गनिमी कावा

गनिमी कावा ही एक युद्धनीती आहे.

गनिमी कावा अथवा इंग्रजीत गुरिला वॉर हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे. यात अतिशय कमी संख्यबळाने तुलनेने मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते. असे अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूच्या मनोधैर्य खच्ची होते. गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते. महाराष्ट्रातील सह्याद्रीजवळील प्रदेश ह्या युद्धनीतीच्या वापरास अत्यंत सोयीचा आहे.

शहाजीराजांनी निजामशाहीच्या अखेरच्या दिवसात ह्या पद्धतीचा वापर केला. शिवाजीराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याचे महत्त्व खूप आहे.शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या युद्धनितीचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला.

गनिमी कावा म्हणजे काय?

शिवाजी महाराजांनी वापर केलेल्या युद्धतंत्राचे स्वरूप विशद करण्यापूर्वी 'गनिमी कावा' या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ असे आहेत. 'गनीम' हा शब्द मूळ फारसी भाषेतला असून 'गनिमी' हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. 'कावा' या शब्दाला लक्षणेने 'फसवणूक', धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दाला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि 'शत्रूवरचा कपटयुक्त हल्ला' अथवा 'कपट-युद्ध' असा 'गनिमी कावा' या संज्ञेचा अर्थ रूढ झाला.

मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या संदर्भात होत असल्याने गनीम म्हणजे मराठ्यांचा शत्रू असा अर्थ निघतो.

मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' या शब्दात केला आहे तो आत्मसमर्थनार्थ. मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत ‍आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार? मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, 'आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले! 'गनिमी कावा' हा शब्दप्रयोग रूढ झाला तो असा. शत्रूने केलेली अवहेलना आपण मानाची बिरुदावली समजून स्वीकारली आहे. याचे कारण, मराठ्यांनी कालपरिस्थित्यनुरूप स्वतःचे असे युद्धतंत्र विकसित केले होते, याची जाणीवच आपल्याला आहे असे दिसून येत नाही.

'धूर्तपणा', 'कपट', 'कावेबाजपणा' अशा प्रकारचे लाक्षणिक अर्थ 'कावा' या शब्दाला प्राप्त झालेले आहेत. कोणत्याही शब्दाला वाच्यार्थ असल्याविना त्याच्याभोवती लक्षणेने निर्माण झालेली अर्थवलये गोळा होत नसतात हे भाषाविज्ञानाचे तत्त्व आहे. त्याचप्रमाणे वाच्यार्थाची काही चिन्हे लक्षणेने येणाऱ्या अर्थात कुठे तरी दडलेली असतात. या सिद्धांतास अनुसरून 'कावा' या शब्दास असलेला मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे.

'महाराष्ट्र शब्दकोशा'त कावा या शब्दाचे पाच अर्थ दिले आहेत.त्यंपैकी शेवटचे चार या शब्दाला लक्षणेने प्राप्त झालेले असून ते असे आहेत : २. लुच्चेगिरी, ३. गुप्तकट, ४. हुलकावणी आणि ५. पीछेहाट. 'कावा' या शब्दाचा वाच्यार्थ प्रथम देण्यात आला आहे तो असा : घोड्याची रग जिरविण्यासाठी त्या घ्यावयास लावलेले फेरे, मंडले, घिरटी, फेर, घोडा भरधाव पळत असता त्याला वाटेल तसा ‍वळविणे, फिरविणे, मंडळाकार आणणे, पुढे मागे भरधाव सोडणे'. 'गनिमी काव्या'च्या मूळ स्वरूपाचा शोध या वाच्यार्थास प्रमाण मानल्यानंतर कसा लागतो हे आता आपण पाहू.

