फ्रान्सिस दिब्रिटो

फादर फ्रान्सिस दिब्रिटो (४ डिसेंबर, इ.स. १९४३[१]; नंदाखाल, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हे महाराष्ट्रातल्या वसई येथील कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी लेखक आहेत. ख्रिस्ती व ज्यू धर्म हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय असून त्यांविषयी त्यांनी मराठीतून लेखन केले आहे.

फ्रान्सिस दिब्रिटो

जीवन

दिब्रिटोंचा जन्म ४ डिसेंबर, इ.स. १९४२ रोजी वसई तालुक्यातल्या नंदाखाल गावी झाला. दिब्रिटो इ.स. १९८३ ते इ.स. २००७ या कालखंडात सुवार्ता या प्रामुख्याने मराठी कॅथॉलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते. त्यांचे शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कुलात झाले. इ.स. १९७२ साली त्यांनी कॅथॉलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केले आहे.

कार्य

फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले, तरी त्यांची खरी ओळख ती नाही. दिब्रिटो हे पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व अशी आहे. ’सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला. ’हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील ’राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबविली.

संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केले होते.[२].

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे प्रकाशित साहित्य

 • आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा
 • ओअ‍ॅसिसच्या शोधात (प्रवासानुभव, मूळ - दैनिकातील सदर). इंग्रजी रूपांतर 'इन सर्च ऑफ दि ओॲसिस'; अनुवादक - फ्रान्सिस दिब्रिटो+रेमंड मच्याडो)
 • ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र)
 • ख्रिस्ती सण आणि उत्सव
 • तेजाची पाऊले (ललित)
 • नाही मी एकला (आत्मकथन)
 • संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास
 • सुबोध बायबल - नवा करार (’बायबल दि न्यू टेस्टॅमेंट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद) (पृष्ठसंख्या - ११२५)
 • सृजनाचा मळा
 • सृजनाचा मोहोर
 • परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक)
 • मुलांचे बायबल (चरित्र)

सन्मान

संदर्भ

 1. ^ सिसिलिया कार्व्हालो. "कृतिशील समाजचिंतक: फादर दिब्रिटो" (मराठी मजकूर). थिंकमहाराष्ट्र.कॉम. २४ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
 2. ^ "सृजनाचा मोहोर" (मराठी मजकूर). लोकसत्ता. १४ जुलै, इ.स. २००२.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यप्रेमी जनतेचा एक आनंदाचा उत्सव असतो.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन/माजी अध्यक्ष

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.

अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ४२ साहित्य संमेलने घेतली असून घुमान येथे झालेले साहित्य संमेलन हे ४३ वे साहित्य संमेलन होते. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी कुसुमावती देशपांडे या एकच स्त्री अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे या चार स्त्रिया संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत.

मराठी साहित्य संमेलनांच्या दहा गाजलेल्या संमेलनाध्यक्षांवर आधारित ’साहित्य दरबारातील दशरत्‍ने’ नावाचे पुस्तक प्राचार्य श्याम भुर्के यांनी लिहिले आहे.

माजी संमेलनाध्यक्षांचा परिचय करून देणारी किमान चार पुस्तके आहेत, त्यांपैकी ही काही :

अरुणा ढेरे व्यक्ती आणि कथनात्मक लेखन (नानासाहेब यादव)

दभि सहवास आणि सन्मान (डॉ. श्यामला मुजुमदार)

संमेलनाध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव (संपादक - अरुण पारगावकर)

’साहित्य दरबारातील दशरत्‍ने’ (प्राचार्य श्याम भुर्के)

गजमल माळी

गजमल माळी राऊत (जन्म : इ.स. १९३४; मृत्यू : आौरंगाबाद, २८ फेब्रुवारी, इ.स. २०१७) हे मराठी भाषेतील लेखक, कवी व नाटककार असून चिंतनपर मानवतावाद या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक होते. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे ते माजी अध्यक्ष असून शिक्षणतज्ज्ञ आणि मुद्रण व्यवसायात आघाडीचे प्रणेते होते.

प्राचार्य गजमल माळी हे सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्तेही होते. ऑरंगाबाद येथील कॉलेजचे स्थापनेपासून १५ जून १९७१ ते ३१ मार्च १९९४पर्यंत ते प्राचार्य होते. तरुण लेखकांना सतत प्रोत्साहन देणारे आणि लिहिते करणारे प्राध्यापक, साहित्यिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे तीन काव्यसंग्रह, पाच संपादित ग्रंथ, लोकसाहित्य शब्दकोषाचे संकलन व सत्यशोधक समाजावरील पुस्तके आहेत.

अजिंठा लेण्यांच्या परिसरात फुललेली रॉबर्ट गिल (अजिंठा लेणी प्रकाशात आणणारे ब्रिटिश अधिकारी) आणि पारो यांची प्रेमकहाणी ‘कल्पद्रुमाची डहाळी’ या नाटकातून गजमल माळींनी लिहिली. तिच्यावरून ‘पारू’ हा चित्रपट निघाला.

गजमल माळी ह्यांचा ‘राष्ट्रीय काँग्रेस आणि सत्यशोधक समाज’ हा त्यांचा वैचारिक ग्रंथ काँग्रेस आणि सत्यशोधक समाज यांच्या संबंधांवर प्रकाश टाकतो. या पुस्तकातून बराचसा अज्ञात इतिहास समाजासमोर आला आहे. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात बहुजन समाज काँग्रेसकडे कसा वळला आणि त्याचे हे वळणे ही सामाजिक अभिसरणाची सुरुवात कशी होती, याचे विवेचन प्रा. माळी यांनी या वैचारिक ग्रंथातून केले आहे.

प्राचार्य गजमल माळी हे ‘राजकीय सत्तांतर’ या सामाजिक-राजकीय विषयाला वाहिलेल्या साप्ताहिकाचे संस्थापक-संपादक होते. सत्यशोधक चळवळीतील उपेक्षित, समर्पित कार्यकर्त्यांची त्यांनी आदरपूर्वक दखल घेतली. ते केवळ लेखक नव्हते, तर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते.

गुणिजन साहित्य संमेलन

९वे राज्यस्तरीय गुणिजन साहित्य संमेलन औरंगाबाद येथे १० फेब्रुवारी २०१३ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष प्रज्ञा दया पवार होत्या.

या पूर्वीची गुणिजन साहित्य संमेलने :

६वे, औरंगाबाद येथे ३१-१-२०१० रोजी. संमेलनाध्यक्ष : उत्तम कांबळे

७वे, औरंगाबादला ९-१-२०११ रोजी. अध्यक्ष : फादर फ्रान्सिस दिब्रिटो

८वे, औरंगाबाद येथे २५-३-२०१२ला. संमेलनाध्यक्ष : राजन खान

पहा : मराठी साहित्य संमेलने

ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार

संत साहित्यावर उत्कृष्ट लेखन करणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रुपये ५ लक्ष रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. ज्यांनी आपले सारे आयुष्य संत साहित्याचा अभ्यास कराण्यात घालवले अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळतो. या प्रकारच्या पुरस्कारांत हा सर्वांत मानाचा सन्मान समजला जातो.

शासनाचा २०१९ सालचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार मधुकर रामदास जोशी यांना जाहीर झाला आहे..

डिसेंबर ४

डिसेंबर ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३८ वा किंवा लीप वर्षात ३३९ वा दिवस असतो.

पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन, पुणे

महाराष्ट्र सरकारतर्फे भरणारे पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन २ व ३ ऑक्टोबर २०१२ रोजी पुण्यात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल अवचट होते. संमेलनाचे उद्‍घाटन महाराष्ट्राच्या तत्कालीन राज्यपालांनी केले. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ’महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ देण्यात आले. संस्थेसाठी पुरस्काराची रक्कम ३० हजार रुपये तर वैयक्तिक पुरस्काराची रु.१५ हजार इतकी होती.

संमेलनाला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. कल्याण गंगवाल, संमोहनतज्‍ज्ञ नवनाथ गायकवाड वगैरे उपस्थित होते.

बायबल

बायबल (पवित्र शास्त्र) हा ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ आहे. बायबल हे प्रत्यक्षात लहानलहान पुस्तिकांचे दोन संच आहेत. पहिल्या पुस्तकास जुना करार तर दुसऱ्या पुस्तकास नवा करार म्हटले जाते. जुना करार हा मुळात यहूदी (ज्यू) लोकांचा धर्मग्रंथ आहे. नवा करार हा येशू ख्रिस्ताशी संबंधित पुस्तिकांचा (शुभवर्तमाने - गॉस्पेल्सचा) संच आहे. बायबल हे इस्लाममध्ये देखील आदरणीय मानले जातबायबल हा ईश्वरप्रेरित ग्रंथ मानला जातो. हा ग्रंथ ख्रिस्ती श्रद्धेची व जीवनाची प्रेरणा देणारा, धर्माची मूलभूत तत्त्वे आणि ईश्वरी तारणाचा इतिहास समजून देणारा ग्रंथ आहे. देवाचे प्रकटीकरण कुणाला, कुठे, कसे व काय काय झाले ते या ग्रंथात दिसून येते. सर्वप्रथम प्रकाशित झालेला व सर्वाधिक प्रती प्रकाशित झालेला हा ग्रंथ होय . इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा बायबलच्या सर्वाधिक प्रती आजपर्यंत छापल्या गेल्या आहेत. भाषांतराच्या बाबतीतही बायबलची इतर कोणत्याही पुस्तकांपेक्षा सर्वाधिक भाषांत भाषांतरे झाली आहेत. आज संपूर्ण जगात मुख्य भाषा व बोलीभाषा मिळून एकूण ५००० भाषा आहेत. त्यातील २१०० भाषांत आणि बोलीभाषांत बायबलचे संपूर्ण किवा अंशतः भाषांतर झाले आहे; हे भाषांतराचे काम निरंतर चालूच आहे.बायबल हा यहुदी व ख्रिस्ती लोकांसाठी आदरणीय असा ग्रंथ आहे. जुन्या कराराला सुमारे तीन हजार वर्षाची आणि नव्या कराराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. बायबल या शब्दाचा अर्थ ‘ग्रंथसंग्रह असा आहे. ता बिब्लिया (TA BIBLIA) या मूळ ग्रीक शब्दावरून बायबल हा इंग्रजी शब्द प्रचारात आला आहे. ता बिब्लिया म्हणजे अनेक पुस्तकांचा संग्रह. ही पुस्तके एकटाकी किंवा एकहाती लिहिली गेलेली नाहीत, तर ख्रिस्तपूर्व १३०० ते इसवी सन १०० या साधारण १४०० वर्षांच्या काळात निरनिराळ्या साक्षात्कारी लेखकांनी लिहिलेल्या, संपादित आणि संग्रहित केलेल्या, अनेक विषय असलेल्या पुस्तकांचा हा संग्रह आह

बायबलची निर्मिती क्रमाक्रमाने होत गेली आहे. इजिप्तमध्ये गुलामगिरीत असलेल्या इस्रायली समाजाला देवाने मोशेच्या नेतृत्वाखाली बाहेर काढले. आपले निवडलेले लोक म्हणून देवाने त्यांचा स्वीकार केला. त्याने त्यांच्या बरोबर करार केला; त्यांना हक्काच्या भूमीचे वचन दिले. त्यानंतरच या समाजाला धर्मशास्त्र (तोरह किवा पंचग्रंथ) मिळाला. या धर्मशास्त्रात इस्रायलच्या कुलपुरुषाचा इतिहास आणि धार्मिक व सामाजिक जीवनासंबंधीच्या नियमांचा अंतर्भाव होता. पंचग्रंथाला पुढे ज्ञानविषयक साहित्याची व संदेष्ट्यांच्या लिखाणाची जोड मिळाली.

ख्रिस्ती धर्म हा येशू या दिव्य व्यक्तीभोवती केंद्रित झाला होता. ख्रिस्ती लोकांसाठी ख्रिस्त हा साकार झालेला प्रत्यक्ष परमेश्वर आहे. त्याच्या प्रेषितांना ख्रिस्तानुभव आला होता. इसवी सन ३० ते ५० या काळात प्रेषित मौखिकरीत्या ख्रिस्ताच्या विचारांचा प्रचार करीत होते. इसवी सन ४९ साली जेरुसलेमची प्रसिद्ध धर्मसभा झाली आणि यहुदी नसलेल्यासाठी ख्रिस्ती धर्माचे दरवाजे उघडले गेले. सुंतेचा प्रश्न निकालात काढला गेला. पॅलेस्टाईनच्या सीमा ओलांडून ख्रिस्ती धर्म पश्चिम आशिया, ग्रीस, रोमपर्यंत पसरला. दूरस्थ ख्रिस्ती लोकांना येशूची शिकवण लेखी रूपात देणे आवश्यक झाले. सुरुवातीला पौलाने पत्रे लिहून ती गरज भागवली.

हळूहळू प्रेषितही काळाच्या पडद्याआड होऊ लागले. त्यामुळे येशूची शिकवण आणि आठवणी यांचे लेखी संग्रह तयार होऊ लागले. उपलब्ध संग्रहांतून साहित्याची निवड करून चार शुभवर्तमानकारांनी आपली शुभवर्तमाने रचली. तसेच पाखंडी मताचा प्रतिवाद करण्यासाठी विपुल प्रमाणात लेखन झाले. ज्या लेखनाचे नाते प्रेषिताबरोबर (प्रत्यक्षदर्शी व्यक्ती – Eye Witness) किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्तीबरोबर होते त्यांचे साहित्य अस्सल (प्रेरित) म्हणून स्वीकारले गेले. बाकीचे नाकारण्यात आले. अशा प्रकारे नव्या कराराची रचना सिद्ध झाली.

