकांचा विचार करणे ,त्यात व्यापार, विदेशी थेट गुंतवणूक, भांडवल प्रवाह, प्रवास आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसाराच्या माध्यमाने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांसाठी खुले केले जाते. विश्व बॅंकेच्या अहवालानुसार जागतिकीकरण म्हणजेअ- १) उपभोग्य वस्तुंसह सर्व वस्तुंच्या आयातीवरील नियंत्रण हळूहळू समाप्त होणे. २) आयात शुल्काचा दर कमी करणे. ३) सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण करणे होय. दिपक नायर यांच्या मते, देशांच्या राजकीय सीमांमध्ये आर्थिक क्रियांचा विस्तार करणे म्हणजेच जागतिकीकरण होय. डॉ. यशवंत मनोहर यांच्या मते जागतिकीकरण म्हणजे जगातील वेगवेगळ्या देशांनी परस्पर व्यापार करणे होय. भारतात १९९० च्या सुमारास जागतिकीकरणाला सुरुवात झाली. ह्या काळात देशावरचे विदेशी कर्ज एवढे वाढले होते की जागतिक बँक (World Bank), आंतरराष्ट्रीय नाणे निधी (International Monetary Fund) ह्या खाजगी जागतिक संघटनांनी भारताला आणखी कर्ज देणे नाकारले व कर्ज मिळवण्यासाठी भारतावर काही अटी लादल्या. ह्या अटींमध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही धोरणात्मक बदल करून तिला विदेशी कंपन्यांसाठी खुले करणे समाविष्ट होते. अर्थव्यवस्थेमधील ह्या बदलांना "आर्थिक सुधारणा" म्हटले गेले व त्यात जागतिकीकरणासोबतच उदारीकरण व खाजगीकरण ह्यांचा पण समावेश होतो. ह्यांनाच एकत्रितपणे खा.ऊ.जा. धोरण असे संबोधले जाते. संजय भास्कर जोशी यांच्या मते, मुख्यत: व्यापारासाठी विविध देशांनी एकमेकांना जोडून घेत एकमेकांच्या भूमीत खुलेपणाने व्यापार करण्यासाठीची व्यवस्था निर्माण करणे म्हणजे जागतिकीकरण होय. मो. वि. भाटवडेकर यांनी नोंदविल्याप्रमाणे, 'देशात खुला व्यापार, गुंतवणुकीसाठी मोकळी बाजारपेठ आणि तंत्रज्ञान व कुशल व्यावसायिकांना देशांतर करण्यास सुलभ कायदे कानून अशी जागतिक व्यवस्था म्हणजे जागतिकीकरण होय.' जग ही एक बाजारपेठ असणे जागतिकीकरणाचे ध्येय आहे , परकीय क्षेत्राचे उदारीकरण केल्यास औदयोगिक उत्पादने आपोआप परकीय क्षेत्राशी जोडली जातात , त्यामुळे अप्रत्यक्षपणे बँकिंग आणि सेवाक्षेत्रही परकीय क्षेत्राकडे आकर्षित होतात . विविध देशांची परकीय क्षेत्रे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थाही एकमेकांशी संलग्न होतात , जागतिकीकरण होऊ लागते , उत्पादनाचे वितरण स्थानिक स्तरापर्यंत होत असेल तर त्याला स्थानिकीकरण असे संबोधतात , याउलट उत्पादनाचे वितरण देशादेशामध्ये होत असेल, तर त्याला आंतरराष्ट्रीयकरण असे म्हणतात ,परंतु जागतिकीकरण आंतरराष्ट्रीयीकरणापेक्षा मोठी आणि व्यापक संकल्पना आहे .जागतिकीकरणात फक्त उत्पादनाचे वितरणच नाही तर त्यासोबत बाजार ,नियम , कररचना , आयातशुल्क , साहाय्य,विक्री , व्यापार संघटन , तोडगा अशा व्यवसायाशी निगडीत सेवांचा देखील समावेश असतो, आंतरराष्टीयकारणात राष्ट्र एकक मानून उत्पादनांची देवाणघेवाण होते , जागतिकीकरणात व्यापाराच्या दृष्टीने राष्ट्रांच्या सीमा फिकट होतात , त्या इतक्या फिकट होतात की, व्यापाराच्या दृष्टीने स्थलांतर आणि भांडवलाचे मुक्त वहन होऊ लागते. जागतिकीकरण हे दळणवळण आणि तंत्रज्ञानामुळे तीव्र होत जाते , ते रोखणे कठीण असते

