पश्चिम युरोप

पश्चिम युरोप हा युरोप खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. पश्चिम युरोपात खालील देश आहेत.

Europe subregion map UN geoscheme
संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्याख्येनुसार युरोपातील प्रदेश:
  पश्चिम युरोप
अटलांटिक तटबंदी

अटलांटिक तटबंदी तथा अटलांटिक भिंत ही नाझी जर्मनीने पश्चिम युरोप व स्कँडिनेव्हियाच्या किनाऱ्यावर बांधलेली तटबंदी होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांकडून होणाऱ्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ही भिंत १९४२ आणि १९४४ दरम्यान बांधली गेली. दहा लाखांपेक्षा फ्रेंच आणि इतर असंख्य कामगारांकडून वेठबिगारी करवून घेउन बांधण्यात आलेल्या या तटबंदीचा उल्लेख नाझी जर्मनी आपल्या जाहीरातबाजीत आवर्जून करे व ही बलाढ्य असल्याचा दावा करीत असे. वस्तुतः ऑपरेशन ओव्हरलॉर्ड व दोस्तांच्या इतर आक्रमक चढायांदरम्यान ही तटबंदी काही तास किंवा दिवसांपेक्षा अधिक तग धरू शकली नाही.

युद्ध संपल्यावर या तटबंदीची रया गेली व हिचा मोठा भाग ठिकठिकाणी समुद्रात कोसळला आहे तर उर्वरित भागाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.

उत्तर युरोप

उत्तर युरोप हा युरोप खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. उत्तर युरोपात खालील देश आहेत.

डेन्मार्क

फेरो द्वीपसमूह

एस्टोनिया

फिनलंड

ऑलंड द्वीपसमूह

आइसलँड

आयर्लंड

लात्व्हिया

लिथुएनिया

नॉर्वे

स्वालबार्ड व यान मायेन

स्वीडन

युनायटेड किंग्डम

आईल ऑफ मान

गर्न्सी and जर्सी

एअर चायना

एर चायना ही चीनमधील विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय बीजिंगमध्ये असून बहुतांश उड्डाणे बीजिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून होतात. १९८८ साली सुरू झालेल्या एर चायनाने २०१२ साली ७ कोटी २० लाख आंतरराष्ट्रीय तसेच अंतर्देशीय प्रवाशांची ने-आण केली. ही कंपनी चीनमधील बहुतांश विमानतळांना सेवा पुरवते तसेच मध्यपूर्व, पश्चिम युरोप तसेच उत्तर अमेरिका येथे बीजिंगपासून आणि आशिया, ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपीय शहरांना चेंगडू, चाँगचिंग, दालियान, हंग्झू, कुन्मिंग आणि शियामेन येथून सेवा पुरवते.

एप्रिल ३०

एप्रिल ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२० वा किंवा लीप वर्षात १२१ वा दिवस असतो.

जगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)

जगात एकूण २३१ सार्वभौम देश आहेत. या जगातील देशांच्या यादीमध्ये जगातील देश त्यांच्या एकूण क्षेत्रफळानुसार क्रमबद्ध केले आहेत. इतर प्रकारांनी क्रम बघण्यासाठी त्या त्या मथळ्याजवळील चौकोनावर टिचकी द्या. हे क्षेत्रफळ जमीन व देशांच्या भौतिक सीमेच्या आत असलेले पाण्याचे साठे ह्यांची बेरीज आहे.

जगामधील बौद्ध धर्म

बौद्ध धर्म (बौद्ध धम्म) हा जगातील अतिप्राचीण धर्मांपैकी एक तसेच वर्तमान जगातील सर्वात प्रमुख धर्मांपैकी एक धर्म आहे. बौद्ध धर्माची इ.स.पू. ६ व्या शतकामध्ये उत्तर भारतात झालेली आहे. आज लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. एका अनुमानानुसार, जागतिक लोकसंख्येत २८.८% म्हणजे २.१ अब्ज लोक बौद्ध धर्मीय आहेत. तथापि, काही सर्वेक्षणात बौद्धांची लोकसंख्या अवघी ५२ कोटी (७%) सुद्धा सांगण्यात येते. बौद्ध धर्माच्या केंद्रस्थानी व बौद्ध अनुयायांचे गुरू तथागत गौतम बुद्ध आहेत.

जिनिव्हा सरोवर

जिनिव्हा सरोवर (फ्रेंच: Lac Léman, Léman, जर्मन: Genfersee) हे स्वित्झर्लंड व फ्रान्स देशांच्या सीमेवरील आल्प्स पर्वतरांगेतील एक सरोवर आहे. ५८० वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या ह्या सरोवराचा ५९.५३ टक्के भाग स्वित्झर्लंडच्या तर उर्वरित भाग फ्रान्सच्या अखत्यारीखाली येतो. जिनिव्हा सरोवराच्या भोवताली स्वित्झर्लंडची व्हो, व्हाले व जिनिव्हा ही राज्ये तर रोन-आल्प हा फ्रान्सचा प्रदेश आहेत.

