ख्रिश्चन

ख्रिश्चन (ख्रिस्चन) (/ˈkrɪstʃən, -tiən/)किंवा ख्रिस्ती हे ख्रिस्ती धर्माचे पालन करणारे असे लोक आहेत, जे येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आणि शिकवणांवर आधारित एकेश्वरवादी अब्राहम धर्म आहे. ख्रिस्त आणि ख्रिश्चन हे शब्द Koine Greek शीर्षक ख्रिस्तोस Christós (Χριστός) या शब्दापासून बनविलेले आहेत,हिब्रू बायबलमधील संज्ञा मशीहा mashiach (מָשִׁיחַ) चे भाषांतर आहे. येशू ख्रिस्ताने स्थापन केलेल्या ख्रिश्चन धर्माचे अनुयायी होय.

Yellow cross (cropped)
I love Jesus Christ

लोकसंख्या

२०११ मध्ये Pew Research Center surveyनुसार २०१० मध्ये जगभरात २.२ अब्ज ख्रिस्ती होते, ते १९१० मध्ये सुमारे ६०० अब्ज (कसे शक्य आहे?) होते.[१]२०५० पर्यंत ख्रिश्चन लोकसंख्या ३ अब्जांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.[२] २०१२ च्या प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार जर सध्याचा ट्रेंड कायम राहिला तर २०५० मध्ये ख्रिस्ती हा जगातील सर्वात मोठा धर्म राहील.[३]

आज, ३७ % ख्रिस्ती अमेरिकेत राहतात, सुमारे २६% युरोपमध्ये राहतात, २४% उप-सहारा आफ्रिकेत राहतात, १३% आशिया आणि पॅसिफिकमध्ये राहतात आणि १% मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत राहतात. जगभरातील सर्व ख्रिस्ती लोकांपैकी निम्मे कॅथोलिक आहेत, तर तृतीयांशपेक्षा जास्त प्रोटेस्टंट- ३७%(Protestant )आहेत ऑर्थोडॉक्स (Orthodox) १२%. इतर ख्रिश्चन गट जगाच्या उर्वरित भागात आहेत. ख्रिस्ती लोक १५८ देशांत आणि प्रदेशांत आहेत. २८० दशलक्ष ख्रिस्ती अल्पसंख्याक म्हणून जगतात.[४]

ख्रिश्चनांची लोकसंख्या जगभरात सुमारे २१.५ लक्ष (३१%) असून ते मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप या खंडांमध्ये आढळतात. आशियाात ख्रिश्चन धर्मीय हे बौद्ध, हिंदूमुस्लिमांच्या तुलनेत फार कमी आहे परंतु आफ्रिका खंडाची अर्ध्यापेक्षा थोडी कमी लोकसंख्या ही ख्रिश्चन आहे. ख्रिश्चन असा एकमेव धर्म आहे की, ज्याचे प्रत्येक खंडात कोट्यवधी अनुयायी आहेत. जगभरातील छोट्या मोठ्या १५० पेक्षा अधिक देशात ख्रिश्चन बहुसंख्य आहेत. भारताच्या लोकसंख्येत ख्रिश्चनांचे प्रमाण २.३% आहे आणि हा धर्म भारताच्या ४ राज्यांत बहुसंख्य आहे.

प्रकार

ख्रिश्चन धर्माचे ३३,०००हून अधिक संप्रदाय असून त्यांना मानणाऱ्या ख्रिश्चनांतही प्रकार आहेत. <ref:http://www.philvaz.com/apologetics/a106.htm ref/>

चित्र

Famous Christians
Famous Christians around the world
Famous Orthodox Christians Mosaic
Famous Other Christians Mosaic
Famous Protestants

संदर्भ यादी

  1. ^ NW, 1615 L. St; Washington, Suite 800; Inquiries, DC 20036 USA202-419-4300 | Main202-419-4349 | Fax202-419-4372 | Media (2011-12-19). "The Size and Distribution of the World’s Christian Population". Pew Research Center's Religion & Public Life Project (en-US मजकूर). 2019-09-16 रोजी पाहिले.
  2. ^ NW, 1615 L. St; Washington, Suite 800; Inquiries, DC 20036 USA202-419-4300 | Main202-419-4349 | Fax202-419-4372 | Media (2011-12-19). "The Size and Distribution of the World’s Christian Population". Pew Research Center's Religion & Public Life Project (en-US मजकूर). 2019-09-16 रोजी पाहिले.
  3. ^ "Christians". Wikipedia (en मजकूर). 2019-09-16.
  4. ^ "Christians". Wikipedia (en मजकूर). 2019-09-16.

