मराठा

मराठा ही महाराष्ट्रातील एक क्षत्रिय हिंदू जात आहे. मराठा जातीच्या विविध पोटजाती सुद्धा आहेत – , 96 कुळी मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी इत्यादी.[१][२]

महाराष्ट्रासह, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, हरियाणा तसेच मध्य प्रदेश,गुजरात ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत. मराठी, तमिळ, तेलुगू, तंजावर मराठी या मराठ्यांच्या भाषा आहेत.

शब्द उत्पत्ती

मराठा या शब्दाचे संस्क्रुत रुप महाराष्ट्र आहे अर्थात ज्यांचे राष्ट्र मोठे आहे ते मराठे. मरहट्टा, महारठ्ठा,रठ्ठा म्हणजे राष्ट्र,रठ्ठा मार देणे,महारथ, महारथी म्हणजे मराठा उर्फ राष्ट्रपती या संज्ञा प्राचीनकाळी अत्यंत शौर्यशाली रणधुरंधर क्षत्रिय राजबिंड्या पुरुषांनाच लावीत असत. याला आधार रघुवंशाच्या ६व्या सर्गामधील पुढील श्लोक आहे-

"'एको दस सहस्राणि योधयेद्यस्तु धान्विनाम। शस्त्रशास्त्रप्रवीणश्च स वै प्रोक्तो महारथ:। अमितान्योधयेद्यस्तु संप्रोक्तोऽतिरथस्तु स:। रथस्त्वेकेन योद्धा स्यात्तन्न्यूनोऽर्द्धरथ: स्मृत:।' !!

भावार्थ - शस्त्रशास्त्रात म्हणजे रणविद्येत प्रवीण होऊन जो एकथा क्षत्रिय दहा हजार योद्ध्यांबरोबर लढू शकतो त्या रणधुरंधरासच मरहट्टा- महारथ महारथी म्हणतात." या संबंधाने डॉ.भांडारकर म्हणतात,"महारथ, महारथी, मरहट्टा व मराठा यांचे संस्कृरुत रूप महाराष्ट्र असे आहे. अर्थात महाराष्ट्र म्हणजे महारथींचा/महारट्ट्यांचा उर्फ मराठा क्षत्रियांचा देश होय. ख्रिस्ती सनापूर्वी सातव्या शतकात क्षत्रिय दक्षिणेत आले. विँध्य पर्वताच्या दक्षिणेकडील देशासंबंधाने पाणिनीच्याही पूर्वी कात्यायनाने आपल्या वार्तिकांत उल्लेख केला आहे. हा या बाबीस सबळ पुरावा होय. तसेच ख्रिस्ती शकाच्या पूर्वी तिसऱ्या शतकाच्या अशोकाच्या शिलालेखावरून जास्त पुरावा मिळतो. या लेखात राष्ट्रिक पैठेणिक अशी नावे आढळतात. पैठण येथे राहणाऱ्यांना पैठेणिक व हल्लीच्या मराठ्यांचे पूर्वज ते राष्ट्रिक होत. अशोकाच्या कुंडे येथील शिलालेखात महाभोजाचाही उल्लेख आहे. याप्रमाणे पतंजलीच्या १०० वर्षे आधी उत्तर-दक्षिणेत दळणवळण चालू होते व महाराष्ट्रात राष्ट्रिक,महाराष्ट्रिक व भोज लोकांची राज्ये होती.(संदर्भ-भांडारकारकृत दक्षिणचा इंग्रजी इतिहास पेज ११)

