घाम

घाम म्हणजे त्वचेतून स्रवणारा मुख्यतः पाणी असलेला एक द्रव. यामुळे शरिराच्या तापमानाचे नियंत्रण होते. तसेच त्वचेवर हल्ला करणाऱ्या विषाणूंचाही नाश होतो. घाम स्रवणाऱ्या त्वचेच्या छिद्रांना घर्मरंध्र असे म्हणतात.

बाह्य दुवे

अधिक वाचन

  • Ferner S, Koszmagk R, Lehmann A, Heilmann W., Z Erkr Atmungsorgane. 1990;175(2):70-5. 'Reference values of Na(+) and Cl(-) concentrations in adult sweat'
  • E. R. Nadel, R. W. Bullard, and J. A. Stolwijk, "Importance of skin temperature in the regulation of sweating", Journal of Applied Physiology, Vol. 31, Issue 1, 80-87, July 1, 1971
अॅल्युमिनियम

ॲल्युमिनियम (रासायनिक सूत्र Al) (अणुक्रमांक १३) हा एक धातुरूप रासायनिक पदार्थ आहे.

आयुर्वेदातील विविध संज्ञा

आयुर्वेदात वापरण्यात येणाऱ्या विविध संज्ञांची यादी व त्याचे थोडक्यात वर्णन-

अग्निदीपक - भूक वाढविणारे पदार्थ किंवा औषध.

अनुपान - औषधसेवनास सहाय्यीभूत पदार्थ, तरल पदार्थ अथवा दुसरे औषध.

अपथ्य - शरीरास/आरोग्यास अहितकारक

अवलेह - साखरेचा गुळाचा पातळ पाक.

आसव/अरिष्ट -

कफघ्न -वाढलेला कफ कमी करणारे पदार्थ किंवा औषध.

काढा - काढ्यातील घटकद्रव्याच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळविणे.नंतर गाळून घेणे.

कुपथ्य - शरीरास/आरोग्यास अहितकारक

केश्य - केश वाढविण्यास मदत करणारे पदार्थ किंवा औषध.

चूर्ण - सुकलेल्या वनस्पती कुटून मग त्या गाळून तयार झालेला बारीक वस्त्रगाळ पदार्थ.

ज्वरघ्न - तापाचे हनन करणारे पदार्थ किंवा औषध.

दाहकारक -आतड्यात / पोटात जळजळ उत्पन्न करणारे, मसालेदार, तिखट पदार्थ अथवा औषध.

पथ्य - शरीरास/आरोग्यास हितकारक

प्राणिज - प्राण्याच्या अवयवापासून अथवा दूध, अस्थी, मूत्र, मल इत्यादींपासून उत्पन्न झालेले किंवा उत्पादित केलेले.

पित्तशामक - वाढलेले पित्त कमी करणारे पदार्थ किंवा औषध.

पित्तहारक - शरीरात पित्त वाढले असता ते कमी करणारे पदार्थ किंवा औषध.

फांट - घटकद्रव्याच्या वजनाच्या चौपट पाणी घालून चांगले उकळवून तयार केलेले द्रावण.

भस्म - एखादा औषधी पदार्थावर जाळण्याची/उष्णतेची प्रक्रिया करून उपलब्ध झालेली राख.

मारण - धातूंचे भस्म तयार करण्याचा एक नियंत्रित विधी.

मूत्रल - शरीरातील दोष लघवीवाटे निघून जावे्त यासाठी मूत्राचे प्रमाण वाढविणारे औषध.

रेचक - ज्या औषधाने रेच/जुलाब होतात असे औषध.

लेप - शरीराचे कोणत्याही अंगावर ज्याचे लेपन केले जाते तो.

वटिका - गोळ्या

वांतिकारक - सेवन केल्यास उलटी होईल असे पदार्थ किंवा औषध.

वायुकारक - वायू वाढविणारे पदार्थ किंवा औषध.

शोधन - शुद्ध करणे

स्नेहन - वंगणासारखे काम करणारे, चोपडेपणा आणणारे पदार्थ किंवा औषध.

स्वरस - अंगरस. ओल्या वनस्पतीस अथवा पानांना कुटून व स्वच्छ फडक्याने गाळून जो रस निघतो त्या रसाला स्वरस म्हणतात.

