ज्ञानकोश

ज्ञानकोश हे एक संदर्भसाधन आहे. हा कोशसाहित्याचा एक प्रकार आहे. ज्ञानकोशाच्या धोरणानुसार त्यात संबंधित विषयाची माहिती लहान, मध्यम किंवा मोठ्या लेखांच्या स्वरूपात देण्यात येते. ही माहिती संक्षिप्त स्वरूपात, साधार व वस्तुनिष्ठपणे मांडलेली तसेच ती शक्य तितकी अद्ययावत असावी असा संकेत आहे.

ज्ञानकोशातील अशा तऱ्हेने माहिती देणाऱ्या लेखाला नोंद अशी संज्ञा आहे. ज्ञानकोश हा अशा नोंदींचा संग्रह असतो. मात्र ह्या नोंदींच्या संग्रहाला विशिष्ट रचना असणे आवश्यक असते. ज्ञानकोशातील नोंदी विशिष्ट तार्किक क्रमाने लावण्यात येतात. हा क्रम विषयानुसार, कालक्रमानुसार, नोंदींच्या शीर्षकांनुसार अकारविल्हे इ. विविध प्रकारचा असू शकतो. परस्परांशी संबंध असलेल्या नोंदींतील संबंध दाखवण्याची काही एक योजना ज्ञानकोशाच्या रचनेत सामान्यतः केलेली असते. त्यामुळे एका नोंदीचा दुसऱ्या नोंदीशी असलेला संबंध स्पष्ट होणे सुकर होते. एखाद्या विषयाची तोंडओळख करून घ्यायला ज्ञानकोश हे उत्तम साधन आहे.

मराठी भाषेतील ज्ञानकोशरचनेची परंपरा ही प्रामुख्याने एकोणिसाव्या शतकात सुरू झालेली दिसते.

Brockhaus Lexikon
Brockhaus Konversations-Lexicon, 1902

ज्ञानकोश ह्या संज्ञेचा मराठीतील वापर

ज्ञानकोश ही मराठी संज्ञा सामान्यतः एन्साय्क्लोपीडिया   (इंग्लिश: encyclopedia, encyclopaedia;) ह्या इंग्रजी संज्ञेचा पर्याय म्हणून वापरण्यात येते. ज्ञानकोश ह्या अर्थाने मराठीत विश्वकोश, महाकोश[१], माहितीकोश अशा संज्ञाही वापरण्यात येतात. उदा. मराठी विश्वकोश किंवा कुमार विश्वकोश, मराठी तत्त्वज्ञान महाकोश तसेच वस्त्रनिर्मिती माहितीकोश इ.

ज्ञानकोशाचे स्वरूप

ज्ञानकोश म्हणजे ज्ञानाच्या सर्व शाखा किंवा एखाद्या विशिष्ट शाखेची बहुव्यापक माहिती लिहिलेला बहुसमावेशक सारग्रंथ (compendium) होय. ज्ञानकोश हा सर्वसाधारण स्वरूपाचा किंवा विषयविशिष्ट अशा दोन्ही तऱ्हेचा असू शकतो. सर्वसाधारण ज्ञानकोशात त्याच्या रचनेच्या हेतूनुसार विविध विषयांवरील माहिती दिलेली असते तर विषयविशिष्ट ज्ञानकोशात एखाद्या विशिष्ट विषयातील विविध अंगांविषयीची माहिती दिलेली असते. ज्ञानकोशाच्या व्याप्तीनुसार आणि त्यातील लेखांची संख्या ठरते आणि ही संख्या व नोंदींचे आकारमान ह्यांनुसार ज्ञानकोश लहान वा मोठा असू शकतो. मोठे ज्ञानकोश अनेकदा विविध खंडांत विभागण्यात येतात. ही खंडांतील विभागणी विषयानुसार किंवा इतर निकषांनुसार करण्यात येते. मुद्रित स्वरूपाच्या ज्ञानकोशांत नोंदींची मांडणी अकारविल्हे करण्याची प्रथा असल्याने त्यांची खंडांतील विभागणी त्यांच्या नोंदींच्या पृष्ठसंख्येचा विचार करून आद्याक्षरांनुसार करण्यात येते असे आढळते.