कावा हा शब्द घोड्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाशी संबंधित आहे.पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणाऱ्या घोड्यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते.तसे झाले तरच त्या त्या दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो.मराठ्यांच्या लष्करात घोड्यांना देण्यात आलेले शिक्षण प्रामुख्याने 'काव्या'चे होते. भरवेगात धावणाऱ्या घोड्याचा वेग यत्किंचितही मंद होऊ न देता नि‍रनिराळ्या दिशांनी आणि उलटसुलट वळण घेण्यात मराठ्यांचे लष्करी घोडे तरबेज असत. वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते. परंतु वेग मंदावला असताना दिशा वा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यास समोरच्या माणसास वा शत्रूस तो कोणत्या बाजूने वळण घेणार आहे याचा अंदाज बांधता येतो. रणक्षेत्रात धावत्या घोड्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अंदाज बांधणे शत्रूस शक्य होऊ नये या हेतूने अनपेक्षित वळणे घेण्याचे शिक्षण लष्करी घोड्यांना देण्यात येत असे. तोच 'कावा'. ही वळणे घोडेस्वार युद्धाच्या सोयीच्या दृष्टीने घेत असतो. भरधाव दौडत येणारा वारू शत्रूची दिशामूल होते. काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल हे प्रधान उद्दिष्ट असते. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेऊन मराठ्यांचे घोडदळ लढत असे म्हणूनच मराठ्यांच्या शत्रूंनी या युद्धपद्धतीस 'गनिमी कावा' हे नाव दिले. या नावात मूळातच एक युद्धतंत्र दडलेले आहे ते दुर्लक्षित राहिल्याने 'गनिमी कावा' वा केवळ 'कावा' या शब्दास लक्षणेने 'कपट', फसवणूक' यांसारखे अर्थ प्राप्त झाले.

प्रेमात व युद्धात सर्वच क्षम्य असते या उक्तीने गनिमी काव्याची पाठराखण करता येते. आपल्या स्वराज्यावर आलेला शत्रू यास कसेही करून परतविणे हेच छत्रपती शिवाजी महाराज उद्दिष्ट होते.

गनिमी काव्याचे घटक

यात :

 • १. नियोजन व अंमलबजावणी
 • २. समन्वय आणि नियंत्रण

या प्रमुख गोष्टी आहेत.त्यात सैन्य व्यवस्थापन तसेच वेळेचे व्यवस्थापनही अंतर्भूत आहे.

गनिमी काव्याचे हेतू

 • १. शत्रूला घाबरविणे किंवा दहशत बसविणे.
 • २. त्याचे मानसिक खच्चीकरण
 • ३. आर्थिकदृष्ट्या शत्रूला अपंग करणे
 • ४. कोंडीत पकडणे.
 • ५. अशी परिस्थिती तयार करणे ज्याने तो शरण येण्यास बाध्य होईल.
 • ६. शत्रूला लढाई मैदान सोडून पळून जावयास लावणे.
 • ७. शत्रुसैन्याची फळी विस्कळीत करणे.
 • ८. त्याला फसविणे.
 • ९. चुकीची माहिती मुद्दाम पुरविणे.
 • १०. त्याची दिशाभूल करणे
 • ११. शत्रूला बेसावध करणे.
 • १२. आपण दुर्बल आहोत किंवा आपल्यात लढाईची हिम्मत नाही असे भासविणे.
 • १३. शरण येण्याची बतावणी करून एकदम आघात करणे.
 • १४. शत्रूला पाठलाग करावयास भाग पाडणे.
 • १५. लढाईचे क्षेत्र आपल्यास अनुकूल असे निवडून शत्रूला कसेही करून तेथे नेणे.
 • १६. शत्रूचे नुकसान करून दरारा निर्माण करणे.
 • १७. म्होरक्यास ठार करणे, ज्याने शत्रुसैन्यात गोंधळ माजतो.

विसाव्या व एकविसाव्या शतकातील गनिमी युद्धे

आफ्रिका

 • अँगोलन यादवी युद्ध
 • दारफूर संघर्ष
 • आयवोरियन यादवी युद्ध
 • ऱ्होडेशियन बुश युद्ध
 • सुदान
 • तुआरेगचे उठाव
 • पश्चिम सहारा युद्ध

आशिया

युरोप

 • कोसोव्हो युद्ध

संदर्भ

 • "राजा शिवछत्रपती", लेखक : ब. मो. पुरंदरे
 • "शिवकालीन राजनीती आणि रणनीती" या पुस्तकातून साभार
अहमदनगर

अहमदनगर हे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील एक शहर आहे, जे पुण्याच्या इशान्य दिशेस १२० किमी पूर्व आणि औरंगाबादपासून ११4 किमी अंतरावर आहे. अहमदनगरचे नाव अहमद निजाम शाह प्रथम यांचे आहे, ज्याने १४९४ मध्ये या शहराची स्थापना बहामनी सैन्याविरूद्ध लढाई जिंकली अशा रणांगणाच्या जागेवर केली. बहमनी सल्तनत फुटल्यानंतर अहमदने अहमदनगरमध्ये नवीन सल्तनत स्थापन केली, ज्याला निजाम शाही राजवंश म्हणून ओळखले जाते.

