नॉर्वे


नॉर्वे (नॉर्वेजियन: Norge) हा उत्तर युरोपातील एक उत्तरी देश आहे. स्कँडिनेव्हियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात वसलेल्या नॉर्वेच्या सीमेचा मोठा हिस्सा स्वीडन देशासोबत आहे तर फिनलंडरशिया देश नॉर्वेच्या अतिउत्तर सीमेवर आहेत. पश्चिम व दक्षिणेस नॉर्वेजियन समुद्रउत्तर समुद्र आहेत. स्वालबार्डयान मायेन हे आर्क्टिक महासागरामधील द्वीपसमूह नॉर्वेच्या अधिपत्याखाली आहेत. ओस्लो ही नॉर्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सध्या नॉर्वेमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही आहे. हाराल्ड पाचवा हे येथील विद्यमान राजे आहेत.

अत्यंत विकसित व समृद्ध असलेला नॉर्वे देश दरडोई उत्पन्नामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.[५][६][७] नॉर्वे हा जगातील पाचव्या क्रमांकाचा खनिज तेल उत्पादक आहे. नॉर्वेचा मानवी विकास निर्देशांक जगात सर्वाधिक आहे.[८]

नॉर्वे
Kongeriket Norge
Kongeriket Noreg
नॉर्वे
नॉर्वेचा ध्वज नॉर्वेचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: आल्ट फोर नोर्गे
(नॉर्वेकरता सर्व काही)
राष्ट्रगीत: या, वी एल्स्कर डेट लांडेट
(हो, आम्ही या भूमीवर प्रेम करतो.)
नॉर्वेचे स्थान
नॉर्वेचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ओस्लो
अधिकृत भाषा नॉर्वेजियन
इतर प्रमुख भाषा सामी
सरकार संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही
 - राजा हाराल्ड पाचवा
 - पंतप्रधान जेन्स स्टोल्टेनबर्ग
महत्त्वपूर्ण घटना
 - एकत्रीकरण इ.स. ८७२ 
 - संविधान १७ मे १८१४ 
 - स्वीडन व नॉर्वेच्या संघाची बरखास्ती ७ जून १९०५ 
 - नाझी आक्रमण ९ एप्रिल १९४०
८ मे १९४५ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३८५,२०७[१] किमी (६७वा क्रमांक)
 - पाणी (%) ५.७
लोकसंख्या
 -एकूण ५,३२८,२१२[२] (२०१९) (१२०वा क्रमांक)
 - घनता १३.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३७७.१ अब्ज[३] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ५२,९६४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०१५) ०.९४९[४] (अति उच्च) (पहिला)
राष्ट्रीय चलन नॉर्वेजियन क्रोन (NOK)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी +१/+२)
आय.एस.ओ. ३१६६-१ NO
आंतरजाल प्रत्यय .no
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४७
राष्ट्र_नकाशा

खेळ

संदर्भ

  1. ^ "Arealstatistics for Norway 2019". Kartverket, mapping directory for Norway. 2019. 2019-03-24 रोजी पाहिले.
  2. ^ "Population, 2019-01-01". Statistics Norway. 2019-02-22. 2019-03-12 रोजी पाहिले.
  3. ^ Norway, International Monetary Fund
  4. ^ 2016 Human Development Report, United Nations Development Programme
  5. ^ World Economic Outlook Database-April 2009, Gross domestic product per capita, current prices, International Monetary Fund. Retrieved April 22, 2009.
  6. ^ World Economic Outlook Database-April 2009, Gross domestic product based on purchasing-power-parity (PPP) per capita GDP, International Monetary Fund. Retrieved April 22, 2009.
  7. ^ "Report for selected countries and subjects – current account balance, U.S. dollars, billions". International Monetary Fund. www.imf.org. October 2008. 2009-05-12 रोजी पाहिले.
  8. ^ "Human Development Index 2009". Human Development Report. hdr.undp.org. 2009-10-05. 2009-10-05 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

अमेरिका फुटबॉल संघ

अमेरिका फुटबॉल संघ (इंग्लिश: United States men's national soccer team) हा अमेरिका देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. अमेरिका आजवर १२ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक

एका देशातून दुसऱ्या देशातील बतार(लॅन्डलाइन)टेलिफोनवर फोन करायचा असेल तर, त्या विदेशी स्थानिक दूरध्वनी क्रमांकाच्या अगोदर एक संकेतांक जोडावा लागतो. त्या संकेतांकांची ही यादी :

१ – युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)२० – इजिप्त

२१० – वापरात नाही

२११ – वापरात नाही

२१२ – मोरोक्को

२१३ – अल्जीरिया

२१४ – वापरात नाही

२१५ – वापरात नाही

२१६ – ट्युनिसिया

२१७ – वापरात नाही

२१८ – लिबिया

२१९ – वापरात नाही

२२० – गांबिया

२२१ – सेनेगल

२२२ – मॉरिटानिया

२२३ – माली

२२४ – गिनी

२२५ – कोत द'ईवोआर

२२६ – बर्किना फासो

२२७ – नायजर

२२८ – टोगो

२२९ – बेनिन

२३० – मॉरिशस

२३१ – लायबेरिया

२३२ – सियेरा लिऑन

२३३ – घाना

२३४ – नायजेरिया

२३५ – चाड

२३६ – मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक

२३७ – कॅमेरून

२३८ – केप व्हर्दे

२३९ – साओ टोमे व प्रिन्सिप

२४० – इक्वेटोरियल गिनी

२४१ – गॅबन

२४२ – काँगो

२४३ – काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक

२४४ – अँगोला

२४५ – गिनी-बिसाऊ

२४६ – दियेगो गार्शिया

२४७ – ॲसेन्शन द्वीपसमूह

२४८ – सेशेल्स

२४९ – सुदान

२५० – रवांडा

२५१ – इथियोपिया

२५२ – सोमालिया (सोमालीलँड)

२५३ – जिबूती

२५४ – केनिया

२५५ – टांझानिया

२५६ – युगांडा

२५७ – बुरुंडी

२५८ – मोझांबिक

२५९ – झांझिबार - वापरला गेला नाही. पहा - टांझानिया

२६० – झांबिया

२६१ – मादागास्कर

२६२ – रेयूनियों

२६३ – झिंबाब्वे

२६४ – नामिबिया

२६५ – मलावी

२६६ – लेसोथो

२६७ – बोटस्वाना

२६८ – स्वाझीलँड

२६९ – कोमोरोस and मायोत

२७ – दक्षिण आफ्रिका

२८x – वापरात नाही

२९० – सेंट हेलेना

२९१ – एरिट्रिया

२९२ – वापरात नाही

२९३ – वापरात नाही

२९४ – वापरात नाही

२९५ – वापरात नाही (सान मरिनोला देण्यात आला होता, +३७८ पहा)

२९६ – वापरात नाही

२९७ – अरूबा

२९८ – फेरो द्वीपसमूह

२९९ – ग्रीनलँड

४० – रोमेनिया

४१ – स्वित्झर्लंड

४२ – आधीचा चेकोस्लोव्हाकिया

४२० – चेक प्रजासत्ताक

४२१ – स्लोव्हाकिया

४२२ – वापरात नाही

४२३ – लिश्टनस्टाइन

४२४ – वापरात नाही

४२५ – वापरात नाही

४२६ – वापरात नाही

४२७ – वापरात नाही

४२८ – वापरात नाही

४२९ – वापरात नाही

४३ – ऑस्ट्रिया

४४ – युनायटेड किंग्डम

४५ – डेन्मार्क

४६ – स्वीडन

४७ – नॉर्वे

४८ – पोलंड

४९ – जर्मनी९० – तुर्कस्तान

९१ – भारत

९२ – पाकिस्तान

९३ – अफगाणिस्तान

९४ – श्रीलंका

९५ – ब्रह्मदेश (म्यानमार)

९६० – मालदीव

९६१ – लेबनॉन

९६२ – जॉर्डन

९६३ – सीरिया

९६४ – इराक

९६५ – कुवेत

९६६ – सौदी अरेबिया

९६७ – येमेन

९६८ – ओमान

९६९ – used to be People's Democratic Republic of Yemen - now unified under 967 येमेन (formerly the Yemen Arab Republic)

९७० – reserved for the Palestinian Authority

९७१ – संयुक्त अरब अमिराती

९७२ – इस्रायल

९७३ – बहारीन

९७४ – कतार

९७५ – भूतान

९७६ – मंगोलिया

९७७ – नेपाळ

९७८ – वापरात नाही - मुळात दुबईकरिता, आता ९७१ वापरला जातो

९७९ – International Premium Rate Service - originally assigned to Abu Dhabi, now covered under 971

९८ – इराण

९९० – वापरात नाही

९९१ – International Telecommunications Public Correspondence Service trial (ITPCS)