हेही पहा

आर्जेन्टिना

आर्जेन्टिना (स्पॅनिश: Argentina; उच्चार: आर्हेन्तिना (द.अ.) किंवा आर्खेन्तिना (स्पे.)) हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. ४०.५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ २७,६६,८८९ एवढे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आर्जेन्टिना दक्षिण अमेरिकेतील दुसरा तर जगातील आठवा मोठा देश आहे. या देशाचा धर्म ख्रिश्चन असून येथे स्पॅनिश व इटालियन भाषा बोलल्या जातात. फक्त दक्षिण अमेरिका खंडाचा विचार केल्यास हा देश आकाराने दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा देश बोलिव्हिया व केप हाॅर्नच्या मध्ये ३७०० किमी. लांब पसरलेला आहे. याची जास्तीत जास्त रूंदी १५०० किमी. आहे. अमेरिकेतील एका भव्य पर्वताचे '''अकंकागुआ''' नावाचे सर्वात उंच शिखर मात्र या देशात आहे. १८१६ मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाले. जगातील डिएगो मॅराडोना, लायोनेल मेस्सी हे नाववंत फुटबॉलपटू याच देशातील आहे. आर्जेन्टिनात कोळसा, शिसे, तांबे, जस्त, सोने, चांदी, निकेल व गंधकाचे साठे आहेत. हवाबंद डब्यात मांस भरून निर्यात करने, हा आर्जेन्टिनाचा प्रमुख उद्योग आहे.

आर्मेनिया

आर्मेनिया (अधिकृत नाव: आर्मेनियन: Հայաստանի Հանրապետություն) हा काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांमधील युरेशियाच्या दक्षिण कॉकेशस भागातील एक डोंगराळ वभूपरिवेष्टित देश आहे. या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्तान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैजान, तर दक्षिणेस इराण व अझरबैजानाचा नाख्चिवान प्रांत आहेत. पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांच्या उबरठ्यावरील या देशाचे ऐतिहासिक काळापासून युरोपाशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक लागेबांधे आहेत.२९,८०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या देशाची लोकसंख्या ३० लाख आहे. ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म असून येथील साक्षरता ९९ टक्के आहे. येरेवान ही या देशाची राजधानी आहे.

भूतपूर्व सोव्हिएत संघापैकी एक घटक प्रजासत्ताक असलेला आर्मेनिया आता बहुपक्षीय लोकशाहीवादी प्रजासत्ताक आहे. आर्मेनियाला प्राचीन सांस्कृतिक व राजकीय वारसादेखील लाभला आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या सुरुवातीला (सर्वसाधारण मान्यतेनुसार इ.स. ३०१) आर्मेनियाचे राज्य हे या ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे या परिसरातील पहिले राज्य होते. आजही आर्मेनियातील बहुसंख्य जनता ख्रिश्चन धर्मीय असली तरीही आर्मेनियाचे प्रजासत्ताक घटनात्मकदृष्ट्या धर्मनिरपेक्ष राज्य आहे. या देशाला १९९१ साली रशिया कडून स्वातंत्र्य मिळाले. हे एक डोंगराळ राष्ट्र असून येथील जमीन अतिशय सुपीक आहे. बटाटे, अाॅलिव्ह, द्राक्ष, कापूस ही येथील प्रमुख पिके आहेत.

इटली

इटली हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. हा देश विकसित देशांपैकी एक असून तो जी-७चा सदस्य आहे. इटली चे क्षेत्रफळ ३,०१,२५३ चौ.किमी एवढे आहे. लिरा हे इटली चे चलन असून इटली ची साक्षरता ९७ टक्के आहे. ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म असून इटालियन ही प्रमुख भाषा आहे. रोम ही इटलीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हा देश गंधकाच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे.इटली तील प्रमुख खेळ फुटबॉल आहे.

ईस्टर

ईस्टर म्हणजेच पुनरुत्थानाचा रविवार हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृतातून पुनः उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. नव्या करारानुसार येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी ४० दिवसांच्या उपवासाचा (लेन्ट) हा काळ संपतो.

ईस्टरचा आठवडा पवित्र आठवडा म्हणून ओळखला जातो. यातील शेवटचे तीन दिवस म्हणजते मौन्द्य गुरुवार, उत्तम शुक्रवार (इंग्लिश: Good Friday) व होली सॅटर्डे होत. त्यानंतरचा रविवार हा ईस्टर असतो.

ईस्टर ची तारीख दरवर्षी बदलते कारण वसंत संपात पौर्णिमेच्या नंतरचा पहिला रविवार म्हणजे ईस्टर असे इसवी सन ३२५ मध्ये भरलेल्या ख्रिस्ती बिशप लोकांच्या संमेलनात ठरवले गेले. यहुदी लोकांच्या पासोव्हर या सणाच्या ऐवजी ईस्टर साजरा केला जातो असे काहींचे म्हणणे आहे. कारण बर्याच युरीपियान भाषांमध्ये ईस्टर हा शब्द पासोव्हरचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.

ईस्टर साजरा करण्याच्या पद्धती मात्र देशागणिक वेगळ्या आहेत. प्रोटेस्टंट पंथीय लोकात "प्रभू उठला आहे" असे म्हणून येणाऱ्यांचे स्वागत केले जाते तर दुसरा माणूस " हो खरच प्रभू उठला आहे" असे म्हणून त्या स्वागतास प्रत्युत्तर देतो. काही देशात ईस्टर अंडी सजवण्याची प्रथा आहे. येशू नसलेल्या रिकाम्या कबरीचे प्रतिक म्हणजे अंडे. आणि प्रभू मृतातून उठला याचा आनंद झाला म्हणून अंडे सजवायचे अशी कल्पना आहे. काही पंथात सूर्योदयाच्या वेळी प्रार्थना केली जाते.