अहमदनगरमध्ये निझाम शाही काळातील अनेक इमारती आणि साइट आहेत. एकेकाळी जवळजवळ अभेद्य मानला जाणारा अहमदनगर किल्ला, भारतीय स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी जवाहरलाल नेहरू (भारताचे पहिले पंतप्रधान) आणि इतर भारतीय नेत्यासाठी कारागृह म्हणून वापरला होता. तेथील काही खोल्या संग्रहालयात रूपांतरित करण्यात आल्या आहेत. १९४४ मध्ये अहमदनगर किल्ल्यावर कैदेत असताना नेहरूंनी 'दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले. अहमदनगरमध्ये इंडियन आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (एसीसी अँड एस), मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी), वाहन संशोधन व विकास आस्थापना (व्हीआरडीई) आणि गुणवत्ता नियंत्रण व्हीकल्सचे नियंत्रक (सीक्यूएव्ही) देखील आहेत. भारतीय सैन्य आर्म्ड कोर्प्सचे प्रशिक्षण आणि भरती केंद्र देखील येथे आहे.

अहमदनगर हे एक तुलनेने छोटे शहर आहे आणि येथे जवळच्या पश्चिम महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरांपेक्षा कमी विकास दिसून येतो. अहमदनगरमध्ये १९ साखर कारखाने आहेत आणि ते सहकार चळवळीचे जन्मस्थानही आहेत. कमी पावसामुळे अहमदनगर अनेकदा दुष्काळाने त्रस्त असते. दैनंदिन जीवनातील संप्रेषणासाठी मराठी ही प्राथमिक भाषा आहे. सन २०३१ पर्यंत अहमदनगरने शहराच्या विकासाची योजना प्रकाशित केली.

गुणक: 19.08°N 74.73°E / 19.08; 74.73

अहमदनगर उच्चार हे महाराष्ट्रातील शहर सीना नदीच्या काठावर वसलेले आहे जे पुण्यापासून ईशान्येकडे साधारणपणे १२० किलोमीटरवर आहे. हे शहर अहमदनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

आशा काळे

आशा काळे या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे झाले असले तरी त्या आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म २३नोव्हेंबर १९४८रोजी गडहिंग्लज येथे झाला. शालेय शिक्षण कोल्हापूर अणि पुणे येथे झाले. वयाच्या १४व्या वर्षी नाटकांत कामे करावयास सुरुवात केल्याने त्यांना कॉलेजचे शिक्षण मिळाले नाही. कथ्थक नृत्याचे त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असून त्या सुरुवातीला नृत्याचे कार्यक्रमही करीत. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक, 'सीमेवरून परत जा' हे, आणि पहिला चित्रपट 'तांबडी माती'. त्यांच्या अभिनय कारकीर्दीला २०१५ साली ५० वर्षे पूर्ण झाली.

समाजप्रबोधनात्मक माहितीपट, लघुपट आणि मराठी चित्रपट निर्माते माधव पांडुरंग नाईक (निधन सप्टेंबर २०१३) हे आशा काळे यांचे पती होत.

२००८साली गोव्यात झालेल्या ६व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आशा काळे यांच्या हस्ते झाले होते.

कृष्णा कोंडके

कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (८ ऑगस्ट, इ.स. १९३२ ; नायगांव, मुंबई - १४ मार्च, इ.स. १९९८ ; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली.

विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत.

छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृती

या लेखातील काही मूळ उतारे विकिस्रोत या बंधुप्रकल्पात स्थानांतरित केले जातील तर काही उतारे कॉपीराईट संदिग्धतेमुळे वगळले जातील

छत्रपती शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषांत प्रकाशित झाल्या आहेत. फक्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेली ६० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. यातील बहुतांशी पुस्तके संशोधनावर आधारित असल्याने त्यांना संदर्भ ग्रंथांची मान्यता आहे; तसेच हजारो कथा, ललित कथा, स्तुतिपर लिखाणे ही विविध मासिके, वृतपत्रांतून प्रदर्शित होत असतात.

नानासाहेब सरपोतदार

नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार (जन्म: नांदवली, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, ११ फेब्रुवारी इ.स. १८९६, मृत्यू : पुणे, २३ एप्रिल इ.स. १९४०:) हे मराठी चित्रपटसृष्टीचे एक आद्य शिल्पकार समजले जातात. ते अभिनेते, लेखक व चित्रपट निर्माते होते. ते स्त्री-भूमिकाही करत.

नानासाहेब नोकरी करून शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेले, तेथून वयाच्या तेराव्या वर्षीच घर सोडून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत जाऊन राहिले. तिथे वत्सलाहरण, सैरंध्री, दामाजी या चित्रपटांत छोटया-मोठया भूमिका केल्या. आईच्या आग्रहाखातर, शिक्षणासाठी ते एका नातेवाइकाकडे इंदूरला गेले. तिथेही अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना. शेवटी नटश्रेष्ठ गणपतराव जोशी यांच्या ओळखीने २१ ऑक्टोबर १९१९ रोजी नव्यानेच स्थापन झालेल्या कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत ते दाखल झाले.

१९२७ सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर पर्वतीच्या पायथ्याशी, आदमबाग येथे एक रुपया भांडवलावर सरपोतदारांनी आर्यन फिल्म कंपनीची स्थापना केली. आठ आणे जमिनीचे भाडे व बाकी आठ आण्याचे पेढे, नारळ, हार, फुले घेऊन मुहूर्त केला गेला. पुढे चित्रपट प्रदर्शक, मुंबईच्या कोहिनूर थिएटरचे मालक बाबुराव कान्हेरे आर्यन फिल्म कंपनीच्या भागीदारीत आले. सरपोतदार अनुभवी नट, लेखक, दिग्दर्शक होतेच याशिवाय ते छायालेखनही शिकले होते. आता ते निर्मातेही झाले होते. हरहर महादेव हा आर्यनचा पहिला चित्रपट होता, पण चित्रपटाच्या नावावर ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने हरकत घेतल्यामुळे त्यांनी नाव बदलून निमक हराम केले.

नाशिकजवळच्या येवळे गावातील अंबू सगुण नावाची मुलगी मूकपटात बालकलाकाराची भूमिका करत असे. नानासाहेबांच्या आर्यन फिल्म कंपतीत प्रथम ती नायिका झाली व पुढे ललिता पवार या नावाने लोकप्रिय झाली. महाराची पोर हा चित्रपट सरपोतदारांनी लिहून दिग्दर्शित केला होता. अंबू ऊर्फ ललिता पवारने महाराजाच्या मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट पहायला सरोजिनी नायडू गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमात आल्या होत्या. या चित्रपटाची महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, बॅरिस्टर बाप्टिस्टा, अच्युत बळवंत कोल्हटकर आदींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. मद्रासच्या हिंदू, जस्टिस वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहून सरपोतदारांचे कौतुक केले होते.

नामदेवराव जाधव

नामदेवराव जाधव हे एक मराठी वक्ते आणि लेखक आहेत. ते महाराष्ट्रातील तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यांनी कित्येक पुस्तके लिहिली असून त्यातील काही पुस्तके बेस्ट सेलर आहेत. शिक्षकांविषयी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत.

भालजी पेंढारकर

भालचंद्र गोपाळ पेंढारकर ऊर्फ चित्रतपस्वी भालजी पेंढारकर (मे २, १८९८ - नोव्हेंबर २६, १९९४) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते.

भालजींच्या “महारथी कर्ण” व “वाल्मिकी” या सिनेमातून भूमिका साकारत असतानाच अभिनेत्री लीलाबाईचे व त्यांचे प्रेम जुळले आणि त्याचे रूपांतर विवाहात झाले व लीला चंद्रगिरीच्या त्या लीला पेंढारकर झाल्या.

