पाषाण युग

पाषाणयुग हा प्रागैतिहासिक प्रबोधनाआधीचा काळ आहे. या काळात माणसाला दगडाचे उपयोग समजू लागले. लाकूड, हाडे व इतर तत्सम वस्तूंचा वापर होत असे, पण मुख्यतः दगडाचा वापर कापण्याची हत्यारे बनवण्यासाठी केला जात असे.

या काळाची सुरुवात अंदाजे २७ लक्ष वर्षांपूर्वी झाली. माणसाच्या काही जमाती विसाव्या शतकापर्यंत देखील पाषाणयुगाप्रमाणेच जगत होत्या. ते दगडाचा वापर प्राण्यांना मारण्यासाठी व त्यांपासून अन्न आणि वस्त्रे मिळवण्यासाठी करत असत. प्रागैतिहासिक काळामध्ये मानवी जीवनाच्या संदर्भातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा या उदयाला आल्या. मृत्यू, मृत्यूनंतरचे जग या विषयाच्या प्रथांची पाळेमुळे ही आपल्याला मानवाच्या आदिम भटक्या कालखंडापासून आढळतात. या कालखंडात आपण प्रागैतिहासिक काळ अथवा इतिहासपूर्व काळ असे संबोधतो. या कालखंडात मनुष्य हा विकासाच्या प्राथमिक टप्प्यावर भटके आयुष्य जगत होता. इतर वन्य प्राण्यांची शिकार करून तो आपला उदरनिर्वाह करत असे. याच मनुष्यप्राण्याचे नंतर नागरिकांमध्ये रूपांतर होत असताना माणूस मानवी जीवनात अनेक बदल घडून आलेले दिसतात जीवन- मृत्यू, मृत्यू व त्याच्याशी निगडीत परंपरा, संकल्पना या देखील याच परिवर्तनाचा अविभाज्य भाग आहेत. जगाच्या इतिहासात मानवाच्या मृत्यू संस्काराची खरी सुरुवात निअँडरथल मानवा पासून झाली असे अभ्यासक मानतात. तर भारतातही प्राचीन मृत्यू संस्कारांची पुरावे हे अश्मयुगात आढळतात. उत्तर पुराश्मयुगीन मानवाची संस्कारित दफने मध्यप्रदेश येथील भीमबेटका सारख्या दहा हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन गुहांमध्ये सापडलेले आहेत. मुळातच अश्मयुगाचे पुराश्मयुग, मध्याश्मयुग व नवाश्मयुग असे तीन भागांमध्ये विभाजन केले जाते. हे केवळ तीन भाग नसून हे मानवी उत्क्रांतीच्या विकासाचे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. भारतातील उत्तर पुराश्मयुगीन मानवाची दफने ही आद्य अंत्यसंस्काराची द्योतक आहेत. अश्मयुगाच्या अंतिम टप्प्यात म्हणजेच उत्तर पूर अश्मयुगात मानवाने भटक्या आयुष्याकडून स्थिर आयुष्याकडे वाटचालीला सुरुवात केली. याच स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर मृत्यूनंतरच्या जगताची मानवी मनाला चाहूल लागलेली दिसते. या उत्तर पुराश्मयुगीन दफनामध्ये अंत्येष्टी सामग्रीच्या स्वरूपात दगडापासून तयार केलेली हत्यारे प्राण्यांची हाडे आभूषणे यासारख्या वस्तू पुरातत्व अभ्यासकांना आढळल्या आहेत. मृत व्यक्ती सोबत त्यांच्या आवडीच्या वस्तू दान करणे किंवा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी त्यांच्यासोबत पुरणे ही प्रथा प्राचीन काळापासून अस्तित्वात होती, हे दर्शवणारे उत्तम उदाहरण भीमबेटका या ठिकाणी पाहायला मिळते. ह राजस्थान मधील बागोरा येथे मध्याश्मयुगीन मृतदेह उत्तर-दक्षिण पुरल्याचे दफना मध्ये पाहायला मिळते. तर गुजरातमधील लांघणाज याठिकाणी मध्याश्मयुगीन चौदा संस्कारित मानवी सांगाडे उत्खननात सापडली. त्यातील 13 सांगाडे हे पूर्व-पश्चिम डाव्या कुशीवर पोटाजवळ पाय दुमडून झोपलेल्या स्थितीत सापडली. तर एक सांगाडा सरळपाय असलेल्या स्थितीत सापडला आहे. येथेही दफना सोबत दगडी हत्यारे तसेच इतर वस्तू मिळालेल्या आहेत. मुख्य बाब म्हणजे लांघणाज येथे मृतांसोबत कुत्रा पुरलेला सापडतो.