डेव्हिड रिकार्डो

डेव्हिड रिकार्डो (इ.स. १७७२ - इ.स. १८२३) हे एक ब्रिटिश अर्थतज्ञ होते. १८१७ साली प्रकाशित झालेल्या “प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन” (“राजकीय अर्थव्यवस्था व करव्यवस्थेची तत्वे”) या त्यांच्या पुस्तकासाठी ते ओळखले जातात. या पुस्तकात रिकार्डो यांनी तत्कालीन जमीनदारी व्यवस्थेची टीका केली. या व्यवस्थेत काही थोड्या जमीनदारांच्या हातात अधिकाधिक जमीन व संपत्ती येते व सामाजिक असमतोल उत्पन्न होतो असे रिकार्डो यांचे मत होते. हा असमतोल टाळण्यासाठी जमीनीवर कर बसवला जावा असे त्यांनी या पुस्तकात सुचविले. पुढे औद्योगिक क्रांतीमुळे जमीनदारी व्यवस्थाच नाहीशी झाली व रिकार्डो यांचे असमतोलाचे भाकीत खोटे ठरले. परंतु त्यांच्यानंतर कार्ल मार्क्स या जर्मन अर्थतज्ञाने हाच असमतोलाचा विचार औद्योगिक भांडवरदारीस लावला.

Ricardo - Opere, 1852 - 5181784
Works, 1852
तोमा पिकेती

तोमा पिकेती (इ.स. १९७१ - ) हे समाजातील आर्थिक उत्पन्न व संपत्तीच्या असमानतेचा अभ्यास करणारे एक फ्रेंच अर्थतज्ञ आहेत. ते पॅरिसमधल्या पॅरिस अर्थशास्त्र संस्थेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

त्यांचे २०१३ साली प्रकाशित झालेले पुस्तक, “ल कापिताल ओ व्हुनेउनियेम सिएक्लं” (“एकविसाव्या शतकात भांडवल”) हे पुस्तक अनेक देशांत सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरले. प्रगत देशांतली आजची आर्थिक असमानता बघितली तर परिस्थिती एकोणिसाव्या शतकातल्या सारखीच आहे असे पिकेती यांचे मत आहे. त्यामुळे कार्ल मार्क्स, डेव्हिड रिकार्डो, इत्यादिंसारख्या सामाजिक विषमतेवर विचार करणाऱ्या विसाव्या शतकाच्या आधी होऊन गेलेल्या अर्थतज्ञांचे विचार आज पुन्हा बघण्यासारखे आहेत. परंतु या तत्कालीन अर्थतज्ञांकडे सामाजिक व वैयक्तीक संपत्तीची अचूक आकडेवारी नसल्यामुळे त्यांचे निष्कर्ष तर्कशुध्द नसून पुर्वग्रहदूषित असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अचूक आकडेवारी असलेल्या सायमन कुझनेट्स सारख्या विसाव्या शतकातल्या अर्थतज्ञांकडे बघितले तर त्यांचे निष्कर्ष मार्क्स प्रभृतींच्या उलटच नाहीत तर विसाव्या शतकातील शीत युध्दाच्या पार्श्वभूमीमुळे वेगळ्याप्रकारे पुर्वग्रहदूषित आहेत. उदाहरणार्थ, मार्क्सच्या मते खासगी भांडवलदारी व्यवस्थेत सामाजिक संपत्ती काही थोड्या व्यक्तींच्या हातात—म्हणजेच खासगी भांडवलदारांच्या हातात—येऊन विषमता वाढत जाते व शेवटी भांडवलदारी व्यवस्थाच संपुष्टात येते. याउलट कुझनेट्सच्या मते खासगी भांडवलदारी व्यवस्थेत केवळ सुरूवातीस सामाजिक विषमता वाढते व काही वेळाने संपत्तीच्या देवाणघेवाणीतून साहजिकच अार्थिक समता अस्तित्वात येते. एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतल्या भांडवलावरच्या या विरोधी कल्पनांचा पिकेती यांनी एकविसाव्या शतकात भांडवल या पुस्तकात एकविसाव्या शतकासाठी उहापोह केला आहे. पिकेतींकडे अचूक आकडेवारीचा सुकाळ असल्याने आधीच्या अर्थतज्ञांच्या तुलनेत त्यांच्या निष्कर्षांना विशेष धार आहे. या विश्लेषणातून पिकेती दाखवतात की जगात आज सर्वत्र आर्थिक विषमता वाढते आहे. ही विषमता कुझनेट्स-मार्गाने घटण्याची लक्षणे नाहीत. पुस्तकाच्या शेवटी ही वाढ रोखण्यासाठी कोणती पावले उचलावीत याबद्दल काही सल्ले आहेत.