भूतान कम्युनिस्ट पार्टी (मार्क्स-लेनिन-माओवादी)

भूतान कम्युनिस्ट पार्टी (मार्क्स-लेनिन-माओवादी) हा भूतान मधला एक बंदी घातली असलेला राजकीय पक्ष आहे.

भूकपा (मालेमा) हे एका नव लोकशाही क्रांतीची मागणी करते व भूतानातील राजेशाही व वांगचुक घराण्याचे पाडाव करण्याचे भाष्य करते. त्यांच्या सैनी दलाचे नाव 'भूतान टायगर फोर्स' आहे. सध्या पक्षात अंदाजे ६०० - १००० सदस्य आहेत. भूतान सरकार द्वारा पक्षावर बंदी घालण्यात आलेली आहे.

मराठा साम्राज्य

मराठा साम्राज्य इ.स. १६७४ ते इ.स. १८१८ पर्यंत भारतात अस्तित्त्वात असलेले हिंदू राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य शिवाजी महाराजांनी इ.स. १६४५ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालावधीत औरंगजेबाविरूद्ध गनिमी कावा वापरून केलेल्या लढायांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार प्रचंड वाढला. इ.स. १६८०मधील शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज गादीवर आले आणि आपल्या 8 वर्षाच्या झंझावाती कारकिर्दीत स्वराज्याच्या सीमा वाढवल्या. नंतर फंदफितुरीतून औरंगजेबाने त्यांची हत्त्या केली. त्यानंतर स्वराज्यात काही काळ अस्थैर्य माजले, संताजी आणि धनाजीसारख्या शूर सरदारांनी स्वराज्याचे अस्तित्व टिकवले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजींचे वंशज जरी राज्य करत असले तरी पंतप्रधान असलेल्या मनमानी करुन(प्रथम बाजीराव नंतर)पेशव्यांच्या हातात राज्यकारभाराची सूत्रे गेली . पेशवे हे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य अधिक विस्तार पावले शेवटी पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेरचा पेशवा दुसरा बाजीराव इंग्रजांबरोबर तिसर्‍या लढाईत पराभूत झाला व त्याने इंग्रजांच्या मदतीने पेशवा बनून बीठूर येथे स्थायीक झाला(झाशी राणी काल)

गनिमी कावा, डोंगरांतून अभेद्य किल्ले बांधणे व त्यायोगे आसपासच्या मलुखावर वचक ठेवणे हा मराठा साम्राज्याचा सुरुवातीला पाया होता. या साम्राज्याला मोठी किनारपट्टी होती व कान्होजी आंग्रे व इतर दर्यासारंगांच्या मदतीने ही सीमा प्रभावीपणे सांभाळली. दक्षिण भारतातील इतर राज्ये व मराठा साम्राज्यातील हा एक मोठा फरक होता. मराठी आरमाराने पोर्तुगीज व ब्रिटिश आरमारांना शह दिल्यामुळे त्यांचा उपयोग करून या परकीय सत्तांना किनाऱ्यांकडून शिरकाव करता आला नाही. कान्होजी आंग्रे यांनी भारतातील पहिले मोठे आरमार उभे केले व त्यामुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणले जाते.

लीलाबाई भालजी पेंढारकर

लीलाबाई भालजी पेंढारकर, माहेरच्या लीला चंद्रगिरी, (ऑक्टोबर २४, १९१० - ?) या मराठी चित्रपटअभिनेत्री होत्या. भालजी पेंढारकर हे त्यांचे पती होते.

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी

शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची यादी खाली दिल्याप्रमाणे आहे. यामध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे.यापैकी सुमारे १११ किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी ४९ किल्ले डागडुजी करून त्यात आवश्यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले.या किल्ल्यांच्या यादीत शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत(स्वराज्याच्या मालकीच्या) त्यावेळी असलेल्या, (शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या/शिवाजी महाराजांनी बांधलेल्या) किल्ल्यांचा समावेश आहे. या यादीचा उद्देश शिवाजी महाराजांचे माहिती व त्यांंचे काम दाखविण्याचा आहे. त्यांची मजल कोठपर्यंत होती हे दाखविणे हा ही एक उद्देश आहे.

