जानेवारी १५

जानेवारी १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५ वा किंवा लीप वर्षात १५ वा दिवस असतो.

<< जानेवारी २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २० २१ २२
२३ २४ २५ २६ २७ २८ २९
३० ३१

ठळक घटना

सोळावे शतक

 • १५५९: राणी एलिझाबेथ (पहिली) यांची इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.

सतरावे शतक

अठरावे शतक

 • १७६१- पानिपतचे तिसरे युद्ध संपले.

एकोणिसावे शतक

 • १८६१: एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.
 • १८८९: द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.

विसावे शतक

 • १९१९ - राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली.
 • १९४९ - भारताच्या स्वातंत्र्यानंतर फिल्डमार्शल के.एम. करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्विकारली. हा दिवस लष्करदिन म्हणून ओळखला जातो.
 • १९७०: मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.
 • १९७३ - जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.
 • १९७५ - अँगोलाला पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य.
 • १९९६ - भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा, संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले.
 • १९९९ - ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

एकविसावे शतक

 • २००१ - सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ’विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.
 • २००५ : ESAच्या SMART-1 या चांद्र-उपग्रहाने चंद्राच्या पृष्ठभागावर असणाऱ्या कॅल्सियम, सिलीकन, लोह, आणि अन्य मूलद्रव्यांचा शोध लावला.
 • २००९ : यूएस एअरवेजच्या विमानाचं, प्राणहानी टाळून हडसन नदीत आश्चर्यकारक लँडींग

जन्म

 • १४१२ - जोन ऑफ आर्क.
 • १४३२ - अफोन्सो पाचवा, पोर्तुगालचा राजा.
 • १४८१ - अशिकागा योशिझुमी, जपानी शोगन.
 • १७७९ - रॉबर्ट ग्रँट – मुंबई इलाख्याचे राज्यपाल, मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक, मुंबईतील ग्रँट रोड हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो.
 • १८५६ - विल्यम स्कॉटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८६३ - विल्हेम मार्क्स, जर्मनीचा चान्सेलर.
 • १८९७ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.
 • १९०८ - एडवर्ड टेलर, पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ, हायड्रॉजन बॉम्बचा संशोधक.
 • १९०९ - ज्याँ बुगाटी, जर्मन अभियंता.
 • १९२० - डॉ. आर. सी. हिरेमठ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू
 • १९२१ - बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री [कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३]
 • १९२६ - खाशाबा दादासाहेब् जाधव , भारतीय कुस्तीगीर.– १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर]
 • १९२९ - डॉ.मार्टिन लुथर किंग, अमेरिकन नागरी अधिकार चळवळीचा नेता.
 • १९१८ - गमाल अब्देल नासर, इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९३१: मराठीह कथाकार शरच्चंद्र वासुदेव चिरमुले
 • १९४७: पत्रकार नितीश नंदी
 • १९५६ - मायावती, भारतीय राजकारणी.
 • १९५६ - पॉल पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९५८ - बोरिस ताडिक, सर्बियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९६७ - रिचर्ड ब्लेकी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९७५ - ग्रेग लव्हरिज, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९८२- सिनेअभिनेता नील नितीन मुकेश

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

जानेवारी १३ - जानेवारी १४ - जानेवारी १५ - जानेवारी १६ - जानेवारी १७ - (जानेवारी महिना)

इ.स. १९५६

इ.स. १९५६ हे इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष आहे.

गॅल्बा

सर्व्हियस सल्पिशियस गॅल्बा (डिसेंबर २४, इ.स.पू. ३ - जानेवारी १५, इ.स. ६९) हा जून ८, इ.स. ६८ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता.

याला सर्व्हियस सल्पिशियस गॅल्बा सीझर ऑगस्टस या नावानेही ओळखले जाते.

चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर

चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर (जानेवारी १५, इ.स. १९२३; अमरावती, ब्रिटिश भारत - ऑक्टोबर २५, इ.स. २००९; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्य-अभिनेते, चित्रपट अभिनेते होते. सुमारे सहा दशकं रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात त्यांची कारकीर्द आहे.

जानेवारी १३

जानेवारी १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३ वा किंवा लीप वर्षात १३ वा दिवस असतो.

जानेवारी १४

जानेवारी १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४ वा किंवा लीप वर्षात १४ वा दिवस असतो.

जानेवारी १६

जानेवारी १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६ वा किंवा लीप वर्षात १६ वा दिवस असतो.

