ज्ञान

अनुभव अथवा शिक्षणाद्वारे माहीत असलेल्या गोष्टींना व कौशल्यांना ज्ञान असे म्हणतात. यात वस्तुस्थिती, माहिती इ. चा समावेश होतो.

ज्ञानाचे विविध प्रकार पडतात.

अभिमन्यु

अभिमन्यू अर्जुन व सुभद्रेचा पुत्र होता. तो कृष्णाचा भाचा असून चक्रव्यूह भेदण्याचे अर्धवट ज्ञान त्याला आईच्या पोटात असतानाच मिळाले होते.

चक्रव्यूह भेदण्याचे असे ज्ञान असणाऱ्या केवळ ४ व्यक्ती होत्या त्यापैकी अभिमन्यू एक होता. त्याच्याशिवाय, अर्जुन ,कृष्ण व द्रोणाचार्य यांनाच चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान होते.

वयाने लहान पण अत्यंत शूर अशा अभिमन्यूला जयद्रथाने कपटाने मारले. उत्तरा ही विराट राजाची कन्या होती. अर्जुनाने बृहन्नडेच्या वेशात तिला नृत्य शिकविले होते.ती अभिमन्यूची पत्नी होती. व परीक्षित हा त्यांचा मुलगा.

महाभारत}}

अभियांत्रिकी

वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक व प्रत्यक्षातील ज्ञान मिळवण्याच्या व वापरण्याच्या कौशल्यांना, व्यवसायांना आणि शास्त्रांना अभियांत्रिकी असे म्हणतात. सामान्यपणे विज्ञानाच्या प्रत्यक्षातल्या उपयोगाला अभियांत्रिकी म्हटले जाते. बांधकामे, यंत्रे, उपकरणे, पदार्थ, प्रणाली व प्रक्रिया यांचे आराखडे व निर्मिती करणे ही अभियांत्रिकीची प्रमुख कार्य आहेत. यासाठी गणिताचा आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांसारख्या विविध विज्ञानांचा उपयोग होतो. यातील पदवीधरांना अभियंता असे म्हणतात.

प्रमुख अभियांत्रिकी शाखा पुढील प्रमाणे आहेत -

यांत्रिक अभियांत्रिकी

स्थापत्य अभियांत्रिकी

यंत्र अभियांत्रिकी

उत्पादन अभियांत्रिकी

विद्युत अभियांत्रिकी

अणुविद्युत अभियांत्रिकी

विद्युत संदेश व दूरसंपर्क अभियांत्रिकी

उपकरण अभियांत्रिकी

संगणक अभियांत्रिकी

संगणकशास्त्र अभियांत्रिकी

रसायन अभियांत्रिकी

जीवशास्त्र अभियांत्रिकी

पर्यावरण अभियांत्रिकी

आंबेडकर जयंती

आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती हा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस असून एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. भारतासह जगभरात हा उत्सव साजरा केला जातो. हा सामाजिक व सांस्कृतिक स्वरूपाचा सण आहे. भारतातील अनेक राज्यात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. या दिवशी आंबेडकरांना सर्व स्तरातील लोकांद्वारे अभिवादन केले जाते. आंबेडकरवादी बौद्ध लोक या दिनाला ‘समता दिन’ आणि ‘ज्ञान दिन’ म्हणूनही साजरा करतात, कारण बाबासाहेब आंबेडकरांना ‘समतेचे प्रतिक’ तसेच ‘ज्ञानाचे प्रतिक’ मानले जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या.बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी

महू (मध्य प्रदेश), दीक्षाभूमी, चैत्यभूमी, इतर संबंधित स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शहरे, गावे, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील ६५ पेक्षा अधिक देशांत आंबेडकर जयंती साजरी केली जाते.नवी दिल्ली, भारतीय संसदेमध्ये त्यांच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभापती, राज्यपाल, इतर मंत्री व सर्व राजकिय पक्षाचे राजकारणी आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करून त्यांना आदरांजली देतात. भारतीय बौद्ध धर्मीय बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला वा मर्तीला समोर ठेवून त्रिवार वंदन करतात. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, लोक संचालन करतात, ढोल वाजवून नृत्य करून आनंद व्यक्त करत मिरवणूक काढतात.