जागतिकीकरण म्हणजे

१) ज्या ठिकाणी स्वस्त आणि रास्त कच्चा माल आणि इतर स्रोत उपलब्ध असतील , अशा जगातील कोणत्याही ठिकाणी उत्पादन घेणे .

२) जगातील कोणत्याही कोपऱ्यापर्यंत वस्तू आणि सेवा पुरविणे , संपूर्ण जग हीच बाजारपेठ असणे .

३)देशाच्या बृहतलक्षी घटकांपैकी 'परकीय क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र असणे .

दलित साहित्य संमेलन

दलित संमेलने ही विविध नावांनी भरतात, त्यांतली काही नावे खाली दिली आहेत. :

अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन

कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन

राज्यव्यापी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन

अस्मितादर्शन साहित्य संमेलन

आदिजन साहित्य संमेलन

आदिवासी साहित्य संमेलन

अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन

अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन

अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन

अस्मितादर्श साहित्य संमेलन

आंबेडकरी युवा साहित्य संमेलन

आंबेडकरी विद्यार्थी साहित्य संमेलन

आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन

आंबेडकरी साहित्य संमेलन

आविष्कार साहित्य संमेलन

ओबीसी साहित्य संमेलन

राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन

चमार एकता सम्मेलन

अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन

अखिल महाराष्ट्र दलित साहित्य संमेलन

दलित अधिकार संमेलन

दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन

दलित करोडपतींचे व्यापारिक सम्मेलन

राष्ट्रीय दलित कलम साहित्य अधिवेशन

दलित काँग्रेस सम्मेलन

दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन

दलित नाट्यसंमेलन

दलित पिछड़ा सम्मेलन

दलित महासम्मेलन

दलित महिला सम्मेलन

दलित-मुस्लिम एकता सम्मेलन

दलित मुव्हमेन्ट असोसिएशनचे वार्षिक सम्मेलन

अंतर्राष्ट्रीय दलित सम्मेलन

अतिदलित सम्मेलन

राज्यस्तरीय दलित संमेलन

राष्ट्रीय दलित सम्मेलन

दलित सम्मेलन

काँग्रेसचे दलित सम्मेलन

ज़िला दलित सम्मेलन

बहुजन समाज पार्टीका दलित सम्मेलन,

मंडल दलित स्म्मेलन

दलित अस्मिता सम्मेलन

दलित साहित्य विचारवेध संमेलन

दलित साहित्य अकादमीचे संमेलन

दलित साहित्य विचारवेध संमेलन

दलित साहित्य संमेलन

दलित सेनेचे जिल्हा संमेलन

द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन

परिवर्तन साहित्य संमेलन

परिवर्तनी साहित्य संमेलन

प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन

फुले-आंबेडकर साहित्य संमेलन

अखिल भारतीय फुले-आंबेडकरवादी साहित्य संमेलन

फुले आंबेडकरी साहित्य संमेलन

फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन

फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन

राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन

महात्मा फुले साहित्य संमेलन

महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन

अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन

बामसेफ अधिवेशन

बौद्ध-दलित साहित्य संमेलन

बौद्ध साहित्य संमेलन

राज्यस्तरीय मराठी दलित साहित्य संमेलन

महादलित सम्मेलन

रमाई चळवळीचे साहित्य संमेलन

रमाई साहित्य संमेलन

राजर्षी शाहू विचारवेध संमेलन

राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन

अखिल भारतीय वामनदादा कर्डक साहित्य संमेलन

विद्रोही साहित्य संमेलन (१)

विद्रोही साहित्य संमेलन (२)

राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन

सत्यशोधकी साहित्य संमेलन

समरसता साहित्य संमेलन

सम्यक थिएटर पारिवारिक साहित्य संमेलन

सम्यक साहित्य संमेलन

भारतीय संविधान चिंतन साहित्य संमेलन

संविधाननिर्माता साहित्य संमेलन

सावित्री साहित्य संमेलन, वगैरे वगैरे...