जानेवारी १७

जानेवारी १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७ वा किंवा लीप वर्षात १७ वा दिवस असतो.

नामदेव ढसाळ

नामदेव लक्ष्मण ढसाळ (फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ - जानेवारी १५, इ.स. २०१४) हे मराठी कवी, विचारवंत, दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि बौद्ध-दलित चळवळीतील नेते होते. महानगरीय जीवनावर लिहिणारे आणि बोली भाषेत लेखन करणारे ते मराठीतले एक महत्त्वाचे लेखक होते. दलित समाजात आपल्या कविताच्या माध्यमातून जनजागृती केली.

मंदाकिनी गोगटे

मंदाकिनी कमलाकर गोगटे (जन्म : मुंबई, १६ मे १९३६; मृत्यू : मुंबई, १५ जानेवारी २०१०) या मराठी लेखिका होत्या. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेच्या त्या अध्यक्षा होत्या.

मराठे-दुराणी युद्ध

मराठे-दुराणी युद्ध डिसेंबर इ.स. १७५९ ते जानेवारी १५, इ.स. १७६१ दरम्यान उत्तर भारताच्या स्वामित्वासाठी झालेले युद्ध होते.

डिसेंबर १७५९मध्ये १,००,०००च्या मराठा सैन्याने दिल्लीतील अफगाण शिबंदीला हरवून दिल्ली काबीज केले. तेथपासून १७६१च्या संक्रांतीच्या दिवशी झालेल्या पानिपतच्या तिसर्‍या लढाईपर्यंत अनेक लढाया झाल्या. यात शेवटी मराठ्यांचा दारुण पराभव झाला व दुराणीनेही भारतातून पाय काढता घेतला.

मार्कस साल्व्हियस ओथो

मार्कस साल्व्हियस ओथो (एप्रिल २५, इ.स. ३२ - एप्रिल १६, इ.स. ६९) हा इ.स. ६९ मध्ये जानेवारी १५ ते एप्रिल १६ पर्यंत रोमन सम्राट पदावर होता.

याला मार्कस साल्व्हियस ओथो निरो या नावानेही ओळखले जाते.

मोलियेर

ज्यां-बाप्तिस्ते पोकेलिन (फ्रेंच: Jean-Baptiste Poquelin; जानेवारी १५, इ.स. १६२२ - फेब्रुवारी १७, इ.स. १६७३; टोपणनावः मोलियेर) हा एक फ्रेंच नाटककार व अभिनेता होता. मोलियेरला पश्चिमात्य विनोदामधील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक मानले जाते.

विकिपीडिया

विकिपीडिया ([२]) हा महाजालावरील एक मुक्‍त ज्ञानकोश आहे. महाजालावरील ह्या ज्ञानकोशात कुणालाही नव्याने लेख लिहिता येतो तसेच आधी लिहिलेल्या लेखाचे संपादन करता येते. विकी हे सॉफ्टवेयर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक देखील) आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्याचे निर्देश करणे आवश्यक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरित करताना ती मुक्त स्वरूपातच वितरित करणे आवश्यक असते.विकिमिडिया फाउंडेशन ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.

जिमी वेल्स आणि लॅरी सँगर ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवशी इंग्रजी भाषेत केली. आजघडीला जगातील विविध भाषांत ह्या ज्ञानकोशाच्या शाखा उपलब्ध आहेत. विविध भाषांचे भाषक आपापल्या भाषेतील ज्ञानकोशाच्या निर्मितीत सहभागी होऊ शकतात. मराठी विकिपीडिया हा ह्या ज्ञानकोशाची मराठी भाषेतील शाखा आहे. विकिपीडियाचा सर्वांनाच खूप फायदा होतो.

मराठी विकिपीडियावर (या पानानुसार)सध्या यात ५५,१९४ लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण तीन कोटींहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहीले गेले आहेत.

विकिपिडीयाची वैगुण्ये गृहित धरूनसुद्धा मुक्त सार्वत्रिक उपलब्धतेमुळे, विविध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणा ह्यांमुळे विकिपीडिया हा आज महाजालावरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे. मराठीतील विकिपिडीया इतर भाषांप्रमाणेच गूगल सारखी शोधयंत्रे वापरून शोधता येतो.

२००७ ऑस्ट्रेलियन ओपन

२००७ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ९५ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १५ ते २८ जानेवारी दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.