गाझा


गाझा हे भूमध्य समुद्रतीरावरील पॅलेस्टाईन प्रदेशाच्या गाझा पट्टीमधील सर्वांत मोठे शहर आहे.

गाझा
غزة
पॅलेस्टाईनमधील शहर

Gaza City

गाझा is located in पॅलेस्टिनी प्रदेश
गाझा
गाझा
गाझाचे पॅलेस्टाईनमधील स्थान

गुणक: 31°31′N 34°27′E / 31.51667°N 34.45°E

देश पॅलेस्टाईन ध्वज पॅलेस्टाईन
राज्य गाझा पट्टी
स्थापना वर्ष इ.स. पूर्व १५वे शतक
लोकसंख्या  
  - शहर ४,०९,६८०
अरबी भाषा

अरबी भाषा (रोमन लिपी: Arabic ; स्थानिक अरबी: العربية (उच्चारः अल् अरबीयाह् ); अरबी: عربي) ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. अरब लोकांवरुन ह्या भाषेचे नाव अरबी असे पडले.अरबी भाषेस पवित्र भाषा असे मानण्यात आले आहे, इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण हा ह्याच भाषेत आहे, तसेच इस्लाम धर्माचे संस्थापक,प्रेषित मुहम्मद पैगंबर ह्यांची बोलीभाषा अरबी होती.

सध्या जगातील एकूण २९ कोटी लोक अरबी भाषा वापरतात.

अलेक्झांडर द ग्रेट

महान अलेक्झांडर, अर्थात तिसरा अलेक्झांडर, मॅसेडोन (अन्य नावे: अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर ; ग्रीक: Μέγας Ἀλέξανδρος ; मेगास आलेक्सांद्रोस) (जुलै २०, इ.स.पू. ३५६ ते जून ११, इ.स.पू. ३२३) हा मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. जागतिक इतिहासात तो सर्वांत यशस्वी व कुशल सेनापतींपैकी एक गणला जातो. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो.

आपल्या कारकिर्दीत त्याने इराण, सीरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया,फिनीशिया, जुदेआ, गाझा, बॅक्ट्रिया तसेच भारतातील पंजाबपर्यंतचा प्रदेश जिंकला. फारसी दस्त ऐवजांनुसार त्याला एस्कंदर-इ-मक्दुनी (मॅसेडोनियाचा अलेक्झांडर) म्हटले जाते. तर उर्दू आणि हिंदी दस्तऐवजांत त्याला सिकंदर-ए-आझम म्हटले गेले आहे.

प्लूटार्क आणि एरियन या प्राचीन ग्रीक इतिहासकारांनी लिहून ठेवलेला अलेक्झांडरचा समग्र इतिहास योग्य आणि खरा इतिहास म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यापैकी 'अलेक्झांडरचे बालपण आणि तारुण्या'वर प्लूटार्कचा इतिहास अधिक समग्र आहे.

आय.एस.ओ. ३१६६-१

आय.एस.ओ. ३१६६-१ अल्फा-२ (इंग्लिश: ISO 3166-1 alpha-2) हे आय.एस.ओ.ने तयार केलेले एक प्रमाण आहे. ह्या प्रमाणामध्ये जगातील सर्व देशांना दोन अक्षरी संक्षिप्त कोड दिला गेला आहे जो बहुतेक सर्व अधिकृत दस्तावेजांमध्ये वापरला जातो. हे प्रमाण आय.एस.ओ. ३१६६ ह्या भौगोलिक प्रमाणसमूहाचा भाग आहे.

आय.एस.ओ. ४२१७

आय.एस.ओ. ४२१७ (इंग्लिश: ISO 4217) हे आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने तयार केलेले प्रमाण आहे. ह्या प्रमाणामध्ये जगातील सर्व चलनांसाठी तीन अक्षरी कोड ठरवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये त्या चलनाचे चिन्ह न वापरता आय.एस.ओ. ४२१७ कोड वापरला जातो. उदा. भारत देशाच्या रुपयाचे चिन्ह हे असले तरीही अधिकृतपणे INR हा कोड किंवा अमेरिकन डॉलरसाठी $ च्या ऐवजी USD हा कोड वापरले जातात.

आशिया

आशिया हा पृथ्वीवरील सात भूखंडांपैकी एक आहे. आशिया जगातील सर्वांत मोठा व सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला खंड आहे. जगातील ६०% लोकसंख्या आशियात राहते. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी ८.६% भाग आशियाने व्यापला आहे.

सिंधू संस्कृती, बॅबिलोनियन संस्कृती, सुमेरियन संस्कृती इ. प्राचीन संस्कृतींचा उगम या खंडातच झाला. हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, पारशी, शिख इ. धर्मांचा उदय देखील याच खंडात झाला.

