दोस्त राष्ट्रे

दुसर्‍या महायुद्धातील दोस्त राष्ट्रे ही अक्ष राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारलेले देश होते.

यांपैकी युनायटेड किंग्डम, सोवियेत संघ, अमेरिकेची संयुक्त संस्थानेचीन हे मुख्य योद्धे होते. याशिवाय फ्रांस (१९४०पर्यंत) ही दुय्यम राष्ट्रे होती. कॅनडाऑस्ट्रेलिया ही अनुक्रमे युनायटेड किंग्डम व अमेरिकेच्या कमानीखाली लढणारी राष्ट्रे होती तर पोलंडचेकोस्लोव्हेकियानी छुप्या कारवाया व गनिमी काव्याच्या रुपात युद्धात भाग घेतला.

भारत, दक्षिण आफ्रिका, इ. युनायटेड किंग्डमच्या आधिपत्याखालील देशांनीही यात मोठे बलिदान दिले. [१]

तारखेनुसार दोस्तांना मिळालेली राष्ट्रे

Cairo conference
The Allied leaders of the Asian and Pacific Theatres: Generalissimo Chiang Kai-shek, Franklin D. Roosevelt, and Winston Churchill meeting at the Cairo Conference in 1943.

जर्मनीच्या पोलंडवरील आक्रमणानंतर

पोलंड: सप्टेंबर १, १९३९
सप्टेंबर ३, १९३९
फ्रांस: सप्टेंबर ३, १९३९ (जून २५, १९४० रोजी शरणागती)
सप्टेंबर ३, १९३९
सप्टेंबर ३, १९३९
  • साचा:देश माहिती न्यू फाउंडलंड:सह
 • नेपाळ ध्वज नेपाळ
सप्टेंबर ४, १९३९
दक्षिण आफ्रिका: सप्टेंबर ६, १९३९
 • [[चित्र:{{{flag alias-१९२१}}}|22x20px|border|कॅनडा ध्वज]] कॅनडा
सप्टेंबर १०, १९३९
(परागंदा सरकार): ऑक्टोबर २, १९३९
एप्रिल ९, १९४० (जर्मनीने केलेल्या आक्रमणानंतर)

खोट्या युद्धानंतर

मे १०, १९४०
मे १०, १९४०
 •  : 10 May 1940
 • साचा:देश माहिती Free French Free France: 18 June 1940
 • ग्रीस Greece: 28 October 1940
 • युगोस्लाव्हियाचे राजतंत्र ध्वज Kingdom of Yugoslavia

[२]

सोवियेत संघावरील आक्रमणानंतर

22 June 1941 (previously at war with Poland, as a co-combatant of Nazi जर्मनी)

पर्ल हार्बरवरील आक्रमणानंतर

 • साचा:PAN: 7 December 1941
 • साचा:CRI: 8 December 1941
 • साचा:DOM: 8 December 1941
 • साचा:ESA: 8 December 1941
 • हैती ध्वज Haiti
8 December 1941
 • Honduras: 8 December 1941
 • साचा:NIC: 8 December 1941
 • Flag of the United States United States
8 December 1941
: 9 December 1941 (at war with the Empire of Japan since 1937)
 • साचा:GUA: 9 December 1941
 • साचा:CUB: 9 December 1941
 • फिलिपाईन्स Philippine Commonwealth : 9 December 1941[३][४]

१९४२ ते डी-डे पर्यंत

 • साचा:देश माहिती British Raj: 1 January 1942 [३][४]
  • साचा:देश माहिती Bahawalpur: (formally on 2 February 1945)
 • मेक्सिको ध्वज Mexico
22 May 1942
22 August 1942
7 April 1943
26 July 1943
 • इराण Iran: 9 September 1943 (occupied by Allies in 1941)
 • Yugoslavia: 1 December 1943[२]
 • लायबेरिया ध्वज Liberia
27 January 1944
12 February 1944
 • साचा:देश माहिती Kingdom of Italy except for the German puppet Italian Social Republic in northern Italy

डी-डे नंतर

 • रोमेनिया Romania: 23 August 1944 (formerly a member of the Axis)
 • Bulgaria: 8 September 1944 (formerly a member of the Axis)
 • साचा:SMR: 21 September 1944 (formerly a member of the Axis)
 • Albania: 26 October 1944 (formerly occupied by Italy and later जर्मनी)
 • इक्वेडोर ध्वज इक्वेडोर
2 February 1945
 • Paraguay: 7 February 1945
 • साचा:URY: 15 February 1945
 • व्हेनेझुएला ध्वज Venezuela
15 February 1945
23 February 1945
27 February 1945
27 March 1945
11 April 1945

संदर्भ व नोंदी

 1. ^ हकीम, जॉय (१९९५). ए हिस्टरी ऑफ यु.एस.: वॉर, पीस अँड ऑल दॅट जॅझ. न्यू यॉर्क: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. आय.एस.बी.एन. 0-19-509514-6.
 2. a b Yugoslavia was intially represented as an Ally by the government-in-exile of the Kingdom of Yugoslavia, a signatory to the Declaration by the United Nations. Democratic Federal Yugoslavia, which would succeed the kingdom, was founded on 29 November 1943 by the communist-led Yugoslav Partisans, who were recognised as the official Yugoslav armed resistance force two days later at the Tehran Conference.
 3. a b http://www.britannica.com/EBchecked/topic/16380/Allied-Powers#ref754272
 4. a b http://www.ibiblio.org/pha/policy/1942/420101a.html
इवो जिमाची लढाई

इवो जिमाची लढाई जपान आणि दोस्त राष्ट्रे यांच्यामध्ये दुसर्‍या महायुद्धात अमेरिकेच्या प्रशांत मोहिमेदरम्यान इ.स. १९४५च्या फेब्रुवारी ते मार्च ह्या महिन्यांमध्ये झाली.