येशूने मानवी देह धारण केला, त्याने दुःख भोगले, त्याला क्रुसावर खिळण्यात आले. तो मरण पावला. त्याला पुरले. त्याचे पुनरुत्थान झाले. शिष्यांना त्याचे दर्शन झाले. तो काळाच्या अंती जगाचा न्याय करण्यासाठी पुन्हा येणार आहे.” (प्रेषितांचा विश्वास अंगीकार ही प्रार्थना - Nicene Creed) ही पहिल्या शतकातील ख्रिस्ती समाजाची श्रद्धा होती. या श्रद्धेशी सुसंगत असलेले लेखन आणि शिकवण ही अधिकृत आणि त्या श्रद्धेशी विसंगत ते अनधिकृत, असा निकष तयार करण्यात आला. धर्मशिकवण देताना संत क्लेमेंट (इसवी सन ९६) व संत आयरेनियस (इसवी सन १८०) यांनी हाच निकष प्रमाण मानला. निकषासाठी ग्रीक भाषेत कॅनोन (Kanon), असीरियन भाषेत कानू (Qanu) , हिब्रू भाषेत कानेह (Qunah) असे शब्द असून मापनसूत्र असा त्याचा अर्थ आहे. युसेबियस (इसवी सन २६०-३४०) हा पॅलेस्टाईनमधील सिझेरियाचा बिशप होता. त्याने दहा भागात चर्चचा इतिहास लिहिला आहे. त्याने चार शुभवर्तमानांतील संदर्भाची यादी तयार केली, तसेच नव्या करारातील पुस्तकांची त्याने अधिकृत, वादग्रस्त, आणि बनावट अशा तीन गटांत विभागणी केली. (इसवी सन ३०३). पवित्र शास्त्र ईश्वरी वाणी – कॅनन (Canon) या इंग्रजी शब्दाचा अर्थ मोजण्याचे साधन किवा मापनसूत्र असा होतो. पवित्र शास्त्रातील ज्या पुस्तकांच्या ईश्वरीप् रेरणेबद्दल शंका नव्हती व जी पुस्तके यहुदी व ख्रिस्ती धर्मविश्वासाच्या कसोटीला उतरली ती पुस्तके कॅननमध्ये समाविष्ट झाली. इसवी सन ९० च्या सुमारास जम्निया येथे भरलेल्या यहुद्यांच्या धर्मसभेत (Synod of Jamnia) जुन्या करारातील ३९ पुस्तकांना यहुद्यानी मान्यता दिली. (कारण ही पुस्तके हिब्रू भाषेत लिहिली गेली होती.). इसवी सन ३९७ च्या काउंन्सिल ऑफ कार्थेज या ख्रिस्ती धर्मसभेत नव्या करारातील २७ पुस्तकांना मान्यता देण्यात आली. . ख्रिस्ताने स्वतः आपल्या अनुयायांसाठी काही लिहून ठेवले नाही. कित्येक वर्ष येशूची शिकवण ख्रिस्त महामंडळाच्या जिवंत स्मृतीत टिकून होती. इसवी सन ४२ ते इसवी सन १०० या कालावधीत नव्या करारातील पुस्तकांचे लेखन झाले. नव्या करारातील २७ लेख ते हेच होत. कित्येक वर्ष ख्रिस्ती लेंखसंग्रहातील कोणता ग्रंथ ईश्वरप्रेरित समजायचा हे ख्रिस्तमहामंडळाने निश्चित केले नव्हते. सरतेशेवटी आफ्रिकेतील कॅथोलिक महागुरू हिप्पो येथे इसवी सन ३९३ मध्ये एकत्र आले. व त्यांनी हे निश्चित केले. या निश्चयाला परमगुरुस्वामींची (पोप) मान्यता मिळाली. कार्थेज येथे इसवी सन ३९७ मध्ये आणखी एक असेच संमेलन भरले व तेथे मागील सभेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संत अथनीशियस (इसवी सन २९५-३७३) याने "परमेश्वर प्रेरित पुस्तके" आणि "गुप्त स्वरूपाची पुस्तके" (Apocryphal) अशी नव्या करारातील पुस्तकांची विभागणी केली. अशा प्रकारे नव्या करारातील एकूण २७ पुस्तके चर्चने परमेश्वरप्रेरित म्हणून अधिकृत मानली. रोमन कॅथोलिक चर्च व प्रोटेस्टंट पंथ यांच्यामध्ये जुन्या कराराच्या प्रेरित पुस्तकांच्या संखेच्या बाबतीत मतभिन्नता होती. रोमन कॅथोलिक चर्चने जुन्या करारातील पुस्तकांची आद्य संहिता (Protocanonical) म्हणून एकूण ३९ पुस्तके तसेच द्वितीय संहिता (Deuterocanonical) म्हणून एकूण ७ पुस्तके प्रमाणित केली. यहुदी धर्मसभेने द्वितीय संहितेतील ७ पुस्तके (Deuterocanonical) प्रमाणित न करता जुन्या करारातील फक्त ३९ पुस्तकांना मान्यता दिली. याचे कारण असे की यहुदी धर्मसभेचे ईश्वरप्रेरित पुस्तकांचे निकष या सात पुस्तकांना लागू पडले नाहीत. उदा० ही पुस्तके हिब्रू भाषेत नसून ग्रीक भाषेत लिहिली गेली होती इत्यादी. (अलीकडे काही पुस्तकांची हिब्रू हस्तलिखिते उत्खननात उपलब्ध झाली आहेत.). मार्टिन ल्युथर याने याच कारणाने ही पुस्तके अनधिकृत ठरवली. तसेच या सात पुस्तकांतील काही शिकवणुकींना त्याचा विरोध होता. अशा रीतीने दोन्ही पंथांमध्ये (कॅथोलिक व प्रोटेस्टंट) जुन्या कराराच्या वेगवेगळ्या संहिता मान्यता पावल्या. कॅथोलिक बायबलमध्ये जुना करार - ४६ पुस्तके (३९+७) व नवा करार - २७ पुस्तके अशी एकूण ७३ पुस्तके प्रमाणित झाली. तर प्रोटेस्टंट बायबलमध्ये जुना करार - ३९ पुस्तके व नवा करार - २७ पुस्तके अशी एकूण ६६ पुस्तके प्रमाणित झाली. परंतु अलीकडे सर्व ख्रिस्ती पंथीय लोकांसाठी छापल्या जाणाऱ्या बायबलमध्ये द्वितीय संहितेची (Deuterocanonical) पुस्तके परिशिष्टे म्हणून छापली जातात. जुन्या आणि नव्या कराराच्या मधल्या काळातील यहुदी समाजाची धार्मिक व राजकीय पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी ही पुस्तके उपयुक्त ठरतात. नव्या करारातील २७ पुस्तकांबद्दल कॅथोलिक, प्रोटेस्टंट व आॅर्थोडॉक्स पंथांचे एकमत आहे.

कॅथोलिक व प्रोटेस्टट बायबलमधील प्रमाणित पुस्तकांच्या आवृत्तीच्या उगमाचा इतिहास : कॅथोलिक व प्रोटेस्टट यांच्यातील जुन्या करारातील हा फरक जाणून घेण्यासाटी आपल्याला यहुदी इतिहासाकडे वळावे लागेल. इसवी सन पूर्व ५८७ ते ५३७ या कालावधीत यहुदी लोक बाबिलोनमध्ये बंदिवासात जीवन कंठीत होते. त्यानंतर त्यातील काही यहुदी जेरुसलेमला परतले. बंदिवासातून परतल्यावर आपला यहुदी विश्वास व परंपरा पुनरुज्जीवित करण्यास त्यांनी सुरुवात केली. याच काळात त्यांनी जुन्या कराराची प्रमाणित संहिता तयार केली. त्यात फक्त ३९ पुस्तकांचा समावेश केला गेला. यालाच हिब्रू पॅलेस्टिनी संहिता (Palestinian Canon) असे म्हणतात. परंतु बरेचसे यहुदी इजिप्तमधील आलेक्झान्द्रिया येथे स्थयिक झाले होते. ग्रीक भाषा ही त्यांची व्यवहाराची भाषा झाली होती व हिब्रू भाषा ते बहुतेक विसरून गेले होते. परंतु त्यांना आपला यहुदी विश्वास व परंपरा टिकवून ठेवायच्या होत्या. म्हणून इसवी सन पूर्व २७० मध्ये जुन्या कराराचे हिब्रू भाषेतून ग्रीक भाषेत भाषांतर करण्यात आले. या संहितेला ग्रीक अलेक्झांद्रियन संहिता (Alexandrian Canon). असे म्हटले जाते. या भाषांतराला सेप्तुअजिन्त (Septuagint) भाषांतर असेही म्हटले जाते. कारण सत्तर यहुदी पंडितांनी हे भाषांतर केले होते. (ग्रीक भाषेत सेप्ता म्हणजे सत्तर). या भाषांतरात ग्रीक भाषेतील सात पुस्तकांची भर घालण्यात आली. अशा रीतीने जुन्या कराराच्या दोन संहिता तयार झाल्या.

इसवी सन ३९० मध्ये पोप दमासस यांनी संत जेरोम यांना पवित्र शास्त्राचे भाषांतर लॅटिन भाषेत करण्याचे काम सोपविले. संत जेरोम यांनी बेंथलेहममधील एका गुहेत हे काम पूर्ण केले. त्यासाठी त्यांनी सेप्तुअजिन्त आवृत्तीचा वापर केला. याच कालावधीत नव्या कराराच्रे संपादन व लेखन पूर्ण होऊन त्यातील पुस्तके प्रमाणित झाली होती. नवा करार ग्रीक भाषेत लिहिला होता. सेप्तुअजिन्त भाषांतराला नव्या कराराची जोड देऊन ख्रिस्तमहामंडळाचा धर्मग्रंथ बायबल सिद्ध झाला. या लाटिन भाषेतील भाषांतराला व्हलगेट असे म्हणतात. हे भाषांतर जवळजवळ हजार वर्ष कॅथोलिक चर्चचे अधिकृत बायबल म्हणून गणले जात होते. अशा रीतीने कॅथोलिक चर्चच्या बायबलमध्ये साहजिकच हिब्रू बायबलमध्ये नसलेल्या सात पुस्तकांची भर पडली.

इसवी सन १५१७ साली प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक मार्टिन ल्युथर यांनी सामान्य लोकांच्या प्रचलित भाषेत (इंग्रजीमध्ये) बायबलचे भाषांतर केले. या भाषांतरासाठी त्यांनी हिब्रू पॅलेस्तींनी सहितेचा (Palestinian Canon) उपयोग केला. अशा रीतीने प्रोटेस्टंट पंथाच्या जुन्या कराराच्या संहितेत ३९ पुस्तकांचा समावेश होऊन ७ पुस्तके (ॲपोक्रिफा ) वगळली गेली.

कॅथोलिक बायबलमधील जुन्या करारातील पुस्तकांची यादी

कॅथोलिक नव्या करारातील पुस्तकांची यादी

प्रोटेस्टंट बायबल मधील पुस्तकांची यादी (जुना व नवा करार)

यहुदी समाज आणि बायबल (जुना करार) : ख्रिस्ती धर्माचा उदय झाला तेव्हा यहुदी समाजात मोशेचे धर्मशास्त्र (तोराह - ग्रंथपंचक), संदेष्ट्यांचे लेखन ( नबीईम ), व अन्य धार्मिक साहित्य (खतुविम), प्रचलित होते. आरंभीच्या यहुदी ख्रिस्ती लोकांसाठीसुद्धा हे पवित्र ग्रंथ होते. कारण येशू स्वतः आणि त्याचे अनुयायी धर्माने यहुदी होते. मात्र ते याला जुना करार असे संबोधित नव्हते. कारण तेव्हा नव्या कराराचे लेखन, संपादन व संकलन पूर्ण झाले नव्हते. अंदाजे इसवी सन ५० ते इसवी सन १०० या कालावधीत नव्या कराराचे लेखन पूर्ण झाले. इसवी सन चवथ्या शतकापर्यंत नव्या कराराची अधिकृत संहिता तयार झाली होती. त्यानंतर यहुद्यांची धार्मिक पुस्तके जुना करार म्हणून ओळखली जाऊ लागली. या जुन्या कराराला नव्या करारातील २७ पुस्तकांची जोड देण्यात आली. अशा रीतीने ख्रिस्ती लोकांचा बायबल हा धर्मग्रंथ अस्तित्वात आला. ख्रिस्ती लोकांनी आपल्या धर्मग्रंथात यहुद्यांच्या धर्मग्रंथाचा (जुना करार) समावेश केला. मात्र यहुद्यानी आपल्या धर्मग्रंथात ख्रिस्ती पुस्तकांचा स्वीकार केला नाही. कारण त्यांच्या मते नवा करार अधिकृत नाही. येशू हा ख्रिस्त किवा मसीहा आहे. हे त्यांनी स्वीकारले नाही. यहुद्यांच्या धार्मिक पुस्तकाला आता जुना करार असे संबोधित नाहीत तर आधुनिक पंडित त्याला "हिब्रू बायबल" असे म्हणतात. यहुदी धर्मशास्त्राचे स्वरूप (हिब्रू बायबल) : यहुदी लोकांचे धर्मशास्त्र म्हणजे जुना करार, यात ३९ पुस्तके असली तरी, एकूण २४ गुंडाळ्या होत्या. खालील तक्ता पहा :

१. नियमशास्त्र - तोराह (Torah - Law) - उत्पती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद एकूण ५ गुंडाळ्या

२. संदेष्टे - नाबिईम (Nabiim - Prophets)

(अ.). अगोदरचे - यहोशवा, शास्ते, शमुवेल, राजे एकूण ४ गुंडाळ्या

इवलेसे|यहुदी धर्मशास्त्राच्या गुंडाळ्या (जुना करार)

(ब.) नंतरचे - यशया, यिर्मया, यहेज्केल, होशेय ते मलाखी, १२ संदेष्ट्यांची एक गुंडाळी एकूण ४ गुंडाळ्या

३. धार्मिक पवित्र लेख - खतुविम (Kethubim - Hagiographha)

(अ.) काव्य - स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे, इयोब - एकूण ३ गुंडाळ्या

(ब. ) सणाच्या गुंडाळ्या - गीतरत्न, रुथ, विलापगीत, उपदेशक, एस्तेर - एकूण ५ गुंडाळ्या

(क.) ग्रंथ - दानीएल, एज्रा, नहेम्या, इतिहास, - एकूण ३ गुंडाळ्या

तानक असा शब्द हिब्रू बायबलसाठी वापरला जातो. हिब्रू बायबलचे तीन मुख्य विभाग आहेत. ग्रंथपंचक (तोराह – TORAH), संदेष्ट्यांचे ग्रंथ (नबीईम – NEBIIM), आणि पवित्र लेख (खतुविम – KETHUBIM). वरील तीनही ग्रंथांची आद्याक्षरे मिळून तानक हा शब्द हिब्रू बायबलसाठी प्रचलित झाला.

वरील तक्त्यात वर्णन केल्याप्रमाणे यहुदी धर्मशास्त्राचे १. नियमशास्त्र, २. संदेष्ट्यांची पुस्तके व ३. धार्मिक लेख असे तीन विभाग होते. ख्रिस्ताने या तीन विभागांचा नव्या करारात उल्लेख केला आहे. (पहा, नवा करार, लुककृत शुभवर्तमान २४:४४, मत्तय ५:१७). शमुवेल, राजे, इतिहास यांची दोन दोन पुस्तके असली तरी प्रत्येकी एक एक गुंडाळी होती. जुन्या कराराच्या अनुक्रमणिकेत असलेले होशेय ते मलाखी या बारा संदेष्ट्यांची एकच गुंडाळी होती. एज्रा व नहेम्या ही दोन पुस्तके मिळून एक गुंडाळी होती. अनधिकृत पुस्तके : ख्रिस्तपूर्व २०० ते इसवी सन २०० या चारशे वर्षाच्या कालावधीत यहुदी व ख्रिस्ती लेखकांनी धार्मिक विषयावर बरेच लेखन केले. त्यापैकी काही लेखनाला अपोक्रिफल (गुप्त) लेखन म्हणजे अनधिकृत साहित्य असे म्हटले जाते. या लेखनाचा यहुदी, कॅथोलिक किवा प्रोटेसटट बायबलमध्ये समावेश नाही. या लिखाणात दृष्टान्त व साक्षात्कार यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. जगाचा अंत व इतिहासाचे शेवटचे पर्व असा यातील लेखनविषय आहे. परमेश्वर व दुष्ट शक्ती (सैतान) यांचा अखेरचा संग्राम या लिखाणात वर्णिला आहे. त्यांतील काही अनधिकृत पुस्तके खालीलप्रमाणे

(अ.) यहुदी अनधिकृत पुस्तके : १. एसद्रासचे पुस्तक, २. मक्काबीचे तिसरे पुस्तक, ३. आदम आणि एवेचे पुस्तक, ४. यशयाचे हौताम्य, ५. हनोखाचे पुस्तक, ६. बारा कुलपतींचे (पेत्रीआर्क) इच्छापत्र, ७. संदेष्टी सिबलची संदेशवाणी, ८. मोशेचे स्वर्गारोहण, ९. बारुखाची पुस्तके, इत्यादी. यहुदी लोकांना ही पुस्तके वंदनीय नसली तरी एक सांस्कृतिक ठेवा म्हणून त्यांकडे पाहिले जाते.(आ.) ख्रिस्ती अनधिकृत पुस्तके : इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर आणि दुसऱ्या शतकात काही अनधिकृत ख्रिस्ती साहित्य लिहिले गेले. त्यांची यादी खालीलप्रमाणे :

१. द गाॅस्पेल ऑफ द नाझरीन (इसवी सन १८० पूर्वी), २. द गाॅस्पेल ऑफ द हिब्रू, अरेमिकमधून ग्रीकमध्ये भाषांतरित (दुसऱ्या शतकाच्या शेवटी), ३. द गाॅस्पेल ऑफ इजिप्तिशियन (इसवी सन १५० नंतर), ४. द गाॅस्पेल ऑफ द एबोनाइट्स, ग्रीक भाषेत (इसवी सन १५० पूर्वी), ५. द गाॅस्पेल ऑफ पीटर (इसवी सन १५० पूर्वी), ६. द गाॅस्पेल ऑफ थाॅमस (इसवी सनाचे दुसरे शतक) .