असे असले तरी दलित साहित्य संमेलन या मूळ नावाने भरलेली काही संमेलने अशी :

१ले दलित साहित्य संमेलन २ मार्च १९५८ रोजी मुंबईत झाले.

बाबुराव बागुल एका दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

३रे दलित साहित्य संमेलन औरंगाबाद येथे झाले. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे त्याचे स्वागताध्यक्ष होते.

एक अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन, ब्रह्मपुरी या गावी २७-२८ फेब्रुवारी १९८८ या तारखांना झाले होते. डॉ. यशवंत मनोहर त्याचे संमेलनाध्यक्ष होते.

३रे (?) दलित साहित्य संमेलन १९७९साली झाले होते.

९वे दलित साहित्य संमेलन चंद्रपूर येथे इ.स.१९८९मध्ये झाले.

दलित साहित्य संमेलन, पुलगावला १९९० या वर्षी झाले. डॉ. यशवंत मनोहर त्याचे संमेलनाध्यक्ष होते.

२-३ मार्च २००८ या तारखांना सुवर्णमहोत्सवी दलित साहित्य संमेलन मुंबईला झाले.

?वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन ४-३-२००९ रोजी झाले.

११वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन नागपूरला २१-२२-२३ जानेवारी २०११ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष खासदार डॉ. जनार्दन वाघमारे होते.

१२वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन भोपाळला मार्च २०१२ मध्ये झाले होते. हे संमेलन अखिल भारतीय दलित साहित्य महामंडळाने भरविले होते.२०१७ साली ज्यावेळी डोंबिवलीत ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते त्या सुमारास कल्याणात ‘समरसता’ संमेलन पार पडले. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्येच आंबेडकरवादी मराठी साहित्य संमेलनही पार पडले. या दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक आणि विचारवंत डॉ. विठ्ठल शिंदे होते. या संमेलनाच्या समारोपाच्या सत्रात ११ ठराव पास करण्यात आले.१) गोवंश हत्याबंदी कायदा व समर्थन यांना प्रतिबंध करावा. २) स्वतंत्र आंबेडकरवादी साहित्य कला अकादमी (शासनाने) स्थापन करावी. ३) भारतीय राज्यघटना राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर करावा. ४) सर्व विद्यापीठांत ‘दलित’ऐवजी ‘आंबेडकरवादी साहित्य’ असे नामांतर करावे. ५) देशातील दहशतवाद अन् जातीय अन्याय अत्याचार रोखणारे धोरण व प्रबोधन अभियान सुरू करावे. ६) सध्याचे आरक्षण धोरण न बदलता राबवावे. ७)कुटुंब नियोजनाचे धोरण-कायदा सक्त करावा.

८) आंबेडकरवादी कलावंतांचा कोश शासनाने निर्माण करावा.९) विचारवंत आणि कार्यकर्त्यांच्या खूनसत्राबाबत शासनाने ठाम भूमिका घेऊन प्रतिकाराचे धोरण ठरवावे. १०) शासनाने जातीअंताचे धोरण व कार्यक्रम ठरवावा. ११) अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य अबाधित ठेवून विचारांच्या आधारावर नागरिकांना देशद्रोही ठरवू नये.

या ठरावांची प्रत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना सरकारी प्रतिनिधी म्हणून देण्यात आली.

नागपूर (लोकसभा मतदारसंघ)

नागपूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या नागपूर जिल्ह्यामधील ६ विधानसभामतदारसंघ समाविष्ट केल्या गेले आहेत.