तसेच हरिवंशात नाग उपनावाच्या क्षत्रिय राजकन्येपासून झालेल्या यदूच्या 4 पुत्रांनी सह्याद्रीपासून थेट कन्याकुमारीपर्यंत ४ राज्ये स्थापिली असा उल्लेख सापडतो. त्याचप्रमाणे विदर्भ देशाचे भोज राजे सोमवंशी असून ते यदुच्या कुळात उत्पन्न झालेले आहेत असा उल्लेख हरिवंशात आढळतो. यावरून महाराष्ट्रात व वऱ्हाडात राहणारे लोक चंद्रवंशी यादव-जाधव मराठे क्षत्रिय होते हे सिद्ध होते.ख्रिस्ती सनापूर्वी ७ व्या शतकापासून इसवी सनाच्या ३ऱ्या शतकापर्यंत वऱ्हाडावर व महाराष्ट्रावर राष्ट्रे (रठ्ठे) उर्फ महाराष्ट्रे(महारठ्ठे) यांचे राज्य होते. पुढे ते अशोकाचे मांडलिक झाले आणि पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी इसवी सनाच्या ६व्या शतकापर्यंत राज्ये केली.

मराठ्यांचे प्राचीनत्व -

श्री वाल्मीकि रामायण - अयोध्याकांड, सर्ग ५१ श्लोक ६ यात दशरथाला महाराष्ट्रे (महारठ्ठे) विवर्धन असे म्हटले आहे.तसेच इसवी सनापूर्वी ६व्या शतकात जैन लोकांच्या "कृतांग सूत्र" या भद्रबाहूने लिहिलेल्या ग्रंथात महाराष्ट्र शब्द आढळतो. या ग्रंथाच्या आधाराने दुसऱ्या शामाचार्यानी लिहिलेल्या "श्री प्रज्ञापना उपांग सूत्र"यात महाराष्ट्र शब्द आढळतो. पश्चिम घाटात कार्ल्याजवळ भाजे नामक कोरीव लेणे आहे तेथील पाण्याच्या हौदावर

"महारथी साकोसिकी पुतसा! विष्णुदत्तसा देयाधमपोदी"

म्हणजे कौशिकपुत्र महारथी/महारठी/महारट्टी विष्णुदत्त याने हे बांधले असे लिहिले आहे आणि या लेण्याचा काळ इ स पूर्व ३०० वर्षाचा आहे. मगध देशावर नंदाचे राज्य असताना म्हणजे सुमारे २३०० वर्षांपूर्वी वररुची होऊन गेला. त्याच्या प्राकृुत प्रकाश या ग्रंथात "शेषं महाराष्ट्रिवत्" असा उल्लेख आहे यावरून महाराष्ट्र व मराठा शब्दाचे प्राचीनत्व स्पष्ट होते.

महाराष्ट्रकुलवंशावली ग्रंथात पुढील श्लोक आढळतो-

"सर्वेषु एक वर्णा ये कृष्यादि कर्मतत्परः ! नमस्कारेण मंत्रेण पंचयज्ञा सदैवहि! एषां ज्ञाति समुद्धोतु कुलानि षण्णवत्यपि ! वंशाश्चत्वार एवात्र सू्र्यचंद्र यदु शेषकः!!"

भावार्थ - महाराष्ट्रिक,महाराष्ट्रे उर्फ मराठे हा एक वर्ण आहे. या वर्णाचे लोक शेतकऱ्यांपासून राजापर्यंतच्या सर्व कार्यात तत्पर असतात. ते नमस्कारात्मक मंत्राने स्वतःच पंचयज्ञ करतात.आपल्या वर्णांची विवाहादि सर्व कर्मे स्वतः करतात.त्यांच्या जातीत ९६ कुळे आणि सूर्यवंश, चंद्रवंश, यदुवंश व शेषवंश असे चार वंश आहेत. यावरून मराठा व महाराष्ट्र शब्दाची प्राचीनता सिद्ध होते.(संदर्भ = क्षत्रियांचा इतिहास-भाग २ : डाॅ. के बी देशमुख पेज ११५ ते ११७).

यानंतरचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे शवरभाष्य {इ.सनाचे ३रे शतक} यातील पुढील वाक्य -

" ननु जनपदपुररक्षणवृत्तिमनुपजीत्यपि क्षत्रिये राजशब्दमांध्राः प्रयुंजते "

यावर कुमारिलाने (सातवे शतक) पुढील टिप्पणी जोडली आहे,

"दाक्षिणात्यसामान्येन आंध्राणामिति भाष्यकारेणोक्तम् "{मध्ययुगीन भारत भाग}

शवराच्या वेळी महाराष्ट्रात आंध्राचे राज्य होते यामुळे शवर नुसतेच म्हणतो की,'आंध्रामध्ये क्षत्रियकर्म करीत नसलेले म्हणजे देश किंवा पुर यांचे रक्षण न करणारे क्षत्रियसुद्धा आपल्यास राजा असा शब्द लावतात. कुमारिलाच्या वेळी महाराष्ट्र स्वतंत्र झाला होता,म्हणून त्याने असे लिहिले की,'दाक्षिणात्य सामान्यतः राज्य न करणारे क्षत्रिय आपल्यास राजा ही पदवी लावतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आजही ९६ कुळी मराठा राज्य नसताना देखील स्वतःस राजे म्हणवितात. ,म्हणजे शवरने ३ऱ्या शतकात व कुमारिलाने सातव्या शतकात वर्णिलेले महाराष्ट्रातील क्षत्रिय हे मराठाच होत हेच सिद्ध होते.

इतिहास

प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे

 • शिवाजीराव आढळराव पाटील
 • नरेंद्र घुले
 • चंद्रशेखर घुले
 • शिवाजीराव काकडे
 • हर्षदाताई काकडे
 • दिलीपराव लांडे शेवगांव
 • तुकाराम गडाख
 • चंद्रकांत खैरे
 • बदामराव पंडित
 • राजेश टोपे
 • अंकुशराव टोपे

हे सुद्धा पहा

संदर्भ

 1. ^ "एक मराठा लाख मराठा people". Encyclopedia Britannica (en मजकूर). 2018-09-16 रोजी पाहिले.
 2. ^ "India | Facts, Culture, History, Economy, & Geography". Encyclopedia Britannica (en मजकूर). 2018-09-16 रोजी पाहिले.
कान्होजी जेधे

कान्होजी जेधे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या साथीदारांपैकी एक होते. शहाजी भोसले यांचे सरदार असलेले जेधे यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मावळातील अनेक सरदारांचा पाठिंबा मिळवून दिला.

खडकीची लढाई

खडकीची लढाई ही तिसर्‍या इंग्रज-मराठा युद्धांतर्गत मराठा साम्राज्याचे पंतप्रधान दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्या सैन्यांमध्ये नोव्हेंबर ५, इ.स. १८१७ रोजी पुण्याजवळील खडकी येथे झालेली लढाई होती.

तंजावुरचे मराठा राज्य

तंजावरचे मराठा राज्य इ.स.च्या १७व्या ते १९व्या शतका दरम्यान भारतातील तमिळनाडू राज्यातील तंजावुर स्थित संस्थान होते. याचे राजे मराठीभाषक होते. येथील मराठी भाषा महाराष्ट्रातील भाषेपेक्षा वेगळी असून त्यास तंजावर मराठी असे नाव आहे. व्यंकोजी भोसले यांनी हे राज्य स्थापन केले.

तानाजी मालुसरे

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून त्यांंच्यासह असलेले तानाजी मालुसरे हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत सहभागी असलेली व्यक्ती आहेत.