येशू ख्रिस्ताचे बालपण व दु:खद अंत यासंबंधी माहिती यात सागितली गेली. त्यावेळच्या ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक समजुतीचे प्रतिबिब या पुस्तकात दिसून येते. याशिवाय काही काल्पनिक व अतिरंजित शुभवर्तमाने या काळात रचली गेली. ती अशी :

१. द प्रोटो गोस्पेल ऑफ जेम्स - प्रभू येशूच्या बालपणाविषयी ग्रीक भाषेतील पुस्तक (इसवी सन १५० च्या दरम्यान), २. द गाॅस्पेल ऑफ स्यूडो मॅथ्यू , लाटिन भाषेत लेखन (इसवी सन ५-६ शतक), ३. द डाॅर्मिशिअन ऑफ द व्हर्जिन (पवित्र मरीयेचे स्वर्गउन्नयन), ४. द हिस्ट्री ऑफ जोसेफ द कारपेंटर - योसेफ सुताराचा इतिहास - अरेबिक, लाटिन आणि कॉप्टिक भाषात. (इसवी सन चवथ्या शतकापूर्वी), ५. द अरेबिक गोस्पेल ऑफ द चाईल्डहूड, ६. द गोस्पेल ऑफ निकादेमुस, ७. द अक्ट्स ऑफ पायलट, ८ द डीसेंट इन टू हेल, ९. द गोस्पेल ऑफ बसिलीदेस, १०. द गाॅस्पेल ऑफ मार्सिओन, ११. द गाॅस्पेल ऑफ ट्रूथ, १२ द गाॅस्पेल ऑफ फिलिप, १३. द गाॅस्पेल ऑफ ज्यूडास इत्यादी.तसेच काही प्रेषितांच्या नावावर पुढील अनधिकृत पुस्तके लिहिली गेली. १. संत जॉन (इसवी सन २०० पूर्वी), २. संत पाॅल (इसवी सन २०० पूर्वी), ३. संत पीटर (इसवी सन १८०-१९०), ४. संत थाॅमस (इसवी सन १५०), तसेच फिलिप, बर्नाबास व थादेउस या संतांच्या प्रवासाच्या आणि चमत्काराच्या नोंदी असलेली पुस्तके.

याशिवाय पुढील अनधिकृत पत्रे लिहिली गेली. : १. द थर्ड एपिसल टू द करिन्थनियस, २. द लेटर ऑफ द अपोसल (इसवी सन १५०-१८०), ३. द एपिसल टू द लओदेसियांस, ४. द एपिसल टू द अलेक्झान्द्रियस, ५. द कॉरास्पोन्डोस ऑफ पौल विथ सेनेका, ६. द एपिसल टू बर्नाबास (इसवी सन १३० नंतर), ७. द केरिग्मा ऑफ पीटर, ८. द केरिग्मा ऑफ पौल इत्यादी. "द गॅस्पेल ऑफ जुदास" च्या चर्मपत्रांचा शोध १९७० साली इजिप्तच्या एका थडग्यात लागला. त्यानंतर ते हरवले आणि २००० साली पुन्हा सापडले. त्यात जुदासला खलनायक असे न दाखवता त्याची उजळ प्रतिमा रेखाटली आहे. बायबलचे अभ्यासक फादर डॉक्टर रुई द मिनेझिस सागतात, " ख्रिस्ती धर्माच्या प्रारंभीच्या काळात सुमारे ६० शुभवर्तमाने अस्तित्वात होती. ख्रिस्ती धर्ममंडळाने त्यातून मत्तय, मार्क लुक व योहानाची शुभवर्तमाने अधिकृत म्हणून स्वीकारली आहेत." जुना करार व नवा करार हे परस्परावलंबी व परस्पर पोषक असे दोन भाग आहेत. जुन्या करारात नव्या कराराविषयी पूर्वअपेक्षा, पूर्वआश्वासने, व पूर्वछायाही दिसून येतात. भावी चागल्या गोष्टींची छाया जुन्या करारात सापडते (नवा करार : इब्री लोकास पत्र : १०:१). नव्या करारात जुन्या कराराची भाकिते व आश्वासने सफळ व पूर्ण होतात. नवा करार समजण्याकरिता जुन्या कराराची पार्श्वभूमी समजली पाहिजे. जुन्या करारावर नवा करार अधिष्ठित आहे. ते अविभाज्य असे घटक आहेत.बायबलच्या मूळ भाषा : बायबल पुढील भाषेत लिहिले गेले :

• हिब्रुू – ही एक अत्यंत प्राचीन सेमेटिक भाषा असून ती उजवीकडून डावीकडे लिहिली व वाचली जाते. सहाव्या शतकाच्या अंतापर्यंत ही यहुदी लोकांची भाषा होती.

• अरेमिक - आर्मेनिया व पर्शिया या देशातील यहुदी लोक ही भाषा बोलत. हीच भाषा येशूची बोलीभाषा होती.

• ग्रीक – ही भाषा लाटिन भाषेप्रमाणे आर्य किवा इंडो युरोपिअन भाषा असून आलेक्झान्द्रियाच्या अधिपत्याखालील, पश्चिम आशियात आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून ही भाषा बोलली जात असे.

जुन्या करारातील ३९ पुस्तके हिब्रू भाषेत लिहिली गेली होती. (प्रथम संहिता) . जुन्या करारातील ७ पुस्तके (द्वितीय संहिता) ग्रीक व अरेमिक भाषेत लिहिली गेली होती.. नव्या करारातील २७ पुस्तके ग्रीक भाषेत लिहिली गेली होती. देवाने प्रेरीत केलेल्या ४० किवा त्यापेक्षा अधिक लेखकांनी बायबलचे लेखन केले. त्यातील बहुतेक लेखक यहुदी होते. पालेस्तीन (इस्राएल), बाबिलोन (इराक), मिसर (इजिप्त), रोम आणि करिंथ अशा वेगवेगळ्या ठिकाणी बायबल लिहिले गेले.देशप्रेम व धर्मशिक्षण शिकविण्यासाठी, तसेच मुक्तिदात्याबद्दल (मसीहा) माहिती देण्यासाठी बायबल लिहिले गेले.

बायबलच्या काही प्राचीन प्रती :- (जुना करार) - प्राचीन जुन्या कराराच्या प्रती गुंडाळ्याच्या स्वरुपात तयार करीत. पपायरस म्हणजे लव्हाळयाच्या लगद्यापासून तयार केलेला जाडाभरडा कागद. गुंडाळ्या करण्यासाठी हा कागद वापरीत. कोरड्या हवामानात या गुंडाळ्या बरेच दिवस टिकत असत. कधी कमावलेल्या जनावरांच्या चामड्यावरसुध्दा गुंडाळ्या तयार करीत. गुंडाळी म्हणजे नकाशासारखा दोन दांड्यांमध्ये बसवलेल्या कागदावर लिहिलेला मजकूर. वरून खाली नव्हे तर, उजवीकडून डावीकडे गुंडाळी उलगडत व त्यावरील मजकूर वाचला जात असे.

(१) मृत सागर गुंडाळ्या (Dead Sea Scrolls) :- (बायबलच्या सर्वात प्राचीन प्रती.) इसवी सन १९४७ मध्ये इस्रायलमधील यरीहोनजीक कुम्ररान येथे मोहंमद अबू धीब नावाच्या एका बदाऊनी मेंढपालाला मृत समुद्रानाजीक एका गुहेत काही प्राचीन गुंडाळ्या सापडल्या व साऱ्या जगातील पवित्र शास्त्राचे अभ्यासक, विद्वान यांचे लक्ष तेथे वेधले गेले. या पवित्र शास्त्राच्या गुंडाळ्या मातीच्या भांड्यात घालून ठेवलेल्या आढळल्या. आतापर्यंत ११ गुहांमध्ये हस्तलिखिते मिळाली आहेत. ही ख्रिस्तपूर्व शेवटचे शतक ते इसवी सन पहिले शतक या काळात लिहिलेली आहेत. चवथ्या गुहेतच ३८२ लेख मिळाले. यापैकी १०० गुंडाळ्या पवित्र शास्त्रासंबंधी आहेत. त्यात पवित्र शास्त्रातील (जुना करार) एस्तेर पुस्तक वगळता हिब्रू पवित्र शास्त्रातील सर्व पुस्तकांचे भाग अगर संपूर्ण पुस्तके आहेत. यांखेरीज अप्रमाणित पुस्तके, दृष्टान्त, साक्षात्कार, भाष्य, टीका, उपकार स्तुतिगीते व पंथीय लिखाण इत्यादी साहित्य सापडले आहे. या गुहानाजिक एका मोठ्या मठाचे अवशेष सापडले असून तेथे एसेनी नावाच्या मठवासीयांची वस्ती होती. या शोधामुळे पवित्र शास्त्रासंबंधी अभ्यासाच्या साधनात मोलाची भर पडली आहे. (२) मासोरेतिक प्रत (Masoretic Text): मूळ हिब्रू जुन्या करारात पूर्वी फक्त व्यंजने होती स्वर नव्हते. यहुदी मासोरातिक पंडितांनी इसवी सनाच्या ६ व्या शतकात हे स्वर शोधून काढले. इसवी सन ६ ते १२ या शतकात काही यहुदी पंडित तिबिर्या व युफ्रायटिस नदीकाठच्या सोरा येथे होते. त्यांनी हिबू मूळ प्रतीमध्ये विरामचिन्हे घातली. व उच्चाराच्या सुलभतेसाठी आरोह अवरोहच्या खुणा तयार केल्या. हे लिखाण व इतर टिपणे या सर्वाना त्यांनी मासारो (रूढी – परंपरा) असे नाव दिले. यावरून मासोरेतिक शब्द आला.

(3) नॅश पपायरस : - जुन्या कराराची ही प्रत १९०२ साली नॅश (W.L. Nash) यांना इजिप्त येथे सापडली. यामध्ये दहा आज्ञांचा काही भाग (निर्गम २०:२-१७), अनुवाद (५:६-२१) आणि शमा (अनुवाद ६:४). इसवी सन पूर्व १५० ते इसवी सन ६८ या काळात ही प्रत लिहिली गेली.

(४) कैरो गेनिझा प्रत :- एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कैरो, इजिप्त येथील यहुद्यांच्या एका जुन्या सभास्थानात ह्या प्रती सापडल्या. जवळजवळ २,००,००० लिखाणाचे तुकडे तेथे सापडले. इसवी सन ५०० च्या दरम्यान ह्या प्रती लिहिल्या गेल्या.

(५) शोमरोनी ग्रंथपंचक :- अंदाजे इसवी सनपूर्व ५४० ते इसवी सन १०० या कालावधीत शोमरोनी लोक यहुद्यांपासून वेगळे झाले. त्यांनी जुन्या करारातील पहिली पाच पुस्तकेच (ग्रंथपंचक - उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना व अनुवाद) हीच फक्त प्रमाण मानली. यालाच शोमरोनी ग्रंथपंचक असे म्हणतात.

(६) सेप्तुअजिन्त :- जुन्या कराराचे हिब्रू भाषेतून ग्रीक भाषेत भाषांतर केले गेले. ख्रिस्तपूर्व २८५ च्या सुमारास हे भाषांतर इजिप्त देशातील आलेक्झान्द्रिया येथे करण्यात आले. ही जुन्या कराराची सर्वात जुनी भाषांतरित प्रत होय.

नव्या कराराच्या प्राचीन प्रती :- कमाविलेल्या कातड्यावर, चर्मपत्रावर लिहिलेला मजकूर स्वतंत्र पानासारखा एकावर एक रचून तयार होणाऱ्या पुस्तकाला कोडेक्स असे म्हणत. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात गुंडाळ्याऐवजी कोडेक्स स्वरुपात लिखाण होऊ लागले. इसवी सनाच्या चवथ्या शतकापासून कमाविलेल्या कातड्यावर , त्याला व्हेल्लम म्हणत, यावर धर्मशास्त्राच्या प्रती लिहून काढीत. ही कातडी पानासारखी रचून पुस्तक बांधीत . पंधराव्या शतकात छापण्याच्या कलेचा शोध लागेपर्यंत सर्व लिखाण हाताने केले जाई. दुसऱ्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत हाताने लिहिण्यात आलेल्या पवित्र शास्त्राच्या संपूर्ण किवा त्रोटक स्वरूपातील चार हजार हस्तलिखित प्रती (Manuscripts) आजही उपलब्ध आहेत. त्यातील काही प्रती खालीलप्रमाणे :

(१) कोडेक्स सिनायटिकस : - ही चवथ्या शतकात लिहिलेली पवित्र शास्त्राची प्रत इसवी सन १८५९ साली सीनाय डोगरावरील सेंट कॅथरीन नावाच्या रोमन कॅथोलिक मठात प्रोफेसर टिशनड्राॅफ यांना सापडली.

(२) कोडेक्स व्हॅटिकनस :- ही चवथ्या शतकात लिहिलेली पवित्र शास्त्राची प्रत आज रोम येथील व्हॅटिकन :(पोप यांच्या) पुस्तकसंग्रहालयात आहे.

(३) कोडेक्स आलेक्झान्द्रियानस : - ही पाचव्या शतकात लिहिलेली पवित्र शास्त्राची प्रत इजिप्त देशातील आलेक्झान्द्रिया येथे सापडली. ती १६२८ साली कॉन्स्टॅन्टिनोपल येथील एका धर्मगुरूने इग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याला भेट म्हणून दिली. आता ती इंग्लंड येथे ब्रिटिश लायब्ररीमध्ये जतन करून ठेवली आहे.

बायबलची भाषांतरे :- •बायबल मधील जुना करार हिब्रू भाषेत तर नवा करार ग्रीक भाषेत आहे. बायबलच्या अनेक प्राचीन हस्तलिखित प्रती आज उपलब्ध आहेत. या प्राचीन हस्तलिखितांवरून प्रमाणप्रत सिद्ध करून बायबल भाषांतरित केले गेले आहे. इसवी सन १८१५ ते १९९५ या काळात बायबलच्या ३० कोटीहून जास्त प्रती छापून विकल्या गेल्या होत्या. जगामध्ये पाच हजारांपेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात. त्यापैकी ३३७ भाषांत संपूर्ण बायबल उपलब्ध आहे. बायबलमधील कमीत कमी एक पुस्तक जगातील २१०० भाषांत उपलब्ध आहे. बायबलखेरीज इतर कोणत्याही ग्रंथाचे भाषांतर इतक्या भाषांत झालेले नाही.