इंग्लिश भाषा

इंग्लंड देशात राहणार्‍या लोकांना इंग्रज म्हणतात, आणि त्यांच्या भाषेला इंग्रजी. संस्कृतमध्ये इंग्रजीला आंग्लभाषा म्हणत असल्याने मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये इंग्रजी भाषा ही आंग्लभाषा म्हणूनही ओळखली जाते. इंग्रजी भाषा (इंग्लिश) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील एक भाषा आहे. ही भाषा अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ह्या देशांमध्ये प्रमुख भाषा आहे. ( अमेरिकन संयुक्त संस्थानांमध्ये इंग्लिश प्रमुख भाषा असली तरी तिला राज्यघटना अथवा इतर कोणत्याही कायद्याद्वारे अधिकृत भाषेचा दर्जा नाही. कॅनडामध्ये इंग्लिश व फ्रेंच ह्या दोन अधिकृत भाषा आहेत.) कित्येक देशांची दुसरी भाषा व शासकीय भाषा आहे. जगभरात सर्वांत जास्त शिकवल्या जाणार्‍या व समजल्या जाणार्‍या भाषांत इंग्लिश भाषेची गणना होते.

३५ कोटी लोकांची इंग्रजी ही मातॄभाषा आहे तर जवळजवळ १५ कोटी लोकांची दुसरी भाषा. जगभरात सुमारे १०० कोटी लोक या भाषेत साक्षर आहेत. इंग्रजी ही विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, इंटरनेटसह अनेक विषयात अत्यंत समॄद्ध आहे.

इंग्लिश ही पश्चिम-जर्मेनिक भाषा आहे. अँग्लो-सॅक्सन कुळातील जुन्या इंग्लिश भाषेपासून इंग्लिश भाषेची उत्पत्ती झाली आहे. इंग्लिशची मुळे जर्मेनिक भाषांत आहे व व्याकरण जुन्या इंग्लिशचे आहे. ब्रिटिश साम्राज्यातून पसरलेल्या इंग्लिश भाषेला आंतरराष्ट्रीय महत्त्व अमेरिकेची संयुक्त संस्थाने महासत्ता झाल्यामुळे आले. जागतीकरणामुळे इंग्लिशचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे. संपर्क, रोजगार, शिक्षण इत्यादींकरता इंग्लिशचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. भारत हा इंग्लिश ही दुसरी भाषा असणारा महत्त्वाचा देश आहे व भारतीय इंग्लिश ही इंग्लिशची एक महत्वाची बोलीभाषा म्हणून ओळखली जाते.

इतिहास

इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व अभ्यास होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = इति + ह +आस = हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे{{|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला राहिला नसून ते निवेदन साधार, वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले असते. जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.

प्रसिद्ध इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय. इतिहासाचे प्रकार खालीलप्रमाणे :

१) भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे शास्त्र

२) इतिहासाची शास्त्रीय पद्धत

३) इतिहास आणि आपण

४) भूतकाळ आणि भविष्यकाळ

कर्णधार (क्रिकेट)

क्रिकेट संघाचा कर्णधार बहुदा स्कीपर म्हणून उल्लेखला जातो.. एक नियमीत खेळाडूपेक्षा कर्णधाराच्या खांद्यावर एक नायक म्हणून बर्‍याच अतिरीक्त भूमिका आणि जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. इतर खेळांप्रमाणेच, कर्णधार हा सहसा एक अनुभवी, चांगले संवाद कौशल्य असलेला, आणि संघामध्ये नियमीत असलेला खेळाडू असतो. संघनिवडीमध्ये कर्णधाराचे मत महत्त्वाचे असते. सामन्याच्याआधी कर्णधार नाणेफेक करतो. सामन्याच्या दरम्यान फलंदाजीची क्रमवारी लावण्याचा निर्णय कर्णधाराचा असतो, तसेच प्रत्येक षटक कोणता गोलंदाज करेल, आणि क्षेत्ररक्षकांच्या जागा ठरवण्याची जबाबदारी सुद्धा कर्णधाराची असते. कर्णधाराचे निर्णय अंतिम असला तरीही, हे निर्णय सहसा सर्वसंमतीने घेतलेले असतात. कर्णधाराला क्रिकेट विषयीच्या धोरणामधील गुंतागुंतीचे असलेले ज्ञान, त्याचा धूर्तपणा आणि मुत्सदेपणा यावर संघाचे यश बर्‍याच अंशी अवलंबून असते.

मैदानावर मोठे निर्णय घेणे गरजेचे असल्याने, इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेट कर्णधाराच्या खांद्यावर खूपच जास्त जबाबदारीचे ओझे असते.

गया विमानतळ

गया विमानतळ (आहसंवि: GAY, आप्रविको: VEGY) हा भारताच्या बिहार राज्यातील गया येथील एक विमानतळ आहे. ह्यास बोधगया विमानतळ असेही म्हणतात. येथील बव्हंशी प्रवासी वाहतुक ही गया जिल्ह्यातील बोधगया ह्या स्थानाकरिता असते. बोधगयेमध्ये गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले होते. ह्या विमानतळापासुन बोधगयेचे अंतर ५ कि.मी. आहे.