कॅथलिक धर्म

कॅथलिक धर्म हा ख्रिश्चन धर्मातील सर्वात मोठा पंथ वा संप्रदाय आहे. याला कॅथोलिक किंवा रोमन कॅथोलिक असेही म्हणतात. या पंथाचे सर्वोच्च पीठ इटलीमधील रोम शहरामधील व्हॅटिकन सिटी या देशात आहे. पोप हे या पंथाचे सर्वोच्च धर्मगुरु असतात.

कॅथलिक पंथ हा मुख्यत्वे इटली, स्पेन, पोर्तुगाल, ब्राझिल व लॅटिन अमेरिकेतील बहुतांश देशात आहे. ब्राझिल हा सर्वाधिक कॅथोलिक पंथाचे अनुयायी असलेला देश आहे. भारतातील ख्रिश्चन हे मुख्यत्वे कॅथोलिक आहे.

ख्रिश्चन धर्म

ख्रिस्ती धर्म किंवा ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म असून त्याला जवळजवळ दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. पॅलेस्टाईन (सध्याचा इस्रायल देश) येथे ख्रिस्ती धर्माचा प्रारंभ झाला. येशू ख्रिस्त हा या धर्माचा संस्थापक मानला जातो. ख्रिस्तपूर्व ४ ते ६ च्या दरम्यान येशूचा जन्म बेंथलेहम गावी झाला.ख्रिस्ती शकारंभी बलाढ्य रोमन साम्राज्य अटलांटिक महासागरापासून तुर्कस्तान पर्यंत व जर्मन समुद्रापासून सहारा पर्यंत पसरले होते. पालेस्तीन हा या रोमन साम्राज्यातील एक सुभा होता. योग्य वेळ आली तेव्हा गालील प्रांतातील बेंथलेहम या गावी येशूचा जन्म झाला. त्या वेळी पालेस्तीन देशावर रोमन सत्ता अधिकार गाजवीत होती. सम्राट ऑगस्टस हा या साम्राज्याचा सम्राट होता. त्याने गालील प्रांताचा मांडलिक राजा म्हणून हेरोद राजाला नेमले होते. याच्याच अमदानीत येशूचा जन्म झाला.

येशू (मूळ हिब्रू शब्द यहोशवा - यहोवा माझे तारण आहे.) या हिब्रू नावाचा अर्थ तारणारा असा आहे. तर ख्रिस्त हा शब्द ख्रिस्तोस या ग्रीक शब्दापासून बनला आहे. त्याचा अर्थ अभिषिक्त केलेला असा होतो. ख्रिस्तोस हा शब्द मसीहा (म्हणजे तारणारा) या हिब्रू शब्दाचे ग्रीक भाषेतील रूपांतर आहे. येशू धर्माने यहुदी होता. वयाच्या ३०व्या वर्षी त्याने आपल्या शिकवणुकीला प्रारंभ केला. जवळपास तीन वर्ष त्याने आपली शिकवण संपूर्ण गालील प्रांतात व आजूबाजूच्या परिसरात प्रसारित केली. त्याने बारा प्रेषितांची निवड करून त्यांना आपले कार्य पुढे चालविण्यास प्रोत्साहन दिले. यहुदी धर्मानुसार (जुना करार) पापी मानवाच्या तारणासाठी परमेश्वराने तारणारा (मूळ हिब्रू शब्द मसीहा) पाठविण्याचे अभिवचन दिले होते. जुन्या करारात या मसीहाबद्दल अनेक भविष्ये वर्तविली गेली होती. येशू हाच तारणारा (मसीहा) आहे अशी ख्रिस्ताच्या शिष्यांची खात्री झाली होती. वयाच्या ३३ व्या वर्षी यहुदी धर्माधिकाऱ्यांनी त्याच्यावर धर्मद्रोहाचा व राष्ट्रद्रोहाचा आरोप करून तत्कालीन रोमन सत्ताधीशांच्या करवी त्याला क्रुसावर खिळवून ठार केले. परंतु मरणानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. त्याने आपल्या अनेक प्रेषितांना दर्शने दिली. व त्याची शिकवण जगभर प्रसारित करण्याची आज्ञा दिली. त्यांनंतर तो स्वर्गात गेला. असा ख्रिस्ती धर्मीयांचा विश्वास आहे. त्याच्या आज्ञेनुसार त्याच्या प्रेषितांनी ख्रिस्ती धर्माचा जगभर प्रसार केला. बायबल (जुना व नवा करार) हा ख्रिस्ती धर्माचा धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या बाबतीत सगळ्यात मोठा धार्मिक समुदाय आहे. ख्रिस्ती धर्मात तीन मुख्य पंथ आहेत. १. कॅथोलिक, २ ईस्टर्न ऑर्थोडॉक्स, ३. प्रोटेस्टंट . या पंथांतही (विशेषतः प्रोटेस्टंट पंथात) प्रेस्बिटेरियन, कॅल्व्हिनिस्ट आदी अनेक उपपंथ आढळतात. ख्रिस्ती धर्मपंथ : ख्रिस्ती धर्मात मुखत्वे तीन धर्मपंथ आढळून येतात. १. रोमन कॅथोलिक २. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स,३. प्रोटेस्टंट. रोमन कॅथोलिक पंथ हा धर्मातील कर्मठ परंपराचे जतन करतो. रोमन कॅथोलिक पंथ रोमच्या पोपची धार्मिक सत्ता मान्य करते. हा ख्रिस्ती धर्मातील सुधारणावादी विचारांचे समर्थन करतो. रोमन कॅथोलिक पंथ आणि ईस्टर्न ऑर्थोडॉक्स पंथ यांच्याशिकवणुकीत व विचारात विशेष फरक नाही. फक्त ईस्टर्न ऑर्थोडॉक्स पंथ हा रोमच्या पोपची सत्ता मान्य करीत नाही तर त्याऐवजी कॉनस्तंटटीनोपलची सत्ता सर्वोच्च मानतात. या पंथांच्या धार्मिक श्रद्धा, धार्मिक विधी या बाबतीत बरीच मतभिन्नता असली तरी येशू ख्रिस्ताबाबत असलेले तीन घटक सर्वांनाच मान्य आहेत. ते तीन घटक खालीलप्रमाणे :