बगईखोर, सराई नहार या सारख्या उत्तर प्रदेशातील मध्याश्मयुगीन स्थळांवर अनेक संस्कारित दपणे मिळाली आहेत. येथील दफणे ही बहुतांश उत्तर-दक्षिण पुरलेल्या स्थितीत आढळतात. तर काही पश्चिम-पूर्व अशी आढळतात. या दफना सोबत आभूषणे, शस्त्र व हत्यारे यासारख्या वस्तू सापडल्या आहेत. मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात मृत्यू तसेच तत्संबंधी प्रथा परंपरांचा मागोवा घेताना प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे मृत्यूची भीती मानवी अस्तित्व बरोबरच उदयाला आलेली असली तरी मृत्युनंतरचे संस्कार हे मानवी विकासासोबतच टप्प्याटप्प्याने विकसित होताना दिसतात. उत्तर पुराश्म व मध्याश्मयुग हे भारतीय इतिहासात मानवाला स्थैर्य प्रदान करणारा कालखंड आहे. या काळात मानवाने नैसर्गिक गुहांचा वापर राहण्यासाठी केला शेती केली नाही. परंतु निसर्गतः उपलब्ध असणाऱ्या रानटी धान्यांचा मानवाने आहारामध्ये समावेश केला. पुढच्या प्रगतीच्या टप्प्यात मानवाने शेती करायला सुरुवात केली. हा काळ नवाश्मयुग म्हणून ओळखला जातो. शेतीच्या आगमनाने अश्मयुगीन भटका मनुष्य स्थिरावला. दगडात सर्वस्व असणाऱ्या मानवाने याच कालखंडात कच्च्या मातीच्या भांड्यांचा वापर सुरू केला. या वापरातून धान्य साठवण यासारख्या गरजा तो भागवत असे. याच टप्प्यावर अंत्येष्टी विधी मध्येही काळाची हे परिवर्तन जाणवते काश्मीर स्थित बुर्झाहों सारख्या नवाश्मयुगीन पुरातत्त्वीय स्थळावर अंडाकृती दखणे सापडलेले आहेत येथे मृतांत सोबत कुत्रा बकरी यासारखे प्राणी पूरलेली दिसतात. तर मृताच्या अंगावर गेरूच्या वापर केल्याचे पुरावे मिळतात. ही गोष्ट विशेष नोंद घेण्यासारखे आहे. याशिवाय मध्याश्मयुगीन दफन आत कच्च्या मातीच्या भांड्यात धान्य, आभूषणे ठेवलेली सापडतात. या पुराव्यामुळे मृत्यूनंतरचे जग ही संकल्पना अधिक दृढ होत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील जोर्वे येथे या काळातील दफने सापडलेली आहेत. या काळातील काही दफने ही घरातच फरशीच्या आत किंवा अंगणात पुरलेली असत तर काही ठिकाणी लहान मुलांची शरीर ही गर्भातील बाळाप्रमाणे मातीच्या मडक्यात पोटाजवळ पाय दुमडलेल्या स्थितीत जमिनीत पुरलेली होती. मातीच्या कुंभाला गर्भाशी व मृत्यूशी असलेला संबंध समजून घेण्यासाठी हे उदाहरण महत्त्वाची ठरते. मातीच्या कुभाला गर्भाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच नवरात्रीच्या नऊ दिवसात याच गर्भ स्वरूपी मातीच्या कुंभात धान्य रोपण करून धरणीच्या सृजनाची, मातृशक्तीची पूजा मांडली जाते. तर अंत्येष्टी मध्ये या धोरणाच्या विरुद्ध अंत्यसंस्कारानंतर दहन किंवा दफन केल्यानंतर आजही एकविसाव्या शतकात हातात मातीचे मडके घेऊन प्रदक्षणा घालून अखेरीस हे फोडले जाते. जीवाची या जन्मातील मुक्तता त्यातून सूचित केले जाते. म्हणूनच बहुदा मानवाने प्राचीन काळात मातीच्या मडक्याचा गर्भ प्रमाणे वापर केलेला दिसतो. आईच्या गर्भातून परत एकदा त्या मुलाने जन्म घ्यावा हाच या कल्पनेतून ही प्रथा त्याकाळी अस्तित्वात आली असावी ताम्रपाषाण युगात मात्र भारतीय मानव हा नागरी जीवन अनुभव लागला. या नागरी जीवनाला आज आपण सिंधू संस्कृती या नावाने ओळखतो. पूर्वीचा भटका आणि त्यानंतरचा ग्रामीण जीवन जगणारा मानव आता पूर्ण नागरिक झालेला होता. हा बदलाचा व नागरीकरणाचा या टप्पात इष्ट-अनिष्ट विधीमध्ये हे स्पष्ट दिसते. या काळात व्यवस्थित अंत्यसंस्कार केलेली दपणे संशोधकांना सापडले आहेत. सिंधुसंस्कृती कालीन दफन मुख्यतः चार भागात विभागली गेलेली होती. विस्तीर्ण समाधीकरण, आशिक समाधी करण,अस्थिकलश आणि दहा संस्कार या स्वरूपामध्ये ते आढळतात. आज एकविसाव्या शतकात हातात मातीचे मडके घेऊन प्रदक्षणा घालुन अखेरीस के अंत्यविधीच्या वेळेस फोडले जाते. जीवाची या जन्मातील