बोगनव्हिल मोहीम

बोगनव्हिल मोहीम तथा चेरी ब्लॉसम मोहीम दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रेजपानी साम्राज्यामध्ये झालेल्या लढाया होत्या. १ नोव्हेंबर, इ.स. १९४३ ते २१ ऑगस्ट, इ.स. १९४५ दरम्यान चालू असलेली ही मोहीम कार्टव्हील मोहीम या दोस्त राष्ट्रांच्या जपानविरुद्धच्या प्रचंड मोहीमेचा भाग होती.

या मोहीमेच्या पूर्वार्धात अमेरिकन सैन्याने बोगनव्हिल द्वीपावर चढाई करून पुळणीवर ताबा मिळवला व नोव्हेंबर १९४३ ते नोव्हेंबर १९४४ तेथे ठाण मांडून ठेवले. या दरम्यान जपानी सैन्याची उपासमार आणि रोगराईमुळे मोठी खराबी झाली. उत्तरार्धात अमेरिकन सैन्य उरलेल्या जपानी सैनिकांना नामोहर करण्यासाठी बेटावर घुसले. येथे त्यांना जवळजवळ १० महिने कडवा प्रतिकार झाला.

मार्च १९४४मध्ये बोगनव्हिल द्वीपावर जपानी सैनिकांचा माग काढणारे अमेरिकन सैनिक

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Shaw 1963, p. 246; Lofgren 1993, p. 27; Gailey 1991, p. 191
  2. a b Shaw 1963, pp. 185–86
  3. ^ Shaw 1963, p. 281, Lofgren 1993, p. 32, and Gailey 1991, p. 210
  4. a b Rottman 2005, pp. 70–72; Gailey 1991, p. 211 and Long 1963, pp. 102–103
  1. ^ मृतांमध्ये वीरगती प्राप्त झालेले तसेच रोगराई, उपासमार आणि अपघातात मृत्यू पावलेल्यांचा समावेश आहे. युद्धांती ऑस्ट्रेलियन सैन्याने २१,०००-२३,५०० बोगनव्हिलमध्ये जपानी युद्धकैदी मोजले. गैली आणि लाँगचे संदर्भ ग्राह्य मानले तर जपानने आपल्या ६५,००० सैनिकांपैकी ४०,०००+ सैनिक येथे गमावले.[४]

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.