१. ख्रिस्ताचा जीवन वृत्तांत : येशू ख्रिस्ताच्या जीवन व कार्यासंबंधी सर्वे घटनांचे संकलन करणारे वृत्तांत (चार शुभवर्तमाने - Four Gospels)

२. धर्मसिद्धांत : येशु ख्रिस्त ही एकमेव अद्वितीय व्यक्ती व परमेश्वराचा पुत्र असून त्याच्या द्वारेच मानवाला तारणप्राप्ती होऊ शकते. तो देव व मानव यांच्यातील एकमेव मध्यस्थ आहे.

३. मानवी जीवन : परमेश्वराबद्दल व आपल्या सहकाऱ्याबद्दल प्रेम बाळगून जीवन व्यतीत करण्याचा ख्रिस्ती मनुष्य प्रयत्न करतो, म्हणजेच ख्रिस्ताच्या आदर्श जीवनाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करण्याचा ख्रिस्ती व्यक्ती प्रयत्न करते.

गुड फ्रायडे

गूड फ्रायडे (पवित्र शुक्रवार/चांगला शुक्रवार/काळा शुक्रवार/महा शुक्रवार) हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिवस आहे. ईस्टरच्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गूड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे साजरा होतो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. काही भाविक लोक चर्च मध्ये जाउन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.

गोवा

गुणक: 15.493°N 73.818°E / 15.493; 73.818

गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मार्च ११ १९९३ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ चौ.किमी एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे. कोकणी व मराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्याचे पिक घेतले जाते. गोव्याची साक्षरता जास्त , म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात.

गोव्यात सगळी माणसे प्रेमाने राहतात.

पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को व पोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले . व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला.

निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे.निसर्गरम्य ठिकाण अशी भारतात गोव्याची ओळख आहे.

चिली

चिलीचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Chile उच्चार ) हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे. चिलीच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला आर्जेन्टिना हे देश आहेत. चिलीला ६,४३५ किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. प्रशांत महासागरातील ईस्टर द्वीप चिलीच्या अधिपत्याखाली येते तर अंटार्क्टिका खंडाच्या १२,५०,००० वर्ग किमी भागावर चिलीने आपला हक्क सांगितला आहे.

१६व्या शतकामध्ये स्पॅनिश शोधक येण्यापुर्वी येथे इन्का साम्राज्याची सत्ता होती. १२ फेब्रुवारी १८१८ रोजी चिलीला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. आजच्या घडिला चिली हा दक्षिण अमेरिकेमधील सर्वात स्थिर व समृद्ध देश आहे.चिली देशाची एकुण लांबी (दक्षिणोत्तर) ४,३०० किमी तर सरासरी रुंदी (पूर्व-पश्चिम) केवळ १७५ किमी आहे. ह्यामुळे चिली मध्ये विविध प्रकारचे हवामान आढळते.

चिलीचे एकूण क्षेत्रफळ ७,५६,९४५ वर्ग किलोमीटर एवढे असून लोकसंख्या १७.१ दशलक्ष आहे. या देशाचा मुख्य धर्म ख्रिश्चन असून स्पॅनिश ही राष्ट्रभाषा आहे. पेसो हे चलन असलेल्या या देशाचे प्रतिव्यक्ती उत्पन्न १०,०८४ अमेरिकन डॅालर एवढे आहे. चिलीला १८ सप्टेंबर १८१० रोजी स्पेन कडून स्वातंत्र्य मिळाले.

चिलीत संपूर्ण जगातून सर्वाधिक तांब्याचे उत्पादन होते. त्यामुळे हा जगातील सर्वात मोठा तांब्याची निर्यात करणारा देश आहे. चिलीत नायट्रेट, सोने, चांदी, लिथियम व लोहाचे सुद्धा प्रचंड साठे आहेत.

