महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हा महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अधीन असलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी मराठी विश्वकोश कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी राज्यकारभारासंबंधी मूलभूत धोरण सूचित करणारी काही सूत्रे सांगितली. त्या सूत्रांनुसार मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृदधीसाठी राज्य शासनाने दिनांक 19 नोव्हेंबर 1960 रोजी कै. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. या मंडळाने जे अनेकविध उपक्रम सुरू केले, त्यांपैकी एक प्रमुख व वैशिष्टयपूर्ण उपक्रम म्हणजे मराठी विश्वकोशाची निर्मिती होय. दिनांक 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे विभाजन होऊन मराठी विश्वकोशाच्या संपादन व प्रकाशन कार्यार्थ महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या राज्यस्तरीय मंडळाची स्थापना करण्यात आली.

Marathi

विश्वकोश निर्मिती मंडळाचे आजवरचे अध्यक्ष व प्रमुख संपादक[१]

क्र. अध्यक्ष कार्यकाल
१. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी १९ नोव्हेंबर १९६० ते २७ मे १९९४
२. प्रा. मेघश्याम पुंडलिक रेगे ४ जून १९९४ ते २८ डिसेंबर २०००
३. प्रा. रा. ग. जाधव १६ जानेवारी २००१ ते १० फेब्रुवारी २००३
४. डॉ. श्रीकांत जिचकार २१ जुलै २००३ ते २ जून २००४
५. डॉ. विजया वाड ९ डिसेंबर २००५ ते ८ डिसेंबर २००८ आणि जून २००९ पासून ते १६ फेब्रुवारी २०१५.
६. ‍‍‍‍‍‍ . दिलीप करंबेळकर ०८ ऑगस्ट २०१५ ते आजतागायत

संदर्भ व नोंदी

  1. ^ http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=article&id=376:2011-01-11-09-57-56&Itemid=92

अधिकृत संकेतस्थळ

संकेतस्थळ: http://vishwakosh.org.in संकेतस्थळ: [१]

पहा

ऑगस्टस

ऑगस्टस (पूर्ण नाव - गेइअस ज्युलिअस सीझर ओक्टेवियन डिवी फिलीअस ऑगस्टस) (लॅटिन : Imperator Caesar Divi F. Augustus) (जन्म - २३ सप्टेंबर, इ.स.पू. ६३, रोम मृत्यू - १९ ऑगस्ट, इ.स. १४, नोला) ऑगस्टस हा रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट होता.

कुळीथ

कुळीथ (अथवा हुलगा) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे कडधान्य आहे. कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते.

कोल्हापूर संस्थान

कोल्हापूर संस्थान हे ब्रिटीश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. कोल्हापूर संस्थान हे तत्कालीन मराठा संस्थानांतील एक प्रमुख संस्थान होते.

महाराणी ताराबाई यांनी १७०७ च्या सुमारास कोल्हापूर राज्याची स्थापना करून आपल्या मुलाला म्हणजेच दुसऱ्या शिवाजी यांना गाडीवर बसवले.

भारत स्वतंत्र झाल्यावर कोल्हापूरचे महाराजा छत्रपती शहाजी (द्वितीय)यांनी हे संस्थान भारतात विलीन केले.

कोसल

कोसल हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

चंदेल्ल घराणे

चंदेल्ल घराणे हे मध्यप्रदेशातील एक राजपूत वंशीय घराणे होते. या घराण्यातील राजांनी खजुराहो येथे बांधलेल्या मंदिरांमुळे हे घराणे अजरामर झालेले आहे.इ.स.च्या ९ व्या शतकापासून ते इ.स.च्या १३ व्या शतकापर्यंत यांनी मध्य भारतावर राज्य केले.

टाकळा

टाकळा या वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॅशिया टोरा ( cassia tora) आहे .हि भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. यच्या कोवळ्या पानाची भाजी करतात.ती पौष्टिक व वातनाशक असते.प्रसूती नंतर टाकल्याची भाजी करून स्त्रियांना खायला देतात.

टेंबे स्वामी

वासुदेव गणेश टेंबे ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी (जन्म : १३ ऑगस्ट, इ.स. १८५४ (श्रावण वद्य ५ शके १७७६) माणगांव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग - मृत्यू : २४ जून, इ.स. १९१४ गरूडेश्वर, बडोदा, गुजरात) हे दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी रचना करणारे कवी व लेखक होते. पत्‍नीच्या मृत्यूनंतर त्यांनी उज्जयिनीच्या नारायणानंद सरस्वतींकडून संन्यासदीक्षा घेतली व वासुदेवानंद सरस्वती या नावाचा स्वीकार केला. वासुदेवानंद सरस्वतींना दत्तसंप्रदायात श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानले जाते.