ओकिनावाची लढाई

ओकिनावाची लढाई किंवा आइसबर्ग मोहीम ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान पॅसिफिक समुद्रात लढली गेलेली मोठी लढाई होती.

एप्रिल ते जून १९४५ दरम्यान झालेली ही लढाई ओकिनावाच्या रायुकू द्वीपसमूहाच्या आसपास लढली गेली. दोस्त राष्ट्रे अनेक महिने एका बेटावरुन दुसऱ्या बेटावर तळ हलवीत जपानकडे सरकत होती. जपानपासून ५५० किमी (३४० मैल) दूर असलेल्या ओकिनावा द्वीपावर तळ ठोकून तेथून जपानच्या मुख्यभूमीवर हल्ला चढवण्याचा त्यांचा व्यूह होता.

जपानी साम्राज्य

जपानी साम्राज्य (जपानी: 大日本帝國) हे इ.स. १८६८ ते इ.स. १९४७ या कालखंडात अस्तित्वात असलेले, वर्तमान जपान देशाचे पूर्ववर्ती साम्राज्य होते. ३ जानेवारी, इ.स. १८६८ रोजी मेइजी पुनर्स्थापनेनंतर हे साम्राज्य उदय पावले व दुसर्‍या महायुद्धात पराभव झाल्यानंतर ३ मे, इ.स. १९४७ रोजी या साम्राज्याचा अस्त झाला.

जपानी साम्राज्याने "फुकोकु क्योहेई" (जपानी: 富国強兵 ; अर्थ: देश श्रीमंत करा! सैन्याची ताकद वाढवा!) या प्रकल्पांतर्गत देशाचे सैनिकीकरण व औद्योगीकरण आरंभले. यामुळे जपानी साम्राज्य जागतिक शक्ती बनले.

जपानी साम्राज्यकाळादरम्यान ह्या देशाने झपाट्याने प्रगती केली व तो जगातील एक प्रगत देश बनला. साम्राज्यवाढीने झपाटलेल्या जपानी राज्यकर्त्यांनी दुसर्‍या महायुद्धात अक्ष राष्ट्रांसोबत हातमिळवणी केली व पूर्व आशियामधील अनेक देशांवर लष्करी चढाया केल्या. हिरोशिमा व नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्यांनंतर जपानी साम्राज्याने २ सप्टेंबर १९४५ रोजी दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती पत्कारली. त्यानंतर अमेरिकेच्या मदतीने जपान देशाचे संविधान पुन्हा लिहिले गेले व ३ मे, इ.स. १९४७ रोजी जपान ह्याच नावाने हा देश ओळखला जाऊ लागला.

दुसरे महायुद्ध

दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले. यानंतर फ्रांस, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपान व इटलीने जर्मनीच्या बाजुने युद्धात पदार्पण केले. डिसेंबर १९४१ मध्ये जपानने अमेरिकेवर हल्ला केल्यावर अमेरिकेने युद्धात सक्रीय भाग घेतला व येथून युद्ध जगभर पसरले. दोस्त राष्ट्रांमध्ये चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटली व जपान हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युद्धात सहा कोटींच्यावर जीवित हानी झाली. मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवित हानी आहे. या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.

पहिले महायुद्ध

पहिले महायुद्ध, पहिले महायुद्ध, ग्रेट वॉर, किंवा वॉर टू ॲन्ड ऑल वॉर्स या नावानेही ओळखले जाते. हे युद्ध २८ जुलै १९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले. इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अश्या या युद्धात ७ कोटी सैनिकांनी भाग घेतला ज्यापैकी ६ कोटी सैनिक युरोपियन होते. भांडखोर देशांची तांत्रिक आणि औद्योगिक प्रगती आणि प्रदीर्घ खंदक लढायांतून निर्माण झालेली 'जैसे थे' परिस्थिति यामुळे या युद्धात आणि त्याबरोबर झालेल्या विविध शिरकाणांमध्ये ९ लाखांपेक्षा जास्त सैनिक व ७ लाख नागरिक ठार झाले. हा इतिहासातील सर्वात घातक संघर्षांपैकी एक होता, आणि त्यात सामील असलेल्या अनेक देशांमध्ये क्रांती किवा मोठ्या राजकीय बदलांसाठी कारणीभूत झाला. युद्धापूर्वीच्या सुप्त संघर्षांचे पूर्ण निराकरण न झाल्याने या युद्धाअखेरीस एकवीस वर्षांनंतर झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली गेली.

दोस्त राष्ट्रे किंवा ट्रिपल ऑंताँत (रशियन साम्राज्य, फ्रेन्च तिसरी प्रजासत्ताक आणि ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र) आणि केन्द्रीय सत्ता (जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी) या दोन गटात झालेल्या या युद्धात जगातील सर्व आर्थिक महासत्ता ओढल्या गेल्या. जरी इटली हा जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी यांच्याबरोबर तिहेरी युतीचा सदस्य असला तरी, ऑस्ट्रिया-हंगेरीने युतीच्या अटींविरुद्ध जाऊन आक्रमण केल्यामुळे त्याने केन्द्रीय सत्तांच्या बाजूने युद्धात भाग घेतला नाही. जसजसे अधिकाधिक देश या युद्धात सामील झाले तसतशी युद्धपूर्व आघाड्यांची वाढ आणि पुनर्रचना झाली. इटली, जपान आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने दोस्त राष्ट्रांत सामील झाले, तर ओस्मानी साम्राज्य आणि बल्गेरिया केन्द्रीय सत्तांमध्ये सामील झाले.