बायबलची काही प्राचीन भाषांतरे :-

१. सेप्तुअजिन्त भाषांतर (Septuagint ) : - जुन्या कराराचे हिब्रू भाषेतून ग्रीक भाषेत भाषांतर केले गेले. ख्रिस्तपूर्व २७० ते २८५ च्या सुमारास हे भाषांतर इजिप्त देशातील आलेक्झान्द्रिया येथे करण्यात आले. सत्तर यहुदी पंडितांनी हे भाषांतर केले म्हणून त्याला सेप्तुअजिन्त भाषांतर असे म्हणतात. (ग्रीक भाषेत सेप्टा म्हणजे ७०).

२. शोमरोनी ग्रंथपंचक : -मोशेची पहिली पाच पुस्तके हिब्रू भाषेतून शोमरोनी भाषेत भाषांतरित करण्यात आली.

३. पेशितो किवा सीरियाक : - संपूर्ण पवित्र शास्त्र सीरियन भाषेत भाषांतरित करण्यात आले. इसवी सन २०० च्या दरम्यान हे भाषांतर केले गेले.

४. व्हलगेट भाषांतर : - संपूर्ण पवित्र शास्त्र (जुना व नवा करार) याचे लाटिन भाषेत भाषांतर करण्यात आले. इसवी सन ४०० च्या सुमारास संत जेरोम याने पोप दमासस यांच्या आज्ञेवरून हे कार्य बेंथलेहम येथे पूर्ण केले. जवळजवळ एक हजार वर्ष रोमन कॅथोलिक चर्चचे हे प्रमाणभूत पवित्र शास्त्र होते. बायबलची काही मराठी भाषांतरे :-

(१) ख्रिस्तपुराण - मराठीला बायबलची रसाळ तोंडओळख फादर थाॅमस स्टीफन यांनी १६१६ सालीच “ख्रिस्तपुराण” या ग्रंथाद्वारे करून दिली होती. या ग्रंथात १७१६२ ओव्या असून आजही हा ग्रंथ मराठीतील एक अभिजात साहित्यग्रंथ म्हणून ओळखला जातो. तथापि “ख्रिस्तपुराण’ हे पारंपारिक बायबल नसून त्याचा कथाविषय बायबल आहे एवढेच.

(२) डॉक्टर विल्यम कॅरी यांचे भाषांतर - डॉक्टर विल्यम कॅरी यांनी इसवी सन १८०४ साली पंडित वैजनाथ यांच्या सहकार्याने बायबलच्या भाषांतराला प्रारंभ केला. इसवी सन १८०५ मध्ये कॅरी यांनी बंगालमधील सेरामपूर येथे संत मत्तयचे शुभवर्तमान मोडी लिपीत प्रसिद्ध केले. मराठीतील पहिल्या छापील पुस्तकाचा मान संत मत्तयच्या या पुस्तकाला मिळतो. इसवी सन १८०७ साली कॅरी यांनी मराठीत नवा करार प्रसिद्ध केला. डॉक्टर विल्यम कॅरी यांनी चाळीस भारतीय भाषांत बायबलचे भाषांतर केले.

(३) पंडिता रमाबाईंचे भाषांतर - (प्रोटेस्टंट आवृत्ती) बायबलचे एकहाती व एकटाकी भाषांतर करणाऱ्या पंडिता रमाबाई या जगातील एकमेव महिला आहेत. त्यांनी सतत १८ वर्ष अहोरात्र मेहनत करून १९२४ साली हिब्रू व ग्रीक या मूळ भाषांमधून बायबलचे मराठी भाषांतर पूर्ण केले. बायबलच्या शेवटच्या पुस्तकातील शेवटच्या वाक्याचे भाषांतर त्यांनी पूर्ण केले आणि त्याच रात्री त्याचे निधन झाले. हिब्रू व ग्रीक भाषा शिकून बायबलचे मातृभाषेत भाषांतर करणाऱ्या रमाबाई या जगातील एकमेव स्त्री भाषांतरकार आहेत.

इवलेसे|155x155अंश|[१२]सुबोध बायबल फादर फ्रान्सिस दिब्रिटो|अल्ट=[14]सुबोध बायबल फादर फ्रान्सिस दिब्रिटो|अल्ट=[14]सुबोध बायबल फादर फ्रान्सिस दिब्रिटो|अल्ट=[14]सुबोध बायबल फादर फ्रान्सिस दिब्रिटो|अल्ट=[14]सुबोध बायबल फादर फ्रान्सिस दिब्रिटो|अल्ट=[14]सुबोध बायबल फादर फ्रान्सिस दिब्रिटो|अल्ट=[14]सुबोध बायबल फादर फ्रान्सिस दिब्रिटो|अल्ट=[14]सुबोध बायबल फादर फ्रान्सिस दिब्रिटो|अल्ट=[14]सुबोध बायबल फादर फ्रान्सिस दिब्रिटो|अल्ट=

(४) सुबोध बायबल ; फादर फ्रान्सिस दिब्रिटो (२०१०) - फादर फ्रान्सिस परेरा या भाषांतराबद्दल म्हणतात” आधुनिक युगातील माणसाला समजेल असा बायबलचा मराठी भावानुवाद सुबोध बायबलच्या रूपाने मराठी जगताला उपलब्ध करून देण्याचे महान कार्य फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले आहे. ह्या बायबलची आवृत्ती अन्य आवृत्त्यांपेक्षा निराळी आहे. ते शब्दशः भाषांतर नसून भावानुवाद आहे. “ यातील विविध माहितीदर्षक अभ्यासपूर्ण टिपा बायबल अभ्यासाला खूपच मदत करतात.इवलेसे|139x139अंश|[१३]अनिल दहिवाडकर यांनी भाषांतरित केलेले बायबल|अल्ट=[15]अनिल दहिवाडकर यांनी भाषांतरित केलेले बायबल|अल्ट=[15]अनिल दहिवाडकर यांनी भाषांतरित केलेले बायबल|अल्ट=[15]अनिल दहिवाडकर यांनी भाषांतरित केलेले बायबल|अल्ट=[15]अनिल दहिवाडकर यांनी भाषांतरित केलेले बायबल|अल्ट=[15]अनिल दहिवाडकर यांनी भाषांतरित केलेले बायबल|अल्ट=[15]अनिल दहिवाडकर यांनी भाषांतरित केलेले बायबल|अल्ट=[15]अनिल दहिवाडकर यांनी भाषांतरित केलेले बायबल|अल्ट=[15]अनिल दहिवाडकर यांनी भाषांतरित केलेले बायबल|अल्ट=

(५) बायबल : देवाचा पवित्र शब्द - (प्रोटेस्टंट आवृत्ती) हा २०१२ साली प्रसिद्ध झालेला बायबलचा भावानुवाद असून त्याचे भाषांतरकार अनिल दहिवाडकर हे आहेत. ख्रिस्ती साहित्य प्रसारक, पुणे यांनी हा भावानुवाद प्रसिद्ध केला आहे. भरपूर माहितीदर्षक टिपा, चित्रे, नकाशे यामुळे हा ग्रंथ बराच माहितीदार झाला आहे.

(६) बायबल सोसायटी ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेले "पवित्र शास्त्र" (कॅथोलिक आवृत्ती) या संपूर्ण बायबलची सतत पुनर्मुद्रणे होत आहेत. (वितरण - जीवन दर्शन केन्द्र, गिरिज, वसई, महाराष्ट्र).

याशिवाय ख्यातनाम कवी मंगेश पाडगावकर यांनी नव्या करारातील चार शुभवर्तमानांचे इंग्रजीवरून अप्रतिम मराठी भाषांतर केले आहे. (बायबल : नवा करार, भाषांतर व मुक्तचिंतन, २००८). तसेच पुण्याच्या जीवनवचन प्रकाशनाने १९८२ साली "पवित्र शास्त्र - सुबोध भाषांतर ही संपूर्ण बायबलची सुगम मराठी आवृत्ती प्रसिद्ध केली. तिचे चागले स्वागत झाले. जुना करार : पार्श्वभूमी

विविध समाजगट - हिब्रू हे सेमेटिक वंशाचे लोक होते. हिब्रू लोकांचे कालांतराने निरनिराळे समाजगट तयार झाले. ते खालीलप्रमाणे होत.

हिब्रू : हेबेर, हबिरू, किवा अपिरू या भटक्या जमातीचे हे लोक. हिब्रू ही त्यांची भाषा होती. पुढे हिब्रू ही समाजवाचक संज्ञा झाली.

इस्राएली : - अब्राहामाचा नातू याकोब याचे इस्राएल हे दुसरे नाव होय. त्याच्या वंशजांना इस्राएली (इस्रायली) असे नाव पडले.

यहुदी (ज्यू) ; - याकोबाला बारा पुत्र होते. तेच इस्रायेलच्या बारा वंशाचे आदिपिते होत. त्यांच्यापैकी दहा घराणी काळाच्या ओघात नामशेष झाली असे मानले जाते. यहुदा आणि बेंजामिन हीच घराणी मागे उरली. बेंजामिनच्या घराण्याला विशेष महत्त्व नसल्याने यहुदा वंशाचे प्राबल्य प्रस्थापित झाले. यहुदा या शब्दावरूनच इस्राएली लोक यहुदी या नावाने ओळखले जाऊ लागले. बाबिलोनच्या बंदिवासातून परतल्या नंतर हे नाव प्रचारात आले. यहुदी लोक जरी देश विदेशात विखुरले गेले तरी ते कधीही अन्य देशातील लोकांशी मिसळले नाहीत. त्यांनी आपल्या एकेश्वरी श्रद्धेचे व यहुदी धर्माचे निष्ठेने जतन केले.

गालीली लोक : पालेस्ताईनच्या उत्तर भागातील गालील सरोवराच्या परिसरातील हे रहिवासी होते. अन्य राष्टांच्या लोकांबरोबर त्यांची सरमिसळ झाली होती. धार्मिक दृष्टीने कट्टर यहुदी लोक यांना कमी दर्जाचे मानीत. हे लोक मात्र प्रखर राष्टवादी होते.

अदोमी लोक : अब्राहामचा दुसरा नातू व याकोबाचा पुत्र एसाव याचे वंशज म्हणजे अदोमी लोक होत. यांना पूर्णपणे यहुदी समजले जात नव्हते. याहुदा प्रांताच्या दक्षिणेला त्यांचे अल्पकाळ वास्तव्य होते. पालेस्ताईनवर राज्य करणारा थोरला हेरोद (ख्रिस्तपूर्व ४० ते इसवी सन ४) हा अदोमी होता.

शोमरोनी लोक (समारीतन लोक) : इस्राएल या उत्तरेकडच्या राज्याची राजधानी समारीया (शोमरोन) येथे होती. यावरून तेथील लोक समारीतन किवा शोमरोनी या नावाने ओळखले जात. बाहेरून आलेले लोक आणि स्थानिक यहुदी लोक यांच्या मिश्र संकराने अस्तित्वात आलेली ही जमात होती. ख्रिस्तपूर्व ७२१ मध्ये इस्राएली लोकांना युद्धकैदी म्हणून असिरीयाला नेण्यात आले, तेव्हा हे शोमरोनी लोक शोमरोन येथेच राहिले . ते मोशेचे धर्मशास्त्र (ग्रंथपंचक - जुन्या कराराची पहिली पाच पुस्तके) मान्य करीत. परंतु जेरुसलेमला तीर्थक्षेत्र समजत नसत. तर गिरीज्जीम पर्वतावर उपासना करीत. कट्टर यहुदी लोक या लोकांना तुच्छ समजत व त्यांच्याशी कोणताही व्यवहार करीत नसत. शोमरोनी लोकही यहुदी लोकांपासून फटकून रहात.

हद्दपार झालेले किवा विखुरलेले यहुदी (डायसपोरा) : पहिल्या शतकात पालेस्ताईनमध्ये यहुदी लोकांची सख्या सुमारे पाच लाख होती. तसेच पालेस्तैनबाहेरही यहुदी मोठ्या प्रमाणात राहत होते. विविध आक्रमणे, युद्ध, व्यापार इत्यादी कारणामुळे हे यहुदी लोक संपूर्ण रोमन साम्राज्यात विखुरले गेले होते. यहुदी लोक जगात कुठेही गेले तरी आपल्या धर्मश्रद्धेशी नेहेमीच एकनिष्ठ राहिल्रे. आपल्या यहुदी धर्माचे त्यांनी कसोशीने जतन केले.

परराष्ट्रीय लोक (पेगन) : पालेस्ताईनचे मुळचे कनानी लोक तसेच तेथे वास्तव्य करून असलेले ग्रीक, रोमन व इतर परदेशी लोक यांना यहुदी लोक परराष्ट्रीय लोक (पेगन) असे संबोधित. हे लोक यहुदी लोकांप्रमाणे एकेश्वरवादी नसून अनेकेश्वरवादी व मूर्तिपूजक होते. कट्टर यहुदी लोक या लोकांशी व्यवहार करीत नसत. जेरुसलेमच्या बाहेर यांची मोठी वस्ती होती.जुना करार : अंतरंग : बायबलच्या पहिल्या पुस्तकात (उत्पत्ती) पहिला मानव आदम आणि पहिली स्त्री एवा यांची कथा वर्णन केली आहे. 'द जेरुसलेम बायबलनुसार (पान २०५५) आदम आणि एवा यांचा काळ २० लाख वर्षांहून प्राचीन आहे. शास्त्रीय परिभाषेत तो "पेबल कल्चर" चा काळ होता. ख्रिस्तपूर्व ३१०० ते २१०० या काळात अब्राहामचे पूर्वज मेसोपोटेमिया (तैग्रीस-युफ्रेटिस नद्यांचा प्रदेश - आताचा इराक) येथे वास्तव्य करीत होते. या काळात सीरियापासून पालेस्ताईनच्या सागरी भागापर्यंत इजिप्तच्या साम्राज्याचा अंमल होता.

अब्राहाम हा आपली पत्नी सारा हिला घेऊन ख्रिस्तपूर्व १८५० च्या दरम्यान तत्कालीन उर या ठिकाणाहून (सध्याचा इराक) कनान (सध्याचा इस्राएल) येथे आला. अब्राहाम व सारा यांना मुलबाळ नव्हते. अब्राहामची हागार नावाची दासी होती. तिजपासून त्याला इश्माएल नावाचा मुलगा झाला. त्यानंतर म्हातारपणी अब्राहामला सारा हिजपासून इसहाक नावाचा मुलगा झाला. सारा आपली सवत हागार हिचा छळ करू लागली. साराच्या छळाला कंटाळून हेगार आपल्या मुलास घेऊन अरबस्तानात निघून गेली.

इसहाक पासून यहुदी जमात व इश्माएल पासून अरबी जमात अस्तित्वात आली. इसहाक याला इसाव व याकोब हे दोन पुत्र झाले. पुढे या दोन पुत्रात वितुष्ट निर्माण झाले. याकोबाला लेआ व रेचेल या दोन धर्मपत्नी आणि बिल्हा व जिल्फा या दासीपत्नी होत्या. या चौघीपासून त्याला एक कन्या व बारा पुत्र झाले. त्यांच्यापासून पुढे इस्रायेलची बारा घराणी (बारा वंश) उदयास आले.

