मे ९

मे ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२९ वा किंवा लीप वर्षात १३० वा दिवस असतो.

<< मे २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१

ठळक घटना आणि घडामोडी

अकरावे शतक

पंधरावे शतक

सोळावे शतक

सतरावे शतक

 • १६७१ - थॉमस ब्लडने टॉवर ऑफ लंडनमधून खजिना लुटण्याचा प्रयत्न केला.

एकोणिसावे शतक

 • १८६८ - अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील रिनो शहराची स्थापना.
 • १८७४ - मुंबईत घोड्याने ओढलेल्या ट्राम सुरू.ट्राम ओढण्यासाठी आणलेल्या विलायती घोड्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना टोप्या घालत असत. ही ट्रामसेवा सुमारे ३१ वर्षे सुरू होती.
 • १८७७: पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.

विसावे शतक

एकविसावे शतक

 • २००१ : जगातील सर्वात लांब घरगुती वापराच्या गॅसची लाइन जामनगरपासून लोणीपर्यंत घालण्यात आली. याची लांबी १२४० किलोमीटर आहे.
 • २००२ : भारतातील अभिमत विद्यापीठांची संख्या ५५पर्यंत पोहोचली.

जन्म

*१९८१-((ॐनिरंजज नरेंद्र मुनीश्वर)) करवीरनिवासिनी महालक्ष्मी पूजक ५६वी पिढी सुरवात

मृत्यू

 • १३३८: भगवद्‍भक्त चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणार्‍या कुसबाखाली सापडला.
 • १४४६ - मेरी, नेपल्सची राणी.
 • १९१७: डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणझोडदास .
 • १९१९: रेव्हरंड नारायण वामन टिळक
 • १९३१: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन
 • १९५९ - कर्मवीर भाऊराव पाटील, मराठी शिक्षणतज्ञ.
 • १९४९ - लुई दुसरा, मोनॅकोचा राजा.
 • १९७८ - अल्डो मोरो, इटलीचा पंतप्रधान.
 • १९८६ - तेनझिंग नॉर्गे, नेपाळी शेरपा; एडमंड हिलरी बरोबर एव्हरेस्ट सर करणारा प्रथम माणूस.
 • १९९५: दिग्दर्शक अनंत माने– पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.  
 • १९९८ - तलत मेहमूद, पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा .
 • १९९९: उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या
 • २००८: किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. फिरोझ दस्तूर
 • २०१३- धृपदगायक झिया फरिदुद्दीन डागर
 • २०१४: भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

मे ७ - मे ८ - मे ९ - मे १० - मे ११ - (मे महिना)

गोपाळ कृष्ण गोखले

नामदार गोपाळ कृष्ण गोखले (मे ९, १८६६ - फेब्रुवारी १९, १९१५) हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते. मोहनदास करमचंद गांधी हे गोखल्यांचे शिष्य समजले जातात. 885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर चा पहिला कालखंड होता. तो मवाळमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळातील मवाळ मतवादी गटाचे अग्रणी नेते म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात. राजकारणाला आध्यात्मिकरणाचा विचार त्यांनी मांडला. एकोणिसाव्या शतकातील उदारमतवादी राजकीय विचारवंतांच्या साखळीमध्ये एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात. भारतातील इंग्रजी सत्ता म्हणजे दैवी वरदान आहे असे मानणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले यांनी सनदशीर राजकारणाला तात्त्विक आणि व्यावहारिक मान्यता दिली. महात्मा गांधींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरु मानले. गोपाळ कृष्ण गोखले हे कुशल राजनीतिज्ञ होते. राजकारणाच्या प्रति त्यांचा दृष्टीकोण उदारमतवादी होता. राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर घटनात्मक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. जहाल विचार व सरळ प्रतिकार, सशस्त्र क्रांती यावर गोपाळ कृष्ण गोखले यांचा विश्वास नव्हता. मात्र इंग्रजांच्या न्यायबुद्धी वर उदारतेवर निपक्षपातीपणावर त्यांचा विश्वास होता. गोखले यांच्या मते इंग्रजपूर्व काळात भारतात शांतता आणि सुव्यवस्था ही अस्तित्वात नव्हती. इंग्रजांच्या आगमनानंतर केवळ घटनात्मक मार्गाच्या आधारे ब्रिटिशांनी शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली. एकूणच गोपाळकृष्ण गोखले यांचा दृष्टिकोन हा ब्रिटिश धारजीॉना होता असे म्हणता येईल.

वसंत नीलकंठ गुप्ते

वसंत नीलकंठ गुप्ते (मे ९, इ.स. १९२८ - सप्टेंबर ९, इ.स. २०१०) हे मराठी समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक होते.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.