विहंगमावलोकन

शब्दकोशाची व्याप्ती भाषेतील शब्द, त्यांचे अर्थ, उच्चार आणि व्याकरण देण्यापुरतीच मर्यादित असते. शब्दकोशात अर्थ स्पष्ट करण्यासाठी प्रसंगी चित्रे आणि क्वचित नकाशेही असतात. पण कोणत्याही प्रकारची सखोल माहिती नसते. याउलट, ज्ञानकोश ज्ञानशाखेतील विविध संज्ञांची तपशीलवार माहिती देत असतो. आणखी त्यापलीकडे जाऊन, या माहितीचे विश्लेषण करणे, ज्ञानशाखांशी असलेली विस्तृत पार्श्वभूमी विशद करणे, आणि संदर्भ उपलब्ध करून देणे ही कामेही ज्ञानकोश करतो.

अनेक ज्ञानकोशांत चित्रे, नकाशे, आराखडे, आधारभूत पुस्तकांचे संदर्भ आणि सांख्यिकीय माहिती असते. सामन्यतः सुशिक्षित, माहिती-विशेषज्ञ अशा तज्ज्ञांच्या संशोधनाने आणि मार्गदर्शनाखाली ज्ञानकोशांची निर्मिती होत असते.

ज्याला एखाद्या विषयाची संक्षिप्त आणि विश्वासार्ह माहिती हवी असेल असा माणूस कधी ना कधी ज्ञानकोशाची पाने चाळतो. अशा ज्ञानकोशांत साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरुद्ध मते असल्यास, त्यांच्यासह), शक्य तिथे संदर्भ असलेली, वस्तुनिष्ठ आणि तटस्थपणे दिलेली माहिती मिळ्ते.

इथे वाचकांना भाषेचे सौंदर्य अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोन: आम्ही ज्ञानकोश मोजक्या तथ्यांसाठी आणि आकडेवारीसाठी वाचतो. येथे आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित मिळावीत. पण आमचे मन आणि विचार प्रभावित करण्याकरिता ज्ञानकोशांतील लेखकांचे मत त्यात मिसळू नका असा असतो. कोशांतील लेख वाचून वाचक आपले मत बनवतो.


सारे विश्वकोश, विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता केवळ वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात. त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा असलेले, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा देणारे, इत्यादी ललित लेखन किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन विश्वकोशात नसते..

ज्ञानकोशांची वर्गवारी विषय, व्याप्ती, संकलनाची आणि मांडणीची पद्धत, उत्पादन किंवा उपलब्धतेच्या पद्धतीनुसार करता येते .ज्ञानकोशब्रिटानिका ज्ञानकोशाप्रमाणे सामान्य ज्ञान किंवा विशिष्ट विषयांना वाहून घेतलेले असू शकतात. शब्दकोशांशी जोडलेले असू शकतात किंवा ते भौगोलिक स्वरूपाच्या दर्शनिका(गॅझेटियर) असू शकतात. ज्ञानकोशातील विवरण पद्धतशीर असते. विषयांचा अनुक्रम बर्‍याचदा मुळाक्षरांनुसार किंवा विषय-सुसंगत असतो.

ज्ञानकोशाची मांडणी व आधुनिक तंत्रविद्या

आधुनिक संगणक, इंटरनेट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे ज्ञानकोशांच्या मांडणीत आमूलाग्र बदल घडत आहेत. अनुक्रम लावणे, शोधयंत्राचा सुलभ वापर करणे, परस्परसंदर्भ देणे अशा गोष्टी सुकर झाल्या आहेत. माहितीचे संकलन, पडताळणी, संक्षिप्तीकरण, सादरीकरण यात महत्त्वपूर्ण बदल घडत असून विकिपीडिया, इत्यादीं गोष्टी, या सुधारणांनी कायकाय शक्य आहे हे सांगणारी ज्वलंत उदाहरणे आहेत. काही ज्ञानकोशांची सीडी मिळते किंवा काही ज्ञानकोश आंतरजालावर वाचायला किंवा उतरवून घ्यायला उपलब्ध असतात.

ज्ञानकोशांचा इतिहास

ज्ञानकोश किंवा त्या अर्थाच्या इतर संज्ञा जरी आधुनिक काळातील असल्या तरी त्यांच्या अर्थाशी नाते सांगणारे साहित्य विविध देशांत आणि तेथील संस्कृतींत पूर्वीपासून आढळणे शक्य आहे. त्यामुळेच ज्ञानकोशांचे सध्याचे स्वरूप हे जरी एकोणिसाव्या शतकातील युरोपीय ज्ञानकोशाच्या प्रभावातून साकारलेले असले तरी जगभरात तसेच भारतात त्यापूर्वीच्या काळात निर्माण झालेल्या ज्ञानकोशसदृश अशा साहित्याची उदाहरणे दाखवून देता येणे शक्य आहे.