मुक्तता त्यातून सूचित केलेली आहे. म्हणून बहुदा मानवाने प्राचीन काळात मातीच्या मडक्याचा गर्भाप्रमाणे वापर केलेला दिसतो. आईच्या गर्भातून परत एकदा त्या मुलांनी जन्म घ्यावा याच कल्पनेतून ही प्रथा त्याकाळी अस्तित्वात आलेली असावी. ताम्रपाषाण युगात मात्र भारतीय मानव हा नागरी जीवन अनुभवू लागला. या नागरी जीवनाला आज आपण सिंधू संस्कृती या नावाने ओळखतो. पूर्वीचा भटका आणि त्यानंतरचा ग्राम मानव आता पूर्ण नागरिक झालेला होता. हा बदलाचा नागरीकरणाचा अंत्येष्टी विधी मधील स्पष्ट जाणवणारा बदल लक्षात घेण्यासारखा आहे. प्राचीन काळात प्राचीन भारतात मोठ्या प्रमाणात दफनविधी आढळून येते, तर अर्वाचीन काळामध्ये दहन विधी असे असले तरी हिंदू धर्मातील काही जातींमध्ये आजही दफन परंपरा अस्तित्वा मध्ये आहे. तर उर्वरित भागात बर्‍याच संस्कृतीमध्ये दफणाला प्राधान्य दिलेले आहे. दफन आणि दहन या दोन्ही पद्धती भारतासारख्या एकाच प्रांतात अस्तित्वात असल्याने आजतागायत या बदलाचे समाधानकारक उत्तर अभ्यासकांना देता आलेले नाही. सिंधू संस्कृतीमधील मृत शरीरासोबत मातीची भांडी अभूषणे इ प्राण्यांची हाडे, दीप इत्यादी वस्तू आढळून आलेल्या आहेत. तर काही ठिकाणी मृतास सोबत त्यांच्या आवडीचे प्राणी उदाहरणार्थ कुत्रा पुरल्याचे पुरावे मिळतात. मृतांत सोबत मिळालेल्या मातीच्या भांड्यांवर काही आकृत्या, पक्षांची चित्र दिसतात. सिंधुसंस्कृती नंतर मानवाने लोखंडाचा वापर मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली या लोहयुगाशी संबंधित एक संस्कृती भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ठरली ती म्हणजे महाश्मयुगीन संस्कृती, या संस्कृतीची वैशिष्ट्ये दफन पद्धतीशी संबंधित आहे. महा म्हणजेच मोठा आणि अश्म म्हणजे दगड, या संस्कृतीत बऱ्याच मृत व्यक्तींच्या दफना वर मोठे दगड उभारले जात. म्हणून या संस्कृतीत महाश्मयुगी संस्कृती म्हणून ओळखले जाते. प्रत्यक्षात या संस्कृतीच्या सर्वच स्तरांवर मोठे दगड सापडले असून दफनाच्या विविध पद्धतीची नोंद करण्यात आलेली आहे. मराठी विश्वकोशात पुरातत्त्वज्ञ म. हा. देव यांनी नमूद केल्याप्रमाणे, 'भारतातील महाराष्ट्र अश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष प्रामुख्याने आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात व दक्षिण भारतात उपलब्ध झालेले आहेत. दक्षिण भारतातील केरळ आंध्र प्रदेश तमिळनाडू कर्नाटक या भागात, तर महाराष्ट्रात अश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांनी उभारलेली दफणे मोठ्या प्रमाणावर आजही पहावयास मिळतात. दक्षिण भारत सोडून दौसा (जिल्हा जयपुर)राजस्थान तसेच अलाहाबाद, मिर्झापूर, बनारस, या जिल्ह्यात (उत्तर प्रदेश) लेह (काश्मीर) तसेच सिंगभूम जिल्हा (बिहार राज्य) येथे अस्तित्वात आहेत. बलुचिस्तान आणि मस्कर, वाघुर, मुराद, मेनन (वायव्य सरहद्द प्रांत) या प्रदेशात तसेच महाराष्ट्रात महाश्मयुगीन अवशेष उपलब्ध झाले आहेत. याशिवाय पूर्व भारतात बस्तर पासून आसाम पर्यंत महाश्मयुगीन दफन पद्धती अस्तित्वात आहेत.

पाषाणयुगाच्या पुढील काळाला ताम्रयुग असे म्हणतात. तांबे अथवा कांस्य धातूंपासून या युगाचे नाव पडले. ज्या वेळी माणसाला धातू बनवण्याचा शोध लागला, तेव्हा पाषाणयुगाचा अस्त झाला. सर्वप्रथम तांबे या धातूचा शोध लागला व त्यानंतर कांस्य धातूचा शोध लागला. लोकांनी मध्य-पूर्व भागांत अंदाजे ख्रि.पू. ३००० ते २००० काळात फक्त दगडाचा वापर सोडून देऊन तांबे वापरण्यास सुरुवात केली.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.