ज्ञान दिन (महाराष्ट्र)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस - १४ एप्रिल हा इ.स. २०१७ पासून पुढे ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने घेतला आहे.गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक आंबेडकर जयंतीला ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करीत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस' म्हणून साजरी होऊ लागली.

तत्त्वज्ञान

भारतात प्राचीन काळापासून धर्म आणि तत्त्वज्ञान यांना एकच मानले गेले; तर पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाची सुरूवात ग्रीक तत्त्वज्ञानाने झाली, असे मान्य झाले आहे.

तत्त्वज्ञान म्हणजे अस्तित्व,ज्ञान, मूल्ये, विवेकशक्ती, मन आणि भाषा यांच्या संबंधातील सर्वसाधारण व मूलभूत प्रश्नांची चिकित्सा असे समजले जाते. अशा प्रश्नांचा अभ्यास करणे किंवा ते शक्यतो सोडवणे हा हेतू तत्त्वज्ञानामागे असतो. अशा प्रकारच्या समस्यांचा विचार करणारे जे इतर मार्ग किंवा इतर ज्ञानशाखा आहेत; त्यापेक्षा अतिशय भिन्न रीतीने होणाऱ्या चिकित्सकतेमुळे व तर्काधिष्ठित युक्तिवादामुळे तत्त्वज्ञान वेगळे ठरते.

प्रश्न उपस्थित करणे, चिकित्सक चर्चा करणे, विवेकशील युक्तिवाद करणे आणि सुव्यवस्थित सादरीकरण करणे ही सर्वसाधारण तात्त्विक पद्धती मानली जाते. "काहीतरी जाणणे शक्य आहे का? ते सिद्ध करणे शक्य आहे का? वास्तव म्हणजे काय? नीती म्हणजे काय? किंवा "जीवन जगण्याची उत्तम रीती कोणती ? " असे प्रश्न तात्त्विक समजले जातात.

भारतीय आणि पाश्चात्य अर्थाने पाहता, मानव स्वत:च्या अनुभवांची, व्यवहारांची जाणीव असलेला असा प्राणी असल्याने त्याच्या या आत्मजाणीव असणाऱ्या प्रकृतीचा होणारा बौद्धिक आविष्कार म्हणजे तत्त्वज्ञान, असे म्हणता येते.

तुर्की भाषा

तुर्की भाषा (उच्चार:ˈt̪yɾktʃe) मध्यपूर्वेतील भाषा आहे. ही ६ कोटी ३० लाख लोकांची मातृभाषा आहे. ही भाषा मुख्यत्वे तुर्कस्तान, सायप्रस तसेच इराक, ग्रीस, बल्गेरिया, मॅसिडोनिया, कोसोव्हो आणि आल्बेनियामध्ये वापरली जाते. या भागांतून परागंदा झालेले लोकही ही भाषा वापरतात.

सुमारे १,२०० वर्षांचा लिखित इतिहास असलेल्या या भाषेचा उगम मध्य आशियात झाला. ऑटोमन साम्राज्याबरोबर ही भाषा युरोपमध्ये पसरली. भारतातही उर्दू भाषेतल्या गझलांमध्ये अनेक तुर्की शब्दांचा वापर असतो. अरबी, फार्सी आणि तुर्की शब्दांचे ज्ञान असेल तर उर्दू शायरी समजणे सोपे जाते.

दान

दान हे दातृत्वशक्ती किंवा आर्थिक स्थितीवर अवलंबून नसते तर,अर्थिक मोहावर,व आसक्तीवर अवलंबून असते.दान हे सत्पात्री व गरज असणाऱ्यांना व्यक्तिंना दिले पाहिजे.(संस्कृत-वृथा दानम् समर्थस्य)

ध्यानं परं कृतयुगे त्रेतायां ज्ञानमुच्यते |द्वापरे यज्ञमेवाहु: दानमेव कलौ युगे || कूर्म पुराण २७.१७

कृतयुगात ध्यान, त्रेतायुगात ज्ञान, द्वापरयुगात यज्ञ आणि कलियुगात दान ही सर्वश्रेष्ठ साधने आहेत.

बोधिसत्व

बोधिसत्व (बोधिसत्त्व) म्हणजे जगाच्या शांतीकरीता वा आनंदाकरीता कार्य करणारे व्यक्ती होय. ही बौद्ध धर्मातील एक संकल्पना आहे. 'बोधिसत्त्व' ह्या शब्दाचा मूळ अर्थ "ज्याला पुढे केव्हा तरी 'बोधी' म्हणजे ज्ञान प्राप्त होणार आहे असा" असाही होतो.

