जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर (जुलै १२, १८६४ - जानेवारी ५, १९४३) हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगीरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले. गुलामगीरी नष्ट झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना शिक्षणाची दारे खुली झाली होती. चित्रकला, गायन व अनेक कलेत निपुण असलेल्या कार्व्हर यांना त्यांच्या आयुष्यात अनेक हितचिंतकांनी उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. जात्याच प्रगल्भ असल्याने शेती विषयक क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केले. चित्रकला वा इतर कलेत प्रावीण्य असूनही त्यांनी पुढील आयुष्यात आपल्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवाना व्हायला पाहिजे या जाणिवेने त्यांनी आपले आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वाहून घेतले. शेंगदाण्यापासून तेल, डिंक, रबर, इ. वस्तू तयार करण्यासाठीच्या प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला. आयुष्यभर कोणत्याही पदाची, पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो.

Carver1web
आपल्या प्रयोगशाळेत डॉ. कार्व्हर
George Washington Carver by Frances Benjamin Johnston
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर

मराठी चरित्रे

विकिक्वोट
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.
जानेवारी ५

जानेवारी ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५ वा किंवा लीप वर्षात ५ वा दिवस असतो.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.