ब्राझील


ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज : 'ब्राझीलिया) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात ३रा मोठा देश आहे.[४] ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हियापेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिनापेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.

अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.[५] भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये चीनभारत यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते.

ब्राझील
ब्राझीलिया
ब्राझीलचा ध्वज ब्राझीलचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Ordem e Progresso
(सुव्यवस्था आणि प्रगती)
राष्ट्रगीत: हिनो नाचिओनाल ब्राझिलेइरो
ब्राझीलचे स्थान
ब्राझीलचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी ब्राझीलिया
सर्वात मोठे शहर साओ पाउलो
अधिकृत भाषा पोर्तुगीज
सरकार अध्यक्षीय संघराज्यीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख जिल्मा रुसेफ
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (पोर्तुगालपासून)
सप्टेंबर ७, १८२२ (घोषित)
ऑगस्ट २९, १८२५ (मान्यता) 
 - प्रजासत्ताक दिन नोव्हेंबर १५, १८८९ 
क्षेत्रफळ
 - एकूण ८५,१४,८७७ किमी (५वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.६4
लोकसंख्या
 - २००९ १९,२२,७२,८९०[१] (५वा क्रमांक)
 - घनता २२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २.०१३ निखर्व[२] अमेरिकन डॉलर (९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १०,५१३ अमेरिकन डॉलर (६८वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२००8) ०.८१३[३] (उच्च) (७५ वा)
राष्ट्रीय चलन ब्राझीलियन रिआल (BRL)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी -२ ते -५
आय.एस.ओ. ३१६६-१ BR
आंतरजाल प्रत्यय .br
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५५
राष्ट्र_नकाशा

भूगोल

अक्षांश ५.१५o उ. ते ३३o.४५ उ.

अक्षवृत्त ५.१५o हे रोराईमा ला लागून जाते, तर ३३o.४५ उ हे रिओ ग्रान्दे दो सुलला लागून जाते .

रेखांश विस्तार- 34o 45' प. हे रेखावृत्त परायबा आणि पैर्नामब्युको अलंगवासला लागून जाते . 73o 48'प. हे रेखावृत्त आक्रेला लागून जाते.

चतु:सीमा

राज्ये

ब्राझील देशामध्ये २6राज्ये व एक शासकीय जिल्हा आहे.

मोठी शहरे

समाजव्यवस्था

धर्म

तीन शतके पोर्तुगीज राजवटीच्या प्रभावाने ब्राझील मध्ये कॅथोलिक धर्माच्या व्यक्ती बहुसंख्य आहेत.

संस्कृती

अर्थतंत्र

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनुसार ब्राझील ही जगातील ७वी मोठी अर्थव्यवस्था आहे. ब्राझीलकडे मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. ब्राझील ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. गेली १५० वर्ष ब्राझील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन करणारा देश आहे.

खेळ

इतर दक्षिण अमेरिकन देशांप्रमाणे फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. ब्राझील फुटबॉल संघ हा जगातील सर्वोत्तम संघ मानला जातो. पेले, रोनाल्डो, रोनाल्डिन्हो इत्यादी ब्राझीलियन फुटबॉलपटू जगप्रसिद्ध अहेत. ब्राझीलने आजवर पाच वेळा फिफा विश्वचषक जिंकला असून २०१४ फिफा विश्वचषकाचे आयोजन ब्राझीलमध्येच केले होते.

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झालेले रियो दि जानीरो हे यजमानपदाचा मान मिळवणारे दक्षिण अमेरिकेमधील सर्वप्रथम शहर असेल. साओ पाउलोमधील ऑतोद्रोमो होजे कार्लोस पेस रेसिंग ट्रॅकवर दरवर्षी ब्राझीलियन ग्रांप्री ह्या फॉर्म्युला वन शर्यतीचे आयोजन केले जाते.