स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा व लोझान ही मोठी शहरे ह्याच सरोवराच्या काठावर वसलेली आहेत.

दक्षिण युरोप

दक्षिण युरोप हा युरोप खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. दक्षिण युरोपात खालील देश आहेत.

आल्बेनिया

आंदोरा

बॉस्निया आणि हर्झगोव्हिना

क्रोएशिया

जिब्राल्टर

ग्रीस

इटली

मॅसिडोनिया

माल्टा

माँटेनिग्रो

पोर्तुगाल

सान मारिनो

सर्बिया

स्लोव्हेनिया

स्पेन

व्हॅटिकन सिटी

दुसरे महायुद्ध

दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले. यानंतर फ्रांस, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपान व इटलीने जर्मनीच्या बाजुने युद्धात पदार्पण केले. डिसेंबर १९४१ मध्ये जपानने अमेरिकेवर हल्ला केल्यावर अमेरिकेने युद्धात सक्रीय भाग घेतला व येथून युद्ध जगभर पसरले. दोस्त राष्ट्रांमध्ये चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटली व जपान हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युद्धात सहा कोटींच्यावर जीवित हानी झाली. मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवित हानी आहे. या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.

पूर्व युरोप

पूर्व युरोप हा युरोप खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. युरोपच्या इतिहासात पूर्व युरोपाची व्याख्या विविध प्रकारे केली गेली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ खालील देशांचा पूर्व युरोपमध्ये समावेश करतो:

बेलारूस बल्गेरिया चेक प्रजासत्ताक हंगेरी मोल्दोव्हा पोलंड रोमेनिया रशिया स्लोव्हाकिया युक्रेन

प्राचीन रोम

प्राचीन रोम (लॅटिन: Roma antiqua) ही आजच्या इटलीमधील रोम शहर केंद्रस्थानी ठेवून निर्माण झालेली एक ऐतिहासिक सभ्यता होती. भूमध्य समुद्रालगत वसलेले हे साम्राज्य ऐतिहासिक जगामधील सर्वात बलाढ्य व सुसंस्कृत बनले. सुमारे १२ शतके अस्तित्वात असलेल्या ह्या साम्राज्याने दक्षिण युरोप, पश्चिम युरोप, उत्तर आफ्रिका, अनातोलिया इत्यादी भागांवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. प्राचीन ग्रीस सोबत रोमचा ग्रीको-रोमन विश्व असा उल्लेख केला जातो.

कला, साहित्य, भाषा, वास्तूशास्त्र, राजकारण, लष्कर इत्यादी अनेक विषयांवर प्राचीन रोमन समाजाचे योगदान अमुल्य मानले जाते. चिचेरो, होरेस, व्हर्जिल, ऑगस्टस इत्यादी रोमन व्यक्ती आजही स्मरणात आहेत.

बुद्धिबळ

बुद्धिबळ हा दोन खेळाडूंनी एका तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळावयाचा बैठा खेळ आहे. बुद्धिबळाची सुरुवात भारतातून झाली. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जाणारे बुद्धिबळ हे पाश्चिमात्य बुद्धिबळ म्हणून ओळखले जाते.

बुद्धिबळ सध्या जगातील सर्वांत प्रसिद्ध बैठ्या खेळांपैकी एक आहे. जगभरात अदमासे ६० कोटी हौशी किंवा व्यावसायिक लोक क्लब्जमध्ये, पत्राने, आंतरजालावर व विविध स्पर्धांमधून बुद्धिबळ खेळतात. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाप झालेला दिसतो.

बुद्धिबळ एका चौरस पटावर खेळला जातो. या ८x८ च्या पटावर ६४ घरे असतात व ती आलटून पालटून क्रमाने काळ्या-पांढऱ्या रंगाची असतात. पहिला खेळाडू पांढऱ्या तर दुसरा काळ्या सोंगट्यांनी खेळतो. या सोंगट्यांना मोहरे म्हणतात. प्रत्येक खेळाडूचे एका रंगाचे सोळा मोहरे असतात.:- एक राजा, एक वजीर(इंग्रजीत क्वीन), दोन हत्ती(इंग्रजीत रूक), दोन घोडे(इंग्रजीत नाइट-सरदार), दोन उंट(इंग्रजीत बिशप) आणि आठ प्यादी(पॉन). प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह, म्हणजे मृत्यूचा धाक देऊन मात करणे(हरवणे) हा खेळाचा उद्देश असतो. राजाला शह मिळाल्यानंतर कुठलीही खेळी करून जेव्हा त्याला शहातून बाहेर पडता येत नाही त्यावेळी राजावर मात झाली असे मानले जाते. विचारवंतांनी बराच अभ्यास करून मात करण्यासाठी विविध क्रमांच्या चालींच्या खेळी रचल्या आहेत.