हे देश आशिया व युरोप ह्या दोन्ही खंडांत गणले जातात. ह्या देशांकरिता क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचे आकडे त्यांच्या आशियातील भागांकरिता आहेत.* हे देश आशिया व ओशानिया ह्या दोन्ही खंडांत गणले जातात. ह्या देशांकरिता क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचे आकडे त्यांच्या आशियातील भागांकरिता आहेत.

== संदर्भ ==ठ

इजिप्त

इजिप्त (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: ˈiː.dʒɪpt; इजिप्शियन: केमेत (Kemet); कॉप्टिक: Ⲭⲏⲙⲓ (कीमि); अरबी/हिंदी: مصر‎ (मिस्र); इजिप्शियन अरबी: Máṣr (मास्र); हिब्रू: מִצְרַיִם (मित्झ्रायिम); ग्रीक: Χημία (खेमिया)); अधिकृत नाव इजिप्तचे अरब गणराज्य हा उत्तर आफ्रिकेतील प्रजासत्ताक देश आहे. या देशाचा बहुतेक भाग आफ्रिकेमध्ये असून केवळ सिनाई द्वीपकल्प हा सुवेझ कालव्याच्या पूर्वेकडील भाग आशियामध्ये आहे. यामुळे इजिप्त हा देश मध्यपूर्वेशी संबंधित मानला जातो.

इजिप्तचे क्षेत्रफळ अंदाजे १०,२०,००० चौरस किलोमीटर आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने इजिप्त हा जगात पंधराव्या क्रमांकाचा देश आहे. इजिप्तच्या ७.७ कोटी लोकसंख्येपैकी (२००५चा अंदाज) बहुतेक लोक नाईल नदीच्या जवळ राहतात. या भागातच शेतीयोग्य जमीन आहे. इजिप्तचा इतर बराच प्रदेश हा सहारा वाळवंटाचा भाग आहे. या भागात फार कमी लोक राहतात. आजकालच्या इजिप्तमधील बहुसंख्य लोक शहरी असून ते अरब लोकसंख्याबहुल अश्या कैरो व अलेक्झांड्रिया, इजिप्त या शहरांजवळ राहतात.

इजिप्त हा देश त्याच्या प्राचीन संस्कृतीकरिता प्रसिद्ध आहे. गीझा येथील पिरॅमिड, कर्णाकचे मंदिर, राजांची दरी यासारखी जगातील प्रसिद्ध आश्चर्ये इजिप्तमध्ये आहेत. आजचा इजिप्त हा अरब व मध्यपूर्व भागाचे महत्त्वाचे राजकीय व सांस्कृतिक केंद्र समजला जातो.

इस्रायल

इस्रायल, अधिकृतरीत्या इस्रायल संघराज्य, (हिब्रू: יִשְׂרָאֵל; अरबी: إِسْرَائِيلُ) हा पश्चिम आशियातील भूमध्य सागराच्या किनाऱ्याला लागून आग्नेयेस वसलेला एक देश आहे. जेरुसलेम ही इस्रायलची घोषित राजधानी आहे (जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी असण्यावरून वाद चालू आहे. त्यामुळे बऱ्याच राष्ट्रांनी आपले दूतावास तेल अवीव्हमध्ये ठेवले आहेत).इस्रायलमध्ये संसदीय लोकशाही असून ते जगातले एकमेव ज्यू राष्ट्र आहे. परंतु इस्रायलमध्ये इतर धर्माचे आणि इतर पंथाचे लोकही आहेत (पहा इस्रायली लोक).अमेरिकेने इस्राएलची राजधानी जेरुसलेम यास राजधानी म्हणून मान्यता दिली आहे.

गाझा पट्टी

गाझा पट्टी हा भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेला एक वादग्रस्त प्रदेश आहे. गाझा पट्टी व वेस्ट बँक हे दोन प्रदेश मिळुन पॅलेस्टाईन प्रांताची स्थापना झाली आहे. गाझा पट्टी सुमारे ४१ किमी लांब तर ६ ते १२ किमी रुंद आहे. हमास ह्या अतिरेकी राजकीय संघटनेचा गाझा पट्टीवर अंमल आहे.

जगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)

जगात एकूण २३१ सार्वभौम देश आहेत. या जगातील देशांच्या यादीमध्ये जगातील देश त्यांच्या एकूण क्षेत्रफळानुसार क्रमबद्ध केले आहेत. इतर प्रकारांनी क्रम बघण्यासाठी त्या त्या मथळ्याजवळील चौकोनावर टिचकी द्या. हे क्षेत्रफळ जमीन व देशांच्या भौतिक सीमेच्या आत असलेले पाण्याचे साठे ह्यांची बेरीज आहे.