स्वेदन / स्वेदजनन - घाम आणणारे पदार्थ किंवा औषध किंवा उपाययोजना.

हिम /शीतकषाय - घटकद्रव्याच्या वजनाच्या सहापट पाणी घालून व रात्रभर भिजत ठेवून सकाळी गाळून घेतल्यावर तयार होणारे औषध.

हीनवीर्य - ज्यात कस उरला नाही असे पदार्थ किंवा औषध.

वामक - उलटी करवणारे.

श्लेष्मल - श्लेमा वाढविणारे

दाह - जळजळ

शोथ -

आनुलोमिक -

कासहर - खोकला दूर करणारे

विषहर - विषाचा प्रभाव कमी/दूर करणारे

काढा

पाचक - पचनास मदत करणारे औषध अथवा पदार्थ.

उष्माघात

प्रखर उन्हात जास्त वेळ फिरल्यामुळे किंवा तापमानात जास्त फरक असलेल्या जागी वावरल्यामुळे (उदा.:वातानुकुलीत खोलीतुन प्रखर उन्हात वा त्या विरुद्ध) होणारी व्याधी.यात अचानक शरीराचे तापमान १०४० फॅ.पेक्षा जास्त वाढते. त्यावर नियंत्रण न आल्यास मृत्यु येतो. यास इंग्रजीत 'सनस्ट्रोक' असे म्हणतात.

विदर्भातील अनेक गावात तपमान ४७० सेल्सियस वा कधी कधी त्याहीपेक्षा थोडे जास्त होते त्यावेळेस उष्माघाताने अनेक लोकं मृत्युमुखी पडतात.

कर्करोग

कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे.

प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ होय. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशींची आवशकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजे अर्बुद किंवा ट्यूमर. अर्बुदाचे दोन प्रकार आहेत.

कर्दळ

कर्दळ (Indian Shot) ही कॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव कॅना इंडिका असे आहे. ही मूळची वेस्ट इंडीझ आणि मध्य व दक्षिण अमेरिका येथील आहे. कर्दळ ही मोठी, बहुवर्षायू व शोभादायक ओषधी असल्यामुळे भारतात बागेमध्ये तिच्या अनेक जाती आढळतात.

कर्दळीचे जमिनीखालील खोड (मूलक्षोड) जाड असते. तिचे जमिनीवरील खोड ०.९-१.२ मीटर उंच असते. पाने साधी व आकाराने मोठी असतात. फुले अनियमित, द्विलिंगी, जोडीने, लाल, शेंदरी व मिश्र रंगांची असतात. बिया अनेक, काळ्या, लहान, गोलाकार व छर्‍यांप्रमाणे असतात. त्यामुळे या वनस्पतीला इंडियन शॉट असेही म्हणतात.

कर्दळीची लागवड ओल्या भुसभुशीत जमिनीत केली जाते. हिला उष्ण हवामान लागते. जमिनीखाली वाढणार्‍या मूलक्षोडापासून अभिवृद्धी करतात. नवीन प्रकार बियांपासून तयार करतात. निरनिराळ्या प्रकारांत संकर करून पुष्कळ ठेंगण्या, निरनिराळ्या रंगछटांच्या व मोठ्या फुलांच्या जाती तयार करतात.

कर्दळीचे मूळ मूत्रल (लघवी साफ करणारे), उत्तेजक व स्वेदकारी (घाम आणणारे) असते. बिया जखमा भरून येण्यास चांगल्या आहेत. दागिने बनविण्यासाठी कर्दळीच्या बियांचा वापर होतो.

काजू

काजू हे एक फळझाड आहे. या फळाला विलायती मँगो म्हणून सुद्धा संबोधले जाते.

हिज्जली बदाम (हिंदी), गेरू (कन्नड), कचुमाक (मल्याळम), जीडिमा मिडि (तेलुगू) अशा विविध नावांनी ओळखल्या जाणार्‍या काजूच्या बोंडांपासून कोकण, मलबार, तामिळनाडू यासारख्या प्रदेशात विविध तर्‍हेचे मद्य तयार केले जाते. गोव्यातही काजूचे भरपूर प्रमाणात पीक घेतले जाते. गोव्यातील काजूची फेणी प्रसिध्द आहे.

