फील्ड मार्शल

फील्ड मार्शल हा भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च पण मानद किताब आहे. या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याला जास्त सत्ता असते असे नाही. त्यामुळे आधिकारिकदृष्ट्या हे पद फारसे महत्त्वाचे नाही. फील्ड मार्शल हे पद जनरल या पदानंतरच मिळू शकते या पदावरील व्यक्ती कधीही निवृत्त होत नाही. स्वतंत्र भारतात आजवर जनरल करिआप्पासॅम माणेकशॉ यांनाच आजवर फील्ड मार्शल हा किताब बहाल करण्यात आला आहे.

Field Marshal of the Indian Army
अली अब्दुल्ला सालेह

अली अब्दुल्ला सालेह अरबी: علي عبدالله صالح (मार्च २१, इ.स. १९४२ - ) हा १९९० ते २०१२ पर्यंत येमेनचा राष्ट्राध्यक्ष होता. याआधी सालेह १९७८ ते १९९० पर्यंत उत्तर येमेनचा राष्ट्राध्यक्ष होता.

आर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टन

फील्ड मार्शल आर्थर वेलेस्ली, वेलिंग्टनचा पहिला ड्युक (इंग्लिश: Sir Arthur Wellesley, 1st Duke of Wellington; मे १, इ.स. १७६९ - सप्टेंबर १४, इ.स. १८५२) हा एक इंग्लिश सेनापती होता.

ब्रिटनच्या इतिहासातील एक अत्यंत चाणाक्ष सेनापती, ब्रिटनचा पंतप्रधान म्हणून वेलस्ली याचे नाव प्रसिद्ध आहे. नेपोलियनसारख्या महान सेनापतीला त्याने वारंवार जेरीस आणले आणि वॉटर्लूच्या युद्धात त्याचा अंतिम पराभव करून युरोपमधील नेपोलियनची सद्दी संपुष्टात आणली.त्याद्वारे जगाच्या इतिहासाला वेगळे वळण दिले. वेलस्ली भारताच्या,खासकरून मराठ्यांच्या इतिहासात एक महत्वाची व्यक्ति आहे. नेपोलियनला जेरीस आणायच्या आगोदर वेलस्लीने भारतात अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला. मराठ्यांच्या विरुद्ध उघडलेल्या मोहिमांमुळे मराठी साम्राज्याला देखील उतरती कळा आणली त्यानंतर काही वर्षांत मराठी साम्राज्य लयाला गेले.

एर्विन रोमेल

एर्विन रोमेल (पूर्ण नाव: एर्विन योहानस युजिन रोमेल)(नोव्हेंबर १५, इ.स. १८९१ - ऑक्टोबर १४, इ.स. १९४४, ज्यांना नुसते फील्ड मार्शल रोमेल म्हणून ओळखले जाते) हे दुसऱ्या महायुद्धातील सर्वात प्रसिद्ध जर्मन सेनापतींपैकी एक होते.

जर्मनीचा महान सेनानायक. रोमेल चा जन्म १८९१ मध्ये स्टुटगार्ट जवळिल हाइडेनहाइम येथे झाला. त्याची जर्मन लष्करामध्ये अधिकारी कॅडेट म्हणून १९१० मध्ये भरती झालि. आणि लवकरच अधिकारीपदावर सेकन्ड लेफ्टनंट म्हणून १९१२ मध्ये नेमणूक झालि. त्यानी पहिल्या महायुद्धात फ्रान्स रोमेनिया व इटलि मधील आघाडिवर काम केले.

पहिल्या महायुद्धानंतर रोमेलनी लष्करी विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले १९२९-३३ ड्रेसडेन इन्फंट्रि स्कुल त्यानंतर १९३५- ३८ पोस्टडॅम वॉर अकादमी. यावेळेपर्यंत रोमेल एक साधा अधिकारी म्हणूनच ज्ञात होता त्याची सर्वात पहिलि छाप १९३८ मध्ये पडलि जेव्हा त्याला हिटलरच्या सुरक्षेची जवाबदारी सोपवण्यात आलि. त्यानंतर रोमेलने पोलंडच्या आक्रमणामध्ये महत्त्वपुर्ण कामगीरी पार पाडलि.

पोलंड्च्या कामगिरी नंतर रोमेलची मेजर जनरल पदी नियुक्ति झालि. त्याने ७व्या पॅन्झर डिव्हिजनची सुत्रे हाति घेतलि व फ्रान्सच्या आक्रमणात उल्लेखनिय कामगिरी बजावलि.

ऑक्टोबर २४

ऑक्टोबर २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९७ वा किंवा लीप वर्षात २९८ वा दिवस असतो.

के.एम. करिअप्पा

फील्ड मार्शल कोदंडेरा मदप्पा तथा के.एम्. करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख होते.

क्लॉड ऑचिनलेक

फील्ड मार्शल सर क्लॉड जॉन आयर ऑचिनलेक (२१ जून, १८८४:ॲल्डरशॉट, हॅम्पशायर, इंग्लंड - २३ मार्च, १९८१:माराकेश, मोरोक्को) हे ब्रिटिश सेनापती होती. यांनी आपले बरेचसे सैनिकी जीवन ब्रिटिश भारतात व्यतीत केले. ते अनेक भारतीय भाषा अस्खलितपणे बोलू शकत. ऑचिनलेक भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील ब्रिटिश सैन्याचे सर्वोच्च सेनापती होते.

गणपत लाड

क्रांतिअग्रणी गणपत दादा लाड ऊर्फ बापू लाड (जन्म : कुंडल, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, ४ डिसेंबर, इ.स. १९२२; निधन : पुणे, १४ नोव्हेंबर, इ.स. २०११) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या तुफानी दलाचे फील्ड मार्शल समजले जाणारे अग्रणी लढवय्या होते.