२८ जून् १९१४ रोजी सारायेव्होमध्ये जहाल युगोस्लाव्ह राष्ट्रवादी गॅव्ह्रिलो प्रिन्सिप यांनी ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सिंहासनचा वारसदार असलेल्या ऑस्ट्रियाचे आर्चड्यूक फ्रांझ फर्डिनांडयांची हत्या केली आणि या युद्धाची ठिणगी पडली. फ्रान्झ फर्डिनांडच्या मृत्यूनंतर जर्मन साम्राज्याच्या चिथावणीवरून ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियासोबत युद्धाची घोषणा केली. या आधीच्या दशकात झालेल्या विविध करारांनी युरोपातील सर्वच देश परस्परांशी बांधले गेले होते. त्यामुळे जेव्हा २३ जुलै रोजी ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाला निर्वाणीचा इशारा पाठवला, तेव्हा एक राजनैतिक पेचप्रसंग निर्माण झाला. काही आठवड्यांतच प्रमुख सत्ता युद्धात उतरल्या, आणि जुलै १९१४ मध्ये बाल्कन भागात सुरू झालेले हे युद्ध झपाट्याने पूर्ण युरोपभर पसरले.

सर्वात आधी २४-२५ जुलै रोजी रशियाने आपलया सैन्याची अंशतः जमवाजमव सुरु केली. २८ जुलै रोजी ऑस्ट्रो-हंगेरियन लोकांनी सर्बियाविरुद्ध युद्ध घोषित केले त्यापाठोपाठ रशियाने ३० जुलै रोजी जाहीरपणे सैन्याची जमवाजमव सुरु केली. जर्मनीने ही जमवाजमव थांबवण्यासाठी रशियाला ३१ जुलैच्या मध्यरात्री रशियाला निर्वाणीचा खलिता पाठवला. रशियाने ही मागणी अमान्य केल्यानंतर १ ऑगस्ट रोजी जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध जाहीर केले. रशियाबरोबरच जर्मनीने फ्रान्सलादेखील निर्वाणीचा खलिता पाठवला, आणि फ्रान्सच्या तटस्थतेची हमी म्हणून फ्रेंचांच्या ताब्यातील दोन किल्ले जर्मनीच्या ताब्यात् देण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्यास फ्रान्सने असमर्थता दर्शवली आणि १ ऑगस्ट रोजी सैन्याची जमवाजमव सुरु केली. ३ ऑगस्ट रोजी जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध जाहीर केले. फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातील सीमा दोन्ही बाजूंनी मजबूत होती. त्यामुळे श्लिफेन योजनेनुसार, जर्मनीने तटस्थ बेल्जियम आणि लक्झेंबर्गवर आक्रमण करून उत्तरेकडून फ्रान्सवर चढाईची तयारी केली. यात बेल्जियन तटस्थतेचे उल्लंघन झाल्यामुळे ब्रिटनने ४ ऑगस्ट रोजी जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले. मार्नच्या लढाईत जर्मन सैन्याची आगेकूच थोपवण्यात दोस्त राष्ट्रांना यश आले. त्यानंतर पश्चिम आघाडीवरच्या लढाईला एका प्रचंड वेढ्याचे स्वरूप आले आणि दोन्ही सैन्यांकडून खंदकांची एक मोठी साखळी तयार झाली. १९१७ सालापर्यंत या साखळीत फारसा फरक पडला नाही. पूर्व आघाडीवर रशियाने ऑस्ट्रिया-हंगेरीविरुद्ध यश मिळवले, पण जर्मन सैन्याने टॅनबेनबर्ग आणि मासुरियन लेक्सच्या युद्धात रशियाचे पूर्व प्रशियावरील आक्रमण परतवून लावले. नोव्हेंबर १९१४ मध्ये, ओस्मानी साम्राज्य केन्द्रीय सत्तांच्या बाजूने सामील झाले आणि कॉकेशस, मेसोपोटेमिया आणि सिनाई येथे नव्या आघाड्यांवर युद्धाला सुरुवात झाली. १९१५ मध्ये इटलीने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने भाग घेतला आणि बल्गेरिया केन्द्रीय सत्तांच्या बाजूने सामील झाला; १९१६ मध्ये रोमेनिया आणि १९१७ साली अमेरिकेची संयुक्त संस्थाने दोस्त राष्ट्रांत सामील झाले.

मार्च 1 9 17 मध्ये रशियन सरकार कोसळले आणि नोव्हेंबरमध्ये एक क्रांती झाली आणि पुढील लष्करी पराभवानंतर रशियाला ब्रेस्ट लिटोव्हस्कच्या तहनीद्वारे सेंट्रल पॉवर्सशी संबंधित अटींचा लाभ झाला, ज्यामुळे जर्मनांना महत्त्वपूर्ण विजय मिळाला. 1 9 18 च्या वसंत ऋतू मध्ये वेस्टर्न फ्रंटला एक आश्चर्यकारक जर्मन आक्षेपार्ह साम्राज्य निर्माण केल्यानंतर, मित्र राष्ट्रांनी प्रतिस्पर्धी हल्ल्यांच्या मालिकेमध्ये जर्मन सैन्याला परतवून लावले. 4 नोव्हेंबर 1 9 18 रोजी, ऑस्ट्रो-हंगेरी साम्राज्य एक युद्धकलापात मान्य झाले आणि जर्मनीला क्रांतिकारकांशी स्वतःची समस्या होती, 11 नोव्हेंबर 1 9 18 रोजी युद्धनौकेवर सहमती दर्शवली, ज्यामुळे मित्र राष्ट्रांच्या विजयाची लढाई संपली.

युद्धाच्या अखेरीस किंवा काही काळानंतर जर्मन साम्राज्य, रशियन साम्राज्य, ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्य आणि ऑट्टोमन साम्राज्य अस्तित्वात नव्हते. नॅशनल बॉर्डरची पुनर्मुद्रण करण्यात आली, अनेक स्वतंत्र राष्ट्रांनी पुनर्संचयित केले किंवा तयार केले, आणि जर्मनीच्या वसाहतींना व्हिक्टर्समध्ये फेकून दिले गेले. 1 9 1 9 च्या पॅरिस शांतता परिषदेदरम्यान, बिग फोर (ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका व इटली) यांनी त्यांच्या करारांची एक श्रृंखला दिली. अशा संघर्षाची पुनरावृत्ती टाळण्याच्या उद्देशाने संघटनेची स्थापना झाली. हा प्रयत्न अयशस्वी झाला, आणि आर्थिक उदासीनता, नूतनीकरण नवीकरण झालेली उत्तराधिकारी राज्ये, आणि अपमान (विशेषत: जर्मनीमध्ये) च्या भावनांनी अखेरीस द्वितीय विश्वयुद्धाच्या सुरुवातीला योगदान दिले.

