मे २९

मे २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४९ वा किंवा लीप वर्षात १५० वा दिवस असतो.

<< मे २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१

ठळक घटना आणि घडामोडी

सतरावे शतक

अठरावे शतक

एकोणविसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

मे २७ - मे २८ - मे २९ - मे ३० - मे ३१ - (मे महिना)

गणेश प्रभाकर प्रधान

गणेश प्रभाकर प्रधान (ऑगस्ट २६, इ.स. १९२२ - मे २९, इ.स. २०१०) हे समाजवादी विचारवंत, राजकारणी व मराठी भाषेमधील लेखक होते. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते.

चौधरी चरण सिंग

चौधरी चरण सिंग (२३ डिसेंबर, इ.स. १९०२ - २९ मे, इ.स. १९८७) हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते. २३ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी भारतात किसान दिन म्हणून साजरा केला जातो.

जॉन एफ. केनेडी

जॉन फिट्झजेराल्ड केनेडी (इंग्लिश: John Fitzgerald Kennedy ), टोपणनाव जॅक केनेडी (इंग्लिश: Jack Kennedy), (मे २९, इ.स. १९१७; ब्रुकलिन, मॅसॅच्युसेट्स, अमेरिका - नोव्हेंबर २२, इ.स. १९६३; डॅलस, टेक्सास, अमेरिका) हा अमेरिकेचे ३५वा राष्ट्राध्यक्ष होता. २० जानेवारी, इ.स. १९६१ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या केनेडीची २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी पदावर असतानाच हत्या झाली.

केनेडी दुसर्‍या महायुद्धात दक्षिण प्रशांत महासागर आघाडीवरील युद्धमोहिमेत प्रत्यक्ष लढला होता. त्यानंतर इ.स. १९४७ ते इ.स. १९५३ या कालखंडात त्याने अमेरिकन प्रतिनिधिगृहात मॅसेच्युसेट्सच्या ११व्या संसदीय जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.

केनेडी याची २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी टेक्सासातील डॅलस शहरात हत्या झाली. खुल्या लिमोझिन गाडीतून जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. टेक्सास प्रांताचे गव्हर्नर जॉन कॉनली गाडीच्या सुरुवातीच्या भागात केनेडी यांच्यासोबत बसले होते. कॉनली या हल्ल्यात जखमी झाले आणि जेडी टिपीट या पोलीस अधिकाऱ्याचा थोड्या वेळाने मृत्यू झाला होता. ली हार्वे ओस्वाल्ड नावाच्या व्यक्तीवर हत्या करण्याचा आरोप ठेवण्यात आला; मात्र खटल्याची सुनावणी होण्यागोदर अवघ्या दोनच दिवसांत जॅक रूबी नामक हल्लेखोराने गोळ्या झाडून त्याची हत्या केली. फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, वॉरन आयोग व अमेरिकन प्रतिनिधिगृहाच्या हत्या-चौकशी समितीने एकटा ओस्वाल्डच हत्येस जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला. त्यासोबतच काही वादग्रस्त श्राव्य पुराव्यांवरून प्रतिनिधिगृहाच्या हत्या-चौकशी समितीने एखादे कारस्थान हत्येस कारणीभूत असल्याचीही शक्यता व्यक्त केली.

भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००७

भारतीय क्रिकेट संघ मे २००७ मध्ये बांगलादेशच्या दौर्‍यावर गेला. त्यात दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळले गेले.

मे २७

मे २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४७ वा किंवा लीप वर्षात १४८ वा दिवस असतो.

मे २८

मे २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४८ वा किंवा लीप वर्षात १४९ वा दिवस असतो.

मे ३०

मे ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५० वा किंवा लीप वर्षात १५१ वा दिवस असतो.

मे ३१

मे ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५१ वा किंवा लीप वर्षात १५२ वा दिवस असतो.

मोरारजी देसाई

मोरारजी देसाई (२९ फेब्रुवारी १८९६ – १० एप्रिल १९९५) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक कार्यकर्ते होते. ते १९७७ ते १९७९ दरम्यान जनता पार्टीने तयार केलेल्या सरकारमध्ये भारताचे ४थे पंतप्रधान बनले.

राजकारणातील त्यांच्या दीर्घ कारकीर्दीत त्यांनी सरकारमध्ये अनेक महत्वपूर्ण पदांवर जसे की: बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि भारताचे दुसरे उपपंतप्रधान म्हणून काम केले.

सुशीलादेवी बापूराव पवार

सुशीलादेवी बापूराव पवार ऊर्फ वनमाला (मे २२, इ.स. १९१५ - मे २९, इ.स. २००७; ग्वाल्हेर; मध्य प्रदेश, भारत) या मराठी आणि हिंदी चित्रपटांतील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री होत्या. श्यामची आई चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना इ.स. १९५३ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा भारतातील राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.

स्नेहल भाटकर

स्नेहल भाटकर (पूर्ण नाव:वासुदेव गंगाराम भाटकर) (जुलै १७, १९१९; मुंबई - मे २९, २००७; मुंबई) हे मराठी चित्रपट, मराठी नाटके, हिंदी चित्रपटांतील नावाजलेले संगीतकार होते.

स्वीडन फुटबॉल संघ

स्वीडन राष्ट्रीय फुटबॉल संघ (स्वीडिश: svenska fotbollslandslaget) हा स्वीडन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. स्वीडनने आजवर ११ विश्वचषकांमध्ये तर ५ युरो स्पर्धांसाठी पात्रता मिळवली आहे. स्वीडनने १९५८ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठली होती परंतु त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. १९४८ लंडन ऑलिंपिक स्पर्धेत स्वीडनने सुवर्णपदक तर १९२४ व १९५२ मध्ये कांस्यपदके मिळवली.

१९८६ फिफा विश्वचषक

१९८६ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची तेरावी आवृत्ती स्पेन देशामध्ये ३१ मे ते २९ जून १९८६ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १०९ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

आर्जेन्टिनाने अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीला ३–१ असे पराभूत करून आपले दुसरे अजिंक्यपद मिळवले. ह्या स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीमधील आर्जेन्टिना विरुद्ध इंग्लंड ह्या सामन्यातील दिएगो मारादोनाने मारलेले दोन गोल स्मरणीय ठरले. पहिला गोल मारादोनाने हाताने चेंडू ढकलून केला ज्याला हँड ऑफ गॉड असे संबोधले जाते तर दुसरा गोल त्याने एकट्याने चार इंग्लिश बचावपटूंना चकवून केला ज्याला गोल ऑफ द सेंच्युरी (शतकामधील सर्वोत्तम गोल) असे ओळखले जाते.

२००५ फॉर्म्युला वन हंगाम

२००५ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५९वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १९ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. ६ मार्च २००५ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर १६ ऑक्टोबर रोजी चिन मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

२०१६ फॉर्म्युला वन हंगाम

२०१६ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६७वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये २१ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २२ चालकांनी सहभाग घेतला. २० मार्च २०१६ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर २७ नोव्हेंबर रोजी अबु धाबी मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.