संदर्भ

  1. ^ Brazil 2009 Estimate IGBE: Instituto Brasileiro de Geografia e Estatística. Retrieved 2 January 2010.
  2. ^ "Brazil". International Monetary Fund. 2010-04-21 रोजी पाहिले.
  3. ^ UNDP Human Development Report 2009. "Table H: Human development index 2007 and its components". UNDP. 2009-10-05 रोजी पाहिले.
  4. ^ "People of Brazil". Central Intelligence Agency. 2008. 2008-06-03 रोजी पाहिले. Unknown parameter |bookशीर्षक= ignored (सहाय्य)
  5. ^ Clendenning, Alan (2008-04-17). "Booming Brazil could be world power soon". USA Today – The Associated Press. पान क्रमांक 2. 2008-12-12 रोजी पाहिले.
  6. ^ "2010 Brazilian Institute of Geography and Statistics estimate". Brazilian Institute of Geography and Statistics. 29 November 2011. 22 January 2011 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

ऑलिंपिक खेळ बास्केटबॉल

बास्केटबॉल हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९३६ सालापासून खेळवला जात आहे. त्यापूर्वी १९०४ सालच्या स्पर्धेत हा खेळ केवळ प्रदर्शनीय होता (पदके बहाल करण्यात आली नाहीत). महिलांची बास्केटबॉल स्पर्धा १९७६ पासून सुरू आहे.

ऑलिंपिक खेळात ब्राझील

ब्राझील देशाने आजवर १९२० पासून १९२८चा अपवाद वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये व १९९२ पासून सर्व हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. २०१६ सालचे ऑलिंपिक खेळ ब्राझीलच्या रियो दि जानेरो शहरामध्ये आयोजीत केले जातील.

कोपा आमेरिका

कोपा आमेरिका (स्पॅनिश: Copa América) ही कॉन्मेबॉल ह्या दक्षिण अमेरिकेमधील फुटबॉल मंडळाद्वारे आयोजित केली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेमध्ये १२ संघ सहभागी होतात. कॉन्मेबॉल मंडळामध्ये केवळ दहाच सदस्य असल्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये बाहेरील २ संघांना आमंत्रित केले जाते. अमेरिका, कोस्टा रिका व मेक्सिको हे कॉन्मेबॉल बाहेरील संघ ही स्पर्धा अनेक वेळा खेळले आहेत.

कोपा आमेरिकाच्या विजेत्याला फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेत आपोआप आमंत्रण मिळते. इ.स. १९१६ साली पहिली कोपा आमेरिका स्पर्धा भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.

फिफा कॉन्फेडरेशन्स चषक

फिफा कॉन्फेडरेशन्स चषक ही एक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे. फिफाद्वारे आयोजीत केली जाणारी ही स्पर्धा सध्या दर चार वर्षांनी खेळवली जाते. ह्या स्पर्धेत जगातील सहा फुटबॉल महामंडळांमधून प्रत्येक एक संघ निवडला जातो. विद्यमान विश्वचषक विजेता तसेच आगामी विश्वचषक स्पर्धेचा यजमान देश ह्यांना ह्या स्पर्धेत आपोआप प्रवेश मिळतो. आशियामधून ए.एफ.सी. आशिया चषक विजेता, आफ्रिकेमधून आफ्रिका देशांचा चषक विजेता, उत्तर व मध्य अमेरिकेमधून कॉन्ककॅफ गोल्ड चषक विजेता, दक्षिण अमेरिकेमधून कोपा अमेरिका विजेता, ओशनियामधून ओ.एफ.सी. देशांचा चषक विजेता तर युरोपामधून युएफा यूरो विजेता देश कॉन्फडेरशन्स चषकासाठी पात्र ठरतात.

१९९२ साली सौदी अरेबियामध्ये किंग फहाद चषक ह्या नावाने ह्या स्पर्धेची सुरूवात झाली.

