ट्युनिसिया


ट्युनिसिया हा उत्तर आफ्रिकेतील भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावरील एक देश आहे. माघरेब भागात वसलेल्या व उत्तर आफ्रिकेमध्ये आकाराने सर्वात लहान असलेल्या ट्युनिसियाच्या पश्चिमेला अल्जीरिया, आग्नेयेला लिबिया व उत्तर आणि पूर्वेला भूमध्य समुद्र आहे. ट्युनिसियाचा ४०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे. ट्युनिस ही ट्युनिसियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

प्रागैतिहसिक काळात ह्या भागावर रोमनांची सत्ता होती. रोमन साम्राज्याने इ.स. पूर्व १४९ साली जवळजवळ सर्व भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला होता. सातव्या शतकादरम्यान माघरेबवर अरब मुस्लिम लोकांनी कब्जा मिळवला. येथील कैरूवान हे उत्तर आफ्रिकेमधील पहिले इस्लामिक शहर होते. १५३४ साली ओस्मानी साम्राज्याने सर्वप्रथम ट्युनिसियावर अधिपत्य मिळवले. पुढील ३०० हून अधिक वर्षे ओस्मानी साम्राज्याचा भाग राहिल्यानंतर १८८१ साली फ्रान्सने ट्युनिसियावर आक्रमण करून येथे आपले मांडलिक राज्य स्थापन केले.

१९५६ साली ट्युनिसियाला स्वातंत्र्य मिळाले. हबीब बुरग्विबा हा ट्युनिशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. २०११ साली ट्युनिसियन जनतेने केलेल्या क्रांतीदरम्यान भ्रष्ट व लाचखोर राष्ट्राध्यक्ष झिने एल अबिदिन बेन अली ह्याची सत्ता उलथवून टाकली गेली व ट्युनिसियामध्ये लोकशाहीवादी सरकार स्थापन झाले.

ट्युनिसिया
الجمهوريةالتونسية
République tunisienne
ट्युनिसियाचे प्रजासत्ताक
ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: حرية، نظام، عدالة
"स्वतंत्रता, सुव्यवस्था, न्याय"[१]
राष्ट्रगीत: हुमत अल-हिमा
ट्युनिसियाचे स्थान
ट्युनिसियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ट्युनिस
अधिकृत भाषा अरबी, फ्रेंच
सरकार
 - राष्ट्रप्रमुख मोन्सेफ मार्झूकी
महत्त्वपूर्ण घटना
 - हुसेन घराणे १५ जुलै १७०५ 
 - फ्रान्सपासून स्वातंत्र्य २० मार्च १९५६ 
 - प्रजासत्ताक २५ जुलै १९५७ 
 - ट्युनिसियन क्रांती १४ जानेवारी २०११ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,६३,६१० किमी (९३वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १,०७,३२,९०० (७७वा क्रमांक)
 - घनता ६३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १००.९७९ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ९,४७७ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०१०) ०.७१२ (उच्च) (९४ वा)
राष्ट्रीय चलन ट्युनिसियन दिनार
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ TN
आंतरजाल प्रत्यय .tn
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २१६
राष्ट्र_नकाशा

इतिहास

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

मोठी शहरे

समाजव्यवस्था

संस्कृती

वाहतूक

ट्युनिसएअर एक्सप्रेस ही कंपनी ट्युनिसियामध्ये विमान वाहतूक पुरवते.

खेळ

संदर्भ

  1. ^ "Tunisia Constitution, Article 4". 1957-07-25. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 2006-04-06 रोजी मिळविली). 2009-12-23 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

अरबी भाषा

अरबी भाषा (रोमन लिपी: Arabic ; स्थानिक अरबी: العربية (उच्चारः अल् अरबीयाह् ); अरबी: عربي) ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. अरब लोकांवरुन ह्या भाषेचे नाव अरबी असे पडले.अरबी भाषेस पवित्र भाषा असे मानण्यात आले आहे, इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण हा ह्याच भाषेत आहे, तसेच इस्लाम धर्माचे संस्थापक,प्रेषित मुहम्मद पैगंबर ह्यांची बोलीभाषा अरबी होती.

सध्या जगातील एकूण २९ कोटी लोक अरबी भाषा वापरतात.