नागपूर जिल्हा साहित्य संघाचे साहित्य संमेलन

नागपूर जिल्हा साहित्य संघाचे २रे साहित्य संमेलन ११-१३ फेब्रुवारी १९८३ दरम्यान नागपूर शहरात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर होते.

बहुजन साहित्य संमेलन

अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन या नावाचे एक संमेलन, आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथे १० फेब्रुवारी १९८८ रोजी डॉ. यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

त्यानंतर आणखी एक अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन, गडचांदूर या गावी ९-१० एप्रिल १९९८ या तारखांना झाले. अध्यक्ष यशवंत मनोहर होते.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे १७ जुलै २०१६ रोजी त्यापूर्वी नुकत्याच स्थापन झालेल्या बहुजन साहित्य संघाच्या वतीने सुरूवातीलाच बहुजन साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्षडॉ. विजयालक्ष्मी वानखेडे होत्या.

अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलन हे आणखी वेगळेच संमेलन आहे.

बाळ सीताराम मर्ढेकर

बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर १, १९०९ - मार्च २०, १९५६) हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसर्‍या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.

बौद्ध साहित्य संमेलन

बौद्ध साहित्य संमेलन या नावाची संमेलने अनेक संस्था घेतात. त्या संस्थांपैकी अंबाजोगाईची बौद्ध साहित्य परिषद ही एक संस्था आहे. अनेक संस्था एकाच नावाची संमेलने घेत असल्याने एकाहून अधिक संमेलनांचा समान अनुक्रमांक असू शकतो. आणि त्यामुळे कोणत्याही विशिष्ट संमेलनाचा नक्की अनुक्रमांक सांगता येत नाही.

मराठी बौद्ध

मराठी बौद्ध किंवा महाराष्ट्रीय बौद्ध हा महाराष्ट्रातील बौद्ध धर्म आचरणारा मराठी भाषिक समूह आहे. २०११ च्या जनगणेनुसार राज्यात ६५ लाख बौद्ध असून यातील ९९% पेक्षा अधिक बौद्ध हे धर्मांतरित बौद्ध आहेत. तर सुमारे ५३ लाख बौद्ध हे अनुसूचित जाती या प्रवर्गातील आहेत. इ.स. १९५६ च्या सामूदायिक धर्मांतरामुळे महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायांत लक्षणिय वाढ झालेली आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन

पहिले महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन, नागपूर येथे, २७ ते २९ नोव्हेंबर १९८५ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर होते.

१०वे महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन, मुंबईत, मुंबई मराठी साहित्य संघ आणि सोमय्या महाविद्यालय यांच्या वतीने ३ डिसेंबर २०१३ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष कवी मंगेश पाडगावकर होते. संगीतकार कौशल इनामदार यांच्या हस्ते संमेलनाचे याचे उदघाटन झाले. या संमेलनात विद्यार्थ्यांच्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी दुर्गेश सोनार होते.पहा : मराठी साहित्य संमेलने; दलित साहित्य संमेलन

रमाबाई आंबेडकर

रमाबाई भीमराव आंबेडकर (७ फेब्रुवारी इ.स. १८९८ – २७ मे, इ.स. १९३५) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.

लक्ष्मण माने

लक्ष्मण बापू माने (जन्मः १ जून, इ.स. १९४९) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषेतील लेखक आहेत. त्यांच्या उपरा नावाच्या साहित्यकृतीमुळे 'उपराकार' लेखक लक्ष्मण माने असेही ओळखले जातात. त्यांच्या ’उपरा’चे हिंदी रूपांतर ’पराया’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. हे आत्मचरित्र हिंदी शिवाय इंग्रजी, गुजराथी, तमिळ, फ्रेंच, मल्याळम आदी भाषांतूनही अनुवादित झाले आहे..माने हे भारतातील मागासवर्गीय, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी कार्य करतात. 'समाजातील उपेक्षित' या विषयावरील परिवर्तनवादी व पुरोगामी विचार ते लेखनातून व्यक्त करतात. हे महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे १९९० ते १९९६ या काळात सदस्य होते.