पोलंडवरील आक्रमण (इ.स. १९३९)

नाझी जर्मनीने सप्टेंबर १, इ.स. १९३९ रोजी पोलंडवर आक्रमण (पोलिश:कांपानिया विझेशनियोवा किंवा वॉय्ना ओब्रॉना १९३९ रोकु, जर्मन:पोलेनफेड्झुग) करून दुसर्‍या महायुद्धाला तोंड फोडले. यानंतर सोवियेत संघानेही पूर्वेकडून पोलंडवर आक्रमण केले.

सोवियेत संघ आणि जर्मनीने या आक्रणाच्या आठवडाभर आधी मोलोटोव्ह-रिबेनट्रोप करार केला होता व त्यानुसार ऑक्टोबर ६ला दोन्ही राष्ट्रांनी पोलंड गिळंकृत करून त्याचे दोन तुकडे आपसात वाटून घेतले.

याला सप्टेंबर मोहीम किंवा पोलंड मोहीम या नावानेही ओळखतात.

बोगनव्हिल मोहीम

बोगनव्हिल मोहीम तथा चेरी ब्लॉसम मोहीम दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रे व जपानी साम्राज्यामध्ये झालेल्या लढाया होत्या. १ नोव्हेंबर, इ.स. १९४३ ते २१ ऑगस्ट, इ.स. १९४५ दरम्यान चालू असलेली ही मोहीम कार्टव्हील मोहीम या दोस्त राष्ट्रांच्या जपानविरुद्धच्या प्रचंड मोहीमेचा भाग होती.

या मोहीमेच्या पूर्वार्धात अमेरिकन सैन्याने बोगनव्हिल द्वीपावर चढाई करून पुळणीवर ताबा मिळवला व नोव्हेंबर १९४३ ते नोव्हेंबर १९४४ तेथे ठाण मांडून ठेवले. या दरम्यान जपानी सैन्याची उपासमार आणि रोगराईमुळे मोठी खराबी झाली. उत्तरार्धात अमेरिकन सैन्य उरलेल्या जपानी सैनिकांना नामोहर करण्यासाठी बेटावर घुसले. येथे त्यांना जवळजवळ १० महिने कडवा प्रतिकार झाला.

रशियाचा इतिहास

रशियाचा इतिहास

रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे . रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे. पूर्वेकडील स्लेव्स आणि फिंनो-युग्रिक लोक यांनी रशियाच्या इतिहास्ची सुरुवात केली . रशियाची राजधानी मॉस्को आहे . तिकडे अधिक्रत लोक रशियन भाषा म्हणतात . जून १२, १९९० तारिखला रशिया स्वातंत्र घोषित झाला पण मान्यता त्यांना दिसेंबर २६, १९९१ ला मिडाली . त्यांचे राष्ट्रीय ध्वज अशा आहे – .

रशियन साम्राज्य-

रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता आहे. रशियातील झारशाही नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला. रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोविएट संघाचा उदय झाला.१७२१ साली, पीटर द ग्रेट अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले. पीटर अलेक्सिस पहिल्याचा मुलगा होता. पीटरने एप्रिल २७, इ.स. १६८२ पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. इ.स. १६९६पर्यंत पीटरचा सावत्रभाऊ इव्हान पाचवा व पीटर असे दोघांनी एकत्र राज्य सांभाळले. पीटरने रशियाचे साम्राज्य युरोप व आशियामध्ये सर्वदूर फैलावले व रशियाला जगातील महासत्तेचा दर्जा दिला. या कारणास्तव त्याचा उल्लेख रशियात व इतरत्र पीटर द ग्रेट (प्योत्र वेलिकी, महान पीटर) असा करतात. थोर राष्ट्रपुरूष पीटर वयाच्या १० व्या वर्षीच रशियाचा त्सार झाला. पण रशियाच्या राजावर तत्कालीन सरदार-उमरावांचा मोठा प्रभाव असल्याने राजा असूनही राष्ट्रापेक्षा स्वतःकडे आणि सरदार-उमरावांकडेच जास्त लक्ष असल्याने रशिया त्याकाळी असंस्कृत, गावंढळ, मागसलेला मानला जाई. पुढील दहा वर्षांच्या काळात त्सार पीटरने सर्व सत्ता आपल्या हातात एकवटली. इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या एका युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला . व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले. हे प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले. बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग ही राजधानी उभारली.१९व्या शतकाच्या अखेरीस रशियाकडे २२,४००,००० चौ. किमी. जमीन होती. केवळ ब्रिटीश साम्राज्याकडे रशियापेक्षा जास्त जमीन होती.रशियन साम्राज्याची पश्चिम सीमा पूर्व युरोपीर मैदानापर्यंत होती.उत्तर सीमा आर्क्टिक महासागरापर्यंत होती .पूर्वेकडे सैबेरीयापर्यंत रशियाचा अंमल होता. दक्षिणेकडे कौकेशस व काड्या समुद्रपर्यंत रशियन सत्ता होती.

एलिझाबेथ ही पीटर द ग्रेट ची मुलगी होती . पीटरनंतर गादीवर एलिझाबेथ बसली . तिच्या कारकीर्दीत रशियाने ७ वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकुन घेतले. परंतू एलिझाबेथच्या मृत्युनंतर तिसरा प्योत्र याने हे सर्व विभाग प्रशियाच्या ताब्यात दिले. कैथेरिन दुसरी किंवा "महान कॅथेरिन" हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.