फिफा जागतिक क्रमवारी

फिफा जागतिक क्रमवारी (FIFA World Rankings) ही जगातील राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघांची गुणवत्तेनुसार क्रमवारी ठरवण्याची एक पद्धत आहे. डिसेंबर १९९२ सालापासून सुरू असलेल्या ह्या क्रमवारीमध्ये प्रत्येक संघाला त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनानुसार गूण मिळतात. सर्वाधिक गूण मिळवणारा संघ क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावर पोचतो. आजवर आर्जेन्टिना, जर्मनी, ब्राझील, स्पेन, नेदरलँड्स, इटली व फ्रान्स ह्या सात संघांनी क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांक गाठला आहे.

जागतिक फुटबॉल एलो गुणांकन ही एलो गुणांकन पद्धतीवर आधारित क्रमवारी देखील फुटबॉल संघांसाठी वापरली जाते.

फिफा विश्वचषक

फिफा विश्वचषक किंवा नुसताच विश्वचषक ही फुटबॉल खेळामधील एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. फिफा फुटबॉलची संस्था दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. ह्या स्पर्धेत जगातील ३२ देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर विश्वचषकाआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे ३२ संघ निवडले जातात. २०१४ विश्वचषक जिंकणारा जर्मनी हा सद्य विजेता देश आहे.

आजवर खेळवण्यात आलेल्या १९ विश्वचषक स्पर्धांपैकी ब्राझीलने ५, इटली व जर्मनीने ४, आर्जेन्टिना व उरुग्वे देशांनी २ तर इंग्लंड, फ्रान्स व स्पेन देशांनी एकवेळा अजिंक्यपद मिळवले आहे.

पुढील विश्वचषक स्पर्धांचे आयोजन २०१८ मध्ये रशिया व २०२२ साली कतार हे देश करतील.

ब्राझील फुटबॉल संघ

ब्राझील फुटबॉल संघ (पोर्तुगीज: Seleção Brasileira de Futebol) हा ब्राझील देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. ब्राझील फुटबॉल संघटना (Confederação Brasileira de Futebol) ही संस्था ब्राझील संघाचे कामकाज सांभाळते. ब्राझील फुटबॉल संघ इ.स. १९२३ सालापासून फिफाचा तर इ.स. १९१६ पासून कॉन्मेबॉलचा सदस्य आहे. आजवर पाच वेळा फिफा विश्वचषक जिंकलेला ब्राझील हा फुटबॉलच्या इतिहासामधील सर्वात यशस्वी संघ असून तो जगातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक मानला जातो.

२०१४ फिफा विश्वचषकाचे आयोजन ब्राझीलने केले. स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये ब्राझीलला जर्मनीकडून १-७ असा अपमानस्पद पराभव पत्कारावा लागला.

रियो डी जानीरो

रियो डी जानीरो हे ब्राझील देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इ.स. १७६३ ते १९६० दरम्यान ही ब्राझीलची राजधानी होती. २०१६मध्ये रियो डी जानीरोमध्ये ऑलिंपिक खेळस्पर्धा झाल्या.तसेच हे एक उत्तम बंदर असून व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे.पहिली वसुंधरा परिषद १९९२ साली ब्राझील देशाच्या याच शहरात झाली होती.या शहराला दक्षिण अटलांटिक महासागराचा समुद्रकिनारा लाभला आहे.हे शहर दक्षिण अमेरिका खंडातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

व्हेनेझुएला

व्हेनेझुएला (संपूर्ण नावः व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताक; स्पॅनिश: República Bolivariana de Venezuela) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. व्हेनेझुएलाच्या पश्चिमेला कोलंबिया, दक्षिणेला ब्राझील, पूर्वेला गयाना हे देश तर उत्तरेला कॅरिबियन समुद्र आहेत. व्हेनेझुएलाला २८०० किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. ९,१६,४४५ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या व्हेनेझुएलाची लोकसंख्या सुमारे २ कोटी ९१ लाख इतकी आहे.

