गालिसिया

गालिसिया हा स्पेन देशाच्या वायव्य कोपर्‍यातील एक स्वायत्त संघ आहे. गालिसियाच्या पश्चिम व उत्तरेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला पोर्तुगाल देश तर पूर्वेला स्पेनचे इतर प्रांत आहेत.

गालिसिया
Comunidad Autónoma de Galicia
स्पेनचा स्वायत्त संघ
Flag of Galicia
ध्वज
Escudo de Galicia 2
चिन्ह

गालिसियाचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान

गालिसियाचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
राजधानी सांतियागो दे कोंपोस्तेला
क्षेत्रफळ २९,५७४ चौ. किमी (११,४१९ चौ. मैल)
लोकसंख्या २७,९६,०८९
घनता ९४.५ /चौ. किमी (२४५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ES-GA
संकेतस्थळ http://www.xunta.es/
कमिलो होजे झेला

कमिलो होजे झेला इ त्रुलोक, इरिया फ्लाव्हियाचा पहिला मार्के (स्पॅनिश: Camilo José Cela y Trulock, 1st Marquis of Iria Flavia; ११ मे १९१६ - १७ जानेवारी २०२) हा एक स्पॅनिश लेखक व लघुकथाकार होता. त्याला १९८९ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.

गालेगो भाषा

गालेगो अथवा गालिसियन (Galego) ही स्पेनच्या गालिसिया प्रदेशात वापरली जाणारी एक रोमान्स भाषा आहे. ही भाषा पोर्तुगीजसोबत मिळतीजुळती आहे.

फ्रांसिस्को फ्रांको

फ्रांसिस्को फ्रांको (स्पॅनिश: Francisco Franco y Bahamonde) हा स्पेनचा हुकूमशहा होता. स्पेनच्या गृहयुद्धादरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा पुढारी व सेनापती असलेल्या फ्रांकोने युद्धात विजय मिळवल्यानंतर स्पेनमध्ये हुकूमशाही राजवट स्थापन केली व तो मृत्यूपर्यंत स्पेनचा राष्ट्रप्रमुख राहिला.

गृहयुद्धामध्ये नाझी जर्मनी व इटलीने फ्रांकोला लष्करी मदत पुरवली असतानाही फ्रांकोने दुसऱ्या महायुद्धादरम्यान अक्ष राष्ट्रांना मदत न करता तटस्थ राहणे पसंद केले. युद्ध संपल्यानंतर फ्रांकोने आपली स्पेनवरील पकड मजबूत ठेवण्यासाठी अनेक राजकीय विरोधकांना छळछावण्यांमध्ये डांबले तसेच त्याच्या राजवटीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना मृत्यूची शिक्षा ठोठावली. त्याच्या कट्टर कम्युनिस्टविरोधी धोरणांमुळे शीत युद्ध काळात अमेरिकेने फ्रांको सरकारसोबत लष्करी व वाणिज्य संबंध प्रस्थापित केले होते.

फ्रांकोच्या मृत्यूनंतर स्पेनने लोकशाही राजवटीकडे वाटचाल करण्यास सुरूवात केली व इ.स. १९७८ साली लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर आले.

युक्रेन

युक्रेन (युक्रेनियन: Україна; रशियन: Украи́на; क्राइमियन तातर: Ukraina) हा पूर्व युरोपातील एक देश आहे. युक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्र तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत. क्यीव ही युक्रेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

नवव्या शतकात निर्माण झालेले क्यीवन रुस हे राज्य मध्य युगादरम्यान एक बलाढ्य राष्ट्र होते. १९व्या शतकामध्ये युक्रेनचा मोठा हिस्सा रशियन साम्राज्याच्या तर उर्वरित भाग ऑस्ट्रिया-हंगेरीच्या अधिपत्याखाली होता. पहिल्या महायुद्धा व रशियन यादवीनंतर ३० डिसेंबर १९२२ रोजी सोव्हियेत संघामध्ये सामील होणारा युक्रेन हा आघाडीचा देश होता. तेंव्हापासून १९९१ सालामधील सोव्हियेत संघाच्या विघटनापर्यंत युक्रेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य हे सोव्हियेत संघातील एक आघाडीचे गणराज्य होते. २४ ऑगस्ट १९९१ रोजी युक्रेनला स्वातंत्र्य मिळाले.

ला कोरुन्या (प्रांत)

ला कोरुन्या किंवा आ कोरुन्या (स्पॅनिश: La Coruña) हा स्पेन देशाच्या गालिसिया स्वायत्त संघामधील चारपैकी एक प्रांत आहे. हा प्रांत गालिसियाच्या ईशान्य भागात वसला असून त्याच्या उत्तर व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. ला कोरुन्या ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. सांतियागो दे कोंपोस्तेला हे गालिसियामधील सर्वात मोठे शहर देखील ह्याच प्रांतामध्ये स्थित आहे.

लुगो (प्रांत)

लुगो (स्पॅनिश: Lugo) हा स्पेन देशाच्या गालिसिया स्वायत्त संघामधील चारपैकी एक प्रांत आहे. हा प्रांत गालिसियाच्या वायव्य भागात वसला असून त्याच्या उत्तरेला बिस्केचे आखात हा अटलांटिक महासागराचा उपसमुद्र आहे. लुगो ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

लूगो

लूगो ही स्पेनच्या गालिसिया संघाची आहे.

सांतियागो दे कोंपोस्तेला

सांतियागो दे कोंपोस्तेला ही स्पेनच्या गालिसिया संघाची राजधानी आहे.

सेल्ता दे व्हिगो

रेआल क्लब सेल्ता दे व्हिगो (स्पॅनिश: Real Club Celta de Vigo) हा स्पेनच्या व्हिगो शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १९३१ साली स्थापन झालेला सेल्ता आजवर अनेक हंगामांमध्ये ला लीगा स्पर्धेत खेळला आहे. २००३-०४ युएफा चँपियन्स लीगमध्ये सेल्ताला प्रवेश मिळाला होता.

स्पेन

स्पेन (स्पॅनिश:(España)एस्पान्या) (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती|es'paɲa), अधिकृत नाव स्पेनचे राजतंत्र (स्पॅनिश:Reino de España रेइनो दे एस्पान्या) हा दक्षिण युरोपामध्ये वसलेला एक देश आहे. स्पेनच्या अखत्यारित भूमध्य समुद्रातील बालेआरिक व कॅनेरी बेटे आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटे तसेच उत्तर आफ्रिकेतील काही भूभाग आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस व पूर्वेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर असून ह्या देशाच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, पूर्वेस फ्रान्स व आंदोरा आणि दक्षिणेस मोरोक्को व जिब्राल्टर यांना लागून आहेत. फ्रान्सनंतर स्पेन हा पश्चिम युरोपमधला दुसरा मोठा व इबेरियन द्वीपकल्पातील तीन देशांपैकी सर्वात मोठा देश आहे. माद्रिद ही स्पेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

स्पेनमध्ये अध्यक्षीय लोकशाही असून हा देश युरोपीय महासंघाचा १९८६ पासुन सभासद आहे. हा देश आर्थिकदृष्ट्या विकसित असून स्पॅनिश अर्थव्यवस्था जगात आठव्या आणि युरोपीय महासंघात पाचव्या क्रमांकावर आहे.

स्पेनचे स्वायत्त संघ

स्पेन देश १७ स्वायत्त संघांमध्ये विभागला गेला आहे. प्रत्येक संघाचे प्रांत हे उपविभाग आहेत. सेउता व मेलिया ही स्पेनची दोन स्वायत्त शहरे आहेत.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.