पाम संडे

पाम संडे (झावळ्यांचा रविवार) हा ख्रिश्चन सण आहे. हा सण ईस्टर संडेच्या एक आठवड्या पूर्वी साजरा केला जातो. जेरुसलेम नगरीत येशुचा प्रवेश आणि त्या नंतरची मेजवानी तसेच येशूचे बलिदान याची सुरुवात झावळ्यांच्या रविवार ने होते. याची उल्लेख नव्या करारातील चारही शुभवर्तमानांमध्ये केला गेलेला आहे.

पेंटेकोस्ट

पेंटेकोस्ट एक ख्रिश्चन सण आहे. ईस्टर नंतर सातव्या रविवारी (४९ दिवस) हा सण साजरा केला जातो. बायबलतील प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे हे जेव्हा जेरुसलेम मध्ये आठवडे सण साजरे करताना येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांना व इतर अनुयायांवर पवित्र आत्माच्या वंशाचा स्मारक होते. काही ख्रिस्ती विश्वास करतात की हा कार्यक्रम कॅथोलिक चर्चचा जन्म दर्शवतो.

पोप

पोप (लॅटिन: papa; ग्रीक: πάππας) हा रोमचा बिशप व जागतिक कॅथोलिक चर्चचा सर्वोच्च पुढारी आहे. कॅथोलिक चर्चमध्ये पोपला सेंट पीटरचा वंशज मानले जाते. १३ मार्च २०१३ रोजी निवडला गेलेला पोप फ्रान्सिस हा विद्यमान पोप आहे.

ख्रिश्चन धर्मगुरूसोबतच व्हॅटिकन सिटी ह्या सार्वभौम देशाच्या राष्ट्रप्रमुखाची जबाबदारी पोप सांभाळतो. मानवी इतिहासामधील सर्वात जुन्या नेतेपदांपैकी एक असलेले पोपचे पद इ.स. च्या तिसऱ्या शतकामध्ये स्थापन करण्यात आले.

बाबा पदमनजी मुळे

बाबा पदमनजी मुळे ऊर्फ बाबा पदमनजी (इ.स. १८३१ - ऑगस्ट २९, इ.स. १९०६) हे मराठी ख्रिस्ती धर्मप्रसारक होते. ते मराठीतील ख्रिस्ती साहित्याचे जनक मानले जातात. त्यांनी लिहिलेली शंभराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची यमुनापर्यटन ही कादंबरी मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी असल्याचे मानले जाते.'अरुणोदय'या नावाने त्यांचे आत्मचरीञ प्रसिद्ध आहे.

बायझेंटाईन साम्राज्य

बायझेंटाईन साम्राज्य (देवनागरी लेखनभेद : बायझेंटाइन साम्राज्य, बायझेन्टाईन साम्राज्य; ग्रीक: Ῥωμανία ; लॅटिन: Imperium Romanum, इंपेरिउम रोमानिउम ;) हे भूमध्य समुद्र व नजीकच्या भूप्रदेशावर पसरलेले मध्ययुगातील ग्रीक भाषक-बहुल साम्राज्य होते. सम्राट कॉन्स्टंटाइनाने रोमन साम्राज्याची राजधानी रोम येथून कॉन्स्टँटिनोपल येथे हलवल्यानंतर ग्रीस हे रोमन साम्राज्याचे केंद्र झाले. पुढे रोमन साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर पूर्व रोमन साम्राज्य हे बायझेंटाईन साम्राज्य म्हणून ओळखू जाऊ लागले. याची राजभाषा ग्रीक होती. याच काळात बायबलाची रचना झाली व ख्रिश्चन धर्म हा बायझेंटाईन साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला. बायझेंटाईन राज्य हे आफ्रिका, मध्य युरोप, पर्शियापर्यंत पसरले होते. अनेक प्रांत या साम्राज्यात असले तरी या साम्राज्याची ख्रिश्चन धर्मीय म्हणून ओळख होती. बेलारियस व तिसरा लिओ यांसारख्या महान सेनांनीनी हे साम्राज्य विस्तारले.

इस्लामाचा उदय झाल्यानंतर इस्लामी फौजांचे पहिले आक्रमण बायझेंटाईन साम्राज्यावर झाले. त्यात त्यांना आफ्रिका व मध्यपूर्वेकडचा भाग गमवावा लागला. तुर्कांचे आक्रमण होईपर्यंत पुढील अनेक वर्षे युरोपातील भूप्रदेश बायझेंटाईन साम्राज्याने टिकवून ठेवले. दरम्यान इ.स.च्या १० व्या शतकात बायझेंटाईन ख्रिस्ती धर्माधिकार्‍यांचे व रोमच्या ख्रिस्ती धर्माधिकार्‍यांचे मतभेद टोकाला गेले, रोम व ग्रीसमध्ये पुन्हा एकदा दरी निर्माण् झाली. ग्रीसचे ख्रिस्ती लोक स्वत:ला पारंपारिक ख्रिस्ती म्हणू लागले. बायझेंटाईन साम्राज्याचा प्रभाव ग्रीस व सभोवतालच्या देशांवर ११०० वर्षांपर्यंत राहिला. बायझेंटाईन साम्राज्याने इस्लामी आक्रमणे अनेक शतकांपर्यंत थोपवून धरली होती. परंतु सरतेशेवटी ओस्मानी साम्राज्याने कॉन्स्टँटिनोपलाचा पाडाव केला व ११०० वर्षांची एकछत्री सत्ता संपुष्टात आणली.