योसेफ हा याकोबचा लाडका पुत्र होता. त्याच्या अकरा भावानी मत्सरबुद्धीने त्याला इजिप्तमधील व्यापाऱ्याना विकले. परंतु तेथे त्याचे नशीब उघडले व तो फारो राजाचा मुख्य प्रधान बनला. पुढे कनानमध्ये दुष्काळ पडल्याने याकोब व त्याचे सगळे गणगोत आणि पुत्रपौत्र इजिप्तमध्ये स्थलांतरित झाले. तेथे योसेफाने त्यांना राजकीय आश्रय दिला. (ख्रिस्तपूर्व १७००). तेथे त्यांचा वंशविस्तार होत गेला. ते हिब्रू भाषा बोलत. आणि त्याच नावाने ते तेथे ओळखले जाऊ लागले. पुढे त्यांच्या वाढत्या संख्येची भीती वाटून तत्कालीन फारो राजाने त्यांचे छळसत्र आरंभले.

हिब्रू लोकांनी परमेश्वरी आदेशानुसार मोशेच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची मोहीम सुरू केली. (ख्रिस्तपूर्व १२५०). फारो राजाबरोबर प्रदीर्घ संघर्ष केल्यानंतर परमेश्वराच्या वरदहस्ताने इजिप्तमधून मायदेशी (कनान देशात) परतण्याची त्यांना परवानगी मिळाली. या अविस्मरणीय घटनेची आठवण म्हणून इजिप्तची सीमा ओलांडण्याआधी त्यांनी 'ओलांडण सण' (पासोव्हर) साजरा केला. त्यांच्या मुक्ततेची स्मृती म्हणून हा सण पाळण्यात येऊ लागला. आजही यहुदी लोक हा सण साजरा करतात.

इवलेसे|[१६]सिनाई पर्वत (इजिप्त)[18]सिनाई पर्वत (इजिप्त)[18]सिनाई पर्वत (इजिप्त)

इवलेसे|[२०]मोशेने उभारलेला निवासमंडप व इस्रायेलची छावणी (अंदाजे ख्रिस्तपूर्व १४३४)[21]मोशेने उभारलेला निवासमंडप व इस्रायेलची छावणी (अंदाजे ख्रिस्तपूर्व १४३४)[20]मोशेने उभारलेला निवासमंडप व इस्रायेलची छावणी (अंदाजे ख्रिस्तपूर्व १४३४)

मोशेच्या नेतृत्वाखाली हिब्रू लोकांनी वाळवंटातून मायदेशी प्रयाण केले. पुढे सिनायच्या वाळवंटात सिनाय पर्वतावर मोशेला परमेश्वराकडून दहा आज्ञा मिळाल्या. याच त्या प्रसिद्ध दहा आज्ञा होत. हिब्रू लोकांना या दहा आज्ञा पाळणे बंधनकारक केले गेले. मोशेने परमेश्वरी आदेशाने सीनायच्या वाळवंटात दहा आज्ञाच्या दोन दगडी पाट्या ठेवण्यासाठी कराराचा कोश घडविला. तसेच तो कोश ठेवण्यासाठी फिरते मंदिर (निवासंमंडप - Tabernacle) उभारले. मोशेने परमेश्वराच्या एकत्वावर नेहेमी भर दिला आणि अनेकदेवता पूजनाला व मूर्तिपूजेला कसून विरोध केला. एकेश्वरवाद अनुसरणारा व परमेश्वराच्या निराकार अस्तित्वावर विश्वास ठेवणारा त्या काळातील हा एकमेव धर्म होता. हिब्रू लोक जवळपास चाळीस वर्ष सीनायच्या वाळवंटात भटकत होते. वतनभूमीत पोहोचण्याआधीच मोशेचे निधन झाले.

मोशेचा उत्तराधिकारी यहोशवा (जोशुवा) याने हिब्रू लोकांना कनानभूमीत नेले. (ख्रिस्तपूर्व १२२० ते १२००) तेथील मूळ लोकांना (कनानी व अन्य सहा जमाती) यांचा नायनाट करून तेथे हिब्रू लोक स्थायिक झाले. देशात शत्रूंना नांदू देणे हि भावी संकटाची नांदी ठरू शकते असे त्या काळी समजले जात होते. हळूहळू हिब्रू लोक एकेश्वरी धर्मापासून दूर जाऊ लागले व कनानी लोकांच्या अनेक देवतांची व मूर्तींची पूजा करू लागले. बैला हे वाहन असलेला 'बेल' हा जननाचा देव होता. तर असिरीयन लोकांची 'इस्तार' ही प्रजोत्पादनाची देवता होती. या देवतांच्या ते भजनी लागले. परदेशी स्त्रियांबरोबर लग्ने करू लागले. मिश्र विवाहामुळे व मूर्तिपूजेमुळे राष्ट्र दुबळे होते अशी धार्मिक नेत्यांची धारणा होती. त्यामुळे या दोन गोष्टीना धर्मपुरुषांनी सतत विरोध केला.

यहोशावानंतर शास्त्यांनी (प्रशासक) इस्रायेलचा कारभार पाहिला (ख्रिस्तपूर्व १२०० ते ख्रिस्तपूर्व १०२५).

एका अर्थाने हे शास्ते लष्करी टोळीप्रमुख होते. अथनीएलपासून शामसोनपर्यंत १२ शास्ते झाले. त्यामध्ये दबोरा ही एक महिला होती. अचाट पराक्रम गाजऊन ती अजरामर झाली.

इवलेसे|[२१]शलमोन राजाने जेरुसलेम येथे बांधलेले पहिले मंदिर (ख्रिस्तपूर्व ९६६-५८६)[22]शलमोन राजाने जेरुसलेम येथे बांधलेले पहिले मंदिर (ख्रिस्तपूर्व ९६६-५८६)[21]शलमोन राजाने जेरुसलेम येथे बांधलेले पहिले मंदिर (ख्रिस्तपूर्व ९६६-५८६)

ख्रिस्तपूर्व १०४० मध्ये शमुवेल या महान संदेष्ट्याचा उदय झाला. आजूबाजूच्या प्रदेशात राजेशाही होती. आपल्यालाही राजा मिळावा असा लोकांनी त्याजकडे आग्रह धरला. तेव्हा त्याने शौल याला राजा म्हणून अभिषेक केला. (ख्रिस्तपूर्व १०१० ते ७९०). तो इस्रायेलचा पहिला अभिषिक्त राजा होता. शौल स्वभावाने संशयी आणि मत्सरी होता. त्याचा दुर्दैवाने अंत झाला. शौलच्या मृत्यूनंतर दावीद राजासनावर बसला. त्याने चाळीस वर्ष राज्य केले. (ख्रिस्तपूर्व १०१० ते ९७०). त्याने इस्रायेलचा विस्तार केला आणि आजूबाजूच्या सर्व शत्रुराष्टांचा बिमोड केला. त्यामुळे इस्राएल ही प्रबळ सत्ता बनली. त्यानंतर दाविदाचा मुलगा शलमोन हा गादीवर बसला. (ख्रिस्तपूर्व ९७० ते ९३३). तो अतिशय ज्ञानसंपन्न आणि विवेकी होता. त्यानेच जेरुसलेमचे प्रसिद्ध मंदिर बांधले. या दोन्ही राजांनी इस्रायेलला वैभवाच्या शिखरावर नेले.

दुभागलेले राज्य : राजा शलमोनाच्या अखेरीस इस्राएल राज्याला उतरती कळा लागली. त्याच्या मृत्युनंतर (ख्रिस्तपूर्व ९३३) अखंड इस्राएल राज्याची दोन शकले झाली. (इस्राएल आणि यहुदा). इस्रायेलचे दहा वंश एकीकडे (उत्तरेकडील राज्य इस्राएल) तर उरलेले दोन वंश दुसरीकडे (दक्षिणेकडील राज्य यहुदा) अशी या अखंड राज्याची विभागणी झाली. ( ख्रिस्तपूर्व ९३१-७२१). शोमरोन ही उत्तरेकडील इस्राएल राज्याची राजधानी झाली तर जेरुसलेम ही दक्षिणेकडील यहुदा राज्याची राजधानी झाली. दुहीमुळे दोन्ही राज्ये कमकुवत होत गेली. याचा फायदा आजूबाजूच्या शत्रूराष्टानी घेतला. दावीद आणि शलमोन यांनी घालून दिलेल्या चागल्या प्रथा यहुदा राज्याने सुरु ठेवल्या. त्यांनी एकेश्वरवादाचे रक्षण केले. जेरुसलेमचे मंदिर हे त्यांच्या एकीचे प्रतिक बनले. धर्मशास्त्र (तोराह - जुना करार) हा धर्मनियमांचा संग्रह संपादित करण्यात आला. यशया आणि मिखा हे यहुदातील महत्वाचे संदेष्टे होते. त्यांनी लोकांना सद्बोध केला.

याउलट परिस्थिती इस्राएल राज्यात निर्माण झाली. तेथील राजे मूर्तीपूजा व अनेक देवतापूजनाच्या नादी लागले. राजा धर्माचा रक्षक राहिला नाही. त्यामुळे ही जबाबदारी संदेष्ट्यानी पार पाडली. एलिया, आमोस, होशेय या संदेष्ट्यानी धर्माचे स्वरूप शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना राज्यसत्तेशी संघर्षही करावा लागला. ख्रिस्तपूर्व ७२१ मध्ये असिरीयन साम्राज्याने इस्रायेलवर स्वारी केली आणि इस्राएली लोकांना बंदिवासात नेले. त्या वेळी इस्रायेलचे हे दहा वंश इतिहासातून नामशेष झाले असे समजले जाते.

ख्रिस्तपूर्व ५९७ मध्ये बाबिलोनचा राजा नाबुखद्रेसर याने दक्षिणेच्या यहुदा राज्यावर स्वारी केली आणि हजारो लोकांना बंदिवान करून बाबीलोनला नेले. ख्रिस्तपूर्व ५८७ मध्ये पुन्हा एकदा स्वारी करून वृद्ध व आजारी वगळता बाकी साऱ्यांना बंदिवासात नेले. याच वेळी त्याने जेरुसलेममधील पहिल्या मंदिराचा (शलमोनाचे मंदिर) विनाश केला. (बाबिलोनियन हद्दपारी ख्रिस्तपूर्व ५८७ ते ५३८).

ख्रिस्तपूर्व ५३८ मध्ये पर्शियाचा राजा सायरस (कोरेश) याने नबुखद्रेजरचा पराभव करून बाबीलोनचे साम्राज्य काबीज केले. सायरसने एक आदेश जारी करून इस्राएली लोकांना मायदेशी परतण्याचे व उपासनेचे स्वातंत्र्य बहाल केले. त्याने त्यांच्या भग्न मंदिराच्या पुन्हा उभारणीसाठी आर्थिक सहाय्य केले. सायरसने धार्मिक सामंजस्य आणि आंतरधर्मीय सुसंवाद यांचा आदर्श घालून दिला. (सायरस हा झोरास्तीयन म्हणजे पारशी धर्मीय होता).

ख्रिस्तपूर्व ५३८ ते ३३३ पर्यंत पर्शियन साम्राज्याच्या मांडलीकानी इस्रायेलमध्ये कारभार पाहिला. ख्रिस्तपूर्व ५३७ मध्ये भग्न मंदिराच्या जीर्णोद्धाराला प्रारंभ झाला. ख्रिस्तपूर्व ४५८ मध्ये विद्वान धर्मशास्त्री एज्रा याचा उदय झाला. त्याने मोशेच्या धर्मशास्त्राच्या आधारे इस्राएली लोकांचे धार्मिक पुनरुज्जीवन केले.

उत्क़्रुष्ट नेतृत्वगुण असलेला नहेमिया हा पर्शियन राजाच्या सेवेत होता. राजाने त्याला जेरुसलेमचा मांडलिक म्हणून नेमले. त्याने बारा वर्ष (ख्रिस्तपूर्व ४४५ - ४३३) कारभार पाहिला. तो उत्क़्रुष्ट संघटक आणि धर्मसुधारक होता. बंदिवासातून परतलेल्या यहुद्याना त्याने पुन्हा अस्मिता प्राप्त करून दिली. त्यानंतर सुमारे १०० वर्ष फारसे काही घडले नाही. याच काळात मलाखी, ओब्दीया, योएल आणि योना या संदेष्ट्यानी संदेश दिले. तसेच याच काळात इयोब, नितीसुत्रे, गीतरत्न, बहुतेक स्तोत्रे, इस्रायेलचा इतिहास, योना, तोबियस, एज्रा, नहेमिया या पुस्तकांचे लेखन झाले.

इवलेसे|ख्रिस्ताच्या काळातील हेरोद राजाने उभारलेले मंदिर [२२] (ख्रिस्तपूर्व १९ ते इसवी सन ७०)[23] (ख्रिस्तपूर्व १९ ते इसवी सन ७०)[22] (ख्रिस्तपूर्व १९ ते इसवी सन ७०)

ख्रिस्तपूर्व ३३६ मध्ये थोरला आलेझान्ङर याचा उदय झाला. त्याने ख्रिस्तपूर्व ३३१ मध्ये पर्शियन साम्राज्य काबीज केले. ख्रिस्तपूर्व ३३३ मध्ये आलेझान्ङरने सीरिया प्रांत जिकून घेतला. ख्रिस्तपूर्व ३२३ मध्ये बाबिलोनमध्ये त्याचे निधन झाले. ख्रिस्तपूर्व २०० पर्यंत इजिप्तच्या लाजीदेस घराण्याने यहुदा प्रांतावर राज्य केले. ख्रिस्तपूर्व ६३ ते इसवी सन ३१३ या काळात रोमन लोकांनी या प्रांतावर राज्य केले. याच रोमन लोकांच्या कालावधीत प्रभू ख्रिस्ताचा जन्म झाला. (इसवी सन अंदाजे ४ ते ६ या दरम्यान). अंदाजे इसवी सन ३३ साली ख्रिस्ताला क्रुसावर चढविण्यात आले. त्यानंतर ख्रिस्ताच्या शिष्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार बहुतेक रोमन साम्राज्यात केला होता. इसवी सन ७० साली रोमन लोकांनी जेरुसलेमच्या दुसऱ्या मंदिराचा विनाश केला. आणि बहुतेक यहुदी लोक वेगवेगळ्या देशात विखुरले गेले. इसवी सन ३१३ ते ६३६ या कालावधीत इस्रायेलमध्ये बिझान्टाईन राजवट होती. इसवी सन ५७० साली अरेबिया येथे (मक्का शहरात) महंमद पैगंबर यांचा जन्म झाला. त्याने इसवी सन ६१० मध्ये इस्लाम धर्माची स्थापना केली. इसवी सन ६३६ ते १०९९ या काळात अरब (मुस्लिम) लोकांनी इस्रायेलवर स्वाऱ्या केल्या. त्यांनी जेरुसलेम येथील यहुदी लोकांच्या भग्न मंदिराच्या जागी डोम ऑफ द रॉक (DOME OF THE ROCK) ही मशीद बांधली. यहुदी आणि इस्लाम यांच्या संघर्षाचे मूळ या ठिकाणी आहे. मुस्लीम अरबांच्या पवित्र भूमीवरील (इस्राएल) आक्रमणानंतर बरीचशी ख्रिस्ती तीर्थक्षेत्रे त्यांच्या ताब्यात गेली होती. ती तीर्थस्थाने अरबांच्या हातून मुक्त करण्यासाठी पोप दुसरे अर्बन यांच्या प्रेरणेने कृसेडरची (क्रुसेडर म्हणजे धर्मयुद्धे) पहिली तुकडी इसवी सन १०९९ साली जेरुसलेमला आली. अरब ख्रिस्ती यांच्यातील घनघोर युद्धामुळे जेरुसलेमची पवित्र भूमी रक्ताने भिजली. जवळपास सात धर्मयुद्ध या काळात लढली गेली. इसवी सन१०९९ ते १२९१ या कालावधीत बेझंटाईन राजांनी येथे राज्य केले.