भारतीय

इ.स. च्या १२व्या शतकात, भारतातील एक राजा सोमेश्वराने 'अभिलाषितार्थ चिंतामणी' हा सुमारे शंभर प्रकरणे असलेला ज्ञानकोष लिहवून घेतला.हा जगातील प्रथम विश्वकोश म्हणून मानला जाते.

मराठीतील ज्ञानकोशरचनेची परंपरा

मराठी भाषेतील ज्ञानकोशरचनेचा पहिला प्रयत्न म्हणून रामाजी केशव सांबारे ह्यांच्या 'विद्याकल्पतरू : मराठी एन्सायक्लोपीडिया म्हणजे मराठी भाषेचा विद्यासंग्रह' ह्याचा निर्देश करावा लागतो. १ एप्रिल १८६८ ते मार्च १८७३ ह्या कालावधीत ह्याचे एकूण ३५ अंक मासिक म्हणून प्रकाशित झाले. उ ह्या अक्षरापर्यंतच्या नोंदींची ५६० पृष्ठे मुद्रित झाली. [२] [३] त्यानंतर १८७८मध्ये जनार्दन हरी आठल्ये ह्यांनी 'विद्यामाला' ह्या नावाने मासिक स्वरूपात ज्ञानकोशप्रकाशनाचा प्रयत्न केला पण २०० पृष्ठे छापून झाल्यावर हे काम बंद पडले. हे दोन्ही प्रयत्न पूर्णत्वाला गेले नाहीत.

१९०६मधील मराठी साहित्यसंमेलनातल्या आपल्या भाषणात विष्णु गोविंद विजापूरकर ह्यांनी मराठीत 'विश्वकोश' निर्माण व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आढळते.[१]

महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा मराठीतील ज्ञानकोशरचनेचा हा पहिला यशस्वी प्रयत्न होता.. १९१५ ते १९२७ ह्या काळात डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर आणि त्यांचे सहकारी ह्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे काम हाती घेऊन पूर्ण केले. ह्या ज्ञानकोशाचे (५ प्रस्तावनाखंड, १६ कोशनोंदींचे खंड (शरीरखंड) तसेच सूचिखंड आणि पुरवणीखंड हे २ खंड धरून) एकूण २३ खंड १९२० ते १९२७ ह्या काळात प्रकाशित झाले. [४]

आणखी पहा

कोश,मुक्त ज्ञानकोश,विकिपीडिया

  • वर्ग:मराठी भाषेतील ज्ञानकोश

बाह्य दुवे

साचा:Wiktionary

ऑनलाईन मराठी ज्ञानकोश

ऑनलाइन ज्ञानकोश

संदर्भ

  1. a b देव २००२, पान. ४८.
  2. ^ कुलकर्णी २००७, पान. १३०.
  3. ^ खानोलकर २००७, पान. १८३.
  4. ^ कुलकर्णी २००७, पान. सत्तावीस.

संदर्भसूची

  • कुलकर्णी, वसंत विष्णु (२००७). मराठी कोश व संदर्भसाधने यांची समग्र सूची (इ. स. १८०० – २००३). मुंबई: राज्य मराठी विकास संस्था.
  • खानोलकर, गंगाधर देवराव (१९६९). "मराठींत ज्ञानकोश रचण्याचा पहिला प्रयत्न : 'विद्याकल्पतरू'". मराठी संशोधन-पत्रिका (मुंबई: मराठी संशोधन-मंडळ) (एप्रिल १९६९ : वर्ष १६ : अंक ३).
  • देव, सदाशिव (२००२). कोशवाङ्मय : विचार आणि व्यवहार. पुणे: सुपर्ण प्रकाशन.
  • विजापूरकर, विष्णु गोविंद (१९६३). देशपांडे, मु, गो., ed. प्रो. विजापूरकर यांचे लेख. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन.
एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका

एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका (इंग्लिश : Encyclopædia Britannica लॅटिन "ब्रिटिश ज्ञानकोश") हा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, इन्कॉ. कंपनीतर्फे प्रकाशित केला जाणारा इंग्लिश भाषेतील सामान्य ज्ञानाचा प्रसिद्ध ज्ञानकोश आहे. सुमारे १०० पूर्णवेळ संपादकांमार्फत आणि ४,४०० हून अधिक योगदात्यांमार्फत हा ज्ञानकोश लिहिला आणि सतत अद्ययावत केला जातो. इंग्रजी ज्ञानकोशांपैकी सर्वाधिक विद्वत्तापूर्ण अशी त्याची ख्याती आहे.अजूनही प्रकाशित होणाऱ्या इंग्रजी ज्ञानकोशांपैकी "ब्रिटानिका" सर्वांत जुना आहे. इ.स. १७६८ ते १७७१ या काळात स्कॉटलंडमधील एडिंबर्ग इथे तीन खंडांमध्ये सर्वप्रथम तो प्रकाशित झाला. दुसर्‍या आवृत्तीत खंडांची संख्या १० झाली; चौथ्या आवृत्तीपर्यंत (१८०१-१८०९) तो २० खंडांचा झाला होता. वाढत्या ख्यातीसोबत या ज्ञानकोशाला प्रसिद्ध विद्वानांचे योगदान मिळविता आले. नववी आवृत्ती (१८७५-१८८९) आणि अकरावी आवृत्ती (१९११) हे ज्ञानकोश विद्वत्ता आणि साहित्यिक शैलीबाबत मैलाचे दगड मानले जातात.१९३३ मध्ये "ब्रिटानिका"ने "सततच्या पुनरावलोकना"चा निर्णय घेतला. मार्च २०१२ मध्ये एन्साय्क्लोपीडिया ब्रिटानिका, इन्कॉ.ने जाहीर केले की, यापुढे ते छापील आवृत्त्या प्रसिद्ध न करता ऑनलाईन स्वरूपावर लक्ष केंद्रित करणार आहेत. बत्तीस खंडांमध्ये प्रसिद्ध झालेली २०१० ची आवृत्ती ब्रिटिश ज्ञानकोशाची अखेरची छापील आवृत्ती ठरली.

कोश

कोश म्हणजे विशिष्ट प्रकारे रचून उपलब्ध करून दिलेला माहितीचा साठा. कोश ह्या शब्दाचा मूळ अर्थ धनाचा साठा, संग्रह असा आहे.कोश म्हणजे एखाद्या चरित्र होय

गणेश रंगो भिडे

गणेश रंगो भिडे (जून ६, १९०९ - ?) हे मराठी लेखक, ज्ञानकोशकार होते. त्यांनी 'अभिनव मराठी ज्ञानकोश' नावाचा ज्ञानकोश रचला.

त्यांच्या जीवनावर प्रतिभा रानडे यांनी ’ज्ञानकोशकार गणेश रंगो भिडे’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.

गोविंद तळवलकर

गोविंद श्रीपाद तळवलकर (जन्म : डॊंबिवली, २२ जुलै, इ.स. १९२५; मृत्यू : ह्युस्टन (अमेरिका), २२ मार्च, इ.स. २०१७) हे इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक होते. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक होते.

तळवलकर हे लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक होते, तर महाराष्ट्र टाइम्सचे २७ वर्षे संपादक होते .

जानेवारी १५

जानेवारी १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५ वा किंवा लीप वर्षात १५ वा दिवस असतो.

नवनाथ कथासार

‘नवनाथ भक्तिसार’ या धुंडीसुत मालुकविविरचित प्रासादिक ग्रंथातील कथांचे सार

मच्छिंद्रनाथ

गोरखनाथ

गहिनीनाथ

जालिंदरनाथ

कानिफनाथ

भर्तरीनाथ

रेवणनाथ

नागनाथ

चरपटीनाथ

निघंटु

आयुर्वेदिक औषधांचा जुन्या काळातला औषधीकोश. यात वेगवेगळ्या औषधी कशा तयार कराव्या याची माहिती, प्रमाण, पद्धती इत्यादींचे वर्णन असते.

प्रश्नोपनिषद्‍

प्रश्नोपनिषद्‍ हे उपनिषदअथर्ववेदाच्या पिप्पलाद शाखेच्या 'ब्राह्मण' भागामध्ये येते. पिप्पलाद ऋषींनी सहा ऋषींच्या सहा प्रश्नांना दिलेली उत्तरे असे या उपनिषदाचे स्वरूप असल्याने याला प्रश्नोपनिषद्‍ असे ओळखले जाते. पहिला आणि शेवटचा प्रश्न सोडून इतर प्रश्न हे उपप्रश्नांचे समूह आहेत.