भायखळा

भायखळा स्थानक हे मुंबईच्या मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील सी.एस.टी स्थानकाआधीचे महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकाची निर्मिती इंग्रजांकरवी १८५७ साली झाली. मुंबई महानगर पालिकेकडून प्रशासकीयरीत्या भायखळा हा 'ई' वार्डात विभागला जातो.विकास हे खऱ्या शहरीकरणाचे लक्षण आहे. पालिकेच्या प्रशासकीय कामांसाठी लागणाऱ्या सर्व छापील सामग्रीची छपाई ही इथल्या मुद्रणालयात केली जाते. १९३५ सालापर्यंत मुंबई महानगर पालिकेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे ही टाईम्स ऑफ इंडिया सारख्या खाजगी वृत्तपत्रांच्या मुद्रणालयात छापली जात असत. तत्कालीन गव्हर्नर वॉन टॉम यांनी मात्र खाजगी मुद्रणालयांवर विसंबून न राहता निविदा काढून १ मार्च १९३५ रोजी एन्ट हॉस्पिटलच्या तळमजल्यावर मुंबई महानगर पालिकेचा पहिला छापखाना काढला. त्यावेळी छापखान्यात सहा कामगार होते. सुरुवातीस अक्षरांची जुळणी हाताने करावी लागत असे, त्यानंतर १९५० साली कर्नाक ब्रिज इथल्या क्रशर ग्राउंडेड बिल्डिंगमध्ये मशीन कंपोझिंगच्या लायनो-मोनो तंत्रावर आधारित अद्ययावत छापखाना सुरू करण्यात आला. १९६७ साली मधुकर कामतांची छपाई तंत्रज्ञ म्हणून नेमणुक करण्यात आली. जर्मनीतील ड्रुपा येथे दर तीन वर्षांनी भरणाऱ्या छपाई तंत्रज्ञान प्रदर्शनाचा उपयोग करून १९८० नंतर तत्कालिन सरकारने ऑफसेट छपाई तंत्रज्ञान कालबाह्य ठरवत डी.टी.पी तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. यानंतर २००७ मध्ये अत्याधुनिक हेडलबर्ग कलर मशीनचा उपयोग सुरू झाला. या मुद्रणालयात वैद्यकिय, शैक्षणिक साहित्य, करपावत्या, विविध प्रकारचे लेखन साहित्य, मोठ्या नोंदवह्या, अंदाजपत्रके, जनजागृतीपर सामाजिक-नागरी संदेश देणारी पत्रके इत्यादी प्रकारची छापकामे केली जातात. तंत्रज्ञान क्रांतीचा वेग इतका प्रचंड आहे की कामगारवर्ग कालबाह्य न ठरता बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या वर्षी ह्या मुद्रणालयाची ७५वी वर्षपुर्ती झाली. येथील कामगारवर्ग हा प्रामुख्याने स्थानिक मराठी भाषिक आहे. ई तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड वाढत असला तरी तो शहरी भागापुरताच मर्यादित दिसतो. जो पर्यंत तंत्रज्ञानाचा असमतोल आहे तो पर्यंत छापिल माध्यमांचे महत्त्व अबाधित राहिल. याशिवाय भारतीय राज्यघटनेत सरकारी दस्तावेज कागदोपत्री असावेत अशी अटही आहे, त्यामुळे छापिल माध्यमाचे महत्त्व हे अबाधित असल्याचे दिसुन येते.

पालिका शाळेच्या इमारतीतच प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजुला सोशल ऍक्टिविस्ट इंटिग्रेशन- ’साई’ नावाची संस्था आहे. सामाजिक संस्था ह्या समाजातिल पीडित घटकांना आधार देउन त्यांचे प्रतिनिधीत्व करतात. एकप्रकारे या संस्था पिडितांचे पालकत्व घेत असतात. ’साई’ ही संस्था प्रामुख्याने मुंबई परिसरातील एच.आय.व्ही बाधित वारांगनांचे पुर्नवसन करते. ए.आर.टी ट्रीटमेंट आणि एच.आय.व्ही वरील मोफत उपचार करणारी ही पहिली संस्था आहे. याशिवाय वारांगनांच्या वस्तीत जाउन विविध प्रकारे एच.आय.व्ही एड्स विषयी जनजागृती करते. जन्मजात एड्स बाधीत मुले, तृतीयपंथी, हिजडे, सामान्य नागरिक यांसारख्यांसाठी साई विविध प्रकारच्या यशस्वी योजना राबबते. साई शिवाय भायखळ्यात शेल्टर होम्स, बाल्डीवाला चॅरिटी ट्रस्ट, आहल-ए-सुन्नत वेल्फ़ेअर ट्रस्ट, कॅन्सर रिसर्च फ़ाउंडेशन, हेलन केलर इन्स्टिट्युट फॉर ब्लाइंड्स ऍन्ड डिफ्स, आदि सामाजिक संस्था आहेत.