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात बारा मावळ या प्रदेशातुन केली. हा प्रदेश जरी लहान होता तरी तो जंगल झाडी,डोंगर व नद्या यांनी युक्त होता. तेथे आठ किल्ले होते.हा प्रदेश लष्करी दृष्टीतून अजिंक्य असाच होता.शिवाजी महाराजांचा कल अजिंक्य भूभागावर किल्ले बांधण्याचा होता.त्यांनी घाट तेथे किल्ला हे धोरण अंगिकारले.हे किल्ले एक प्रकारच्या तपासणी चौक्याच होत्या.तेथून कोणीही आत प्रवेश करू शकत नव्हते.प्रवेश केलाच तर वापस जाण्याची हमी नव्हती.

समतेचा पुतळा

समतेचा पुतळा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई किंवा स्टॅचू ऑफ इक्वालिटी) हे मुंबई, महाराष्ट्रातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आहे. हे स्मारक भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ आहे. येथे १३७.३ मीटर (४५० फुट) उंच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला जाईल. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबर २०१५ रोजी स्मारकाचे भूमिपूजन केले. बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे थोर पुरस्कर्ते असल्यामुळे व समतेसाठी त्यांनी आजीवन केलेल्या संघर्षासाठी या स्मारकाला "स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी" अर्थात "समतेचा पुतळा" म्हटले आहे. आंबेडकरांचे समाधी स्थळ चैत्यभूमी येथून जवळच आहे. या स्मारकाच्या जमिनीचे क्षेत्रफळ ४८,४१४.८३ चौरस मीटर (साडे १२ एकर) असून स्मारकासाठीचा खर्च सुमारे ७८३ कोटी रूपये इतका येण्याता अंदाज आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी (१८२ मीटर) व स्प्रिंग टेंपल बुद्ध (१५३ मीटर) यांच्यानंतर हा आंबेडकरांचा पुतळा जगातील तिसरा सर्वात उंचीचा पुतळा असेल.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि न्यायासाठी लढा दिला आणि भारतातील कोट्यवधी शोषीत जनतेला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला, त्यामुळे आंबेडकरांना समतेचे प्रतिक असे म्हटले जाते.

हिझबुल्ला

हिझबुल्ला (अरबी: حزب الله‎) ही पश्चिम आशियाच्या लेबेनॉन देशामधील एक ज्यूविरोधी शिया अतिरेकी संघटना व राजकीय पक्ष आहे. १९८२ साली इस्रायलच्या लेबेनॉनवरील हल्ल्यानंतर काही मुस्लिम धर्मगुरूंनी इराणच्या पाठिंब्यावर हिझबुल्लाची स्थापना केली. हिझबुल्लाचे पुढारी इराणचे अयातोल्ला रुहोल्ला खोमेनी ह्यांचे अनुयायी होते. इराणी सैन्याने हिझबुल्लाला लष्करी प्रशिक्षण दिले. १९८२ च्या हल्ल्यानंतर इस्रायलने दक्षिण लेबेनॉनमधील काही भूभाग बळकावला होता. १९८५ ते २००० दरम्यान हिझबुल्लाने इस्रायली सेनेविरूद्ध गनिमी कावा वापरून लढाई केल्यानंतर अखेर मे २००० मध्ये इस्रायलने दक्षिण लेबेनॉनमधून माघार घेतली.

सध्या हिझबुल्ला लेबेनॉनमधील एक प्रमुख राजकीय पक्ष असून तेथील शिया मुस्लिम जनतेचा हिझबुल्लाला मोठा पाठिंबा आहे. अमेरिका, फ्रान्स, युनायटेड किंग्डम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, सौदी अरेबिया, इस्रायल ह्या देशांनी हिझबुल्लाला अतिरेकी संघटना ठरवले असून त्यावर पूर्ण अथवा अंशत: बंदी घातली आहे.

२०११ सालापासून सुरू असलेल्या सीरियन यादवीमध्ये हिझबुल्लाने सीरियन सरकार व बशर अल-अस्सादची बाजू घेतली असून सीरियन विरोधकांसोबत लढा चालवला आहे.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.