अधिक काजूबिया खाल्ल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. शरीरातून पुरेसा घाम बाहेर येतो. ओल्या काजूच्या वरची फिकट तपकिरी साल काढून ते खाण्याचा आनंद कोकणातील सर्वच लहानथोर घेतात. काजूबर्फी, काजू कतली ही मिष्टान्ने आणि खारे काजू लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात मेजवानीसाठी नारळीभात, शाही पुलाव, शिरा तयार केला जातो. या पदार्थांतही काजूचा वापर केला जातो.

कापूस

कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त तंतू पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा तंतू आहे. कापूस हे एक नगदी पिक आहे, कपाशी या झाडापासून कापूस मिळवला जातो यालाच पांढरे सोने असेही म्हटले जाते. कापसापासून धागे मिळवले जातात. धाग्यांपासून कापड तयार केले जाते. पेक्टिकद्रव्य, प्रथिन द्रव्ये, मेण, राख आणि आर्द्रता यांचा समावेश कापसाच्या तंतूमध्ये असतो. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो.

मराठी-हिंदीमध्ये कापसाला रुई अस प्रतिशब्द आहे. मात्र रुई या विषारी ननस्पतीचा आणि कापसाचा काही संबंध नाही.

कापसाला इंग्रजीत[Gossipium]

कापसामध्ये जवळपास ९५% सिल्लुलोस (Cellulose) असते.

क्षय रोग

क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात.

क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी.

हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा compliance (औषधांना चिकटून रहाणे) ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारांत अतिशय आवश्यक आहे.

ते अवयव

मेंदूची आवरणे,

मणके व इतर हाडे,

लैंगिक अवयव.

गणपती

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात.

घामोळे

घामोळे यात घम्रग्रंथीमध्ये घाम साठून राहिला आणि त्वचेवर येऊ शखला नाही की त्वचेला सूज किंवा रॅशेस येतात. यालाच घामोळे म्हणतात. मान, काखेत किंवा मांड्या या ठिकाणी त्वचा एकमेकीला स्पर्श करत असल्याने हवा पोहोचून घामाचे बाष्पीभवन होत नाही. घट्ट कपड्यांमुळे तसेच भरपूर क्रीम चोपडल्यानेही घाम सुकण्यासाठी अडथळे येतात.

चिखलपान

चिखलपान (इंग्लिश:Mud puddling) ही कीटकांची, विशेषतः फुलपाखरांची चिखल,कुजलेले पदार्थ,प्राण्यांचा घाम यातून ते आवश्यक क्षार, खनिजे, सोडीयम,अमिनो आम्ले इ.शोषून घेण्याची क्रिया होय. या कीटकांना आवश्यक असलेली सर्व पोषणमूल्ये परागकण व मधातून मिळत नाहीत म्हणून ते याप्रकारे पोषणमूल्ये मिळवतात.

सहसा हे कीटक थोडा चिखल असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकत्र बसलेली दिसतात.

उन्हाळ्यात तापमान वाढलेले असताना जंगलात थोडे पाणी शिल्लक असलेल्या ओढ्यातील चिखलात चिखलपान करताना आढळतात.

एका ठिकाणी जमलेली अशी रंगीबेरंगी फुलपाखरे अतिशय विलोभनीय दिसतात. अनेकविध जातींची फुलपाखरे अशा ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र आलेली असतात.

फुलपाखरे सतत उडत असल्यामुळे त्यांची एरव्ही छायाचित्रे घेणे कठीण असते पण चिखलपान करणारी फुलपाखरे छायाचित्रकारांसाठी सुद्धा एका पर्वणीच असते.

पक्षी

पक्षी हे उंच उडणारे दोन पायांवर चालणारे पिसे असलेले गरम रक्ताचे पृष्ठवंशीय जीव आहेत. जीवशास्त्रानुसार पक्ष्यांची व्याख्या फेदर्ड बायपेड अशी होते. याचा अर्थ पिसे असलेले दोन पायांचे प्राणी. पक्ष्यांचे सर्वांत ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची उडण्याची क्षमता. ही क्षमता पक्ष्यांना इतर पृष्ठवंशीय प्राण्यांपेक्षा वेगळे ठरवते. पेंग्विन व शहामृग असे फारच थोडके पक्षी वगळता इतर सर्व पक्ष्यांना उडता येते. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पिसे. सर्व पक्ष्यांना पिसे, चोच व चार कप्याचे हृदय असते. हृदयाच्या चार कप्यांमुळे पक्षी उष्ण रक्ताचे आहेत. पिसांच्या व चोचीच्या रचनेमुळे पक्षी वजनाने अतिशय हलके असतात. पिसे त्यांचे थंडीपासून सं‍रक्षण करतात व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उडण्याची शक्ती देतात.