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध हे इ.स. १८१७-१८मध्ये मराठे व इंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.व्दितीय इंग्रज मराठा युद्धाच्या नंतर मराठ्यांना आणि ब्रिटिशांना उसंत मिळाली,त्या दरम्यान ब्रिटिशांनी स्वत:ची शक्ती वाढवली परंतु मराठ्यांनी एकोपा टिकवला नाही आणि ते ब्रिटीशांच्या तुलनेत मराठे राजनैतिक आणि लष्करीदृष्ट्या कमी पडत गेले.अशा पार्श्वभूमीवर गव्हर्नर जनरल लॉर्ड हेस्टींग्सची नियुक्ती झाली. त्याने आपल्या कारकिर्दीत आक्रमक धोरणाचा अवलंब केला.नेपाळ युद्धाच्या समाप्तीनंतर पेंढारी लोकांशी संघर्ष सुरु करून अप्रत्यक्षरीत्या मराठ्यांनाच आव्हान दिले.परिणामी इंग्रज-मराठा युध्द सुरु झाले. त्यात हेस्टींग्सने भोसले, पेशवा बाजीराव दुसरा आणि शिंदे ह्यांना अपमानजनक तह स्वीकारण्यास भाग पडले. अखेर पेशव्याने अंतिम युध्द करण्याचा निर्णय घेतला.त्याला अप्पासाहेब भोसले आणि मल्हारराव होळकर (यशवंतराव होळकरांचा पुत्र) ह्यांनी साथ दिली.पण युद्धात पेशवा,भोसले आणि होळकरांना एकत्र येऊ न देता त्यांना इंग्रजांनी वेगवेगळे पराभूत केले.सीताबर्डीच्या लढाईत भोसल्यांचा, महित्पुरच्या लढाईत होळकरांचा आणि खडकी,कोरेगाव व आष्टा येथील लढाईत पेशव्यांचा पराभव झाला.अशा प्रकारे इंग्रजांसमोर मराठ्यांचा टिकाव लागला नाही,वरील सर्वांनी शरणागती पत्करली.बाजीरावाला पेशवेपद सोडावे लागले.त्याचा प्रदेश इंग्रजांनी आपल्या साम्राज्यात विलीन केला.छत्रपतीचे सातारा राज्य व इतर मराठा सरदारांच्या प्रदेशावर ब्रिटीश नियंत्रण प्रस्थापित झाले आणि खऱ्या अर्थाने मराठा सत्तेची समाप्ती झाली.

दुसरे इंग्रज-मराठा युद्ध

दुसरे इंग्रज-मराठा युद्ध हे मराठा साम्राज्य व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात इ.स. १८०३-०५ दरम्यान झालेले युद्ध होते.

पहिले इंग्रज-मराठा युद्ध

पहिले इंग्रज-मराठा युद्ध हे मराठा साम्राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात इ.स. १७७५-८२ दरम्यान लढले गेलेले युद्ध होते. सुरतेच्या तहापासून सुरू झालेले हे युद्ध सालबाईच्या तहानिशी संपले.सदर युध्द गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींगज च्या काळात घडले.

बाळाजी बाजीराव पेशवे

बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्या नंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांना २५ जुन १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली. त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने बाळसे धरले. मराठ्यांनी उत्तर भारतात जरब बसवली आणि साधारण इ.स. १७६० च्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य अशी ताकत होती.

परंतु १७६१ च्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. त्याच पराभवाच्या धक्याने २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

मराठा साम्राज्य

मराठा साम्राज्य इ.स. १६७४ ते इ.स. १८१८ पर्यंत भारतात अस्तित्त्वात असलेले हिंदू राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य शिवाजी महाराजांनी इ.स. १६४५ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालावधीत औरंगजेबाविरूद्ध गनिमी कावा वापरून केलेल्या लढायांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार प्रचंड वाढला. इ.स. १६८०मधील शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज गादीवर आले आणि आपल्या 8 वर्षाच्या झंझावाती कारकिर्दीत स्वराज्याच्या सीमा वाढवल्या. नंतर फंदफितुरीतून औरंगजेबाने त्यांची हत्त्या केली. त्यानंतर स्वराज्यात काही काळ अस्थैर्य माजले, संताजी आणि धनाजीसारख्या शूर सरदारांनी स्वराज्याचे अस्तित्व टिकवले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजींचे वंशज जरी राज्य करत असले तरी पंतप्रधान असलेल्या मनमानी करुन(प्रथम बाजीराव नंतर)पेशव्यांच्या हातात राज्यकारभाराची सूत्रे गेली . पेशवे हे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य अधिक विस्तार पावले शेवटी पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेरचा पेशवा दुसरा बाजीराव इंग्रजांबरोबर तिसर्‍या लढाईत पराभूत झाला व त्याने इंग्रजांच्या मदतीने पेशवा बनून बीठूर येथे स्थायीक झाला(झाशी राणी काल)