ना.म. जोशी मार्गाने पुढे येत असताना डाव्या बाजुला भायखला लोहमार्ग रेल्वे पोलिस स्टेशन आहे. पोलिस स्टेशनमधील कॉन्स्टेबलबरोबर भायखळा (प.) स्टेशन समोर असलेल्या केळे गल्लीत शिरलो. इथे केळांचे गोदाम असल्यामुळे या गल्लीस केळे गल्ली असे नाव पडले. गल्लीच्या सुरुवातीस किरकोळ दुकाने आहेत. आतील परिसर मात्र अत्यंत बकाल आहे. खुज्या झोपडपट्ट्या, रस्त्यावरुन भरून वाहणारी गटारे, त्याच रस्त्यावर खेळणारी उघडी फाटक्या मळक्या कपड्यांतील मुले असे एकंदर चित्र दिसले. या गल्लीतच एक सिटी ट्रस्ट नावाची नवीन इमारत आहे. या भागात फक्त हिच एक नवीन इमारत असून या इमारतीच्या एका २ बी.एच.के फ्लॅटचा दर २०-२२ लाखाच्या आस पास आहे. या इमारतीजवळ उभे राहिले असता समोरच काही अंतरावर दुसरा रेसिडेन्सी टॉवर दिसतो. त्या टॉवर मधील तेवढ्याच जागेचा दर मात्र ४५ लाखांवर आहे. मी भायखळा शहरात असलो तरी तो परिसर मात्र शहरी नव्हता किंबहुंना तेथील लोकही शहरी नव्हते. या परिसरात कोणत्याही प्रकारचा लहान उद्योग-धंदा नाही, फक्त मजुरी करणारा कष्टकरी वर्ग आणि त्यांची कुटुंबे इथे रहातात. येथील लोक कोणत्याही प्रकारचा कर भरत नसल्या कारणाने सुधारणेस कोणताच वाव दिसत नाही. हा परिसर भायखळ्यातील असला तरी शहरी मात्र वाटत नव्हता.

ना.म. जोशी मार्गावरील भायखळा अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोरुन मी तात्यासाहेब घोडके चौकातुन उजवीकडे वळुन पालिकेच्या ’ई’ वॉर्ड कार्यालयात गेलो. आसपासचा परिसर हा मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय मध्यमवर्गीयांचा आहे. ’ई’ वॉर्ड कार्यालयासमोरच ख्रिश्चन प्रोटेस्टंट पंथियांचे चर्च आहे. ’ई’ वॉर्डाचे क्षेत्रफळ हे ७.३२ कि.मी. आहे. २००१ च्या जनगणनेनुसार या वॉर्डाची लोकसंख्या ४,४०,३३५ इतकी आहे. वॉर्डाच्या सीमारेषा ह्या विविध रस्त्यांद्वारे ठरवल्या गेल्या आहेत. पुर्वेस रे रोड, पश्चिमेस साने गुरुजी रोड, उत्तरेस दत्ताराम लाड मार्ग आणि दक्षिणेस रामचंद्र भट्ट मार्ग अशा चौकटीत ’ई’ वॉर्ड आहे. याशिवाय या भागात सहा प्रकारच्या समाजसेवी संस्था आहेत.

’ई’ वॉर्ड कार्यालयापुढे चालत गेल्यास ’साखळी इस्टेट’ नावाचा संपूर्ण मुस्लिम बहूल परिसर आढळतो. स्थानिकांकडून या नावाचा ’सांकली इस्टेट’ असा उच्चार केला जातो. साखळी इस्टेटच्या पहिल्या गल्लीत मी उजव्या बाजूने शिरलो. आजुबाजूला उर्दू भाषेतील पाट्या लक्ष वेधून घेतात. येथील इमारती ह्या दु-तीमजली आहेत. बांधकाम जुन्या पद्धतीचे आणि परिसर काहीसा अस्वच्छ आहे. येथील घरे ही अरुंद आणि फार चिंचोळ्या आकाराची आहेत. स्थानिकांकडून भायखळा आणि या परिसराच्या इतिहासाविषयी जाणून घेतले असता १९४० सालच्या सुमारास हा परिसर फार कमी दाटीवाटीचा होता असे कळाले. त्या सुमारास ह्या परिसरात ट्राम चालत असे. सुरुवातीस हा भाग ख्रिश्चनबहूल होता या भागाच्या एकूण लोकसंख्येच्या १/३ लोकसंख्या ही ख्रिश्चन धर्मीय होती. नंतर मात्र कुटुंबातील सदस्य संख्या वाढू लागल्याने ख्रिश्चन धर्मिय हा परिसर सोडून उपनगरांत जाऊ लागले. या परिसरात राहणारा मुस्लिम आणि हिंदू हा गिरण्यांमधे काम करणारा कामगार होता. सुशिक्षित ख्रिश्चन हा बँका, शाळा वगैरे कार्यालय़ांत काम करत होता तर अशिक्षित ख्रिश्चन हा श्रीमंत ख्रिश्चनांकडे घरकाम करत होता. भायखळ्यात पहिले फिनिक्स, इंडिअन, गार्डन, ब्रॅडबरी, सिंप्लेल्स, शक्ती या कापड गिरण्या होत्या. रस्ते फार चांगले नव्हते पण मुंबई-आग्रा रोड रहदारीचा मुख्य रस्ता होता. नाले पुर्वी पाण्याने साफ केले जात असत आता मात्र स्वच्छतेचा बोजवारा उडालेला दिसतो. मौलाना आझाद रोड, जेकब सर्कल, भायखळा ब्रिज, नागपाडा हे पहिले वस्तीचे प्रमुख परिसर होते. भायखळ्याला अन्न-धान्याचा पुरवठा हा पुणे, नाशिक, येथून होत असे. किंग्सले डेविसची ’एस कर्व’ ही संकल्पना भायखळ्याच्या बाबतीत लागू पडते. औद्योगिकरण झाल्यानंतर प्रामुख्याने शहरीकरण झालेले दिसते. मात्र गिरण्या बंद पडल्यानंतर पुन्हा कर्वची गती कमी झालेली आढळून येते.मौलाना आझाद, रिपन रोड, नागपाडा, सुरती मोहल्ल्यात मुस्लिम धर्मीय जास्त संख्येने राहत असत. लालबाग, एस ब्रिज, जेकब सर्कल या भागात हिंदू तर नागपाड्यात ज्यू आणि माझगांव, साखळी रोड या भागात पूर्वी ख्रिस्त लोक रहात असत.