स्पर्धात्मक बुद्धिबळाची परंपरा १६ व्या शतकात युरोपमध्ये सुरू झाली. इ.स. १८८६ साली विल्हेल्म स्टेइनिट्झ हा पहिला अधिकृत बुद्धिबळ विश्वविजेता झाला. विश्वनाथन आनंद हा भारतीय खेळाडू २०१२सालापर्यंत जगज्जेता होता. बुद्धिबळाच्या सांघिक स्पर्धा "बुद्धिबळ ऑलिंपियाड" दर दोन वर्षांतून एकदा भरवल्या जातात. दोन आंतरराष्ट्रीय संघटना-- फेडेरेशन इंटरनॅशनाले देस इचेक्स (फिडे) आणि इंटरनॅशनल करस्पाँडन्स चेस फेडेरेशन या जगातील महत्त्वाच्या स्पर्धा भरवतात.

बुद्धिबळ खेळणाऱ्या संगणकाच्या निर्मितीसाठी संगणकतज्ज्ञ पहिल्यापासून प्रयत्‍नशील होते. त्यामुळेच अलीकडील बुद्धिबळावर संगणकाचा प्रभाव पडलेला दिसतो. इ.स. १९९७ मध्ये गॅरी कास्पारोव्ह (त्यावेळचा जगज्जेता) आणि आय.बी.एम. कंपनीचा डीप ब्ल्यू संगणक यांच्यातील सामन्यातून सर्वांत बुद्धिमान/कुशल माणसाला बुद्धिबळात हरवणारी संगणक-प्रणाली तयार करता येते हे सिद्ध झाले.

मध्य युरोप

मध्य युरोप हा युरोप खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. पारंपारिक दृष्ट्या मध्य युरोप हा शब्द पूर्व युरोप व पश्चिम युरोप ह्या भागांतील काही देशांचा उल्लेख करण्याकरिता वापरला गेला आहे. अनेकदा मध्य युरोप हा शब्द शीतयुद्धादरम्यान मागासलेल्या देशांचा उल्लेख करण्याकरिता वापरला जात असे. विविध संस्था व व्यक्तींनी मध्य युरोपची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केली आहे. बहुसंख्य व्याख्यांच्या मते खालील देशांचा मध्य युरोपात समावेश केला जाउ शकतो:

ऑस्ट्रिया

चेक प्रजासत्ताक

जर्मनी

हंगेरी

लिश्टनस्टाइन

पोलंड

स्लोव्हाकिया

स्लोव्हेनिया

स्वित्झर्लंड

कधीकधी क्रोएशिया व सर्बिया हे देश देखील मध्य युरोपात गणले जातात.

मार्च २१

मार्च २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८० वा किंवा लीप वर्षात ८१ वा दिवस असतो.

मोटारवाहन

मोटारवाहन, मोटार, मोटारकार किंवा कार हे एक चाके असणारे एक स्वयंचलित वाहन आहे. अनेक व्याख्यांनुसार मोटारवाहनाला चार चाके असतात, ते रस्त्यावर चालते व कमाल ८ प्रवासी त्यामध्ये बसून प्रवास करू शकतात.

जगातील पहिली मोटारकार जर्मन संशोधक कार्ल बेंत्स ह्याने १८८५ साली फोर स्ट्रोक इंजिन वापरुन बनवली. मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने १९०२ साली सुरु केला तर हेन्री फोर्ड ह्याने ह्या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला व किफायती दरात मोटारगाड्या विकण्यास सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व मध्यात मोटारगाड्यांवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले व मोटार तसेच मोटार उत्पादन तंत्रांची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली.

