डिसेंबर ५


डिसेंबर ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३९ वा किंवा लीप वर्षात ३४० वा दिवस असतो.

<< डिसेंबर २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३० ३१

ठळक घटना आणि घडामोडी

पंधरावे शतक

सोळावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन

बाह्य दुवे

डिसेंबर ४ - डिसेंबर ६ - डिसेंबर ७ - डिसेंबर ८ - (डिसेंबर महिना)

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी (जन्म: २५ डिसेंबर १९२४; मृत्यू : १६ आॅगस्ट २०१८) हे माजी भारतीय पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते. ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते. यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली होती.

इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००७-०८

The England cricket team will tour Sri Lanka from सप्टेंबर २८ to डिसेंबर २२ इ.स. २००७. England will make two trips to Sri Lanka in this tour with the ODI team arriving on सप्टेंबर २५ before returning to England on the ऑक्टोबर १५. The Test team will then arrive on the नोव्हेंबर १५ and will stay there for the remainder of the tour. The tour will include three Test matches and five ODIs.

क्लोद मोने

क्लोद मोने (फ्रेंच: Claude Monet) हा एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात फ्रेंच चित्रकार होता. दृक् प्रत्ययवाद (अर्थात इंप्रेशनिझम) शैलीच्या जनकांपैकी एक म्हणून मानला जातो.

डिसेंबर ३

डिसेंबर ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३७ वा किंवा लीप वर्षात ३३८ वा दिवस असतो.

डिसेंबर ४

डिसेंबर ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३८ वा किंवा लीप वर्षात ३३९ वा दिवस असतो.

डिसेंबर ६

डिसेंबर ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४० वा किंवा लीप वर्षात ३४१ वा दिवस असतो.

डिसेंबर ७

डिसेंबर ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४१ वा किंवा लीप वर्षात ३४२ वा दिवस असतो.

पी.व्ही. नरसिंम्हा राव

पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव (तेलुगू: పాములపర్తి వెంకట నరసింహారావు ; रोमन लिपी: Pamulaparti Venkata Narasimha Rao ;) (जून २८, इ.स. १९२१ - डिसेंबर २३, इ.स. २००४) हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली.

मधुकर धोंड

मधुकर वासुदेव धोंड (ऑक्टोबर ४, इ.स. १९१४ - डिसेंबर ५, इ.स. २००७; वांद्रे, मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी' या ग्रंथाला इ.स. १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन हे भारताच्या पश्चिम क्षेत्रात असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सरकार आहे. महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.

लक्ष्मण देशपांडे

डॉ. लक्ष्मण देशपांडे (डिसेंबर ५, इ.स. १९४३ - फेब्रुवारी २२, इ.स. २००९) एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते. मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांना त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून या नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ रूपे सादर करायचे. त्यामुळे लोक त्यांना वऱ्हाडकर म्हणायचे.

लक्षमण देशपांडे लहानप गणपती उत्सवात होणाऱ्या मेळा नावाच्या करमणुकीच्या कार्यक्रमांत भाग घेत. तेथेच त्यांच्यातील कलावंताची जडणघडण झाली. घरची परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी एम.ए. व त्यानंतर एमडी (मास्टर इन ड्रॅमॅटिक्‍स)चे शिक्षण घेतले. मौलाना आझाद, सरस्वती भुवन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यावर १९८० साली ते औरंगाबाद विद्यापीठात शाखाप्रमुख म्हणून कार्यरत झाले. याच दरम्यान त्यांनी 'वऱ्हाड निघालंंय लंडनला'ची निर्मिती केली. या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारोंच्या संख्येने लोक प्रयोगांना हजर रहात. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवेत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया येथेही वऱ्हाडचे प्रयोग झाले. एकाच व्यक्तीने ५२ व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम केल्याबद्दल डॉ. देशपांडे यांची २००४मध्ये गिनीज बुकातही नोंद झाली. रेशमगाठी, पैंजण या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले. याशिवाय त्यांनी द्विपात्री 'नटसम्राट' या नाटकातही काम केले. इ.स. २०००मध्ये वऱ्हाडकारांनी औरंगाबाद विद्यापीठातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. याच वर्षी त्यांची परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

लॉरा मार्श

लॉरा अलेक्झांड्रा मार्श (डिसेंबर ५, इ.स. १९८६:पेंबुरी, केंट, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.

