महाराष्ट्रीय ज्ञानकोश

महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा इ.स. १९२१ ते इ.स. १९२९ सालांदरम्यान २३ खंडांमध्ये प्रकाशित झालेला, श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संकलित, संपादित केलेला मराठी भाषेतील ज्ञानकोश आहे.

बाह्य दुवे

  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे वेबप्रकाशित ( यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे संबधीत वेबसाईटवर कॉपीराइट © २०१२ दावा तळटीपेत नमुद आहे. या महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील श्रीधर व्यंकटेश केतकर (मृत्यू इ.स.१९३७) यांचे स्वत:चे लेखनावर आणि इतरही बहुतांश लेखनावर कॉपीराईट लागावयास नको,पण रचनेचा आणि मजकुर परिष्कृत केला गेल्यास त्यावर कॉपीराईट लागतो. याची नोंद घ्यावी )
आइ नदी

आइ नदी अथवा ऐए नदी अथवा अइ नदी (असमीया भाषा: আই নদী) हि भारताच्या आसाम राज्यामधील एक नदी आहे. आइ नदी भूतानमध्यें उगम पावून तीस भूतान मध्ये अनेक छोट्या उपनद्या मिळतात. खडकाळ प्रदेशांतून पूर्वेस गोवालपारा चिरांग आणि बॉँगाइगांव या जिल्ह्यांतून वहात जाऊन बंगपारी येथे मनास (ब्रम्हपुत्राला मिळणारी एक नदी) नदीला मिळते. नदीची लांबी ९५ मैल आहे. त्यातील साधारणत: 64 miles/ 103km आसाम राज्यात आहे. आइ नदीत चार टन पर्यंत ओझ्याच्या होड्या चालतात. Guwahati-Rangiya-New Bongaigaon Mainline of Northeast Frontier Railway Bijni आणि Patiladoha स्टेशनांच्या दरम्यान आइ नदी क्रॉस होते.

आहोम

अहोम ही आसाम येथील एक जमात आहे. यांनीच आहोम साम्राज्य उभारले. यांचा मूळ पुरुष म्हणून ताइ जमातीतून आलेल्या सुकाफाचे नाव घेतले जाते. हे मूळचे ब्रह्मदेशातील रहिवासी असावेत असे मानले जाते. ही ब्रह्मदेश, तिबेटी, हिंदु अश्या मिश्रणातून बनलेली संस्कृती आहे. या जमातीची आहोम भाषा अस्तित्त्वात होती. परंतु कालौघात ही भाषा लुप्त झाली आहे. या भाषेची लिपीही अस्तित्त्वात होती. या जमातीत दोन विवाह पद्धती आहेत चकलोंग आणि पिढामुरी समारंभ.

कालवा

कालवे म्हणजे पाणी वाहून नेण्याकरतां, किंवा शेतीला पाणी पुरवठ्यासाठी तयार केलेला जमीनींतील सखल मार्ग होय. याचा उपयोग होड्या, जहाजें, वाहने चालविण्याकरता होतो. हा तयार केलेला कृत्रिम जलमार्ग आहे.

गाहा सत्तसई

शालिवाहन राजा हाल(हल) सातवाहन (इसवी सन पूर्व २०० ते इस २०० ) याने केलेल्या गाथारूपी लोककाव्याच्या व काही स्वत: रचलेल्या गाथांच्या एकत्रित संग्रहास गाहा सत्तसई अथवा गाथासप्तशती असे म्हणतात.