१८०० मध्ये रशियनचा खूप मोठा साम्राज्य झाला होता . १९१४ चा विश्व युद्ध मध्ये पण रशीयन्स्नी बरेच देशांना मजा चाखावला होता .१९२२ आणि १९९१ सदीच्या मध्यात रशियाचा इतिहासला लोक ' सोविएट युनिअन 'चा इतिहास असे म्हणत होते .१९८० मध्ये रशियाची आर्थिक व राज्यकारभारासंबंधी स्तिथी तीव्र अशक्त झाली होती , आणि म्हणून ' सोविएट युनिअन ' म्हणजे रशियाचा मुख्य, खाली पडले होते .

अधिक्र्तपणे रशियन संघच्या इतिहास जेनुअरी १९९२ मध्ये झाला . पण रशियाने त्यांचे महाशक्ती , महासत्ता सोविएटचा राज्यकारभारासंबंधीचा आणि आर्थिक स्तिथीतून उभारण्याच हारवली होती .तेव्हा पण रशियाने हार नाही मानवली , त्यांने बाजार पुंजीवाद (भांडवलशाही) वर आधारित त्यानची आर्थिक स्तिथी सुधारण्यच प्रयत्न केले . आजही रशिया अनेक राज्यकारभारासंबंधी संस्कृती आणि सामाजिक संरचना वर सोविएटशी बातम्या व चर्चा करतात .

सोव्हियेत रशिया-

सोव्हियेत संघ हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हियेत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली व २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले.

सोव्हियेत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता. भूरचना आणि वनस्प्तीच्या दृष्टीने सोवियेत संघाचे चार भाग पडत. अती उत्तरेच्या फिनलंडच्या सीमेपासून आर्क्टिक समुद्राच्या किनाऱ्याने बेरिंग समुद्रापर्यंत पसरलेला टुंड्राचा बर्फाच्छादित प्रदेश ज्यात मुख्यत्वे पाणथळ भाग, दलदलीचा प्रदेश, शेवाळे आणि खुरटी झुडपे यांचे साम्राज्य होते. या भागात मनुष्य वसाहत कमी होती.तैगाच्या दक्षिणेस एल्म, ओक या झाडांसह लाकडाची विपुल संपत्तीचा, सुपीक जमिनीचा प्रदेश होता. जगातील सगळ्यात मोठा, सलग, लागवडीखालचा प्रदेश अशी याची ओळख. विविध प्रकारचे कारखने, उद्योग धंदे या भागात होते. या सुपीक भागाच्या दक्षिणेला कोरड्या हवामानाचा, वाळवंटी प्रदेश होता. या भागात अनेक्दा अवर्षण, दुष्काळ असे. येथील प्रमुख पीके तंबाखू, चहा, ऊस, अंजीर, अक्रोड, बांबू, लवंग,निलगीरी ही होती. सोवियेत संघ खूप मोठा देश होता तरी एकूण उपलब्ध क्षेत्राच्या केवळ १/३ जागा लागवडी योग्य होती.

सोवियेत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती. जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी ओब, येनिसी, लेना व अमूर या ४ मोठ्या नद्या सोवियेत संघात होत्या. आर्क्टिक समुद्राचा सुमारे ४,००० मैलांचा समुद्र किनारा सोवियेत संघाला लाभला होता. वर्षातील बहुतेक वेळ हा समुद्र बर्फाच्छादित राहत असल्याने नौकानयनास तो फारसा उपयोगी नव्हता. सुमारे एक लाख पन्नास हजार चौरस मैल क्षेत्रफळ असलेला व चारही बाजुने भूमीने वेढलेला कास्पियन समुद्राला तर जगातील सर्वात मोठे सरोवर म्हणता येईल. सैबेरियातील बैकाल सरोवर जगातील सर्वात खोल सरोवर ठरते. विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोवियेत संघाला लाभल्या होत्या.सोव्हियेत संघामध्ये एकूण १५ संघीय गणराज्ये होती. १९९१ साली सोव्हियेत संघाचे विघटन झाल्यानंतर ह्या १५ गणराज्यांचे रुपांतर १५ स्वतंत्र देशांमध्ये झाले.

प्रागैतिहासिक कालखंड – भूगोल , चतु:सीमा, राजकीय विभाग, मोठी शहरे, शिक्षण, संस्कृती, भाषा-

रशिया हा जगातील शेत्रफडानुसार सर्वांत मोठा देश आहे. रशियाचे एकुण क्षेत्रफळ १७,०७५,४०० चौ.किमी. आहे. रशियात २३ जागतिक वारसा स्थडे ,४० राष्ट्रीय उद्याने आहेत. रशिया देशाचे एकुण ८३ राजकीय विभाग आहेत.

२१ प्रजासत्ताक

४६ ओब्लास्ट (प्रांत)

९ प्रदेश

१ स्वायत्त ओब्लास्ट

४ स्वायत्त जिल्हे

२ केंद्रशासित शहरे

अतिपूर्व केंद्रीय जिल्हा हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी आकाराने सर्वात मोठा व लोकसंख्येने सर्वात लहान जिल्हा आहे. दक्षिण केंद्रीय जिल्हा हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. दक्षिण जिल्हा रशियाच्या नैऋत्य भागातकोकसस भागामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग दक्षिण जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात. उत्तर कॉकासियन केंद्रीय जिल्हा हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी सर्वात नवा निर्माण झालेला जिल्हा आहे. १९ जानेवारी २०१० रोजी दक्षिण केंद्रीय जिल्हापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. उत्तर कोकसस भौगोलिक प्रदेशामधील रशियाचे बहुधा सर्व प्रांत ह्या जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.मध्य केंद्रीय जिल्हा हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. मध्य जिल्हा रशियाच्या वास्तविकपणे रशियाच्या अतिपश्चिमेकडे पूर्व युरोपितवसला आहे. मध्य केंद्रीय जिल्हा हे नाव भौगोलिक नसून राजकीय व ऐतिहासिक कारणांसाठी वापरले गेले आहे.उरल केंद्रीय जिल्हा हारशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा रशियाच्या उरल भागात वसला आहे.वायव्य केंद्रीय जिल्हा हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा रशियाच्या वायव्य भागात वसला आहे.वोल्गा केंद्रीय जिल्हा हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. वोल्गा जिल्हा रशियाच्या पश्चिम भागात युरोपीय रशियामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग वोल्गा जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.सायबेरियन केंद्रीय जिल्हा हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. सायबेरियन जिल्हा रशियाच्या मध्य भागामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग सायबेरियन जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.

