जुलै १४


जुलै १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९५ वा किंवा लीप वर्षात १९६ वा दिवस असतो.

ठळक घटना आणि घडामोडी

तेरावे शतक

अठरावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००० - फिजीतील उठावाचा सूत्रधार जॉर्ज स्पेटला अटक व देशद्रोहाचा आरोप.
  • २०१६ - फ्रांसच्या नीस शहरात दहशतवाद्याने लोकांच्या जमावात मोठा ट्रक घालून ८०पेक्षा अधिक लोकांना ठार केले.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

जुलै १२ - जुलै १३ - जुलै १४ - जुलै १५ - जुलै १६ - (जुलै महिना)

इ.स. २०१६

इ.स. २०१६ हे इसवी सनामधील २०१६ वे, २१व्या शतकामधील १६वे तर २०१०च्या दशकामधील सातवे वर्ष असेल.

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा १८९६ साली ग्रीसच्या अथेन्समध्ये भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी (१९१६, १९४० व १९४४ चा अपवाद वगळता) उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती ह्या संस्थेवर स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी आहे. उन्हाळी ऑलिंपिकच्या प्रचंड यशानंतर १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा देखील भरवल्या जात आहेत.

स्पर्धेच्या प्रत्येक प्रकारामध्ये पहिल्या येणाऱ्या खेळाडू अथवा संघाला सुवर्ण पदक, दुसऱ्याला रौप्य पदक तर तिसऱ्याला कांस्य पदक देण्यात येते. २००८ च्या बीजिंगमधील ऑलिंपिक स्पर्धेत २०५ देशांच्या १०,५०० खेळाडूंनी ३०२ प्रकारच्या खेळप्रकारांमध्ये सहभाग घेतला होता.

ग्रीस, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया व स्वित्झर्लंड ह्या जगातील केवळ पाच देशांनी आजवरच्या सर्व उन्हाळी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून सर्व स्पर्धांमध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकणारा ग्रेट ब्रिटन हा एकमेव देश आहे.

जुलै १२

जुलै १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९३ वा किंवा लीप वर्षात १९४ वा दिवस असतो.

जुलै १३

जुलै १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९४ वा किंवा लीप वर्षात १९५ वा दिवस असतो.

जुलै १५

जुलै १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९६ वा किंवा लीप वर्षात १९७ वा दिवस असतो.

जुलै १६

जुलै १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९७ वा किंवा लीप वर्षात १९८ वा दिवस असतो.

जेराल्ड फोर्ड

जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड, कनिष्ठ (इंग्लिश: Gerald Rudolph Ford, Jr., जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड, ज्यूनियर) (जुलै १४, इ.स. १९१३ - डिसेंबर २६, इ.स. २००६) हा अमेरिकेचा ३८वा राष्ट्राध्यक्ष होता. ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ ते २० जानेवारी, इ.स. १९७७ या कालखंडात याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तत्पूर्वी इ.स. १९७३-७४दरम्यान रिचर्ड निक्सन याच्या अध्यक्षपदाच्या दुसर्‍या मुदतीत हा अमेरिकेचा ४०वा उपराष्ट्राध्यक्ष होता. त्याच्या आधीचा उपराष्ट्राध्यक्ष स्पिरो ऍग्न्यू याने राजीनामा दिल्यानंतर अमेरिकी राज्यघटनेतल्या २५व्या घटनादुरुस्तीनुसार याची उपराष्ट्राध्यक्षपदी थेट नेमणूक झाली. वॉटरगेट प्रकरणामुळे ९ एप्रिल, इ.स. १९७४ रोजी रिचर्ड निक्सन याने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर याने अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. निवडणुकींस सामोरे न जाता नेमणुकीच्या प्रक्रियेने राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष पदांवर आरूढ झालेला हा एकमेव अमेरिकन व्यक्ती आहे.

उपराष्ट्राध्यक्षपदावर नेमणूक मिळण्याअगोदर फोर्ड इ.स. १९४९ ते इ.स. १९७३ या काळात अमेरिकी प्रतिनिधिगृहात मिशिगन संस्थानाचा प्रतिनिधी होता.

अध्यक्ष बनल्यावर त्याने रिचर्ड निक्सन याला अध्यक्षीय माफीनामा दिला. त्यावरून पुष्कळ वादंग उठले. शीतयुद्ध संपुष्टात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरलेल्या हेलसिंकी जाहीरनाम्यावर त्याने सही केली. देशांतर्गत आघाडीवर निक्सन प्रशासनास मंदी व चलनवाढ इत्यादी आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. इ.स. १९७६ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत त्याला डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार जिमी कार्टर याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली.

यशवंत विष्णू चंद्रचूड

यशवंत विष्णू चंद्रचूड (जुलै १२, इ.स. १९२०; पुणे, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत - जुलै १४, इ.स. २००८; मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. यांनी सर्वाधिक काळ - म्हणजे फेब्रुवारी २२, इ.स. १९७८ पासून जुलै ११, इ.स. १९८५ रोजी निवृत्त होईपर्यंत ७ वर्षे व ४ महिने - सरन्यायाधीशपद भूषविले. ऑगस्ट २८, इ.स. १९७२ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी यांची नेमणूक झाली.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.