अल्जीरिया फुटबॉल संघ

अल्जीरिया फुटबॉल संघ (अरबी: منتخب الجزائر لكرة القدم) हा आफ्रिका खंडामधील अल्जीरिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. अल्जीरिया आजवर ३ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला असून त्याला प्रत्येक वेळी पहिल्या फेरीतच पराभूत व्हावे लागले आहे. अल्जीरियाने १९९० साली आफ्रिकन देशांचा चषक जिंकला होता.

आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक

एका देशातून दुसऱ्या देशातील बतार(लॅन्डलाइन)टेलिफोनवर फोन करायचा असेल तर, त्या विदेशी स्थानिक दूरध्वनी क्रमांकाच्या अगोदर एक संकेतांक जोडावा लागतो. त्या संकेतांकांची ही यादी :

१ – युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)२० – इजिप्त

२१० – वापरात नाही

२११ – वापरात नाही

२१२ – मोरोक्को

२१३ – अल्जीरिया

२१४ – वापरात नाही

२१५ – वापरात नाही

२१६ – ट्युनिसिया

२१७ – वापरात नाही

२१८ – लिबिया

२१९ – वापरात नाही

२२० – गांबिया

२२१ – सेनेगल

२२२ – मॉरिटानिया

२२३ – माली

२२४ – गिनी

२२५ – कोत द'ईवोआर

२२६ – बर्किना फासो

२२७ – नायजर

२२८ – टोगो

२२९ – बेनिन

२३० – मॉरिशस

२३१ – लायबेरिया

२३२ – सियेरा लिऑन

२३३ – घाना

२३४ – नायजेरिया

२३५ – चाड

२३६ – मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक

२३७ – कॅमेरून

२३८ – केप व्हर्दे

२३९ – साओ टोमे व प्रिन्सिप

२४० – इक्वेटोरियल गिनी

२४१ – गॅबन

२४२ – काँगो

२४३ – काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक

२४४ – अँगोला

२४५ – गिनी-बिसाऊ

२४६ – दियेगो गार्शिया

२४७ – ॲसेन्शन द्वीपसमूह

२४८ – सेशेल्स

२४९ – सुदान

२५० – रवांडा

२५१ – इथियोपिया

२५२ – सोमालिया (सोमालीलँड)

२५३ – जिबूती

२५४ – केनिया

२५५ – टांझानिया

२५६ – युगांडा

२५७ – बुरुंडी

२५८ – मोझांबिक

२५९ – झांझिबार - वापरला गेला नाही. पहा - टांझानिया

२६० – झांबिया

२६१ – मादागास्कर

२६२ – रेयूनियों

२६३ – झिंबाब्वे

२६४ – नामिबिया

२६५ – मलावी

२६६ – लेसोथो

२६७ – बोटस्वाना

२६८ – स्वाझीलँड

२६९ – कोमोरोस and मायोत

२७ – दक्षिण आफ्रिका

२८x – वापरात नाही

२९० – सेंट हेलेना

२९१ – एरिट्रिया

२९२ – वापरात नाही

२९३ – वापरात नाही

२९४ – वापरात नाही

२९५ – वापरात नाही (सान मरिनोला देण्यात आला होता, +३७८ पहा)

२९६ – वापरात नाही

२९७ – अरूबा

२९८ – फेरो द्वीपसमूह

२९९ – ग्रीनलँड

४० – रोमेनिया

४१ – स्वित्झर्लंड

४२ – आधीचा चेकोस्लोव्हाकिया

४२० – चेक प्रजासत्ताक

४२१ – स्लोव्हाकिया

४२२ – वापरात नाही

४२३ – लिश्टनस्टाइन

४२४ – वापरात नाही

४२५ – वापरात नाही

४२६ – वापरात नाही

४२७ – वापरात नाही

४२८ – वापरात नाही

४२९ – वापरात नाही

४३ – ऑस्ट्रिया

४४ – युनायटेड किंग्डम

४५ – डेन्मार्क

४६ – स्वीडन

४७ – नॉर्वे

४८ – पोलंड

४९ – जर्मनी९० – तुर्कस्तान

९१ – भारत

९२ – पाकिस्तान

९३ – अफगाणिस्तान

९४ – श्रीलंका

९५ – ब्रह्मदेश (म्यानमार)