वर्नर हायझेनबर्ग

वर्नर कार्ल हायझेनबर्ग (डिसेंबर ५, इ.स. १९०१ - फेब्रुवारी १, इ.स. १९७६) हे जर्मनीचे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान केले. १९२७ मध्ये त्यांनी अनिश्चिततेचे तत्त्व मांडले.

वसंतराव नाईक

वसंतराव नाईक (०१ जुलै. १९१३:पुसद, यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र - इ.स. १८ ऑगस्ट १९७९) हे मराठी राजकारणी होते. डिसेंबर ५, इ.स. १९६३ ते फेब्रुवारी २०, इ.स. १९७५ कालखंडादरम्यान ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. (१ जुलै १९१३ - १८ ऑगस्ट १९७९) महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व एक कृषितज्ञ. त्यानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राज्यभार सांभाळला. वसंतराव नाईककांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्याश्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषविले होते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होते. हरित क्रांतीचे प्रणेते अशी त्यांची ओळख होती.

नाईक कुटुंब:

नाईकांचे मूळ आडनाव राठोड असे होते; परंतु गहुली हे खेडे चतुरसिंग राठोड यांनी वसविले होते. त्यांनी जमीनजुमला जमा करून आपल्या समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. साहजिकच ते वंजारी समाजाचे नाईक म्हणजे पुढारी झाले. त्यावरून पुढे त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंगाचा मुलगा फुलसिंग हा पुढे या समाजाचा नाईक झाला. त्यांच्या पत्नी होनूबाई यांना दोन मुले झाली, राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले व वसंतराव नाईक म्हणून ओळखले गेले.

शिक्षण:

वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०).

विद्यार्थिदशेत त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले व डेल कार्नेगी या दोहोंच्या विचारांची छाप पडली होती. तसेच महाविद्यालयात असताना त्यांचा स्नेह नागपूरमधील घाटे या प्रसिद्ध ब्राह्मण कुटुंबाशी जडला. या स्नेहातुनच पुढे त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह वत्सलाबाई यांच्याशी झाला (१९४१). या विवाहामुळे विदर्भात थोडी खळबळ उडाली व उभयतांना काही वर्षे आपापल्या घरांपासून अलिप्त राहणे अपरिहार्य झाले; पण वसंतरावांनी पूर्ण विचारान्ती हे लग्न केले होते. त्यांची वकिलीही ठीक चालली होती. वत्सलाबाई बी.ए. असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत. त्यांची दोन्ही मुले निरंजन व अविनाश असून दोघेही सुविद्य आहेत.

कार्य:

वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला व आर्थिक स्थितीही सुधारली तसेच त्यांची हळूहळू प्रतिष्ठाही वाढली. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). यांशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (डिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली (१९५१–५२). ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.

प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत असत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय वसंतरावांकडेच जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली आणि मार्च १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले.

मृत्यू:

वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले. पुढे त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हेसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९७० च्या दशकात मुंबईतील कम्युनिस्ट-नेतृत्वात कामगार संघटनांचे प्रतिउत्तर म्हणून शिवसेना उभी करण्याच्या त्यांच्या धोरणाला अनेक पत्रकार आणि राजकीय अभ्यासाचे तज्ज्ञ, उजवे विचार पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उदयाचे श्रेय देतात.

हुसेन शाहीद सुर्‍हावर्दी

हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी (बंगाली: হোসেন শহীদ সোহ্‌রাওয়ার্দী ; उर्दू: حسین شہید سہروردی ; रोमन लिपी: Huseyn Shaheed Suhrawardy) (सप्टेंबर ८, इ.स. १८९२ - डिसेंबर ५, इ.स. १९६३) हा भूतपूर्व ब्रिटिश भारतातील व त्यानंतरच्या पूर्व पाकिस्तानातील राजकारणी व इ.स. १९५६ ते इ.स. १९५७ या काळात पाकिस्तानाचा पाचवा पंतप्रधान होता.

मौलाना अब्दुल हमीदखान भसानी याने स्थापलेल्या पूर्व पाकिस्तान अवामी मुस्लिम लीग या पक्षात सुर्‍हावर्दी सामील झाला. मौलाना भसानी याच्या हयातीनंतर सुर्‍हावर्दीने पक्षनेतृत्वाची धुरा सांभाळली. पुढील काळात अवामी लीग असे नामांतर झालेला हा पक्ष मुस्लिम लीग पक्षाविरुद्ध पाकिस्तानात उभा राहिलेला पहिला प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष ठरला.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.