इसवी सन १२९१ साली मामलुक तुर्कांनी पेलेस्तैनवर विजय मिळविला. त्यांनी इसवी सन १५१६ पर्यंत राज्य केले. त्यानंतर आटोमन तुर्क आले. सुलतान सुलेमान याने याच काळात जेरुसलेम शहराभोवती तटबंदी उभारली. ती अजूनही शाबूत आहे. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान म्हणजे इसवी सन १९१७ साली हा प्रदेश ब्रिटीशांच्या ताब्यात आला. त्यांनी देशोधडीला लागलेल्या यहूद्याना मायदेशी परतण्याची मुभा दिली. परंतु त्यांच्यावर जाचक निर्बंधही लादले. १४ मे १९४८ रोजी इस्रायेलचे स्वतंत्र राष्ट अस्तित्वात आले. जवळपास २००० वर्षानंतर जगभर विखुरलेले यहुदी येथे परत येऊ लागले. (इस्रायेलची पुनस्स्थापना).

थोडक्यात ख्रिस्तपूर्व ५८७ पासून इसवी सन १९४८ पर्यंत पालेस्तैनवर बाबिलोनियन, पर्शियन, ग्रीक रोमन, बिझान्तैन, अरब मुस्लीम, क्रुसेडर, मामलुक तुर्क, आटोमान तुर्क आणि ब्रिटीश या अनेकविध सत्तांनी राज्य केले. इस्राएलच्या इतिहासातील महत्वाचे टप्पे :-

ख्रिस्तपूर्व किवा इसवी सन पूर्व - ( BEFORE CHRIST OR B.C.)

१९५० अब्राहामचा इस्राएल भूमीत (कनान देशात) प्रवेश

१२५० देवाचे मोशेला पाचारण

१२१२ इस्राएल जनतेचा इजिप्तच्या गुलामगिरीतून मायभूमीत (इस्राएल मध्ये) प्रवेश.

१२०० पालेस्तिनी लोकांचा वेढा व त्या काळापासून त्याला पालेस्तइन हे नाव.

११०५ शमुवेल भविष्यवाद्याचा जन्म.

१०२५ इस्रायेलचा पहिला राजा म्हणून शौलाचा राज्याभिषेक.

१००४ दावीद राजाची वैभवशाली कारकीर्द.

९६५ दाविदाचा मुलगा शलमोन याच्या राजवटीचा सुवर्णकाळ. पहिल्या मंदिराची उभारणी.

९२२ इस्रायेलचे विभाजन : इस्राएल व यहुदा अशी दोन राज्ये.

८७५ यशया भविष्यवाद्याचा काळ.

७२१ असिरीयन साम्राज्याकडून इस्रायेलचा पाडाव. इस्राएली जनता पुन्हा गुलामगिरीत.

६२६ यिर्मया भविष्यवाद्याचा काळ

५८७ बाबिलोनी सम्राट नबुखाद्रेजर याजकडून यहुदा राज्याचा अंत. जेरुसलेममधील मंदिराचा विनाश. बाबिलोनमध्ये दास्यत्व.

५३८ पर्शियाचा सम्राट सायरस (कोरेश) बाबिलोन काबीज करतो आणि यहुदी लोकांना मायदेशी परतून जेरुसलेममध्ये मंदिर उभारण्याची परवानगी देतो.

३३४ आलेक्झान्देर द ग्रेंट (सिकंदर) पालेस्तीन काबीज करतो.

६४ पोम्पी पेलेस्तीन जिकून घेतो. (रोमन सत्तेखाली पालेस्तीन).

४० पारथीयन राज्यकर्ते पालेस्तीन सर करतात.

३९ पार्थीयन सैन्याचा पाडाव करून हेरोद पालेस्तीन परत मिळवितो.

इसवी सन ४ : प्रभू येशूचा जन्म.

ख्रिस्तजन्मानंतर किवा इसवी सना नंतर (A.D.)

इसवी सन ३० येशूचे क्रूसावरील मरण.

७० रोमचा सम्राट टायटसं जेरुसलेम नगरी व जेरुसलेमचे मंदिर यांचा नाश करतो. यहुदी पुन्हा हद्दपारीत जातात.

१३५ हेद्रीयन पुन्हा जेरुसलेमचा नाश करून तेथे एलिना कापितोलीना ही नगरी वसवतो.

३३० ते ६३४ सम्राट कॉन्स्टन्टाईनख्रिस्ती धर्म स्वीकारतो व पवित्र भूमीत अनेक ख्रिस्त मंदिरे उभारतो.

इसवी सन ५७० मोहंमद पैगंबर यांचा अरेबियातील मक्का येथे जन्म. त्यांच्या द्वारे इसवी सन ६१० मध्ये इस्लामची (मुस्लीम) धर्माची सुरवात.

६१४ पर्शियन सम्राट खुस्रो पालेस्तीन काबीज करून अनेक ख्रिस्तमंदिरे जमीनदोस्त करतो.

६३६ पालेस्तीन मुस्लिमांच्या ताब्यात. जेरुसलेम मुस्लिमांचेही तीर्थक्षेत्र. भग्न यहुदी मंदिराच्या जागी डोम ऑफ द रॉक मशिदीची उभारणी.

१००९ फातीमिद खालिद ख्रिस्त मंदिरे उध्वस्त करतो. क्रुसेड म्हटलेल्या धर्मयुद्दना चेतावणी.

१०९९ क्रुसेडर जेरुसलेम आपल्या ताब्यात घेतात. व तेथे लाटिन साम्राज्य प्रस्थापित करतात.

१२६३ इजिप्तचा मामेलूक सुलतान संपूर्ण क्रुसेड भूमी ताब्यात घेतो.

१५१७ पालेस्तीन तुर्कस्तानच्या ओटोमान राजवटीच्या ताब्यात.

१९१७ पहिल्या महायुद्धाला सुरवात.

१९२२ पालेस्तीन ब्रिटीशांच्या सत्तेखाली

१९४७ पालेस्तीनची फाळणी : इस्राएल व पालेस्तीन अशा दोन राष्टांची निर्मिती.

१९४८ नवे राष्ट्र म्हणून इस्रायेलचा उदय. यहुदी अरब यांच्यात पहिले युद्ध. (इस्रायेलची पुनस्स्थापना)

१९५६ इस्राएल इजिप्त युद्ध

१९६७ अरब व इस्राएल यांच्यात सहा दिवसांचे दुसरे युद्ध. (जेरुसलेमचा ताबा यहुद्यांकडे).

१९७३ अरब इस्राएल यांच्यात १६ दिवसांचे तिसरे युद्ध. ( योम किप्पुर युद्ध).

१९७९ इस्राएल इजिप्त यांच्यात समेट नव्या कराराची पार्श्वभूमी :-

१. नव्या कराराच्या काळातील राजकीय परिस्थिती : - येशूच्या जन्माच्या वेळी (अंदाजे इसवी सन ४ च्या दरम्यान) पालेस्तीन देशावर रोमन सत्तेचा ताबा होता. आणि हेरोद हा रोमन सत्तेचा मांडलिक म्हणून त्या प्रदेशावर राज्य करीत होता. हेरोद कारस्थानी परंतु कर्तव्यदक्ष होता. त्याने अनेक कोट किल्ले बांधले. नगरे वसविली. वास्तू, इमारती उभारल्या. मंदिरे आणि नाट्यशाळा बांधण्यासाठी मुक्तहस्ते आर्थिक मदत केली. जेरुसलेमच्या प्रसिद्ध मंदिराची पुनरबांधणी करून (ख्रिस्तपूर्व २० ते ख्रिस्तपूर्व १०) त्याने यहुद्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला. मात्र हेरोदाचे कौटूबिक जीवन अतिशय दुर्दैवी व अस्थिर होते. त्याला एकूण दहा बायका होत्या. मरियम पहिली ही त्याची आवडती पत्नी होती. परंतु हेरोदाची बहिण सलोमी ही तिला पाण्यात पाहत असे. तिने हेरोदाच्या मनात मरियम विषयी विष पेरले. बहिणीच्या नादी लागून हेरोदाने आपली पत्नी मरियम, तिची आई व आपले दोन पुत्र अरीस्तोबोलास आणि आलेक्झान्दर यांची क्रूर हत्या केली. डोरिस या पत्नीपासून झालेला आपला मुलगा अन्तीपातेर याला त्याने आपला वारस नेमले. परंतु तो आपल्या विरुद्ध कट कारस्थान करीत आहे असा संशय येताच त्याने त्यालाही ठार केले.

येशूचा जन्म झाला (इसवीसन पूर्व ४) तेव्हा आपल्याला प्रतीस्पर्धी निपजला आहे अशा समजुतीने हेरोदाने बेंथलेहेम व आजूबाजूच्या प्रदेशातील जी दोन वर्षांची व त्याहून कमी वयाची बालके होती त्यांचा वध करविला. (पहा नवा करार : मत्तय २ : १६). हेरोदाचा क्रूर स्वभाव पाहता ही गोष्ट खरी असावी यात संशय नाही. कर्करोगाने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू अतिशय दुखद आणि वेदनादायक होता. आपल्या मृत्यूनंतर कोणी शोक करणार नाही याची त्याला कल्पना होती म्हणून ' माझा मृत्यू होताच जेरुसलेममधील काही प्रतिष्ठित लोकांना पकडून त्यांची हत्या करावी ' असा आदेश हेरोदाने दिला होता.

नवा करार म्हणजे येशूच्या शिष्यानी आणि श्रद्धा ठेवणाऱ्या समुदायाने मागे ठेवलेला एक मौलिक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. एका महान घटनेचा त्यांनी अनुभव घेतला व तो अनुभव इतरांना मिळावा या उच्च आध्यात्मिक हेतूने त्यांनी शुभवार्तामाने (GOSPELS) लिहिली. निरनिराळ्या सूत्रांकडून जमविलेल्या माहितीची त्यांनी प्रामाणिकपणे मांडणी केली. त्यांनी आपला मजकूर काळजीपूर्वक संपादित केला. हे सर्व लेखन जबाबदार व्यक्तींनी केले आहे. त्या काळात शुभवर्तामानाची अनधिकृत पुस्तकेही (APOCRYPHAL GOSPELS) अस्तित्वात आली होती. त्या प्रकारचे लेखन त्यांनी कटाक्षाने टाळले. अंदाजे इसवी सन ५० ते इसवी सन १०० या कालावधीत नव्या करारातील बहुतेक पुस्तके लिहिली गेली होती. शुभवर्तामानाच्या लेखकांनी किबहुना संपादकांनी एकाच बैठकित केलेले हे एकटाकी लेखन नाही. त्यंनी त्या काळी उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक माहितीची जमवाजमव करून त्यांची जुळवाजुळव केली. तसे करताना सर्वच ठिकाणी कालानुक्रम पाळला गेला आहे असे नाही. सोयीनुसार त्यांनी विषयांची वर्गवारी केली आहे. शैली आणि आशय यांचा अभ्यास केला असता योहानाचे शुभवर्तमान भिन्न स्वरूपाचे आहे असे स्पष्ट जाणवते. मत्तय, मार्क आणि लुक यांनी नमूद केलेल्या काही गोष्टी योहानाने वगळल्या आहेत, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या गोष्टींचे आणि स्थळांचे संदर्भ त्याने दिले आहेत. उदा येशूला अटक केल्यानंतर त्याला प्रमुख याजक हन्नाकडे नेण्यात आले, हे त्यानेच नमूद केले आहे.

२. ख्रिस्तकालीन धार्मिक व सामाजिक व्यवस्था :- प्राचीन यहुदी समाजात प्रारंभी नियमांचे जंजाळ नव्हते. दहाआज्ञा म्हणजे जीवन जगण्यासाठी दिलेली दहा सोपी मुल्ये होती. हळूहळू यहुदी समाजात पुरोहितशाहीचा उदय झाला. धार्मिक नीतीनियमांचे अवडंबर माजले. या नियमांना अनेक फाटे फुटत गेले. त्यांचे कर्मकांड निर्माण झाले. यहुदी धर्मात लहानमोठे असे एकूण ६१६ नियम होते. या नियमांचा अर्थ लावणे ही शास्त्री व परुशी लोकांची मक्तेदारी होती. तसे करताना शब्दाचा भावार्थ समजून घेण्याऐवजी त्यांचा कीस काढण्याची प्ररुत्ती वाढीस लागली. उदा. शब्बाथवार म्हणजे शनिवार पवित्र पाळण्याची व त्या दिवशी कुठलेही काम करू नये अशी आज्ञा दिली गेली गेली होती. मानवाने सप्ताहातील एक दिवस विश्रांती घ्यावी व तो दिवस देवाच्या स्मरणात घालवावा असा उद्देश यामागे होता. मात्र शास्त्री व परुशी यांनी या आज्ञेला कर्मकांडाचे स्वरूप दिले.

शब्बाथवारी काय करावे व काय करू नये यासंबंधी अनेक ग्रंथ रचण्यात आले. शब्बाथवारी श्रम करण्यास मनाई होती. श्रम म्हणजे काय ? किती श्रम करणे धर्मसंमत आहे ? कुठल्या प्रकारचे श्रम वर्ज्य आहेत ? याचे कोष्टक तयार झाले. उदा. शब्बाथवारी दिवा उचलून ठेवता येईल का ? सुईत दोरा ओवता येईल काय ? वडिलांना आपले छोटे बाळ उचलता येईल काय ? अशा शुल्लक प्रश्नाबाबत वादविवाद घडू लागले.

प्रारंभी हे नियम माैखिक स्वरुपात होते. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात ते शब्दबद्ध करण्यात आले. आठशे पृष्ठे असलेला त्रेसष्ट आध्यायांचा एक ग्रंथ रचण्यात आला. त्याला 'मिश्नाह' (Mishna) असे म्हणतात. पुढे या त्रेसष्ट आध्यायांवर आणखी भाष्ये लिहिण्यात आली. त्याला ' तालमूद' (Talmud) म्हणतात. जेरुसलेमच्या तालमुद्चे बारा विशाल छापील ग्रंथ व बाबिलोनच्या तालमुद्चे त्रेसष्ट छापील ग्रंथ आज यहुदी समाजात प्रचलित आहेत.