भुवई

प्राण्याच्या चेहऱ्यावरील डोळ्यांच्या वर असलेल्या केसांच्या बारीक पट्टीला भुवई (मराठी लेखनभेद: भिवई; अनेकवचन: भुवया, भिवया) असे म्हणतात.

मानवी शरीरात भुवई असण्याचे निश्चित प्रयोजन नाही; मात्र उत्क्रांती होत असताना मानवाच्या चेहऱ्यावरचे कपाळाजवळील भागातले केस गळाले आणि केवळ भुवई राहिली. मानवांच्या भुवयांमध्ये वांशिकतेनुसार वैविध्य आढळते. उदाहरणार्थ पूर्व आशियाई लोकांमध्ये भुवया बऱ्याच बारीक असतात, तर युरोपीय लोकांमध्ये लालसर अथवा फिक्या भुऱ्या रंगाच्या असतात.

लहुजी राघोजी साळवे

लहु राघोजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. ते लहुजी वस्ताद नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका मातंग कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते, युद्ध कलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसे. त वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे त्याकाळी प्रसिद्ध होते. एखदा राघोजी साळवे यांनी वाघाबरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर केले होते व आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. साळवे घराने सशस्त्र विद्येमध्ये निपुण व तरबेज होते त्यामुळे, शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदरकिल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांचे आजोबा यांच्याकडे सोपवली होती. पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणासाठी साळवे घराण्यातील अनेक वीर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना 'राऊत ' या पदवीने गौरविले होते.

पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व २३ वर्षे वयाच्या लहुजी यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. लहुजीं चे वडील राघोजी साळवे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे शत्रू वर तुटून पडले होते व सपासप तलवारीचे वार करत शत्रुंना जमिनीवर लोळवत होते. अखेर या संकटातुन बाहेर पडण्यासाठी घाबरलेल्या इंग्रजांनी एकत्र वार करून राघोजींना संपवले.

राघोजी या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ.स. १८१८मध्ये मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज शनिवारवाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.

या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले. आपल्या वडिलांना आपल्या डोळ्या समोरच शहीद झालेले पाहून लहूजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली व भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली. ही समाधी अजूनही पुणे-शिवाजीनगरजवळच्या ‘वाकडेवाडी’ येथे आहे.

दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्ध कले मध्ये लहुजी निपुण होते लहुजींचे पिळदार शरीर व त्यांची भरलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फुटत असे. जीवघेण्या शस्त्रां बरोबर ते अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असतं. आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.

२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे

इ.स. १८४८ साली लहुजींच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भरत होती.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या ११वीच्या पुस्तकामध्ये वीर वस्ताद लहुजी साळवे यांचा जन्म इ.स.१८०० मध्ये झाल्याचे नमुद आहे.

उपमा -धर्मवीर लहुजी वस्ताद, आद्यक्रांती लहुजी वस्ताद

विजय तेंडुलकर

विजय तेंडुलकर (जानेवारी ६, १९२८ - मे १९, २००८) हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, तथा राजकीय विश्लेषक होते. सखाराम बाईँडर हे प्रसिद्ध नाटक तेंडुलकर यांनी लिहिले.

