नाझारेथ


नाझारेथ हे इस्रायल देशाच्या उत्तर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. येशू ख्रिस्ताचे बालपण ह्याच शहरात झाले.

नाझारेथ
נָצְרַת
इस्रायलमधील शहर

View of Nazareth from El Kishleh neighborhood

Nazareth COA
चिन्ह
नाझारेथ is located in इस्रायल
नाझारेथ
नाझारेथ
नाझारेथचे इस्रायलमधील स्थान

गुणक: 32°42′07″N 35°18′12″E / 32.70194°N 35.30333°E

देश इस्रायल ध्वज इस्रायल
जिल्हा उत्तर जिल्हा
क्षेत्रफळ १४.१२३ चौ. किमी (५.४५३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ६५,९००
http://www.nazareth.muni.il/
फ्लोरेन्स

फिरेंत्से किंवा फ्लोरेन्स (इटालियन: Firenze, उच्चार ) ही इटली देशाच्या मधील तोस्काना प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्लोरेन्स शहराची लोकसंख्या सुमारे ३.७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १५ लाख आहे.

ऐतिहासिक काळापासून फ्लोरेन्स हे इटली व युरोपामधील कला व संस्कृतीचे माहेरघर मानले गेले आहे. विशेषतः मध्ययुग व रानिसां काळांत चित्रकला, शिल्पकला व वास्तूशास्त्र ह्या विषयांमध्ये फ्लोरेन्सचे योगदान अमुल्य मानले जाते. सर्वानुमते रानिसांचा उगम फ्लोरेन्स येथेच झाला. मध्ययुगात व्यापार व अर्थकारणारे केंद्र असलेले फ्लोरेन्स हे त्या काळात जगातील सर्वात महत्त्वाच्या व श्रीमंत शहरांपैकी एक होते. रानिसां दरम्यानच्या फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकाची फ्लोरेन्स ही राजधानी होती.

येथील ऐतिहासिक वास्तूंमुळे फ्लोरेन्स हे जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले गेले आहे व युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. फ्लोरेन्समध्ये अनेक कला दालने व संग्रहालये असून येथे दरवर्षी अंदाजे १५ लाखापेक्षा अधिक पर्यटक भेट देतात.

मारिया (येशूची आई)

मारिया (ग्रीक: Μαρία; Aramaic: ܡܪܝܡ, translit. Mariam‎; हिब्रू: מִרְיָם; अरबी: مريم) ;१ल्या शतकातील नासरेथचा गालीलातून ज्यू (यहूदी) स्त्री,व बायबल आणि कुराणानुसार येशू ख्रिस्तची आई होती.

नवीन करारात मत्तय आणि लुकच्या शुभवर्तमानात व कुराणमध्ये मारीयाला कुमारी (ग्रीक: παρθένος) असे तिचे वर्णन केले आहे आणि ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी असताना (पुरुषाच्या संपर्काशिवाय) तिच्या पोटी पुत्र आला असा ख्रिस्ती लोक विश्वास धरतात. हा एक अलौाकिक चमत्कार मानला जातो. हा अदभुत जन्म त्यावेळी झाला ज्यावेळी ती योसेफाला वाग्दत्त झाली होती आणि फक्त लग्नाचा विधी बाकी होता.योसेफाने तिच्याशी लग्न केले. बेथलेहेम या गावी तिने येशूला जन्म दिलालुकच्या शुभवर्तमानात येशूच्या जन्माची घोषणा होते. जेव्हा देवदूत गब्रीएल मारीयाला सांगतो की,या पवित्र कार्यासाठी देवबापाने सर्व स्त्रियातून तिला निवडलेले आहे. येशूच्या मारण्याच्या वेळी तिथे मारिया उपस्थित होती. कॅथोलिक आणि ऑर्थोडॉक्स शिकवणीनुसार, तिच्या पृथ्वीवरील जीवनात शेवटी तिच्या शरीर स्वर्गात नेले गेले याला स्वर्गउन्नयन (म्हणजे सदेह स्वर्गात उचलून घेणे) म्हणतात.मारियाला ख्रिस्ती धर्मात पूज्य मानण्यात आले आहे, आणि इतर धर्मांत सर्वात गुणवंत संत असल्याचे मानले जाते. तिचे श्रद्धाळूंना तिच्या दृष्टी(दर्शन) दिली आहे. पूर्व आणि ओरिएंटल ऑर्थोडॉक्स, रोमन कॅथोलिक, अँग्लिकन, आणि लुथेरन चर्च विश्वास आहे की मरीया येशूची आई म्हणून, देवाच्या आई(ग्रीक: Θεοτόκος) आहे. अनेक दिग्गज ख्रिस्ती मेरीयाचे भूमिका बायबलातील संदर्भ दावा संक्षेप आधारित कमी करते. मारिया (अरबी: مريم) इस्लाम मध्ये परमपुज्य स्थान प्राप्त आहे, जिथे एक मोठा भाग तिला समर्पित केले आहे.