गाहा सत्तसई हा, इतर संशोधकांसोबतच स.आ. जोगळेकर यांच्या मतानुसार महाराष्ट्री प्राकृत भाषेत असलेला आणि महाराष्ट्रात रचना झालेला कालानुक्रमे आद्यग्रंथ आहे,तर त्याच्या गुणांनी अग्रगण्य आहे. संशोधक डॉ.सुकथनकर यांच्या मतानुसार "गाथा सप्तशती हा प्राकृत वाड्‌मयातील आद्य व अग्रगण्य ग्रंथ आहे; प्राचीन व बहुमोल सुभाषितांचा संग्रह आहे, साहित्यशास्त्रज्ञांनी त्यातील वचने उधृत केली आहेत; रसिक पंडितांनी त्यावर टीका लिहिल्या आहेत."गाथासप्तशती मधील प्रत्येक गाथा स्वयंपूर्ण आहे आणि त्यात मानवीय भावना, व्यवहार आणि प्राकृतिक दृष्यांचे अत्यंत सुरस आणि सौंदर्यपूर्ण चित्रण आहे. निसर्गचित्रणात विंध्य पर्वत आणि गोला (गोदावरी) नदीचा पुनःपुन: उल्लेख येतात. खेडी, शेतकर्‍यांचे ग्रामीण जीवन, उपवन, झाड़ी, नदी, विहिरी, तलाव इत्यादीसोबत पुरुष-स्त्रियांचे विलासपूर्ण व्यवहार आणि प्रणयभावनेच विलोभनीय आविष्कार या ग्रंथात आहे.प्रेमाच्या विविध अवस्थाही मार्मिकपणे शब्दांकित केलेल्या आहेत. ह्या गाथांतून सुंदर निसर्गचित्रेही वैपुल्याने आढळतात. त्यांशिवाय होलिकोत्सव, मदनोत्सव ह्यांसारखे विशेष प्रसंग; तसेच विविध व्रते, आचारादींची वर्णनेही त्यांतून येतात. महाराष्ट्रातील तत्कालीन समाजजीवनाचे प्रतिबिंब या गाथांतून आढळून येते.

ज्ञानकोश

ज्ञानकोश हे एक संदर्भसाधन आहे. हा कोशसाहित्याचा एक प्रकार आहे. ज्ञानकोशाच्या धोरणानुसार त्यात संबंधित विषयाची माहिती लहान, मध्यम किंवा मोठ्या लेखांच्या स्वरूपात देण्यात येते. ही माहिती संक्षिप्त स्वरूपात, साधार व वस्तुनिष्ठपणे मांडलेली तसेच ती शक्य तितकी अद्ययावत असावी असा संकेत आहे.

ज्ञानकोशातील अशा तऱ्हेने माहिती देणाऱ्या लेखाला नोंद अशी संज्ञा आहे. ज्ञानकोश हा अशा नोंदींचा संग्रह असतो. मात्र ह्या नोंदींच्या संग्रहाला विशिष्ट रचना असणे आवश्यक असते. ज्ञानकोशातील नोंदी विशिष्ट तार्किक क्रमाने लावण्यात येतात. हा क्रम विषयानुसार, कालक्रमानुसार, नोंदींच्या शीर्षकांनुसार अकारविल्हे इ. विविध प्रकारचा असू शकतो. परस्परांशी संबंध असलेल्या नोंदींतील संबंध दाखवण्याची काही एक योजना ज्ञानकोशाच्या रचनेत सामान्यतः केलेली असते. त्यामुळे एका नोंदीचा दुसऱ्या नोंदीशी असलेला संबंध स्पष्ट होणे सुकर होते. एखाद्या विषयाची तोंडओळख करून घ्यायला ज्ञानकोश हे उत्तम साधन आहे.

मराठी भाषेतील ज्ञानकोशरचनेची परंपरा ही प्रामुख्याने एकोणिसाव्या शतकात सुरू झालेली दिसते.

बहाळ शिलालेख

बहाळ शिलालेख हा जळगाव जिल्ह्यातील बहाळ येथील सारजादेवीच्या मंदीरात मिळाला. या लेखाची भाषा संस्कृत असून लिपी नागरी आहे. यात उल्लेखिलेली तिथी चैत्र आद्य प्रतिपदा चित्रभानु संवत्सर अशी आहे. हा लेख यादवराजा सिंघणदेव याच्या कारकिर्दीतील आहे. या लेखाचा उद्देश सिंघणदेव याचा ज्योतिषी अनंतदेव याने द्वारजा (सारजादेवी) देवालयाचा पाया बांधला हे नमूद करण्याचा होता. या लेखाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात अनंतदेव व त्याचे पूर्वज यांची माहिती दिलेली असून दुसर्या भागात सिंघणदेव व त्याचा पिता यांची स्तुती केलेली आहे. या लेखात पुढे जैत्रपालाने गणपतीला आंध्रप्रदेशाचा प्रमुख केल्याचा उल्लेख आहे. विवेकसिंधु ग्रंथ लिहिणारा प्रसिद्ध मराठी आद्यकवि मुकुंदराज हा याच जैत्रपालाच्या पदरीं होता असे म्हटले जाते.