या उपनिषदाच्या सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे सहा ऋषी 'ब्रह्मण‌' च्या जिज्ञासेने पिप्पलादाकडे येतात. पिप्पलाद त्यांना एक वर्षभर तेथेच तपस्या करून नंतर प्रश्न विचारण्यास सांगतात. पिप्पलादाच्या प्रश्न विचारायला आलेल्या या सहा ऋषींची नावे अशी:

सुकेशा - भारद्वाज कुळातील एक ऋषी

सत्यकाम शिबीकुमार - ऋषी

सौर्यायणी - गर्ग कुळातील एक ऋषी

आश्वलायन कोसल देशाचा एक ऋषी

भार्गव विदर्भ निवासी असा एक ऋषी

कबन्धी कत्यऋषीचा प्रपौत्रया लेखाचा ज्ञानकोशीय विस्तार येथे करा. मराठी अर्थासहीत मूळग्रंथ मजकूरासाठी मराठी विकिस्रोत प्रकल्पाकडे जावे.आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: प्रश्नोपनिषद्‍ हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:प्रश्नोपनिषद्‍ येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.

मराठी विकिपीडिया

मराठी विकिपीडिया हा विकिपीडिया या मुक्त ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्पातील मराठी भाषेतला ज्ञानकोश आहे. मे १, इ.स. २००३ रोजी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाली. जुलै, इ.स. २०१६ मध्ये मराठी विकिपीडियाची लेखसंख्या ४२,००० च्यावर जाऊन पोचली. डिसेंबर २०१७ मध्ये मराठी विकिपीडियावर ५०,००० लेख पूर्ण झाले आहेत.

विकिपीडियाचे प्रशासक, प्रचालक यांचे मतानुसार विकिपीडियावर लेख लिहिताना त्यातील माहिती अचूकच पाहिजे असा हट्टाग्रह करुन उपयोग नाही. परिणामत: येथील मजकूर अचूकच असेल याची कोणतीही खात्री देता येऊ शकत नाही. तरी येथील माहितीचा वापर करताना त्या माहितीची अन्य काही ठिकाणांहून पडताळणी केलेली निश्चितच उपयोगी ठरेल.

मराठी विकिस्रोत

मराठी विकिस्रोत हा मराठी विकिपीडीयाचा बंधूपकल्प आणि एक विकी प्रकल्प आहे. हे आंतरजालावर असलेले मराठी मुक्त ग्रंथालय आहे. 'मराठी विकिस्रोत विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचा ग्रंथालय प्रकल्प आहे.

हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठानाद्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधुप्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचा आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. भारतीय लेखकांसाठी असलेल्या नियमाप्रमाणे लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. मरणोत्तर प्रकाशित साहित्य प्रथम प्रकाशनानंतर ६० वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते. येथे मराठी भाषेतील सर्व प्रताधिकार मुक्त साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.

यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण असते. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले दस्तएवज आणता येतात.

१००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असते.

मराठी विश्वकोश

मराठी विश्वकोश हा महाराष्ट्र शासन तयार करवून घेत असलेला आणि मुळात पुस्तकरूपात असलेला मराठी ज्ञानकोश आहे. तो आता डिजिटल झाला आहे. हा ज्ञानकोश आंतरजालावर ऑनलाइन व मोफत वाचता येतो.

मूळ २० छापील खंडांचे डिजिटायझेशन करून ते क्रमाक्रमाने आंतरजालावर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम २५ ऑक्टोबर २०११ पासून सुरू झाला. प्रकाशित झालेले २० खंड आंतरजालावर सीडॅकच्या सहकार्याने आले आहेत. मानव्य विद्या विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्व विषयाचे ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश कोणताही एक महत्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी संलग्न असतो .

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हा महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अधीन असलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी मराठी विश्वकोश कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी राज्यकारभारासंबंधी मूलभूत धोरण सूचित करणारी काही सूत्रे सांगितली. त्या सूत्रांनुसार मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृदधीसाठी राज्य शासनाने दिनांक 19 नोव्हेंबर 1960 रोजी कै. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. या मंडळाने जे अनेकविध उपक्रम सुरू केले, त्यांपैकी एक प्रमुख व वैशिष्टयपूर्ण उपक्रम म्हणजे मराठी विश्वकोशाची निर्मिती होय. दिनांक 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे विभाजन होऊन मराठी विश्वकोशाच्या संपादन व प्रकाशन कार्यार्थ महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या राज्यस्तरीय मंडळाची स्थापना करण्यात आली.