प्रभू येशू व त्याचे शिष्य धर्माने यहुदी होते. परंतु या धार्मिक कर्मकांडाला येशूचा सक्त विरोध होता. शब्बाथवारी परोपकार किवा चागली कार्ये करण्यास विरोध नसावा असे त्याचे मत होते. त्यामुळे कर्मठ धार्मिक कर्मकांडाला येशूने प्रखर विरोध केला. हे नियम अधिक मानवतावादी करण्याचा त्याचा प्रयत्न होता. येशूच्या काळी विविध धार्मिक गट अस्तित्वात होते. ख्रिस्तपूर्व १७५ ते ख्रिस्तपूर्व १२५ या काळात यहुदी लोकांची हसिदिम आणि हेल्लेणीस्त अशी विभागणी झाली होती. हसिदिम म्हणजे मोशेच्या धर्मशास्त्राचे काटेकोर पालन करणाऱ्या श्रद्धाळू यहुदी लोकांचा गट आणि हेल्लेणीस्त म्हणजे ग्रीक संस्कृतीचा अवलंब केलेल्या यहुदी लोकांचा गट होय. परुशी आणि एसेनी हे हसिदिम गटाचे तर सदुकी हे हेल्लेणीस्त गटाचे अनुयायी होते. ख्रिस्ताच्या काळात यहुदी समाजात अस्तित्वात असलेले प्रमुख समाजगट खालीलप्रमाणे होते.

परुशी : - परुशी हा शब्द "पेरीशाया" (Perishaya) या अरेमायिक शब्दावरून प्रचलित झाला. हे यहुदी लोकांचे धार्मिक नेते होते. मोशेच्या धर्मशास्त्रावर आधारित धार्मिक समाज निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अस्थिर राजकीय वातावरणात धर्मशास्त्र समाजाला एकत्र ठेऊ शकते अशी त्यांची धारणा होती. ते धर्मशास्त्राच्या पालनाच्या बाबतीत अत्यंत आग्रही होते. त्यामुळे धर्मशास्त्राचे कर्मकांड निर्माण झाले. त्यातील कर्मठ परुशी लोकांबरोबर येशूचे अनेकदा खटके उडाले.धर्मशास्त्री : - हे लोक धर्मशास्त्राचे अधिकृत भाष्यकार होते. ग्रीक भाषेत त्यांच्यासाठी " ग्रोमातेउस " आणि हिब्रू भाषेत "सोफेर" हे शब्द वापरले आहेत. दीर्घ प्रशिक्षणानंतर वयाच्या चाळीसाव्या वर्षी एखाद्याला धर्म शास्त्री म्हणून दीक्षा दिली जात असे. त्यानंतर त्यांना धर्मपंडित म्हणून समजले जात असे. धर्मसभेत (सान्हेन्द्रीन) बसण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होत असे. मान सन्मानासाठी ते अनेकदा हपापलेले असत. त्यामुळे येशूने अनेकदा त्यांची कानउघडणी केली होती.

सदुकी : - पालेस्तीन मधील श्रीमंत लोकांचे प्रतीनिधित्व करणारा हा धर्मगुरूंचा एक गट होता. योहान हिकार्नस (ख्रिस्तपूर्व १३४ - १०४) याच्या कारकिर्दीत हा गट उदयास आला. समाजातील श्रीमंत लोकांबरोबर त्यांचे जवळचे संबंध होते. ते स्वतःला जुन्या करारातील त्सादोक (Zadok) या याजकाचे उत्तराधिकारी समजत. यावरून त्यांना सदुकी हे नाव मिळाले. ( त्सादोक या हिब्रू शब्दाचा अर्थ नीतिमान असा आहे.). या पंथावर ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. मृतांचे पुनरुत्थान आणि देवदूतांचे अस्तित्व यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांच्यात आणि परुशी लोकात सतत खटके उडत. इसवी सन ७० नंतर सदुकी पूर्णपणे नामशेष झाले.

एसेनी : - हा आधात्मिक यहुदी लोकांचा एक गट होता. एसीन या शब्दाचा अर्थ धार्मिक वृत्तीचे असा आहे. हे इस्राएली लोक ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात बाबिलोनहून पालेस्तीनला परत आले. मृत समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर कुम्रान येथे वाळवंटात त्यांनी वस्ती केली. नव्या करारात त्यांचा संदर्भ येत नाही कारण पारंपारिक यहुदी समाजापासून हे लोक अलिप्त राहत. जेरुसलेममधील मंदिर, तेथील पारंपारिक उपासना, बलिदान इत्यादी गोष्टी ते नाकारीत. मात्र पवित्र शास्त्राच्या (जुना करार किवा हिब्रू बायबल) अभ्यासाला त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांनी लिहिलेल्या जुन्या करारातील अनेक पुस्तकांच्या तसेच त्यांच्या पंथीय साहित्याच्या प्राचीन हस्तलिखित प्रती १९४८ साली कुम्रान येथील गुहेत सापडल्या आहेत. (पहा : मृत सागर गुंडाळ्या किवा Dead Sea Scrolls).

झेलोट : - येशूच्या काळी पालेस्तीन मध्ये झेलोट (Zealot) नावाचा अतिरेकी राष्टवाद्यांचा गट अस्तित्वात होता. रोमन लोकांशी सशत्र प्रतिकार करण्यासाठी पहिल्या शतकाच्या प्रारंभी हा जहाल गट अस्तित्वात आला. येशूच्या बारा शिष्यापैकी शिमोन हा या गटाचा पूर्वाश्रमीचा सभासद होता.

शोमरोनी लोक : - मत्तय, लुक आणि योहान यांच्या शुभवर्तामानात शोमरोनी लोकांचा संदर्भ येतो. कर्मठ यहुदी व शोमरोनी लोक यांच्यात हाडवैर होते. धार्मिकदृष्ट्या कर्मठ यहुदी या लोकांना पाखंडी व मिश्र रक्ताचे समजत व त्यांच्याशी कुठलाही संबंध ठेवीत नसत. आज इस्रायेलमध्ये केवळ ३५० शोमरोनी उरले आहेत.

येशूचे जीवितकार्य : - येशूच्या जन्मापासून इसवी सन हि कालगणना सुरु झाली असे मानले जाते. मग येशूचा जन्म ख्रिस्तपूर्व ४ मध्ये कसा झाला असा प्रश्न पडतो. इसवी सन या पंचांगाची सुरवात इसवी सन ५२५ मध्ये मठवासी डायानेशीयस याने केली. त्यावेळी रोमन पंचांग (कॅलेंडर) प्रचलित होते. डायानेशीयस याने रोमन वर्ष ७५४ हे येशूचे जन्मवर्ष मानून इसवी सन ही कालगणना सुरु केली. त्याच वर्षी हेरोदाचा मृत्यू झाला असे त्याने गृहीत धरले. परंतु यहुदी इतिहासकार योसेफस याने केलेल्या ऐतिहासिक नोंदीनुसार हेरोदाचा मृत्यू रोमन वर्ष ७५० मध्ये झाला होता. डायानेशीयस याने केलेली हि चूक कालांतराने लक्षात आली. त्यामुळे येशूचे जन्मवर्ष ४ वर्ष मागे नेऊन ख्रिस्तपूर्व ४ असे करण्यात आले.

येशूच्या नावाचा उच्चार हिब्रू भाषेत 'यहोशवा किवा येशुवा" ग्रीकमध्ये येजूस आणि अरेमायिक मध्ये येशुवा असा होतो. या नावाचा अर्थ "यहोवा माझे तारण आहे" असा होतो. यहोवा हे परमेश्वरासाठी जुन्या करारात वापरलेले हिब्रू नाव आहे. या नावाचा अर्थ सर्वसाधारणपणे अनादी परमेश्वर असा होतो. येशूच्या जन्मासंबंधी मत्तयाच्या शुभवर्तामानात पुढील नोंद केलेली आहे.

"येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला, त्याची आई मरिया हिची योसेफाबरोबर सोयरिक झाली होती. त्यांचा सहवास घडण्यापूर्वी ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झालेली दिसून आली." (मत्तय १:१८).

योसेफ आणि मारिया यांचा शरीरसंबंध न येता दैवी कृपाप्रसादाने तीच्या उदरी गर्भ राहिला. येशूचा जन्म यहुदा प्रांतातील बेंथलेहेम गावी झाला. त्याचे बालपण व तारुण्य गालील प्रांतातील नाझरेथ गावी गेले. तेथे तो मारिया व योसेफ यांच्या संगतीत वाढला. सुतारकी हा योसेफाचा व्यवसाय होता. त्यामुळे सुताराचा मुलगा या नावाने समकालीन लोक येशूला ओळखत असत. वयाच्या साधारण तिसाव्या वर्षी येशूने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडून बाप्तिस्मा स्वीकारून आपल्या कार्यास प्रारंभ केला. तत्कालीन पालेस्तीन देश हे येशूचे कार्यक्षेत्र होते. त्याकाळी पालेस्तीन रोमन सत्तेच्या अधिपत्याखाली होता.

येशूची लोकशिक्षणाची पद्धत : - पालेस्तीन हि येशूची कर्मभूमी. आपल्या कार्यकाळात येशूने हा प्रदेश पिंजून काढला. येशूने सभास्थान (सिनेगॉग) आणि मंदिराच्या पीठावरून प्रवचने दिली. त्याचप्रमाणे गावोगावी फिरून लोकांना शिक्षण दिले. येशूची प्रवचने ऐकण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी लोटत असत. त्याच्या शब्दांना अधिकारवाणीची धार होती. त्यामुळे सर्वावर त्याची छाप पडत असे. उपदेश करताना येशूने दुष्टांतकथांचा मुक्तपणे वापर केला. येशूचे चमत्कार : - चमत्कार हा येशूच्या कार्याचा एक घटक होता. ते साध्य नव्हते तर साधन होते. येशूने मानवाला पूर्ण मुक्ती देण्यासाठी वापरलेले ते एक माध्यम होते. मँद्लीन मिलर आणि जे. लिन मिलर यांनी येशूच्या चमत्कारांची तीन वैशिष्टये सागितली आहेत. १) येशूचे चमत्कार मानवतेच्या भल्यासाठी होते. २) त्या चमत्कारामागे उच्च नैतीक अधिष्ठान असून ते दैवी संदेश देणारे साधन होते. ३) ते स्वतःच्या लाभासाठी किवा आत्मप्रौढीसाठी नसून येशूने त्यांचा संयमित वापर केला. (हर्पेर्स बायबल डीशनरी पृ ४४७)

येशूच्या रूपाने देव आपले वैभव प्रकट करीत होता. हा येशूच्या चमत्काराचा गर्भित अर्थ होता. परंतु तो सर्वांच्या लक्षात आला नाही. लोकांना शारीरिक, मानसिक व्यथा वेदनापासून मुक्त करण्यासाठी येशूने केलेले चमत्कार हे एक प्रतिक होते. त्या अनुभवातून संबंधित व्यक्तींच्या जीवनात अमुलाग्र बदल व्हावा, त्यांचे आत्मपरीवर्तन व्हावे व त्यांना श्रद्धेची अनुभूती यावी हे त्याच्या चमत्काराचे अंतिम उद्दिष्ट होते. त्यामुळे आपले विरोधक किवा राजा हेरोद यांची जिज्ञासा पुरी करण्यासाठी किवा त्यांच्याकडून नमस्कार घेण्यासाठी येशूने चमत्कार करणे कटाक्षाने टाळले. दुष्ट लोक चमत्कारांची मागणी करतात असे त्याने सागितले. (मत्तय १२:३८-४०). लोकांनी चमत्काराची मागणी केली म्हणून त्याला मनस्वी वाईट वाटले. (मार्क : ८:११-१२).खोटे संदेष्टे फसविण्यासाठी चमत्कार करतील असा इशारा येशूने दिला. (मार्क : १३:२२). तसेच विश्वास ठेवण्यासाठी धर्मशास्त्राचे पालन पुरेसे आहे. त्यासाठी चमत्काराची गरज नाही असे येशूने स्पष्ट सागितले. (लुक १६: ३१). येशूने अनेकदा लोकांसमोर चमत्कार करण्याचे कटाक्षाने टाळले. एका बहिऱ्या माणसाला त्याने लोकांपासून दूर नेऊन बरे केले. (मार्क ७:३३).

चर्चचे कार्य व सेवाभाव

समलिंगी विवाह

चर्च

मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन

ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे २३वे अधिवेशन १०-११-१२ मे २०१२, या दिवसांत अहमदनगर येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष अशोक आंग्रे होते. हे साहित्य संमेलन, इसवी सन १८४२च्या जून महिन्यापासून अहमदनगर येथून प्रसिद्ध होणाऱ्या, आणि आजतागायत गेली १७० वर्षे अव्याहतपणे चालू असणाऱ्या ज्ञानोदय नियतकालिकातर्फे आयोजित केले जाते.

पहिल्या २३ संमेलनांपैकी आतापावेतो १६ प्रॉटेस्टंटपंथीय ख्रिस्ती लेखकांनी तर केवळ सात कॅथोलिकपंथीय लेखकांनी या साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भूषविली आहेत. काही वर्षांपूर्वी ही अध्यक्षपदे दोन्ही पंथातील लेखकांनी आलटून पालटून वाटून घ्यावीत असा अलिखित समझोता झाला होता.

आतापर्यंत महाराष्ट्रातील नाशिक, निपाणी, अहमदनगर, पुणे, बारामती, सोलापूर, मुंबई, मालवण, जालना, नागपूर या विविध ठिकाणी ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलने भरली. त्यांतील बहुतांशी द्विदिवसीय होती. अध्यक्षस्थानी फादर फ्रान्सिस दिब्रिटो, निरंजन उजगरे, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. अनुपमा उजगरे, डॉ. सुभाष पाटील वगैरे साहित्यिक होते.

यापूर्वीची मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने आणि त्यांचे अध्यक्ष

१ले : १८-१९एप्रिल १९२७, अहमदनगर, रेव्हरंड डॉ. निकल मेकॅनिकल

२रे : १८-१९ एप्रिल १९३०, मुंबई, मनोहर कृष्ण उजगरे (स्वागताध्यक्षा लक्ष्मीबाई टिळक)

३रे : २८-२९ डिसेंबर १९३२, निपाणी, देवदत्त नारायण टिळक

४थे : २८-२९ डिसेंबर १९३३, नागपूर, लक्ष्मीबाई नारायण टिळक (स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद साळवे)

५वे : १५-१७ ऑक्टोबर १९५४, केडगाव, पु.ल.पाटोळे

६वे : १८-१९ नोव्हेंबर १९५५, पुणे, रेव्ह. सुमंत धोंडो रामटेके

७वे : २७-२९ डिसेंबर १९५६, पुणतांबे, वसंत भाऊराव समुद्रे

८वे : ६-७ नोव्हेंबर १९७२, पुणे, आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी (स्वागताध्यक्ष आचार्य दीनानाथ एस.पाठक)

९वे : २९-३० डिसेंबर १९७३, मुंबई, फादर डॉमनिक ऑब्रिओ (स्वागताध्यक्ष हरिश्चंद्र भास्कर उजगरे)

१०वे : ३-४-नोव्हेंबर १९७५, बारामती, भास्करराव जाधव (स्वागताध्यक्ष डॉ. कमलाकर कोल्हटकर)

११वे : २७-२८डिसेंबर १९७७, सोलापूर, रॉक कार्व्हालो (स्वागताध्यक्षा मरियम रॉजर्स)

१२वे : २३-२४ मे १९८१, अहमदनगर, श्रीमती रामकुंवर नामदेव सूर्यवंशी (स्वागताध्यक्ष डॉ.एस.के. हळबे)

१३वे : २९-३० डिसेंबर १९८४, मुंबई, फादर डॉ. एलायस रॉड्रिग्ज (स्वागताध्यक्षा विजया शामराव पुणेकर)

१४वे : २८-२९ एप्रिल १९९०, मुंबई, विजया शामराव पुणेकर (स्वागताध्यक्ष रवि देवीप्रसाद शर्मा)

१५वे : १०-१२ जानेवारी १९९२, पुणे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो (स्वागताध्यक्ष फादर नेल्सन मच्याडो)

१६वे : १७-१८ डिसेंबर १९९४, मालवण, निरंजन हरिश्चंद्र उजगरे (स्वागताध्यक्ष फादर डिसिल्व्हा)

१७वे : १८-१९ एप्रिल १९९८, नागपूर, प्रा. सुधीर देवीप्रसाद शर्मा (स्वागताध्यक्ष बिशप रा. रेव्ह. विनोद पीटर)

१८वे : ५-६ फेब्रुवारी २०००, नाशिक, प्रा.डॉ. सिसिलिया कार्व्हालो (स्वागताध्यक्ष फादर ज्यो पिठेकर)

१९वे : १५-१७ नोव्हेंबर २००१, अहमदनगर, प्राचार्य देवदत्त हुसळे (स्वागताध्यक्ष कमलाकर देठे)

२०वे : २७-२९ मे २००५, मुंबई, डॉ. अनुपमा निरंजन उजगरे (स्वागताध्यक्ष विलास तोरणे)

२१वे : १८-२० मे २००७, जालना, डॉ.सुभाष कृष्णराव पाटील (स्वागताध्यक्ष विवेक निर्मल)

२२वे : ८-९-१० मे २००९, वसई, अध्यक्ष फादर मायकेल (स्वागताध्यक्ष

२३वे : १०-१२ मे २०१२, अहमदनगर, अशोक आंग्रे (स्वागताध्यक्ष रेव्ह. प्रदीप कांबळे)

२४वे :

२५वे : २०-२२ नोव्हेंबर २०१४, सोलापूर, डॉ. नाझरथ मिस्किटा (स्वागताध्यक्ष मोहन आंग्रे)

राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेने भरविलेली आतापर्यंतची ज्ञात ’बंधुता साहित्य संमेलने’; ही बहुतेक संमेलने पुणे जिल्ह्यात भरली होती. : -

१ले राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, पुणे येथे मे १९९९मध्ये झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा.ग. जाधव होते.