तोरिनो

तोरिनो किंवा तुरिन (इटालियन: Torino, It-Torino.ogg ; प्यिमाँतीज: Turin) ही इटली देशाच्या मधील प्यिमाँत प्रदेशाची राजधानी व उत्तर इटलीमधील एक मोठे औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इटलीच्या वायव्य भागात पो नदीच्या काठावर व आल्प्स पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तोरिनो शहराची लोकसंख्या २००९ साली ९,१०,१८८ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे.

इटलीच्या सांस्कृतिक इतिहासात तोरिनोला मानाचे स्थान आहे. येथील कला संग्रहालये, ओपेरागृहे ग्रंथालये, चर्च, उद्याने व भोजनालये प्रसिद्ध आहेत. पर्यटन हा येथील एक मोठा उद्योग असून इटलीमधील पहिल्या दहा व जगातील २५० पर्यटनस्थळांमध्ये तोरिनोची गणना होते. ५८ अब्ज डॉलर इतकी आर्थिक उलाढाल असणारे तोरिनो हे आर्थिक दृष्ट्या इटलीमधील रोम व मिलानखालोखाल तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. इटलीमधील मोटारवाहन उद्योगाचे तोरिनो हे सर्वात मोठे केंद्र आहे. फियाट कंपनीचे मुख्यालय ह्याच शहरात आहे.

पॅलेस्टाईन

पॅलेस्टाईन (ग्रीक: Παλαιστίνη, Palaistinē; लॅटिन: Palaestina; हिब्रू: ארץ־ישראל ,פלשׂתינה; अरबी: فلسطين) हा मध्यपूर्वेमधील भूमध्य समुद्र व जॉर्डन नदीच्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे. पॅलेस्टाईन प्रदेशाच्या सीमा इतिहासामध्ये अनेक वेळा बदलल्या गेल्या आहेत. सध्या पॅलेस्टाईन प्रदेशामध्ये इस्रायल हा स्वतंत्र देश तर गाझा पट्टी व वेस्ट बँक हे दोन पॅलेस्टिनी भूभाग गणले जातात. ह्या दोन भूभागांचा मिळून सार्वभौम पॅलेस्टाईन राज्य स्थापण्यात यावे, अशी मागणी गेले अनेक वर्षे करण्यात येत आहे. पॅलेस्टाईन राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वादग्रस्त पॅलेस्टिनी राज्यावर सध्या पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीची सत्ता आहे.

पॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती

पॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती (अरबी: السلطة الوطنية الفلسطينية अल-सुल्ता, अल-वतनीयाह, अल-फिलिस्तानीयाह) ही मध्यपूर्वेतील पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक व गाझा पट्टी ह्या वादग्रस्त भूभागांचा राज्यकारभार सांभाळणारी एक संस्था आहे. १९९४ साली ओस्लो येथे झालेल्या बैठकीमध्ये ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली.

भूमध्य समुद्र

भूमध्य समुद्र हा अटलांटिक महासागराचा एक भाग व पृथ्वीवरील एक प्रमुख समुद्र आहे. हा समुद्र चारही बाजूंनी जमिनीने वेढला गेला असून त्याच्या उत्तरेस युरोप व अनातोलिया तर दक्षिणेस आफ्रिका खंड आहेत. भूमध्य समुद्र पश्चिमेला जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने अटलांटिक महासागरासोबत जोडला गेला आहे. डार्डेनेल्झ व बोस्फोरस ह्या सामुद्रधुन्या भूमध्य समुद्राला मार्माराच्या समुद्रासोबत व काळ्या समुद्रासोबत जोडतात. तसेच इजिप्तमधील सुएझ कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्रासोबत जोडतो.

तांत्रिक दृष्ट्या अटलांटिक महासागराचाच एक भाग असला तरी बरेचदा भूमध्य समुद्र एक वेगळा पाण्याचा साठा समजला जातो. २५ लाख चौरस किमी इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ असलेल्या भूमध्य समुद्राची सरासरी खोली १,५०० मी तर कमाल खोली ५,२६७ मी इतकी आहे.