घटनेनुसार रशिया एक संघराज्य व अर्ध-अध्यक्षीय लोकशाही राष्ट्र आहे. रशियात राष्ट्रपती हा राष्ट्रप्रमुख, तर पंतप्रधान हा कार्यकारी प्रमुख असतो.

रशिया आर्थिकदृष्ट्या प्रगतीशील राष्ट्र आहे. रशियाचा दरडोई उत्पन्नात १० वा क्रमांक लागतो.रशियन भाषा ही युरेशिया खंडामधील एक प्रमुख भाषा आहे. स्लाविक भाषांपैकी ही सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. रशियन भाषा इंडो-युरोपीय भाषाकुळातील स्लाविक भाषाकुळात गणली जाते. रशियन प्रथम भाषा असणाऱ्या भाषकांची जगभरातील संख्या सुमारे १६.४ कोटी (इ.स. २००६ चा अंदाज) असून द्वितीय भाषा असणाऱ्या भाषकांची संख्या धरता एकूण भाषकसंख्या जगभरात २७.८ कोटी आहे.

शेती-

२००५ साली रशियातील १,२३७,२९४ चौ.किमी. जमिन लागवडीखाली होती. केवळ भारत ,चीन व अमेरिकेत यापेक्षा जास्त जमिन लागवडीखाली आहे.

उर्जा-

रशियाला प्रसारमाध्यमे उर्जा महासत्ता म्हणतात. रशियात सर्वाधिक नैसर्गिक वायु सापडतो.

वाहतुक-

रशियातील रेल्वेवाहतुक संपुर्णपणे सरकारने चालविलेल्या रशियन रेल्वे मार्फत होते. रशियात एकुण ८५,००० कि.मी. रेल्वेमार्ग आहेत.

२००६ साली रशियात ९,३३,००० कि.मी. रस्ते होते. यातील ७,५५,००० कि.मी.रस्ते पक्के होते.

रशियन क्रांती'

क्रांतीपूर्व काळात रशियात झार घराम्याची सत्ता होती. इ.स. १९१७ रशियात झालेल्या राजकीय उलथापालथीस रशियन क्रांती म्हटले जाते. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. मार्च, इ.स. १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले. ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.

रशियन राज्यक्रांती ही पहिली साम्यवादी क्रांती होती. जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. इ.स. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोग्राड येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता लेनिन इ.स. १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरु झाले.

पहिले महायुद्धात रशियनची क्रांती(१९०७) –

पहिले महायुद्ध हे इ.स. १९१४ ते इ.स. १९१८ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोपातील दोस्त राष्ट्रे ( फ्रांस ,रशियन साम्राज्य ,युनायटेड किंग्डम व नंतर इटली व अमेरिकेची संयुक्त संस्थाने ) व केंद्रवर्ती सत्ता ( ऑस्ट्रिया-हंगेरी ,प्रशिया (वर्तमान जर्मनी ), बल्गेरिया ,ओस्मानी साम्राज्य यांच्या दरम्यान झाले. यात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.

१९१६ साली ब्रुसिलोव्हमध्ये विजय मिळवूनही रशियात सरकार विरोधी असंतोष वाढत होता. झारची राजवट नावापुरती होती. खरी सत्ता महाराणी आलेक्झानद्र हिच्या व ग्रिगोरी रास्पोतिन याच्या हातात होती. असंतोष वाढत गेल्यावर ग्रिगोरी रास्पोतिन याचा १९१६ च्या अखेरीस खून करण्यात आला.

मार्च १९१७ साली, पेट्रोग्राडमध्ये झारविरुद्ध निदर्शने करण्यात आली. यामुळे झारने सिंहासनाचा त्याग केला व एक कमकुवत हंगामी सरकार स्थापण्यात आले. या गोंधळात आघाडीवरचे लष्कर निकामी ठरले.

हंगामी सरकारबद्दलचा असंतोष वाढत असतानाच व्लादिमिर इलिच लेनिनच्या पक्षाची ताकद व लोकप्रियता वाढत होती. लेनिनने सरकारला युद्ध थांबवण्याची मागणी केली. बोल्शेव्हिकांनी केलेला सशस्त्र उठाव यशस्वी ठरला. लेनिनने लगेच प्रशियाला युद्ध थांबवण्याची मागणी केली. ही मागणी प्रशियाला पटली नाही. नंतर ब्रेस्ट-लिटोव्हस्क चा तह झाला. यानुसार फिनलँड, बाल्टिक देश, पोलंड व युक्रेन केंद्रवर्ती सत्तांना देण्यात आले.

इतर कोणत्याही युद्धाचे परिणाम या युद्धाएवढे मोठे नव्हते. या युद्धामुळे प्रशियन साम्राज्य ऑस्ट्रिया-हंगेरीयन साम्राज्य ओस्मानी साम्राज्य व रशियन साम्राज्य ही साम्राज्ये नामशेष झाली.

मॉस्को , सेंट पीटर्सबर्ग, नोव्होसिबिर्स्क, निझनी नोव्हगोरोड, येकाटेरिनबर्ग, सामरा, ओम्स्क, काझन व चेलियाबिन्स्क ह्या सगडी रशियाची खूप मोठी आणि प्रसिद्ध शहरे आहे .