शासकीय जिल्हा (ब्राझील)

शासकीय जिल्हा हे ब्राझीलच्या राजधानी ब्राझीलियाचे स्थान आहे.

साओ पाउलो

साओ पाउलो (पोर्तुगीज: São Paulo ; अर्थ: संत पॉल ;) ब्राझील देशातील, तसेच पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर ब्राझीलच्या साओ पाउलो राज्याची राजधानी आहे. साओ पाउलो शहराची वस्ती १,१०,१६,७०३ असून क्षेत्रफळ १,५२३ कि.मी.२ आहे. २५ जानेवारी १५५४ रोजी स्थापलेल्या या शहराचे नाव ख्रिश्चन धर्मातील संत पॉल याच्या पोर्तुगीज भाषेतील नावावरून पडले.

साओ पाउलो देशातील आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र आहे. येथे साओ पाउलो रोखे बाजार आहे.

साओ पाउलो हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक होते. येथील अरेना कोरिंथियान्स येथे स्पर्धेमधील ६ सामने खेळवले गेले.

सुरिनाम

सुरीनाम हादक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. सुरीनामच्या पूर्वेला गयाना, पश्चिमेला फ्रेंच गयाना व दक्षिणेला ब्राझील हे देश तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे. पारामारिबो ही सुरीनामची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

सुरीनाम हा दक्षिण अमेरिका खंडात क्षेत्रफळाच्या व लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान देश आहे. तसेच जेथे डच ही भाषा राष्ट्रीय भाषा म्हणून वापरली जाते असा सुरीनाम हा नेदरलॅन्ड्जव्यतिरिक्त पश्चिम गोलार्धातील एकमेव देश आहे .

सुरीनामची संस्कृती अत्यंत विभिन्न आहे. सुरीनामच्या जवळजवळ ५ लाख लोकसंख्येपैकी ३७% लोक भारतीय वंशाचे आहेत. १९व्या शतकात उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातून आणि बिहारमधून आलेले अनेक कामगार येथे स्थायिक झाले. त्यांचे वंशज सुरीनामच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा आहेत. सुरीनाममधील २०% लोक मुस्लिम धर्माचे आहेत.

१९५० फिफा विश्वचषक

१९५० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची चौथी आवृत्ती ब्राझील देशामध्ये २४ जून ते १६ जुलै १९५० दरम्यान खेळवण्यात आली. दुसऱ्या महायुद्धामुळे १९४२ व १९४६ सालच्या स्पर्धा रद्द केल्या गेल्यामुळे १९३८च्या विश्वचषकानंतर १२ वर्षांनी ही स्पर्धा भरवली गेली. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १५ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

उरुग्वेने अंतिम साखळी गटात यजमान ब्राझीलला २–१ असे पराभूत करून दुसरे अजिंक्यपद मिळवले. विजेतेपदासाठी अंतिम फेरीचा सामना न खेळवला गेलेला हा आजवरचा एकमेव विश्वचषक आहे.

२०१० फिफा विश्वचषक

२०१० फिफा विश्वचषक ही जून ११ ते जुलै ११, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेलेली जगातील अग्रणीय फुटबॉल स्पर्धा होती. दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली ही स्पर्धा फिफा विश्वचषक स्पर्धेची १९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा प्रथमच आफ्रिकेत खेळली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी फिफाच्या २०८ सदस्य राष्ट्रांपैकी २०४ राष्ट्रांनी भाग घेतला. पात्रता फेरी ऑगस्ट २००७ पासून सुरू होती. स्पेनने अंतिम सामन्यात नेदरलँड्सवर १-०ने मात करून विजेतेपद मिळवले.