९९२ – ताजिकिस्तान

९९३ – तुर्कमेनिस्तान

९९४ – अझरबैजान

९९५ – जॉर्जिया

९९६ – किर्गिझस्तान

९९७ – वापरात नाही

९९८ – उझबेकिस्तान

९९९ – वापरात नाही

आर्क्टिक महासागर

उत्तरध्रुवी महासागर पृथ्वीच्या उत्तर धृवाभोवतीचा महासागर आहे. ह्याच्या भोवताली रशिया, अलास्का, कॅनडा, ग्रीनलँड, आइसलँड, नॉर्वे, स्वीडन व फिनलंड हे देश/प्रदेश आहेत.

अतिथंड वातावरणामुळे आर्क्टिक महासागराचा बराचसा भाग कायमस्वरूपी बर्फाच्या रूपात आहे. उरलेल्या भागात वर्षाचे काही महिने पाणी असते. याचे क्षेत्रफळ सुमारे १,४२,४४,९३६ चौ. किमी इतके आहे. येत्या काही वर्षात आर्क्‍टिक महासागरावरील सर्व बर्फ वितळण्याची शक्‍यता आहे.

आधुनिक शोधाप्रमाणे जगातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे या पाण्याखालील भूभागात आहेत. बर्फ वितळत चालल्याने तेल आणि नैसर्गिक वायू यांचे मोठ्या प्रमाणावरचे व्यावसायिक उत्खनन येथे आता शक्य होते आहे. तसेच् उन्हाळ्यातील काही महिने महासागरामधून सागरी वाहतूक शक्‍य झाली आहे.

ऑलिंपिक

ऑलिंपिक खेळांचा इतिहास (ग्रीसमधील) ३००० वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरूवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली. ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड ,भारत सह १४ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले.

“ओलंपिक डे” इस दिन को सर्वप्रथम 1948 मे परिचित करवाया ...

स्थापना: 23 जून 1894

जानकारी: विवरण

अध्यक्ष: थॉमस बेच

मुख्यालय: लौसन, स्वीज़लेंड

ऑलिंपिक खेळ हँडबॉल

सांघिक हँडबॉल हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९७२ सालापासून खेळला जात आहे. त्यापूर्वी १९३६ बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेत देखील हा खेळ समाविष्ट केला गेला होता. महिलांचा हँडबॉल १९७६पासून खेळला जाऊ लागला.

चेक प्रजासत्ताक फुटबॉल संघ

चेक प्रजासत्ताक फुटबॉल संघ हा चेक प्रजासत्ताक देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. १९९२ सालापर्यंत चेक प्रजासत्ताक चेकोस्लोव्हाकिया संघाचा भाग होता. स्वतंत्र झाल्यापासून चेक प्रजासत्ताकाने आजवर १ फिफा विश्वचषकामध्ये तर ५ युएफा यूरो स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे.

डॅनिश वसाहती साम्राज्य

डॅनिश वसाहती साम्राज्याची सुरुवात १३व्या शतकात झाली, जेंव्हा डेन्मार्कने एस्टोनियात प्रदेश जिंकण्यास सुरुवात केली. १५३६ साली डेन्मार्क व नॉर्वेचे एकत्रीकरण झाले, यानंतर डेन्मार्क-नॉर्वे या नव्या देशाने फेरो द्वीपसमूह, आइसलँड व ग्रीनलँड जिंकले. १८१४ साली नॉर्वे स्वीडनला आंदण देण्यात आले (नेपोलियोनिक युद्धे). यामुळे वसाहती डेन्मार्कच्या हातात गेल्या.

फिनलंड

फिनलंड (फिनिश: Suomen tasavalta; स्वीडिश: Republiken Finland) हा उत्तर युरोपातील व स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. फिनलंडच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, पूर्वेला रशिया तर दक्षिणेला फिनलंडचे आखात आहे. हेलसिंकी ही फिनलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फिनिश व स्वीडिश ह्या दोन्ही फिनलंडच्या अधिकृत व राजकीय भाषा आहेत.

सुमारे ५४ लाख लोकसंख्या असलेला फिनलंड हा युरोपियन संघातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला देश आहे. बहुतांश जनता देशाच्या दक्षिण भागात राहते.

औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेला फिनलंड देश २०१० सालामधील एका सर्वेक्षणानुसार आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था, राजकीय वातावरण व जीवनशैली ह्या अनेक श्रेण्यांमध्ये जगातील सर्वोत्तम तर सामाजिक व राजकीय स्थैर्य असलेला जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे.