गनिमी कावा, डोंगरांतून अभेद्य किल्ले बांधणे व त्यायोगे आसपासच्या मलुखावर वचक ठेवणे हा मराठा साम्राज्याचा सुरुवातीला पाया होता. या साम्राज्याला मोठी किनारपट्टी होती व कान्होजी आंग्रे व इतर दर्यासारंगांच्या मदतीने ही सीमा प्रभावीपणे सांभाळली. दक्षिण भारतातील इतर राज्ये व मराठा साम्राज्यातील हा एक मोठा फरक होता. मराठी आरमाराने पोर्तुगीज व ब्रिटिश आरमारांना शह दिल्यामुळे त्यांचा उपयोग करून या परकीय सत्तांना किनाऱ्यांकडून शिरकाव करता आला नाही. कान्होजी आंग्रे यांनी भारतातील पहिले मोठे आरमार उभे केले व त्यामुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणले जाते.

मराठा साम्राज्याच्या टांकसाळी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैदिक राज्याभिषेकाने मराठा साम्राज्याची स्थापना झाली आणि हे साम्राज्य १६७४ - १८१८ पर्यंत अस्तित्वात होते. स्थाप्नेच्याच वेळी महाराजांनी रायगडास टांकसाळ स्थापून तेथून सोन्याचे 'होन' व तांब्याची 'शिवराई' पडून मराठा चलनाची सुरुवात केली.कालांतराने, जसेजसे साम्राज्य वाढत गेले, तसेतसे नव्या टांकसाळी स्थापल्या गेल्या. तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर यांतील बरीच टांकसाळी स्वतंत्र मराठा संस्थानिकांच्या सत्तेत जाऊन कार्यरत राहिल्या. या कंपनी अथवा ब्रिटीश राज कालीन टांकसाळींचा सदर लेखात उल्लेख केला नाही.

मानाजी पायगुडे

अटक विजय वीर मानाजी पायगुडे हे मातब्बर मराठा सरदार होते. १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला अटक चा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात मानाजी पायगुडे आघाडीवर होते.

मुरारबाजी देशपांडे

मुरारबाजी देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - मे १६, इ.स. १६६५) हा मराठा सैन्यातील वीर होता. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. इ.स. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे १६६५ रोजी मोगलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना त्यांस वीरमरण आले.

मोरोपंत त्र्यंबक पिंगळे

मोरोपंत त्र्यंबक पिंगळे (जीवनकाळ: इ.स.चे १७ वे शतक) हे छत्रपती शिवाजीराजांच्या काळातील मराठा दौलतीचे पंतप्रधान, अर्थात पेशवा होते.

राक्षसभुवनची लढाई

राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला.

वडगावची लढाई

वडगावची लढाई मराठे व इंग्रज यांच्यामध्ये पुण्यापासून साधारणपणे ४० किमी दूर असलेल्या वडगाव या ठिकाणी झाली. याला पहिले मराठा-इंग्रज युद्ध म्हणूनसुद्धा ओळखले जाते. मराठे व इंग्रज यांच्यात एकूण तीन लढाया झाल्या. भारताच्या इतिहासात या तीनही लढाया अतिशय महत्त्वाच्या आहेत. या लढायांत मराठ्यांचे नेतृत्व तुकोजीराव होळकर व महादजी शिंदे यांनी केले. मराठ्यांनी या लढायांत शिस्त आधुनिक डावपेच यांचे प्रदर्शन क‍रून इंग्रजांना परास्त केले व अखेरीस जेरीला आलेल्या इंग्रज फौजेचा वडगाव येथे पराभव केला. इंग्रजांना या पराभवामुळे मराठ्यांशी तह करावा लागला. परंतु इंग्रज गव्हर्नर यांनी हा तह नामंजूर करत युद्ध चालू ठेवले.