द्वारकानाथ माधव पितळे

द्वारकानाथ माधव पितळे, ऊर्फ नाथमाधव, (एप्रिल ३, इ.स. १८८२; मुंबई, ब्रिटिश भारत - जून २१, इ.स. १९२८; मुंबई, ब्रिटिश भारत) हे मराठी कादंबरीकार होते.

केवळ ४६ वर्षाच्या आयुष्यातील मोठा काळ नाथमाधवांनी शिवाजीवरील संशोधनात घालवला. ऐतिहासिक साहित्याबरोबरच आपल्या लिखाणातून त्यांनी नेहेमीच बालविवाहातून निर्माण होणार्‍या समस्या वाचकांपुढे मांडल्या. ते स्त्री शिक्षणाचे व पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. नाथमाधव हे एक उत्तम शिकारी होते.

पद्मा गोळे

पद्मा गोळे (जुलै १०, इ.स. १९१३; तासगाव - फेब्रुवारी १२, इ.स. १९९८) या मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार होत्या.

पूस नदी

पूस नदी ही पैनगंगा या नदीची उपनदी आहे. ही नदी वाशीम जिल्ह्यात उगम पावते. पूसवरून पुसद हे गावाचे नाव पडले असावे. ही नदी माहूर जवळ हिवरा संगम येथे पैनगंगेला जाऊन मिळते.

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

बडनेरा

बडनेरा हे अमरावतीजवळचे मुख्य रेल्वेजंक्शन आहे.

बोडो भाषा

बोडो ही भारत देशाच्या आसाम राज्यामधील एक भाषा आहे. ही भाषा बोडो जमातीचे सुमारे १३ लाख लोक वापरतात.

भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार बोडो ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.

बोडो हा चिनी-तिबेटी भाषासमूहातील भाषांचा आसामातला गट आहे. बोडो गटात गारो, त्रिपुरी व मीकीर याही महत्त्वाच्या बोली आहेत. बोडो भाषेतील उपसर्ग किंवा प्रत्यय अत्यंत तोकडे असून भाषिक परिवर्तनात बोडो गटातील बोलींचे बहुतेक सर्व उपसर्ग नष्ट झाले आहेत. केवळ क्रियापदांचे कारक किंवा सकर्मक रुपदर्शक फ-किंवा प-हा उपसर्ग तग धरून आहे.

भोकरदन

गुणक: 20°14′48″N 75°46′14″E

भोकरदन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे.

वाशिम

वाशिम हे वाशीम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहराची लोकसंख्या ६२,८६३ आहे.

विविध ज्ञानविस्तार (नियतकालिक)

विविध ज्ञानविस्तार हे इ.स. १८६७ साली सुरू झालेले मराठी भाषेतील मासिक होते. रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी या मासिकाची स्थापना केली. भौतिक व सामाजिक शास्त्रांतील विविध ज्ञानशाखांविषयी तत्कालीन विद्वानांनी, अभ्यासकांनी लिहिलेले लेख या मासिकात छापून येत असत. हे मासिक इ.स. १९३७ सालापर्यंत चालले.

विषुवांश

खगोलीय विषुववृत्तावर वसंतसंपात बिंदूपासून पूर्वेकडे असलेल्या खगोलीय वस्तूच्या (उदा., ताऱ्याच्या) होरावृत्तापर्यंतचे कोनीय अंतर म्हणजे विषुवांश (इंग्रजी: Right Ascension (RA) - राईट असेन्शन; चिन्ह: α) होय.

सूक्ष्मतरंग

१ ते १०० गिगाहर्ट्‌झ वारंवारता आणि ०·३ ते ३० सेंमी. दरम्यान तरंगलांबी असलेल्या विद्युतचुंबकीय प्रारणाला सूक्ष्मतरंग (इंग्रजी: microwave - मायक्रोवेव्ह) म्हणतात. अवरक्त किरणे व रेडिओ तरंग यांना विलग करू शकणारी सुस्पष्ट सीमारेषा सूक्ष्मतरंगांत नाही.

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.