मध्यपूर्व

मध्यपूर्व हे पृथ्वीवरील एक भौगोलिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात कोणत्या देशांचा समावेश आहे किंवा कोणते देश समाविष्ट करावे याबद्दल काही निश्चित धोरण नसले, तरी मध्यपूर्वेत साधारणपणे भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील नैर्ऋत्य आशियातील, लगतच्या यूरोपमधील व आफ्रिकेच्या उत्तर भागातील काही देश गणले जातात. इजिप्त, इराक, इराण, इस्रायल, ओमान, कतार, कुवेत, जॉर्डन, बहरीन, येमेन, लिबिया, लेबानन, संयुक्त अरब अमिराती, सिरिया, सुदान, सौदी अरेबिया ही सर्व अरब राष्ट्रे, तुर्कस्तान आणि सायप्रस ही अर्ध-युरोपियन राष्ट्रे, आणि अल्जीरिया, मोरोक्को, ट्यूनीशिया या आफ्रिकी देशांचा स्थूलपणे, मध्यपूर्वेत समावेश होतो.

मे ४

मे ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२४ वा किंवा लीप वर्षात १२५ वा दिवस असतो.

वेस्ट बँक

वेस्ट बँक हा मध्यपूर्वेतील एक वादग्रस्त भूभाग आहे. वेस्ट बँक व गाझा पट्टी हे दोन पॅलेस्टाईनचे प्रांत मानले जातात. वेस्ट बँक प्रांत जॉर्डन नदीच्या पश्चिम काठावर वसला आहे. वेस्ट बँकच्या उत्तर, पश्चिम व दक्षिणेला इस्रायल देश आहे व पूर्वेला जॉर्डन आहे. १९४८ ते १९६७ दरम्यान वेस्ट बँक जॉर्डनच्या ताब्यात होता, पण १९६७ साली झालेल्या इस्रायल-अरब युद्धानंतर इस्रायलने वेस्ट बँकवर कब्जा मिळवला.

वेस्ट बँक प्रदेश एकुण ५,६४० वर्ग किमी क्षेत्रफळ जमिनीवर वसला आहे व त्याची लोकसंख्या २३,४५,००० आहे ज्यातील बहुतांशी लोक अरब मुस्लिम आहेत. वेस्ट बँक सध्या कोणत्याच देशाचा सार्वभौम भाग नसल्यामुळे त्याची सुरक्षा व्यवस्था इस्रायलच्या ताब्यात आहे. वेस्ट बँक जरी इस्रायलचा भूभाग नसला तरी तेथील अनेक ठिकाणी इस्रायलने अनधिकृत अतिक्रमण करून वसाहती उभ्या केल्या आहेत. ह्या वसाहतींना आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध असला तरी आपल्या देशाच्या नैसर्गिक वाढ व प्रगतीसाठी ह्या वसाहती आवश्यक आहेत असा युक्तिवाद इस्रायलने लढवला आहे.

रामल्ला ह्या वेस्ट बँकमधील शहरात पॅलेस्टिनियन नॅशनल ऑथोरिटीचे मुख्यालय आहे. बेथलहम, जेरिको, नाब्लुस, हेब्रॉन, अल-बिरेह ही वेस्ट बँकमधील काही महत्त्वाची शहरे आहेत.

सहा दिवसांचे युद्ध

सहा दिवसांचे युद्ध (हिब्रू: מלחמת ששת הימים}}; अरबी: النكسة) हे मध्य पूर्वेमधील इस्रायल विरुद्ध इजिप्त, जॉर्डन व सिरिया ह्या देशांदरम्यान लढले गेलेले एक युद्ध होते. जून १९६७ मध्ये सहा दिवस चाललेल्या ह्या युद्धामध्ये इस्रायलचा सपशेल विजय झाला. ह्या युद्धाची परिणती म्हणून इस्रायलने इजिप्तकडून गाझा पट्टी व सिनाई द्वीपकल्प; सिरियाकडून गोलान टेकड्या तर जॉर्डनकडून वेस्ट बँक हे भूभाग बळकावले.

हमास

हमास (अरबी: حماس हमास, [उर्दू]]: حركة المقاومة الاسلامية) ही एक पॅलेस्टाईन सुन्नी मुस्लिम सैनिकी संघटना, लष्कर संबंधित विंग, Izz जाहिरात-दिन अल Qassam brigades सह आहे. हमास किंवा त्याच्या लष्करी विंग यांना ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इजिप्त, युरोपियन युनियन, इस्रायल, जपान, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि जॉर्डन मधे दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. इराण, रशिया, तुर्की, चीन, दक्षिण आफ्रिका, आणि काही अरब राष्ट्रांच्या मध्ये ही दहशतवादी संघटना म्हणून मानली जात नाही. वेस्ट बँक आणि गाझा पट्टीतील पॅलेस्टेनियन नॅशनल ऑथॉरिटी मध्ये विधानमंडळात (legislative council ) प्राबल्य.

स्थापना १९८७.

इस्राएल मधील नागरिकांवर हल्ल्यांसाठी तसेच पॅलेस्टाईन समाजासाठी समाजकार्ये करण्यात प्रसिद्ध.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.