९६० – मालदीव

९६१ – लेबनॉन

९६२ – जॉर्डन

९६३ – सीरिया

९६४ – इराक

९६५ – कुवेत

९६६ – सौदी अरेबिया

९६७ – येमेन

९६८ – ओमान

९६९ – used to be People's Democratic Republic of Yemen - now unified under 967 येमेन (formerly the Yemen Arab Republic)

९७० – reserved for the Palestinian Authority

९७१ – संयुक्त अरब अमिराती

९७२ – इस्रायल

९७३ – बहारीन

९७४ – कतार

९७५ – भूतान

९७६ – मंगोलिया

९७७ – नेपाळ

९७८ – वापरात नाही - मुळात दुबईकरिता, आता ९७१ वापरला जातो

९७९ – International Premium Rate Service - originally assigned to Abu Dhabi, now covered under 971

९८ – इराण

९९० – वापरात नाही

९९१ – International Telecommunications Public Correspondence Service trial (ITPCS)

९९२ – ताजिकिस्तान

९९३ – तुर्कमेनिस्तान

९९४ – अझरबैजान

९९५ – जॉर्जिया

९९६ – किर्गिझस्तान

९९७ – वापरात नाही

९९८ – उझबेकिस्तान

९९९ – वापरात नाही

आफ्रिकन देशांचा चषक

आफ्रिकन देशांचा चषक (फ्रेंच: Coupe d'Afrique des Nations) ही आफ्रिकन फुटबॉल मंडळाद्वारे आयोजित केली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्यातील विजेत्याला आफ्रिकाचा विजेता हे पद मिळते तसेच फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेत आपोआप आमंत्रण मिळते.

इ.स. १९५७ साली ही स्पर्धा पहिल्यांदा खेळवली गेली व १९६८ पासून दर दोन वर्षांनी खेळवली जात आहे. इजिप्तने आजवर आफ्रिकन देशांचा चषक सर्वाधिक वेळा (७ वेळा) जिंकला आहे.

उत्तर आफ्रिका

उत्तर आफ्रिका हा आफ्रिका खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. उत्तर आफ्रिकेचा बराचसा भाग सहारा वाळवंटाने व्यापलेला आहे. उत्तर आफ्रिकेत खालील देशांचा समावेश होतो.

ऑलिंपिक खेळात ट्युनिसिया

ट्युनिसिया देश १९६० सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक (१९८० चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण ७ पदके जिंकली आहेत. ह्यांपैकी ४ पदके अ‍ॅथलेटिक्समध्ये, २ बॉक्सिंगमध्ये तर उर्वरित पदक जलतरणात मिळाले आहे.

ऑलिंपिक खेळात नेदरलँड्स

ऑलिंपिक खेळात नेदरलँड्सने १९००च्या उन्हाळी खेळांपासून भाग घेतला आहे. त्यानंतर १९०४चे सेंट लुइस येथील खेळ आणि १९५६चे मेलबोर्नमधील खेळ यांशिवाय नेदरलँड्सने सगळ्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

ऑलिंपिक खेळात स्पेन

स्पेन देश १९०० सालापासून बहुतेक सर्व उन्हाळी व सर्व हिवाळी स्पर्धांमध्ये (१९७६ चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर ११५ पदके जिंकली आहेत.

ट्युनिस

ट्युनिस ही ट्युनिसिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

ट्युनिसियन दिनार

दिनार हे ट्युनिसियाचे अधिकृत चलन आहे.

ट्युनिसिया फुटबॉल संघ

ट्युनिसिया फुटबॉल संघ (अरबी: منتخب تونس لكرة القدم‎; फिफा संकेत: TUN) हा उत्तर आफ्रिकामधील ट्युनिसिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला ट्युनिसिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ४८व्या स्थानावर आहे. आजवर ट्युनिसिया १९७८, १९९८, २००२ व २००६ ह्या चार फिफा विश्वचषक तसेच २००५ सालच्या फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे. ट्युनिसियाने २००४ सालचा आफ्रिकन देशांचा चषक जिंकला होता.