२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ फिफा विश्वचषक ही फिफा विश्वचषक ह्या जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेची विसावी आवृत्ती आहे. ही स्पर्धा जून १२ ते जुलै १३ दरम्यान ब्राझील देशामध्ये खेळवली जात आहे. १९५० नंतर दुसर्‍या वेळेस ब्राझील ह्या स्पर्धेचे आयोजन करीत आहे. आर्जेन्टिनामधील १९७८ फिफा विश्वचषकानंतर ही स्पर्धा प्रथमच दक्षिण अमेरिका खंडात भरवली जात आहे.

मार्च २००३ मध्ये फिफाने २०१४ सालचा विश्वचषक दक्षिण अमेरिकेमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. ब्राझील व कोलंबिया ह्या दोनच देशांनी यजमानपद स्वीकारण्यात स्वारस्य दाखवले. ३० ऑक्टोबर २००७ रोजी फिफा अध्यक्ष सेप ब्लॅटर ह्याने ब्राझीलची निवड झाल्याचे जाहीर केले.

गतविजेत्या स्पेनवर साखळी फेरीमध्येच पराभवाची नामुष्की ओढवली तर यजमान ब्राझीलला उपांत्यफेरीत पराभव पत्कारावा लागला. १३ जुलै २०१४ रोजी रियो दि जानेरोतील माराकान्या स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये जर्मनीने आर्जेन्टिनाला अतिरिक्त वेळेमध्ये १-० असे पराभूत करून विश्वचषक चौथ्यांदा जिंकला. अमेरिका खंडात आयोजीत करण्यात आलेल्या विश्वचषकामध्ये ह्या खंडाबाहेरील संघाने विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती.

२०१४ फिफा विश्वचषक गट अ

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अ गटात ब्राझील, क्रोएशिया, मेक्सिको आणि कामेरून या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १२-२३ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल स्पर्धा ब्राझीलमध्ये ३ ते २० ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल.ऑलिंपिक यजमान शहर रियो दि जानेरोशिवाय सामने बेलो होरिझोन्ते, ब्राझिलिया, साल्व्हादोर, साओ पाउलो मानौस या शहरांमध्ये खेळवण्यात येतील. ह्या सर्वच्या सर्व सहा शहरांमध्ये २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेचे सामने झाले होते, फक्त रियो मधील एस्तादियो ऑलिंपिको हे ऑलिंपिक मैदान विश्वचषकाचे मैदान नव्हते. फिफाशी संलग्न संघटना या स्पर्धेत संघ पाठवू शकतात. पुरुष गटात २३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या (१ जानेवारी १९९३ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेले) खेळाडूंसह, त्यापेक्षा मोठ्या फक्त तीन खेळाडूंना एका संघात खेळण्यास परवानगी आहे. महिला गटासाठी वयाची कोणतीही अट नाही. स्पर्धेमध्ये ४०० फुटबॉल वापरले जातील.

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल - पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष फुटबॉल स्पर्धा ४-२० ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल. उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेची ही २६वी आवृत्ती आहे. महिला स्पर्धेसोबत, २०१६ उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा ही ब्राझीलमधील सहा शहरांमध्ये पार पडेल. यजमान शहर रियो दि जानेरो मधील माराकान्या मैदानावर अंतिम सामना होईल. पुरुष गटामध्ये सहभागी होणार्‍या संघामध्ये २३ वर्षांखालील खेळाडूंनाच (१ जानेवारी १९९३ किंवा त्यानंतर जन्मलेल्या) खेळण्याची परवानगी आहे. प्रत्येक संघात फक्त तीनच २३ वर्षांवरील खेळाडूंना सहभागी होता येईल.

ह्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच हॉक-आय पद्धतीने गोल-लाईन तंत्रज्ञान वापरले जाईल. अतिरिक्त वेळेत चौथा बदली खेळाडू वापरता येण्याची चाचणी म्हणून सदर स्पर्धेला आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन मंडळचा भाग म्हणून मार्च २०१६ मध्ये मान्यता देण्यात आली.

उत्तर अमेरिका
मध्य अमेरिका
कॅरिबियन
दक्षिण अमेरिका

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.