बोधी

बोधी किंवा बोध या शब्दाचा अर्थ "स्थितीचे परिपूर्ण आकलन" असा होतो. ही संज्ञा प्रबोधनकाळासाठी किंवा ज्ञानोदयाच्या काळासाठी मुख्यत्वे वापरली जाते. बौद्ध धर्माच्या आध्यात्मिक क्षेत्रात बोधी या संज्ञेचा अर्थ "अंतिम सत्याचे आकलन किंवा साक्षात्कार" असा होतो. पाश्चात्य विद्वानांनी "एन्लायटनमन्ट" हा प्रतिशब्द बोधी, केन्शो आणि सतोरी या बौद्ध मतातील संज्ञांसाठी वापरला आहे. हिंदू धर्मातील मोक्ष (मुक्ती) ही संकल्पना आणि जैन धर्मातील केवल ज्ञान ही संज्ञा बोधीशी समकक्ष आहे.

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(1989 मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.Sunil Arora हे 23 वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत.

निवडणूक आयुक्त-अशोक लवासा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (संक्षिप्त: मनसे) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक/राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश, आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे.

मिती

मिती म्हणजे कुठल्याही वस्तुची लांबी, रुंदी, उंची इ. ठरविण्यासाठी लागणारे माप अथवा प्रमाण होय. विज्ञानाच्या दृष्टीने द्विमिती आणि त्रिमिती अस्तित्त्वात आहेत. आइन्स्टाईन यांनी चौथी मिती (चतुर्मिती ) काळ स्वरुपात मांडली. याशिवाय अनेक मिती असतील तथापी त्याचा वापर करण्याचे ज्ञान अद्याप आपल्याला झालेले नाही. दृष्टी, आवाज आणि स्पर्श यातून तीन मितींचे ज्ञान होते. मानवी डोळ्यांची दृष्टी त्रिमिती आहे. स्ट्रिंग तत्त्वज्ञानानुसार अशा अनेक (दहा) मिती अस्तित्वात आहेत. चौथ्या मितीबद्दल आपण फक्त कल्पना करू शकतो.

मुक्‍त ज्ञानकोश

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

येथील लेखनाचा परिघ ज्ञानकोशाचा असतो.मुक्‍त ज्ञानकोश वाचन, लेखन, संपादन,सुधारणा, बदल करण्याकरीता सर्वांना मुक्त असतात.मुक्त ज्ञानकोशातील लेखात सर्वसामान्य वाचक सुद्धा लेखनात सहभाग घेतात तसेच एकट्याने अथवा सहयोगी पद्धतीने लेखन केले जाते.

मुक्त ज्ञानकोश हा मुक्त सॉफ्टवेअरच्या तत्त्वावर आधारित असून ज्ञानावरील मालकी हक्क असू नये म्हणून त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. कोणीही वापरकर्ता तो संपादित करू शकतो.

रामचंद्र नीळकंठ बावडेकर

रामचंद्र नीळकंठ बावडेकर उर्फ रामचंद्रपंत अमात्य (१६५०-१७१६) हे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळातील राजनीतीचे प्रत्यक्ष ज्ञान असलेले एक प्रधान होते. रामचंद्रपंत अमात्यांची साथ केवळ शिवाजीराजेच नव्हे तर संभाजीराजे, राजाराम आणि ताराबाईंना लाभली. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलेली राजनीती अमात्यांनी आपल्या उत्तरायुष्यात लिहून काढली. तसेच कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) यांच्या आज्ञेने त्यांच्या राजकुमारांना राज्यकारभाराचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी 'आज्ञापत्र' हा ग्रंथ लिहिला..

स्त्री अभ्यास

स्त्री अभ्यास ही एक नव्याने घडत असलेली, आंतरशाखीय स्वरूपाचा आशय विकसित करू पाहणारी अशी ज्ञान शाखा आहे. स्त्री अभ्यास हे आंतर विद्याशाखीय विद्यापीठीय क्षेत्र आहे ज्यात स्त्री-वादी दृष्टीकोनातून समाजाचा राजकीय, आर्थिक, सामाजिक इतिहासाचा बहुसांस्कृतिक अभ्यास केला जातो' आणि ज्यात लिंगभाव, वर्ण, वर्ग, जात, लैंगिकता आणि इतर सामाजिक विषमतांची स्त्रीवादी चिकित्सा केली जाते.

विद्यापिठ अनुदान आयोग अनुदानीत स्त्री अभ्यास केन्द्रे, विविध ज्ञानशाखांमधील लिंगभाव परिप्रेक्ष्यातून संशोधन आणि अध्यापन करणारे अभ्यासक तसेच स्त्री चळवळींतील कार्यकर्ते हे सर्व स्त्री अभ्यास ज्ञान क्षेत्रात योगदान करणारे घटक मानले जातात.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.