बेनितो मुसोलिनी

बेनितो मुसोलिनी हा इटलीचा भूतपूर्व पंतप्रधान व हुकुमशहा होता. इटलीमध्ये फॅसिझम स्थापन करण्यात बेनितो मुसोलिनीने महत्त्वपूर्व भुमिका बजावली. दुसऱ्या महायुद्धामध्ये मुसोलिनीने नाझी जर्मनीसोबत मैत्री केली व अक्ष राष्ट्रांमध्ये सहभाग घेतला.

एप्रिल १९४५ मध्ये अक्ष राष्ट्रांचा पराभव निश्चित झाल्यानंतर मुसोलिनीने स्वित्झर्लंडमध्ये पलायन करण्याचा प्रयत्न केला, पण त्या दरम्यान त्याला पकडून ठार मारण्यात आले.

बेनितो मुसोलिनी
बेनितो मुसोलिनी


इटलीचा ४० वा पंतप्रधान
कार्यकाळ
३१ ऑक्टोबर १९२२ – २५ जुलै १९४३

जन्म २९ जुलै १८८३
प्रेदाप्पियो, इटली
मृत्यू २८ एप्रिल १९४५ (वय: ६१)
ज्युलिनो दि मेझाग्रा, इटली
राष्ट्रीयत्व इटली ध्वज इटली
धर्म रोमन कॅथॉलिक
एप्रिल २८

एप्रिल २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११८ वा किंवा लीप वर्षात ११९ वा दिवस असतो.

ऑक्टोबर २९

ऑक्टोबर २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०१ वा किंवा लीप वर्षात ३०२ वा दिवस असतो.

ऑक्टोबर ३०

ऑक्टोबर ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०२ वा किंवा लीप वर्षात ३०३ वा दिवस असतो.

जुलै २९

जुलै २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१० वा किंवा लीप वर्षात २११ वा दिवस असतो.

फॅसिझम

फॅसिझम हे २०व्या शतकाच्या सुरुवातीस मध्य-युरोपात ठळकपणे दिसू लागलेले, मूलगामी अधिकारशाही राष्ट्रवादाचे एक रूप आहे. फॅसिझमच्या समर्थकांना किंवा फॅसिझमनुसार राज्यकारभार चालवणार्‍यांना "फॅसिस्ट" म्हटले जाते. राष्ट्रीय सिंडिकेटवादाने प्रभावित झालेल्या सुरुवातीच्या फॅसिस्ट चळवळी पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान इटलीमध्ये उदयास आल्या. फॅसिझममध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा उजव्या विचारसरणीच्या भूमिकेचा आणि डाव्या विचारसरणीच्या राजकारणाचा संगम करण्यात आला होता. फॅसिझमचे हे वैशिष्ट्य उदारमतवाद, मार्क्सवाद आणि पारंपरिक पुराणमतवाद ह्यांच्या विरुद्ध आहे. डाव्या-उजव्या विचारधारांच्या पारंपरिक मोजपट्टीवर फॅसिझमला सहसा कट्टर उजव्या बाजूचे मानले जाते, पण काही समीक्षकांनी आणि स्वतः फॅसिस्टांनी फॅसिझमची अशी मांडणी पुरेशी नसल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला आहे.

राष्ट्रीय एकीकरणासाठी समाजात मोठ्या प्रमाणात उठाव घडवून आणून एका सर्वंकषसत्तावादी राज्याची निर्मिती करणे ही फॅसिस्टांची भूमिका होती. जो पक्ष फॅसिस्ट विचारधारेच्या तत्त्वांनुसार देशाला पुनःस्थापित करण्यासाठी क्रांतिकारक राजकीय चळवळ उभारेल अशा पक्षाची निर्मिती हे फॅसिस्टांचे ध्येय होते. जगभरातील फॅसिस्ट चळवळींमध्ये काही समान दुवे आहेत - राष्ट्राचे उदात्तीकरण, शक्तिशाली नेत्याप्रती भक्ती आणि समर्पण, तसेच अतिराष्ट्रवाद आणि लष्करसत्तावादावर विशेष जोर, वगैरे.. फॅसिझमच्या धोरणानुसार राजकीय हिंसा, युद्ध आणि साम्राज्यवाद ही राष्ट्रीय आनंद पुनर्जागृत करण्याची साधने आहेत. फॅसिझमचे स्पष्ट प्रतिपादन आहे की शक्तिशाली देशांना स्वतःचे साम्राज्य विस्तारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ह्यासाठी स्वतःपेक्षा कमजोर देशांना विस्थापित करण्याचा पण त्यांना पूर्ण अधिकार आहे.

फॅसिस्ट विचारधारा पुनःपुन्हा राज्याच्या श्रेष्ठत्वाचा पुनरोच्चार करते. इटली येथील बेनितो मुसोलिनी आणि जर्मनी येथील अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांनी स्वतःला राज्याचे मूर्तिमंत रूप म्हणून प्रस्तुत केले व त्याआधारे स्वतःच्या निर्विवाद निरंकुश सत्तेचा दावा केला. फॅसिझमचे सिद्धान्त, संकल्पना आणि संज्ञा हे समाजसत्तावादाकडून उधार घेतलेले आहेत. मात्र समाजसत्तावादाच्या केंद्रस्थानी वर्गसंघर्षाचा मुद्दा होता, तर फॅसिझमने त्याला बदलवून त्याजागी परराष्ट्रसंघर्ष आणि वंशवाद ह्यांना स्वतःचा आधार बनवले. स्वदेशी उत्पादनाला देशाच्या बाजारपेठेत संरक्षण देऊन व आर्थिक धोरणांमध्ये हस्तक्षेप करून राष्ट्रीय स्वयंपूर्णता साधणे ह्या मुख्य उद्देशाने फॅसिस्ट लोक मिश्र अर्थव्यवस्थेचे समर्थन करतात.

दुसर्‍या महायुद्धानंतर काही पक्षांनी स्वतः फॅसिस्ट असल्याचे जाहीरपणे घोषित केले आहे. असे असले तरी, "फॅसिस्ट" ही संज्ञा राजकीय विरोधकांद्वारे बहुधा तिरस्कारवाचक म्हणून वापरली जाते. २०व्या शतकातील फॅसिस्ट चळवळींमधून पुढे उदयास आलेल्या विचारधारांना किंवा तत्सम कट्टर उजव्या विचारधारांना अधिक औपचारिकपणे संबोधण्यासाठी "नव-फॅसिस्ट" (neo-fascist) किंवा "उत्तर-फॅसिस्ट" (post-fascist) ह्या संज्ञा वापरल्या जातात.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.