महाराष्ट्रीय ज्ञानकोश

महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा इ.स. १९२१ ते इ.स. १९२९ सालांदरम्यान २३ खंडांमध्ये प्रकाशित झालेला, श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संकलित, संपादित केलेला मराठी भाषेतील ज्ञानकोश आहे.

माधव मोडक

माधव दादाजी मोडक ऊर्फ बंधु माधव (जन्म : नोव्हेंबर ३, इ.स. १९२७; मृत्यू : ऑक्टोबर ७, इ.स. १९९७) हे मराठी लेखक होते. दलितांवरील साहित्यरचनेसाठी ते परिचित आहेत.

बंधु माधव यांनी अनुसूचित समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या "जनता' व "प्रबुद्ध भारत' या साप्ताहिकांतून प्रबोधनपर लिखाण केले. कलापथकाच्या माध्यमातून आणि कथासंग्रह, कादंबऱ्या या माध्यमांतून त्यांनी प्रबोधनाचे प्रभावी कार्य केले.

मार्च ३१

ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ३१ मार्च हा वर्षाचा ९० व्या दिवस आहे (लीप वर्षात ९१ अंशांचा). वर्ष संपेपर्यंत २७५ दिवस बाकी असतात. रविवार किंवा सोमवार (५७) पेक्षा मंगळवार, गुरुवार किंवा शनिवार (प्रत्येकी ४०० वर्षांमध्ये प्रत्येक ५८ वर्षांत) पडण्याची शक्यता अधिक आहे, आणि बुधवार किंवा शुक्रवार (५६) रोजी होण्याची शक्यता कमी आहे.

मुक्‍त ज्ञानकोश

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

येथील लेखनाचा परिघ ज्ञानकोशाचा असतो.मुक्‍त ज्ञानकोश वाचन, लेखन, संपादन,सुधारणा, बदल करण्याकरीता सर्वांना मुक्त असतात.मुक्त ज्ञानकोशातील लेखात सर्वसामान्य वाचक सुद्धा लेखनात सहभाग घेतात तसेच एकट्याने अथवा सहयोगी पद्धतीने लेखन केले जाते.

मुक्त ज्ञानकोश हा मुक्त सॉफ्टवेअरच्या तत्त्वावर आधारित असून ज्ञानावरील मालकी हक्क असू नये म्हणून त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. कोणीही वापरकर्ता तो संपादित करू शकतो.

लगोऱ्या

लगोऱ्या हा एक महाराष्ट्र व अन्य राज्यांमध्ये प्रचलित असलेला एक पारंपारिक खेळ आहे. लगोऱ्या, चेंडू एवढेच साहित्य, साधे सोपे नियम व छोटेसे मैदान हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे. खेळाचा उद्देश म्हणजे यात असलेल्या लगोऱ्या एकावर एक ठेवणे व त्या चेंडूने विस्कळीत करणे.

विकिपीडिया

विकिपीडिया ([२]) हा महाजालावरील एक मुक्‍त ज्ञानकोश आहे. महाजालावरील ह्या ज्ञानकोशात कुणालाही नव्याने लेख लिहिता येतो तसेच आधी लिहिलेल्या लेखाचे संपादन करता येते. विकी हे सॉफ्टवेयर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक देखील) आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्याचे निर्देश करणे आवश्यक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरित करताना ती मुक्त स्वरूपातच वितरित करणे आवश्यक असते.विकिमिडिया फाउंडेशन ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.

जिमी वेल्स आणि लॅरी सँगर ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवशी इंग्रजी भाषेत केली. आजघडीला जगातील विविध भाषांत ह्या ज्ञानकोशाच्या शाखा उपलब्ध आहेत. विविध भाषांचे भाषक आपापल्या भाषेतील ज्ञानकोशाच्या निर्मितीत सहभागी होऊ शकतात. मराठी विकिपीडिया हा ह्या ज्ञानकोशाची मराठी भाषेतील शाखा आहे. विकिपीडियाचा सर्वांनाच खूप फायदा होतो.

मराठी विकिपीडियावर (या पानानुसार)सध्या यात ५४,९७९ लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण तीन कोटींहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहीले गेले आहेत.

विकिपिडीयाची वैगुण्ये गृहित धरूनसुद्धा मुक्त सार्वत्रिक उपलब्धतेमुळे, विविध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणा ह्यांमुळे विकिपीडिया हा आज महाजालावरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे. मराठीतील विकिपिडीया इतर भाषांप्रमाणेच गूगल सारखी शोधयंत्रे वापरून शोधता येतो.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.