काही अनुमानांनुसार सध्या जगात सुमारे ६० कोटी मोटारवाहने अस्तित्वात आहेत.कार (किंवा ऑटोमोबाईल) एक चाके असलेली मोटर वाहन आहे जी वाहतुकीसाठी वापरली जाते. कारच्या बहुतेक परिभाषांमध्ये असे म्हटले जाते की ते प्रामुख्याने रस्त्यावर धावतात, आसन एक ते आठ जणांकडे असतात, चार टायर असतात आणि मुख्यत्वे वस्तूंपेक्षा लोक वाहतूक करतात. [२] []]

गाडी

401 ग्रिडलॉक.जेपीजी

कॅनडाच्या ओंटारियो मधील एका द्रुतगती मार्गावर कार आणि ट्रक

वर्गीकरण

वाहन

उद्योग

विविध

अर्ज

वाहतूक

इंधन स्त्रोत

पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू, इलेक्ट्रिक, हायड्रोजन, सौर, तेल

पॉवर

होय

स्वप्रेरित

होय

चाके

3-4

धुरा

2

शोधक

कार्ल बेंझ [१]

20 व्या शतकात कार जागतिक वापरासाठी आल्या आणि विकसित अर्थव्यवस्था त्यांच्यावर अवलंबून आहेत. जर्मन शोधक कार्ल बेंझ यांनी आपल्या बेंझ पेटंट-मोटरवेगेनला पेटंट दिले तेव्हा 1886 हे वर्ष आधुनिक कारचे जन्म वर्ष म्हणून ओळखले जाते. 20 व्या शतकाच्या सुरूवातीला कार मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या. 1908 मॉडेल टी ही फोर्ड मोटर कंपनीने बनवलेल्या अमेरिकन कारची सर्वसामान्यांना प्रवेश करण्यासारखी पहिली कार होती. अमेरिकेत मोटारींचा वेगाने अवलंब करण्यात आला, जिथे त्यांनी प्राण्यांनी काढलेल्या गाड्या आणि गाड्या बदलल्या, परंतु पश्चिम युरोप आणि जगाच्या इतर भागात ते स्वीकारण्यास बराच काळ लागला. [उद्धरण आवश्यक]

युरोप

युरोप हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. युरेशिया ह्या महाखंडाच्या पश्चिम प्रायद्वीपावर वसलेल्या युरोपाच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिमेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला भूमध्य समुद्र व पूर्वेला काळा समुद्र आहेत. उरल पर्वतरांगा, कास्पियन समुद्र व कॉकासस प्रदेश हे साधारणपणे युरोप व आशियाच्या भौगोलिक विभाजनासाठी वापरले जातात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोप हा जगातील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा खंड आहे. रशिया हा युरोपातील सर्वात मोठा देश तर व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश आहे.

लोकशाही निर्देशांक

लोकशाही निर्देशांक (Democracy Index) हा जगातील देशांमधील लोकशाहीचे मूल्यमापन करण्यासाठी वापरला जातो. ह्यामध्ये जगातील १६७ देशांना ० ते १० दरम्यान गूण दिले जातात. ० ते ३ गूण मिळालेले देश हुकुमशाही, ४ ते ६ गूणांचे देश मिश्र राजवटी, ६ ते ८ गूण मिळालेले देश दोषपूर्ण लोकशाही तर ८ ते १० गूण मिळालेल्या देशांमध्ये संपूर्ण लोकशाही आहे असे मानले जाते. ह्यासाठी प्रत्येक देशांसाठी ४ वर्गातील एकूण २५ विविध सूचक वापरले जातात.

२००६ साली लोकशाही निर्देशांक सर्वप्रथम बनवला गेला व प्रत्येक २ वर्षांनी त्यामध्ये बदल केले जात आहेत.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस (इंग्लिश: Secretary-General of the United Nations) हे संयुक्त राष्ट्रांच्या सचिवालय ह्या मुख्य अंगाचा प्रमुख आहे. सरचिटणीस संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख व प्रवक्ता ही कामेही संभाळतात.

पोर्तुगालचे अँतोनियो गुतेरेस हे विद्यमान सरचिटणीस आहेत.

संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद

संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद (इंग्लिश: United Nations Economic and Social Council) हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख ६ अंगांपैकी एक आहे. ही परिषद संयुक्त राष्टांच्या १४ महत्त्वाच्या समित्यांच्या आर्थिक व इतर कामकाजांचे सुचालन करते. ५४ सदस्य असलेल्या ह्या परिषदेची सभा दरवर्षी जुलै महिन्यात चार आठवडे चालते.

जगातील आर्थिक समस्या व धोरणांवर चर्चा करण्यासाठी ही परिषद हा एक प्रमुख मंच आहे. १९९८ सालापासून ह्या परिषदेमार्फत अनेक देशांचे अर्थमंत्री, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक ह्यांदरम्यान संवाद घडवून आणला जातो. सध्याच्या घडीला स्लोव्हाकिया देशाचे राजदूत मिलोस कोतेरेक हे आर्थिक व सामाजिक परिषदेचे प्रमुख आहेत.

युरोपातील देश व संस्थाने
देश व भूभाग
अन्य भूभाग
अंशत: मान्य देश
जगातील भौगोलिक प्रदेश

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.