ब्राह्मण समाज

ब्राह्मण समाज हा लेख हिंदू ब्राह्मण (जात) असलेल्या लोकांच्या समाज रचनेवर आधारित आहे.

मार्च ३१

ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ३१ मार्च हा वर्षाचा ९० व्या दिवस आहे (लीप वर्षात ९१ अंशांचा). वर्ष संपेपर्यंत २७५ दिवस बाकी असतात. रविवार किंवा सोमवार (५७) पेक्षा मंगळवार, गुरुवार किंवा शनिवार (प्रत्येकी ४०० वर्षांमध्ये प्रत्येक ५८ वर्षांत) पडण्याची शक्यता अधिक आहे, आणि बुधवार किंवा शुक्रवार (५६) रोजी होण्याची शक्यता कमी आहे.

माशी

माशी हा घरांमध्ये आढळला जाणारा उडणारा कीटक आहे. हा किटक मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरवणारा आहे. हा किटकप्रकार "डिप्टेरा' गटात आहे. डाय म्हणजे दोन आणि टेरा म्हणजे पंख, या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून डिप्टेरा हा शब्द बनला आहे. अर्थातच माश्‍यांच्या शरीरावर पंखांच्या दोन जोड्या असतात. माशी आपले पंख दर सेकंदाला दोनशे वेळा हलवते. माशीचा उडण्याचा वेग ताशी सात किलोमीटर्स इतका असतो. सगळ्यात लहान आकाराच्या माशी एका इंचाच्या विसाव्या भागाइतकी छोटी असते. सगळ्यात मोठी माशी साधारण तीन इंच लांबीची असते. माशी फक्त द्रवपदार्थ खाते. नांगी नसल्यामुळं माशी दंश करू शकत नाही. पावसाळ्यातील वातावरण हे तापमान, दमटपणा, जमिनीतील ओलावा हे माशीसाठी पोषक असते. एका वेळी मादी १०० ते १५० अंडी घालते. त्यातून २४ ते ४८ तासात माश्या जन्माला येतात. माश्‍यांच्या प्रादुर्भावाने पशूंच्या आरोग्यावर तसेच उत्पादनावरही परिणाम होतो.

रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३

रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ हा ब्रिटिश भारतातील एक कायदा असून तो इ.स. १७७४ ते इ.स. १७७४ अशी दहा वर्षे कार्यान्वित होता.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश पार्लमेंटकडे कर्ज मिळण्यासाठी विनंती केली. लॉर्ड नॉर्थ हा त्यावेळी इंग्लंडचा मुख्य प्रधान होता. त्याने पार्लमेंटमध्ये एक ठराव करून कंपनीने हिंदुस्थानातील व्यापारामुळे जो फायदा झाला असेल त्यावर पार्लमेंटची सत्ता आहे असे ठरवले व कंपनीला कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी पार्लमेंटमध्ये एक कायदा पास करून घेतला. इ.स. १७७३ सालीं नॉर्थने कंपनीच्या राज्यकारभारासंबंधी जो कायदा केला त्याला रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ असे म्हणतात. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा करण्यात आला. बंगालच्या राज्यपालांना गव्हर्नर जनरल ऑफ कलकत्ता हा दर्जा देण्यात आला. मद्रास व मुंबईचे राज्यपाल त्यांच्या अमलाखाली आले. कंपनीवर देखरेख ठेवण्याच्या कामात मदत करण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या हाताखाली चार सभासदांची एक समिती नेमण्यात आली. कलकत्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. तिथे मुख्य न्यायाधीश आणि अन्य तीन न्यायाधीशांची नेमणूक झाली. हे न्यायाधीश गव्हर्नर जनरलच्या अधिकाराखाली येत नसत. हा कायदा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठीच बनवलेला होता. परंतु ह्या कायद्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. या कायद्यामुळे गव्हर्नर जनरलला संपूर्णत: समितीच्या सदस्यांवर अवलंबून रहावे लागे. त्याला प्रत्यक्षात निर्णय घ्यायचे काहीही अधिकार नव्हते.