२ऱ्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. निर्मलकुमार फडकुले होते. हे संमेलन पिंपरी-विंचवडच्या सांगवी या उपनगरात झाले.

२रे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, अध्यक्ष - नागनाथअण्णा नायकवडी व नागनाथ कोतापल्ले; वाळवा

३रे राष्ट्रीय बंधुता संमेलन संमेलन पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात झाले; संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.रावसाहेब कसबे होते.

४थे संमेलन चिखली येथे, संमेलनाध्यक्ष डॉ.यू.म. पठाण.

५वे बंधुता साहित्य संमेलन, नाशिक येथे २२ फेब्रुवारी २००४ ला भरले होते. संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे होते.

६वे संमेलन अहमदनगरला. अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो (की कोतापल्ले?)

८वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन २४ आणि २५ फेब्रुवारी २००७ या कालावधीत पुण्यात झाले. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य संमेलनाध्यक्ष होते.

९वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, २३ फेब्रुवारी २००८ रोजी भरले होते; स्वागताध्यक्ष उत्तम कांबळे होते. अध्यक्ष होते डॉ. मा.प. मंगुडकर.

१०वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन भोसरी येथे, (२००९), संमेलनाध्यक्षा डॉ. सिसिलिया कार्व्हालो

११वे : २३-२४ जानेवारी २०१० या तारखांना ११वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन तळेगावमध्ये झाले. साहित्यिक गंगाधर पानतावणे या संमेलनाचे अध्यक्ष होते.

१२वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे २२-२३ जानेवारी २०११ या तारखांना जुन्नर तालुक्‍यातील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथे बारावे "राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन' झाले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे हे संमेलनाध्यक्ष होते.

१३वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने तेरावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन पुण्यात २१-२२जानेवारी २०१२ या तारखांना झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर होते.

१४वे तळेगाव दाभाडे येथे, संमेलनाध्यक्ष कॉ. गोविंद पानसरे होते.

११-१२ जानेवारी २०१४मध्ये मंचरला भरलेल्या १५व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अ‍ॅडव्होकेट भास्करराव आव्हाड होते..

१७-१८ जानेवारी २०१५ या काळात पुणे शहरात झालेल्या १६व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे होते.

१७व्या अखिल भारतीय बंधुता साहित्य संमेलनच्या अध्यक्षा डॉ. अश्विनी धोंगडे होत्या. संमेलन २०१६ सालच्या फेब्रुवारीत झाले..

२६-२७ डिसेंबर, २०१६ या कालावधीत पुण्यातील नवी पेठ येथे झालेल्या १८व्या संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश रोकडे होते. संमेलनादरम्यान विजय वडवेकर, अनुराधा गोरखे, गंगाधर रासगे, शिरीष चिटणीस, डॉ रझिया पटेल, डॉ. रामनाथ चव्हाण आणि बाबुराव घोलप महाविद्यालय यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.

१९वे : २४ व २५ डिसेंबर २०१७. इस्लामपूर; अध्यक्ष कवी उद्धव कानडे. या संमेलनादरम्यान शेतकरी कामगार पक्षा चे प्रा. एन.डी. पाटील यांना राष्ट्रीय बंधुता पुरस्कार प्रदान झाला.पहा : साहित्य संमेलने; दलित साहित्य संमेलन

शिवाजीराव अनंतराव भोसले

शिवाजीराव अनंतराव भोसले (जुलै १५, १९२७ - जून २९, २०१०) हे मराठी वक्ते, लेखक होते.

साहित्यिक कलावंत संमेलन

पुणे आणि आसपासच्या ग्रामीण परिसरातील साहित्यिक आणि कलावंत यांच्या उपजत कलागुणांचे संवर्धन व्हावे, या हेतूने प्रा. शैलेश त्रिभुवन आणि दिलीप बराटे यांनी 'साहित्यिक- कलावंत प्रतिष्ठान'ची स्थापना केली. पुण्यातील या संस्थेतर्फे पुणे शहरात 'साहित्यिक- कलावंत' संमेलनाचे आयोजन केले जाते. या संस्थेतर्फे वाग्यज्ञे हा पुरस्कारही दिला जातो. या संमेलनात सर्वांना विनामूल्य प्रवेश असतो.

६वे साहित्यिक-कलावंत संमेलन २२ व २३ एप्रिल २००६ रोजी झाले....

८वे संमेलन पुण्यातील कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये १४, १५ आणि १६ डिसेंबर २००८ या दिवसांत झाले.

९वे संमेलन २५ ते २७ डिसेंबर २००९ या दिवसांत झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे होते.

१०वे संमेलन १७ ते १९ डिसेंबर २०१० या दरम्यान झाले. संमेलनाध्यक्ष फ.मुं. शिंदे होते.

११वे साहित्यिक कलावंत संमेलन १0 ते १२ नोव्हेंबर २०११ या काळात झाले

१२वे संमेलन २३ ते २५ डिसेंबर २०१२ या काळात डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि कवी संदीप खरे यांना डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते "वाग्यज्ञे गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

१३वे संमेलन २५-२६ डिसेंबर २०१३ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. अश्विनी धोंगडे

१४वे संमेलन पुण्यामधील कोथरूड येथे २०१४ साली २५-२६-२७ डिसेंबर या काळात झाले. संमेलनाचे उद्घाटन उषा संजय काकडे यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर हे होते.

१५वे संमेलन पुण्यात २५ ते २७ डिसेंबर २०१५ या कालावधीत झाले. वात्रटिकाकार रामदास फुटाणे हे संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाचे उद्‌घाटन धनंजय मुंडे यांनी केले.

१६वे संमेलन पुण्यात २५-२६ डिसेंबर २०१६ या काळात झाले; प्राचार्य द.ता. भोसले संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाचे उद्‌घाटन डॉ.अक्षयकुमार काळे यानी केले. या साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते लेखिका मल्लिका अमर शेख यांना साहित्य क्षेत्रातील वाग्यज्ञे साहित्य पुरस्कार आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१७वे संमेलन पुण्यात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात २४-२५ डिसेंबर २०१७ या कालावधीत झाले. मराठीचे माजी प्राध्यापक डाॅ. निशिकांत मिरजकर हे संमेलनाध्यक्ष होते. या २५व्या संमेलनात विंदा दर्शन, चित्रांगण, ग्रंथोत्सव, सांस्कृतिक राष्ट्रवाद (चर्चा), काव्यांजली वगैरी कार्यक्रम होते. संमेलनात डॉ.. गिरीश ओक आणि अशोक नायगावकर यांना वाग्यज्ञे पुरस्कार प्रदान झाले. संमेलनाचे आयोजन दिलीप बराटे यांनी केले होते.

१८वे संमेलन पुणे येथे २३-२४ डिसेंबर २०१८ या तारखांना झाले. फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाध्यक्ष होते.

१४व्या संमेलनाचा वृत्तान्त :-या संमेलनामध्ये चित्रप्रदर्शन, ग्रंथ महोत्सव, नट-खट अप्सरा, महाचर्चा, स्वरआरती, कविसंमेलन, अभिनेत्यांशी गप्पांचा कार्यक्रम, परिसंवाद व बालनाट्ये सादर करण्यात आली.

या साहित्यिक-कलावंत संमेलनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लावणी व वेगवेगळ्या कला नृत्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते तर ‘नमो विचार देशाला तारेल कि मारेल ?’ या विषयावर प्रदीर्घ मुलाखतीमध्ये संजय आवटे, यशवंत मनोहर, माधव भंडारी, कुमार सप्तर्षी यांनी आपापली मनोगते व्यक्त केली.

संजय आवटे यांनी बोलताना ख्रिसमसच्या दिवशीच सुशासन दिन का? हे समजले नाही अशी टीका करून साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ यांच्या विधानांकडे लक्ष वेधले. व पाकिस्तानचे मॉडेल अपयशी का ठरले व भारताचे मॉडेल यशस्वी का झाले याचे उत्तर आपल्या एकीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. परराष्ट्रमंत्री गीतेला राष्ट्रीय ग्रंथ मानते म्हणजे नक्की काय समजायचे? असा सवालही उपस्थित केला.

पुढे आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी मोदी ज्या पक्षाच्या, संघटनेच्या विचार धारेमध्ये वाढले दुर्दैवाने त्या पक्षाचा आणि संघटनेचा स्वातंत्र्य चळवळीशी काहीही संबंध नव्हता, त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ म्हणजे काय ? स्वातंत्र्य चळवळीत विकसित झालेले मुद्दे म्हणजे काय हेच यांना लक्षात येत नाही, असे सांगितले.

यशवंत मनोहर यांनी घरवापसीचा दाखला देत, ’मुस्लीम-ख्रिश्चन वगैरे धर्माच्या ज्या लोकांना हिंदू होणे शक्य नसेल त्यांनी देश सोडून जावे या पद्धतीची भूमिका घेतली जाणे हे संविधानद्रोही म्हणजे राष्ट्रद्रोही आहे,’ असे परखड मत मांडले.

आताच या राष्ट्राला हिंदू राष्ट्र करण्याचा काहींच्या मनामध्ये उद्रेक का झाला आहे असा सवाल करून, कालपर्यंत सर्व जातीचे लोक या देशामध्ये आनंदाने नांदत होते, या पुढेही आनंदाने नांदू द्या.ज्यांना आपल्यापेक्षा या देशाचे जास्त कळत होते ते महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, यांनी या देशाचा भूतकाळ कमीतकमी लक्षात ठेऊन भविष्यकाळ जास्तीत जास्त लक्षात घेत ही सगळी मांडणी केली आहे असे सांगितले.

माधव भंडारी यांनी या विषयावर बोलताना मोदींनी स्वतःला कुठेही विचारवंत, तत्त्वज्ञ म्हटले नाही. मोदी विचार देशाला तारेल की मारेल या प्रश्नाचे उत्तर १३ महिन्यामध्ये जनतेने दिले आहे.

मोदींचे तर प्रसिद्ध वाक्य आहे 'सबका साथ, सबका विकास' हे असून १३ वर्षामध्ये किती मुस्लीम-ख्रिश्चनांनी गुजरातमधून स्थलांतर केले हे आधी सांगावे असा सवाल उपस्थितांना केला.

सच्चर आयोगाच्या शिफारशीनुसार अहवालामध्ये मुस्लिमच अल्पसंख्याक का, बाकी अल्पसंख्याक समाज विचारात का घेतला नाही असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सुशासन दिनानिमित्त बोलताना हा दिवस अटलबिहारी वाजपेयींच्या जन्म दिनानिमित्त साजरा केला आहे त्याचा व ख्रिसमसचा काही संबंध नाही असे सांगितले. नथुराम गोडसेच्या बाबत बोलताना गोडसेचा आणि आमचा कसलाही संबंध नाही, हे विष पेरण्याचे काम मुद्दाम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

डॉ.कुमार सप्तर्षी यांनी बोलताना घटनेच्या आधारे झालेल्या ज्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांतून ज्यांचा इतिहास लोकशाहीला फारसा पोषक नाही असे लोक आता राजसत्तेवर आलेले आहेत अशी सुरुवात करून," हा जो जनादेश आहे, हा राज्य करायला संधी दिलेली आहे, हे तुम्हाला साईबाबांच्या मूर्ती फेकून द्यायला, नथूरामची मंदिरे बांधायला, आमचे ऐकले नाही तर दुसर्‍या देशात जा हे सांगायला जनादेश दिलेला नाहीउ" असे परखड मत मांडत त्यासाठी असे परिसंवाद होत राहणे बोलत राहणे याला लोकशाहीतला महत्त्वाचा अधिकार म्हणतात असे सांगितले.

पुढे बोलताना मोदी हे नेमके कुणी निवडलेले आहेत असा प्रश्न पडतो, त्या वेळेस ते भाजपने निवडलेले आहेत हे पाव सत्य व आर.एस.एस.ने निवडलेले आहेत हे पाव सत्य म्हणून आर.एस.एस.ने दिलेला आदेश भाजपला देखील पाळावा लागतो. म्हणजे कधीकधी अर्धसत्याचे पूर्ण सत्य होते. म्हणून आर.एस.एस. ला काय करायचे आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. लोक नथुरामचे मंदिर बांधायला लागले तर उद्या दाऊदचेही मंदिर बांधले जाईल मग काय करायचे? कारण गुन्हेगारांची मंदिरे बांधली जाऊ लागल्यावर असेच होईल.

गांधींजींच्या काळातही जातवादी शक्ती होत्या पण गांधीजींनी त्यांना डोके वर काढू दिले नाही असेच शेवटी त्यांनी सांगितले.

पहा :मराठी साहित्य संमेलने ;

सूर्योदय साहित्य संमेलन

सूर्योदय साहित्य संमेलन हे जळगावला होणारे एक एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन आहे. जळगावची सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ ही संस्था हे संमेलन भरवते. प्रा. डॉ. दत्ता भोसले, प्रा.डॉ. तारा भवाळकर, डॉ. बोल्ली लक्ष्मीनारायण, वामन होवाळ, प्रा. डॉ. रवींद्र शोभणे, सुधाकर गायधनी, डॉ. रा.रं. बोराडे, लक्ष्मण गायकवाड, रेखा बैजल, प्रा. डॉ. यशवंत पाठक, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, संगीता बर्वे, इ. लेखक या संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत.

मराठी साहित्यिक

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.