रशियन झारच्या खजिन्याचे रहस्य-

पहिल्या महायुद्धाच्या वेळी, रशियन साम्राज्याचा त्या वेळचा झार, दुसरा निकोलस याने, आपला खजिना जर्मन सैनिकांच्या हातात पडू नये म्हणून राजधानी सेन्ट पीटर्सबर्ग मधून, मॉस्कोच्या पूर्वेला असलेल्या काझन या ठिकाणी हलवला होता. या खजिन्यामधे 500 टन नुसते सोनेच होते. 5000 पेटारे आणि 1700 पोती यात हा खजिना भरलेला होता व एका अंदाजाप्रमाणे त्याची किंमत 650 मिलियन रूबल्स एवढी तरी होती पहिले महायुद्ध संपण्याच्या आधीच, रशियामधे 1917 सालच्या ऑक्टोबर महिन्यात बोल्शेव्हिक क्रांती लेनिनच्या नेतृत्वाखाली झाली. ही क्रांती करणारे बोल्शेव्हिक सैनिक व झारशी एकनिष्ठ असलेले रशियन अधिकारी व सैन्य यांच्यातील यादवी युद्ध 1922 पर्यंत चालू होते. 1922 मधे बोल्शेव्हिक पक्षाने संपूर्ण रशियावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. या यादवी युद्धाच्या दरम्यान म्हणजे 1919 साली झारच्या पक्षाचा एक वरिष्ठ सेनाधिकारी, ऍडमिरल अलेक्झांडर कोलचेक याने उरल पर्वतच्या भागात झेक सैनिकांच्या मदतीने उठाव केला व काझन शहरातून बोल्शेव्हिक सैनिकांना तेथून हुसकावून लावले. त्याच्या साथीला असलेल्या झेक सैनिकांना, ‘व्हाईट गार्डस‘ असे नाव पडले आहे.

दुसर्‍या निकोलसच्या खजिन्याचा बराचसा हिस्सा, ऍडमिरल कोलचेव्ह व त्याचे व्हाईट गार्डस यांच्या हातात पडला. हा खजिना हलवण्यासाठी या सैनिकांना 40 रेल्वे वॅग न्स वापराव्या लागल्या. ऍडमिरल कोलचेव्ह व त्याचे सैनिक यांनी हा खजिना कुठे हलवला हे गूढ गेली 90 वर्षे तरी रशियन इतिहास संशोधकांना सोडवता आलेले नाही. काझनमधल्या विजयानंतर, झारच्या नाविक दलात ऍडमिरल असलेल्या कोलचेव्हने, बोल्शेव्हिक सैनिकांच्या विरूद्ध सर्वांनी लढावे म्हणून प्रयत्न केले व स्वत:ची हुकुमशाही राजवट, उरल पर्वताच्या भागात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला त्यात यश आले नाही व रेड गार्डस बरोबरची लढाई तो हरला व त्यांच्या तावडीत सापडला. यानंतर त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. कोलचेव्हबरोबरच्या झेक सैनिकांनी निकोलसचे सोने असलेल्या रेल्वे वॅगन्स कुठे व कशा हलवल्या हे आतापर्यंत न समजलेले गूढ आहे. या व्हाईट गार्डस चा युद्धात पराभव झाल्यावर आपल्याला झेकोस्लिव्हाकियाला परत जाऊ देण्यासाठी त्यांनी त्यांच्या जवळ असलेले काही सोने मॉस्को मधल्या सरकारला देऊ केले व त्याच्या बदल्यात रशियातून पळ काढण्यात ते यशस्वी झाले.

बाकीच्या सोन्याची या व्हाईट गार्डसनी कशी विल्हेवाट लावली असवी या बद्दल अनेक तर्ककुतर्क गेली 90 वर्षे केले गेले आहेत. काही लोकांच्या मताने हे सोने या झेक सैनिकांनी चोरट्या मार्गाने झेकोस्लोव्हाकियाला नेले असावे. व 1920 च्या सुमारास झेकोस्लोव्हाकिया देशात आलेली अचानक सुबत्ता या सोन्यामुळेच होती. काही लोकांच्या मते, हे सोने या झेक गार्डसनी जपान व इंग्लंड मधल्या बॅन्कात ठेवले असावे.

रशियाच्या पूर्व भागात व सैबेरियाच्या दक्षिणेला, लेक बैकल म्हणून एक विशाल जलाशय आहे. जगातील गोड्या पाण्याचा हा सर्वात मोठा जलाशय आहे असे मानले जाते. कोलचेव्हच्या उठावाच्यावेळी हा लेक संपूर्ण गोठलेला होता. काही लोकांच्या मताने, व्हाईट गार्डसनी सोन्याने भरलेल्या रेल्वे वॅगन्स, या गोठलेल्या लेक बैकल वरून ओढत नेण्याचा प्रयत्न केला परंतु त्या वजनाला अतिशय जड असल्याने या जलाशयाच्या पृष्ठभागावरचा बर्फाला भेगा पडून तो फुटला व या सर्व वॅगन्स लेक बैकलमधे बुडल्या असाव्यात. या कथेला सत्याचा थोडा आधार आहे. 1904-1905 मधल्या रशिया-जपान युद्धात या लेक बैकलच्या पृष्ठभागावर रेल्वेचे रूळ टाकण्यात आलेले होते.

गेली 2 वर्षे, रशियाच्या ‘मिर‘ या शास्त्रीय संशोधनासाठी वापरल्या जाणार्‍या दोन पाणबुड्या, लेक बैकलमधे संशोधन कार्य करत आहेत. या मिर पाणबुड्या, त्यांनी काही वर्षांपूर्वी ‘टायटॅनिक‘ या बुडलेल्या जहाजाच्या शोधून काढलेल्या अवशेषांमुळे, एकदम प्रसिद्धिच्या झोतात आल्या होत्या. सर्वसाधारणपणे या पाणबुड्या अटलांटिक व हिंदी महासागरात संशोधन करत असतात. या मिर पाणबुड्यांना, निकोलसच्या सोन्याची ही दंतकथा सत्य आहे का हे पडताळून पाहण्याची नामी संधीच मिळाली आहे.