ससा

ससा हा एक छोटा सस्तन प्राणी आहे. सस्याचे दोन प्रकार असतात. रानटी ससे आकाराने खूप मोठे असतात. ते पाळीव नसतात किंवा त्यांना पाळणं कठीण असतं. काही शतकांपूर्वी त्यांचा खाण्यासाठी वापर केला जायचा. त्याचं मांस खूप स्वादिष्ट लागते. त्याची कातडी पण खूप मऊ असते. एका वेळेला सशाची मादी 10 ते 12 पिल्ले देते. जन्मतः सशाचे डोळे उघडलेले नसतात ससे पांढरे, तसेच पिवळट तपकिरी रंगाचे किंवा काळ्या रंगाचे असतात. सफेद ससे त्यांच्या पांढर्‍या शुभ्र रंगामुळे विशेष उठून दिसतात. ससा हा शाकाहारी प्राणी आहे. ससा अतिशय चपळ व वेगवान असतो. सशाचे डोळे लाल असतात. ससे पालन हा एक चांगला व्यवसाय आहे. सशाच्या अनेक प्रजाती आहेत. रानात मिळणारे ससे पाळण्यास बंदी आहे. काही ठराविक जातीचे ससे पाळता येतात. ससे अनेक प्रकारचे असतात . ससे रानातील गवत व शेतातील भाज्या, गाजर अश्या काही वनस्पती खातात. ससे खूप चपळ आणि भित्र्या स्वभावाचे असतात. तो वेगाने उड्या मारत पळू शकतो. ससे 35 ते 40 मीटर प्रति तास या वेगाने धावू शकतात. ससे खरे तर तीन रंगात आढळतात. सफेद ( पांढरा), काळा किंवा तपकिरी. संपूर्ण जगात सस्यांच्या जवळपास 305 जाती आहेत. सास्याची सर्वात मोठी जात जर्मन जायंट आहे तर सर्वात लहान जात आहे नेदरलँड द्वार्फ आहे. ससे शक्यतो समूहाने राहातात. सास्याची मादी पिल्लांना जन्म देण्यापूर्वी, एक बीळ बनवते. त्यामध्ये पालापाचोळा आणि स्वतःचे केस वापरून उबदार वातावरण तयार करते. सस्यांच्या पिलांना जन्मताच केस नसतात आणि जन्मल्या नंतर ते आठवडाभर तसेच न डोळे उघता पडलेले असतात. दरम्यान त्यांच्या अंगावर केस येण्यास सुरुवात होते. ससा हा शाकाहारी प्राणी आहे. गवत हे त्याचं मुख्य आणि आवडत अन्न आहे. सस्यांच्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते कारण त्याला उलटी करता येत नाही. सस्यांचे कान शकयतो 3 ते 4 इंचाचे असतात. सस्यांच्या तोंडात 28 दात असतात. सस्यांचे डोळे अश्या प्रकारे असतात की त्यांना त्यांच्या चहुबाजूंचं दिसू शकते. त्यामुळे त्यांना पकडणं जरा जास्तच अवघड काम असते. पण त्याला बरोबर नाकासमोर दिसू शकत नाही. सस्याची नजर, ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता चांगली असते. ससा शिकाऱ्याच्या वासावरून त्याला ओळखू शकतो. सस्यांच्या मिशा या त्याच्या रुंदी एवढ्या असतात. त्यामुळे त्याला हे समजण्यास मदद होते की एखाद्या बिळात तो जाऊ शकतो की नाही. ससे दिवसातून किमान आठ वेला झोप (डुलकी) घेतात. सस्यांना घाम येत नाही. ते त्यांच्या कानाद्वारे आणि त्वचेद्वारे उष्णता बाहेर फेकतात. सस्याचे आयुष्य कमी असते. शक्यतो ससे दहा ते बारा वर्षे जगु शकतात. ही सर्व सस्याबद्दलची माहिती.

सस्तन प्राणी

ज्या प्राण्याला स्तन आहे तो सस्तन प्राणी होय.

उष्ण रक्ताचे, पाठीचा कणा असलेले, शरीरावर स्वेद (घाम) व दुग्ध (दूध) ग्रंथी (स्तन) असणारे प्राणी.

हे प्राणी जन्मल्यानंतर काही दिवस त्यांचे पोषण आईच्या दुधावर होते.

उदा. माणूस, मांजर, वटवाघूळ

स्वाइन इन्फ्लुएन्झा

हा एक लेख स्वाईन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाईन फ्लू/स्वाईन फ्ल्यू असेही म्हटले जाते.

हृदयाघात

हृदयाघात म्हणजे ह्रदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठ्यातील अडथळ्यांमुळे कार्यक्षमता कमी होऊन त्यांचे काम विस्कळीत होणे होय.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.