वामनदादा कर्डक साहित्य संमेलन

औरंगाबादच्या वामनदादा कर्डक प्रतिष्ठान या संस्थेने भरविलेले पहिले अखिल भारतीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन, १५ मे २००८ रोजी औरंगाबाद येथे झाले. डॉ. यशवंत मनोहर संमेलनाध्यक्ष होते.

पहा : दलित साहित्य संमेलन; साहित्य संमेलने

संविधाननिर्माता साहित्य संमेलन

यशवंतमनोहर डॉट कॉम या संकेतस्थळावर दिल्याप्रमाणे दलित लेखक डॉ. यशवंत मनोहर हे स्वत:, संविधान निर्माता आणि संविधान चिंतन या संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनांच्या तारखा अश्या--

पहिले संविधान निर्माता साहित्य संमेलन, सांगली, १६-१७ जानेवारी २०१०.

भारतीय संविधान चिंतन साहित्य संमेलन, उमरेड (नागपूर जिल्हा), २५-२६ एप्रिल २०१०.

या संमेलनांत डॉ. यशवंत मनोहर यांनी दिलेली अध्यक्षीय भाषणे त्यांच्या ’बत्तीस भाषणे’ या पुस्तकात छापली आहेत.

पहा : साहित्य संमेलने

सम्यक साहित्य संमेलन

सम्यक साहित्य संमेलन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित केले जाते.

पहिल्या सम्यक साहित्य संमेलनाचे आयोजन इ.स. २०१० साली करण्यात आले होते. दीनानाथ मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन कांचा आयलया यांच्या हस्ते झाले होते. परशुराम आठवले हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती व पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, पुणे विद्यापीठाच्या एका सभागृहात, १४-१६ डिसेंबर २०१२ या काळात ३रे सम्यक साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष संजय पवार, स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर आणि कार्याध्यक्ष डॉ. विजय खरे आणि अविनाश महातेकर होते. संमेलनाचा समारोप गंगाधर पानतावणे यांच्या भाषणाने झाला.

संमेलनात पास झालेले ठराव :

१. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा.

२. महात्मा फुले आणि सावित्री फुले यांना भारतरत्‍न पुरस्कार द्यावा.

३. शाहू-आंबेडकर-फुले यांच्यावरील धड्यांचा पाठपुस्तकात समावेश करावा, आदी.

संजय पवार यांच्या भाषणातून

"या तिसऱ्या सम्यक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण फुले-शाहू-आंबेडकरांचा गजर, ब्राह्मणी व्यवस्थेवर टीका, बहुजनवाद, राजकीय नेतृत्वावर टीका, हा नेहमीचा सिलॅबस बाजूला ठेवून अंतर्मुख होऊ या."

साहित्यिक कलावंत संमेलन

पुणे आणि आसपासच्या ग्रामीण परिसरातील साहित्यिक आणि कलावंत यांच्या उपजत कलागुणांचे संवर्धन व्हावे, या हेतूने प्रा. शैलेश त्रिभुवन आणि दिलीप बराटे यांनी 'साहित्यिक- कलावंत प्रतिष्ठान'ची स्थापना केली. पुण्यातील या संस्थेतर्फे पुणे शहरात 'साहित्यिक- कलावंत' संमेलनाचे आयोजन केले जाते. या संस्थेतर्फे वाग्यज्ञे हा पुरस्कारही दिला जातो. या संमेलनात सर्वांना विनामूल्य प्रवेश असतो.

६वे साहित्यिक-कलावंत संमेलन २२ व २३ एप्रिल २००६ रोजी झाले....

८वे संमेलन पुण्यातील कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये १४, १५ आणि १६ डिसेंबर २००८ या दिवसांत झाले.

९वे संमेलन २५ ते २७ डिसेंबर २००९ या दिवसांत झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे होते.

१०वे संमेलन १७ ते १९ डिसेंबर २०१० या दरम्यान झाले. संमेलनाध्यक्ष फ.मुं. शिंदे होते.