येशू ख्रिस्त

येशू ख्रिस्त (इ.स.पू ४ ते इसवी सन ३० अंदाजे) हा ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी आहे. त्‍याला मरियम पुत्र, नासरेथ गावाचा येशू, प्रभु येशू खिस्‍त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसीह असेही म्‍हटले जाते, ख्रिस्‍ती धर्मग्रंथातील (बायबलमधील) नवा करार नामक उपग्रंथ येशूच्‍या जन्मासंबंधी, तसेच त्‍याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. बायबल हा ग्रंथ ख्रिस्ती धर्माचा एकमेव पवित्र ग्रंथ आहे.

रशिया

रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. रूबल हे रशियाचे चलन आहे. ख्रिश्चन व निधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.

लेबेनॉन

लेबेनॉनचे प्रजासत्ताक (देवनागरी लेखनभेद: लेबनॉन; अरबी: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया ; फ्रेंच: République libanaise, रेपुब्लिक लिबानेस ;) हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरूत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. त्रिपोली व सैदा ही येथील इतर मोठी शहरे आहेत.

मानवी इतिहासाची नोंद होण्यापूर्वी लेबेनॉनमध्ये लोकवस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. सुमारे इ.स. पूर्व १५५० ते इ.स.पूर्व ५४३ दरम्यान हा भूभाग फीनिशिया संस्कृतीचा भाग होता. इ.स.पूर्व ६४ मध्ये लेबेनॉन रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये येथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढत राहिला. मध्य युगाच्या सुरूवातीच्या काळात मुस्लिमांनी येथे आक्रमण करण्यास सुरूवात केली. इ.स. १५१६ ते इ.स. १९१८ ह्या दरम्यानच्या ४०० वर्षांच्या काळात लेबेनॉनवर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. पहिल्या महायुद्धामध्ये ओस्मानी साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ओस्मानी भूभागाच्या वाटण्या करण्यात आल्या. लेबेनॉनवर १९२० ते १९४३ दरम्यान फ्रान्सची सत्ता होती. २२ नोव्हेंबर १९४३ रोजी लेबेनॉनने स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४६ साली दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच सैन्य लेबेनॉनमधून बाहेर पडले.

स्वातंत्र्यानंतर लेबेनॉनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत गेली व बैरूत जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक बनले. १९७५ ते १९९० दरम्यान चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये लेबेनॉनमधील पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. युद्धानंतर पंतप्रधान रफिक हरिरीने लेबेनॉनला पुन्हा प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले. २००५ मधील हरिरीच्या हत्येनंतर लेबेनॉनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे सिरियाने लेबेनॉनमधील आपले सर्व सैन्य काढून घेतले व अनधिकृतपणे बळकावलेला भूभाग परत दिला. २००६ साली लेबेनॉनच्या हिझबुल्ला ह्या अतिरेकी पक्षाने इस्रायलसोबत पुकारलेल्या युद्धामध्ये लेबेनॉनची पुन्हा पडझड झाली.

वेल्लूर

वेल्लूर हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या वेल्लूर जिल्ह्याचे एक लहान शहर आहे. वेल्लोर शहर तमिळनाडूच्या उत्तर भागात चेन्नईपासून १२५ किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली वेल्लूरची लोकसंख्या १.८५ लाख होती. वेल्लूर हे तमिळनाडूमधील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. येथील व्ही.आय.टी. विद्यापीठ हे अभियांत्रिकी कॉलेज व ख्रिश्चन मेडिकल कॉलेज हे वैद्यकीय कॉलेज भारतामधील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपैकी एक मानली जातात.

काटपाडी जंक्शन हे बंगळूर-चेन्नई रेल्वेमार्गांवरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे.

ख्रिश्चन 
ख्रिस्ती धर्म पाळणारे व्यक्ती
StJohnsAshfield StainedGlass GoodShepherd Face
माध्यमे अपभारण करा
प्रकार religious identity
उपवर्ग believer
ह्याचा भाग ख्रिश्चन धर्म
चा आयाम ख्रिश्चन धर्म

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.