अमेंडिंग अ‍ॅक्ट १७८१द्वारे यात काही सुधारणा करण्यात आल्या.

लगोऱ्या

लगोऱ्या हा एक महाराष्ट्र व अन्य राज्यांमध्ये प्रचलित असलेला एक पारंपारिक खेळ आहे. लगोऱ्या, चेंडू एवढेच साहित्य, साधे सोपे नियम व छोटेसे मैदान हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे. खेळाचा उद्देश म्हणजे यात असलेल्या लगोऱ्या एकावर एक ठेवणे व त्या चेंडूने विस्कळीत करणे.

वाफळे शिलालेख

वाफळे शिलालेख हा सोलापूर जिल्ह्यातील वाफळे येथे असलेल्या एका जुन्या मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीजवळ आहे. याची भाषा संस्कृत असून इ.स.च्या बाराव्या शतकातील नागरी लिपी आहे. या शिलालेखाचा उद्देश यादव सिंघणाच्या नोकरीत असलेल्या नारण (नारायण) नामक व्यक्तीच्या नातवाने उपल येथील तेजेश्वराच्या मंदिराला दिलेल्या निरनिराळ्या देणग्या नमूद करणे हा होता. जैत्रपालाच्या राजवटीत दिलेल्या देणग्या कायम केल्याचा उल्लेखही या शिलालेखात केलेला आहे. विवेकसिंधु ग्रंथ लिहिणारा प्रसिद्ध मराठी आद्यकवि मुकुंदराज हा याच जैत्रपालाच्या पदरीं होता असे म्हटले जाते.

संथा

संथा हा शब्द मराठी भाषेत वेगवेगळ्या अर्थच्‍छटांनी वापरला जातो. गुरूकडून दीक्षा घेणे; आदर्श कार्यास/उद्दिष्टास/ध्येयास व्रत असल्याप्रमाणे अंगीकारणे; पाठ करण्याची (पठणाची)/ (लक्षात ठेवण्यासाठी) क्रिया, पाठाचे आवर्तन करण्याची क्रिया इत्यादीं अर्थच्‍छटांचा यात समावेश होतो. भारतातील विविध वेदादी पारंपरिक ग्रंथ विद्यार्थ्यांकडून मुखोद्गत करून घेण्याच्या पद्धतीसही संथा असे म्हटले जाते.

सांचिन, संस्थान

सांचिन (इ.स.१७९१ ते इ.स. १९४७) हे जंजिऱ्याच्या सिद्दीच्या वंशजांनी, तत्कालीन पेशव्यांशी (सवाई माधवराव पेशवे? ) तह करून गुजराथेत सुरतेजवळ सांचिन येथे स्थापन केलेले संस्थान होते. जंजिऱ्याचे सिद्दी हे अहमदनगर आणि विजापूर येथील राजाजवळ आरमाराच्या नोकरीत होते. हीच नोकरी त्यांनी मोंगलांच्या वेळीही केली. मोंगलांच्या ऱ्हासानंतर ते जंजिऱ्यास राहूं लागले. या सिद्दींनी मराठे व इंग्रज ह्यांच्याबरोबर अनेक उलाढाली केल्या.जंजिऱ्याचा नवाब सिद्दी अब्दुल रहमान याचा मुलगा सिद्दी अब्दुल करीम हा सिद्दी जोहर याच्या बंडाळीमुळे/आक्रमणामुळे १७८४ मध्ये पळून पुण्याला पेशव्यांच्या आश्रयाला आला. त्याने १७९१ च्या पेशव्यांसोबतच्या तहात जंजिऱ्याचे अधिकार (केवळ कागदोपत्री ?) सोडून त्या एवजी सांचिनची जहागिरी मिळवली.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.