प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे

प्रा. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे (१९४३ - जानेवारी ६, २०१०) हे मराठी भाषेमधील लेखक होते.

प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे
जन्म नाव प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे
जन्म १९४३
सुल्लाळी,उस्मानाबाद
मृत्यू जानेवारी ६, २०१०
भावसिंगपुरा,औरंगाबाद
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र नाटक, साहित्य
वडील ईरबाजी सोनकांबळे
पत्नी कुमुदिनी सोनकांबळे
अपत्ये

मुलगे = डॉ. अश्‍विन , प्रिशीत , मनोज

मुलगी = डॉ. चेतना
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार(१९८३)
आदर्श शिक्षक पुरस्कार(१९९७)
'बेस्ट सिटिझन'
औरंगाबादमधील तिसऱ्या दलित साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष
मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

जीवन

प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म १९४३ सालामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील सुल्लाळी (आता हे गाव लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात आहे) या बिनचेहऱ्याच्या गावी झाला. लहानपणी डोईवरचे माता-पित्याचे छत्र हरवले असले तरी, बहिणीने त्यांचा सांभाळ केला. गुरे-ढोरे वळतच त्यांची शाळा चालू होती. महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयात झाले. त्यानंतर ते मराठवाडा विद्यापीठातून इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून त्यांनी एल.ए‌ल.बी चे शिक्षण पूर्ण केले.

कारकीर्द

प्रा. सोनकांबळे सुरुवातीला गल्ले बोरगाव येथे शिक्षक म्हणून नोकरीला लागले. इ.स. १९६६ मध्ये ते डॉ.आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. व पुढे त्याच विभागाचे प्रमुख झाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्यपद आणि इ.स. १९८८ मध्ये प्राचार्यपदही त्यांनी भूषविले. तेथूनच ते निवृत्त झाले.

ग्रंथसंपदा

"अस्मितादर्श (त्रैमासिक)'मधून त्यांच्या लिखाणाचा प्रारंभ झाला."आठवणींचे पक्षी' हे त्यांचे आत्मचरित्र अत्यंत गाजले. या आत्मचरित्राचे अकरा भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. याशिवाय "असं हे सगळं', "पोत आणि पदर' ही त्यांची ग्रंथसंपदा आहे.

व्यक्तिविशेष

साहित्य व सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. कोणत्याही कार्यक्रमाला प्रा. सोनकांबळे गेले की ते तेथील व्यक्तींना आपल्या खिशातली फुले व खडीसाखर देत. एक सहृदयी आणि प्रेमळ साहित्यिक अशी त्यांची ओळख होती.

संमेलन

मराठवाडा साहित्य परिषदेच्या आखाडा बाळापूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इ.स. १९७९ मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या तिसऱ्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. इ.स. १९८१मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या ऑल इंडिया बुद्धिस्ट टीचर्स कॉन्फरन्सचेदेखील ते स्वागताध्यक्ष होते. १९८२मध्ये झालेल्या पहिल्या दलित नाट्यमहोत्सवाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली.

पुरस्कार

  • प्रा. सोनकांबळे यांना साहित्य अकादमीचा १९८३मध्ये पुरस्कार मिळाला.
  • राज्य शासनानेदेखील पुरस्कार देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला आहे.
  • लातूर नगरपरिषदेने प्रा. प्र. ई. सोनकांबळे यांचा भूमिपुत्र म्हणून विशेष सत्कार केला होता.
  • अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार प्रा. सोनकांबळे यांना प्रदान करण्यात आला होता.
  • रयत शिक्षणसंस्थेचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
  • राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार (१९९७)

बाह्य दुवे

आनंद पाळंदे

आनंद पाळंदे हे लोकप्रिय मराठी लेखक आहेत.

== जीवन = मरण

कल्याण कुलकर्णी

कल्याण कुलकर्णी (? - ऑक्टोबर २४, १९९८) हे मराठी लेखक होते.

गोपाळ गंगाधर लिमये

गोपाळ गंगाधर लिमये (सप्टेंबर २५ १८८१ - अज्ञात)मराठी कथाकार आणि विनोदकार होते. कॅप्टन गो. गं. लिमये या नावाने त्यांनी लेखन केले.

जनार्दन ओक

जनार्दन ओक हे एक मराठी लेखक आहेत.

जानेवारी ६

जानेवारी ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६ वा किंवा लीप वर्षात ६ वा दिवस असतो.

नीलकंठ महादेव केळकर

नीलकंठ महादेव केळकर (१९०० - ?) हे मराठी चित्रकार, लेखक होते.

माधव आचवल

प्रसिद्ध लेखक, चित्रकार, वास्तूशिल्पकार, समीक्षक

राजीव साने

राजीव साने हे तत्त्वज्ञान विषयाचे संशोधक व लेखक आहेत. तसेच हे एक नावाजलेले कामगार पुढारीही आहेत. यांनी आपले तत्त्वज्ञानाचे संशोधन पुस्तक स्वरूपात युगांतर नावाने प्रसिद्ध केले आहे. तसेच संगणक विषयावरही यांनी लेखन केले आहे.

लक्ष्मण गायकवाड

"उचल्या" ह्या पारधी समाजाचे अस्वस्थ करणारे चित्रण असलेल्या अतिशय गाजलेल्या कादंबरी चे लेखक.

लीना मोहाडीकर

लीना मोहाडीकर या एक मराठी लेखिका आहेत.

विजय कुवळेकर

विजय कुवळेकर : मराठी लेखक आणि पत्रकार. त्यांनी चित्रपटांचे लेखनही केले आहे.

विनीता आपटे

विनीता आपटे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या मराठी भाषेतील लेखिका आहेत.

विनीता आपटे या मराठी निवेदिका,ले़खिका,अभिनेत्री आहेत. सध्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागात पॅरिस येथे सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत.

विमला ठकार

विमला ठकार (१५ एप्रिल, इ.स. १९२१ - ११ मार्च, इ.स. २००९) या मराठी भाषेतील लेखिका आहेत.

सहज भाषेत अध्यात्मातील अवघड तत्वे उलगडणे यांना लेखनातून सिद्ध आहे.

आत्मोन्नती व मनोविकास या विषयावर लेखन करणाऱ्या या महत्त्वाच्या लेखिका आहेत.

शकुंतला बोरगावकर

शकुंतला बोरगावकर (? - जून १२, २००१) या मराठी लेखिका होत्या.

संजीवनी खेर

संजीवनी खेर या ऐतिहासिक स्त्रियांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके लिहिणार्‍या एक मराठी लेखिका आहेत.

मराठी साहित्यिक

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.