डेव्हिड बेन-गुरियन

डेव्हिड बेन-गुरियन (हिब्रू: דָּוִד בֶּן-גּוּרִיּוֹן; १६ ऑक्टोबर, १८८६ - १ डिसेंबर, १९७३) हा इस्रायल देशाचा संस्थापक व पहिला पंतप्रधान होता. बेन-गुरियन कट्टर ज्यू राष्ट्रीयवादी होता व त्याने १४ मे १९४८ रोजी पॅलेस्टाइन भूभागावर स्वतंत्र इस्रायल देशाची घोषणा केली.

विसाव्या शतकात कार्यरत असलेल्या जगातील १०० सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये त्याची गणना केली जाते. बेन-गुरियनच्या स्मरणार्थ तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळ तसेच इस्रायलमधील असंख्य महत्त्वाच्या इमारती व वास्तूंना त्याचे नाव दिले गेले आहे.

डेव्हिड बेन-गुरियन
डेव्हिड बेन-गुरियन


इस्रायलचा पंतप्रधान
कार्यकाळ
२ नोव्हेंबर १९५५ – २१ जून १९६३
मागील मोशे शॅरेड
पुढील लेव्हि एश्कॉल
कार्यकाळ
१७ मे १९४८ – ७ डिसेंबर १९५४
पुढील मोशे शॅरेड

जन्म १६ ऑक्टोबर, १८८६
पॉइन्स्क, रशियन साम्राज्य (आजचा माझोव्येत्स्का प्रांत, पोलंड)
मृत्यू १ डिसेंबर, १९७३ (वय ८७)
इस्रायल
धर्म ज्यू
सही
डेव्हिड बेन-गुरियनयांची सही

बाह्य दुवे

इस्रायल

इस्रायल, अधिकृतरीत्या इस्रायल संघराज्य, (हिब्रू: יִשְׂרָאֵל; अरबी: إِسْرَائِيلُ) हा पश्चिम आशियातील भूमध्य सागराच्या किनाऱ्याला लागून आग्नेयेस वसलेला एक देश आहे. जेरुसलेम ही इस्रायलची घोषित राजधानी आहे (जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी असण्यावरून वाद चालू आहे. त्यामुळे बऱ्याच राष्ट्रांनी आपले दूतावास तेल अवीव्हमध्ये ठेवले आहेत).इस्रायलमध्ये संसदीय लोकशाही असून ते जगातले एकमेव ज्यू राष्ट्र आहे. परंतु इस्रायलमध्ये इतर धर्माचे आणि इतर पंथाचे लोकही आहेत (पहा इस्रायली लोक).अमेरिकेने इस्राएलची राजधानी जेरुसलेम यास राजधानी म्हणून मान्यता दिली आहे.

इस्रायलचे पंतप्रधान

इस्रायलचे पंतप्रधान हे इस्रायल देशाचे शासनप्रमुख आहेत व इस्रायली राजकारणात सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. पंतप्रधानांची नियुक्ती इस्रायलचे राष्ट्रपती करतात. १४ मे १९४८ला इजरायलच्या स्वातंत्र्याच्या घोषणे नंतर डेव्हिड बेन-गुरियन इस्रायलच्या अस्थायी सरकारचे नेता म्हणून पंतप्रधान झाले व पहिल्या निवडणुकीत तेच निवडुन आले. गोल्डा मायर या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. ३१ मार्च २००९ पासुन बिन्यामिन नेतान्याहू सध्याचे पदस्त पंतप्रधान आहेत. पंतप्रधान असताना लेव्हि एश्कॉल यांचे निधन झाले (१९६९) व यित्झाक राबिन यांची हत्या (१९९५) करण्यात आली.

इस्रायलचे राष्ट्रपती

इस्रायलचे राष्ट्रपती हे इस्रायल देशाचे राष्ट्रप्रमुख आहे. हे पद प्रामुख्याने एक औपचारिक पद आहे कारण कार्यकारी शक्ती प्रभावीपणे इस्रायलच्या पंतप्रधानांच्या जवळ आहे. २४ जुलै २०१४ पासून सध्याचे राष्ट्रपती रेउव्हेन रिव्हलिन नियुक्त झाले आहेत. इस्रायलचे विधानमंडळ क्नेसेट हे इस्रायलचे राष्ट्रपती सात वर्षांच्या कालावधीसाठी निवडून देते आणि एका व्यक्तिला आता केवळ एकदाच नियुक्त करता येते.

ऑक्टोबर १६

ऑक्टोबर १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८९ वा किंवा लीप वर्षात २९० वा दिवस असतो.

जानेवारी २५

जानेवारी २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५ वा किंवा लीप वर्षात २५ वा दिवस असतो.

डिसेंबर १

डिसेंबर १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३५ वा किंवा लीप वर्षात ३३६ वा दिवस असतो.

बेन गुरियन विमानतळ

बेन गुरियन विमानतळ (आहसंवि: TLV, आप्रविको: LLBG) हा इस्रायल देशामधील सर्वात मोठा व तेल अवीव शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ तेल अवीवच्या १९ किमी ईशान्येस स्थित आहे. १९३६ साली ब्रिटिशांनी बांधलेल्या ह्या विमानतळाला १९७३ साली इस्रायलचा पहिला पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरियन ह्याचे नाव देण्यात आले. आर्किया इस्रायल एरलाइन्स, एल ॲल इत्यादी इस्रायलमधील प्रमुख विमान वाहतूक कंपन्यांचे प्रमुख वाहतूकतळ येथेच आहेत.

२०१३ साली बेन गुरियन विमानतळाचा १.४२ कोटी प्रवाशांनी वापर केला.

मोशे शॅरेड

मोशे शॅरेड (हिब्रू: משה שרת; १६ ऑक्टोबर, १८८६ - जुलै ७, इ.स. १९६५) हा इस्रायल देशाचा दुसरा पंतप्रधान होता. तो दोन वर्षांहून कमी काळ सत्तेवर होता.

लेव्हि एश्कॉल

लेव्हि एश्कॉल (हिब्रू: לֵוִי אֶשְׁכּוֹל; ऑक्टोबर २५, इ.स. १८९५ - फेब्रुवारी २६, इ.स. १९६९) हा १९६३ ते १९६९ दरम्यान इस्रायल देशाचा पंतप्रधान होता. इस्रायल देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीमध्ये त्याचे योगदान मौल्यवान मानले जाते.

इस्रायल ध्वज इस्रायलचे पंतप्रधान

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.