व्यापार चक्र

व्यापार चक्र हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे अंग आहे. या मध्ये सरकारी हस्तक्षेप कमी असतो. उपभोक्त आणि उत्पादक यांना स्वातंत्र्य असते. ही अर्थव्यवस्था बाजार यंत्रणे वर आधारित असते. यामुळे अशा अर्थव्यवस्थेत आर्थिक व्यवहारत सतत चढ-उतार होतात. अर्थव्यवस्थेतील चक्राकार पद्धतीने घडून येणारे बदल म्हणजे व्यापार चक्र होय. मिश्र अर्थव्यवस्थेत ही चढ-उतार होतात.पण साम्यवादी अर्थव्यवस्थेत असे बदल जाणवत नाहीत.हे बदल तेजी-घसरण-मंदी-पुनरुज्जीवन स्वरूपात असतात. त्याच बरोबर या बदलांच कालावधी निश्चित नसतो. काही व्यापार चक्रे अल्प मुदतीची असतात,तर काहींचा कालावधी मोठा असतो. या बदलांचे बहुतेक सर्वच क्षेत्रावर परिणाम होतात. व्यापार चक्रामुळे एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण उत्पादन आणि एकूण रोजगार पातळी इत्यादी मध्ये लाटांसारखे चढ-उतार घडून येतात. चक्रीय बदल एका क्षेत्रात सुरु होऊन अन्य क्षेत्रात विस्तार होतो. व्यापार व्यापार चक्राचे स्वरूप आंतरराष्ट्रीय असते.

व्यापारचक्राचा मागोवा

फ्रेंच अर्थतज्ज्ञ क्लेमेंट जगलर याचा खास व्यापारचक्रावरील पहिला ग्रंथ १८६० साली प्रसिद्ध केला. त्यात व्यापारचक्राच्या त्यांनी तीन अवस्था दर्शविलेल्या होत्या. आर्थिक भरभराट (प्रॉस्पेरिटी), आर्थिक घसरण (रिसेशन) आणि आर्थिक अरिष्ट अगर दिवाळखोरी (डिप्रेशन) अवस्था. या तीन अवस्था क्रमशः एकापाठोपाठ एक अशा येत असतात. आर्थिक अरिष्टे चक्री आंदोलनाचा भाग असतात, हे प्रथम ज्यांना उमगले, त्यांत जगलरचा समावेश होतो. आर्थिक भरभराटीतच विघटनाची बीजे रोवली जातात, त्यांतूनच मंदी उदभवते, तसेच किमतींमधील कालानुसारी फेरबदल यांसारख्या बाबींच्या मुळाशी व्यापारचक्राची संकल्पना आहे, असे जगलरचे निदान होते.व्यापारचक्रांचा सैद्धांतिक अभ्यास करणारे अर्थतज्ज्ञ

विल्यम स्टॅन्ली, जेव्हन्झ हायेक, अ‍ॅल्फ्रेड मार्शल, कार्ल मार्क्स, डेव्हिड रिकार्डो, जोझेफ शुंपेटर, नट विकसेल, जे.एम केन्स, जॉन हिक्स रिचर्ड, बेस्ली क्लेअर मिचेल इत्यादी.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.