११वे साहित्यिक कलावंत संमेलन १0 ते १२ नोव्हेंबर २०११ या काळात झाले

१२वे संमेलन २३ ते २५ डिसेंबर २०१२ या काळात डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि कवी संदीप खरे यांना डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते "वाग्यज्ञे गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

१३वे संमेलन २५-२६ डिसेंबर २०१३ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. अश्विनी धोंगडे

१४वे संमेलन पुण्यामधील कोथरूड येथे २०१४ साली २५-२६-२७ डिसेंबर या काळात झाले. संमेलनाचे उद्घाटन उषा संजय काकडे यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर हे होते.

१५वे संमेलन पुण्यात २५ ते २७ डिसेंबर २०१५ या कालावधीत झाले. वात्रटिकाकार रामदास फुटाणे हे संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाचे उद्‌घाटन धनंजय मुंडे यांनी केले.

१६वे संमेलन पुण्यात २५-२६ डिसेंबर २०१६ या काळात झाले; प्राचार्य द.ता. भोसले संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाचे उद्‌घाटन डॉ.अक्षयकुमार काळे यानी केले. या साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते लेखिका मल्लिका अमर शेख यांना साहित्य क्षेत्रातील वाग्यज्ञे साहित्य पुरस्कार आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१७वे संमेलन पुण्यात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात २४-२५ डिसेंबर २०१७ या कालावधीत झाले. मराठीचे माजी प्राध्यापक डाॅ. निशिकांत मिरजकर हे संमेलनाध्यक्ष होते. या २५व्या संमेलनात विंदा दर्शन, चित्रांगण, ग्रंथोत्सव, सांस्कृतिक राष्ट्रवाद (चर्चा), काव्यांजली वगैरी कार्यक्रम होते. संमेलनात डॉ.. गिरीश ओक आणि अशोक नायगावकर यांना वाग्यज्ञे पुरस्कार प्रदान झाले. संमेलनाचे आयोजन दिलीप बराटे यांनी केले होते.

१८वे संमेलन पुणे येथे २३-२४ डिसेंबर २०१८ या तारखांना झाले. फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाध्यक्ष होते.

१४व्या संमेलनाचा वृत्तान्त :-या संमेलनामध्ये चित्रप्रदर्शन, ग्रंथ महोत्सव, नट-खट अप्सरा, महाचर्चा, स्वरआरती, कविसंमेलन, अभिनेत्यांशी गप्पांचा कार्यक्रम, परिसंवाद व बालनाट्ये सादर करण्यात आली.

या साहित्यिक-कलावंत संमेलनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लावणी व वेगवेगळ्या कला नृत्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते तर ‘नमो विचार देशाला तारेल कि मारेल ?’ या विषयावर प्रदीर्घ मुलाखतीमध्ये संजय आवटे, यशवंत मनोहर, माधव भंडारी, कुमार सप्तर्षी यांनी आपापली मनोगते व्यक्त केली.

संजय आवटे यांनी बोलताना ख्रिसमसच्या दिवशीच सुशासन दिन का? हे समजले नाही अशी टीका करून साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ यांच्या विधानांकडे लक्ष वेधले. व पाकिस्तानचे मॉडेल अपयशी का ठरले व भारताचे मॉडेल यशस्वी का झाले याचे उत्तर आपल्या एकीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. परराष्ट्रमंत्री गीतेला राष्ट्रीय ग्रंथ मानते म्हणजे नक्की काय समजायचे? असा सवालही उपस्थित केला.

पुढे आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी मोदी ज्या पक्षाच्या, संघटनेच्या विचार धारेमध्ये वाढले दुर्दैवाने त्या पक्षाचा आणि संघटनेचा स्वातंत्र्य चळवळीशी काहीही संबंध नव्हता, त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ म्हणजे काय ? स्वातंत्र्य चळवळीत विकसित झालेले मुद्दे म्हणजे काय हेच यांना लक्षात येत नाही, असे सांगितले.