भूमध्य समुद्र

भूमध्य समुद्र हा अटलांटिक महासागराचा एक भाग व पृथ्वीवरील एक प्रमुख समुद्र आहे. हा समुद्र चारही बाजूंनी जमिनीने वेढला गेला असून त्याच्या उत्तरेस युरोप व अनातोलिया तर दक्षिणेस आफ्रिका खंड आहेत. भूमध्य समुद्र पश्चिमेला जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने अटलांटिक महासागरासोबत जोडला गेला आहे. डार्डेनेल्झ व बोस्फोरस ह्या सामुद्रधुन्या भूमध्य समुद्राला मार्माराच्या समुद्रासोबत व काळ्या समुद्रासोबत जोडतात. तसेच इजिप्तमधील सुएझ कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्रासोबत जोडतो.

तांत्रिक दृष्ट्या अटलांटिक महासागराचाच एक भाग असला तरी बरेचदा भूमध्य समुद्र एक वेगळा पाण्याचा साठा समजला जातो. २५ लाख चौरस किमी इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ असलेल्या भूमध्य समुद्राची सरासरी खोली १,५०० मी तर कमाल खोली ५,२६७ मी इतकी आहे.

मध्य युरोपीय प्रमाणवेळ

मध्य युरोपीय प्रमाणवेळ ही युरोपाच्या मध्य भागातील देशांमध्ये वापरली जाणारी प्रमाणवेळ आहे. ती जागतिक प्रमाणवेळेपेक्षा १ तास पुढे आहे. मध्य युरोपीय प्रमाणवेळ पाळणारे युरोपीय देश उन्हाळ्यात वाढलेल्या दिनमानाशी जुळवून घेण्यासाठी यूटीसी +२ असलेली मध्य युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ पाळतात.

लीबिया

लिबिया (संपूर्ण नावः الجماهيرية العربية الليبية الشعبية الإشتراكية العظمى; समाजवादी जनतेचे भव्य लिबियन अरब जमाहिरिया) हा उत्तर आफ्रिका खंडातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील एक देश आहे. लिबियाच्या पूर्वेला इजिप्त, पश्चिमेला ट्युनिसिया व अल्जीरिया, दक्षिणेला चाड व नायजर तर आग्नेय दिशेला सुदान हे देश आहेत. लिबियाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र आहे. त्रिपोली ही लिबियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

सुमारे १८ लाख क्षेत्रफळ असलेला लिबिया हा आफ्रिकेतील चौथा मोठा तर जगातील १७व्या क्रमांकाचा देश आहे व येथील लोकसंख्या अंदाजे ६४.२ लाख आहे. ह्यापैकी बहुसंख्य लोक देशाच्या उत्तर भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्याजवळ वसले आहेत तर सहारा वाळवंट असलेल्या दक्षिण भागात अत्यंत तुरळक वस्ती आहे. लिबियातील बहुतांशी जनता अरब वंशाची आहे

मोठ्या प्रमाणावर असलेल्या खनिज तेलाच्या साठ्यांमुळे हा देश आर्थिक दृष्ट्या बळकट आहे. लिबियाची अर्थव्यवस्था आफ्रिका खंडामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे तर मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत लिबिया आफ्रिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.सोळाव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत लिबियावर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती तर १९११ ते १९५१ दरम्यान लिबिया ही इटली देशाची एक वसाहत होती. १९६९ सालापासून मुअम्मर अल-गद्दाफी हा लिबियाचा राष्ट्रप्रमुख व सर्वेसर्वा आहे.

१९७६ उन्हाळी ऑलिंपिक

१९७६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची एकविसावी आवृत्ती कॅनडा देशाच्या माँत्रियाल शहरामध्ये जुलै १७ ते ऑगस्ट १ दरम्यान खेळवली गेली. कॅनडा देशाने आयोजीत केलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.

ह्या स्पर्धेच्या खर्चामुळे यजमान माँत्रियाल शहर मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाले. हे कर्ज पूर्णपणे फेडण्यासाठी त्यांना पुढील ३० वर्षे लागली.

२००८ उन्हाळी ऑलिंपिक

२००८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची २९वी आवृत्ती चीनमधील बीजिंग शहरात ऑगस्ट ८ ते ऑगस्ट २४ दरम्यान खेळवण्यात आली.

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फेन्सिंग

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फेन्सिंगची स्पर्धा ६ ते १४ ऑगस्ट दरम्यान रियो दि जानेरो. या स्पर्धेतील १० प्रकारांमध्ये सुमारे २१२ स्पर्धकांनी भाग घेतला.

आफ्रिकेतील देश व संस्थाने

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.