मरिया (Mary) येशूची आई मारिया. दाविदाच्या राजवंशातील तसेच योसेफाची ती कुमारी पत्नी होती. जोकिम व हन्ना यांची ती कन्या होती. याव्यतिरिक्त शुभवर्तमनामध्ये तिच्या घराण्याचा उल्लेख सापडत नाही. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी असतानाच पुरुषाच्या संपर्काशिवाय ती गर्भवती राहील व तिला पुत्र होऊन त्याला येशू म्हणतील असा निरोप तिला गब्रिएल या देव्दुताकडून मिळाला होता. तिचा पती योसेफ याला शिरगणतीसाठी बेंथलेहेम गावी जावे लागले. त्याच्या सोबत मारीयेलाही जावे लागले व तेथेच येशूचा जन्म झाला. पुढे हेरोद राजाकडून बाळ येशूच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने ते इजिप्त देशात पळून गेले. हेरोदाच्या मृत्यूनंतर ते गालीलातील नाझरेथ गावी परत आले.

काना गावातील लग्नसमारंभाला मारिया येशूसमवेत गेली होती. त्यानंतर एकदम येशूच्या जीवनातील अखेरच्या क्षणी तिचा उल्लेख शुभवर्तमानात आला आहे. ती येशूबरोबर जेरुसलेमला आली. तेथून कालवरी टेकडीवर त्याला क्रुसावर खिळेपर्यंत ती तेथेच होती. नंतर शब्बाथ संपल्यावर मारिया माग्दलीया व इतर महिलांसोबत ती येशूच्या कबरेजवळ आली होती.

येशूने क्रुसावर आपला प्राण सोडण्याआधी तिथे उभ्या असलेल्या आपल्या शिष्याला (योहानाला) तिची काळजी घेण्यास सागितले होते. त्यानंतर मारिया या शिष्यासोबत राहू लागली. येशूच्या स्वर्हरोहणावेळी ती शिष्यांसोबत होती. तिचा मृत्यू व स्वर्गउन्नयाबददल बायबलमध्ये उल्लेख सापडत नाही. परंतु एफेसस गावात तिला मृत्यू आला असावा असे म्हटले जाते. (मत्तय १,२,२७,२८ :; मार्क १५:१६,; लुक १,२,२४ : योहान १९: प्रे. कृत्ये १)

तिच्या मृत्यूनंतर तिला सदेह स्वर्गात उचलून घेतले गेले व स्वर्ग पृथ्वीची राणी करण्यात आले असे कॅथोलिक चर्च मानते. पहिल्या व दुसऱ्या शतकातील अनेक अप्रमाणित ख्रिस्ती लेखनात तिच्या जीवनाबद्दलचे उल्लेख आले आहेत.

मुस्लिम धर्मातसुध्दा मारियेला अत्यंत आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. पवित्र कुराणातील एक संपूर्ण अध्याय तिच्या नावाने प्रसिध्द आहे. (पवित्र कुराण अध्याय १९ : सुरतुल मरियम) या अध्यायात येशूच्या जन्माची हकीकत वर्णन केली आहे. परंतु कुराणातील ख्रिस्तजन्माची हकीकत व शुभवर्तमानातील हकीकत यात बराच फरक आहे. तसेच कुराणातील आलीइमरान या अध्यायातही मारिया व येशूच्या जन्मासंदर्भात उल्लेख आला आहे. (पहा ३ आलीइमरान : ३३-५२)

येशू ख्रिस्त

येशू ख्रिस्त (इ.स.पू ४ ते इसवी सन ३० अंदाजे) हा ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी आहे. त्‍याला मरियम पुत्र, नासरेथ गावाचा येशू, प्रभु येशू खिस्‍त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसीह असेही म्‍हटले जाते, ख्रिस्‍ती धर्मग्रंथातील (बायबलमधील) नवा करार नामक उपग्रंथ येशूच्‍या जन्मासंबंधी, तसेच त्‍याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. बायबल हा ग्रंथ ख्रिस्ती धर्माचा एकमेव पवित्र ग्रंथ आहे.

सेंत-देनिस

सेंत-देनिस (फ्रेंच: Saint-Denis) हे फ्रान्स देशाच्या पॅरिस महानगरामधील एक शहर आहे. हे शहर पॅरिसच्या ९.४ किमी उत्तरेस इल-दा-फ्रान्स प्रदेशाच्या सीन-सेंत-देनिस विभागात वसले आहे.

१.०५ लाख लोकसंख्या असलेले सेंत-देनिस येथील स्ताद दा फ्रान्स ह्या स्टेडियमसाठी प्रसिद्ध आहे. १९९८ फिफा विश्वचषकासाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला होता. सध्या फ्रान्स फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथूनच खेळतो.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.