यशवंत मनोहर यांनी घरवापसीचा दाखला देत, ’मुस्लीम-ख्रिश्चन वगैरे धर्माच्या ज्या लोकांना हिंदू होणे शक्य नसेल त्यांनी देश सोडून जावे या पद्धतीची भूमिका घेतली जाणे हे संविधानद्रोही म्हणजे राष्ट्रद्रोही आहे,’ असे परखड मत मांडले.

आताच या राष्ट्राला हिंदू राष्ट्र करण्याचा काहींच्या मनामध्ये उद्रेक का झाला आहे असा सवाल करून, कालपर्यंत सर्व जातीचे लोक या देशामध्ये आनंदाने नांदत होते, या पुढेही आनंदाने नांदू द्या.ज्यांना आपल्यापेक्षा या देशाचे जास्त कळत होते ते महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, यांनी या देशाचा भूतकाळ कमीतकमी लक्षात ठेऊन भविष्यकाळ जास्तीत जास्त लक्षात घेत ही सगळी मांडणी केली आहे असे सांगितले.

माधव भंडारी यांनी या विषयावर बोलताना मोदींनी स्वतःला कुठेही विचारवंत, तत्त्वज्ञ म्हटले नाही. मोदी विचार देशाला तारेल की मारेल या प्रश्नाचे उत्तर १३ महिन्यामध्ये जनतेने दिले आहे.

मोदींचे तर प्रसिद्ध वाक्य आहे 'सबका साथ, सबका विकास' हे असून १३ वर्षामध्ये किती मुस्लीम-ख्रिश्चनांनी गुजरातमधून स्थलांतर केले हे आधी सांगावे असा सवाल उपस्थितांना केला.

सच्चर आयोगाच्या शिफारशीनुसार अहवालामध्ये मुस्लिमच अल्पसंख्याक का, बाकी अल्पसंख्याक समाज विचारात का घेतला नाही असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सुशासन दिनानिमित्त बोलताना हा दिवस अटलबिहारी वाजपेयींच्या जन्म दिनानिमित्त साजरा केला आहे त्याचा व ख्रिसमसचा काही संबंध नाही असे सांगितले. नथुराम गोडसेच्या बाबत बोलताना गोडसेचा आणि आमचा कसलाही संबंध नाही, हे विष पेरण्याचे काम मुद्दाम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

डॉ.कुमार सप्तर्षी यांनी बोलताना घटनेच्या आधारे झालेल्या ज्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांतून ज्यांचा इतिहास लोकशाहीला फारसा पोषक नाही असे लोक आता राजसत्तेवर आलेले आहेत अशी सुरुवात करून," हा जो जनादेश आहे, हा राज्य करायला संधी दिलेली आहे, हे तुम्हाला साईबाबांच्या मूर्ती फेकून द्यायला, नथूरामची मंदिरे बांधायला, आमचे ऐकले नाही तर दुसर्‍या देशात जा हे सांगायला जनादेश दिलेला नाहीउ" असे परखड मत मांडत त्यासाठी असे परिसंवाद होत राहणे बोलत राहणे याला लोकशाहीतला महत्त्वाचा अधिकार म्हणतात असे सांगितले.

पुढे बोलताना मोदी हे नेमके कुणी निवडलेले आहेत असा प्रश्न पडतो, त्या वेळेस ते भाजपने निवडलेले आहेत हे पाव सत्य व आर.एस.एस.ने निवडलेले आहेत हे पाव सत्य म्हणून आर.एस.एस.ने दिलेला आदेश भाजपला देखील पाळावा लागतो. म्हणजे कधीकधी अर्धसत्याचे पूर्ण सत्य होते. म्हणून आर.एस.एस. ला काय करायचे आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. लोक नथुरामचे मंदिर बांधायला लागले तर उद्या दाऊदचेही मंदिर बांधले जाईल मग काय करायचे? कारण गुन्हेगारांची मंदिरे बांधली जाऊ लागल्यावर असेच होईल.

गांधींजींच्या काळातही जातवादी शक्ती होत्या पण गांधीजींनी त्यांना डोके वर काढू दिले नाही असेच शेवटी त्यांनी सांगितले.

पहा :मराठी साहित्य संमेलने ;

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.