जून १०

जून १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६१ वा किंवा लीप वर्षात १६२ वा दिवस असतो.

जून ५

जून ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५६ वा किंवा लीप वर्षात १५७ वा दिवस असतो.

देओदोरो दा फॉन्सेका

मार्शल मनुएल देओदोरो दा फॉन्सेका (उच्चार:mɐnu'ɛw deo'dɔɾu da fõ'sekɐ) (ऑगस्ट ५, इ.स. १८२७ - ऑगस्ट २३, इ.स. १८९२) हा ब्राझिलचा पंतप्रधान होता.

याने सम्राट पेद्रो दुसर्‍याला पदच्युत करून सत्ता हातात घेतली होती.

फ्रीडरीश पॉलस

फील्ड मार्शल फ्रीडरीश विल्हेम अर्न्स्ट पॉलस (२३ सप्टेंबर, १८९०:गुक्सहागेन, जर्मनी - १ फेब्रुवारी, १९५७, ड्रेस्डेन

, पूर्व जर्मनी) हा नाझी जर्मनीचा उच्च सेनापती होता.

१९४२मध्ये सोवियेत संघावरील आक्रमणात भाग घेतला होता व त्याअंतर्गत स्टालिनग्राडला वेढा घातला होता. स्टालिनग्राडच्या वेशीवर झालेल्या घनघोर लढाईत पॉलस जर्मन सैन्याचा सेनापती होता. या लढाईत दोन्ही पक्षांचे अतोनात नुकसान झाले. शेवटी सोवियेत संघाच्या सैन्याने प्रतिहल्ला चढवीत जर्मन सैन्यालाच वेढले आणि पॉलसला शरण येण्यास भाग पाडले.

पॉलस शरणागती पत्करणार असे कळल्यावर ॲडॉल्फ हिटलरने त्याला फील्ड मार्शल पदावर बढती दिली. तोपर्यंत जर्मनीच्या एकही फील्ड मार्शल शत्रूच्या हाती जिवंत लागलेला नव्हता. पॉलसला बढती देण्यामागे त्याने लढून मरावे किंवा आत्महत्या करावी असा हिटलरचा गूढ संदेश होता. बढती मिळाल्यावर दोनच तासांत पॉलस आपल्या सगळ्या सैन्यासह सोवियेत संघाला शरण गेला.

भारतीय लष्कर हुद्दे व मानचिन्ह

भारतीय लष्करी हुद्दे व मानचिन्ह आणि ब्रिटिश लष्करी हुद्दे व मानचिन्ह यांत बरेच साम्य आहे.

मोरेश्वर नीळकंठ पिंगळे

मोरेश्वर नीळकंठ पिंगळे उपाख्य मोरोपंत हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक वरिष्ठ नेते होते. "हिन्दु जागरणाचा सरसेनानी" म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. संघ प्रचारक म्हणून झालेल्या त्यांच्या ६५ वर्षांच्या सेवेत, त्यांनी विविध पदे भूषविली. त्यातील, 'अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख' हे पद सर्वोच्च होते. सन १९७५ मध्ये भारतात लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात ते सहा सरसंघचालकांपैकी एक होते. भारतीय प्रसारमाध्यमांनी, रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान त्यांचा "फील्ड मार्शल" म्हणून गौरव केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले: गौ-संशोधन, सरस्वती नदी शोध, इतिहास पुनर्लेखन ही त्यातील काही उदाहरणे. त्यामुळे त्यांना संघाचा प्रकल्प पुरुष ही पदवी मिळाली. ते प्रसिद्धिपराङ्‌मुख होते. त्यांचे वर्णन 'सर्वच ठिकाणी पण कशातच नाही' असे करता येऊ शकेल. ते आपले जीवन संघाचा खरा स्वयंसेवक म्हणून जगले.

यान क्रिस्चियान स्मट्स

फील्ड मार्शल यान क्रिस्चियान स्मट्स (मे २४, इ.स. १८७० - सप्टेंबर ११, इ.स. १९५०) हा दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान, सेनापती व मुत्सद्दी होता.

स्मट्स इ.स. १९१९ ते इ.स. १९२४ व इ.स. १९३९ ते इ.स. १९४८ अशा दोन कालखंडांत दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधानपदी होता. त्याने पहिल्या व दुसर्‍या महायुद्धात युनायटेड किंग्डमकडून फील्ड मार्शल पदावर राहून भाग घेतला.

सरित धनरात

फील्ड मार्शल सरित धनरात (थाई: สฤษดิ์ ธนะรัชต์ ; रोमन लिपी: Sarit Thanarat ;) (जून १६, इ.स. १९०८ - डिसेंबर ८, इ.स. १९६३) हा इ.स. १९५७ ते मृत्युपर्यंत थायलंडाचा हुकुमशहा व पंतप्रधान होता.

धनराताने इ.स. १९५७ साली लष्करी उठाव केला व स्वतःला पंतप्रधान घोषित केले. इ.स. १९५८मध्ये लष्करी कायदा लागू करून विरोध मोडून काढला. त्याचबरोबर त्याने थायलंडाच्या राजाला महत्त्वाचे स्थान दिले व अनेक विकासकामांना सुरूवात केली.

सॅम माणेकशॉ

फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशाॅ (एप्रिल ३, १९१४ - जून २७, २००८) भारतीय सैन्याचे सरसेनापती होते.

माणेकशॉ भारताचे आठवे सैन्यप्रमुख होते.

right|180px|thumb|सॅम माणेकशॉ

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.