लेक बैकलचे संशोधन पूर्ण होण्याच्या अवस्थेत आलेले असताना, अचानक मागच्या आठवड्यात या पाणबुड्यांना, रेल्वेच्या पुलावर वापरतात त्या पद्धतीचे मोठे लोखंडी गर्डर आढळून आले. पृष्ठभागापासून 400 मीटर खाली एका उताराच्या भागावर जास्त शोध घेतला असता ते गर्डर एखाद्या रेल्वे वॅगनचा भाग असावेत असे वाटले. यानंतर थोड्याच वेळात या पाणबुडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात चमचम करणार्‍या सोन्याच्या कांबी या पाणबुडीचा चालक बेअर स्त्र्येनॉव्ह व त्याचे दोन सहकारी यांना आढळून आले. स्त्र्येनॉव्ह हा लेक बैकलच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काम करणारा एक शास्त्रज्ञ आहे.

स्त्र्येनॉव्हचा एक सहकारी रोमन फॉनिन हा म्हणतो की या सोन्याच्या कांबी लेकच्या तळावर असलेल्या चिखलात एवढ्या रुतून बसलेल्या अहेत की त्या बाहेर काढणे आम्हाला शक्य झाले नाही. परंतु या आठवड्यात आणखी काही पाण्याखालच्या डाईव्ह्स घेऊन, दुसरा निकोलस या झारच्या सोन्याचे गूढ आम्ही सोड्वणारच आहोत.

मात्र त्याला असे वाटते की हे सोने जरी बाहेर काढण्यात यश मिळाले तरी व्हाईट गार्डस व सोने यांची दंतकथा काही लोक विसरणार नाहीत. उलटी ती त्यांच्या जास्तच स्मरणात राहण्याची शक्यता आहे.

लेयटे आखाताची लढाई

लेयटे आखाताची लढाई (मराठी नामभेद: लेयटे गल्फची लढाई ; इंग्लिश: Battle of Leyte Gulf, बॅटल ऑफ लेयटे गल्फ) ही दुसर्‍या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रे आणि शाही जपानी आरमार यांच्यात फिलिपिन्सजवळील लेयटे आखातात लढली गेलेली आरमारी लढाई होती. ही लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यानची सगळ्यात मोठी आरमारी लढाई होती आणि काही हिशोबाप्रमाणे ही जगाच्या इतिहासातीलच सगळ्यात मोठी आरमारी लढाई होती.ही लढाई चार टप्प्यांत चार ठिकाणी लढली गेली: सिबुयान समुद्राची लढाई, सुरिगाओ आखातची लढाई, समारची लढाई, केप एन्गान्योची लढाई.

यांशिवाय आसपासच्या प्रदेशात अनेक झटापटीही झाल्या.युद्धाच्या सुरुवातीस जपानने आग्नेय आशियातील अनेक प्रदेश हस्तगत करून तेथील तेलसाठे व खनिज संपत्ती मिळवलेली होती. जपानचे बरेचसे युद्धतंत्र या सामग्रीवर आधारित होती. येथून जपानकडे जाणारी ही रसद तोडण्यासाठी दोस्त राष्ट्रांना फिलिपिन्स जिंकून तेथे तळ उभारणे गरजेचे होते. यासाठी अमेरिकेने २० ऑक्टोबर रोजी लेयटे बेटावर चढाई केली. हे पाहताच जपानी आरमाराने आपली शक्ती एकवटून प्रतिहल्ला केला. पण अमेरिकन आरमाराच्या तिसर्‍या आणि सातव्या तांड्याने हा प्रतिहल्ला उधळून लावला. ही लढाई संपताना जपानकडे असलेल्या विमानांची संख्या अमेरिकेच्या युद्धनौकांच्या संख्येपेक्षाही कमी झाली. येथून पुढे जपानला समुद्रात लढायला बळच उरले नाही. या लढाईत जपानी आरमाराचीही इतकी हानी झाली, की युद्धाच्या अंतापर्यंत ते यातून सावरलेच नाही .

या लढाईत जपानी वैमानिकांनी सर्वप्रथम कामिकाझे हल्ले चढवले.

सप्टेंबर ११

सप्टेंबर ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५४ वा किंवा लीप वर्षात २५५ वा दिवस असतो.

ॲडमिन बॉक्सची लढाई

ॲडमिन बॉक्सची लढाई, न्गाक्येडौकची लढाई किंवा सिंझवेयाची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रे आणि जपानी सैन्यामध्ये झालेली लढाई होती. ५-२३ फेब्रुवारी, १९४४ दरम्यान आराकानजवळ झालेल्या या लढाईत दोस्तांचा विजय झाला.

ही लढाई सध्याच्या बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेजवळ झाली होती. यात जपान्यांची एक डिव्हिजन तर दोस्त राष्ट्रांच्या दोन डिव्हिजन आणि एक रेजिमेंट होत्या. याशिवाय दोस्तांनी अधिक दोन डिव्हिजनांची कुमक पाठवली. यात दोस्त राष्ट्रांचे ३,५०६ सैनिक मृत्यू पावले आणि जपान्यांकडून लढणारे ३,१०६ मृत्यू पावले तसेच २,२२९ सैनिक जखमी झाले. याशिवाय दोस्तांची तीन आणि जपान्यांची ६५ लढाऊ विमाने कामी आली.

या लढाईमध्ये दोन्हीकडून भारतीय सैनिक लढले. दोस्त राष्ट्रांकडून ते ब्रिटिश भारतीय लष्कराचा भाग होते तर जपान्यांकडून आझाद हिंद फौजेच्या ध्वजाखाली ते लढले.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.