यान मायेन

गुणक: 70°59′N 8°32′W

यान मायेन हे आर्क्टिक महासागरातील व नॉर्वेच्या अधिपत्याखालील एक बेट आहे. स्वालबार्डचे क्षेत्रफळ ३७३ वर्ग किमी असून येथे केवळ १८ ते ३५ लोक राहतात.

युरोप

युरोप हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. युरेशिया ह्या महाखंडाच्या पश्चिम प्रायद्वीपावर वसलेल्या युरोपाच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिमेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला भूमध्य समुद्र व पूर्वेला काळा समुद्र आहेत. उरल पर्वतरांगा, कास्पियन समुद्र व कॉकासस प्रदेश हे साधारणपणे युरोप व आशियाच्या भौगोलिक विभाजनासाठी वापरले जातात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोप हा जगातील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा खंड आहे. रशिया हा युरोपातील सर्वात मोठा देश तर व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश आहे.

स्वालबार्ड

स्वालबार्ड हा आर्क्टिक महासागरातील व नॉर्वेच्या अधिपत्याखालील एक द्वीपसमूह आहे. स्वालबार्डचे क्षेत्रफळ ६१,००२ वर्ग किमी असून लोकसंख्या केवळ २,११६ इतकी आहे.

लाँगयरब्येन हे स्वालबार्डमधील सर्वात मोठे शहर आहे.

स्वीडन

स्वीडन (स्वीडिश: Konungariket Sverige) इंग्रजीत Sweden) हा उत्तर युरोपातील एक देश आहे. स्वीडनच्या उत्तरेला व पश्चिमेला नॉर्वे, इशान्येला फिनलंड, तर पूर्वेला व दक्षिणेस बाल्टिक समुद्र आहेत. दक्षिणेला डेन्मार्क, जर्मनी व पोलंड तर पूर्वेला इस्टोनिया, लॅटिव्हिया, लिथुआनिया व रशिया ह्या देशांसोबत स्वीडनच्या सागरी सीमा आहेत. स्वीडन डेन्मार्क देशाशी ओरेसुंड पूलाद्वारे जोडला गेला आहे.

सुमारे ४.५ लाख चौरस किमी क्षेत्रफळ असलेला स्वीडन देश युरोपियन संघामधील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. येथील लोकसंख्या ९४ लाख असून बहुतांशी लोक देशाच्या दक्षिण भागात शहरी क्षेत्रांमध्ये राहतात. स्टॉकहोम ही स्वीडनची राजधानी व प्रमुख शहर आहे.

ऐतिहासिक व मध्ययुगीन काळापासून स्वीडन हा एक स्वतंत्र देश राहिला आहे. सध्या स्वीडनमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही आहे. कार्ल सोळावा गुस्ताफ हे येथील विद्यमान राजे आहेत. अत्यंत विकसित व समृद्ध असलेल्या स्वीडनला लोकशाही निर्देशांकानुसार जगात प्रथम स्थान मिळाले आहे.

१९२० उन्हाळी ऑलिंपिक

१९२० उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील सातवी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा बेल्जियम देशाच्या अँटवर्प शहरामध्ये २० एप्रिल ते १२ सप्टेंबर दरम्यान खेळवली गेली. पहिल्या महायुद्धात उध्वस्त झालेल्या अँटवर्पला यजमान शहराचा मान देण्यात आला.

१९५२ उन्हाळी ऑलिंपिक

१९५२ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची १५वी आवृत्ती फिनलंड देशाच्या हेलसिंकी शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ३ दरम्यान खेळवली गेली.

१९५२ हिवाळी ऑलिंपिक

१९५२ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा नॉर्वे देशाच्या ओस्लो शहरामध्ये फेब्रुवारी १४ ते फेब्रुवारी २५ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३० देशांच्या ६९४ खेळाडूंनी सहभाग घेतला.

१९९४ हिवाळी ऑलिंपिक

१९९४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १७वी आवृत्ती नॉर्वे देशाच्या लिलहामर ह्या गावात १२ ते २७ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ६७ देशांमधील १,७३७ खेळाडूंनी भाग घेतला.

युरोपातील देश व संस्थाने
देश व भूभाग
अन्य भूभाग
अंशत: मान्य देश
नॉर्वे ध्वज नॉर्वेचे पंतप्रधान

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.