विश्रामबाग वाडा

विश्रामबाग वाडा हा मराठा साम्राज्याचा पेशवा दुसरा बाजीराव याचा जुन्या पुण्यातील राहता वाडा होता. इ.स. १८०७ साली सुमारे ३.५ लाख रुपये खर्चून हा वाडा बांधला गेला. शनिवार वाडा या पेशव्यांच्या वडिलार्जित वाड्यात राहण्यापेक्षा दुसर्‍या बाजीरावाने विश्रामबागवाड्यात राहणे पसंत केले. तिसर्‍या इंग्रज-मराठा युद्धात इ.स. १८१८ साली पुण्याचा पाडाव होईपर्यंत ११ वर्षे दुसर्‍या बाजीरावाचे येथे वास्तव्य होते. सुमारे २०,००० वर्ग फूट क्षेत्रफळाच्या या वाड्याचा बहुतांश भाग टिकला आहे. या वाड्यात सध्या टपाल कार्यालय, नगरपालिकेच्या काही कचेर्‍या व मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय आहे.

सवाई माधवराव पेशवे

सवाई माधवराव किंवा माधवराव नारायण (अन्य नामभेद: दुसरा माधवराव) (जन्मः इ.स. १७७४ ; किल्ले पुरंदर, मराठा साम्राज्य - मृत्यू :इ.स. १७९५ ; शनिवारवाडा, पुणे, मराठा साम्राज्य) हा मराठा साम्राज्याचा पेशवा, अर्थात पंतप्रधान होता. याने इ.स. १७८२ ते इ.स. १७९५ या काळात मराठ्यांच्या पेशवाईची सूत्रे सांभाळली. रघुनाथरावाच्या कारस्थानातून हत्या झालेल्या पेशवा नारायणरावाचा हा पुत्र होता. सातारा दरबाराच्या संकेतांनुसार पदारूढ पेशव्याचा पुत्र पुढील वारसदार ठरत असल्यामुळे, माधवराव नारायणाचा पेशवेपदावर कायदेशीर हक्क होता. परंतु नारायणरावाच्या हत्येनंतर पेशवाईवर हक्क सांगणार्‍या रघुनाथरावाला पुणे दरबारातील बारभाईंनी पेशवेपदापासून दूर ठेवले व माधवराव नारायणास सातार्‍याच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे देववून पेशवेपदावर बसवले. पदारूढ होतेवेळेस माधवराव नारायण अल्पवयीन असल्यामुळे आरंभी नाना फडणवीस कारभारी म्हणून कामकाज पाहत होते.

हडपसरची लढाई

हडपसरची लढाई ही होळकर आणि पेशवे व शिंदे यांच्या संयुक्त फौजेत पुण्याजवळ हडपसर येथे दिनांक २५ ऑक्टोबर, इ.स. १८०२ रोजी झालेली ही लढाई आहे.

हुजूर दफ्तर

हुजूर दफ्तर हे महाराष्ट्रातील पुणे येथे असलेले मराठा साम्राज्यातील सर्व शासकीय कागदपत्रांची नोंद ठेवणारे भांडार होते. पेशव्यांचा प्रशासकीय व्यवस्थापनाचा व्याप प्रचंड असल्याने यास हुजूर दफ्तर म्हटले जात असे. तेथून मराठा साम्राज्यातील स्वराज्य व साम्राज्य प्रदेशातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारभार पाहिला जाई. फडणवीस आणि दिवाण हे पेशव्याचे दोन वंशपरंपरागत मंत्री पेशव्याच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली या कार्यालयाचा कारभार पाहत.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.